✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा* 💥 ठळक घडामोडी :- १८४८- पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सुरू. १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले. 💥 जन्म :- १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते. १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक. १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक. १९४३ - रघुनाथ माशेलकर . 💥 मृत्यू :- १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ. १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्र सेवा दलाकडून ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कारांची घोषणा, प्रतिभा शिंदे, अनिता ढोले व प्रियांका तमायचीकर यांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विनाअनुदानित गॅस सिलेंडर 120 रुपयांनी स्वस्त; अनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 5.11 रुपयांची कपात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सुधीर भार्गव यांची मुख्य माहिती आयुक्तपदी निवड, मंगळवारी राष्ट्रपती भवनात घेणार शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार, राज्य सहकारी बँक असोसिएशनने केले जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज 2 जानेवारीपर्यंत स्थगित.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बंगळुरू - कर्नाटकमधील ज्येष्ठ अभिनेते सी.एच. लोकनाथ यांचे निधन, 350 चित्रपटात केलं होतं काम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *महाराष्ट्राच्या स्मृती मानधानाचा ICC कडून गौरव, 11 वर्षांनंतर भारतीय खेळाडूला मिळाला मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/Bks4qsAT6S Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्ष सुखाचे जावो* *🄷 🄰 🄿 🄿 🅈* *🄽 🄴 🅆 🅈 🄴 🄰 🅁* 2⃣0⃣1⃣9⃣ https://prajawani.in/news_page.php?nid=647 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्ष नवे स्वप्न नवे* प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा, असा विचार सुरू होतो. काहींच्या मनात सुरू असलेले विचार 'थर्टी फर्स्ट'च्या रात्रीच रंगबिरंगी मद्याच्या सुंगधात तर काहींचे सिगारेटच्या धुरात विरून जातात. परंतु, काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात. हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात. त्यांचे हे संकल्प एक- दोन दिवसासाठी नव्हे तर वर्षानुवर्ष पाळले जातात. मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही यावर्षी काही संकल्प करूया आणि ते पाळूयाही. *ह्या परीपाठाच्या प्रसारणा सोबतच* नूतन वर्ष सुरु होत आहे.धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना गुणदोषांसहीत स्वीकारत असतो. त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो, की त्याचा आपल्याला तर मन:स्ताप तर होतोच. परंतु, त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो. आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो. परंतु, त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे. स्वत:साठी वेळ काढा - घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात 'सॅंडविच' होत असते. त्यामुळे व्यक्तीचा स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. दिवसभरातून किमान 10 ते 15 मिनिटे स्वत:साठी काढून ठेवली पाहिजे. या पंधरा मिनिटात आपण एखादा छंद जोपासू शकता. व्यायाम करून फिट राहू शकता. सकारात्मक विचार करायला शिका - एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे, त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाच बाऊ करणे, हा आपला स्वभाव बनून जातो. त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे. आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही, हे ठामपणे ठरविले पाहिजे. अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात. अगदी कठिण परिस्थितीत आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात. स्वत:ची कामे स्वत: करा - आपल्याला सगळ्यात जास्त त्रास स्वत:मुळेच होतो. कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते. त्यात आपला आद्य शत्रू म्हणजे आळस. आपण किमान स्वत:ची तरी कामे स्वत: केली पाहिजेत. नियोजन आखून कामे उरकली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लागते.. *नव-वर्षाची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात* *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही…! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?* पश्चिम बंगाल *२) रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?* मुंबई *३) ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली ?* १९६५ *४) स्मार्ट सिटी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे शहर कोणते ?* भुवनेश्वर *५) इस्त्रोची स्थापना कधी झाली ?* १९६९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरेश सावंत, नांदेड ● नंदन नांगरे ● भास्कर रेड्डी ● बालाजी वरगंटवार ● अतुल चव्हाण ● दिलीप धामणे, हिंगोली ● अनिकेत भारती, नांदेड ● राज जयस्वाल, माहूर ● धोंडिबा गायकवाड, धर्माबाद ● शेख बिस्मिल्ला सोनेशी ● मनमोहन कदम, धर्माबाद ● पांडुरंग कोकुलवार, नांदेड ● संजय पाटील शेळगावकर ● सतीश शिंदे ● मधुकर गिरमे ● सविता धर्माधिकारी, लातूर ● चंद्रकांत दामेकर, नांदेड ● सुनेत्रा बेल्लूरकर ● लक्ष्मीकांत बेंकट, करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• @@ *गुगली* @@ *नववर्षाभिनंदन* मावळत्याचा आदर नव्याचे स्वागत आहे अशांचीच किंमत जे या न्यायाने वागत आहे मावळत्याकडून धडा नव्या कडून शिकायला हव सर्वांना सुखा समाधानाच आनंदाच जावं हे वर्ष नव *नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा* शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 〰 ‼ *विचार धन* ‼ 〰 *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नर नारी के सूख को, खांसि नहि पहिचान त्यों ज्ञानि के सूख को, अज्ञानी नहि जान। सारांश ज्ञानी माणसाला सुखाचा खजिना प्राप्त झालेला असतो. तो सुखाला कधीच पारखा होत नाही. सुखाच्या शोधासाठी स्वतःचं अस्तिव गमावून तो फसव्या मृगजळाच्या मागं धावत सुटत नाही. आपल्या कडच्या उपलब्ध साधनातून तो आनंदाची निर्मिती करतो. त्यात त्याला त्याच्या आनंद लहरी समाधान देत असतात. मात्र अज्ञानी माणूस सुखाच्या शोधात कस्तुरी मृगासारखा स्वतःची व स्वतः जवळील कस्तुरीची ओळख नसल्यामुळे धाव धाव धावतो अन ऊरी फुटून आत्मघात करून घेतो. सुखाचे कारंजे स्वतःच्या ठायीच दडलेले असूनही ते उजागर करता न आल्याने तो सुखाला पारखा होत असतो. त्याचे कारण म्हणजे अज्ञान. अज्ञानी माणूस केवळ भ्रमात जगत असतो. त्याला इच्छित गोष्ट साध्य झाली नाही की तो हताश व खिन्न होतो. हे हताशपण त्याला नैराश्याकडेही नेऊ शकते. मात्र ज्ञानी माणसाचं तसं नसतं तो भ्रमात जगत नाही. आपल्या आवाक्यातल्याच गोष्टी साध्य करण्याची त्याची कोशिश असते. त्यात तो यशस्वी नाही झाला तरी हिमत हारत नाही. अपयशाची कारणे शोधतो व नव्या उमेदीने पूनर्रभरारी घेत असतो. नपुंसकाला समागमाचे सुख काय कळणार ? तसे अज्ञान्याला ज्ञानी माणसाच्या सुखाची काय लज्जत चाखता येणार बरे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अज्ञान - Ignorance* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मन करारे प्रसन्न* एक खूप प्राचीन कथा आहे. श्वेतकी नावाचा एक राजा होता. तो खूप यज्ञ करत असे. त्यामुळे त्याची खूप ख्याती झाली होती. त्याने एकदा सलग बारा वर्षे अग्नीदेवाला अखंड शुद्ध तुपाची आहुती दिल्याने अग्नी देवाची पाचनशक्ती वाढली. याचा वाईट परिणाम असा झाला, की अग्नीदेवतेचे तेज कमी झाले आणि तो मंद पडला मग त्याने ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि त्यांना तेज परत मिळविण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला खांडव येथील जंगल जाळून टाकण्याचा सल्ला दिला. त्याने तसे केले, परंतु इंद्रदेवाने पाणी टाकून ती आग विझवली. मग त्याने कृष्ण आणि अर्जुनाला आपल्या साह्यतेचे आवाहन केले. अर्जुनाने अग्नी देवाला विनंती केली, की मला देवेंद्राशी युद्ध करण्यासाठी तू शस्त्रे पुरवायची. अग्नी देवाने त्याला गांडीव धनुष्य आणि दिव्यास्त्र दिले, तर कृष्णाला एक चक्र भेट दिले. यानंतर अग्नी देवाने आपल्या शक्तीद्वारे पुन्हा खांडव जंगल जाळण्यास सुरुवात केली. वाढत्या आगीने पृथ्वीवर मात्र हाहाकार माजला. त्यावर परत देवेंद्राने आपल्या शक्तीने पाऊस पाडण्यास सुरुवात केली, परंतु अर्जुन आणि कृष्णाने पावसाला रोखले. यावेळी इंद्राच्या मदतीला देव, असुर, यक्ष, राक्षस, सर्प असे अनेक जण धावून आले, परंतु या साऱ्यांचा कृष्ण आणि अर्जुनापुढे निभाव लागला नाही. अखेर अग्नी देवतेने आपली आग पसरवल्याने त्यांची तब्बेत पूर्ववत झाली. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज परतले. तात्पर्य इतकेच की, जर शरीर सुखी असेल, तर मनही प्रसन्न राहते. आणि मन प्रसन्न तर चेहऱ्यावर आपोआप तेज दिसते. तुम्हाला ताजेतवाने दिसायचे असेल तर तुम्हाला आपले शरीर तर स्वस्थ ठेवायलाच हवे. परंतु, याच सोबत आपले मनही प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
न🔨यन वाट शब्द ओठांवर येऊन नयनी ओघळल्या अश्रूंचा धारा* *संवेदनशील भाव कोमेजून गेले* *कशासाठी देतोस वेदनेस थारा* मी सारं मज जीवनाचे शोधीले शब्दांतुनी तुझीया भाव मज सुकोमल जाहले कशासाठी?देतोस आता दुःख गेलीत लया वाट पाहूनीया चांदण्याचा साज शृंगार तो गंधाळला अन् गंधाळलेल्या आसमंतात नयनमनोहर आसवांचा जाहला नेञास करारी लागे मग नजरेसमोर नजरेचा का आहेत आडवाटा ?? अन् ओसरलेल्या अश्रूतही संवेदना आहेत तुझ्या..... ............ अन् ओसरलेल्या अश्रूतही संवेदना आहे तुझ्या ....... संवेदना आहे तुझ्या....... 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे (हदगाव.)
*वाट ही वेडी जराशी* वाट ही वेडी जराशी तुझ्या प्रेमळ स्वप्नाची नित्य मज आठवण मनात येई उराशी तुझ्या गोड शब्दांनी भाव सजले माझा मनी तुझ्यासारखे नाही कोणी मज न दिसे जगी जीवनी असे रुप तुझे गंधाळलेले श्वासात माझा वसलेले ध्यासात तू , श्वासात तू वाट वेडीस लाविलीस तू तुझ्या शब्द अमृताची गोडी मज कैसी लागीली अन् तुला न बोलताही वाट ही वेडीची जराशी न गेली ध्यास तुझ्या प्रेमाचा भक्ती आणि प्रितीचा मोहन माझा मनातला जडलाय जीव जीवातला........ 〰〰〰〰〰〰〰 दिनांकः३०-१२-२०१८ 〰〰〰〰〰〰 *✍प्रमिला सेनकुडे* *नांदेड (ता.हदगाव)*
🌹 *जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 (दिनांक३०- १२- २०१८) माणसाने आपल्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या आंतरिक सौंदर्यावर लुब्ध झालेले अतिउत्तम. कारण सौंदर्य हे सत्य शोधण्याच्या दृष्टीत असते. आणि ही सौंदर्यात सत्य शोधण्याची दृष्टी आपण सामान्य माणसात उपजत करू शकत नाही. म्हणून त्यांना सत्य दाखवावे; म्हणजे सौंदर्याची परिभाषा आपोआपच समजेल, दिसेल. मानवी जीवन सामर्थ्यानं आणि सौंदर्यानं पुलकित झालेलं आहे. या सामर्थ्यमय जीवनाच्या वाटेवर संकटाचे आभाळ कोसळले तर ते मोठ्या हिंमतीने सामर्थ्यशालीपणाने दूर सारावे. आणि सौंदर्याचे क्षण आले तर ते आनंदानं हर्षमय मनाने उल्हासीतपणे जगावेत, अनुभवावेत. असे म्हणतात "सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे." या जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी मानव आहे. स्त्री आणि पुरुष ही त्याची दोन भाग आहेत, रुपं आहे. माणसाने फुलासारखे आपले जीवन जगावे या 'या जगण्यावर या जन्मावर शतदः प्रेम करावे'........ *"सौंदर्य ही परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील श्रेष्ठ सर्जन आहे."* असे मनू ह्या विचारवंताने आपल्या विचारातून स्पष्ट केले आहे. गवताच्या पात्यावर पडलेल्या मोत्यासारखं दवबिंदू हे सौंदर्याचं लेणं आहे.श्रावणातील सौंदर्य मनाला खुदकन हसवत असत. कितीही झालं तरी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 'जशी दृष्टी तशी 'सृष्टी. *तरीही आणखी पुन्हा एकदा सांगावस वाटतं...* माणसाने बाह्य सौंदर्य पाहण्यापेक्षा त्याचे आंतरिक सौंदर्य पाहणे आवश्यक आहे. 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*शेवट* *शेवट हा वर्षातला कधी* *नववर्षाचा उंबरठ्यावर* *आला कळलेच नाही मज आता सरत्यापरी* *दुःख सावरता सावरता आलेली संकट ही झेलता सुखाचे क्षण येतील तरी भावना मनी मज आता* *आगमन नववर्षाचे होईल* *शेवट तरी न होईल ह्या* *संघर्षमय जीवनाचा* *आयुष्यातील शेवटच्या* *क्षणापरी ह्या* *आरंभ जरी दुःखाचा* *शेवटही होईल त्याचा* *जीवनाचे हे जीवन गाणे* *वर्षावर्षाने पुढे पुढे जाणे*दिनांक ३१-१२-२०१८ 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे हादगाव जिल्हा नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/12/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- २0१२: अनुदानाचे पैसे रोख स्वरूपात लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची अभिनव योजना देशातील २0 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार. २0१३ : घरकुल घोटाळ्यातील संशयित आमदार गुलाबराव देवकर यांना अटक. २0१५ : सरकारी नोकर्यांमध्ये श्रेणी तीन आणि चारच्या पदांसाठी मुलाखती घेण्याचा प्रघात बंद करण्याची पंतप्रधानांची घोषणा. 💥 जन्म :- १९१0 श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. 💥 मृत्यू :- १९२६ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - सिक्किम येथील बर्फाच्छादित प्रदेशात अडकलेल्या 2500 नागरिकांची भारतीय सैन्याकडून करण्यात आली सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप, नील द्वीपचे शहीद द्वीप तर रॉस द्वीपचं नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जळगाव : जामनेरमध्ये राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोलकाता - दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृनाल सेन यांचे निधन, ते 95 वर्षांचे होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढणार- नारायण राणे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे - पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या 65 किलो गटात महाराष्ट्राच्या सोनबा गोंगणेला सुवर्ण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेलबर्न कसोटीत विजय मिळवून विराट कोहलीने परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधाराच्या विक्रमाशी केली बरोबरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/3j1UDW5e5S Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 31 डिसेंबरला वर्ष संपते तसे कॅलेंडर देखील संपते आणि खुंटीला नवीन कॅलेंडर लटकविली जाते. त्याविषयीचा लेख *हर कॅलेंडर कुछ कहता है ।* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_30.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म १२ जुलै १८६३ रोजी पुण्यात झाला.ते मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बी.ए. पयर्ंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले हाते.१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. जुलै ७, १९१0 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे, ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही. महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते.त्यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या र्मयादा स्पष्ट केल्या. तथापि, राजवाडे यांचे वाक्य न वाक्य ब्रह्मवाक्य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच. विशेष म्हणजे मराठी विचारविश्वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.” *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मुख्य निवडणूक आयुक्त आणि सहआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?* राष्ट्रपती *२) कोणत्या वनस्पतीची पोषण पद्धती परजीवी प्रकारची असते ?* अमरवेल *३) 'द कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स'ची स्थापना कधी करण्यात आली ?* १९२६ *४) तामिळनाडूच्या पश्चिमेकडील १0 जिल्ह्याचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?* कोंगुनाड *५) युरोप खंडाची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं शहर कोणतं ?* माश्रेलिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन चव्हाण ● शशांक पुलकंठवार ● ताहेर पठाण ● अमोल बुरुंगुळे ● प्रकाश तामसकर ● रामचंद्र रेड्डी सामोड ● किरण अबुलकोड ● शिवाजी खुडे ● राजेश्वर रामपुरे ● रेहान खान ● मारोती बोलेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वास* नाती टिकवायला महत्त्वाचा विश्वास आहे विश्वास म्हणजेच नात्यातला श्वास आहे श्वासावीना जसे माणूस जगत नसतो अविश्वासाने कोणी प्रेमाने वागत नसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दूजा हैं तो बोलिये, दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे, का पै काको मोहि। सारांश विधाता निर्गुण निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात विनाकारणंच भांडून घेणार्यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने त्या अंधावर मुग्ध किवा प्रसन्न होईल ? लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे. तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकल्प करा अथवा करु नका शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज रहा.कारण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करा म्हणजे तुमचे तुम्हाला निश्चितच मिळेल.मी असे करणार आहे मी तसे करणार आहे असे जगाला सांगत सुटू नका.जग काही म्हणतील त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही किती दिवस चालणार ?चार दिवस तुम्ही त्यांच्यासमोर करणार आणि काही दिवस निघून गेले की, पुन्हा तेच करणार.म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास नाही असेच होईल ना ! संकल्प असे करा की,ते आयुष्यभर आपल्या जीवनासाठीच आहेत.मग तुम्हाला वर्षाची किंवा वर्ष संपल्यानंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी करायची काही गरजच नाही.दिवस,महिने,वर्ष येतात जातात याकडे लक्ष देऊ नका,पण आयुष्य हे एकदाच येते आणि ते अमर्यादित म्हणजेच आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल.आपण केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचा ठाम निर्धार असला की,काही दर वर्षी शेवटी सोडायचे आणि नवीन धरायचे किंवा करायचे असेही करायचे नाही.काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही तर आपण काळाची पावले ओळखून आपण आपले जीवन आनंदमय आणि सुखमय कसे जाईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.तुम्ही निर्माण केलेले आणि प्रत्यक्ष जीवनात अनुसरलेले संकल्प हे इतर लोक आपोआपच अनुकरण करतील आणि करायलाही लागतील.हा तुमचा तुम्ही सुरवातीपासून केलेला आदर्श संकल्प नवीन वर्षासाठी इतरांना अनुकरणीय ठरेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपघात - Accident* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वरपांगी पाहून निर्णय न घेणे* एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात. त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती,पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो! पत्नी बुडत्या बोटी वर थांबते! बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते! शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, "पत्नी पतीला काय म्हणाली असेल? बहुतेक विद्यार्थी म्हणतात, मला तुम्ही धोका दिलात! मी तुम्हाला ओळखलेच नाही!!" एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!" तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा!" शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?" तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो," नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!" "तुझे उत्तर बरोबर आहे!" शिक्षक हलकेच म्हणाले. बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले. बऱ्याच वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते. त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते! त्या मुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो! त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती! पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!" *तात्पर्यः* चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही! त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेऊ नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक जैवविविधता दिन* 💥 ठळक घडामोडी : १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल. २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी. 💥 जन्म :- १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील. १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक. १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक. १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते. 💥 मृत्यू :- १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ. १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कांदा निर्यातीचं अनुदान 5 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर, केंद्र सरकारचा निर्णय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ परिसरात 1 जानेवारीला पाच सभांना परवानगी, सोशल मीडियावरही पोलिसांची देखरेख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *इस्रोच्या 'मिशन गगनयान'साठी 10 हजार कोटी रुपये मंजूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीतील एक महत्त्वपूर्ण निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची तयारी; केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *खामगाव : भारिप बहुजन महासंघाकडून बुलडाणा लोकसभेसाठी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : एसटीच्या 3 हजार 307 कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, इच्छित ठिकाणी होणार बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *2017 प्रमाणे यंदाही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला विराट कोहली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नांदेड मनपाचे मुख्य लेखाधिकारी श्री संतोष कंदेवार यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख *प्राथमिक शिक्षक ते मुख्य लेखाधिकारीचा प्रवास* https://prajawani.in/news_page.php?nid=602 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एच. डी. कुमारस्वामी* एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.ते यापूर्वीसुद्धा २00६-७ दरम्यान कर्नाटकचे १८वे मुख्यमंत्री होते. हे कर्नाटक जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी कन्नड चित्रपटांचे निर्माता आणि वितरक आहेत. त्यांचे वडील एच.डी. देवेगौडा भारताचे माजी पंतप्रधान आहेत. कुमारस्वामी यांना त्यांची पत्नी अनितापासून निखिल नावाचा मुलगा आहे. निखिल कन्नड चित्रपट अभिनेता आहे. कुमारस्वामी यांना कन्नड आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री राधिकापासून शमिका नावाची मुलगी आहे.धर्मनिरपेक्ष जनता दलाचे कर्नाटकातील एक कार्यकर्ते होन्नालोगेरे प्रकाश यांची हत्या झाल्यानंतर जनता दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्या हल्लेखोरांना गोळ्या घाला, असे वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नवा वाद निर्माण केला आहे. कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर दु:खी होणे समजू शकते, परंतु हल्लेखोरांना अटक करून कठोरातील कठोर शासन करण्याची भूमिका कुणीही घ्यायला पाहिजे. मग ते भले ते विरोधक असले तरी! त्यातही पुन्हा सत्ताधार्यांची जबाबदारी अधिक असते, याचे भान कुमारस्वामी यांना राहिले नाही आणि ते भलतेच बोलून गेले. कुमारस्वामी हे कर्नाटकातील शेतकर्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व राकट दिसत असले तरी प्रत्यक्षात ते भावनाशील असल्याचे सांगितले जाते आणि त्याचा प्रत्यय अधुनमधून येत असतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर काही दिवसांतच कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते भावुक झाले आणि आपण भगवान शंकराप्रमाणे आघाडीचे विष पितोय, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतो, असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याबाबत त्यांनी नंतर घूमजाव केले. हल्लेखोरांना गोळ्या घालण्याच्या वक्तव्याबाबतही त्यांनी ह्यमी भावनेच्या भरात चुकीचा शब्द वापरला, ती केवळ तात्कालिक प्रतिक्रिया होती. आदेश नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे. यातला प्रांजळपणा गृहित धरला तरी कुणाही राज्यकत्यार्ला ही भाषा शोभणारी नाही, तो बेजबाबदारपणा आहे. एकूणच भारतीय राजकारणात वाढत चाललेला हिंस्रपणा सर्व राजकीय विचारधारांच्या लोकांनी आत्मसात केला आहे, हेच यातून दिसते. अधून मधून त्यांचे कर्नाटकमधील सरकार पडणार असल्याच्या चर्चा होतात. आताही त्यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजपाशी संधान साधून बाहेर पडणार असल्याची चर्चा असून यामुळे या राज्यातील जदसे व काँग्रेस आघाडीचे चर्चा लवकरच पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) निकोबार द्विपबेटात किती बेटे आहेत ?* १९ *२) भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते ?* उत्तर प्रदेश *३) पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे पार पडली ?* नवी दिल्ली *४) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?* कृषी क्षेत्र *५) विल्यम शेक्सपिअरच्या निधनाला किती वर्षे पूर्ण झाली ?* ४०० *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संतोष हणमंतराव कंदेवार मुख्य लेखाधिकारी, मनपा नांदेड ● संजय आंध्रस्कर ● विजय रणभिडकर ● सुरेश सुतार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काळ* मी मी म्हणणाराला काळ जिंकता येत नाही कितीही मी मी म्हणा काळ गुलाम होत नाही मी मी म्हणणाराला काळाला शरण जावे लागते काळा पुढे सर्वांनाच नतमस्तक व्हावे लागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !* *भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🦆🦆🦆🦆🦆🦆संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलै तो मै पूजूँ पहार । ताते तो चक्की भली पीसि खाय संसार । सारांश : दगड-धोंडे पूजणार्यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांच्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीशी आपली तुलना करु नका यापेक्षा आपल्या जीवनात कोणता चांगला बदल करायला हवा ते पहा.ज्यामुळे आपल्या चांगल्या बदललेल्या जीवनशैलीचे इतरांना अनुकरण करता येईल.त्यात तुम्हालाही समाधान वाटेल आणि इतरांनाही तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले याचा आनंद वाटेल.लोक तुमच्या वाईट गोष्टींचे कधीच अनुकरण करत नसतात हे लक्षात असू द्या.म्हणून सदैव आपल्या जीवनात आपल्यातले असलेले दुर्गुण शोधायला शिका आणि इतरांच्या मध्ये असलेले चांगले गुण शोधून आपल्या जीवनात घेऊन त्यांचे अनुकरण करायला शिका म्हणजे आपणही इतरांसारखे नक्कीच चांगले जीवन बनवू शकू. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रकरण - Episode* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *व्यवहारज्ञानाचे धडे* एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे. त्यांची ख्याती एका धान्याच्या व्यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्या मुलासोबत प्रवचन ऐकण्यास आला. प्रवचन सुरु झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले,''या जगात जितके प्राणी आहेत. त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो.'' ही गोष्ट व्यापा-याच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली. त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले. ते स्वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागली. मुलाने त्या गायीला हाकलण्यासाठी लाकूड उचलले पण त्याच्या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्यापारी तेथे आले त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले,'' अरे तुझ्यासमोर ती गाय धान्य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्यासारखा गप्प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?'' मुलगा म्हणाला,'' बाबा, काल तर महाराज म्हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्ये पण एक जीव पाहिला'' तेव्हा व्यापारी म्हणाले,''मूर्खा, अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत एकसारखे करायची नसते.'' तात्पर्य :- सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्यास जीवन सुखदायी होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुतात्मा शिरीषकुमार जयंती* 💥 ठळक घडामोडी : १६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले. १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले. १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार. 💥 जन्म :- १९२६- शिरीषकुमार यांचा जन्म. १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती. १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती. १९४०- ए के अँटनी माजी मंत्री १९५२- अरुण जेटली केंद्रीय मंत्री . 💥 मृत्यू :- १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय. १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक. १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी. २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत. २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक. २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे. २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर, राज्यसभेतही मंजूर होईल- गृहमंत्री राजनाथ सिंह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई- ९९वे नाट्यसंमेलन होणार नागपूरमध्ये, २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०१९ ला होणार नाट्यसंमेलन, ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली; ११ वर्षात तुकाराम मुंढे यांची १४वी बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, 25 लाख कर्मचाऱ्याना मिळणार याचा फायदा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गाझीपूर येथे कचरा आणि टाकाऊ प्लास्टिकपासून वीज निर्मितीचा प्रयोग येथे राबवला जात आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताने आपला पहिला डाव 7 बाद 443 धावांवर डाव घोषित केला असून,भारताचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज माघारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/MXaGlNn Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग आठवा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_25.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हिवाळ्यातील आहार* हिवाळ्यात पचनशक्ती उत्तम राहते. त्यामुळे या दिवसात काहीही खाल्लं तरी पचतं, असं म्हटलं जातं. मात्र, या दिवसातही आहाराकडे विशेष लक्ष दिलं जायला हवं. त्या बाबतचा हा कानमंत्र.. ४ थंडीत मिळणार्या गाजर, नवलकोल आदी भाज्या पौष्टिक असतात. थंडीपासून शरीराचं रक्षण करणार्या असतात. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू आदी आजारांना दूर ठेवण्यासाठी त्यांच्या सेवनाचा लाभ होतो. ४ थंडीत ग्रीन टीचं सेवनही उपयुक्त ठरतं. ग्रीन टी मध्ये भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. यामुळे घातक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास अँटीऑक्सिडंट मदत करतात. ४ हिवाळ्यात लसूण खाणं चांगलं. लसणामुळे शरीराला उर्जा मिळते. ४ गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात साखरेऐवजी मध घालावं. ४ हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. ४ संत्री, दाक्ष आदी फळातील क जीवनसत्त्वामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉॅल कमी करण्यासोबत ही फळं चयापचय क्रिया वाढवतात. ४ या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. कबरेदकांचं प्रमाण जास्त असणारे ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे, आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) इंडियन अँग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट कोठे आहे ?* पुसा (नवी दिल्ली) *२) सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री कोण ?* आदिल अल जुबेर *३) 'द इंडियन स्ट्रगल' हे पुस्तक कोणी लिहिले ?* नेताजी सुभाषचंद्र बोस *४) संगमरवर खडक कोणत्या राज्यात आढळतो ?* राजस्थान *५) जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो ?* १ जून *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साई पाटील जुन्नीकर ● व्यंकटेश माडेवार ● वृषाली वानखडे ● अजय तुमे ● योगेश शंकर ईबीतवार ● नंदकिशोर सोवनी ● ओमसाई गंगाधर सीतावार ● सचिन आठवले ● रुकमाजी कट्टावाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* आवड अन् उत्साहाने काम उत्कृष्ट बनते उगीच विचार कशाला की जग काय म्हणते जगाचा विचार केल्यास कोणी काही करू शकत नाही जगाचा विचार करणारा कधी महान ठरू शकत नाही शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'सहजस्थिती किंवा नीजस्थिती' कशी असते यासाठी एक साधे मोटारचे उदाहरण घेऊन स्पष्ट करू. मोटार चालकापाशी क्लच, ब्रेक, आणि अॅक्सिलेटर या तीन गोष्टी महत्वाची भूमिका बजावत असतात. चालकाचे काम संतुलित, संयमित मोटर चालविणे हे असते. त्याच्या पायाखालच्या अॅक्सिलेटरमुळे गाडीचा वेग वाढतो. आपल्या आयुष्यात सुखकारक, आनंददायक घटना घडल्या की आपल्या चित्तवृत्ती उचंबळून येतात. मन था-यावर रहात नाही... आणि प्रतिकूल, क्लेशकारक, घटना घडली की तेच मन काळवंडते, कोमेजते, मलूल, उदास आणि खिन्न होते. गाडीसमोर कोणी अनपेक्षित आले की आपण कचकन् ब्रेक दाबतो. तेव्हा होते तशी ही अवस्था असते.* *पण गाडी तर चालू राहिली पाहिजे आणि इंजिनशी तिचा असलेला थेट संबंध काही इच्छित काळापुरता तुटला पाहिजे, तेव्हा आपण क्लच दाबतो. ही जी अवस्था ती स्थिर, शांत, आणि समधात अवस्था. म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपले मन स्वच्छ, नितळ, पारदर्शी, भाव-विकाररहित झाले आहे. लिंग-देह-सुख-दु:ख यांच्या पलिकडील ही अवस्था. यावेळी आपल्याला येणारी आनंदाची अनुभूती केवळ शब्दातीत - ती चिदानंद स्वरूपाची. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास सर्व संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...* *'नामापरते सुख नाही रे सर्वथा !'* *--हाच तो सदगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जाति न पुछो साधु की पुछ लिजिए ग्यान । मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान । अर्थ महात्मा कबीर ज्ञानविषयक विवेचनात सांगतात की, विद्वान जाती धर्म किवा कुळावरून ठरवू नये किवा त्याची जात, धर्म, कुळ विचारू नये. असे सांगतात. तलवारीचं श्रेष्ठत्त्व तिच्या धारेवरून ठरत असतं. तलवार ठेवण्यासाठी कोणतं म्यान वापरलं जातं. ते फार किमती आहे का? हे फार महत्वाचं नसतं. तलवारीला चमकण्यासाठी म्यानाबाहेरंच काढावं लागतं. म्यान रिकामंच पडून राहातं. लोकबोलीत एक म्हण आहे. नदीचं मुळ आन ऋषीचं कुळ विचारू नये. किती विचारपूर्वक ही म्हण जपलीय बरं आपल्या पुर्वजांनी ! रामायणाचा रचिता पूर्वायुष्यात वाटमारी करणारा लुटारू म्हणून हिणवल्या जायचा. एकादा प्रसंग जीवनात घडून जातो अन सुरू होतं जीवनाचं आरपार चिंतन. पार धुवून जातो लुटारूपणाचा कलंक. प्रकटतो जीवन अन नात्यांच्या आदर्शत्वाची अनुभूती देत तत्वचिंतक वाल्मिकी . वेळेचा सदुपयोग करीत स्वतःला सदैव वाचन चिंतनात गुंतवून वर्षानुवर्ष गुलामीत खितपत पडलेल्या माणसांना स्वाभिमानाची जाणीव करून देणारा मानव मुक्तीचा एल्गार ही एक क्रांतीच आहे. जीवनोद्धाराचा शिक्षण हाच महामार्ग सांगणारे प्रज्ञासूर्य डाॅ.भीमराव आंबेडकर जगाच्या औत्सुक्याचा विषय ठरणे ही जाती ,धर्म किवा कुळाची किमया नव्हती. ती विद्वतेची किमया होती. तलवारीला पाहाताना म्यानाला काढून टाकावंच लागतं तसं विद्वानाची उंची त्याच्या विद्वत्तेवरून पहावी लागते, जातीवरून नव्हे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण सर्वसाधारणपणे ज्यांच्याजवळ धनसंपत्ती,पैसा अडका,गर्विष्ठपणा आहे अशा माणसांना श्रीमंत असे म्हणतो.तर ज्यांच्याजवळ ह्या गोष्टी नाहीत अशी माणसे गरीब आहेत असे म्हणतो.परंतु श्रीमंत माणसाजवळ सगळ्या गोष्टी उपलब्ध असूनही त्यांच्याजवळ माणुसकीचा थोडाही लवलेश नसेल तर तो श्रीमंत कसला ? त्याला श्रीमंत म्हणण्यापेक्षा तो रंकही म्हणण्याच्या लायकीचा नाही. उलट जो माणूस परिश्रम करतो,आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो, इतरांबद्दल आपुलकीने,प्रेमाने वागतो, कठीण प्रसंगी इतरांच्या वेळेला धाऊन जातो, इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे अशी भावना मनात बाळगतो,ज्याचे मन शुद्ध आणि पवित्र आहे,मनामध्ये कोणतीही स्वार्थी भावना नाही,कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही अशी माणसे श्रीमंतापेक्षाही अधिक श्रीमंत असतात हे लक्षात असू द्यावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लायक - Worth it* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इतरांचीही दुःख पाहणे* एकदा एका झाडाखाली सशांनी आपली एक तातडीची सभा बोलावली. सर्वच ससे दु:खी आणि घाबरलेले होते. एक ससा उभा राहून म्हणाला, ''मित्रहो, आपलं जीवन फारच दु:खी आहे आणि या दु:खातून आपली सुटका होणे कधीही शक्य नाही. आपल्याला मनुष्य, कुत्रा, गरूड आणि इतरही अनेक लहान मोठ्या प्राण्यांपासून धोका आहे. तेव्हा आपण सर्वचजण एखाद्या तलावात जाऊन जीवन देऊया. जिवंतपणी या अनंत यातना भोगण्यापेक्षा मरण परवडले. शिवाय आपण एकत्र मरू. म्हणजे दुसर्याच्या मरणाचे दु:खही करायला नको.'' त्या सशाचे बोलणे सर्व सशांना पटले. त्या सर्वांनी एकाच वेळी प्राणत्याग करण्याचे ठरवले. प्राणत्याग करण्याचा दिवसही ठरविला गेला. ठरलेल्या दिवशी सर्व ससे आपल्या कुटंबातील लहानथोरांसह एकत्र जमले. थोड्याच वेळात सशांचा एक मोठा समूह तळ्याकाठी आला. त्या तळ्याकाठच्या चिखलात बरेच लहानमोठे बेडूक खेळत होते. सशांना पाहून ते घाबरले आणि त्यांनी भराभर तळ्यात उड्या टाकल्या. ते पाहून एक हुशार ससा म्हणाला, ''मित्रांनो, थांबा. घाई करू नका. आता तुम्ही पाहिलंत ना. आपल्याला घाबरणारे प्राणीही या जगात आहेत. त्यांचं दु:ख आपल्यापेक्षाही मोठं आहे. तरीही ते हिंमत बाळगून जगताहेत ना मग आपण कशाला दु:खी आणि निराश व्हायचं! या प्राण्यांपेक्षा आपण सुखी आहोत. तेव्हा आपल्यापेक्षा सुखी प्राण्यांकडे न पहाता दु:खी प्राण्यांकडे पाहून आपण जगायला हवे. म्हणजे आपले दु:ख आपल्याला जाणवणार नाही. तेव्हा चला आता आपआपल्या घरी आणि आनंदाने जगा.'' त्या सशाचे बोलणे सर्वांनाच पटले. आनंदाने उड्या मारीत ते आपापल्या घरी परतले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. पंजाबराव देशमुख जयंती* 💥 ठळक घडामोडी : १७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला. १९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली. १९४५ - कोरियाची फाळणी. १९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १७९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री. १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय. १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका. २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली : आंध्र प्रदेशमधील नव्या उच्च न्यायालयाला राष्ट्रपतींकडून मंजुरी.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक : आमदार बच्चू कडू यांचे प्रांत कार्यालयातील आंदोलन मागे, 14 पैकी 10 मागण्या मान्य, उर्वरित 4 मागण्यांवर 4 जानेवारीला बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नंदुरबार : सारंगखेडा येथील पर्यटन महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चेतक फेस्टिव्हलचे या दोन वर्षांत आमच्या सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रँडिंग केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजस्थानः लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे प्रभारी म्हणून प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमा सापडला वादाच्या कचाट्यात, या सिनेमातील दोन संवाद आणि तीन दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने घेतला आक्षेप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दोन बाद 215 धावांपर्यंत मारली मजल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/k6K1bvq Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नामकरण ते अंत्यविधीचा प्रवास* https://prajawani.in/news_page.php?nid=511 दैनिक प्रजावणीमध्ये प्रकाशित लेख. वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *✍🏻 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पंजाबराव देशमुख* पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.त्यांनी उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले. त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली. १९३0 मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री, कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. त स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्यि झाले. १९५२, १९५७ आणि १९६२ रोजी त्यांची खासदार म्हनणून नियुक्तीच झाली. तसेच ते १९५२ ते १९६२ पयर्ंत कृषिमंत्री होते. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी र्शद्धानंद वसतिगृह सुरू केले. त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे. शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी भारत कृषक समाज स्थापन केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यातसाठी एक वृत्तपत्र म्हणजे महाराष्ट्र केसरी सुरू केली. स्वतंत्र भारतात कृषिमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,000 च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री (झारखंड) *२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वॉशिंग्टन *३) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?* जिराफ *४) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड *५) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?* तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● पूजा शिंपी बागुल ● विठ्ठलभाई श्रीगांधी ● शिवाजी अंबुलगेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळ* आयुष्यात जेव्हा आपल्या कठीण वेळ येत असते आपल्या क्षमतेची तेव्हा खरी ओळख होत असते कठीण काळ माणसाला खुप काही शिकवत असतो जीवन जगण्यासाठी तोच आपल्याला टिकवत असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्या सारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भारी कहौ तो बहु दरौ, हलका कहु टू झूत | माई का जानू राम कू, नैनू कभू ना दीथ || अर्थ महात्मा कबीर निर्गुणाचे उपासक होते. कोणतेही तत्त्व भारी (जड) आहे असे म्हटले तर त्याबद्दल भिती निर्माण होते . जर ते हलके (सहज ) आहे म्हणावे तर ते बावळट पणाचे ठरेल. ज्या तत्त्वाची आपण अनुभूतीच घेतली नाही . केवळ ऐकून त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणे हे अततायीपणाचे ठरेल ! राम म्हणजे कर्तव्य निष्ठा व कर्तव्य पालन. राम म्हणजे मर्यादा पुरूषोत्तम . राम तत्त्व विचार आधी आमच्या वर्तनात उतरला पाहिजे. दृढनिश्चयी वृत्तीचा अंगीकार केला पाहिजे. न्यायवृत्ती , लोकादर भावना व बंधुत्व आमच्या ठायी रूजले तरच रामाबद्दल बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. केवळ रामाचे नाव घेतले आणि वर्तनात राम उतरवलाच नाही. तर आम्ही राम अनुसरतो म्हणणे योग्य ठरेल का ? राम ही समृद्ध जगण्याची संकल्पना आहे. राम सोशिकतेचा महान विचार आहे. राम विवेक आणि विचाराचा जागर आहे. राम जीवनाचा महन्मंगल आधार आहे. जगताना सर्वव्यापकता नसेल तर जगण्यात राम राहात नाही. संकुचित व स्वार्थीपणे जगण्याने जीवनात राम येत नाही. माणसाने आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असताना ते ओझे म्हणून रडत अडखळत काम करण्याऐवजी समर्पण भावानं ते हसत हसत पूर्ण केलं तर कार्याला आणि त्या क्षेत्राला एक वेगळीच खुमारी चढते. अन जीवनात राम भरायचा म्हणजे तरी दुसरं काय असतं बरं.... ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्णय - Decision* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *💥 खरे अपयश :-* एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?" यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे" रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?" यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, * "अनुभव ( Experience )* . मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !" हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?" यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे !!" *🔸 तात्पर्य - * *आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं !* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी. 💥 जन्म :- १९१४ - बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्यरत समाजसेवक. १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक. १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी). 💥 मृत्यू :- १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. १९९९ - शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती. २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी नवीन 28 मंत्र्याना दिली पद आणि गोपनीयतेची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंडोनेशिया : त्सुनामीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 373 वर पोहोचला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अंदमान-निकोबार समूहातील बेटाला देण्यात येणार सुभाषचंद्र बोस यांचं नाव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्रप्रदेश : भाजपा आमदार पी. एम. राव यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पालघर नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. श्वेता मकरंद पाटील-पिंपळे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुलागिट्टी नरसम्मा यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बॉक्सिंग डे' कसोटीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपले संघ केले जाहीर, यजमान ऑस्ट्रेलियाने संघात एकच बदल केला, तर भारताने आपल्या संघात केले दोन बदल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/xpz1vPX Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग सातवा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_20.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाबा आमटे* थोर समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये भारत जोडो अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय बॉक्सर कोण ?* शिवा थापा *२) कोपनहेगन देशाची राजधानी कोणती ?* डेन्मार्क *३) भारतात दूरदर्शनचे प्रथम प्रसारण कधी झाले ?* १५ डिसेंबर १९५९ *४) ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य कोण ?* दादाभाई नौरोजी *५) अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण ?* स्वातंत्र्यवीर सावरकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आकाश सरकलवाड ● नरसिंग जिड्डेवार ● शेख शादूल ● कपिल जोंधळे ● अशोक लांघे ● नागराज डोमशेर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुंदर मन* सुंदर विचार येतात जिथे सुंदर मन आहे सुंदर विचाराला थोडच महत्त्वाच धन आहे सुंदर मन असले की सुंदरच विचार येतात मनाच्या सौंदर्यानेच सारे विकार जातात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दारुच्या व्यसनात गुरफटलेल्या माणसाला दारूच आवडते. त्याच्या समोर अनमोल असा अमृताचा कुंभ ठेवला तरी त्याला त्याची काहीच किंमत वाटणार नाही. कारण तो व्यसनाधीनतेमुळे सदैव विषाचाच शोध घेत फिरत असतो. मुर्ख माणसाला समजावायला साक्षात ईश्वर जरी आला तरी मुर्खाच्या मुर्खपणासमोर बिचार्या ईश्वराचं काय खरं ठरणार नाही. व्यसनाधीनतेत बुडालेला माणूस बुद्धी प्रामाण्य वागत नाही. तो त्याने जी नशा केलेली असते. त्या नशेच्या पूर्णपणे अमलाखाली जावून त्या क्षणी सुचेल त्याप्रमाणे इष्ट-अनिष्ट वर्तन करून बाजुला होत असतो.* *गांजाडू झोपडीत गप्पागोष्टी करत चिलीम फुकत बसलेले असतात. एकाने धुंदीत चिलीम शिलगावून जळती काडी भिरकावलेली. हे महाशय झुरक्यात गुंग. झोपडी पेट घेते. तिथे बर्याच जीवनपूरक वस्तू आहेत. अरे जाळ लागलाय पळा, म्हणत ते केवळ चिलीमच घेवून पळतात. त्यांना तीच हवी असते.* *"गंजेटी बैठे गांजा पिने* *झोंपडी मे लागी आग,* *चल रे निकल जोगी* *अपनी चिलम ले भाग।* *असं असतं व्यसनी माणसांचं वर्तन ! मनात घेतलं असतं तर बर्याच मौल्यवान वस्तू वाचविता आल्या असत्या. परंतु नशेत बुद्धी शाबूत राहातेच कुठं ! नको त्या मर्कट लिला करून बघणार्यांच्या विनोदाचा किवा दयेचा भाग बनून ही व्यसनी माणसं जगत असतात.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡.... मूल घडवताना........... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• .मुले तुमच्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतात हे त्यांना कळू द्या. त्यांना बोलायचे असते तेव्हा तुम्ही ऐकण्यास तयार असता असे त्यांना वाटले पाहिजे. कोणताही संकोच न बाळगता मुलांना मनातले बोलता यावे असे खेळीमेळीचे, निवांत वातावरण तयार करा. आई-वडिलांना मनातले सांगितल्यास ते रागावतील किंवा आपल्यालाच दोष देतील असे जर मुलांना वाटले, तर ते कदाचित मनातले बोलणार नाहीत. तेव्हा, मुलांशी धीराने वागा आणि तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे याचे त्यांना वेळोवेळी आश्वासन द्या. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकटातून शोधामार्ग* *एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.* *त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...* *त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल......."* *मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये* *पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला* *वरुन माती पडतचं* *होती...काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.....सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून* *पाहीले,तर तो पहातचं राहीला...अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.* *लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.....* *असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला....* *आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???* *आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.* *म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो....शांत मनाने ती हाताळा.... खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....* *झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.* *मस्त रहा,आनंदी जगा....हेच जीवनाचे सार आहे.*. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/12/2018 वार - वार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्षातील सर्वात मोठी रात्र* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत. १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात. १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार. 💥 जन्म :- १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती. १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश 💥 मृत्यू :- १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरातील नऊ उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गडचिरोली : कडाक्याच्या थंडीने एटापल्ली तालुक्यात दोन दिवसात 44 जनावरांचा मृत्यू.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेची युती,144-144 जागा लढवण्याचा निर्णय- अधिकृत सूत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कामदेखील सुरू झालेलं नाही. खर्चात तब्बल 1 हजार कोटींची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताचे माजी सलामीवीर डब्ल्यू व्ही. रमण यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी करण्यात आली निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसीची क्रमवारी जाहीर ; विराट कोहलीचं अग्रस्थान कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर भाग सातवा वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_20.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *के. श्रीकांत* भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार म्हणून ख्यात असणारे कृष्णमाचारी श्रीकांत यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचा जन्म मद्रास येथे झाला. त्यांच्या मित्रमंडळात ते चिका आणि क्रिश या टोपण नावाने ओळखले जातात. दक्षिण विभागातून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना १९८१ मध्ये अहमदाबाद येथे इंग्लंडच्या विरुद्घ खेळला. त्याच्या दोनच दिवसांनी पहिला कसोटी सामनाही इंग्लंडच्याच विरुद्घ मुंबईत खेळला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्षे होते. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांनी सुनील गावस्कर यांच्यासोबत खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचा खेळ अतिशय आक्रमक राहिला. त्यामुळे आगामी काळात ते सलामीच्या फलंदाजांसाठी आदर्श ठरले. काळानुरूप त्यांच्या फलंदाजीमध्ये एक लय आली. १९८३ मध्ये ज्या भारतीय चमूने विश्वचषक जिंकला त्याचा ते महत्त्वाचा घटक होते. त्यात अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक धावा करणारे श्रीकांतच होते. १९८९ मध्ये त्यांना कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली. क्रिकेटमधून नवृत्तीनंतर त्यांनी टीमचे प्रशिक्षकपद स्वीकारले. एवढेच नाही तर २0१३ मध्ये 'झलक दिखला जा' या नृत्याच्या स्पर्धेवर आधारित शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) नागरिकांना मतदानाचा नकाराधिकार बहाल करणारा पहिला देश कोणता ?* बेल्जियम *२) तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ?* के. चंद्रशेखर राव *३) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हय़ात आहे ?* चंद्रपूर *४) महाराष्ट्रातील काळवीटासाठी प्रसिध्द अभयारण्य कोणते ?* रेहेकुरी *५) लिबियाची राजधानी कोणती ?* त्रिपोली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मन्मथ खंकरे ● श्रीमती माणिक नागावे ● गजानन गायकवाड ● संभाजी तोटेवाड ● जयश्री सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपलेपणा* आपलेपणा म्हणजे मैत्रीतला धागा असतो विश्वासाने व्यक्त होण्याची हक्काची जागा असतो जिथे आपलेपणा तिथे पक्का विश्वास असतो लक्षात ठेवा मैत्री म्हणजे जगण्यातला श्वास असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••8 *परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...* *ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नैराश्य - Depression* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानाचे मोल*💐 राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्या शेतकर्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते. आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही. दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे ? फुकटचं धान्य खाऊन वर मस्तीला आलास का ? राजांना नावं ठेवतोस ? पहिला शेतकरी म्हणाला, अगदी बरोबर बोललास. गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटंच खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशिवाय कशी राहील ? यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करुन घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला. त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 *संपूर्ण ऐहिक व अध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान ,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे ईश्वर कशात आहे ह्याची नेमकी जाणीव असलेले गोरगरिबांचे,दिनदलितांचे आधुनिक सत्पुरुष संत गाडगे महाराज यांना* *💐विनम्र अभिवादन*💐 🙏🙏🙏🙏🙏🙏 *जीवनात स्वच्छता, आचार-विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे.* ज्या भांड्यात पाणी ठेवायचे आहे ते भांडे स्वच्छ असावे लागते.त्याप्रमाणे जीवनाची उभारणी जिच्यावर करायची ती श्रद्धा निर्मळ असली पाहिजे.म्हणजे आपल्याकडून कोणाचेही वाईट होणार नाही चांगलीच कर्म घडतील. आपली बुद्धी स्वच्छ आणि स्पष्ट असेल तरच आपण नेमका निर्णय घेऊ शकतो. माणसाने भोगलालसा आणि सत्ताभिलाषा यांचे आवरण काढून आपली बुद्धी स्वच्छ व सात्त्विक ठेवली पाहिजे. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/12/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले. १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान. १९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले. २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन १८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की १९०१: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद १९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती १९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी 💥 मृत्यू :- १९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट १९५६: डेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने १९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट १९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवीन ब्रिटनमधील पपुआ न्यू जेनिया येथे भूकंपाचा धक्का, 5.7 रिश्टल स्केलची नोंद, पालघरमध्ये ही भूकंपाचा धक्का* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्याालयाने २३ जानेवारीपर्यंत केली स्थगित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीहरीकोटा: इस्रोकडून 'जीसॅट ७ ए' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- मेगा भरतीबाबत राज्य सरकारचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र, '23 जानेवारीपर्यंत मेगा भरतीद्वारे नेमणूक नाही'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कालपासून सुरू झाली हेल्मेट सक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, धुळ्यात तापमानाचा पारा 5 अंशांवर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *लहानपण देगा देवा* वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpan •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत गाडगेबाबा* गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ - २० डिसेंबरइ.स. १९५६) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवाकरणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* ========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैव दहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या प्रयोगशाळांचे जाळे वाढवणार आहे ?* विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा *२) दक्षिण चीनमध्ये ६२ सें.मी. लांबीचा जगातील सर्वात मोठा कीटक सापडला. त्याचे नाव काय ?* फ्रिगानिस्ट्रिया चायनेनसीस झाओ *३) नंद राजघराण्यातील शेवटचा राजा कोण ?* धनानंद *४) नकाशावरील अंतर कशाने मोजतात ?* ओपीसोमीटर *५) स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ?* नरेंद्रनाथ दत्त *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली 👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर 👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद 👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गजानन मुडेले, देगलूर 👤 सोपान हेळंबे, उमरी 👤 डॉ. माधव कुद्रे, कंधार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *आश्वासन* आश्वासन म्हणजे पाण्यावरची रेघ आहे दुष्काळात पडलेली काळजाला भेग आहे काळजाची भेग मिटता मिटत नाही आश्वासन पूर्ण होईल मनाला पटत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे.* *'मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 कबीराचे बोल 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= ताको लक्षण को कहै, जाको अनुभव ज्ञान साध असाध ना देखिये, क्यों करि करुन बखान। सारांश ज्याच्याकडे अनुभवातून प्राप्त झालेलं ज्ञान आहे. त्याच्या लक्षणांच्या बाबतीत काही सांगावयाची आवश्यकता नसते. तो सज्जन दुर्जन असा भेद करीत नाही. सर्वांकडे समदृष्टीने पाहात असतो. अनुभवाच्या बळावर त्याने स्थितप्रज्ञता धारण केलेली असते. विश्वातल्या प्रत्येक घटनेकडे अनुभवी तटस्थपणे पाहात असतो. त्याच्या स्थिर वृत्ती ठामपणे वास्तवाकडे नेतात. वेळ ही वेळंच असते. ती बरी वाईट असण्याचं काही कारणंच नाही. मात्र अस्थिर वृत्ती शुभाशुभ असा वेळेबाबतीतही भेद करतात. सकाळ होणं हा नैसर्गिक घटनाक्रम आहे. ती बरी वाईट असणे ह्या अस्थिर मनाच्या धारणा असतात. सुप्रभात , मंगल प्रभात, शुभ सकाळ, शिव सकाळ, भिम सकाळ हे तर मनाचे खेळ असतात. मन वास्तवाबाबत तटस्थ नसतं, मात्र सकाळ ही सकाळंच असते, हे फक्त अनुभवीच सांगतो. चंद्र आपल्या शितल चांदण्याचा वर्षाव सर्वांवर करीत असतो. सद्गृहस्थ रस्त्याने चाललाय म्हणून त्याच्यावर प्रखर प्रकाश टाकणे आणि चोर चाललाय म्हणून कमी प्रकाश टाकणे असा चंद्राजवळही भेदभाव नसतो. झाडाकडेही समदृष्टी असते. झाडही त्याला खतपाणी पुरवणार्याला जशी शितल छाया देत तशीच छाया त्याच्यावर कुर्हाड चालवायला येणार्यावरही धहतं. त्याप्रमाणे खर्या संताकडे आप-पर असा भेदभाव नसतोच. हे संत प्रभावात कळतं. -एकनाथ डुमणे मुखेड =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत उकार न शिकवता उ आणि ऊ उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करण्याचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावधगिरी* पूर्वी एकदा लांडगे व बोकड यांची फार दिवस लढाई चालली होती. वास्तविक पाहता लांडग्यांनी पहिल्याच दिवशी पराभव करून त्यांचा फन्ना उडविला असता, परंतु बोकडांच्या बाजूस जे कुत्रे होते त्यांच्यापुढे त्यांचे काही चालेना. शेवटी तहाची वाटाघाट होऊन उभयपक्षी असे ठरले की, लांडग्यांनी आपली पोरे बोकडांच्या स्वाधीन करावी व बोकडांनी आपले कुत्रे लांडग्यांच्य ताब्यात द्यावे. मग या अटी अमलात येताच बोकडांकडे गेलेल्या लांडग्यांच्या पोरांनी आपल्या आयांसाठी आरडाओरडा केला. तो ऐकताच लांडगे धावून आले आणि बोकडांस म्हणाले, 'दुष्टांनो, आमच्या पोरांना मारून तुम्ही तह मोडला, तेव्हा लढाईला तयार व्हा.' इतके बोलून ते बोकडांवर तुटून पडले व बोकडांजवळ कुत्रे नसल्यामुळे ते सगळे सहज मारले गेले. तात्पर्य :- शत्रूशी सख्य करताना ज्या वस्तूवर आपली सुरक्षितता अवलंबून असेल अशा वस्तू त्यांना कधीही देऊ नयेत. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार 💥 जन्म :- १८८७ - भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ १९३० - साहित्यिक व समीक्षक रमेश तेंडुलकर १९३१ - समीक्षक स. शि. भावे १९४६ - स्टीवन स्पीलबर्ग, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. १९४६ - रे लियोटा, अमेरिकन चित्रपट अभिनेता. १९६३ - ब्रॅड पिट, अमेरिकन चित्रपट अभिनेता. १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार 💥 मृत्यू :- १९९३ - राजा बारगीर, मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक. १९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर, कीर्तनकार. २००० - मुरलीधर गोपाळ तथा मु.गो. गुळवणी, भारतीय इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक. २००४ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *माधवी दिवाण यांची केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक हमीद अन्सारी यांची आज होणार सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : हंगामातील नीचांकी 8.5 इतक्या किमान तपमानाची नोंद. नाशिककर गारठले, थंडीचा वाढता कडाका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *परिमल राय गोव्याचे नवे मुख्य सचिव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया- दुसऱ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी 287 धावांचं आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/935eEbv Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अनुभव लेख *कोल्हापूरचा भरत रिक्षावाला* https://www.facebook.com/100003503492582/posts/1806474019479364/ वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्धा वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचेमुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर कापूसव्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती. सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणीही पाहत नसताना आपले काम इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?* प्रशांत महासागर *०२) अमरनाथ हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?* जम्मू काश्मीर *०३) मध्यप्रदेश ची राजधानी कोणती ?* भोपाळ *०४) वाळवंटातील जहाज कोणास म्हटले जाते ?* उंट *०५) शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत ?* गुरू नानक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रवी यमेवार ● नितीन वंजे ● उदयराज कोकरे ● विजयकुमार भंडारे ● जनार्दन नेउंगरे ● महेश जोगदंड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतलबी* जो तो इथे मतलबी आहे वरवर निरागस छबी आहे खोटा बुरखा लगेच फाटतो खरा प्रकाशा सारखा स्पष्ट वाटतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते.* *"साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती-भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कहा सिखापना देत हो, समुझि देख मन माहि सबै हरफ है द्वात मह, द्वात ना हरफन माहि। सारांश महात्मा कबीर ज्ञानानुभव देताना म्हणतात , मी जितका काही उपदेश करतो तो केवळ आपल्या हृदयांतरी साठवून ठेवा. सगळी अक्षरे दौतीत साठलेली आहेत. परंतु दौत अक्षरात थोडीच असणार आहे ! तद्वत हे विश्व परमात्म्यात सामावलेलं आहे. तो परमात्मा या विश्वाच्या बाहेरही सामावलेला आहे. मनुष्य स्वभावाची एक खाशीयत आहे . तो देखल्या देवा दंडवत घालून प्रतिकात्मक मुर्ती, दगड, धोंडे पूजून मोकळा होतो. अशा पूजनानं खरंच देवाचं स्वरूप कळणार आहे का ? ईश्वरी निसर्ग शक्तींच्या कूतुहलातून निर्मित भयापोटी मानवी हतबलतेतून निसर्गशक्तीपुढील शरणागतीच्या अभिव्यक्तीसाठी मानलेल्या प्रतिकात्मक रूपांचं पूजन करून ईश्वराचं आकलन झाल्याचं फसवं समाधान देत भोळ्या भाबड्यांची भौतिक लुट करून त्यांची ईश्वर ही कल्पनाच सीमित करून टाकली गेलीय. चार धाम यात्रा केलेला असो की काबा करून आलेला असो. उगाच का म्हणतो 'अजूनही मला देव पूर्ण कळलाच नाही हो !' विश्व संचललन शक्तीचं स्थुल जरी निरीक्षण केला तरी ती शक्ती अनाकलनीय आहे. भौतिकदृष्ट्या कितीही सुखसंपन्न असला तरी मानवी विचार कक्षेच्या बाहेर हे विश्व संचालन शक्तीचं रूप आहे. ते अनादि अथांग आहे. त्याचा शोध घेता घेता अनेकांनी आपली अनुमानं निरीक्षणं नोंदवलीत. प्रत्येकाचं मत स्शयंसापेक्ष आहे. ईश्वर आत्मचिंतनाशिवाय कसा भेटणार ? त्यासाठी आत्मदृष्टी हवी. त्यातून ईश्वरी साक्षात्कार व्हायला लागतो. ईश्वरीय रूप अर्थात निसर्ग शक्ती दृष्टी-सृष्टीच्याही पलिकडची बाब आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीचा फरक जाणते तेव्हा ती व्यक्ती नक्कीच चिंतनशील आहे असे समजावे.इतरांच्या जीवन जगण्यामध्ये काही उणीवा असतील त्या आपल्या जीवनात तर नाही ना याचा वेध घेऊन त्या सुधारणा करता येतात असाही विचार करण्यास प्रवृत्त होते तर काही चांगल्या गोष्टी असतील तर अनुकरण करायला काहीच हरकत नाही असाही विचार करून चांगले जीवन जगण्यासाठी तयार होते.म्हणजेच चांगले विचार सुधारण्याची संधी देतात तर वाईट विचार मनातून काढून टाकण्याची इच्छा प्रकट करतात.ह्या दोन्ही बाजूंनी विचार करणारीच व्यक्ती आपले सुंदर जीवन जगू शकते.उलट विचार न करणारी किंवा अविचारी व्यक्ती जीवनात कधीही आपल्या चुकांना सुधारण्याची संधी देऊ शकत नाहीत आणि जीवनात कधीही सुधारु शकत नाहीत हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मुल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संस्कार म्हणजे नेमकं काय असत? संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात. तसेच संस्कृती पण संस्कारांवर निर्भर असते. दोन्ही एकमेकावर आधारित असतात. संस्कार म्हणजे मानवाच्या व मानव समाजाच्या चांगल्या सवयी. असे सद्गुण हे मानवात असले पाहिजे. अशा गुणांचा फक्त व्यक्तिगत लाभ नसतो तर सर्व समाज त्यापासून लाभान्वित होतो. निरोगी समाजजीनाकरिता उत्तम संस्कारित मानव आवश्यक आहे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोंबडी आणि कोल्हा* एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’ तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/12/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय सेवानिवृत्ती दिन* 💥 ठळक घडामोडी :- १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला. १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली. १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले. १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब. १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार. 💥 जन्म :- १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९७२ - जॉन अब्राहम, हिंदी चित्रपट अभिनेता. १९७८ - रितेश देशमुख, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष. १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या पुतळ्याचे डीएमके मुख्यालयात काँग्रेसच्या सोनिया गांधींनी केले अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *टोकियो - जपानमधील सपोरो शहरातील एका पबमध्ये भीषण स्फोट, 42 जण गंभीर जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई म्हाडा लॉटरीला सुरुवात, पुढच्या वर्षी मुंबई लॉटरीमध्ये असणार दुप्पट घरं, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेकडून राज्यस्तरीय उकृष्ट अध्यापक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न, सलग पाचव्या वर्षी हा पुरस्कार सोहळा संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हॉकी वर्ल्डकपवर बेल्जिअमची मोहोर; नेदरलँडला 3-2 गोलफरकाने हरवले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास, स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय, BWF World Tour Finals स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद पटकावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/VKzVqwy Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धार्मिक स्थळी मोबाईल बंदी का ?* https://prajawani.in/news_page.php?nid=268 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लक्ष्मीकांत बेर्डे* मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सहकलाकार तसेच नाट्य अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यानेआपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यत: विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आला. मराठी चित्रपटातील सुपरस्टारपद त्यांना चाहत्यांनी बहाल केले होते. लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका (इ.स. १९८५), अशी ही बनवाबनवी (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (इ.स. १९९१), बेटा (इ.स. १९९२) व हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले. त्याकाळी लक्ष्मिकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांचे चित्रपटात असणे म्हणजे चित्रपट हमखास यशस्वी होण्याचे गमक झाले होते.अंशी आणि नव्वदचे दशक या अभिनेत्याने गाजवले. विनोदी चित्रपटांचा काळ होता. लक्ष्मीकांत बेर्डेने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आणि विनोदी अभिनेता म्हणून आपले अस्तित्त्व निर्माण केले होते. मात्र त्यांची कारकीर्द ऐन बहरात असताना अकाली निधनाने त्यांची एक्झिट झाली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) एन.एन.ओ.पी. चे विस्तारित रूप काय ?* नागा नॅशनल डेमॉक्रॅटिक कॉर्पोरेशन *२) सर्वोदय या संस्थेचे स्थापना वर्ष कोणते ?* १९०६ *३) भारताचा पहिला व्हॉइसराय कोण ?* लॉर्ड किनिंग *४) नेपाळची राजधानी कोणती ?* काठमांडू *५) अरुवी, महावेली या नद्या कोणत्या देशात वाहतात ?* श्रीलंका *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुधीर येलमे ● विक्रम पतंगे ● दिगंबर बेतीवार ● प्रतापसिंह मोहिते ● डॉ. उषा रामवानी गायकवाड ● श्रीनिवास नरडेवाड ● नारायण मुळे ● केशव कदम ● काशिनाथ बाभळीकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हार अन् जीत* हार आणि जीत जगण्याची रीत आहे आपल्यांसाठी हारणं म्हणजे प्रित आहे नात्यात जिंकण्या पेक्षा हारणं मोठं असतं आपल्यांना हरवून जिंकण खोटं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.* *आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कागत लिखै सो कागदी, को व्यहाारि जीव आतम द्रिष्टि कहां लिखै , जित देखो तित पीव। सारांश महात्मा कबीर आत्मानुभवावर अधिक विश्वास ठेवायला सांगतात. सर्वजण ऐकीव व लिखित गोष्टीच प्रमाण माणून हट्टवादी मनोवृत्ती तयार करून घेतात. कागदोपत्री शास्त्रात लिहलेले दस्तऐवज आहेत. त्याला आपण सत्याच्या कसोटीवर कुठ जाणून घेतलेलं असतं. केवळ ऐकून अथवा वाचून त्या गोष्टीवर हुकूम वागण्याचा किवा जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आंधळी भक्ती करणे होय. त्या भक्तीला व्यावहारिकता कशी कळणार ? अशा भक्तीचा मार्ग जर आपण अनुसरणार असू तर मानवानेच मानवावर लादलेल्या दांभिकता थोतांडातून माणूसाची मुक्तता कशी होणार ? माणसाला मिळालेल्या बुद्धीचा वापर तथ्य जाणून घेण्यासाठी विचार व विवेकासाठी नाही केला तर आत्मसाक्षात्कार तरी कसा होणार ? बाह्य जग डोळे उघडे ठेवून पाहता आलं पाहिजे. ध्यान मनन करताना डोळे मिटून चिंतन करता आलं पाहिजे. खर्या साधूची संगती आत्मबोधाकडे नेत असते. मनाची संभ्रमावस्था पार निघून जाते. प्रकटणारं सत्य हे अंतिम व शाश्वत सत्य असतं. त्याला कुठलीही कसोटी देण्याची गरज भासत नाही. इथं फसवेगिरी किवा भामटेगिरिचा धोका नसतो. स्वानुभव हे दाखवता येत नाहीत ते अनुभवता येतात. निजरूपाचं खरं दर्शन स्वतःत डोकावल्याशिवाय कसं होणार ? डोळे दृष्टी देतात. दृष्टीकोन स्वतःलाच तयार करावा लागतो. विकार विरहित जगताना निसर्गाची दिव्यता ध्यानात येवू लागते. सर्वत्र आपल्याला ईश्वराचं अस्तित्व दिसू लागतं. खर्या परमात्म्याचं दर्शन होतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखादा कुंभार जेव्हा चाकावर मडके घडवण्यापूर्वी मातीमध्ये पाणी आणि जीव ओतून मुलायम मातीचा गोळा बनवून चाकाच्या मध्यभागी ठेवून चाकाला फिरवतो आणि फिरणा-या चाकावरच आपल्या चिखलाने भरलेल्या हाताने प्राथमिक स्वरुपात मडक्याचा आकार करतो.आणि निराकार असलेल्या मडक्याला चाकावरुन काढून बाजूला घेऊन मडक्याच्या आत एक हात घालून व दुस-या हातात थापटी घेऊन जसा पाहिजे तसा आकार देऊन आकर्षक आणि सुंदर आकाराचे मडके बनवतो.मडके बनवण्याचे सारे श्रेय मडके बनवणा-या कुंभाराकडेच जाते.कारण तो आपल्या एकाग्र मनाने,परिश्रमाने आणि सातत्याने प्रयत्न करुन निराकार मातीचे रुपांतर एका सुंदर आणि आकर्षक मडक्यामध्ये करतो.त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाची आपल्या पाल्याविषयी भूमिका एका कुंभारासारखीच असते.आपला पाल्य हा एका निराकार मातीसारखाच असतो.त्याला त्याच्यावर प्रेम,माया,आपुलकी देऊन त्यावर योग्य संस्कार करुन तो सुजान, सुसंस्कृत, आदर्श नागरिक बनवून तो आपल्या पायावर सक्षमपणे बनवण्याचे प्रयत्न करतात आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी हातभार लावतात.आई-वडील हेच आपल्या पाल्याचे खरे शिल्पकार असतात.म्हणून पालकांनीही तेवढेच जागृत राहून आपल्या पाल्यांच्या काही कमतरता असतील तर त्या शक्यतो जाणून घेऊन त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे आणि सुंदर आणि आकर्षक पाल्यांचे व्यक्तिमत्व घडवावे असे केले तर अधिक पालकांनाही आपण आपल्या पाल्यासाठी केल्याचे समाधान वाटेल.कुंभारासारखीच पाल्यांच्या बाबतीत पालकांची भूमिका आहे हे निश्चित.पाल्यांचे भवितव्य घडवण्यात कसल्याही प्रकारचा कमीपणा मानू नये.आपणही कुंभारासारखे सदैव पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाठीशी खंबीरपणे उभे टाकायलाच हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड भ्रमणध्वनी..९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मुल घडवताना.... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुलांवर चांगले संस्कार करणे ही आजच्या काळाची मुख्य गरज आहे. नव्या पिढीला चांगले ज्ञान दिले गेले पाहिजे. चांगले संस्कार केले पाहिजेत. त्यामुळे समाजाचाही स्तर उंचावेल. जगातील सर्वाधिक संत आपल्या देशात होऊन गेले. आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि ती जगभरात पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जावेत. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकी* इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्याने समाजात अत्युच्च स्थान निर्माण केले होते, ज्या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्याचे नाव होते क्झेनथस, इसाप आपल्या आचरणातून क्झेनथसला सतत शिकवण देत असे. ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत, सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्झेनथसने इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्या दगडाला अडखळून पडला, त्यानेही शिवी हासडली पण तो दगड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी क्झेनथस स्नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्झेनथसने इसापला विचारले तू तर म्हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता पण दगड उचलून टाकण्याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे मी आपणास सांगितले.'' क्झेनथस निरूत्तर झाला. *तात्पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरे.* ============== वर्तमानपत्रातून संग्रहित ============== *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय चहा दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - नेटस्केप नॅव्हिगेटरची १.० आवृत्ति प्रकाशित. 💥 जन्म :- १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू. 💥 मृत्यू :- १०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट. १०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये. १२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राफेलमध्ये घोटाळा नसल्याची सुप्रीम कोर्टाची 'क्लीन चिट', मोदी सरकारला मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली- राफेल करारावरून सभागृहात गोंधळ झाल्यानं लोकसभा 17 डिसेंबरपर्यंत तहकूब* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भोपाळ- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ 17 डिसेंबरला लाल परेड मैदानावर घेणार शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील सर्वात कमी तापमान जळगावमध्ये (१० अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/acZsiGYGES Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग चौथा* वाचन करता येईल. https://www.blogger.com/blogger.g?blogID=5645795248580674337#editor/target=post;postID=52510233279047699;onPublishedMenu=overviewstats;onClosedMenu=overviewstats;postNum=0;src=postname वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अमिताभ घोष* अमिताभ घोष यांची इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये गणना होते. ११ जुलै १९५६ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या घोष यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. दिल्ली विश्वविद्यालयाचे सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर 'द सर्कल ऑफ रीजन' ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बघता बघता घोष यांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. घोष यांच्या 'शॅडो लाइन्स' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना जाहीर झाला आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ट करा व स्वत:चे भविष्य घडवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे स्थापना वर्ष कोणत ?* १९३८ *२) भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांचा कार्यकाल कोणता ?* १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ *३) भारतातील सर्वात जुना, जास्त कालमानाचा पर्वत कोणता ?* अरवली *४) हेल्मंड, अबू, दर्या, काबूल या नद्या कोणत्या देशात वाहतात ?* अफगाणिस्तान *५) कोस्टारीका या देशात कोणती शासन पद्धती अनुसरली जाते ?* अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ सायबलू ● बालाजी सुंकेवार ● श्रीधर काटेगर ● सुशील केकान ● रामकृष्ण लोखंडे ● शिवाजी रामदिनवार ● शुभ मलिक ● गुरुदास भागानगरे ● अनिल जाधव शिरपूरकर ● दीपक चावरे ● योगेश पाटील ● ऋषीकेश गरड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *झाडं* झाडं व्हायला बी ला गाडून घ्यावं लागतं प्रेम मिळवायचं तर मग प्रेम द्यावं लागतं गाडून घेतल्या शिवाय बीचं झाडं होत नसतं आपण दिल्याशिवाय कोणी प्रेम देत नसतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.* *आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात राव की रंक । आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मूल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाल कथा *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ 💥 मृत्यू :- १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : रवींद्र साठे यांना जनकवी पी.सावळाराम पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दुखापतीमुळे भारतीय संघातून रोहित शर्मा, अश्विनला विश्रांती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/JZdD67V Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गजानन दिगंबर माडगूळकर विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१). *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सी.पी.आय.चे विस्तारित रूप काय ?* कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया *२) 'आर्य समाज' चे स्थापना वर्ष कोणते ?* १८७५ *३) जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात राहतात ?* १६ % *४) सिक्किमची राजधानी कोणती ?* गंगटोक *५) गुजरातमध्ये किती जिल्हे आहेत ?* गंगटोक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नंदकिशोर पाटील आगळे ● सारंग भंडारे ● पवन धावनी ● विजय सातपुते *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कावेबाजी* लबाडांचा गोड बोलून विघातक कावा असतो आम्ही खुपच चांगले असा त्यांचा दावा असतो लबाडांची कावेबाजी उघड होत असते कितीही लपवा ती लपल्या जात नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खलील जिब्रान म्हणतात,'शिल्पकार व चित्रकार यांच्या कामापेक्षा एखाद्या शेतक-याचे, सामान्य कामगाराचे काम श्रेष्ठ दर्जाचे असते.' जीवन म्हणजे खरोखर अंधार. भर उन्हांत काम करणारा शेतकरी, धडधडत्या यंत्राबरोबर काम करणारा कामगार, धगधगत्या भट्टीजवळ काम करणारा मजूर आणि सीमेवर जीव धोक्यात घालणारा सैनिक ही कामातून केल्या जाणा-या अत्युच्च त्यागाची उदाहरणे. तुम्ही काम करता तेव्हा स्वत:ला स्वत:शी, इतरांशी आणि देवाशी जोडत असता. एखाद्या हमालाच्या अंगातून वाहणा-या घामाच्या धारा पाहिल्या की रक्ताचे पाणी करणे काय असते हे संवेदनशिल मनाला सहज कळते. पण कष्टाच्या भाकरीवर फार थोड्यांची श्रद्धा आहे.* *शेक्सपिअरच्या एका नाटकात काॅरिन नावाचा साधाभोळा मेंढपाळ भेटतो. तो म्हणतो.. मी खरा श्रमकर्ता, कष्टकरी आहे. माझी भाकरी मी मिळवतो. माझे कपडेही मीच बनवतो. मी कुणाची निंदा करत नाही. कुणाच्या आनंदाचा हेवा करत नाही. इतर लोकांच्या चांगल्या गोष्टी पाहून मला आनंद होतो. माझे दु:ख मी माझ्याशी ठेवतो. माझ्या जीवनात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या शेळ्यामेंढ्या चरताना पाहणं आणि त्या कोकरांना दूध पिताना पाहणं. काॅरिनच्या जीवनाची साधीसुधी संकल्पना पाहून माणसं जगू लागली तर आपल्या जीवनात कित्येक प्रश्न निर्माण होणार नाहीत. एक साधा मेंढपाळ एवढ्या नैतिक उंचीवरून बोलू शकतो तर शिकल्या सवरलेल्यांनी कोणत्या उंचीवरून बोलले, वागले पाहिजे हे सांगितलेच पाहिजे असे नाही.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह । जिसको कुछ नही चाहिए वह शहनशाह । अर्थ महात्मा कबीरांनी मानवाच्या कधीही न संपणार्या अपेक्षांवर मार्मिकपणे प्रकाश टाकला आहे. कितीही घाव बसले तरी मानवी मनाची हाव काही संपणारी नाही. जो गरीब आहे. त्याला श्रीमंचीचं वेड लागतं . ज्या वस्तू त्याच्याकडे नाहीत. त्या मिळविण्यासाठी त्याची जमेल त्या मार्गानं श्रीमंत होण्याची धडपड चालूच असते. जर ती श्रीमंती चुकीच्य मार्गाने मिळवीलेली असेल तर ती लाभेल का ? टिकेल का ? मनात शंकांचं मोहाळ भुणभुणायला लागतं. मिळालेल्यापेक्षा आणखी जास्तीचं वाढं-दिडं करण्याची धडपड. आहे ते टिकविण्यासाठीची चिंता. असा मजेदार जीवनसंघर्ष करताना माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सर्व वैभव जवळ असूनही त्याचा उपभोग त्याला घेताच येत नाही. केवळ भारवाहकाचं काम निमुटपणे तो करीत राहातो.अगोदर उपाशीपोटी राहून सारं कमावलं. आता ते पचत नाही म्हणून मन मारून पोटाला उपाशी ठेवावं लागतं ! असा विचित्र जगणारा पृथ्वी तलावर माणूस हाच एकमेव प्राणी असावा. बर एवढं गाढव ओझं ओढून शेवटी रिकामंच निर्वाण ! जमव जमव जमवण्याच्या नादात जगणं जगायचं राहूनंच गेलं ! अशी खंत घेवून जगण्यात काय हशील बरे ! ज्याच्याकडे काहीही नाही तोच माणूस खरा खूश आहे. त्याला कोणती चिंता सतावत नाही. नाहीच तर हरवायची भीती नाही. मनाला विरक्त करता आलं की समाधानाशी मस्त मितृत्व होतं. मनानं श्रीमंत असणाराच खरा राजा असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही.असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते.खंत वाटून घ्यायचेही कारण नाही.पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते.इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये.ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते.पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही.इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा.अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल.इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही.आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मुल घडवताना.... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खरच संस्कार म्हणजे नक्की काय? योग्य आचार-विचार, गुण-अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार? की जीवनात मनाला कधीही अहंकाराची बाधा होऊ न देता विनम्र असणे म्हणजे संस्कार? आपली कथा त्या कस्तुरी मृगासारखी तर झाली नाही ना? म्हणजे स्वतःकडे कस्तुरी असूनही त्याची जाणीव मात्र आपल्याला नाही. संस्कार शोधायला गेल्यावर, हाती नक्की काय लागतं हे मोठ प्रश्नचिन्ह आहे गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिष्याची परीक्षा रामानुजाचार्य शठकोप स्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोप स्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ‘‘माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?’’ रामानुज नम्रपणे म्हणाले, ‘‘गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.’’ शठकोप स्वामींनी विचारले, ‘‘हे तुला ठाऊक असतांना सुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?’’ यावर रामानुज म्हणाले, ‘‘वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.’’ ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००१ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार. २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. २००२ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर. २००३ - इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले. २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर 💥 जन्म :- १८९९ - पांडुरंग सातू नाईक, मराठी सिनेमॅटोग्राफर. १९१३ - आर्ची मूर, मुष्टियोद्धा. १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक. १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका. १९५५ - मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री 💥 मृत्यू :- १९८६ - स्मिता पाटील, हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री. १९९४ - विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक. १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम ऊर्फ शिरुभाऊ लिमये , भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भोपाळ : काँग्रेस पक्षाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने राज्यपाल आनंदीबेन पटेलांची भेट घेऊन मध्य प्रदेशात सत्ता स्थापनेचा दावा केला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंग्लंडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे कायम राहणार; अविश्वास ठरावाविरोधात 63 टक्के मतं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *हज यात्रेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ, 19 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संग्रामपूर : धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करत धनगर समाज बांधवांकडून घरावर काळे झेंडे उभारून करण्यात आला निषेध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला महाराष्ट दौऱ्यावर; मेट्रोसह विविध विकासकामांचे करणार भूमीपूजन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ * दिल्ली- कालपासून हिवाळी अधिवेशनाला झाली सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनिक प्रजावाणीच्या ई पेपर मध्ये प्रकाशित लेख " डॉक्टर देव की दानव " https://prajawani.in/news_page.php?nid=212 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625768 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनोहर पर्रिकर* गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री असणारे मनोहर पर्रिकर हे भारताचे संरक्षणमंत्री राहिले आहेत. ते उत्तरप्रदेशातून राज्यसभेचे खासदारही राहिलेले आहेत. त्यांनी १९७८ मध्ये आयआयटी मुंबई येथून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आयआयटी झालेले ते पहिलेच मुख्यमंत्री म्हणविले जातात. या कामगिरीसाठी त्यांना आयआयटीतर्फेही २00१मध्ये विशिष्ट माजी विद्यार्थी ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे ते भाजपाचे पहिले नेतेआहेत. २४ ऑक्टोबर २000 रोजी ते गोव्याचे मुख्यमंत्री बनले पण, त्यांचे सरकार २७ फेब्रुवारी २00२ पर्यंतच चालू शकले. जून २00२ मध्ये ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. २0१७ मध्ये ते चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर आसीन झाले. राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोव्यात भाजपाची सत्ता आणण्याचे संपूर्ण श्रेय पर्रिकर यांनाच जाते. अत्यंत तडफदार अशा या नेत्याला कर्करोगाने ग्रासले असून नुकतेच ते विदेशातून उपचार घेऊन परतले आहेत. याही स्थितीत ते गोव्याचा कारभार पाहतात, हे विशेष *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची भीती तुमच्या समोर उभी ठाकेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवुन टाका - चाणक्य *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'एन बी सी सी'चे विस्तारित रूप काय ?* नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन *२) भारताचे पंतप्रधान म्हणून एच.डी.देवेगौडा यांचा कार्यकाल कोणता ?* १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ *३) भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाचे व्यवस्थापन केंद्र कोठे आहे ?* दिल्ली *४) अमेरिकेमध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे ?* अध्यक्षीय प्रजासत्ताक *५) कुन्नूर हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● राजेश वाघ ● अनिल गायकवाड ● शरद नवले ● रोहन कुरमुडे ● उज्वल मस्के ● राजेश पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षण* शिक्षणाने माणसाचे जीवन फुलत असते अंधकारमय मार्ग त्यानेच टळत असते शिक्षण घेऊन जीवन फुलवता आले पाहिजे घेतलेल्या शिक्षणाचे सार्थक झाले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन अनमोल आहे. पण ते फुकट मिळालेलं आहे. न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठे असते ! आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं. दिवस येतात, जातात. जीवन मात्र अडगळीत असतं. खरंतर माणूस जगतो कशासाठी? तर जगण्यासाठीच ! जीवन जटील नाहीच. पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत... त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो. माणूस वयानं जसजसा वाढू लागतो, तसतसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेह-यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात ! एवढं सुंदर जीवन हातात असताना झूटया भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते.* *माणूस धावत राहतो अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो. जीव गुदमरून टाकणा-या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठे हातात असतात ! काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या शेवटच्या प्रवासात एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• उदर समाता अन्न ले, तन ही समाता चीर अधिक ही संग्रह ना करें, तिस्का नाम फकीर। सारांश संन्याशी कसा असावा ? याबद्दल महात्मा कबीर सांगतात की जो पोट भर अन्न घेतो आणि काया झाकण्यापुरती वस्त्र मिळाली की संतुष्ट व समाधानी धारण करतो. यापेक्षा अधिकचे द्रव्य,कपडेलत्ते जमा करीत नाहीं किवा त्यांचा संग्रह ही करीत नाही तोच खरा फकीर किवा संन्यासी असतो . अध्यात्म सांगण्याच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे प्रकार केले जातात. पूर्वी सामान्य माणसाला अध्यात्म किवा वेद पुराण कळायचं नाही. ते समजून घेण्यासाठी एखाद्या ज्ञानी पंडिताकडं जावं लगायचं. तो पंडितही भलता भाव खायचा .समोरच्याला माहिती सांगणे किवा मजकूर वाचण्याच्या मोबदल्यात त्या गरजू व्यक्तीकडून अंगमेहनतीची कामे फुकट करून घेणे. द्रव्यादी उकळणे असा प्रकार सर्रास चालायचा. आजही थोतांडी कर्मकांडाची भिती दाखवून लुबाडणूक होताना दिसते. भोळे भाबडे भक्तगण जादू छू मंतर हात चालाखीला भुलून बुवाबाजी व ढोगाला आहारी पडतात. ढोगी नाटकी सन्याशांचे आश्रम जागोजागी थाटले जातात. धर्म व पंथांच्या नावाखाली साध्या भोळ्या भक्तांना लुटून संन्यस्तपणाच्या बुरख्याआडून अधर्म करणार्यांना वेळीच ओळखून दूर राहावं. ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥ अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥ दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥ तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥ जगद्गुरू तुकोबांचा वरील अभंग ध्यानात घेतला तरी अशा ढोंगी सन्याशांपासून अलिप्त होता येईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या विचारात आणि तुमच्या विरोधकांच्या विचारात खूप फरक आहे.तुमचा विचार हा सर्वसाधारण पणे त्रास होऊ नये,आपल्या बोलण्यामुळे मन दुखवू नये,तो जरी आपल्याकडे काकदृष्टीने पाहत असला तरी आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीनेच पाहणे.आपले एखादेवेळी नुकसान झाले तरी चालेल पण त्याचे नुकसान होऊ नये अशी आपली धारणा असते आणि यामुळेच समोरच्यापेक्षा आपले जीवन सुखावह जगण्याचे मंत्र्यांनी शिकवते.हाच जगण्याचा मंत्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत नसतो आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचे चित्रच बदलून जाते.शेवटी त्यांच्या जगण्यात आणि जीवनात तुमच्यासारखा अर्थच नसतो.म्हणून तुमची जगण्याची जीवनशैली ही खरोखरच सर्वसमावेशक आणि आदर्श आहे हे विसरु नका.आज नाही उद्या तरी तुमच्या जीवनशैलीचा नक्कीच स्वीकार करतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मुल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या माणसाकडून मिळालेले दुःख* एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो." *तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. १९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी. १९४९ - गोपीनाथ मुंडे, भाजपा नेते १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता. १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर पक्षाच्या दिल्ली मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शक्तिकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *Telangana Assembly Election Results : के.चंद्रशेखर राव यांचा 50,000 मतांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : नाशिककर गारठले, हंगामात सर्वाधिक नीचांकी 9.4 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ, पुजारा अव्वल पाचमध्ये; बुमराहचीही चमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *तिसरा भाग* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_11.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गोपीनाथ पांडुरंग मुंडे गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म (१२ डिसेंबर १९४९ रोजी झाला. ते मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य होते, त्यांनी इ.स. २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे(भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील होते. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता. . संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रश्न 01 कोणत्या भारतीय नेत्याला को “भारताचे लोहपुरुष” या नावाने ओळखले जाते ?* उत्तर : श्री सरदार वल्लभ भाई पटेल *प्रश्न 02. कन्याकुमारी मध्ये रॉक मेमोरियल (शैल स्मारक) कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आले ?* उत्तर : स्वामी विवेकानन्द *प्रश्न 03. जालीयनवाला बाग कोणत्या शहरात आहे ?* उत्तर : अमृतसर *प्रश्न 04. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* उत्तर : मोर *प्रश्न 05. “जय जवान, जय किसान” हा नारा कोणी दिला ?* उत्तर : लालबहादुर शास्त्री *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गजानन हुस्सेकर ● रमेश वाघ ● समीर मुल्ला ● पवनकुमार वतनदार ● आकाश पाटील ● मधू पाटील ● नागनाथ परसुरे ● शुभानन गांगल ● माधव सोनटक्के ● अशोक पाटील कदम ● विजय केंद्रे ● महेश शिवशेट्टी ● रामकृष्ण पाटील ● पवन खरबाळे ● विलास पाटील आवरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* सूर्य उगवला की अंधार जळत असतो विचार स्पष्ट झाला की संशय ढळत असतो विचार स्पष्ट झाला की संशयाचा प्रश्न उरत नाही सूर्यासारखी स्पष्टता तिथे संशय ठरत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपलं जग सुंदर आहे. झाडं-झुडं, नदी-नाले, डोंगरद-या, पशू-पक्षी, चंद्र-तारे.. सारंच अनोखं ! त्यात आपला जन्म म्हणजे निसर्गानं दिलेली अनुपम भेट. हे जीवन आधिक सुंदर व्हावं म्हणून माणूस शिकतो, ज्ञानसंपन्न होतो. शिक्षणाच्या चरकातून पिळून निघालेल्या माणसाला नोकरी, पद-प्रतिष्ठा मिळते. प्रमाणपत्र त्याचे मापदंड असतात. यातून समृद्ध समाज घडविणारा व मानव्याची पूजा करणारा माणूस अभिप्रेत असतो. दुसरीकडे मातीत राबणारे, कलांसाठी आयुष्य वाहिलेले आणि जगाला मानवतेचा संदेश देणारे लोक जगण्यासाठी संघर्ष करतात, वणवण भटकतात कारण शैक्षणिक दाखल्यांचे गाठोडे त्यांच्याजवळ नसते.* *खरंतर जीवनाच्या विविध रंगाना, कलागुणांना आपल्यात मिसळून घेतलेला इंद्रधनू असतो माणूस ! माणूस बहुआयामी असतो. अनेकांनी शिक्षणात 'ढ' असूनही नोबेल पुरस्कार मिळवून इतिहास घडविला. आपल्या वाटा आपणच शोधल्या. माणसाचे प्रश्न केवळ गणितानं सुटत नाहीत. पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे काही उत्तरं असतात. दु:खाच्या काहिलीतही आपल्या संवेदना जपणारे काही लोक असतात. जगासाठी जळता येत नसलं तरी प्रामाणिक जगणं हातात असतं माणसाच्या. ही माणसं जगाच्या लेखी मोठी नसतात. पण 'माणूस' म्हणून लायक असतात. तीर्थक्षेत्रांच्या पाय-या झिजवणा-यांपेक्षा कुणाच्या वेदनेची फुलं करणारी माणसं महान असतात. ही जीवनमूल्यंच माणसाचा मापदंड असावा.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर पशु पैसा ना गहै, ना पहिरै पैजार ना कछु राखै सुबह को, मिलय ना सिरजनहार। सारांश माणसाला मायेने आपल्या मोहात असे जखडून ठेवले आहे की माणूस स्वार्थापासून दूर जायलाच तयार नाही. जेव्हा पाहावे तेव्हा मी व मला हीच त्याची हाव हाव चालू असते. कितीही जरी धन संपत्ती मिळाली तरी त्याचंं समाधान होतच नाही. पायी चालणार्याला सायकल हवीशी वाटते. सायकल स्वार मोटार सायकल वाल्याकडे बघून दुःखी होतो. मोटार सायकल वाल्याला कार वाल्याचा हेवा वाटतो. असा हा हावहावीचा न संपणारा दुःखी करणारा मार्ग. या उलट पायी पालणार्यानं रस्त्यानं काठीच्या आधारावर चालणार्या एक पायच नसलेल्या जिद्दी अपंगाकडं पाहिलं, मोटारसायकल वाल्यानं कारऐवजी सायकलवाल्याकडं पाहिलं की आपणाकडं इतरापेक्षा बरं आहे याची जाणीव होते. मनात मत्सराची भावना जागृत होत नाही. इतराकडं निखळ व दयाभावाने पाहाण्याची दृष्टी वाढीस लागते. हीच वृत्ती माणसासाला जगाकडं सकारात्मकतेनं पाहायला शिकविते. महात्मा कबीर जीवन सहज व नैसर्गिकपणे जगण्याचा सल्ला देतात. पशू-पक्षी जीवन जगण्यासाठी गाठीला पैसा बांधून ठेवत नाहीत किवा पायाला पायतन वापरत नाहीत. उद्याच्या दिवसासाठी आजचा दिवस संपताना काही संचितही करून ठेवत नाहीत. म्हणून त्यांना देव काही चोचीत दाना देत नाही किवा जवळ काहीच नाही म्हणून ते काही उपाशी मरत नाहीत. उलट संचय करणार्याला सांभाळणं व हरवण्याची भिती आहे. पशू पक्ष्यांपाशी उद्याची चिंता नाही. पुढच्या पिंढ्यांसाठी संपतीची काळजी नाही म्हणून त्यांच्या पिलांच्या पंखात बळ येतं. ते दूर पर्यंत उड्डान घेत आकाशालाही गवसणी घालतात. माणसानं थोडा विवेक जागा केला तर बर्याच काही गरज नसता सलणार्या ठणका आपोआपच कमी होतील, व धुसर वाटणारा जीवनमार्ग धोपट होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मुल घडवताना.......🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संस्कारांनी मनावर योग्य परिणाम होतात. आयुष्य समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी मदत होते. जसं एखाद्या रत्नाला पैलू पाडल्यानंतर ते रत्न पूर्वीपेक्षा तेजस्वी होतं किंवा एखाद्या चित्रात रंग भरत गेल्यावर ते जसं उठावदार आणि सुंदर दिसतं, तसं संस्कारांचा मनावर असामान्य परिणाम होउन दिव्य तेजाचा उदय होतो. शेवटी निरोगी, सात्विक, धर्मशील आणि सामर्थ्यवान पीढी घडवणे हेच तर असते संस्कारांचे ध्येय, नाही का गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वैचारिक निर्मळता* गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झर्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये." *तात्पर्य- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.कारण विचार खुंटलेकी विकार भडकतात.आणि अविचाराने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचे आज लागणार निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोल्हापूर - शिक्षणाच्या वारीला कोल्हापूरच्या तपोवन भूमीत सुरुवात, शिक्षणमंत्र्यांनी साधला ऑनलाईन शिक्षकाशी संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई - राज्य सरकारने मेगाभरतीबाबत पुनर्विचार करावा, मराठा आरक्षण प्रश्नावरून हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऍडलेड- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिल्या मालिकेत भारतानं ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9523625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवी प्रदीप* कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’ असे प्रसिद्ध गाणे त्यांच्या नावावर आहेत. १७०० गाणी लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार गौरव केला. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हंगेरीमध्ये कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे ?* प्रजासत्ताक शासन पद्धती *२) 'बिटवीन द लाइन्स'चे लेखक कोण ?* कुलदीप नय्यर *३) संयुक्त संस्थानातील आकाराने मोठे आणि उष्ण पाण्याचे झरे असणारे राष्ट्रीय उद्यान कोणते ?* येलोस्टोन पार्क *४) बेरजेच्या मशिनचा शोध कोणी लावला ?* ब्लेस पास्कल *५) इस्टर्न टाईम्स हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होते ?* इंग्रजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● इलियास शेख ● प्रिया बुडे ● प्रा. नितीन दारमोड ● दस्तगीर सय्यद ● लल्लू खान ● दीपक पाठक ● आदर्श मडावी ● आकाश सोनटक्के ● विशाल स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तत्त्व* क्षणिक सुखासाठी माणूस स्वतः ला विसरत आहे शुल्लक बाबींसाठी तोल घसरत आहे क्षणिक सुखा पेक्षा नैतिकतेला महत्त्व असते नैतिकता ढळू नये हे खरे तत्त्व असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हरिजन गांठ ना बान्धिये उदर समाना लेय आगे पीछे हरि खरे जो मांगे सो देय । सारांश महात्मा कबीर ईश्वरीय अंशाचे खरे गुण वैशिष्ट्ये सांगतांमा म्हणतात की,'ईश्वरीय अंश असणारे किवा ईश्वराची लेकरं हा विशाल निसर्ग. त्याची विलोभणीय सुंदर रुपं याना ओरबाडत नाहीत. विकास किवा भरभराटीच्या नावाखाली निसर्गाचे , पर्यावरणाचे विद्रुपीकरण करीत नाहीत. जुन्यातलं पूर्वीचं जे पर्यावरण पूरक आहे ते नाहीसं करून नव्हे तर त्याला राखून नाविन्य स्वीकार कसा करता येईल ? याकडे लक्ष देतात. भक्कम अशी शेकडो वर्षापूर्वीची झाडे निसर्गातले डोंगर टेकड्या ही रूप नष्ट करीत विकासाच्या आडून स्वतःलाच तर फसवित नाहीत ना ! गावातले रस्ते बांधताना दर पाच दहा वर्षाला फुटाफुटाने उंची वाढवून रस्त्यावरचे पाणी घराघरात सोडले तर याला विकास म्हणायचा का? रस्ते चकचकीत करताना गावकर्यांनी घर कशी उंच करायची. या विचारानं मुळ घर सोडून दुसरीकडंच वस्ती करावी लागू नये! मानवामात्रा व वन्यजीवांना ही जमीन व मोकळ आकाश कायम सुरक्षित लाभेल याची हमी देणारा विकासक लाभला पाहिजे. महागड्या उंची वस्तू वापरध्याचा मोह भाईबंधाना लुबाडून पूर्ण होता कामा नये? एकमेव मानव प्राणी वगळता कोणताही प्राणी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी संचय करून ठेवत नाही. निसर्गातून फक्त पोटापुरतंच ते घेत असतात. निसर्गाचं संतुलन बिघडू देत नाहीत. इकडं पाच दहा वर्ष नेतेगिरी, ठेकेदारी करणारा गचकतो. त्याच्या जाण्यानंतर मागचे आक्रोश करताना 'पुढच्या दहा पिढ्या बसून खाल्ल्या तरी सरणार नाही इतकंं साहेबानं कमावलं हो '! म्हणून दुःख करतात की जणतेला लुबाडल्याचं अभिमानानं सांगतात ! देव जाणे. मतदानावेळी आमिशाला बळी पडायचे अन असेच नेते आणि विकासक आपल्यावर लादून घ्यायचे की लोकाभिमूख, धडपड्या, चळवळीतला लोकांशी नाळ असणारा नेता निवडायचा हे किमान नशेपासून दूर राहून मतदारानं ठरविलंं पाहिजे. हा निसर्गच माझा आहे. मला उद्याच्या भूकेची चिंता करण्याची गरजच काय आहे? ही पशू-पक्षांची खरी विचार सरणीअसते. कारण त्यांचं जगणं वास्तव नैसर्गिक आहे. याउलट मांणूस वर्तन करतो व विषाद करीत बसतो. हे बदललं पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शांती - Peace* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनःशांती* अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणार्या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत. हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/12/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- *मानवी हक्क दिन* 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भोपाळः स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेवरून काँग्रेसची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महानगरपालिका निवडणूक : धुळ्यात 60, तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विजय मल्ल्ल्याच्या प्रत्यार्पण खटल्यासाठी सीबीआय आणि इडीचे पथक संचालक साई मनोहर यांच्या नेतृत्वात ब्रिटनला रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : राज्यात पडलेल्या दुष्काळाचा मोठा फटका यंदा आवळा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. दुष्काळामुळे उत्पादन तब्बल ७० टक्क्यांनी घटले असल्याचे आवळ्याचे व्यापाºयांनी स्पष्ट केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरातील दुष्काळी भागातील रुग्णांना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व सदस्य असलेल्या डॉक्टरांकडून सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्राने मिळवले खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद, पुण्यात रंगणार स्पर्धा; देशभरातील ९ हजार खेळाडूंची नोंदणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *दुसरा भाग* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_9.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जदुनाथ सरकार* जदुनाथ सरकार देशातील प्रसिद्ध इतिहासकार हाते. त्यांनी भारताच्या मोघलकालीन इतिहासाचे लेखन करून मोठे योगदान दिले आहे. त्यांचा जन्म १0 डिसेंबर १८७0 रोजी बांगला प्रांतात झाला. त्यांचे शिक्षण कलकत्ता येथे झाले. १८९८ मध्ये प्रांतीय शिक्षण सेवेसाठी त्यांची निवड झाली. त्यांनी कलकत्ता, पाटणा व उत्क लमध्ये इंग्रजी व इतिहास शास्त्राचे विभागप्रमुख म्हणून काम केले. १९१७ मध्ये त्यांनी निवड काशीच्या हिंदू विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख म्हणून झाली. मात्र पुढच्या वर्षी त्यांनी काही कारणामुळे हे पद सोडून रेवेंशा काँलेज उत्कल जॉईन केले. ब्रिटिश सरकारने त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना शिक्षणसेवेत संधी दिली. यानंतर ते कलकत्ता विद्यापीठात उपकुलपती म्हणून नियुक्त झाले. १९२३ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना आय.ई. तर १९२९ मध्ये सर पदवी बहाल केली. यदुनाथ सरकार यांचे पहिले पुस्तक इंडिया आँफ औरंगजेब, टोपोग्राफी, स्टेटिस्टिक्स अँड रोड १९0१ मध्ये प्रकाशित झाली. औरंगजेब का इतिहास दोन खंडात प्रकाशित झाले. त्यांचेच पुस्तक शिवाजी अँड हिज टाईम्स १९१९ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकांचे फारसी, मराठी, राजस्थानी व युरोपीयन भाषांमधील उपलब्ध सामुग्रीचा सावधपणे उपयोग करून सरकारने ऐतिहासिक संशोधनाचे कार्य केले. सोबतच मुलभूत आधारावर संशोधनाची सुदृढ परंपराही यामुळे सुरू झाली. यासाठी यदुनाथ सरकार यांनी दिलेले योगदान अमूल्य व अतुलनीय आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) केंद्रीय मंत्रिमंडळाने मध्यंतरी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ?* मल्याळम *२) २0१३ चा मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला ?* लिडिया डेव्हिस *३) एम. चिन्नास्वामी स्टेडियम कोठे आहे ?* बेंगळुरू *४) कोणत्या भारतीय शहराला 'उगवत्या सूर्याचा प्रदेश' असं म्हणतात ?* इटानगर *५) 'तेज कदम' हे भारताने कोणत्या देशासोबत संयुक्तपणे जारी केलेले निवेदन आहे ?* कझाकस्तान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संदीप मस्के ● दशरथ शिंदे ● विठ्ठल जांभळे ● शिवानंद हिंदोळे ● दत्ताहरी भीमरतवार ● अमोल पाटील सलगर ● अनिल यादव ● श्रीकांत मॅकेवार ● संभाजी धानोरे ● प्रवीण वाघमारे ● लक्ष्मण पद्मावार ● दिनेश वाढवणकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *कृती* विचाराला कृतीची जोड बसावी लागते कृती होईल एवढी ओढ असावी लागते मनात ओढ असल्यास सहज कृती होते कार्य करण्याची त्यातून तर मनोवृत्ती होते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'जन्म आणि मृत्यू' या माणसाच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या संकल्पना. जन्म म्हणजे काय. मृत्यू म्हणजे काय. ते कसे घडतात किंवा त्यांचेमागे कोण आहे ? त्या दोन संकल्पनांच्या आधी किंवा नंतर म्हणजे त्याच्या आगे-मागे काय असते ? याविषयी काहीसे धुसर धुसर व्यक्त होत असते. परंतु ठामपणे कोणीच काही म्हणत नाही. उमर खय्याम म्हणतात.. 'जन्म आणि मृत्यू' ही माणसाच्या जीवनातील न उलगडणारी कोडी आहेत.* *ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे, हे मात्र सत्य ! जन्म आणि मृत्यू या दोन टोकांत असणा-या एका मोठ्या व्हरांड्यात माणसाचे येरझारा घालणे म्हणजे जीवन. ही दोन टोके, दोन ध्रुव ठरलेले आहेत. त्यात चालत राहणे एवढे मात्र खात्रीपूर्वक आपल्या हातात आहे, असे मानले तर या चालण्याचा प्रवास, इथला आपला मुक्काम मन:पुर्वक व्हायला हवा; पण तो तसा होत नाही. या दोन टोकांच्यामध्ये येरझारा घालता घालता आपण बरेचदा ठेचकाळतो, भरकटतो, चुकतो, गांगरतो, गोंधळतो, हरतो आणि जिंकतोदेखील ! जेव्हा या चालण्यात काही प्रमाणात यशस्वी होतो तेव्हा त्याचे श्रेय आपल्याकडेच घेतो. पण जेव्हा हरतो तेव्हा मात्र त्याची अनेक कारणे आपल्या तल्लख बुद्धीतून झराझरा बाहेर पडतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जब घटि मोह समाईया, सबै भया अंधियार निरमोह ज्ञान बिचारि के, साधू उतरै पार। सारांश जोपर्यंत मनाला मोह चिटकलेला आहे. तो पर्यंत षडविकारांची उत्पत्ती होतच राहाणार. मनाच्या अधिन राहून अज्ञानांधःकाराचा नाश करता येणे अशक्य आहे. कर्मेंद्रिये जर बुद्धि सापेक्ष राहिली व मनाची अवस्था निर्मोही तयार झाली तरच सत्कर्मे संभव आहेत. मोहातून मुक्त व्हायचं असेल मनाला जडलेली आसक्ती दूर सारावी लागेल. मनावर दाटलेलं मोहाचं मळभ फक्त संतंच दूर करू शकतात. संत संगतीत राहून सांसारिक आसक्तीचे पाश दूर सारता येतात. निखळ, निर्मळाची ओळख करून देण्याची किमया संतांठायी असते. ते कधीच माया मोहात गुरफटून पडत नाहीत. संसारी माणसांची अवस्था पतंगासारखी झालेली आहे. दिव्यापासून प्रकाशाची निर्मिती होते. त्याच्यापासून निर्माण होणार्या उजेडातून खरं तर दूरवरचा शोध घ्यायचा असतो. परंतु पतंग दिव्यावरंच झेप घेत असतात. आपल्या अस्तित्वाचा त्यांना विसर पडतो. अग्निशी टकरून स्वतःचे इवले इवले पंख जाळून घेवून ते जायबंदी होवून जातात. व तडफडत आयुष्य संपवून घेतात. दिव्याचा क्षणिक मोह पतंगांची ती अवस्था करीत असेल तर मानवात आसक्ती मुळे निर्माण होणारा मोह काय अवस्थेला नेईल याची ओळख संत करून देतात. षडविकारापासून दूर राहिले तर मानवाला जीवनानंद घेता येईल व जीवनात भव सागर तरून जाईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संवर्धन - Promotion* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माकड , कोल्हा व जंगल* (प्राणी) एकदा एक वानर व कोल्हा यांची जंगलात भेट झाली तेव्हा माकड कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देतोसका तर तो मी लावून वार्यापासून माझं रक्षण करीन. मला त्याचा उपयोग होईल.तुझे शेपूट खूप झुबकेदार आहे.तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे माकडा तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.' तात्पर्यः काही स्वार्थी प्रवृत्तीचा माणसांजवळ सर्व असून पण ते दुसऱ्याचा उपयोगी येत नाही.खर तर माणसाने इतरांच्या मदतीला कसे जाता येईल हा विचार नेहमी ध्यानीमनी ठेवून जगावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🌹जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 http://www. pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.* *प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.* smt.pramila senkude *यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.* *म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏 हदगाव (नांदेड) 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी : १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले. १९४१ - ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो काँसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला. १९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार. 💥 जन्म :- १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान. १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात स्टेजवरच आली भोवळ, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *इंडिअन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी केंद्र सरकारने केली नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या पाच राज्यांसाठी निवडणुका पार पडल्या असून निवडणुकांचे निकाल ११ डिसेंबरला लागणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यातील विविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अँडलेड येथे होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्याच्या जोरावर न्यूझीलंडने तिसर्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी पाकिस्तानला १२३ धावांनी मात देत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/r1Exkxb Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काही बाही असेच काही* * खालील ब्लॉगवर पहिला भाग वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/06/blog-post_22.html?m=1 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापुरी चपल ही खूप प्रसिद्ध आहे.आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे.येथे मिसळपाव हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ प्रसिद्ध आहे. फडतरे मिसळपाव प्रसिद्ध आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्य जगून समजते ; केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?* ३६ *०२) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केंव्हा झाली ?* ०१ मे १९६० *०३) महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत ?* ०६ *०४) अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखले जाते ?* विदर्भ *०५) मराठवाडा नावाने कोणता विभाग ओळखला जातो ?* औरंगाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अनिल सूत्रावे ● अनिरुद्ध खांडरे ● फारुख अली ● राजेश जळकोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मार्गदर्शक* मार्गदर्शनाच्या अभावाने कोणी भरकटत असतो सुंदर आयुष्यातून कोणी कायमचाच उठत असतो योग्य वेळी प्रत्येकाला मार्गदर्शक मिळाला पाहिजे आयुष्यातील टर्निंग पाॅईंट वेळीच कळाला पाहिजे शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनात आपल्याला जे काही यश मिळते ते फक्त आपल्या स्वत:च्या प्रयत्नांचे फळ आहे, असे आपण कधीही प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टाला, पतीच्या किंवा पत्नीच्या मदतीला, मित्रांच्या व* *सहका-यांच्या योगदानाला आपण दिले नाही, तर तो स्वार्थ ठरेल. पण आपल्या यशप्राप्तीत एक अदृश्य हितचिंतक नेहमीच आपली साथ देत असतो आणि तो असतो सर्वसाक्षी परमेश्वर. गरजेच्या वेळी आपल्याला त्याची आठवण येते, पण गरज भागल्यावर त्याचे आभार मानायचे आपण बहुतेकदा विसरून जातो.* *परमेश्वराचे आभार आपण का आणि कशासाठी मानायचे? आपल्याला त्याने जीवन दिले म्हणून. जीवनात आपली सतत प्रगती होत राहिली म्हणून, आपण सुरक्षित, निरोगी राहिलो म्हणून नाही, तर आपल्यासाठी हे सगळे करत असताना परमेश्वर मात्र अदृश्य राहतो आणि तो कशासाठीच स्वत:ला श्रेय घेत नाही म्हणून त्याचे आभार मानले पाहिजेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ♥♥♥♥♥♥♥♥♥ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह जग कोठी काठ की, चहुं दिश लागी आाग भीतर रहै सो जलि मुअै, साधू उबरै भाग । सारांश महात्मा कबीर क्रोधाचे दुष्परिणाम लक्षात आणून देतात. हा संसार म्हणजे लाकडी महालासारखा आहे. कोणत्याही क्षणी हा महाल आगीचे भक्ष होवू शकतो. मानवाच्य्या ठायी षड्विकार उत्पन्न होत असतात, त्या सर्व विकारांमध्ये क्रोध हा फारच घातक असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की रागाची निर्मिती होते. रागाचं प्रकटीकरण क्रोधाद्वारे होत असतं. मनाची एकाग्र अवस्था साधली नाही की चिडचिड करणं , रागे भरणं अशा क्रिया सहज प्रकट होतात. त्यामुळे पुढचा कार्यभाग बिघडतो. राग ही क्षणिक स्वरूपात व्यक्त होणारी आणि नकारात्मक विचाराकडे नेणारी सहज भाव क्रिया होय. ती अचानक प्रकटत असली तरी ती माणसाचा जीवन विषयक सकारात्मक दृष्टीकोनच बिघडवून टाकते. क्रोधामुळे मानसिक संतुलन बिघडतं, रागाच्या भरात माणूस अविचाराने वागतो. स्वभावात चिडखोरपणा वाढायला लागतो. माणून आतल्या आत गुदमरून स्वतःचे नुकसान करून घ्यायला लागतो. शक्तीक्षय होवून शारीरिक दुर्बलता ओढवून घेतो. क्रोधामुळे मित्र नातलग दुरावतात. साधू, सज्जन मात्र आपल्या चित्त प्रवृत्ती स्थिर ठेवतात. क्रोधाचा वाराही अंगाला लागू देत नाहीत. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद, समाधान कधीही कमी होत नाही. म्हणून माणसानं क्षमाशिलता, समंजसपणा व धैर्य अंगी धारण करून क्रोधाला दूर पिटाळायला शिकलं पाहिजे, एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही पालकांचा अपसमज असतो की, मी माझ्या मुलांना उच्चशिक्षित केले, म्हणजे मी माझ्या आयुष्यातील सर्व कर्तव्ये पार पाडली. मुले उच्चशिक्षित झाली आणि सुसंस्कारित झाली नाहीत, तर त्या उच्च शिक्षणाचा काय उपयोग ? हे शिक्षण घेऊन पदवीधर मुलांनाही आज स्वतःच्या उपजीविकेसाठी दारोदार भटकावे लागत आहे, तर असे शिक्षण हवे कशाला ? पण हे पालकांना कोण सांगणार ? मुलांनी शिक्षण घेऊन इतर सर्व करावे; परंतु 'साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करावे', असे पालकांना वाटत नाही. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपजीविका - Occupation* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी सेवा* गंगेच्या काठी गुरु अभेंद्र यांचा आश्रम होता. एकदा देशात भीषण दुष्काळ पडला, गुरु अभेंद्र यांनी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या तीन शिष्यांना बोलावून घेतले. व सांगितले," अशा संकटाच्या वेळी आपण पीडितांची सेवा करायला पाहिजे. तुम्ही तिघे वेगवेगळे जावून उपाशी लोकांना अन्नदान करावे." यावर शिष्य म्हणाले,"गुरुजी! आपण इतक्या लोकांना भोजन कसे काय देवू शकतो? आपल्याजवळ न अन्नाचा साठा आहे ना अन्न खरेदी करण्यासाठी धन." तेंव्हा गुरु अभेंद्र यांनी त्या तिघांना एक थाळी देत म्हणाले," हि दिव्य थाळी आहे. या थाळीजवळ तुम्ही जितके अन्न मागाल तितके ती देईल. तिन्ही शिष्य ती थाळी घेवून निघाले. दोन शिष्य एका ठिकाणी बसले, तिथून जो कोणी जाईल त्याला भोजन देत असत. परंतु तिसरा शिष्य मात्र गप्प बसला नाही तर उपाशी लोकांना शोधून शोधून भोजन नेवून देत राहिला. काही दिवसांनी तिघेही जेंव्हा आश्रमात परतले तेव्हा गुरुनी तिसऱ्या शिष्याची खूप स्तुती केली. पहिल्या दोघांना याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले,"गुरुजी! दुष्काळपीडितांची सेवा तर आम्हीपण केली आहे. मग तुम्ही तिसऱ्या शिष्याची विशेष स्तुती का करता आहात?" गुरु म्हणाले," तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अन्नदान करीत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने लोकांना जागेवर जावून भोजन दिले त्याची सेवा किंवा मदत हि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याची सेवा हि स्तुतीलायक आहे." *तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिवस* *ध्वज दिन* 💥 ठळक घडामोडी : १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार. १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर. 💥 जन्म :- १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १२५४ - पोप इनोसंट चौथा. १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा. १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट. २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. २०१३ - विनय आपटे, मराठी कलाकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्राच्या मानव संसाधन मंत्रालयाने देशभरातील शाळांना २२ भाषांचा भाषासंगम कार्यक्रम दिला आहे. जो २२ दिवस चालणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *उत्तरखंड- उत्तरकाशीमधील हार्सिल खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *निळवंडे धरणासाठी ५०० कोटी बिनव्याजी घेतल्यानंतर आता सीएम फंडासाठी साईबाबा संस्थाकडून ५० कोटी घेण्यास विधी विभागाची मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोलकाता - भाजपाच्या रथ यात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई हायकोर्टाचा केदारनाथ सिनेमाला हिरवा कंदिल; सिनेमाच्या रिलिजला स्थगिती देण्यास नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाशिक : मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला पदभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या मालिकेत भारताच्या ०९ बाद २५० धावा, चेतेश्वर पुजाराचे शतक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/3Nzbkey Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* * खालील ब्लॉगवर पहिला भाग वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विनय आपटे* विनय आपटे हे मराठी अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षणीय ठरले. विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. नाटक, गजरा, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.अनेक नवोदित कलावंतांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. मी नथुराम बोलतोय या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या मित्राची गोष्ट अँन्टीगनी या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. मराठी वाहिनीवरून प्रसारित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट व दुर्वा मालिकेत त्यांनी काम केले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) युगोस्लाव्हियात कोणते चलन वापरात आहे ?* दिनार *२) 'दास कॅपिटल' चे लेखक कोण ?* कार्ल मार्क्स *३) इंडोनेशियामधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर कोणते ?* बांडुंग *४) 'प्रताप' हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत आहे ?* हिंदी *५) देशातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोठे आहे ?* लेह *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भीमाशंकर बच्चेवार ● धनंजय शंकर पाटील ● सुदीप दहिफळे ● साईनाथ जायेवाड ● मनोज मनूरकर ● साईनाथ बुडावार ● बाळासाहेब तांबे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ध्येय* ठेवायचं तर उच्च ध्येय ठेवा ध्येय प्राप्त होतं ते मनात रोवा मनात जे काही सुप्त रहातं एक दिवस नक्की ध्येय प्राप्त होतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाजजीवनात गतिमानता वाढली. उद्योग, व्यवसाय, शिक्षण यानिमित्ताने कुटुंबातील अनेक सदस्य शहराकडे वळले. तसे कुटुंबाचे विभाजन अटळ ठरले. विभाजन फक्त कुटुंबाचे झाले नाही, तर ते घराचेही झाले. घराच्या घरपणाला घरघर लागली. शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडलेली मुले नंतर घराकडे परतेनाशी झालीत. मुलं परत येतील, घरात पुन्हा आनंदाला उधाण येईल, या वेड्या आशेवर घराची दारे नेहमी उघडी ठेवून मुलांची वाट पाहिली जाऊ लागली. आई-वडिलांच्या या व्याकूळ भावनेची आंदोलनं टिपताना कवयित्री इंदिरा संत लिहितात..* *'सांज टळली तरीही* *दार लावावे वाटेना* *वळेल का कुणी मागे?* *डोळा वाटुली संपेना..'* *मुलांची वाट बघून थकलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना जाणीव होते की, मुलं आता परत येणार नाहीत. आता एकाकी जीवन जगणं भाग आहे. अशी मनाची समजूत घालून वृद्ध माता-पिता पुन्हा संसाराचा गाडा एकाकीपणे हाकण्यास तयार होतात. त्यांची ही एकाकी धडपड व्यक्त करताना कवयित्री पुढे म्हणतात..* *'संपावया हवी वाट* *लावायला हवा दिवा* *पोटासाटी मुकाट्याने* *हवा टाकायला तवा '* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्म फंद जग फांदिया, जप तप पूजा ध्यान जाहि शब्द ते मुक्ति होये, सो ना परा पहिचान। सारांश सारे जग शाश्वताचे पूजन , संवर्धन करावयाचे सोडून मिथ्या फसव्या गोष्टींच्या नादी लागते. हे जग सुंदर करणं. सत्कर्माच्या माध्यमातून सुंदर जग स्वर्ग तयार करायचा? का दुष्कर्म करून अंधःकार अज्ञानाच्या खाईत नरकातच खितपत पडायचं याचा विचार व्हायला हवा. विश्वात मृत्यू पश्चात स्वर्ग नरकाच्या कल्पना करणं, हे सारं थोतांड आहे. तरीही हे अज्ञानी जीव विश्वातल्या सत्य, सुंदर आणि शिवस्वरूप निसर्गाविष्काराला विसरून नको त्याच अस्तित्वातच नसलेल्या गोष्टीसाठी जप, तप, पूजा, अर्चा , ध्यानादि कर्मकांडे करीत राहातात. वागणं बोलणंच चांगलं नसेल तर जीवनात काय साध्य होणार आहे? धर्माच्या पांघरणाखाली कर्मठ आणि लादलेल्या वचन हट्टासाठी उर्मट वागून स्वर्ग प्राप्ती किवा निर्मिती होत नाही .त्यासाठी सहानुभूतीची कळवळ्याची गरज असते. क्षमावृत्ती अंगी असावी लागते. वाणीतून आपुलकीचे पाझर वाहताना दिसावे लागतात. कर्मामागील वर्मच कळलं नाही तर कसं चालणार बरं ! ज्या शब्दांच्यामुळे बुरसुटलेल्या चाली! रीती, रूढी, रिवाज, व परंपरापासून मुक्ती देण्याचं व मानव कल्याणचं सामर्थ्य ज्या शब्दात आहे. त्या शब्दांचा मंत्रोच्चार केला की नसलेली भीती व भय पार पळून जाईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती आपल्या जीवनात सदैव आपापल्या कामात मग्न असते ती व्यक्ती कधीही आणि कसल्याही सुखाची अपेक्षा करीत नाही.आपल्या कामात जेव्हा मग्न असते तेव्हा ते काम करत असताना आपोआपच दु:ख विसरुन जाते आणि कामातच सुख मानते.परंतु जी व्यक्ती काहीच काम न करता केवळ सुखाची अपेक्षा करते ती व्यक्ती आपल्या जीवनात सुखी तर होऊच शकत नाही उलट दु:खात आपले जीवन टाकून चिंतेत पडते.काम करीत नसल्यामुळे फुकटची चिंता आणि काम करीत नसल्यामुळे जीवनात असमाधान यामुळे तो कधीही सुखी होणारच नाही. म्हणून सदैव माणसाने रिकामे न राहता सदैव आपल्या कामात मग्न राहावे आणि कामातच खरे सुख मानावे.हा सुखी जीवनाचा मूलमंत्र सदैव आचरणात आणावा. ©व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🌸🍃🌹🌸🍃🌹🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपेक्षा - Expect* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सत्कर्माची गोड फळे.* एका गावात राम नि श्याम असे दोन कुबडे मित्र राहत होते. राम गरीब तर श्याम श्रीमंत होता. परंतु दोघात चांगली मैत्री होती. एके दिवशी राम श्यामला म्हणाला," मी कुठवर तुझ्यावर ओझे बनून राहू?" हे ऐकून श्याम म्हणाला," तू मला माझ्या कामात मदत कर, म्हणजे तुझ्या मनाला दोषी वाटणार नाही." दुसऱ्या दिवसापासून राम श्यामला कामात मदत करू लागला. काही दिवसांपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले परंतु श्याम हळूहळू रामकडून जास्त काम करून घेवू लागला आणि त्याचा अपमानही करू लागला. त्याच्या ह्या वर्तनाने राम दु:खी झाला. रामने श्यामचे घर सोडले आणि जंगलात गेला. तेथे त्याची भेट एका साधुशी झाली. त्याची दु:खमय कथा ऐकून त्या साधूला त्याची दया आली, त्याने त्याच्या कुबदावरून मायेचा हात फिरविला आणि काय आश्चर्य ! रामचे कुबड नाहीसे झाले. त्याबरोबरच साधूने रामच्या हातात एक पिशवी दिली व सांगितले," हि पिशवी सत्कर्माची पिशवी आहे, ह्यात सोन्याचा मोहोरा आहेत. तू सत्कर्माने वागला आणि सत्कर्मासाठी जर यातील धन खर्च केले तर ह्या पिशवीतील धन कधीच नष्ट होणार नाही." राम गावी परत आला. त्याने सत्कर्मासाठी म्हणजे लोंकाच्या भल्यासाठी अनेक उत्तम कामे केली. त्यासाठी त्याने जितका पैसा खर्च केला तितका आजवर कोणीच केला नव्हता. हे पाहून श्यामच्या मनात असूया निर्माण झाली. त्याने राम ला हे सर्व कसे झाले हे विचारले. तेंव्हा रामने खरे ते सांगितले. श्याम जंगलात गेला व साधू महाराजांना आपले कुबड दाखवीत म्हणाला माझ्या मित्रासारखे मला नीट करून द्या व मलाही पैश्याची पिशवी द्या. श्यामचा हा स्वार्थी स्वभाव पाहून साधू महाराजांनी त्याला बरे तर केले नाहीच पण त्याला तेथून हाकलून दिले व सांगितले कि सत्कर्म करणाऱ्याला देव सहकार्य करतो. *तात्पर्य - लोभ, मत्सर बाजूला ठेवून मन सत्कर्मात गुंतविले तर आपला भविष्यकाळ हा अतिशय चांगला असतो. सत्कर्माच्या वाटेने नेहमी चालले पाहिजे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिवस* 💥 ठळक घडामोडी : १९९२ - अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बाबरी मशीद पाडली. 💥 जन्म :- १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा. १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हैदराबाद - तेलंगणामध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, विधानसभेच्या 119 जागांसाठी उद्या शुक्रवार 7 डिसेंबर रोजी होणार मतदान.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक- महापालिका अग्निशमन दलाच्या सात जवानांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा शौर्यपदक राजभवनमध्ये समारंभपूर्वक प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रामजन्मभूमी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी, सिनेमाचा ट्रेलर युट्युबवरुन हटविण्याचे आदेश, सेन्सॉरची परवानगी घेऊनच प्रदर्शित करा - कोर्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; जेडी(एस)च्या दोन, काँग्रेसच्या सहा आमदारांना मिळणार मंत्रिपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औरंगाबाद : पथकाद्वारे दुष्काळ परिस्थितीचे मुल्यमापन करून अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येईल - केंद्रीय सहसचिव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अॅडिलेड : आजपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/9aHepSbKpS Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रासंगिक लेख *डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही* दैनिक लोकशाही वार्ता मध्ये प्रकाशित लेख http://epaper.lokshahivarta.in/epapermain.aspx आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतीत उभी राहिली आहेत. जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ नेते, महापुरुषांमध्ये डॉ. आंबेडकरांचा उल्लेख होतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) एनआयडीसीचे विस्तारित रूप काय ?* नॅशनल इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन *२) डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थापन वर्ष कोणते ?* १८८० *३) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री. राजेंद्रबाबू यांचा कार्यकाल कोणता ?* २ मे २००४ ते ३१ मे २००४ *४) तिसर्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारताच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होते ?* इंदिरा गांधी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● डी आर भोसके ● राजेश पाटील उमरेकर ● माधव हलकुडे ● बाबासाहेब घागळे ● प्रा. मंगल सांगळे ● कैलास सोनकांबळे ● शंकर बोंबले ● अशोक हिंगणे ● दिलीप।विश्वांभर ● बालाजी गैनवार ● राजेश अम्पलवाड ● नरेश पांचाळ ● देवानंद मुरमुरे ● गोविंद चौरे पाटील ● विवेक क्षीरसागर ● दत्ता कासेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुख की दु:ख* सुख किंवा दुःखाची काळजी आपल्यावर असते काय भेटेल याची चिंता आपण जपल्यावर नसते सुखाची किंवा दुःखाची निवड आपणच करतो सारी सुखं सोडून आपण त्या दुःखालाच धरतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवनात 'प्रेम' या भावनेला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्याच्या वागण्या-बोलण्यात प्रेम नसेल, तर 'कोरडा रे कोरडा' असे म्हणून त्याला दुय्यम ठरविले जाते. प्रेम ही जीवनातील सर्वोच्च अवस्था असून त्याद्वारे जग जिंकता येते. शत्रूलाही मित्र बनवता येते. याच प्रेमाचे एक रूप भक्ती हे असून त्यामध्ये आपल्याला भारतातील सर्वच संतांचा समावेश करावा लागेल. या प्रेमाचाच उत्कट आणि उच्च अविष्कार जर भक्ती असेल, तर प्रेमदेखील आपल्याला शांती आणि मोक्ष मिळवून देण्याची पहिली पायरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.* *या भक्तप्रेमाचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे असते. तो मागत नाही; पण काही लपवतही नाही. तो जे आहे ते स्वत:सहित उधळून टाकतो. म्हणजेच स्वत:ला तो पूर्णपणे भगवंताच्या ताब्यात देतो. मी अपात्र आहे, अशीच कायम भावना ठेवणे हे त्या प्रेमाचे खरे लक्षण असते. योग्यता नसताना मला आयुष्यात खूप काही मिळाले, अशी ज्याला जाणीव असते, तो भक्त भगवंताच्या कृपेचा खरा पाईक असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह तो घर है प्रेम का, उंचा अधिक ऐकांत सीस काटि पग तर धरै, तब पैठे कोई संत । सारांश : आत्मा जागृत असेल तर चैतन्याचा साक्षात्कार होतो. जीवंत शरीर म्हणजे आत्मालय होय. हे आत्मालय म्हणजे प्रेमालयच नव्हे का ! जिथे सर्वांप्रतीच्या जाणीवा दडलेल्या असतात . सर्वांसाठी प्रेमरसाची निर्मिती होवून ची हळूहळू कृतीतून वाहू लागते. जगातील सर्व घरांपेक्षा हे किमती घर आहे. स्वतःत डोकावून पाहाता याच्याठायी चिंतन व मननासाठी एकांतही आहे. या एकांताचा सदुपयोग करणार्याला सर्वांप्रति आपुलकी व प्रेम वाटू लागते. तसेच भव्यता व दिव्यता जिथेजिथे असेल तिथेतिथे नतमस्तक होण्याची वृत्ती अंगी बाणायला लागते. अशा वेळी संयम, शांती, कळवळा, सहानुभाव इ, विविध सद्गुणांच्या आविष्कारानं ते घर सर्वांना आवडू लागतं. त्या घरात वास्तव्य करणार्या जीवाचं वर्तनंच साक्षात्कारी ईश्वररूपी वाटू लागतं. तेव्हा कुण्या संतरूपाचा या घरामध्ये प्रवेश झालेला असतो. मनाच्या सर्व भावाभिव्यक्तीत प्रेमभावनेचा आविष्कार सर्वश्रेष्ठ आहे. प्रेमभावनेच्या ठायी वैषयिक विकाराची उत्पत्ती होता कामा नये. विकार वाढले की नैतिक अधःतनाकडे प्रवास सुरू होतो. धडपडताना पडलेल्याला सहज उभं राहाता येतं, परंतु सर्वांच्या नजरेतून पडलेल्याला उभं राहाणं कसं जमणार बरं ! म्हणून पडण्यापेक्षा घडण्यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे. प्रेम निखळ व निरपेक्ष असलं की त्यात शारदी पुनवेच्या चांदण्याचा भास होवू लागतो. निरामय प्रेमभावनेसाठी सर्वाधिक त्यागाची आवश्यकता असते. हे कायम जपलं पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यावर प्रेम केलं जातंय, आपण एका कुटुंबाचा भाग आहोत, आपणही काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो आणि आपल्या जिज्ञासेला मोठ्यांकडून प्रोत्साहन दिलं जातं असं तुमच्या मुलाला वाटण्याजोगं वातावरण तयार करण्यात जर तुम्हाला यश आलं, तर मुलांच्या मेंदूचा योग्य विकास आपोआप होईल,” असे हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयाचे पीटर गोर्स्की म्हणतात. “पालक म्हणून आपली भूमिका ही मेंदूतील जटिल प्रकिया घडवून आणण्याची नव्हे तर सुदृढ, समंजस व संवेदनशील मानवांचा विकास घडवून आणण्याकरता पोषक वातावरण निर्माण करण्याची आहे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघात - Betrayal* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघातकी स्वभाव* जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल ! *तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा* *जागतिक माती दिन* * 💥 ठळक घडामोडी : १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार, ७२ हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात बोलतांना दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *स्टेट बँकेच्या एटीएममधून हवे तेवढे पैसे काढण्याची दिली मुभा मात्र त्यासाठी खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची अट.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सरकारकडून शाळांमध्ये राबवल्या जाणार्या मध्यान्ह भोजन योजनेच्या देखरेखीत चालढकल करणार्या सहा राज्यांवर सुप्रीम कोर्टाने दिले दंडात्मक कारवाईचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण द्या, ओरिसाचे मुख्यमंत्री पटनाईक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *10 डिसेंबरला दुपारी 11 वाजता सरकारनं बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; पंतप्रधान नरेंद्र मोदीही राहणार उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघातील सलामीचा फलंदाज गौतम गंभीरने घेतला क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/Lxhf0ZN5nS Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉक्टर देव की दानव* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योगी अरविंद घोष* अरबिंदो ऊर्फ ( अरविंद) योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. ते स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले. त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना,इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९0७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. त्यांनी कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ह्यपूर्णयोगाची मांडणी त्यांनी केली. माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा उदय व्हायचा आहे; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी केली आहे *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा, कृतघ्न होऊ नका *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) भारतात कोळशाचे किती टन सुप्त साठे उत्पादनक्षम आहेत ?* ६०००० दशलक्ष टन *२) ओडिशात औष्णिक वद्युत केंद्र कोठे आहे ?* तालचेर *३) दुसर्या पंचवार्षिक योजनेत वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रावर केलेला खर्च एकूण खर्चाच्या किती टक्के होता ?* २८ *४) कंबोडियात कोणतं चलन वापरात आहे ?* रियाल *५) संपूर्ण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?* धारावी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीहरी अंभोरे, पत्रकार ● राजेश गटलावार ● साईनाथ कल्याणकर ● संतोष रामराव शिंदे ● अशोक चिंचलोड ● सूर्यकांत स्वामी ● राज डाकोरे ● प्रल्हाद गड्डपवार ● अविनाश सुभेदार ● योगेश पडोळे ● राजू अलमोड ● सुनील पांचाळ ● शंकर भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कामापुरता मामा* कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी असते काम होईपर्यंत ती कशात ही राजी असते काम झालं की लगेच राजीची नाराजी होते बोलकी आजी एकदम मुकी बहिरी आजी होते शरद ठाकर सेलू जि परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *मूल घडवताना....*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आर्थिक विचार, आर्थिक मूल्य, आर्थिक वर्तन आणि आर्थिक दृष्टिकोन ह्या साऱ्या बाबी पाल्य बहुतांशी पालकांकडे बघूनच शिकतात. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पाल्याला अनुभव मिळेल अशी संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकाचे काम आहे. एक अनुभव हा शंभर उपदेशांपेक्षा श्रेष्ठ असतो. कोणत्याही गोष्टींचा आत्मविश्वास हा अनुभवातूनच येत असतो. म्हणून मुलांना प्रत्येक बाबीचे अनुभव द्यायला हवे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर मन मिरतक भया, इंद्री अपने हाथ तो भी कबहु ना किजिये, कनक कामिनि साथ। सारांश महात्मा कबीर सांगतात की तुम्ही इच्छा व आसक्तिवर विजय मिळविलेला असेल. तुमचं मन निर्विकार असेल. विषयभोगी इंद्रियावर पूर्णपणे विजय मिळविला असेल. भौतिक बाबींचा प्रभाव पडून मनाचं विचलन होत नाही . अशी अवस्था जरी तुम्ही धारण केलेली असेल तरी तुम्ही धन आणि नारी संग टाळला पाहिजे. मनाची स्थिर अवस्था किती काळ राहिलं हे निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही. जो पर्यंत मनावर संस्कार व सत्संगतीचा प्रभाव आहे. तो पर्यंत मनाचा तोल ढळणार नाही. धनाच्या ठायी चंचलता असते. ते भौतिक सुख व श्रीमंतीची स्वप्न दाखवायला लागतं. नारीच्या संगतीतही विषय विकार उत्पन्न होवू शकतात. मनाचं संतुलन राहील की नाही ? याची खात्री कशी देणार बरं ! म्हणून कबीर धनासोबत स्त्रीसंगही टाळण्याचा सल्ला देतात. संत तुकारामांनीही अभंगातून उपदेश करताना 'स्त्रीयांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणमृत्तिकेच्या । नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरेना ।।' असे म्हटले आहे. महान तपस्व्यांची दीर्घकालीन तपस्या नारी सहवासामुळे क्षणार्धात भंग पावल्याचे दाखले असताना सज्जनानं अशा बाबींची परीक्षा द्यायचा यत्न करण्यात सुद्धा जोखीम आहे. चारित्र्य निर्माण करण्यासाठी जीवनातली कित्येक वर्षे गेलेली असतात. एकदा का चारित्र्यावर शिंतोडे उडाले की ते धुण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते संशयाच्या भोवर्यातून आणि अफवांच्या लाटेतून सावरू म्हणता सावरता येत नाही. जवळचे, दुरचे सर्व जण उगीच संशयाने बघायला लागतात. म्हणून कनक आणि कामिनीपासून अंतर ठेवून राहिले तर बिघडतं कुठं ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा जरी अवगुण असेल तर तोच एखादा गुण त्याच्या जीवनाच्या अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे असे समजावे. पण त्याच व्यक्तीला त्या अवगुणाला थांबवता आले तर नक्कीच समजावे की, त्याची हळूहळू यशस्वी जीवनाकडे वाटचाल सुरु आहे. जीवनात अवगुणाला शून्य महत्त्व देऊन त्याला जीवनातून हद्दपार करुन त्या ठिकाणी चांगल्या संस्कारक्षम गुणांची भरती करावी तरच जीवन समृद्ध बनेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धडपड - Trick* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नदी, मासा आणि युक्ती* एका नदीच्या तिरावर एक कोळी मासे पकडायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय नौसेना दिन* 💥 ठळक घडामोडी : १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला. 💥 जन्म :- १९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान. १९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक. 💥 मृत्यू :- १९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका. १९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज दोन दिवसांच्या अबूधाबी दौऱ्यासाठी रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी अटक राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पैशांसाठी खासगी रुग्णालयांकडून सिझेरियन डिलेव्हरी- सर्व्हे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - मराठा आरक्षणाविरुद्ध हायकोर्टात याचिका, अॅड. गुणवंत सदावर्तेंच्यावतीने याचिका दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रिलायन्सच्या टीना अंबानी, वित्त मंत्री मुनगंटीवार, पंकजा मुंडे, डॉ. रणजित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते कॅन्सर केअर हॉस्पिटलचे करण्यात आले उद्घाटन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चंद्रपूर : सर्वाधिक पासपोर्ट असलेला भारत देश जगात तिसरा. लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल- हंसराज अहिर. चंद्रपूर येथे पासपोर्टचे 238 वे पासपोर्ट केंद्र सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषक हॉकी स्पर्धा : स्पेनने फ्रान्सविरुद्ध पुरुष विश्वचषक हॉकीच्या अ गटातील सामना १-१ असा ड्रॉ केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/jRy75Aw Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालविवाह* https://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आर व्यंकटरमण* रामास्वामी व्यंकटरमण हे भारताचे आठवे राष्ट्रपती होते. ते १९८७ ते ९२ दरम्यान या सर्वोच्च पदावर राहिले. व्यंकटरमण यांचा जन्म तामिळनाडूमधील तंजौरनजीकच्या पट्टकोट्ट या गावात झाला. त्यांचे बहुतांश शिक्षण मद्रास येथे झाले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली केली. वकिली करत असतानाच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातही सहभाग घेतला हेाता. भारत छोडो आंदोलनात ते सक्रिय होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची योग्यता पाहून भारत सरकारने त्यांना देशाच्या सर्वोत्कृष्ट वकिलांमध्ये स्थान दिले. विद्यार्थी राजकारणात सक्रिय असल्याने ते लवकरच राजकारणात आले. १९५२ ते ५७ दरम्यान ते देशाच्या पहिल्या संसदेचे सदस्य राहिले. १९५३ ते ५४ दरम्यान त्यांनी काँग्रेसचे सचिव म्हणूनही काम पाहिले. खासदार असूनही त्यांनी लोकसभेचा राजीनामा देऊन तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. १९६७ मध्ये ते योजना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. लोकसभेत तर त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम पाहिले. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांना संरक्षण खाते सोपविण्यात आले. ऑगस्ट १९८४ मध्ये ते देशाचे उपराष्ट्रपती झाले आणि २५ जुलै १९८७ रोजी त्यांनी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पेट्रोलियम तेलाचे सुप्त साठे कोणत्या खडकात आढळतात ?* स्तरित खडकात *२) दामोदर खोरे योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हाती घेण्यात आली ?* पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात *३) रोहा ते मंगलोर दरम्यान रेल्वे कधी सुरू झाली ?* २६ जानेवारी १९९८ *४) ग्रीसमध्ये कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे ?* अध्यक्षीय शासन पद्धती *५) 'तफसीर-ए-गालिब' चे लेखक कोण ?* ग्यानचंद जैन. *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नागनाथ चेटलूरे, कुंडलवाडी ● उमाकांत शिंदे ● वैशाली बाळासाहेब भामरे ● शेख आलीम ● प्रभू अण्णा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दु:ख* अबोल माणूस जेव्हा कुठं बोलकं होतं व्यक्त झालं म्हणजे दुःख हलकं होतं व्यक्त व्हायला हक्काची जागा असावी लागते दुःखी माणसाला यापेक्षा आणखी काय लागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••a *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शीलवंत सबसे बड़ा, सब रत्नन की खान । तीन लोक की संपदा, रही शील में आन।। सारांश- महात्मा कबीर म्हणतात "शीलवान किवा संतुष्ट व्यक्ती जगात सर्वात श्रेष्ठ आहे. शीलवान माणसे रत्ना-मानकांच्या तुलनेत चांगली मानली जातात. ज्या व्यक्तिंच्या अंतरात शालीनता वास्तव्य करते ती व्यक्ती विश्वात श्रेष्ठत्वाला पात्र ठरते . चंद्राची शितलता ,सुर्याची तेजस्वीता सागराची विशालता सज्जनाने अंगी धारण केलेली असते. सर्वावर ते कैवल्याचं चांदणं शिंपित असतात. प्रसंगी प्रखरपणे शिष्य व सोबत्याला परिणामांची जाणीव करून देत असतात. खळ कितीही वाकडा वागला तरी त्याचं वाकडेपण निघुन जावं . अशीच प्रार्थना विशाल हृदयानं ते विधात्याकडं करीत असतात. शीलवंत सज्जन खरं तर रत्नांच्या म्हणजेच सद्गुणांच्या खाणीच असतात . शील म्हणजे विशुध्दीचामार्ग आत्मशुद्धीकरणाचा मार्ग. या विशुधीमार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत, ज्याला पंचशील म्हणतात. १) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे व ५) मादक पदार्थाचे सेवन न करणे. अश प्रकारच्या श्रेष्ठ आचरणापुढे कोणतीही भौतिक वस्तू कितीही मोलाची असौ. ती फिकीच वाटायला लागते ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धूर्त - Sly* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धूर्त कोल्हा* एका शेतकर्याच्या शेतावर एक कुत्रा व एक कोंबडा राहत होते. एके दिवशी कुत्रा कोंबड्याला म्हणाला, ''एकाच ठिकाणी राहून फार कंटाळा आला आहे. आपण सहलीला जाऊन येऊ या का?'' कोंबड्याने होकारार्थी मान हलवली. दुसर्या दिवशी मालकाचा डोळा चुकवून ते दोघे सहलीला निघाले. त्यांनी सोबत काही मांसल हाडे व कुरकुरीत बिया खाण्यासाठी नेल्या. जंगलात दिवसभर सहलीचा आनंद लुटल्यावर रात्र पडल्यानंतर त्यांनी एका डेरेदार वृक्षाचा आसरा घेतला. वृक्षाच्या ढोलीत कुत्रा झोपला तर कोंबडा उंच फांदीवर आराम करू लागला. जेव्हा पहाट झाली तेव्हा कोंबड्याने सवयीप्रमाणे बांग दिली. कोंबड्याच्या बांगेने जवळ राहणार्या कोल्हय़ाला जाग आली. मजेदार मेजवानीच्या आशेने त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली. तो त्या वृक्षाजवळ आला व कोंबड्याला म्हणाला, ''नमस्कार महाशय, जंगलात तुमचे हार्दिक स्वागत आहे. येथे एकटा राहून मलाही कंटाळा आला होता. बरे झाले तुमची सोबत मिळाली.'' चतुर कोंबड्याने कोल्हय़ाच्या या खोट्या प्रशंसेमागील कावा ओळखला व तो म्हणाला, '' तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला, तुम्ही या वृक्षाच्या ढोलीकडे जा. तेथे माझा दारवान तुमचे स्वागत करायला तयार आहे.'' कोल्हय़ाला काही संशय आला नाही. तो ढोलीकडे गेला. तेथे स्वागत करायला उभा असलेला कुत्रा पाहून कोल्हय़ाला घाम फुटला व तो तडक तेथून पसार झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/12/2018 सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक दिव्यांग दिन* 💥 ठळक घडामोडी : १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशातील दहशतवादाशी संबंधित घटनांचे धागेदोरे हैदराबादपर्यंत पोहोचतात - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक : समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिर्डी : निळवंडे कालव्यासाठी शिर्डी संस्थांनकडून राज्य सरकारला ५०० कोटी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पालघरमध्ये पुन्हा एकदा जाणवले भूकंपाचे धक्के. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *काँग्रेस मध्य प्रदेशात 126 ते 132 जागा जिंकेल- काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे मॅरेथॉनच्या मुख्य शर्यतीत इथियोपियाचा एटलाओ डेबिड विजेता, गतविजेता इथिओपियाच्याच गुजशू बेशा याचे उपविजेतेपदावर समाधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने रविवारी पुरुष हॉकी विश्वचषकात पूल सीच्या लढतीत शानदार खेळ करताना आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/ZQ9GXWR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धार्मिक स्थळी मोबाईल बंदी का ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. राजेंद्र प्रसाद* डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. कॉंग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९0६ मध्ये कोलकाता येथे आयोजित अधिवेशनात आला होता. औपचारिकरित्या, त्यांनी १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा झाले तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे सर्मपण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी असहकार आंदोलन जाहीर होताच आपल्या वकिलीला रामराम ठोकला व स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. राजेंद्रप्रसाद यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५0 रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. १९५0 ते १९६२ या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) योजना आयोगाची स्थापना कधी झाली ?* १९५० *२) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली ?* ९ डिसेंबर १९४६ *३) नगदी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते ?* नाफेड *४) गंगोत्री नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?* उत्तराखंड *५) हैदराबादमध्ये चारमिनार कोणी बांधले ?* कुली कुतुबशाह *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अनुराधा श्यामसुंदर माडेवार ● शिवाजी कल्याणकर ● विलास रोंटे ● साईप्रसाद पुलकंठवार ● जयदीप केराई किशन ● ए समद शेख ● निहार रेड्डी ● रघुनाथ टेकुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देव* संकटात वाटते प्रत्येकाला भेव संकट आले की आठवतो देव अडचणीत आठवतो देवाचाच मुद्दा काम झालं की कोणी विचारत नाही सुध्दा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे विद्यार्थीजीवनात विद्यार्थी मन लावून जिद्दीने आणि अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवतो.त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या मनाची तयारी,त्यासाठी लागणारी मनातून जिद्द आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवायला हवे.समजा पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तर तिथेच माघार न घेता आपण त्यात कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करण्याची तयारी करावी आणि आपले मन खचू न देता तेवढ्याच जोमाने तोंड देण्यासाठी सज्ज रहावे मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग तुमच्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही माघार घेणार नाहीत. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काळजी - Care* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कक्षीवानाचे कोडे* एकदा कक्षीवान ऋषी प्रियमेध नावाच्या ऋषीकडे गेला व म्हणाला, ''प्रियमेधा, माझे एक कोडे सोडव पाहू. अशी कोणती वस्तू आहे, की जी पेटविली तरी तिचा प्रकाश पडत नाही ?'' प्रियमेधाने खूप डोके खाजवले पण ह्याचा त्याला उलगडा होईना. कोणतीही वस्तू पेटली, की तिचा थोडा तरी प्रकाश पडणारच. तेव्हा तो म्हणाला, ''हय़ाचे उत्तर मला देत येत नाही. पण माझ्या वंशात पुढे कोणीतरी विद्वान निपजेल आणि तो तुला ह्याचे उत्तर देईल.'' कक्षीवान ऋषीजवळ एक मुंगसाच्या कातड्याची भली मोठी पिशवी होती. त्या पिशवीत प्रियंगू (पिंपळी), तांदूळ आणि अधिकता नावाचे धान्य भरले होते. तीतून एक एक दाणा काढून तो दरवर्षी फेकून देत असे. ते सर्व दाणे संपेपर्यंत त्याला आयुष्य दिलेले होते. पण प्रियमेधाला काही इतके आयुष्य नव्हते. तो मेल्यावर त्याचा मुलगा त्याच्या जागी आला व तोही पुढे म्हातारा होऊन मरण पावला. अशा रीतीने प्रियमेधानंतर नवव्या पिढीत साकमश्व जन्मला. पण कक्षीवान मात्र अजूनही आपली पिशवी घेऊन बसलाच होता. तो जवळजवळ ९00 वर्षांचा म्हातारा झाला होता. अजून त्याचे कोडे कोणाला सुटले नव्हते. साकमश्वाला ह्या कोड्याचे वेडच लागले. त्याने निश्चय केला, की मी हे कोडे जिंकीनच. त्यावेळी त्याला एक 'साम' सुचले. त्याने ते गाणे म्हटल्याबरोबर त्याला ते कोडे सुटले. तेव्हा मोठय़ा आनंदाने तो तडक कक्षीवानाकडे धावत गेला. कक्षीवानाने त्याला दुरून धावत येताना पाहिले तेव्हा त्याच्या येण्याचे कारण त्याने ताडले. तो म्हणाला, ''अरे, माझी ही पिशवी नदीत बुडून टाका. माझे कोडे सोडवून मला खाली पाहावयास लावणारा माणूस हा पाहा मला दिसतो आहे. आता काय कारायचे मला जगून?'' साकमश्व कक्षीवानाजवळ आला व म्हणाला, जो मनुष्य नुसती ऋचा म्हणतो आणि 'साम' म्हणत नाही तो कवी अग्नीसारखा चेततो पण त्याचा प्रकाश पडत नाही. पण जो 'ऋचा' म्हणतो आणि लगेच 'साम' ही गातो तो कवी अग्नीसारखा चेततो आणि त्याचा प्रकाश पडतो. साकमश्वाला जेव्हा 'साम' स्फुरले व त्याने ते म्हटले तेव्हा त्याला 'सामा'चे तेज कळून चुकले. संगीताची जोड दिल्याखेरीज नुसते मंत्र पाठ करण्यात अर्थ नाही हे त्याने शोधून काढले. साकमश्व पुढे म्हणाला, ''हे तुला माझे उत्तर आहे. माझ्या बापाचेही हेच उत्तर आहे.'' असे म्हणून थेट प्रियमेधापर्यंत सर्व पूर्वजांची त्याने नावे घेतली आणि आपल्या पूर्वजांचा कलंक धुऊन टाकला. तेव्हापासून यज्ञात ऋग्वेदातील ऋचांबरोबर सामवेदांतील सामेही म्हटली जाऊ लागली आणि काव्याला संगीताची जोड मिळाली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक एड्स निर्मूलन दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६३ - नागालँड भारताचे १६वे राज्य झाले. १९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना. १९७३ - पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य. १९७४ - टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार. 💥 जन्म :- १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा. १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार. १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा. १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अर्जेंटिना - जी-20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त, अनुदानित गॅस सिलेंडर 7 रुपयांनी महागला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - आगामी शिक्षक भरतीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईत शिक्षणाची वारी उत्साहात संपन्न, तीन दिवस चालेलेल्या शिक्षणाच्या वारीत विविध शैक्षणिक बाबीची मिळाली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड, विधानसभा अध्यक्षांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त प्रासंगिक लेख खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय https://goo.gl/9wZXYz आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विजयालक्ष्मी पंडीत* १८ ऑगस्ट १९०० साली स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांना एक बहिण व एक भाऊ होता. भावाचे नाव जवाहरलाल नेहरू व बहिणीचे कृष्णा नेहरू असे होते. पाच वर्षांच्या असताना त्या इंग्लंड येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या. स्वरूप यांचे प्राथमिक शिक्षण घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झलर्ंड येथे गेल्या. स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूप यांची भेट रणजीत पंडित यांच्याशी झाली.ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजीत यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांचे नाव स्वरुपचे विजयालक्ष्मी पंडित असे झाले.विजयालक्ष्मी पंडित या संसदपट्टू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पयर्ंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. १९६४ मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल …, मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल …!! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) न्यूझीलंडची राजधानी कोणती ?* वेलिंग्टन *२) 'इंटरनॅशनल इयर ऑफ चाईल्ड' म्हणून कोणते वर्ष साजरे करण्यात आले ?* १९७९ *३) जॉर्जियातील प्रमुख नद्या कोणत्या ?* रिआन, कुर्हा - कंबोडिया *४) ग्रहगोल आणि सूर्यकुलाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?* खगोलशास्त्र *५) अवकाशात अवकाशयानातून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण ?* राकेश शर्मा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शिवराज गाडीवान ● योगेश जायशेठ ● विठ्ठलराव मुजळगे ● श्याम दरबसतेवार ● श्रीकांत लांडे ● सुभाष सोनक्के ● मारोती दिंडे ● हेमंत भेंडे ● मारुती गिरगावकर ● राजकुमार दाचावार ● श्याम नरवाडे ● शिवाजी पुरी ● बालाजी कलकोटे ● श्याम पाटील ● राजेंद्र पाटील ● विश्वनाथ पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या चरणी कोणी जेव्हा लिन होतो लिन झाल म्हणून कोणी थोडा दीन होतो लिन झालं म्हणून कोणी लाचार समजू नये लिन होतो म्हणजे दुबळे विचार समजू नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर माया पापिनी, फंद ले बैठी हाट । सब जग तो फंदे परा, गया कबीरा काट । सारांश महात्मा कबीर म्हणतात की, माया मोहात पाडणारी पापिनी आहे. माया माणसाला अलिप्त राहून कार्य करू देत नाही. एखाद्या कार्यात स्वतःला पूर्ण रुपाने झोकून देवून कार्य करू पाहताना मायेचे पाश माणसाला भ्रमित करून टाकतात. मायेची कित्येक रूपं आपल्या अवती-भवती वावरत असतात. पारध्यानं सावज आपल्या जाळ्यात अडकलं पाहिजे म्हणून न दिसणारे परंतु षड्विकारांनी युक्त अशी सावजाला हलूच देत नाही ती ! मायेजवळ मोहिनी अस्त्र असतं. कुणाला सत्ता, संपत्ती श्रीमंतीचा मोह, कुणाला विषय वासनेचा मोह तर कुणाला सौंदर्याचा मोह मोहित करीत असतो. मायेकडून एकदा का हे मोहिणीअस्त्र टाकल्या गेलं की माणसं स्वतःच्या मान-मर्यादा विसरून जातात. मायेहातचं बाहुलं बणून राहातात. सज्जन ,साधू मात्र अशा माया मोहावर विजय मिळवून असतात. ते मायेला , मोहाला जराही भुलत नाहीत. कधीच त्यांनी माया मोहाचे पाश तोडून टाकलेले असतात, राजपुत्र म्हणून वावरताना दुःखाची पुसटशी छायाही कधी त्याला स्पर्श केली नाही. मात्र हाच वैभवात वाढलेला सुखवस्तू राजपुत्र नगरातून फेरफटका मारताना माणसाचं दुःखमय जगणं पाहातो. माणसांचं जगणं दुःखमय असलं तरीही माणसांचं पुन्हा-पुन्हा त्यातंच गुरफटणं ! या सार्याचं त्या राजपुत्राकडून सखोल चिंतन होतं आणि दुःखाच्या निर्मितीची कारणं शोधणं सुरू होतं. दुःखाचं कारण लालसा, मोहात सापडतं ! सारे मोह मायेचे पाश तटातट गळून पडतात. जगाप्रति दयाभाव दाटून येतो. आणि राजसुखाचा त्याग करून सिद्ध होतात महाकारूणी तथागत गौतम बुद्ध ! संपूर्ण जगाला मानवता धर्माची शिकवण देतात व लोककल्याणाचा मार्ग दाखवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बरेवाईट,सुखदुःख, पापपुण्य, खरेखोटे,प्रामाणिक,सत्यवान,बेईमान, भाग्यवान या गोष्टींचा मानवी जीवनाशी अगदी निकटचा संबंध जोडला जातो.यातूनच कसे जीवन जगायला शिकले पाहिजे हे कळते. ज्या गोष्टी आपण आपल्या मनातून प्रामाणिकपणे करत असतो त्यातून आपल्या वृत्तीतून,कृतीतून इतरांना त्रास होणार नाही,आपल्यामुळे इतरांची मने दुखावली जाणार नाहीत, आपल्या वर्तणूकीमध्ये बेबनाव किंवा खोटेपणा नाही, दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात नेहमी सतर्कपणे राहून समाधानाने जीवन जगतो तो खरा यशस्वी होतो यालाच आपण पुण्यवान, भाग्यवान, चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सुखी, समाधानी समजतो.हे सारे गुण ज्यांच्यामध्ये आहेत ते खरेच माणूस म्हणून जगण्यास पात्र आहेत.त्यांच्या जीवनात खोट्याला,दुस-याला दु:ख देण्याला, स्वत:च्या स्वार्थाला कधीच थारा जीवनात दिलेला नसतो.त्यांचे हे गुण समाजासाठी प्रेरणा देतात. ज्या व्यक्तीमध्ये वरील कोणतेही गुण नाहीत अशा व्यक्तींचे जीवन म्हणजे सर्व अवगुण संपन्न, अहितकारक, समाजविघातक दुष्ट वृत्ती असलेली दुराचारी व्यक्ती म्हटले पाहिजे.ज्या अशा त्यांच्या वाईट वृत्तीमुळे किंवा वाईट कृतीमुळे समाजातले चांगले असलेले वातावरण बिघडल्या जातो.त्यांचे स्थान समाजामध्ये शून्य असते. ह्या वरील दोन्ही गोष्टींचा फरक जाणून खरे काय आहे आणि आपण कसे रहायला अथवा जगायला पाहिजे याचे ज्ञान ज्यांच्याजवळ आहे आणि ते ज्ञान घेऊन स्वाभिमानाने ,प्रामाणिकपणे जीवन जगतो तोच खरा जीवनात यशस्वी होतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भाग्यवान - Lucky* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोठीच त्याची सावली* सूर्य नुकताच मावळत होता. एक कोल्हा त्याच्या गुहेतून आळसावत उठला. त्याला शिकारीला जाण्याची तशी घाई नव्हती. त्या जंगलात भरपूर गुबगुबीत हरणे व मांसल ससे होते. एखादा प्राणी कोल्हय़ाला सहज सापडायचा. कोल्हय़ाने आसपास नजर फिरवली तर सूर्याच्या किरणामुळे गुहेच्या भिंतीवर पडलेली त्याची सावली त्याला दिसली. स्वत:ची मोठी सावली पाहून कोल्हा खूश झाला व स्वत:शीच म्हणाला, '' वा! मी आकाराने किती मोठा आहे!! मी जर एवढा मोठा असेन तर त्या क्षुद्र सिंहाला मी का घाबरू? तो सिंह स्वत:ला जंगलाचा राजा समजतो. आज मी त्याला दाखवतो की जंगलाचा खरा राजा कोण आहे!'' कोल्हय़ाचे हे वाक्य हवेत विरते न विरते तोच त्याला एक जोरदार गर्जना ऐकू आली. मागोमाग कोल्हय़ाच्या मोठय़ा सावलीला त्याहीपेक्षा मोठय़ा सावलीने झाकून टाकले. ती सिंहाची सावली होती. त्याने एक पंजा कोल्हय़ाला मारताच कोल्हा धूळ चाटू लागला. ''आता सांग, जंगलाचा खरा राजा कोण आहे?'' ''आपणच आहात, हुजूर'' जखमी झालेला कोल्हा कण्हत म्हणाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/11/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 💥 जन्म :- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंतप्रधान मोदी जी20 परिषदेसाठी अर्जेंटिनात पोहोचले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण! सरकारचा कृती अहवाल सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सावंतवाडी : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. मात्र हा त्याचा डाव हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा मनसे एसटी कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष हरी माळी यांनी दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्र प्रदेश : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइटचे (HysIS) होणार प्रक्षेपण.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *म्हाडाच्या घरांच्या किमती आणखी तब्बल १० टक्क्यांनी होणार कमी, अत्यल्प, अल्प, मध्यम गटातील अर्जदारांना मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लाखो शेतकऱ्यांचा राजधानीत हल्लाबोल; आज घालणार संसद भवनाला घेराव !* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : अंंकिता रैना, करमन कौर यांना दुहेरी मुकुटाची संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक-विद्यार्थी संबंध* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• डॉ. सर जगदीशचंद्र बोस हे एक भारतीयजीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञतसेच पुरातत्त्वज्ञहोते. पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो . *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कोंबडी संशोधन केंद्र कोठे आहे ?* हैदराबाद *२) पहिली कापड गिरणी कोठे आणि कधी सुरू झाली ?* मुंबई १८५४ *३) विदर्भातील प्रसिद्ध 'आनंद सागर' कोठे आहे ?* शेगाव *४) आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठला ?* शिरढोण, जि.रायगड *५) 'भारताचे पॅरिस' ही कोणत्या शहराची ओळख आहे ?* मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शंकरराव कुंटुरकर ● राजेश्वर येवतीकर ● राजू दरेकर ● देवराव पिंगळेकर ● विलास वाघमारे ● रवी भुगावार ● उमेश खोकले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इमानी* मी शोधले सर्वत्र कुठे इमान आहे भेटलो इमानी म्हणून तोही बेईमान आहे वाटले इमानी जगाला तेही बेइमान आहेत असे हे सारे इमानी इथे गुमान आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निश्चल काल गरासही, बहुत कहा समुझाय । कहे कबीर मैं का कहुॅ, देखत ना पतियाय । सारांश जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू अटळ आहे. जन्माला आलेल्या कोणालाही चिरंजीविता अशक्य आहे. कुणाचा नंबर आज लागला तर कोणी उद्या निश्चित जाणार आहे. ही बाब महात्मा कबीर लक्षात आणून देतात. वारंवार मृत्यूची अटळता नजरेसमोर येवूनही लोक विश्वास करत नाहीत. मृत्यू कधी आणि कोणत्या रुपाने पुढ्यात उभा टाकेल ? हे सांगता येणं कठीण आहे, परंतु तो येणार आहे. तेव्हा आपल्याला मिळालेल्या जीवनाचा सदुपयोग केला . सत्कार्यानं खारीचा का होईना वाटा उचलून जीवनानंद निर्माण करता आला. तर आपल्या जगण्याचा सुगंध सर्वत्र दरवळेल. दुसर्याच्या जगण्यालाही उल्हसित करेल. माणूस देहरुपानं जरी गेला तरी त्याच्या विचारानं चिरंजिव राहू शकतो. आपल्या पश्चातही या विश्वात विचाराच्या चैतन्याचं चांदणं देत राहून दुःखी व अज्ञानी जीवाच्या जीवनातील अंधःकार नक्कीच नाहिसा करू शकतो. तेव्हा अमूल्य असा मानव जन्म सार्थकी लावणं सर्वतोपरि आपल्या हातात आहे. त्याचा योग्य सदुपयोग करून घेता आला पाहिजे. सन्मार्ग दाखवणं हे सज्जनाचं काम आहे.शेवटी काय साध्य करायचं ते आपआपल्या विचारधारेवर अवलंबून असतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा, महत्त्वाचा आणि मौल्यवान जर कुठला दागिना असेल तर तो म्हणजे नम्रता हा आहे. ज्यांच्या अंगी नम्रता असेल ती व्यक्ती महनीय आणि वंदनीय असते.ती व्यक्ती केवळ नम्रतेमुळे इतरांच्या हृदयावर राज्य करु शकते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नम्रता - Humility* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थी मित्र* दोन मित्र एकदा एकाच गावाकडे जायला एकत्र निघाले होते. जंगलातून जात असताना त्यातील एकाची नजर रस्त्यात पडलेल्या एका रेशमी थैलीकडे गेली. त्याने ती लगेच उचलली. त्याने ती उघडून बघितली तर त्यात काही सुवर्ण मोहोरा होत्या. '' वा! काय नशीब आहे माझे!! मला चक्क सोन्याच्या मोहोरांनी भरलेली थैली सापडली आहे.'' त्याचा मित्र त्याला म्हणाला, '' मला सापडली असे म्हणू नको. आपल्याला सापडली, असे म्हण. जेव्हा दोन वाटसरू एकत्र जात असतात तेव्हा फायद्यात किंवा संकटात दोघांचा समान हिस्सा असतो.'' ''नाही, नाही'', थैली सापडलेला मित्र रागाने म्हणाला. ''ही थैली मला सापडली आहे. ती मी माझ्यापाशीच ठेवणार.'' दुसरा मित्र यावर काही बोलला नाही. ते दोघे काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना जंगलातील डाकूंनी घेरले. ज्याच्याजवळ सुवर्ण मोहोरांची थैली होती तो घाबरला व हळूच दुसर्या मित्राला म्हणाला, ''आता जर आपल्याला सापडलेली सोन्याच्या मोहोरांची थैली यांना सापडली तर आपली खैर नाही.'' दुसरा मित्र शांतपणे म्हणाला, ''नाही, नाही आपली नाही, तर तुझी खैर नाही, कारण काही वेळापूर्वी तूच म्हणालास की थैली माझीच आहे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/11/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी : १७७७ - सान होजे, कॅलिफोर्नियाची एल पेव्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती अल्ता कॅलिफोर्नियातील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय 💥 जन्म :- १४२७ - झेंगटॉँग, चीनी सम्राट. १८०२ - विल्हेल्म हाउफ, जर्मन कवी. १८०३ - क्रिस्चियन डॉपलर, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ. १८४९ - सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. १८५६ - थियोबाल्ड फोन बेथमान हॉलवेग, जर्मनीचा पाचवा चान्सेलर. १८९५ - विल्यम व्ही.एस. टबमॅन, लायबेरियाचा १९वा राष्ट्राध्यक्ष. १८९८ - सी.एस. लुईस, आयरिश लेखक. १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९६१ - टॉम साइझमोर, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :- ७४१ - पोप ग्रेगोरी तिसरा. १२६८ - पोप क्लेमेंट चौथा. १३१४ - फिलिप चौथा, फ्रांसचा राजा. १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - शिक्षणाची वारी चौथ्या टप्याला मुंबईत उत्साहात सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्यप्रदेश आणि मिझोरममध्ये सरासरी 75 टक्के मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी मुंबई : बाजारसमितीमधील माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य, पणनमंत्री थोड्यावेळात बाजारसमितीमध्ये येऊन करणार घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली- यूपीएसीच्या चेअरमनपदी अरविंद सक्सेना यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोवा - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकथाकार सलीम खान यांचा सन्मान; मुलगा अरबाजनं स्वीकारला पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अरुणाचलमध्ये भूकंपाचे धक्के, 5.5 रेश्टर स्केल तीव्रतेची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *Hockey World Cup 2018 : भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलचौकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इंदिरा गोस्वामी इंदिरा गोस्वामी ह्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंदिरा गोस्वामी यांच्या पित्याचे नाव उमाकांत गोस्वामी आणि मातेचे अंबिकादेवी गोस्वामी. गोहत्तीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी त्यांनी विवाह केला. लग्नाच्या अठरा महिन्यांत त्याच्या पतीचे कार अपघातात निधन झाले. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील गोलपारा सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये दिल्ली विश्वविद्यालयाच्याआधुनिक भारतीय भाषा विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. तुलसीदासविरचित रामायण आणि आसामी भाषेतील माधव कंदली यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करून इ.स. १९७३ साली त्यांनी गोहत्ती विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• १) 'तत्वबोधीनी सभा' या संस्थेचे स्थापना वर्ष कोणते? १८४० *२) अरवली आणि सातपुडा पूर्वघाटाच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेला असणार्या भू-भागाला काय म्हणतात ?* मैदानी प्रदेश *३) १९५७ मध्ये तुर्भे येथे कोणत्या संस्थेची स्थापना झाली ?* भाभा अँटॉमिक रिसर्च सेंटर *४) दुसर्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं होतं ?* अवजड उद्योग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगेश खवसे ● साईनाथ बोईनवाड ● पोतन्ना गुंटोड ● प्रमोद पाटील बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खुळ* एखाद्याच्या डोक्यात एकच एक खुळ असते ते काही निघत नाही मनात पक्क मूळ असते मनातलं काढल्या शिवाय डोक्यातून जात नाही मन शांत झाल्या शिवाय समाधान होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना, आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना। सारांश महात्मा कबीर चराचरात ईश्वर पाहतात. सर्वांठायी परमात्म्याचा अधिवास असतो. मानवाठायी असणारं चैतन्य म्हणजेच परमात्म्याचं रूप नाही का ? आमच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. कोणत्याही धर्म पंथाचा माणूस असो त्याचा जन्म आणि मृत्यू भिन्न असतो का ? माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर त्या त्या धर्म पंथाचे संस्कार बिंबवले जातात. खरे तर माणूस जन्माला येतो माणूस म्हणूनच परंतु त्याच्यावर जाती, धर्माचे, पंथाचे जे संस्कार केले जातात ती सर्व कृत्रिमता आहे. ती कुठल्या तरी भितीपोटी, समुहाच्या वेगळेपणासाठी निर्माण केलेली ही वरवरची व्यवस्था आहे. तिला कुठलाही शाश्वत आधार नाही आहे. शाश्वत व अंतिम सत्य माणूस हा माणूस व मानवता हाच त्याचा धर्म आहे. सर्वांच्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत त्याचा माती हाच आधार आहे. हे शाश्वत सत्य सर्वांना कळतंय पण वळत नाही. अशी वास्तविकता आहे. जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात त्यांना राम प्रिय आहे. जे स्वतःस मुसलमान मानतात त्यांना रहिम प्यारा आहे. राम आणि रहिम हे दोन्ही मानव कल्याणासाठी झिजले. त्यांच्या कृर्तृत्वातून आदर्श जीवनाचा बोध मिळतो. त्यांनी माणसामाणसात भेदभाव केल्याचे इतिहास सांगत नाही. तरी त्यांच्या नावावरून दंगली घडणे मानवतेला अशोभनीय आहे. त्यांची नावं घेवून लढाया करणार्यांना विशाल अशा मानवता धर्माचं खरं स्वरूप व मानव कल्याणाचं मर्मच कळलेलं नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्तीच्या मनात संशयाने घर केलेले असेल तर त्याचे जीवन जगणे अवघड होऊन बसते.त्याच्या मनात नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल संशयी दृष्टीनेच पाहतो.अशा पाहण्याने स्वत:च्या जीवनाचे नुकसान तर होतेच पण इतरांच्या जीवनातही संशयाचे विष कालवून त्याचे मनही अस्थिर करुन टाकते.अशा परिस्थितीत मग चांगले जीवन जगायला अवघड जाते.अशा संशयी व्यक्तींच्या सानिध्यात न राहणेच योग्य ठरेल.संशय हा संशयी व्यक्तींचा मित्र असतो तर इतरांचा शत्रू.म्हणून अशा शत्रूला आपल्यापासून चार पाऊले दूरच ठेवायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संशय - Doubt* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवतेचा धर्म* एकदा एका उंदराने हिरा गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या उंदिराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा सगळे उंदिर एक घोळका करून एका दुसऱ्यावर चढून दाटीवाटीने बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता. हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच उंदराला कसे काय ओळखले? शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..! आयुष्यात धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा पण आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आपण ह्या समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका.. नाहीतर त्या मूर्ख उंदिरामध्ये आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही..! माणसे जोडा मानवता हाच धर्म. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/11/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला. 💥 जन्म :- १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री. १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी. १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता. १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *इस्लामाबाद - सार्क संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण, पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राचा दावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय मैदान सोडणार नाही; रिफायनरीविरोधात नाणारवासीय आक्रमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - जी-20 देशांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून जाणार अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी रणबीर सिंह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्यात सध्या 50 टक्के आरक्षण आहे, 52 टक्के नाही, त्यामुळे एसईबीसीचं 2 टक्के आरक्षण जिवंत आहे - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बाॅलिवूडमधील ज्येष्ठ गायक मोहम्मद अझिझ यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई - भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने प्रशिक्षक रमेश पोवार आणि सीओए सदस्य डायना एडलजी यांच्यावर केले गंभीर आरोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकदा तरी अनुभववी शिक्षणाची वारी* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जोतीराव गोविंदराव फुले मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना १८८८ या साली मिळाली. शेतकर्यांचे आसूड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कॅमेरूनची राजधानी कोणती?* याओंडे *२) कुवेतमध्ये कोणती राज्यपद्धती अस्तित्वात आहे?* राजेशाही *३) प्रवरा नदीच्या प्रवाहाची लांबी किती?* १५० कि.मी. *४) सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?* हरणांसाठी *५) आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन संघटनेची स्थापना कधी झाली?* १९६५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● राम चव्हाण ● भैया कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिष्ठा* आपल्या पेक्षा आपल्या प्रतिष्ठेच वय जास्त असतं आपणच आपली प्रतिष्ठा सांभाळने रास्त असतं एका दिवसात कोणालाच प्रतिष्ठा मिळत नसते छोट्याशा चुकीनेही ती दूरदूर पळत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर माया पापिनी, फंद ले बैठी हाट । सब जग तो फंदे परा, गया कबीरा काट । सारांश महात्मा कबीर म्हणतात की, माया मोहात पाडणारी पापिनी आहे. माया माणसाला अलिप्त राहून कार्य करू देत नाही. एखाद्या कार्यात स्वतःला पूर्ण रुपाने झोकून देवून कार्य करू पाहताना मायेचे पाश माणसाला भ्रमित करून टाकतात. मायेची कित्येक रूपं आपल्या अवती-भवती वावरत असतात. पारध्यानं सावज आपल्या जाळ्यात अडकलं पाहिजे म्हणून न दिसणारे परंतु षड्विकारांनी युक्त अशी सावजाला हलूच देत नाही ती ! मायेजवळ मोहिनी अस्त्र असतं. कुणाला सत्ता, संपत्ती श्रीमंतीचा मोह, कुणाला विषय वासनेचा मोह तर कुणाला सौंदर्याचा मोह मोहित करीत असतो. मायेकडून एकदा का हे मोहिणीअस्त्र टाकल्या गेलं की माणसं स्वतःच्या मान-मर्यादा विसरून जातात. मायेहातचं बाहुलं बणून राहातात. सज्जन ,साधू मात्र अशा माया मोहावर विजय मिळवून असतात. ते मायेला , मोहाला जराही भुलत नाहीत. कधीच त्यांनी माया मोहाचे पाश तोडून टाकलेले असतात, राजपुत्र म्हणून वावरताना दुःखाची पुसटशी छायाही कधी त्याला स्पर्श केली नाही. मात्र हाच वैभवात वाढलेला सुखवस्तू राजपुत्र नगरातून फेरफटका मारताना माणसाचं दुःखमय जगणं पाहातो. माणसांचं जगणं दुःखमय असलं तरीही माणसांचं पुन्हा-पुन्हा त्यातंच गुरफटणं ! या सार्याचं त्या राजपुत्राकडून सखोल चिंतन होतं आणि दुःखाच्या निर्मितीची कारणं शोधणं सुरू होतं. दुःखाचं कारण लालसा, मोहात सापडतं ! सारे मोह मायेचे पाश तटातट गळून पडतात. जगाप्रति दयाभाव दाटून येतो. आणि राजसुखाचा त्याग करून सिद्ध होतात महाकारूणी तथागत गौतम बुद्ध ! संपूर्ण जगाला मानवता धर्माची शिकवण देतात व लोककल्याणाचा मार्ग दाखवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण स्वत: केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा असतो.त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.आपण करत असलेल्या कृतीसाठी लागणारे साहित्य, कौशल्य, एकाग्रता, पूर्वानुभव आणि समयसुचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात.हे आपल्याला दुस-याच्या करणा-या कृतीतून मिळत नाही.आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे समाधान मिळते ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही.यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हेदेखील शिकायला मिळते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोडक्या डोक्याचा राजा* कोणे एकेकाळी सोनापूर राज्यावर एक मध्यम वयाचा राजा राज्य करत होता. त्याच्या दोन राण्या होत्या. थोरली राणी राजाप्रमाणेच वृद्ध होती तर धाकटी राणी अगदी तरुण होती. दोन्ही राण्यांचे राजावर अतिशय प्रेम होते. काळ उलटत गेला तसतसे राजाचे केस पांढरे होऊ लागले. थोरल्या राणीला त्याबद्दल काहीच वाटत नव्हते पण धाकटी राणी मात्र अस्वस्थ झाली. तिचा पती वृद्ध दिसणे तिला पसंत नव्हते. त्यामुळे जेव्हा-जेव्हा ती राजाबरोबर असे तेव्हा राजाचे केस विंचरण्याच्या बहाण्याने ती राजाचे पांढरे केस उपटत असे. या उलट थोरल्या राणीला राजाचे केस पांढरे होणे सुखावत होते. ती राजापेक्षा जास्त वृद्ध दिसू इच्छित नव्हती. त्यामुळे ती जेव्हा जेव्हा राजाबरोबर असे तेव्हा राजाचे केस विंचरताना ती राजाच्या काळ्या केसांना उपटून टाकत असे. आता हे सांगायला नको की, थोड्या कालावधीनंतर त्या बिचार्या राजाने आपल्या डोक्यावरील सर्व केस गमावले व तो चक्क बोडक्या डोक्याचा राजा बनला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/11/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक ठळक घडामोडी :- १९९५ - तलत महमूद यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती. १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ. १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यस्तरीय गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, 3 कोटी 38 लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - मध्य प्रदेश आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला, 28 नोव्हेंबरला होणार मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे वय 25 वर्षांवरुन 18 वर्ष करण्याच्या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विधीमंडळाचे कामकाज सुरु होताच विरोधक आक्रमक, दुष्काळग्रस्तांना तातडीनं मदत देण्याची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुरबाडच्या हरिश्चंद्रगड गडावर अडकलेल्या 20 पर्यटकांची सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ * इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेवर 3-0 ने मात करीत 55 वर्षांनंतर परदेशात प्रतिस्पर्धी संघाला दिली क्लीन स्विप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/OaJAj9J Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धार्मिक स्थळी मोबाईलवर बंदी का ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हरिवंशराय बच्चन* हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील प्रथितयश कवी, साहित्यिक आहेत. हरिवंशराय यांचा जन्म अलाहाबादनजीकच्या प्रतापगड जिल्हय़ातील बाबूपट्टी या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या पित्याचे नाव प्रताप नारायण श्रीवास्तव आणि आईचे नाव सरस्वतीदेवी होते. सरस्वतीदेवींच्या पोटी जन्मलेल्या या पुत्राला खरोखर सरस्वतीदेवी प्रसन्न होती, असेच म्हणावे लागेल. त्यांना लहानपणी 'बच्चन' असे म्हटले जात होते. याचा अर्थ 'बच्चा' किंवा 'अपत्य' असा होतो. नंतर मात्र याच नावाने ते ख्यात झाले. त्यांनी कायस्थ शाळेत प्रथम उर्दूमधून शिक्षण घेतले. तसेच प्रयाग विश्वविद्यालयातून इंग्रजीत एम.ए. आणि केंब्रिजमधून इंग्रजी साहित्यातील कवी डब्ल्यू. बी.यीट्स यांच्या कवितांवर संशोधन करून पीएचडीची पदवी घेतली. १९२६ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचा विवाह श्यामा बच्चन यांच्याशी झाला. त्यावेळी त्या अवघ्या १४ वर्षांच्या होत्या. पण, श्यामा यांचे क्षयरोगाने निधन झाले आणि पाच वर्षांनी हरिवंशराय यांनी पंजाबी तरुणी तेजी सुरी यांच्याशी विवाह केला. त्याचवेळी त्यांनी कवितालेखनाला सुरुवात केली होती. त्यांना अमिताभ आणि अजिताभ असे दोन पुत्र झाले. तेजी बच्चन यांच्यात अभिनयाचा गुण होता. त्यांनी हरिवंशराय यांनी अनुवादित केलेल्या शेक्सपियर नाटकात काम केले होते. साहित्यात हरिवंशराय यांचे योगदान अमूल्य असे मानले जाते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवायही त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. त्यांची 'मधुशाला' ही साहित्यकृती तर अजरामर ठरली आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो ?* सहा महिने *२) राज्य पुनर्रचना तत्त्वानुसार आंध्र राज्याची स्थापना कधी झाली ?* १ ऑक्टो.१९५३ *३) राज्यसभेत जास्तीत जास्त सभासद संख्या किती असते ?* २५० *४) प्रशासनाचा औपचारिक आणि घटनात्मक प्रमुख कोण ?* राष्ट्रपती *५) सर्वोच्च न्यायालयात न्यायदानाचे काम करणार्या न्यायाधीशांना वकिली करण्याचा किती वर्षांचा अनुभव आवश्यक असतो ?* 10 *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अनिता जावळे - वाघमारे ● दीपक जाधव ● लिंगन्ना गुंटोड ● लोकडेश्वर बोमले ● पोषट्टी जाजेवार ● पंकज शेठिया ● ओंकार बच्चूवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भरोसा* आपल्या समस्येच आपणच निराकरण करू शकतो स्वतः वर नाही मग दुस-यावर कसा भरोसा धरू शकतो दुसरे फक्त आपल्याला सल्ला देऊ शकतात कोणाचं दु:ख थोडं कोणी वाटून घेऊ शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या पृथ्वीतलावर पर्वत, नद्या , स्थावर-जंगम आहे तोवर लोकसमूहात रामायणाची कीर्ती गाजत राहणार आहे.. या शब्दांत महर्षि वाल्मिकींनी रामायण कथेची कालातीत स्थिरता कोरून ठेवली आहे. या भूतलावरील प्रत्येक मानवी वृत्ती व प्रवृत्तीचं प्रातिनिधिक रूप या महाकाव्यात रंगविलं आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सेवक, आदर्श राजा अशा आदर्शांचा प्रतिनिधी म्हणून श्रीरामाचं चरित्र आपल्यापुढं येतं. संतानी, भक्तांनी, कवींनी त्याला देवत्वाला पोहोचवलं आहे.* *रामायणातील अगतिकता नि वेदनांच्या आंतरिक संघर्षाच्या तळाशी पोहचल्याशिवाय श्रीरामाच्या मानव ते 'मर्यादा पुरूषोत्तम प्रभूराम' या देवत्वरूपाशी तादात्म्य पावताच येणार नाही. गदिमांनी गीतरामायणात प्रभूरामाच्या जीवनपटाचा माणूस म्हणून सारांश मांडताना अतिशय उत्कटतेने वलयांकित केलेले-* *'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा* *पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.'* *हे श्रीरामाचं रूप आधिक यथार्थ वाटतं..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आंधी आयी ज्ञान की, ढ़ाहि भरम की भीति । माया टाटी उर गयी, लागी राम सो प्रीति । सारांश जेव्हा ज्ञानाची भरती येते. तेव्हा अज्ञानाचे भ्रम चुटकीसरशी गळून जातात. ज्ञानामुळे प्रत्पेक गोष्टीमागील कार्यकारणभाव कळायला लागतात. प्रत्येक घडामोडीच्या मागे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर भौतिक व रासायनिक क्रिया कारणीभूत असतात. त्यामागेच त्या क्रियेचं रहस्य दडलेलं असतं. हे सामान्य माणसाच्या विचार प्रक्रियेच्या बाहेरचं असलं तरी त्या मागील कारणं शोधत गेली तर कार्यकारण मिमांसा होते. प्रक्रियेमागील रहस्य उलगडताच तिच्या बाबतीत मनात निर्माण झालेले अज्ञानी व अचाट संभ्रम नाहिसे होतात. "चालता विज्ञानाची वाट तुटती अज्ञानपाश तटातट हो तसे तिमिरातूनी पहाट पुढे ज्ञानाचा लखलखाट, दाटून आलेल्या आभाळाने सगळीकडे अंधारून यावं ! विजांच्या चमचमाटाने आणि गडगडाटाने आसमंत थरारून टाकावा ! मात्र वार्याची झुळूक लागताच थेंबांचा अमृत वर्षाव होतो. आभाळ आसमंताला शितलता व नवचैतन्यानं भरून टाकावं. मग आभाळी दाटलेल्या मळभाची कणभरही तमा उरत नाही. तशीच अवस्था अज्ञानात चाचपडणार्याला ज्ञान प्राप्तीनंतर निर्माण होत असते. माया व अविचाराचा फसवा भास नाहिसा होतो. आपल्या सुंदर निसर्गाशी, ज्ञानाशी व चराचरारात भरून असलेल्या चैतन्यमय विश्वात्मक शक्तीशी समरस होत आनंदाची निर्मिती व्हायला लागते.. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नुकसान - Damage* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी* एकदा भगवान श्रीकृष्णाने मोठय़ा यज्ञाचं आयोजन केलं. त्यांनी धर्मराजाला बोलावून सांगितलं, या यज्ञात एका माणसाचा बळी द्यायचा आहे. त्यासाठी एखादा दुष्ट-दुर्जन माणूस शोधून काढ. आपण त्याचा बळी देऊ. नंतर कृष्णाने दुर्योधनाला बोलावले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, 'मी एक यज्ञ करतो आहे. या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावयाचा आहे. तेव्हा शक्यतो एखादा पवित्र-सज्जन माणूस शोध. आपण त्याचा यथोचित सत्कार करू.' धर्मराज एका दुष्ट माणसाच्या शोधात निघाला आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधासाठी नघाला. धर्मराजाला एकही दुष्ट माणूस सापडला नाही. तो परत आला आणि म्हणाला, 'भगवान! आपल्या राज्यात कोणीही दुष्ट नाही. आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस अत्यावश्यक असला तर तुम्ही मलाच बळीच द्या. तुमचा यज्ञ पार पडेल.' थोड्या वेळाने दुर्योधन आला आणि कृष्णाला म्हणाला, 'देवा! मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मी सोडता एकही सज्जन माणूस आढळला नाही. तेव्हा एक सज्जन व्यक्ती म्हणून माझा सत्कार करावा.' तात्पर्य : विचार तशी दृष्टी *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सस्नेह नमस्कार*🙏👏 〰〰〰〰〰〰 आज दिनांक १३-११-२०१८ रोजी रोटरी क्लब हदगाव तर्फे निराधार महिलांसाठी एक माणुसकी आणी मदतीचा हात देण्यासाठी दिवाळी आणि भाऊबीज ओवाळणी म्हणून साडी,फराळ साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमा मधे एकुण 17 निराधार महिलांना मायेची भेट देण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तहसीलदार हदगाव मा. श्री कुळकर्णी साहेब आणि शिवसेना तालुका प्रमुख श्री श्यामराव चव्हाण .श्री संभाजी लांडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात रोटरी अध्यक्ष आदरणीय श्री बालासाहेब कदम. सचिव आदरणीय डॉक्टर श्री संजय पावार सर.,आदरणीय बालाप्रसद मुंदडा.मुनासेठ गट्टानी.कोनडलवाडे साहेब.जी डी तावडेसर.आदरणीय डॉक्टर. तावडे साहेब.विवेकानंद शाळेचे तावडे सर.आदरणीय डॉक्टर स्वप्निल अग्रवाल सर.वर्षा ताई देशमुख. प्रमिलाताई सेनकुडे.सौ. तावडे. कदम सर.प्रा.नागेश सर आणि शिल्पा चौधरी मॕडम व सर्व रोटरी सदस्य तसेच ,पत्रकार आ.गजानन गिरी, आ.हिमान्शू इंगोले.आदी उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान प्रमिलाताई सेनकुडे यांना गुरुगौरव पुरस्कार मिळाला म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. नागेश चौधरी सर यांनी केले. आजच्या कार्यक्रमाचे काही क्षणचिञे 👇👇👇👇 〰〰〰〰〰〰〰🙏🙏🙏🙏
🔰🌸🔰🌸🔰🌸🔰 *🌷🌷जीवन विचार*🌷🌷 〰〰〰〰〰〰 मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही.सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात.पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते. मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण दिली... *संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"* माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.कारण नावेत जर पाणी वाढले तर जसा धोका होतो तसे घरात धन वाढल्यामुळे धोका निर्माण होतो. म्हणून दानधर्म करण्याचे चांगले कार्य आपल्या हातुन घडावे ह्यातच मानवी जीवनाच भल आहे. आपण समाजाच काहीतरी देणं लागतो ही भावना ध्यानीमनी ठेवून आपण आपल्या कष्टाचा कमाईचा एक भाग जरी समाजातील गरजू लोकांच्यासाठी लावला तरी आपल्या जीवन जगण्याचे सार्थक झाले समजावे. 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *🙏शब्दांकन/संकलन*🙏 *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/11/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली १९८८ : श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले १९९८ : पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या जेसी व्हेंचुराची मिनेसोटाच्या राज्यपालपदी निवड 💥 जन्म :- १६१८ : औरंगजेब, मोगल सम्राट १९३३ : अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ १९३३ : मायकेल डुकाकिस, अमेरिकन राजकारणी १९५१ : अझमत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :- १९७० - पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा १९९६ - ज्यॉँ-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष २००४ - शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान, संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष . *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *व्यापाऱ्यांना एका तासात 1 कोटींचं कर्ज मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ही नव्या कर्ज योजनेची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *एक पैसाही न देता 'शिक्षकांची भरती' होणार, सरकार 4,738 जागा भरणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *12 दिवसांपासून सुरू असलेला ओला, उबर चालकांचा संप अखेर मागे; परिवहन मंत्री दिवाकर रावतें सोबतच्या बैठकीत तोडगा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उद्धव भोसलेंची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - DSK प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रकडून मराठे व गुप्ता यांना अधिकार बहाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर - माळशिरस नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी मनीषा इंगळे तर उपाध्यक्षपदी डाॅ. मारुती पाटील यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी तर हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/yX3WyZ2YwR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपी दिवाळी अंक प्रकाशित झालय त्यातील माझी प्रकाशित......! *"कथा - भाऊबीज"* वाचा प्रतिलिपि वर https://marathi.pratilipi.com/story/qhzRZfB59oqg?utm_source=android&utm_campaign=content_share अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अमर्त्य सेन* अर्थशास्त्रज्ञ अर्मत्य सेन यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ रोजी झाला. त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा नोबेल सन्मान मिळालेला आहे. ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय जादवपूर विद्यापीठ आणि दिल्लीच्या स्कुल आँफ एकाँनाँमिक्स तसेच आँक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. एमआयटी, स्टेनफोर्ड, बर्कले व काँरनेल विद्यापीठांमध्ये त्यांनी सेवा दिली आहे. त्यांचा जन्म कोलकातामध्ये झाला. शांतीनिकेतनमध्ये शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी केंब्रिजच्या ट्ििनटी काँलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी काही काळ म्यानमारच्या मंडाले येथेही घालवला आहे. त्यांनी चाळीस वर्षात ३0 च्यावर पुस्तके लिहिली आहेत. १९७३ ते ७१ दरम्यान ते दिल्लीच्या स्कुल आँफ एकाँनाँमिक्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यावेळी माजी पंतप्रधान डाँ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक विद्वान अर्थशास्त्रज्ञ त्यांचे सहकारी होते. अर्थशास्त्रातील संशोधक म्हणून जादवपूर विद्यापीठातून त्यांची कारकिर्द घडली. अर्थशास्त्रातील संशोधनासाठी त्यांना १९९८ मध्ये सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर केंद्र सरकारनेही त्यांना १९९९ मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'डेक्कन हेरॉल्ड' या वर्तमानपत्राचे प्रकाशन स्थळ कोणते ?* बेंगळुरू *२) डोळ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे जीवनसत्त्व कोणते ?* अ जीवनसत्त्व *३) पेशीकेंद्राभोवती दोर्यासारखा सूक्ष्मतम असणार्या भागाला काय म्हणतात ?* रंगपरमाणू *४) भूपृष्ठाची मोजणी, वक्रता कोन मोजणारे उपकरण कोणते ?* थिओडोलाइट *५) अर्थशास्त्रातील संशोधनासाठी १९९८ मध्ये नोबेल पुरस्कार मिळविणारे भारतीय कोण ?* अमर्त्य सेन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● एस पी जाधव ● संदीप पगारे ● मयूर महाजन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सवय* गुलामीची सवय लागली की माणूस स्वतःची ताकत विसरतो याच्यात ताकतच नाही असा सर्वात गैरसमज पसरतो सवयीचे गुलाम न होता स्वतःच्या ताकतीची जाणीव व्हावी आपली सामर्थ्य आपण आपल्यात डोकावून पहावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत कबीर यांनी मानवी जगण्यातल्या खोटेपणावर प्रहार करीत ख-या भक्तीची जाणीव आपल्या रचनांमधून करून दिली. त्या रचना फारच दिलासा देणा-या आहेत. कुणाचीही वेदना ही आपली सहवेदना झाली पाहिजे यावर भर देत संतानी जो विचार मांडला तो अमूल्य जीवनाचा विचार आहे. गुरूस्वरूप असणा-या संताबद्दल कबीर म्हणतात....* *संगत संतनकी कर ले।* *जनमका सार्थक कछु कर ले।* *उत्तम नरदेह पाया प्राणी इसका* *हित कछु कर ले ॥* *या सांगण्यातून कबीरांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हेच सांगितले. त्या सार्थकतेच्या पाठीमागे आपण केव्हा आणि कधी जाणार आहेत, याचा विचार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायला हवा. संत हे कृपादृष्टी करणारे असल्याने त्यांच्याकडून कधीही कठोर वागणूक मिळणे अशक्य आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग ही प्रकाशवाट असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 51* कबीर संगी साधु का, दल आया भरपूर । इन्द्रिन को तब बाँधीया, या तन किया धर । अर्थ : खर्या संतांच्या संगतीने माणसाच्या वर्तनात बदल होतो. संत संगतीमुळे मानवाला कल्याणकारी मार्ग सापडतो. संत द्वेष, माया, मोह ,विकार, वासना यापासून अलिप्त राहतात. संताचे ठायी विचार , विवेक, वैराग्य, दया, क्षमा, समता , निरामयता इ सद्गुणांची खाणंच असते. त्यांच्या कृपा कटाक्षाने सुद्धा काळीज फुटेतो धावणार्याला शांती मिळते व तो समाधानाच्या मार्गावर येतो. विज्ञानाचा पदवीधर असणार्या नरेंद्राच्या मस्तकी गुरू रामकृष्ण परमहंसांचा स्यर्श झाला. मनाची चंचलता नाहीशी होवून नरेंद्र अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा पहिला तत्ववेत्ता ठरला. अध्यात्म व विज्ञानाने एकमेकांच्या हातात हात घेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मानवतेला विकासाची जोड मिळेल व विज्ञानाच्या बुद्धि प्रामान्यतेला सहृदयता मिळेल. हे संपूर्ण जगाला सांगणारा तो विज्ञाननिष्ठ संन्यासी 'स्वामी विवेकानंद' होतो . किती मोठी अद्भूत शक्ती संचरत असते, खर्या साधूंच्या ठायी ! खरे साधू भौतिक सुखांच्या सान्निध्यात वावरूनही त्यांची कधीच आस धरीत नाहीत. संन्यासी वृत्तीनं जगताना इंद्रीयांच्या अधिन असणार्या मनालाच हे संन्यस्त जिंकून घेतात. मनाला विकारी न होवू देता विवेकपूर्ण जगत निरामयतेचा अंगीकार करून हे दिव्यत्वानं जगालाच भारून टाकतात. त्यांचं क्षणभराचं सान्निध्यही माणसाला दिव्य दृष्टी बहाल करून जातं. खर्या संत, सज्जनाच्या सहवासाने जीवनाला मानवतेची जोड मिळते. माणूस विकारमुक्त होऊन विवेकानं जगायला लागतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या रेखाटलेल्या चित्रात कल्पनेने रंग देऊन चित्र रंगवून पूर्ण करणे सोपे असते, परंतु जीवनाच्या चौकटीत आखलेल्या चित्रात रंग देणे फार कठीण असते.त्यामध्ये जीवनात प्रसंगानुरूप येणारे वेगवेगळे सुखाचे, दु:खाचे,आनंदाचे,विरहाचे,नात्यांचे, जीवन व्यवहाराचे अनेक रंग कसे भरावे याचे कल्पक ज्ञान असणे आवश्यक आहे आणि वास्तव जीवनात ते साकारणे त्याहीपेक्षा जास्त अवघड जाते.कधी कधी आयुष्य संपते तरीही जीवनाच्या चित्रात रंग पूर्ण देणे होत नाही.जो कोणी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कौशल्याने रंगवण्याचे काम विशिष्ट कलेने करतो तेव्हा त्याच्या जीवनाचे आदर्श चित्र रंगवतो आणि त्या रंगवलेल्या चित्रांचे इतर लोक अनुकरण करतात नि जीवनात एक वेगळा आनंद घ्यायला लागतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🎊🎨🎊📚🎨🎊📚🎊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्तणूक - Behavior* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानधर्म* कानपूरमध्य़े गंगेच्या काठी बसून एक भिकारी भीक मागत होता. भिकेत त्याला जे मिळेल ते त्यातून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. त्याच्या हातात एक कटोरा असायचा. त्याला तो जाणा-या येणा-याच्या पुढे करायचा. ज्याला त्यात काही टाकावयाचे असेल ते टाकत होता. परंतु तो भिकारी तोंडाने काही मागायचा नाही. अन्य भिका-याप्रमाणे तो दीनवाणा होत नसे. एके दिवशी तिकडून एक श्रीमंत माणूस जात होता. भिका-याने पाहिले, श्रीमंताच्या अंगावर अत्यंत भारी कपडे होते, गळ्यात आणि अंगावर सोन्याचे दागिने चमकत होते. उंची राहणी ही त्याच्या वर्तनातून दिसून येत होती. श्रीमंत वाटतो म्हणून भिका-याने त्याच्याकडे कटोरा पुढे केला, ते पाहून त्या श्रीमंताच्या चेह-यावर तिरस्कार उमटला. त्याने खिशातून एक रूपायाचे नाणे काढले व त्या भिका-याकडे फेकले व छद्मी हसला. तो पुढे निघणार इतक्यात भिकारी जागेवरून उठला. त्याने त्या श्रीमंताचे उद्धट वर्तन व गरीबांसाठी असलेले तिरस्करणीय भाव पाहून ते रूपायाचे नाणे श्रीमंताकडे परत फेकले व म्हणाला,’’ घे सांभाळ तुझी दौलत, मला तुझ्यासारख्या गरीबाचा पैसा नको, ज्या दानामध्ये तिरस्काराचा भाव आहे असे दान स्वीकार करू नये असे मला सांगण्यात आले आहे. दान करतानासुद्धा शुद्ध मनाने, चांगल्या भावाने दान करावे जेणे करून घेणा-याला व देणा-याला समाधान लाभते.परमेश्वराने माणूस बनविताना जर काही फरक केला नाही तर तू तिरस्कार करून परमेश्वराचा अपमान करतो आहेस हे लक्षात ठेव. ’’ हे ऐकताच श्रीमंताला आपली चूक लक्षात आली. त्याने तात्काळ भिका-याची क्षमा मागितली. तात्पर्य :- दान सत्पात्री, प्रेमपूर्वक व नि:स्वार्थ भावनेने केल्यास त्याचे समाधान मिळते./ जगात सर्वजण समान आहेत. श्रीमंती आज आहे तर उद्या श्रीमंती नसेल याची जाणीव ठेवून वागले पाहिजे.माणसाने मनोभावे निस्वार्थीपणे दानधर्म करावा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/11/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९१४ : पहिले महायुद्ध रशियाने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले १९७४ : सोलमध्ये नाइटक्लबला लागलेल्या आगीत ७४ ठार २००० : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (चित्रीत) पहिले रहिवासी पोचले 💥 जन्म :- १७९५ - जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष १८६५ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष १९६५ - शाहरुख खान, भारतीय अभिनेता 💥 मृत्यू :- १९५० - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक १२८५ : पीटर तिसरा, अरागॉनचा राजा १३२७ : जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा १९३५ : जेम्स कॅमेरोन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *धुळे व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; 9 डिसेंबरला मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईः हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार, अधिवेशनाचं कामकाज 9 दिवस चालणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आज घडीला निवडणुका झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील भाजपाला 300 जागा मिळण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सी - व्होटरच्या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर, काल 250 मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवोदितांना खेळाडूपेक्षा माणूस म्हणून घडवायचे आहे ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’ च्या शुभारंभी सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आपले मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तिरुवनंतपुरम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 9 विकेट्स राखून मिळविला दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/MXN8y95 Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपी दिवाळी अंक प्रकाशित झालय त्यातील माझी प्रकाशित......! *"कथा - वेळ नाही मला"* वाचा प्रतिलिपि वर https://marathi.pratilipi.com/story/GZ8q7b3fE2Uk?utm_source=android&utm_campaign=content_share अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *थिमक्का* दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 284 वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 284 वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) देशात डाळींचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते ?* मध्यप्रदेश *२) पश्चिम घाटात किती किलोमीटर लांब पर्वत आहे ?* १७०० किमी *३) 'बॉर्न अगेन ऑन द माउंटन' पुस्तकाचे लेखक कोण ?* अरुणमा सिन्हा *४) धातुशास्त्रावर संशोधन करणारी झारखंडमधील संस्था कोठे आहे ?* जमशेदपूर *५) देशातील पहिले अणुशक्ती केंद्र कोठे उभारण्यात आले ?* तारापूर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शंकरराव कामिनवार, धर्माबाद ● मारोती बोईनवाड ● गोविंद देशमुख ● छाया पुयड ● महेश धुळेकर ● प्रवीण शिंदे ● प्रणित जैस्वाल ● महेश दुधाळकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* नकारात्मक विचार विनाशाचे कारण आहे सतत नकारात्मकता हे काय धोरण आहे जसा विचार करता तसाच चेह-यावर दिसेल सकारात्मकता नाहीच तर मनात कुठून घुसेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत कबीर म्हणतात..."बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलीया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय." 'आदर्श व्यक्तिमत्व' एका दिवसात बनू शकत नाही. या जगात वाईटाचा शोध घेतला तर सर्वात वाईट आपण स्वत:च सापडतो.* *'शिल्पकार' जसा एखादे शिल्प घडविताना, त्यातील नकोसा भाग काढतो व हवासा भाग ठेवून एक देखणे शिल्प तयार करतो. तद्वतच आपल्यातील दोष शोधून,ते काढून टाकून एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' बनण्याचा 'संकल्प' हिच खरी 'घटस्थापना.' हि विधायक 'घटस्थापना' झाली कि आपोआपच ह्रदयात 'मानवतेची प्रतिष्ठापना' झालीच म्हणून समजा.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 50* जाति न पुछो साधु की पुछ लिजिए ग्यान । मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान । अर्थ महात्मा कबीर ज्ञानविषयक विवेचनात सांगतात की, विद्वान जाती धर्म किवा कुळावरून ठरवू नये किवा त्याची जात, धर्म, कुळ विचारू नये. तलवारीचं श्रेष्ठत्त्व तिच्या धारेवरून ठरत असतं. तलवार ठेवण्यासाठी कोणतं म्यान वापरलं जातं. ते फार किमती आहे का? हे फार महत्वाचं नसतं. तलवारीला चमकण्यासाठी बाहेर काढावं लागतं. म्यान रिकामंच पडून राहातं. लोकबोलीत एक म्हण आहे. नदीचं मुळ आन ऋषीचं कुळ विचारू नये. किती विचारपूर्वक ही म्हण जपलीय बरं आपल्या पुर्वजांनी ! रामायणाचा रचियेता पूर्वायुष्यात वाटमारी करणारा लुटारू म्हणून हिणवल्या जायचा. एखादा प्रसंग जीवनात घडून जातो अन सुरू होतं जीवनाचं आरपार चिंतन. पार धुवून जातो लुटारूपणाचा कलंक. प्रकटला जीवन अन नात्यांच्या आदर्शत्वाची अनुभूती देत तत्वचिंतक वाल्मिकी . वेळेचा सदुपयोग करीत स्वतःला सदैव वाचन चिंतनात गुंतवून वर्षानुवर्ष गुलामीत खितपत पडलेल्या माणसांना स्वाभिमानाची जाणीव करून देणारा मानव मुक्तीचा एल्गार ही एक क्रांतीच होती. जीवनोद्धाराचा शिक्षण हाच महामार्ग सांगणारे प्रज्ञासूर्य डाॅ.भीमराव आंबेडकर जगाच्या औत्सुक्याचा विषय ठरणे ही जाती ,धर्म किवा कुळाची किमया नव्हती. तर ती विद्वतेची किमया होती. तलवारीला पाहाताना म्यानाला काढून टाकावंच लागतं तसं जातीचंही आहे. विद्वानाची उंची त्याच्या विद्वत्तेवरून पहावी लागते, जातीवरून नव्हे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण एखाद्यावेळी अनवाणी पायाने पायी जाताना तळपायाला खडा रुतला तर डोळ्यांत टचकन पाणी येते आणि असह्य वेदना होतात.काही काळ आपण झालेले दु:ख खूप सहन करतो आणि पुढे चालायला लागतो पण मनात खडा टोचल्याचे शल्य राहतेच.पण तोच खडा दुस-याच्या पायाला टोचला तर त्याला आपण खाली पाहून चालू नये का असा सल्ला देतो.जो त्रास आपल्याला झाला आहे तो त्रास इतरांना होऊ नये असे ज्यांना मनापासून वाटते ते दुस-या चे कधीच वाईट चिंतीत नाहीत. अशी माणसे नेहमी आपल्या जीवनात असावीसी वाटतात.जे दुस-यांच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतात ते कधी कधी स्वत:च्या जीवनात दु:ख झालेले कधीच कुणाला सांगत नाहीत.त्यांच्या मनात कधीही वाईट भावना निर्माण होत नाही.अशांचे आयुष्य हे एक दुस-यांसाठी प्रेरणादायी असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित - Safe* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव* बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/11/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - कर्नाटक(राजमुद्रा दाखवली आहे), केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना 💥 जन्म :- १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे १९१८ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते १९२६: संगीत दिग्दर्शक यशवंत देव १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर १९७३ - ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री १९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू १९८७ - इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १७०० - कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा १८९४ - अलेक्झांडर तिसरा, रशियाचा झार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - 16 ते 26 नोव्हेंबरदरम्यान काढणार मराठा संवाद यात्रा, 26 नोव्हेंबरला अधिवेशनावर देणार धडक, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जागतिक बँकेच्या २०१७ सालच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक २३ अंकांनी वधारून ७७ वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : मराठावाड्याला अखेर आज मिळणार पाणी ; नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून सकाळी दहा वाजता पाण्याचा होणार विसर्ग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. हेमंत देशमुख यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *फटाके फोडण्यासाठी दक्षिण भारतातील वेळ निश्चित. सकाळी 4 ते 5 व रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान फटाके फोडता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/xZN3CdlEtR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपि या वेब पोर्टलवर वाचा "हाताची जादू ओळखणारा शिक्षक" दिवाळी अंकात प्रकाशित कथा https://marathi.pratilipi.com/story/ChAhzBia2opi?utm_source=android&utm_campaign=content_share आपले अभिप्राय जरूर द्यावे. अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नरेंद्र दाभोळकर* नरेंद्र अच्युत दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधर्शद्धांच्या निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधर्शद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २00६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या काठी बरीच तीर्थक्षेत्रे आहेत ?* कृष्णा *२) बेल्जियमची राजधानी कोणती ?* ब्रुसेल्स *३) केरळमध्ये अवकाशयान प्रक्षेपण केंद्र कोठे आहे ?* थुंबा *४) 'फॅमिली लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण ?* अखिल शर्मा *५) ओडिशाची उपराजधानी कोणती ?* पुरी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संजय कांबळे, माहूर ● प्रशांत सुरवसे ● संतोष चाटोरीकर, उमरी ● लक्ष्मीकांत बामणीकर ● राजेश खरबाळे ● सूर्यकांत राखोंडे, धर्माबाद ● ऋषिकेश मंदेवाड ● राहुल संत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार* रावणाला सोन्याची लंका पुरली नाही दिग्गज साम्राज्याची वीट उरली नाही वृथा अहंकार झाल्यास काहीच पुरत नसते चालता बोलता माणूस अचानक मरत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुंबईतच प्रवास करीत असताना रिक्षा सिग्नलला थांबली. बाजूच्या रिक्षात एक बोकड शांतपणे बसला होता. त्याच्या शेजारचा माणूस निर्विकार होता. 'विश्वासघात' हा असाच शांतपणे बसलेला असतो. समोरच्याला कल्पना नसते, आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे. बोकडाला काय माहीत? आपला कर्दनकाळच आपल्या शेजारी बसला आहे.* *आयुष्यातही अनेकदा असेच घडते. आपल्या आजूबाजूला शांतपणे वावरणारी माणसेच आपल्याला अडचणीत आणत असतात. विश्वासघात, फसवणूक, खोटे बोलणे या सगळ्या गोष्टी अनेकजण सराईतपणे करत असतात. ठेच लागल्यावर आपल्याला कळते, कुणामुळे जखम झाली आहे. राजकारणात, समाजात, व्यक्तिगत आयुष्यातही सर्रासपणे असे घडते. माणूस हतबल होतो, अनेकदा माणसे त्यातून सावरत नाहीत. "अशावेळी शांतपणे आपली मनोवृत्ती स्थिर ठेवणे गरजेचे असतं."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 49* संत ना छाडै संतई, कोटिक मिले असंत । चन्दन विष व्यापत नहीं, लिपटत रहत भुजंग । अर्थ : भला माणूस कधीही आपल्या पदाला व नावाला बट्टा लागू देत नाही. तो सरळ मार्गी असतो. त्याला भलं बुरं कळत असतं ! आपण ज्या पदावर आहोत त्या पदाचा सतत नावलौकिक वाढवण्याची त्याची धडपड असते. जो काही मान सन्मान मिळालाय व जगणंही सुकर व्हायला मदत झालीय ती विद्यमान पदानंच मदत केलीय .याचं स्मरण त्याला सदैव असतं. त्पा पदामुळेच तर आपणास सर्वजण ओळखतात . याचं नित स्मरण करीत हसत मुखानं उल्हसितपणे आपल्या कर्तव्य मार्गावर भला माणूस अग्रेसर असतो. त्याच्या संगतीत वाईट व दुष्ट माणसे आली तरी त्यांच्या सान्निध्याचा तिळमात्र प्रभाव सज्जन स्वतःवर पडू देत नाहीत. संत दुर्जनाला आपल्या संंगतीतून दूर करीत नाहीत तर 'दुर्जनातले दुर्गुण कसे कमी करता येतील ? या विचाराने ते वावरत असतात. सज्जनाचे गुण वैशिष्ट्ये सांगताना महात्मा कबीर म्हणतात की, खरे संत कितीही अडचणीत जगतील परंतु ते संत पदाला साजेसंच वागतील . त्याला कधीही बदनाम होवू देणार नाहीत. जसे चंदन वृक्षाच्पा शितल छायेमुळे व त्याच्या सुगंधित संगतीमुळं पक्षी, फुलपाखरे चंदनाच्या झाडावर बसतात तसे विषधारी सापही चंदनाला विळखा घालून बसतात. चंदन त्यांना दूर सारत नाही तर काही काळ का होईना, त्यांना आपल्या सुगंधी जगण्यानं मुग्ध करून त्यांच्यातला विषारीपणा विसरायला लावतो. संतांचही जगणं चंदणासारखंच असतं . त्यांचे ठायी कधीही आप परभाव उत्पन्न होऊ देत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या ठिकाणी प्रेम,आपुलकी, जिव्हाळा,मोठ्यांचा आदर, एकोपा, एकमेकांचे सुखदुःखाचे भागीदार, प्रामाणिकपणा, अतिथींचे स्वागत, घरातील स्त्रियांना दिले जाणारे प्रेम आणि तिच्या भावना ओळखून तिला दिला जाणारा आदर, शांती, समाधान, ईश्वराप्रती श्रद्धा, आरोग्यसंपन्न जीवन आणि त्याला हवी असणारी स्वच्छता ह्या सा-या गोष्टींचा जिथे समावेश आहे तिथल्या वास्तूला ख-या घराची उपमा दिली जाते.अशा ठिकाणालाच खरे घर म्हणून समजले जाते आणि अशाच घरात सदैव शांती, समाधान आणि ऐश्वर्य नांदत असते. जेथे अशा गोष्टींचा अभाव असेल, केवळ चार भिंती आहेत,वर छत आहे पण समाधान नाही, शांती नाही, सदैव कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत राहतात, एकमेकांमध्ये ऐक्याची भावना नाही,एकत्र असून अबोला असतो अशा विसंगत असलेल्या वातावरणाला घर म्हणता येत नाही. म्हणून खरेच घर म्हणायचे असेल किंवा बनवायचे असेल तर ह्या वरील सर्व गोष्टींना घरातल्या प्रत्येक सदस्याने प्रयत्न करायलाच हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद....९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏘🏡🏠🏘🏡🏠🏘🏡🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अडचण - difficulty* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई कि खोटी आई* एका आठ वर्षाच्या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून वडील दुसरे लग्न करून त्या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्हणून पुन्हा त्या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातान्हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्वत:च्या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला? गेल्या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे.'' तात्पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय एकता दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार १८८० - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग १९२० - भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन काँग्रेस)ची स्थापना १९८४ - भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीची आपल्याच अंगरक्षकांकडून हत्या 💥 जन्म :- १८७५ - सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान १८९५ - सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू १९२६ - एच.आर.एफ़. कीटिंग, मुंबई शहर ही पार्श्वभूमी असलेल्या रहस्यकथा लिहिणारा इंग्रजी लेखक १९४६ - रामनाथ परकार, भारतीय क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :- १९७५ - सचिन देव बर्मन संगीतकार १९८४ - इंदिरा गांधी, भारतीय पहिली महिला पंतप्रधान १९९९ - डॉ.भय्यासाहेब ओंकार वास्तव शैलीत चित्रे काढणारे मराठी चित्रकार २००५ - अमृता प्रीतम, ज्ञानपीठ विजेती लेखिका *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *खास भावगीतांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गुजरात: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळ्याचे कडक पोलीस बंदोबस्तात आज होणार अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये दिवाळी बोनस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नंदुरबार - आदिवासी कारखाण्यातर्फे यंदा उसाला 2308 रुपये एकरकमी देण्याची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेल्या कॅमेरामनच्या कुटुंबीयांना 15 लाखांची केंद्र सरकार करणार मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागपूर - सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसानभरपाई द्यावी - अजित पवार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *चौथ्या क्रमांकासाठी ११ फलंदाजांची घेतली चाचणी, अंबती रायुडू या स्थानासाठी सर्वात उपयुक्त फलंदाज असल्याचे कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचे मत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/Nyd4Bnr Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय एकात्मता कशी टिकेल ?* https://sharechat.com/post/d9QN6Zw आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सरदार वल्लभभाई पटेल* वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पाटेल समाजामध्ये झाला त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४ मध्ये मणीबेन आणि १९०६ मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले. वल्लभभाईगोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते. एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ह्या पदवीने संबोधित केले आहे. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारतछोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकता येईल ते आदराने घ्यावे - साने गुरुजी *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैक किती जंगलांनी व्यापले आहे ?* ६२,२२४ चौ. कि.मी *२) 'फ्लड ऑफ फायर' या पुस्तकाचे लेखक कोण ?* अमिताभ घोष *३) अलीकडेच कोणत्या राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करण्यात आली ?* बिहार *४) इंटेलसॅट-४ या उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करण्यात आले ?* ८ जानेवारी १९७८ *५) रणगाड्याचा शोध कोणी लावला ?* स्विन्टन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आप्पासाहेब सुरवसे, बीड ● जागृती सुधीर निखारे, मुंबई ● निलांजय यडपलवार ● देवदास कोयेवार ● दामोदर डहाळे ● गणेश पाटील हांडे ● शीतल गांधी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुलाम* सहज मिळतं त्याला किंमत रहात नाही घरच्या देवाकडे तर कोणीच पहात नाही घरच्यांना लाथा अन् दुरच्यांना सलाम असतो असे वागणारा खरंच वैचारिक गुलाम असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.* *कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 48* जिही जिवरी से जाग बँधा, तु जनी बँधे कबीर। जासी आटा लौन ज्यों, सों समान शरीर।” अर्थ : हे जग मायावी आहे. इथे मोहिनी घालणारे भ्रमाचे अनेक फसवे धागे आहेत. मोहात पडून भ्रमित होवू नये. फसवे पाश ओळखता आले पाहिजेत. मात्र इथले जीव सारसार विचार न करताच मोहात दावनीला जखडले आहेत. जीवनाचं सार्थक करायचं असेल. तर माया , मोहात गुरफटू नको. विनाकारण स्वतःच स्वतःला फरफटत नेऊ नकोस. हा मानवरूपी देह विचार व विवेकाने वागण्यासाठीच लाभलेला आहे. सर्व प्राणी मात्रांकडे नसलेले बोली व बुद्धी हे आगळेवेगळे वैशिष्ट्य केवळ मानवाठायीच आहे . तेव्हा आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर सत्कर्म करून जीवन सफल करावयाला हवे. मीठाविना जेवन फिके वाटावे तसे सत्कर्माविना जीवन उठून दिसूच शकत नाही. माणसाच्या वागण्यातील विसंगती दाखवताना ' गेली सांगून ज्ञानेश्वरी , माणसापरीस मेंढरं बरी." वास्तवाचं बोलकं चित्र मांडून या गाण्यातून माणसातील भेदभावी वृत्तीवर फटकार मारलाय. माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागलं तरी मानवता नांदू लागेल. नाही तर मानव देह धारण करूनही मानवता विसरलेला पशू अशीच ओळख देवून कसं चालेल ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमचा धर्म कोणताही असो किंवा जात कोणतीही असो पण जी माणसे संकटात सापडली आहेत अशा माणसांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे असायला हवा हाच खरा माणुसकीचा सर्वात मोठा धर्म आहे हे कधीही विसरु नका.अशावेळी कोण श्रीमंत आहे किंवा कोण गरीब आहे हा देखील भेद पाहू नका.कारण संकटं जेव्हा येतात तेव्हा कधीच कुणामध्ये भेद करत नाही.त्यामुळे हादेखील भेद आपण माणूस म्हणून का करायचा. मदतीच्यावेळी सारेच भेद विसरुन आपले माणुसकीच्या नात्याने कर्तव्य म्हणून मदत करावी हीच आपल्याला खरी शिकवण साधूसंतानी आणि पूर्वजांनी दिली आहे.ती शिकवण नित्य स्मरणात ठेवून आपण जीवन जगायला शिकले पाहिजे कसल्याही प्रकारचा भेद न करता एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्यता - Qualifications* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सदाचरण* फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्या विद्वत्तेचा व योग्यतेचा यथायोग्य आदर होता म्हणूनच तो त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असे. प्रजेमध्येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्याला इतक्या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्यासाठी एक गुप्त योजना बनविली. दुस-या दिवशी त्यानी दरबारातून परतताना राजाच्या खजिन्यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्याने न पाहिल्यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्या व खिशात भरल्या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. न्यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्या या चुकीबद्दल त्यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्यात यावी. तीनवेळेला त्यांनी कोषातून धन चोरले म्हणून तीन महिने सजा देण्यात आली आहे जेणेकरून ते पुन्हा असा अपराध करण्यात यशस्वी होणार नाही. या न्यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्यास इच्छुक होतो की लोक कशामुळे मला सन्मान देतात, वैयक्तिक माझा सन्मान करतात की मी करत असलेल्या सदाचरणाचा लोक सन्मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्त झालो आणि त्यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्ही कोणत्याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्हणणे ऐकले व स्वत:ला सैनिकांच्या स्वाधीन केले. *तात्पर्य :-सदाचरण हेच मनुष्याचे धन आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि.30/10/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ - आंध्र प्रदेशच्या महबूबनगर जिल्ह्यातील पालेम गावाजवळील पुलाच्या कठड्याला धडकून बसगाडीला लागलेल्या आगीत ४५ ठार, ७ जखमी. 💥 जन्म :- १८८१ - नरेंद्र देव, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते १९०९ - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ १९४९ - प्रमोद महाजन, भारतीय जनतापक्षाचे नेते 💥 मृत्यू :- १९२८ - लाला लजपतराय, भारतीय स्वातंत्र्यसेनानी १९७४ - बेगम अख्तर, गझल गायिका 'मलिका-ए गझल' १९९६ - प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते १९९८ - विश्वनाथ चिंतामण ऊर्फ विश्राम बेडेकर मराठी साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक १९९९ - वसंत हळबे, व्यंगचित्रकार २०११ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : दोन दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जम्मू-काश्मीरमधील लडाख परिसरात सव्वा आठच्या सुमारास 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जळगाव - दूध उत्पादकांना ५ रूपये अनुदानाला ३ महिने मुदतवाढ, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : आजपासून सलग 3 दिवस दारणा धरणातून 15 हजार क्यूसेस तर गंगापूर धरणातून 3 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीलंका : सुरक्षा रक्षकाने आंदोलकांवर गोळीबार केल्याप्रकरणी श्रीलंकेचे माजी कर्णधार तथा पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २२४ धावांनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/nkJ3P0p Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. होमी भाभा* डॉ. होमी भाभा भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते. त्यांचे प्राथमिक ते पदवीपयर्ंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनीयर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रेच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनीयरिंगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून इ.स. १९३0 साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. इ.स. १९४0 साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु ऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक पर्शिमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. अणूचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्टय़ा सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. संयुक्त राष्ट्रच्या सभेला जाताना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणू संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) तेराव्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली ?* नोव्हेंबर २00७ *२) 'गांधी : अँन इलिस्ट्रेटेड बायोग्राफी' या पुस्तकाचे लेखक कोण ?* प्रमोद कपूर *३) 'नॅसडॅक'चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?* न्यूयॉर्क *४) विश्वाच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठीच्या महाप्रयोगाचे नाव काय ?* लॉर्ज हॅड्रॉन कोलायडर *५) महाराष्ट्रातील शेकरू खारीसाठी प्रसिध्द अभयारण्य कोणते ?* भीमाशंकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शैलेंद्र सुरकूटवार ● पंकज गादेवार ● श्याम स्वामी, हिंगोली ● संग्राम टेकाळे ● बसवराज पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धीर* कधी धरावा लागतो आपला आपण धीर कठीण प्रसंगी रहावे फक्त काही काळ स्थीर धिराने राहिल्यावर मन स्थिर रहाते मन स्थिर असेल तर केवढेही संकट दूर पळून जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••● *विचारधन* ●•• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *मडक्यासाठी लागणारी माती आणण्याला कुंभाराने गाढव पाळलेले असते. गाढव जेव्हा रिकामे असते तेव्हा ते मालकाच्या अंगणात थांबत नाही. ते सरळ उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात बसते. पालापाचोळा साली-टरफले सारे ते मटकावते. प्रत्येक प्राण्याच्या काही त-हा असतात. खाण्याच्या काही सवयी असतात. गाढवाला अगदी गूळपाण्यात भिजवलेली डाळ दिली तरी ते मनापासून खाणार नाही. उकिरड्यावर पडलेले उष्टे अन्न मनापासून खाईल.* *माणसांचेही तसेच असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त-हा असतात, सवयी असतात. "विशिष्ट व्यक्तिला विशिष्ट गोष्टीच आवडतात, आणि विशिष्ट व्यक्ति विशिष्ट ठिकाणीच सापडते. त्यांना दुसरीकडे शोधायचे कारण नाही."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 48* कबीर संगी साधु का, दल आया भरपूर । इन्द्रिन को तब बाँधीया, या तन किया धर । अर्थ : खर्या संतांच्या संगतीने माणसाच्या वर्तनात बदल होतो. संत संगतीमुळे मानवाला कल्याणकारी मार्ग सापडतो. संत द्वेष, माया, मोह ,विकार, वासना यापासून अलिप्त राहतात. संताचे ठायी विचार , विवेक, वैराग्य, दया, क्षमा, समता , निरामयता इ सद्गुणांची खाणंच असते. त्यांच्या कृपा कटाक्षाने सुद्धा काळीज फुटेतो धावणार्याला शांती मिळते व तो समाधानाच्या मार्गावर येतो. विज्ञानाचा पदवीधर असणार्या नरेंद्राच्या मस्तकी गुरू रामकृष्ण परमहंसांचा स्यर्श झाला. मनाची चंचलता नाहीशी होवून नरेंद्र अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा पहिला तत्ववेत्ता ठरला. अध्यात्म व विज्ञानाने एकमेकांच्या हातात हात घेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मानवतेला विकासाची जोड मिळेल व विज्ञानाच्या बुद्धि प्रामान्यतेला सहृदयता मिळेल. हे संपूर्ण जगाला सांगणारा तो विज्ञाननिष्ठ संन्यासी 'स्वामी विवेकानंद' होतो . किती मोठी अद्भूत शक्ती संचरत असते, खर्या साधूंच्या ठायी ! खरे साधू भौतिक सुखांच्या सान्निध्यात वावरूनही त्यांची कधीच आस धरीत नाहीत. संन्यासी वृत्तीनं जगताना इंद्रीयांच्या अधिन असणार्या मनालाच हे संन्यस्त जिंकून घेतात. मनाला विकारी न होवू देता विवेकपूर्ण जगत निरामयतेचा अंगीकार करून हे दिव्यत्वानं जगालाच भारून टाकतात. त्यांचं क्षणभराचं सान्निध्यही माणसाला दिव्य दृष्टी बहाल करून जातं. खर्या संत, सज्जनाच्या सहवासाने जीवनाला मानवतेची जोड मिळते. माणूस विकारमुक्त होऊन विवेकानं जगायला लागतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात मौल्यवान वस्तू सांभाळून त्यात वेळ वाया घालवतो, त्यामुळे मानसिक अवस्थाही चलबिचल होते, एवढे सांभाळूनही कधी कधी जीवाला ही धोका पत्करावा लागतो आणि आपली झोपही उडून जाते.हे सांभाळण्यापेक्षा जीवनात चांगली माणसं भेटली तर त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण ती आपल्या जीवनात आलेल्या कोणत्याही संकटकाळात आपल्या मदतीला धावून येतील.तीच खरी आपली मौल्यवान संपत्ती आहे. त्यांना आपल्या जीवनात मौल्यवान दागिण्यापेक्षा अधिक जपायला हवे.त्यांच्यापासून आपल्या जीवीताचे रक्षणही होईल,मन चलबिचल होणार नाही , निवांतही झोप लागेल आणि चांगली माणसे आपल्या जीवनात आली म्हणून समाधानही वाटेल.अशा माणसांना आपल्या काळजामध्ये स्थान देऊन त्यांचे जतन केले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संगत - Compatible* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सखोल अभ्यास खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. माणसांनी खच्चून भरलेली एक रेल्वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा हा मनुष्य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्याच्या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्यातील बहुतांश इंग्रज त्याची चेष्टामस्करी करत होते. त्याला खेडूत, अडाणी समजून त्याच्या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्यांच्या त्या चेष्टामस्करीकडे, टिंगल करण्याकडे त्या भारतीयाचे लक्ष नव्हते. तो त्याच्या नादात मग्न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्याने रेल्वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्वे थांबविली’’ त्या सावऴया रंगाच्या व्यक्तिने उत्तर दिले,’’मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्यक्ति उत्तरली,’’माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्वे पट्ट्या खराब झाल्या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्यक्ति म्हणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्वेच्या गतीमध्ये काही फरक पडला आहे आणि त्यामुळे रेल्वेचा जो विशिष्ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’ गार्डने याची खातरजमा करून बघण्यासाठी त्या व्यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्वेत त्या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्चर्यचकित झाले. केवळ त्या माणसाच्या ज्ञानामुळे आज त्यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्या माणसाची प्रशंसा व स्तुती करू लागले. गार्डने त्यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्वरैय्या असून मी व्यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्तब्ध झाले. कारण त्याकाळात विश्र्वेश्वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्यांची क्षमा मागितली. तात्पर्यः सखोल अभ्यास असलेल्या व्यक्ती अतिशय सयंमी शांत व वैचारिक दृष्टीने उच्च असून दूरदृष्टी ठेवून वागतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक स्ट्रोक दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार १९९९ - ओडिशाच्या किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळाने अतोनात नुकसान केले २००८ - डेल्टा एरलाइन्स आणि नॉर्थवेस्ट एरलाइन्स एकत्रित होऊन जगातील सगळ्यात मोठ्या विमानवाहतूक कंपनी तयार 💥 जन्म :- १९११ - रामचंद्र नारायण चव्हाण, वाईचे बहुजन समाज हितकर्ते विचारवंत व लेखक. 💥 मृत्यू :- १९६७ - डॉ. कूर्तकोटी, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व हिंदू धर्मप्रचारक १९९४ - सरदार स्वर्णसिंग, भारताचे माजी परराष्ट्रमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *यवतमाळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चार दिवसांच्या कतार आणि कुवेतच्या दौऱ्यावर रवाना.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मदनलाल खुराणा यांचे निधन, ते 82 वर्षाचे होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : मुंबई विमानतळावर सीआयएसएफ जवानाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाचे वाचविले प्राण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या कपातीमुळे गेल्या ११ दिवसांपासून भारतामध्ये इंधन दरवाढीत झाली कपात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली : 'बधाई हो' चित्रपटाची घौडदौड सुरूच, दुसऱ्या आठवड्यात 76 कोटींची घसघशीत कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : 2018 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचं केलं कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/iSM8wVmGoR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आधुनिक तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/10/11-%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्ट्रोक म्हणजे काय ?* बहुतेक वेळा मेंदूला रक्तपुरवठा करणार्या एखाद्या धमनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पक्षाघात होतो. यामुळे मेंदुच्या त्या भागाला हानी पोहोचते व तुमच्या शरीरातील मेंदुच्या त्या भागाद्वारे नियंत्रित केला जाणारा भाग निकामी होवू शकतो. उदा, तुमचा एखादा हात किंवा पाय किंवा वाचा निकामी होवू शकते. हे नुकसान तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचेही ठरू शकते, आंशिक किंवा पूर्ण देखील असू शकते. लक्षणे आढळताच तुम्हांला पूर्णपणे औषधोपचार मिळाल्यास मेंदुच्या त्या भागाला पुन्हा रक्तपुरवठा चालू होवू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, ज्यामुळे जास्त नुकसान होत नाही. पक्षाघात टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. ऍस्पिरिनचे लहान डोस तुमचा पक्षाघाताबाबतचा धोका कमी करू शकतात का याबाबत तुमच्या डॉक्टरला विचारा. ऍस्पिरिन तुमच्या रक्तामध्ये गाठी पडू देत नाही आणि यामुळे तुमच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होत नाही. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हरिका द्रोणावली हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बुध्दिबळ *२) बांगलादेशचं चलन कोणतं आहे ?* टका *३) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?* कृषी *४) नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ?* वैज्ञानिक ऑल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल *५) नौदलाचे प्रमुख कोण असतात ?* अँडमिरल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन मोहिते ● विशाल पाटील बोडे ● शिवानंद खपाटे ● निखिल गुजराथी ● संपदा पाटील ● गणेश कट्टावाड ● शंकरराव कुंटुरकर ● दिनेश राजपुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजेड* अंधा पुढे दिवा कशाला हवा डोळसा पुढे उजेड ठेवा ज्याला जे हवे त्याला ते द्यावं जे दिलं ते उपयोगी यावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले. "अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 47* मन राजा नायक भया, टाँडा लादा जाय । है है है है है रही, पूँजी गयी बिलाय । अर्थ मन प्रवृत्ती चंचल आहे. मनाची हीच चंचलता मानवाला सतत झुलवत असते. ते सर्वात वेगवानही आहे. क्षणात भुईवर तर क्षणात आभाळी विहार करीत असते. मनासारखा जगात दुसर्या खेळ्या नाही. त्याला नियंत्रणात न ठेवल्यास ते अधःपाताकडे नेते.. जवळ दमडी असो की नसो ते राजा बनतं. मोठा व्यापरी बणून विषय सुखांची खरेदी करतं. मोह, माया, लालसेच्या नादी लागून माणूस कुवतीबाहेर वागायला लागतो. त्यामुळे एक तर त्याचे दिवाळे निघते किवा तो ऊर फुटेतो धावून दमछाक करून घेतो. भोग विलास सारं उपभोगावं परंतु सारं प्रमाणात असावं. उपभोगांची अनिंयत्रित लुट केली की पक्वान्नाचं ताट पुढढ्यात असूनही मधुमेहीनं त्याच्याकडं नुसतंच बघत बसावं अशी परिस्थिती उत्तरार्धात ओढवते. म्हणून माणसाने मनाला मोकाट भटकू न देता त्याला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायला हवं. निसर्ग आपणास हवा, पाणी, प्रकाश देताना कुठलाही भेदभाव करीत नाही, एकमेव मणुष्य नावाचा सर्वात बुद्धीमान प्राणी वगळता कोणतेही प्राणी आपापसात कधीही भेदभाव करीत नाहीत. सर्वजण मिळून मिसळून एकोप्याने राहतात. निसर्गातील उपलब्धतेचा मिळून-मिसळून आस्वाद घेतात. कोणी मालक नसतो कोणी नोकर नसतो . माणसानं आपल्याच बांधवाचं जळूगत शोषण करीत शोषक व शोषित असे गट तयार केले. रिकाम्या हाती जन्मा येवून रिकाम्याच हाती मातीशी एकरूप होणे आहे तर माणसाची ही मिजास आहे. चिरंजीवीतेचं वरदान मिळाल्यावर माणूस माणसाची काय अवस्था करील ही कल्पनाच न केलेली बरी ! मानवतेचं राज्य आणण्यासाठी माणसासारखं वागणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे सारं काही असणार्यांनी हावरटपणा व लुटारू प्रवृत्ती सोडली पाहिजे. कृत्रिमतेचा बडेजाव मिरवण्याऐवजी शाश्वत व चिरंतनाचा वेध घेतला पाहिजे. माणसाच्या विकृत प्रवृत्तीने नको तेच अज्ञानाचे गाढव ओझे मानवाच्या पाठीवर लादले. अन तेच आम्ही पुढे पुढे नेण्यात काय हशील आहे ? निरामय जीवन जगत बुरसट रिती-परंपरा, भेदाभेद सोडला नाही तर माणूस या पदाला आपण पात्र होवूच शकत नाही. माणुसकीला पारख्या झालेल्या लोकांच्या मानवतेच्या भंपक घोषणाच ऐकायला मिळत राहतील. हेच खरं... एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण एखाद्यावेळी अनवाणी पायाने पायी जाताना तळपायाला खडा रुतला तर डोळ्यांत टचकन पाणी येते आणि असह्य वेदना होतात. काही काळ आपण झालेले दु:ख खूप सहन करतो आणि पुढे चालायला लागतो पण मनात खडा टोचल्याचे शल्य राहतेच. पण तोच खडा दुस-याच्या पायाला टोचला तर त्याला आपण खाली पाहून चालू नये का असा सल्ला देतो. जो त्रास आपल्याला झाला आहे तो त्रास इतरांना होऊ नये असे ज्यांना मनापासून वाटते ते दुस-या चे कधीच वाईट चिंतीत नाहीत. अशी माणसे नेहमी आपल्या जीवनात असावीसी वाटतात. जे दुस-यांच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतात ते कधी कधी स्वत:च्या जीवनात दु:ख झालेले कधीच कुणाला सांगत नाहीत. त्यांच्या मनात कधीही वाईट भावना निर्माण होत नाही. अशांचे आयुष्य हे एक दुस-यांसाठी प्रेरणादायी असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निष्क्रिय - Inactive* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वैचारिकतेचा अभावामुळे सर्वनाश* एका राज्यात निष्क्रिय,अविचारी राजाचे शासन होते. त्याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्या सर्व चापलुसी करणारे होते. त्या राजाच्या राज्यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्य त्या राज्यात जात नसत. त्यामुळे त्या राज्यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्या राज्यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्ला दिला की त्या ऋषींना आपल्या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्यांचा सत्कार करावा म्हणजे जनतेचा विश्वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्या मुख्य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्या झोपड्या पाहून थांबले व त्यांनी विचारले,’’ या कुणाच्या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्काळ राजाला म्हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी चापलुशी केलेल्या उपदेशाने राजाचे राज्य लयाला गेले. त्याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला. तात्पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे. खरे आहे ना !!!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". smt.pramilatai senkude. नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणूनच कन्फ्यूशियसने म्हणले आहे 'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.' ================== 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰💐🍀💐🍀💐🍀💐
*प्रतिबिंब* फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिने आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले. मौल्यवान अशा कंठ्यामध्ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्याने ते खाण्याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्या लक्षात एक गोष्ट आली की आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या.'' राजा म्हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घ्या. जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊ अशी घोषणाही त्याने त्यावेळी केली. अर्धे राज्य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्याच्या नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्य बक्षीसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्या मनातही लोभ निर्माण झाला. त्यानेही अर्धे राज्य मिळविण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली. पण हार पुन्हा गायब झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्याच हातात येत नव्हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या राज्याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्या पाण्याच्या वास सहन न झाल्याने पटकन पाण्यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले हे राजाच्या कानावर गेले व त्याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल. त्यासाठी राजाही तेथे आला व त्याने आपली राजवस्त्रे उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली. त्याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्या घाणेरड्या पाण्यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्यात पडला आहे म्हणून सर्वजण पाण्यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्याना विचारले काय झाले? संत त्यावर म्हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्ही ज्या हाराकडे पाहून पाण्यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्यात दिसते आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधत आहात.'' लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक शरमिंदा झाले. तात्पर्यः मानवी जीवनाची पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झाली आहे. जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्वास्थ्य हे शोधण्यापेक्षा आपण त्याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्यापेक्षा आपण कितीतरी गोष्टी गमावित आहोत. खरंय ना ! संकलित
*माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड (दि.२७/१०/२०१८) 🌷 *प्रात्यक्षिक उपक्रम* वर्ग १ ली २ री तील विद्यार्थ्यांच्या कला कार्यानुभव विषय अंतर्गत केलेल्या कलाकृती. 🌷मा.मु.अ.श्री कर्जतकर सरांनी उत्कृष्ट कलाकृती केलेल्या विद्यार्थ्यांना वही बक्षिसे दिली त्यानंतर मी खाऊ वाटप केला. 💐कुळकर्णी मॕडम हिवराळे मॕडमनी मुलांचे कौतुक करून अभिनंदन केले. 💐 〰〰〰〰〰〰 ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका) 🙏🙏🙏🙏🙏🙏
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/10/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९८६ - युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठवरील सर्व निर्बंध काढून टाकले 💥 जन्म :- १८७४ - कवी भा. रा. तांबे १९२० - के.आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती १९२३ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक. १९४७ - समाजसेवक डॉ. विकास आमटे १९५४ - पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल १९८४ - इरफान पठाण, भारताचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १६०५ - तिसरा मोगल सम्राट अकबर १७९५ - सवाई पेशवा माधवराव १९८७ - क्रिकेटपटू व समालोचक विजय मर्चंट २००१ - अभिनेता प्रदीप कुमार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेराला अटक; पुणे पोलिसांची मुंबईत कारवाई * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशातील सर्वाधिक श्रीमंत महाराष्ट्रात, अब्जाधिशांच्या यादीत 4 चौथ्या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचे नाव प्रथम स्थानावर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केली १५० उमेदवारांची यादी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याची मराठा क्रांति ठोक मोर्चाची मागणी. अन्यथा २५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा. १ डिसेंबरपासून आंदोलन तीव्र केले जाईल, समन्वयकांची माहिती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तिरुपती बालाजी मंदिरात येत्या 1 नोव्हेंबरपासून प्लास्टिक वापरावर बंदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या पूजा धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची केली कमाई, सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत भारताला पदक.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे https://sharechat.com/post/JZnQpg5 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाईल क्रांती आणि जीवन* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/10/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवी भा. रा. तांबे* भास्कर रामचंद्र तांबे अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी होते. हिंदी काव्य, उर्दू नज्म आणि गजल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. त्यांची समग्र कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७३ रोजी ग्वाल्हेर संस्थानातील झाशीजवळच्या मुंगावली या गावी झाला. तांबे यांचे मूळ गाव कोकणातील खेटकुई. तांबे यांनी आपली पहिली कविता शाळेत असतानाच लिहिली. चिपळूणकर, आगरकर यांच्या लेखनाचा अभ्यास त्यांनी केला. शिवाय बायरन, शेले, किट्स, वर्डस्वर्थ, टेनिसन, ब्राऊनिंग या इंग्रजी कवींच्या कवितांचाही त्यांनी अभ्यास केला. कायद्याचा अभ्यास हे निमित्त झाले आणि त्यांनी उर्दू भाषाही शिकून घेतली. ग्वाल्हेर संस्थानच्या शिक्षणखात्यात त्यांनी अकरा वर्षे नोकरी केली. ग्वाल्हेर दरबारने त्यांना राजकवी हा किताब दिला. त्यांच्या जवळजवळ अडीचशे कविता उपलब्ध आहेत. गायनातील नोटेशन्सचा त्यांनी अभ्यास केला होता. खंडकाव्य, स्फुटकाव्य, लेखन, भाषणे, अभिप्राय, प्रस्तावना, नाटक अशी त्यांची विपुल आणि विविधांगी साहित्यसंपदा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ?* ल्योन, फ्रान्स *२) जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण ?* ऋषभ देव *३) र्जमनीचा हुकुमशहा हिटलरची संघटना कोणती ?* नाझी संघटना *४) इराणची राजधानी कोणती ?* तेहरान *५) चौथ्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण ?* पी. एन. सिंघल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● दगडू गारकर, लातूर ● ओम माळवतकर ● मोहिनी रावजीवार ● प्रतीक बादेवाड, मुखेड ● श्रीमती छाया माळवाळ, खुलताबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बेगड* बेगडाचा रंग असा किती काळ रहातो काही दिवसातच तो पांढरा होऊन जातो चमकण्या पुरतेच ते लोकांना छान दिसते रंग गेला की बेगड खुपच घाण दिसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••●‼ *विचार धन* ‼●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. वयाचा काही काळ त्यांना संस्कार, संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर एका विशिष्ट वयानंतर त्याला 'कर्तव्य' ही संज्ञा प्राप्त होते. मग कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी केले जाणारे काम हेही कर्तव्यात मोडते. 'कामात देव शोधा' हे जीवनाचे खरे तत्वज्ञान मानले पाहिजे. "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो।" हे ज्याला कळले, तोच पुढे जातो.* *कामाशी साधली जाणारी एकरूपता, त्यातून दिसणारी तादात्म्यता हाही 'उपासना' मार्गच आहे.* *जो करी कर्म अहेतु निरंतर,* *देव तयास मिळो न मिळो रे।* *यातून कवीला जे सांगायच आहे, त्याचे चिंतन करूया. त्यासाठी 'मोहाच्या फुलबागा' दूर सारायला हव्यात. त्यासाठी मनाची अवस्था कोती असून चालणार नाही. आकाशाएवढे मन झाले, तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील. जन्मलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावे लागते. कुणीही त्यातून सुटत नाही. हे टाळून पुढे जाऊया, मनाचा विकास साधूया....* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 46* बार-बार तोसों कहा, सुन रे मनुवा नीच। बनजारे का बैल ज्यों, पैडा माही मीच। अर्थ : साधू व सज्जन मानवातील वैगुण्य नाहिसं व्हावं. म्हणून सतत उपदेश करीत असतात. परंतु बहुतांश माणसांच्या स्वभावातील मुळ वाकडेपण जाता जात नाही. कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे ते पुन्हा-पुन्हा मुळ स्वभाव धारण करीत असतं. अशा निर्लज्ज प्रवृत्तींना उद्देशून महात्मा कबीर म्हणतात , हे निर्लज्ज माणसा ! सज्जनांचे म्हनणे ऐक ! त्यात तुझी भलाई आहे. वारंवार सांगतो आहे. परंतु तुझ्या वर्तनात बदल का होत नाही ? जीवनातला निखळ आनंद घ्यायचा सोडून तू मोहांच्या मागे का धावत आहेस ? पतंगाला दिव्याचा मोह होतो. तिथं गेल्यावर आच (आग) लागून शरीराची हानी होणार आहे. हे माहित असूनही त्याने मोहांध होवून दिव्यावर धाव घेत स्वतःचे पंख जाळून घ्यावेत अन पंखहिन तडफड करीत राहावे. तशी तुझी गत झाली आहे. फिरत्या व्यापार्याच्या गोण्या वाहणार्या बैलाला खायला प्यायला चांगलं भेटत असलं तरी तरी त्याला रानवार्याचा मुक्त आस्वाद घेता येत नाही. डिरक्या मारून मनसोक्त चौखूर उधळण्याची आपल्या भाईबंदासोबत मजा चाखता येत नाही. कंटाळवाणं, निरस व भारवाही जगणं जगता जगता-जगता एक दिवस भटकंतीच्या मार्गावरच आपल्या जीवनाचा नकळत शेवट होऊन जातो. जन्माला आल्याच्या अन जीवन जगल्याच्या कोणत्याच पाऊलखुणा मागे न सोडता भूईला भार होऊन जगण्याची खंत मनी घेवून एक दिवस अस्तित्वहीन होवून जावं लागतं. तेव्हा आतापासून तुझ्या हाती असणार्या वेळेचा सदुपयोग करून जीवन सार्थक करून घ्यावंस असा संतोपदेश असतो . शेवटी रडत-रडत जगायचं का धडपडत उभं राहायचं हा सर्वस्वी तुझा तुच निर्णय घ्यायचा आहे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपली ओळख इतरांपेक्षा वेगळी करून द्यायची असेल तर आपल्याला इतरांपेक्षा वेगळे काहीतरी चांगले करावे लागेल आणि चांगले काही नवीन करण्यासाठी आपल्यातल्या कल्पकतेला चालना दिली पाहिजे.तसेच इतरांमध्ये जे नाही ते आपल्याला वेगळे सिद्ध करून दाखवावे लागेल.आपल्यातील असलेल्या कलेकडे एकदा का आकृष्ट झाले की,मग आपली ओळख लोकांना स्वत: होऊन द्यायची गरज नाही. लोक आपोआपच आपल्याला जगापेक्षा वेगळे काहीतरी आहे म्हणून ओळखायला लागतील. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌟🌙🌟🌙🌟🌙🌟🌙🌟🌙 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाद - sounds* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिबिंब* फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिने आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले. मौल्यवान अशा कंठ्यामध्ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्याने ते खाण्याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्या लक्षात एक गोष्ट आली की आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या.'' राजा म्हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घ्या. जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊ अशी घोषणाही त्याने त्यावेळी केली. अर्धे राज्य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्याच्या नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्य बक्षीसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्या मनातही लोभ निर्माण झाला. त्यानेही अर्धे राज्य मिळविण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली. पण हार पुन्हा गायब झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्याच हातात येत नव्हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या राज्याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्या पाण्याच्या वास सहन न झाल्याने पटकन पाण्यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले हे राजाच्या कानावर गेले व त्याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल. त्यासाठी राजाही तेथे आला व त्याने आपली राजवस्त्रे उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली. त्याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्या घाणेरड्या पाण्यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्यात पडला आहे म्हणून सर्वजण पाण्यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्याना विचारले काय झाले? संत त्यावर म्हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्ही ज्या हाराकडे पाहून पाण्यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्यात दिसते आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधत आहात.'' लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक शरमिंदा झाले. तात्पर्यः मानवी जीवनाची पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झाली आहे. जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्वास्थ्य हे शोधण्यापेक्षा आपण त्याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्यापेक्षा आपण कितीतरी गोष्टी गमावित आहोत. खरंय ना ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
समानार्थी शब्दः १. हत्ती - *गज* २. पंकज - *कमळ* ३. तोंड - *वदन* ४. पाणी- *जल* ५. नमस्कार - *नमन* ६. बाप- *जनक* ७. बाण - *शर* ८. बाग- *उपवन* ९. समस्या- *अडचण* १०.घास- *कवळ* ११.धाक - *जरब* १२.भांडण - *कलह* १३.नवरा- *वर* १४.पर्वत - *अचल* १५.कठीण - *अवघड* १६.पुरुष - *नर* १७.द्रव्य - *धन* १८.आवश्यकता - *गरज* १९.उलगडा- *उकल* २०.दूध- *पय* २१.रूची- *चव* २२.गंध - *दरवळ* २३.गृह- *घर* २४.घोडा - *पवन* २५.पाऊल- *पद* २६.डोळा - *नयन* २७.तृण - *गवत* २८.रस्ता - *सडक* २९.हात- *कर* ३०.वारा- *पवन* ३१.सुवर्ण - *कनक* ३२ अंबर - *गगन* ३३.खून - *रगद* ३४.रास - *थर* ३५.कप्पा - *खण* ३६.पक्षी - *खग* ३७.किल्ला- *गड* ३८.अवचित - *एकदम* ३९. मृत्यू - *मरण* ४०.अग्नि - *अनल* ४१.काळ - *यम* ४२.जंगल - *वन* ४३.अविरत - *सतत* ४४.आश्चर्य - *नवल* ४५.अभिनेता- *नट* ४६.ढग - *जलद* ४७.पोट- *उदर* ४८.अंधार- *तम* ४९.ध्वनि- *रव* ५०.ओझे- *वजन*
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९३६ - हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला १९४७ - जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली 💥 जन्म :- १२७० - संत नामदेव महाराज १८९० - गणेश शंकर विद्यार्थी, भारतीय पत्रकार व भारतीय स्वातंत्र्यसैनिक १९३७ - संगीतकार हृदयनाथ मंगेशकर १९५० - तिरुमलै श्रीनिवासन, भारतीय क्रिकेट खेळाडू १९७० - रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री १९८५ - असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्री १९९१ - अमाला पॉल, दक्षिण भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९९१ - स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सूरत येथील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी यंदा दिवाळी भेट म्हणून त्यांनी आपल्या कर्मचार्यांना दिले सहाशे कार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *बोट दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार, फास्ट ट्रॅक चौकशी केली जाणार- गृहराज्यमंत्री दीपक केसरकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जायकवाडी धरणात 26 ते 31ऑक्टोबरदरम्यान पाणी सोडणार; कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांचे लेखी आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निवडणुकांसाठी तिसरं मूल दत्तक दिलं तरीही 'उमेदवारी बाद अन् पद धोक्यात' ओडिशातील एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वॅन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित तीन वन डेसाठी भारतीय संघ जाहीर, जस्प्रीत बुमरा व भुवनेश्वर कुमार यांचे पुनरागमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे https://sharechat.com/post/xp8bKlX *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मजबूत मन म्हणजेच यश* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/12/%e0%a4%ae%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हृदयनाथ मंगेशकर* हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत. त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत. त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पारादीप बंदर कोठे आहे ?* ओडिशा *२) राज्यसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत ?* उत्तर प्रदेश *३) कंबोडियाची राजधानी कोणती ?* नॉमपेन्ह *४) राष्ट्रपती कोणत्या कलमाद्वारे वटहुकूम काढतात ?* कलम १२३ *५) 'कोलाज' या पुस्तकाच्या लेखिका कोण ?* शरीष पै *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संगीता संतोष कंदेवार - नामेवार ● माधव लिंबाजीराव गव्हाणे ● अविनाश थोरात ● नवनाथ शिंदे ● गणेश पालदेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शब्द* शब्दांना ह्रदयाच्या तराजूत तोललं पाहिजे विचार करून माणसाने कधीही बोललं पाहिजे विचार करून बोलतात ज्यांना कळते शब्दाचे मोल कायम लक्षात रहातात आपल्या माणसाचे बोल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचारधन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बायबलमध्ये एक महान बोधकथा आहे. एका अविवाहित स्त्रीच्या हातून घडलेल्या चुकीचा आपल्या सोयीचा अर्थ लावून नादान लोक तिला दगड-धोंड्यांनी ठेचून मारायला धावतात. ती जीवाच्या आकांताने पळत सुटते, खाली कोसळते तेव्हा तिच्यासमोर महाकारूणिक प्रभू येशू उभा असतो. ती त्यांचे पाय धरून आपले प्राण वाचविण्यासाठी गयावया करते. प्रभू तिला अभय देत उभं करतात आणि लोकांना विचारतात 'लोक हो., आपण हिच्या जीवावर का उठलात?' लोकातून क्रोधाने तप्त लाल झालेली वाक्य उत्तरतात 'हि पापीण आहे. हिने फार मोठे पाप केले आहे. हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, पुन्हा घोळका ओरडतो..मारा..मारा धोंड्यांनी मारा हिला..* *तितक्यात प्रभू पुन्हा धीरगंभीर अन् शांत मुद्रेने त्यांना म्हणतात 'बाबांनो, हिने खरोखरच पाप केले असेल तर तुम्ही मानता त्या कायद्याप्रमाणे ती दोषी आहे आणि दोषीला तुम्हीच शिक्षा देणारे असाल तर पहिला दगड फक्त त्यानेच उचलावा, ज्याने आयुष्यात चुकूनसुद्धा एकही पाप केले नाही. असा प्रस्ताव मांडताच सर्वजण परस्परांच्या नजरा चुकवत एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या हातातील दगडांची पकड सैल झाली. सर्वांच्या हातातले दगड धरतीवर लोळत येशूला शरण गेले. कारण त्या लोंढ्यात एकही निष्पाप नव्हता. प्रत्येकाचे हातून लहान-मोठी पापे झालेलीच होती. ते सर्व माना खाली घालून पराभूतागत पाठमोरे झाले. त्या स्त्रीचे प्राण वाचले. तिने तिची चूक मान्य केली, ती प्रभुभक्त झाली...* *"लोकांच्या हातुन गळून पडलेले दगड आजही पूर्ण निष्कलंक माणसाच्या हाताच्या स्पर्शाची वाट पहात तिथेच पडून आहेत..पण निष्पाप हात त्यांना स्पर्शायला पुढे धजले नाहीत."* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 45* धर्म किये धन ना घटे, नदी न घट्ट नीर । अपनी आखों देखिले, यों कथि कहहिं कबीर । अर्थ धर्मार्थ दान केल्याने संपत्ती घटत नाही. मात्र ते दान डोळसपणाने केलेले असावे. धर्म मानवता व सहिष्णूवृत्ती जपणारा असावा. न्याय, निती विवेकाचं अधिष्ठाण असणारा असावा. त्यात सर्वांप्रति कैवल्यभाव असावा. अंधश्रद्धा व वाईट रूढी-परंपरांना तेथे वाव असता कामा नये, अशावेळी परोपकारार्थ सांपत्तिक, वैचाचारिक, श्रमिक दान व सेवा व्हायलाच हवी. त्यातून समाजाला चालना, प्रेरणा निळते, नदीकडे पहा ना ! ती सदैव वाहत राहाते. तहानलेल्या जीवांना तृप्त करते. आजूबाजूच्या परीसराला सिंचित करून सृष्टी सौंदर्य खुलवित असते. वसुंधरेच रूपही बदलत असते. पशू पक्षी सार्यांचं जीवन खुलवित असते.त्यामुळे काय तिचे जल नाहिसे होत असते का ? उलट ती नदीमाय, जीवनदियिनी, कामिनी, अशी संबोधनं त्या त्या भागात धारण करीत असते. त्यात नदीच्या जीवनाची सार्थकता व साफल्य सामावलेलं असतं. मानसानंही नदीसारखंच सत्पात्री दान करावयाला शिकायला हवे. खर्या धर्मानं वागून तर बघा. कसा जीवनाचा परिमल सर्वत्र दरवळायळा लागतो. लोकादर करणारा राम, न्यायाची बाजू घेणारा कृष्ण ही अजरामर झालेली पात्रं. बुद्धांनी कारूण्याचं दान केलं ते महाकारूणी ठरले. राजा अशोकानं व हर्षानं संपत्तीचा जनतेच्या भल्यासाठी डोळसपणे वापर केला. ती साम्राज्यं सुवर्णकाळ म्हणून ओळखली जातात. ज्ञानदेवांनी संस्कृतातलं बंदिस्त ज्ञान प्राकृतात आणलं. तुकोबांच्या जीवनविषयक सुलभ तत्वज्ञानानं पाचव्या वेदाची जागा घेतली. शिवबांनी युक्तीला कर्तृत्वाचं दान देत अन्यायी राज सत्तांना नामशेष करीत सामाजिक बुरसट रुढी-परंंपरांना छेद देत रयतेचं शिवराज्य निर्माण केलं. ह्या सर्व जीवनदानाच्याच सुंदर अभिव्यक्तीची फलश्रुतीच नव्हे काय ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याला हुशारीचा, ज्ञानाचा आणि मीपणाचा अहंकार आहे त्याला पशूपातळीच्याच अवस्थेतला आहे असे समजावे.कारण तो ज्ञान असून चांगल्यासाठी उपयोगात आणत नाही, ज्ञान आहे, हुशारी आहे पण तो जर फक्त मी पणाचा टेंभा मिरवत असेल तर हा मुर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल. जर हे सर्वकाही स्वत:च्या जीवनात मिळवलेल्या ज्ञानाच्याआधारे चांगला बदल घडवून आणत असेल आणि जे काही ज्ञान लोकांपर्यंत लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो खरा निगर्वी व परोपकारी माणूस समजावे. अशी माणसे बोटावर मोजण्याइतकी कमी प्रमाणात पहायला मिळतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती - Great* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती आईची* एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला,'' स्वामीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्वाचा असूनसुद्धा पित्याला फारसे का महत्व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्या व्यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला व त्या व्यक्तिच्या हाती देत ते म्हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला,'' स्वामीजी माझी कंबर, पोट दोन्हीही खूप दुखत आहे. एक प्रश्न काय विचारला मी, तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले त्याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्वामी मंद स्मित करत म्हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्या मातेची महती ही तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठच आहे. '' तात्पर्य :- आईसारखे दैवत सा-या जगतामध्ये नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*माझी शाळा माझे उपक्रम* 📚📚📚📚📚📚 आज दि.२५-१०-२०१८ रोजी वर्ग पहिली व दुसरी चा विद्यार्थ्यांचा रिंगणखेळ हा उपक्रम घेतला. साहित्य ➖रिंगण, सागरगोटे दशक साठी आणि लहान खडे एकक म्हणून वापरले. कृतीः गोलातील प्रत्येक मुलास रिंग टाकण्याची संधी देणे व रिंगणात किती एकक दशक आहेत ते मोजून सांगणे बाकी विद्यार्थी तितकी संख्या लिहतील. उद्दिष्टः 🌸 एकक व दशक संकल्पना समजणे, दृढ होणे. 🌸 मोजणे आणि लिहिणे, सांगणे 🌸 संख्यालेखन सराव. 〰〰〰〰〰〰〰 ✍ वर्गशिक्षिका श्रीमती सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. ➖➖➖➖➖➖➖
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/10/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५१ - स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीला सुरुवात २००१ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली २००७ - एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण. 💥 जन्म :- १९३७ - संगीत समीक्षक अशोक रानडे १९४५ - अभिनेत्री, चित्रपट निर्माती अपर्णा सेन 💥 मृत्यू :- १९५५ - शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलूसकर १९८० - शायर व गीतकार साहिर लुधीयानवी २००३ - स्वाध्यायचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले २००९ : अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. २०१२ - विनोदी अभिनेते जसपाल भट्टी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमास निघालेल्या स्पीडबोटीला अपघात, एकाचा मृत्यू; राज्य शासनातर्फे मृताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *केंद्रीय दक्षता आयोग सीबीआयच्या अधिकाऱ्यांवरील आरोपांची करणार चौकशी - अर्थमंत्री अरुण जेटली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी जस्टीस नरेश एच. पाटील यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 4 टक्क्यांची घसरण, येत्या काळात पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *एम. नागेश्वर राव यांनी स्वीकारला सीबीआयच्या अंतरिम संचालकपदाचा कार्यभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत स्टेज - IV (BS-IV) वाहनांच्या विक्री आणि नोंदणीवर 1 एप्रिल, 2020 पासून बंदी : सर्वोच्च न्यायालय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दहा हजार धावांचा टप्पा 205 सामन्यांमध्ये ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला टाकले पिछाडीवर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/7d6dMGQ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरज तेथे मदत करा* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/14/%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर* हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशके त्यांनी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्र गाजवले. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी महाराष्ट्रात अमरावती येथे झाला. त्यांचे वडील चिंतामणराव कोल्हटकर हेसुद्धा नाटकांतून अभिनय करत असत. भावबंधन नाटकातील मोरेश्वर या भूमिकेतून १९४४ मध्ये कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले. तत्पूर्वी १९४७ मध्येच भालजी पेंढारकरांच्या गरिबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. १९५0 साली कुंकवाचा धनी चित्रपटात त्यांनी नायकाची व्यक्तिरेखा केली. यानंतर पेडगांवचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजुळा, हिरवा चुडा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८0पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. अभिनयाशिवाय कोल्हटकरांनी नाटकांचे दिग्दर्शनही केले. १९६४ सालातले मोहिनी हे त्यांनी दिग्दर्शिलेले पहिले नाटक होते. १९४९ साली जेव्हा त्यांनी पहिल्यांदा भावबंधन केले, तेव्हा लता मंगेशकरही त्या नाटकात होत्या.आगर्याहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. चित्तरंजन कोल्हटकरांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. भावबंधनप्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरिताचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अर्शूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) म्यूज ही नदी कोणत्या देशात आहे ?* बेल्जियम *२) गदर पार्टीची स्थापना कधी झाली ?* १९१३ *३) भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला कधी हलवण्यात आली ?* १९१२ *४) लोकसभेच्या अध्यक्षांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?* पाच वर्षांचा *५) एडीबी हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?* एशियन डेव्हलपमेंट बँक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नितीन गुजराथी, धर्माबाद ● श्रीनिवास नक्का, लातूर ● गोविंद येळगे, धर्माबाद ● प्रथमेश मच्छरलावार ● जय सिंग चौहान ● कौशल्या कारवेडकर ● व्यंकी रॉय *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वाभिमान* बड्या घरच्या श्वानाला सर्रास मान असतो काहींचा स्वाभिमान कुठेही गहान असतो स्वाभिमान गहाण ठेवलास माणूस नको तिथे झुकतो गरज नाही त्या ठिकाणीही तो करंकरं वाकतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 45* इष्ट मिले अरु मन मिले, मिले सकल रस रीति । कहैं कबीर तहँ जाइये, यह सन्तन की प्रीति ।” अर्थ – संताचे वर्तन कसे असावे? यावर महात्मा कबीर प्रकाश टाकतात. दैवत, उपासना पद्धती , संपूर्ण रीती-रिवाज आणि आपलं स्वतःचं मन जिथ रमतं, आपल्या साधनेला जिथं अनुकूलता लाभेल. अशी ठिकाणं साधूला प्रिय असली पाहिजेत. मनः शांती लाभली की सर्व समस्यांवरचे उपाय सापडत असतात. खरं तर समस्याच मनःशांतीच्या मार्गातल्या गतिरोधक असतात. म्हणून मनाची शांती ढळणार नाही अशा कृती हाती घेतल्या तर समस्यांना थाराच मिळत नाही. मनाच्या एकाग्रतेसाठी तप , चिंतन, मनन आदि साधना सांगितल्या गेल्या आहेत. या साधनांच्या साध्यतेसाठी काहींनी सर्व भौतिक सोयी सुविधा त्यागून निरव एकांतात स्वतःला गुंतवलं. मानवी वसाहती पासूनही स्वतःला अलिप्त करीत संन्यस्त जीवनाचा अंगीकार केला. ही उपासना असो की संन्यास मानवाच्या कल्याणासाठीच अंगीकारले गेले. जगद्गुरू तुकोबाराय संसारी साधू होते. त्यांच्या व इत्तर काही दार्शनिकांच्या दृष्टीने संसार त्यागून जंगलात जावून बसणे म्हणजे संन्यास नव्हे, तर संसारी व भौतिक सुविधांमध्ये वावरूनही, त्यांच्यापासून अलिप्त राहता येणं. मनाच्या ठायी त्यांच्याप्रति मोह न येऊ देणे .म्हणजे संन्यास ! संसारा मध्पे मन व इंद्रिये पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात नाहीत अशांना जंगलातला एकांत हवा असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वत:चे दु:खही पचवून दुस-यांच्या दु:खात सहभागी होऊन इतरांसोबत आनंदी राहणारे लोक खूप सुखी होतात.दु:ख कुणाचेही कुणी वाटून घेत नाही परंतु दु:खात सहभागी होऊन काही प्रमाणात सुख देता येते अशी विचार करणारी माणसेही या जगात काही कमी नाहीत.संत,सज्जन असणा-याच्या जीवनात थोडे झोकून पाहिले तर त्यांचे जीवनही सर्वसामान्य माणसांच्याहीपेक्षा अधिक अवघड असते पण ते लोकांसमोर कधीही येऊ देत नाहीत.त्यांना असे वाटते की,आपणच जर आपले दुःख लोकांसमोर मांडले तर त्यांना झालेल्या दु:खातून कशी सुटका होईल हा विचार अशी माणसे करतात.इतरांच्या भावनांशी खेळून त्रास देण्यापेक्षा त्यांना त्यातून सुटका करुन आनंद कसा देता येईल याकडे अधिक लक्ष देतात.अशा वृत्तीची माणसे एक समाजासाठी आदर्श मानले जातात.त्यांचे अनुकरण आपणही करावे व इतरांना आनंद देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसे फुलवता येईल याकडे अधिक लक्ष द्यायला शिकले पाहिजे,ही देखील एक मानवतेची सेवाच होऊ शकेल.यासाठी कसल्याही प्रकारचा भेद न करता मनमोकळेपणाने संवाद साधून सा-यांचे जीवन सुखी व समृद्ध कसे करता येईल यासाठी दु:खीतासमोर जायला शिकले पाहिजे.ही देखील एक आपली सामाजिक बांधिलकी म्हणून कर्तव्य करायला हवे.यातच आपले खरे समाधान आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌷🍂🌷🍂🌷🍂🌷🍂🌷🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मशगुल - Gossip* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता* जगाच्या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्या कुटीत ईश्वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्यांच्याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्यांच्यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्यूनंतर ते जेव्हा स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना सोन्याचा मुकुट घालण्यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्यांच्या डोक्यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्वात कोणत्याच दृष्टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्याचा मुकुट व त्या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्यांचे बोलून झाल्यावर देवदूत म्हणाला,’’ तुम्ही पृथ्वीवर हिरे माणके दिलेली नव्हती तेव्हा तुम्हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्हणजे अश्रू होते. जे त्यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल त्यांना वाईट वाटले व त्याबद्दल त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्वरभक्ती आणि स्नेह यातच खूप आनंदी होतो म्हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्हणाला,’’ तुम्हाला ईश्वराचा स्नेह मिळाला म्हणूनच तुम्हाला ईश्वराचा सोन्याचा मुकुट देण्यात आला आहे.’’संताना स्वत:ची चुक समजली. ते स्वत:मध्येच मशगुल राहिले. त्यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. तात्पर्य:-ईश्वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
👏 *आकस्मिक भेट*👏 📚📚📚📚📚📚 आज दि.२४-१०-२०१८ रोजी मा. दिग्रसकर साहेब , शिक्षणाधिकारी (प्रा. ) जि.प. नांदेड , व श्री.मा. बनसोडे साहेब (मनपा.) शिक्षणाधिकारी यांची *जि.प.प्रा.शा.गोजेगाव* केंद्र (भानेगाव) 💐👏💐👏💐👏 👉यांनी परिपाठदरम्यान आकस्मिक भेट दिली. भेटी दरम्यान साहेबांनी विद्यार्थ्याशी शैक्षणिक संवाद साधला. तसेच ज्ञानरचनावाद व तंत्रज्ञान,नवोदय शिष्यवृत्ती वर्ग ह्या विषयी माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.तद्वतच मा.कें प्र.श्री जामगडे साहेब यांच्याशीही संवाद साधून त्यांना व आम्हा सर्व शिक्षकांना मार्गदर्शनपर सूचनाही दिल्या.तसेच सर्व विदयार्थ्याना बिस्कीट खाऊ वाटप मा. साहेबामार्फत करण्यात आले . *👉शालेय पोषण* *आहाराबाबतची चौकशी,तसेच दोन्ही डीजीटल रुम बघुन व गुणवत्ता बघुन साहेबांनी समाधान व्यक्त केले.* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 👇👇👇👇 क्षणाचिञे 〰〰〰〰〰〰 *✍शब्दांकन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.) जि.प.प्रा.शा.गोजेगाव 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- 1945 - संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 1984 - भुयारी रेल्वे कोलकता येथे सुरू 💥 जन्म :- 1910 : मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीतील अभिनेत्री लीला पेंढारकर 1914 - आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल 1921 - व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण 💥 मृत्यू :- 1992 - मराठी नावकथेचे जनक अरविंद गोखले 2013 - तब्बल पाच दशके आपल्या जादुई, आवाजाने हिंदी चित्रपट संगीतात ठसा उमटवणारे पार्श्वगायक मन्ना डे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८0 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती केली जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सुप्रीम कोर्टाने देशभरात सरसकट फटाके विक्रीच्या बंदीला नकार दिला असला तरी कमी प्रदूषण करणार्या फटाक्यांचीच विक्री केली जावी, असे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाईन विक्री करण्यावरही कोर्टाने घातली बंदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भेट राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची १२८ कोटींची मालमत्ता लवकरच जप्त होण्याची चिन्हं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : मुंबई शहराच्या डायल-100 प्रकल्पासह शहर सीसीटीव्ही प्रकल्प व्यापक करणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : फॉर्मात असलेल्या आघाडीच्या फलंदाजांच्या जोरावर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आज होणाऱ्या दुस-या एकदिवसीय लढतीत विजयाची लय कायम राखण्यास उत्सुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/4Vj4TpwngR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाहिरात : एक चिंतन* https://b.sharechat.com/36eeXGAIbR आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पार्श्वगायक मन्ना डे* ख्यातनाम गायक मन्ना डे यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. त्यांचे मुळ नाव प्रबोधचंद्र डे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोलकाता येथे झाले. त्यांना कुस्ती व बॉक्सिंग खुप आवडत होते. सोबतच ते फुटबॉलप्रेमीसुद्धा होते. महाविद्यालयीन काळात ते अशा स्पर्धांमध्ये भाग घेत असत. त्यांच्या वडिलांची त्यांना वकील बनवण्याची इच्छा होती. वकील बनायचे की गायक अशा द्विधा मनस्थितीत ते होते. मात्र काका कृष्णचंद्र डे यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी गायक बनण्याचे ठरविले.एक दिवस काकांसोबत रियाज करीत असताना बादल खान यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि विचारणा केली असता आपण असेच गात असतो, असे उत्तर त्यांनी दिले. बादल खान यांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली. पुढे त्यांनी काकांसोबत संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी मुंबई गाठले आणि बॉलिवूडमध्ये गायक म्हणून प्रस्थापित झाले.त्यांनी १९४२ मध्ये तमन्ना चित्रपटापासून आपले करिअर सुरू केले. २०१३ पर्यंत त्यांनी सुमारे तीन हजार पेक्षा अधिक गाणे गायले. हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये आणि इतरही भाषांमध्ये त्यांच्या आवाजाला मोठा चाहतावर्ग लाभला. केंद्र सरकारने त्यांना चित्रसृष्टीतील योगदानासाठी १९७१ मध्ये पद्मश्री सन्मान तर २००५ मध्ये पद्मभूषण तर २००७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'पंचतंत्र' या ग्रंथाचे लेखक कोण?* विष्णू शर्मा *२) देशात सोन्याच्या खाणी कोठे आहेत?* कर्नाटक (कोलार) *३) सिमेंटचे कारखाने कोणत्या राज्यात आहेत?* मध्य प्रदेश *४) दक्षिण कोरियाची राजधानी कोणती?* सेऊल *५) भारतात रणगाडा तयार करण्याचा मोठा कारखाना कोठे आहे?* आवडी (तामिळनाडू) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गजानन क्यादलवार ● कृष्णा प्रकाशराव मोरे ● राज धनकवार ● माधव कौठवाड ● सतीश बावणे ● लक्ष्मीकांत बेंकट ● पागोजी डुकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कारलं* कडू कारल्यालाही गोड म्हणून खाता आलं पाहिजे वाईटालाही चांगल्या नजरेने पहाता आलं पाहिजे कारलं कडू म्हणाल तर ते खाता येत नाही वाईट म्हणाल तर त्याला चांगलं म्हणून पहाता येत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे. 'मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* •• ●‼ *रामकृष्णहरी*‼● •• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 44* बहते को मत बहन दो, कर गहि एचहु ठौर। कह्यो सुन्यो मानै नहीं, शब्द कहो दुइ और।” अर्थ सत्कर्म अथक असले पाहिजे , असे महात्मा कबीर म्हणतात . पोहायला न येता गंटागळ्या खावून बुडत असेल किवा वाहून जात असेल तर त्याला बुडू देऊ नका. वाहूनही जाऊ देऊ नका. त्याचा हात धरून मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याला बाहेर काढा. तो सांगितलेल्या गोष्टीकडे काना डोळा करीत असेल तरी त्याला उपदेश करणे सोडू नका. त्याच्या भल्याचे दोन शब्द सांगतच राहा. सज्जन दयावंत असतात. त्यांची कळवळ्याची जाती असते. 'बुडती हे जण । न देखवे डोळा । म्हणोणीया कळवळा । येत असे ।।' तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे ते जगाच्या कल्याणासाठी धडपडत असतात. वाईट संगती किवा विचाराच्या प्रभावाखाली येवून ज्ञान मार्गापासून माणूस भरकटलेला असेल तर त्याला ज्ञानामृताचे डोस पाजून सत्य व विवेकी मार्गावर आणण्याचं पवित्र काम साधू व विचारवंताचं आहे. खरा व मानवतावादी धर्म बुरसट विचार अंधश्रद्धेची शिकवण देत नाही. काही संधीसाधू ढोंगी बुवा, बाबा चमत्काराच्या नावाखाली लोकांची प्रचंड लूट व पिळवणूक करीत आपलं इप्सित साधत असतात. अशा अंधभक्तीपासून दूर करून लोकांना डोळस मार्ग दाखवणे हे संताचे खरे कार्य आहे. अशा वेळी उपदेश देवूनही समोरची व्यक्ती मानत नसली तरी सतत त्याला अज्ञानाची जाणीव करून देत राहिले पाहिजे. एक ना एक दिवस तो विचार प्रवृत्त होवून खर्या भक्ती मार्गाकडे वळेल. त्याच्या ठायी खर्या ज्ञानाची जाणीव होईल व तो अज्ञानापासून दूर होऊन सत्य व विवेकशील मार्गाची कास धरेल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिथे तुमची श्रद्धा आहे तिथे तुमचा आत्मविश्वास आहे हे लक्षात असू द्या.लोक तुम्हाला काही म्हणतील त्यावर विश्वास ठेवू नका.कारण तुमच्या श्रध्देपासून तुम्हाला परावृत्त करुन तुमच्यातल्या आत्मविश्वासाला तडा निर्माण करण्याचे काम करतात आणि मानसिकता विचलित करण्याचे. मग तुमचे त्यामुळे कोणत्याही कामात मन लागत नाही.अशामुळे त्यांना आनंद वाटतो.लोकांनी असे म्हटले म्हणून तुम्ही तसे करु नका.तुम्हाला ज्यातून आनंद आणि समाधान मिळत असेल तर जरुर एखाद्या तुमच्या असलेल्या श्रध्देवर विश्वास ठेवूनच काम करायला हरकत नाही.तुमची प्रगती हीच तुमच्या श्रध्देतून मिळणारी प्रेरणा आहे हे कधीही विसरू नका.शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हेच खरे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भांडण - Brawl* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सोन्याची कुदळ* एका माणसाला दोन मुले होती जेव्हा तो म्हातारा झाला. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि म्हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे धन-संपत्ती घ्यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्याला खोटे का सांगितले?मग त्याच्या आत्म्याने म्हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्त पीक त्याच्या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला. तात्पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्याच्या घरी समृद्धी, सुख अवश्य येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/10/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ : भारत आणि चीनदरम्यान सीमा संरक्षण सहकार्यविषयक करारावर स्वाक्षर्या 💥 जन्म :- १७७८: कित्तूरची राणी चेन्नम्मा १९२४ : संगीतकार, गायक, नट पं. राम मराठे १९४० : ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले १९४५ : अभिनेता, दिग्दर्शक देवेन वर्मा १९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार १९७८ : इंग्लिश क्रिकेटपटू स्टीव हार्मसन 💥 मृत्यू :- १९१५ : इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नाशिक : अहिंसेचा अर्थ खूप व्यापक असून तो समजून घेण्याची गरज विश्वाला आहे - मांगीतुंगी येथील विश्व शांती संमेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह आज राज्याच्या दौऱ्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा तिढा सुटला असून यावर्षी कर्मचाऱ्यांना 15 हजार 100 बोनस जाहीर - रवी राव, म्युनिसिपल लेबरचे कार्याध्यक्ष यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये मिळणार दिवाळी भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी मुंबई : शासनाने 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास 26 नोव्हेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल - मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समितीचा निर्णय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागला भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *फरिदाबाद: येथे झालेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या ५ सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० विकेट्स राखून केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip खालील ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/X6MvpAv *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपघात - जीवनाला एक वेगळेच वळण देऊन जातो.* https://nasayeotikar.wordpress.com/2018/10/20/%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देवेन वर्मा* देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी कच्छ गुजरात येथे झाला. मात्र त्यांचे शिक्षण आणि बालपण पुण्यात झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र तसेच समाजशास्त्रात पदवी घेतली. अभिनयात आवड असल्याने त्यांनी करिअर म्हणून हे क्षेत्र निवडले आणि यात ते हास्य कलाकार म्हणून बर्यापैकी नावारूपासही आले. बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट विनोदवीरांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांनी अनेक चित्रपट केलेत त्यापैकी चोरी मेरा काम, चोर के घर चोरी आणि अंगूर या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. गुलजार, हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी या दिग्गज दिग्दर्शकांचे ते आवडते कलाकार होते. देवेन वर्मा यांचा विवाह अशोक कुमार यांची कन्या रूपा गांगुली यांच्याशी झाला. अनेक हिंदी चित्रपटांसह त्यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटातही काम केले. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले होते. देवेन वर्मा २ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकार आणि किडनी निकामी झाल्याने इहलोक सोडून गेले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) राजस्थानात अणुशक्ती केंद्र कोठे आहे ?* कोटा *२) महंमद गझनीने कनौजवर कधी चढाई केली ?* इ. स. १०११ *३) मेक्सिकोची राजधानी कोणती ?* मेक्सिको सिटी *४) 'मुद्राराक्षस' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* विशाखादत्त *५) 'मुस्लिम लीग'ची स्थापना कधी झाली ?* १९०६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्रवीण राखेवार, नांदेड ● एकनाथ आव्हाड, मुंबई ● स्वरदा खेडेकर गावडे ● पंकज बदाने ● प्रिया टेकाळे, माहूर ● अभिषेक नागूल, नांदेड ● नरेंद्ररेड्डी चाकरोड ● शिवकुमार बुट्टे ● ईश्वर डहाळे ● व्यंकटेश यमेवार ● श्याम जाधव ● साई पाटील शहादत्त *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छेद* ज्या ताटात खायचं त्यात छेद करतात रोज सोबत राहून दोघात भेद धरतात ज्या ताटात खाता त्यात छेद करायचा नसतो चार घास खातो त्याचा उपकार स्मरायचा असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पावसाळा म्हणजे सृष्टीत चौफेर कसे चैतन्य भरलेलं असतं. नानाप्रकारचे चैतन्यकिडे, हिरव्या हिरव्या झुडपांमध्ये, नाजुक नक्षीदार वेलींवरती कसे मस्त रमलेले दिसतात. पानांआड लपून एकसारखा झीणझणझण आवाज हा ऐकायला येतो. पण एक दृष्टीभेट मात्र अलभ्य. एका वेलीच्या पानावर बघा कशी अंडी घातली होती. त्या अंड्यातल्या जीवाला मायेची ऊब देत एक मादी बसली होती. पण तेवढ्यात एका पक्षानं अचूक नेम धरला...बघता बघता किटक मादी बिचारी आकस्मिकपणे आपल्या न जन्मलेल्या जीवांना सोडून गेली. जीव बिचारे अनाथ पोरके झाले. पण त्यांना आधार होता तो हिरव्यागार पानांचा.* *मानवेतर प्राण्यांमध्ये जन्ममृत्यूचा हा खेळ असा आकस्मिक घडत असतो. हिरव्या पानांच्या उबदार पाळण्यात अंडी सुरक्षित होती. त्या अंड्यांतून जीव जन्माला येईल. जगण्याची एकाकी धडपड त्या जीवाची सुरू होईल. अल्पकाळ का होईना आईच्या प्रेमाची उब त्या अंड्यातल्या जीवाला मिळाली. कदाचित हीच निसर्गाची शिकवण असावी. एकटंच यायचं या जगात. जगायचा संघर्षही एकट्यानेच करायचा. त्या जगण्याचा भरभरून आनंदही घ्यायचा आणि एकट्यानेच परतायचं. हेच खरं जीवनाचं सूत्र.* *कवीने म्हटल्यानुसार या बिनभिंतीच्या शाळेत, अर्थात निसर्गात जशी वैविध्यपूर्ण समृद्ध उधळण असते, तशी मैत्रीची भावना देणारी ऊबही मिळते आणि गुरूसारखी शिकवणसुद्धा. त्यामुळे हेच खरं जगण्याचं सूत्र, असं म्हणणं संयुक्तिक नाही का ?* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 43* देह खेह होय जायगी, कौन कहेगा देह । निश्चय कर उपकार ही, जीवन का फन येह।” अर्थ – परोपकार व सद्वर्तन विषयक मार्गदर्शन करताना महात्मा कबीर म्हणतात की, जीवंत असेतो सर्व प्राण्यांना किंमत आहे. एकदा का शरीरातलं चैतन्प नाहीसं झालं की देहाचं मूल्य संपलं. मग तो मानव प्राणी जरी असला तरी देह मातीलाच अर्पण होणार आहे. रांत्रदिन संपत्तीत लोळणारी व्यक्ती असो की हलाखीत जीवन जगणारा गरीब असो. सर्वांच्या जीवनाचं अंतीम सत्य मृत्यू आहे. आईच्या उदरी वाढणार्या गर्भाचा जन्म कधी होणार? हे सांगता येतं. मृत्यू कधी होणार? हे सांगणारी यंत्रणा अद्याप तरी अस्तित्वात आलेली नाही. तो कोणत्याक्षणी ओढवेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे जीवन फुलवणं , जीवनाची सार्थकता वाढवणं हे जीविताचं लक्षण आहे. जीवंत असूनही जर जगणं आनंदी व समाधानी जगता येत नसेल तर जीवंतपणी मरण अनुभवणे होय. जे काही चांगलं करावयाचं आहे ते जीवंतपणीच करावयायासं हवं. दान देणं असो. आनंद वाटणं असो की इतरांची दुःखं वाटून घेणं असो. हे सारं जीवंत असे तो करता येतं. एकदा का देहाने अचेतन अवस्था धारण केली की तुमच्याकडं कोण काय मागणार आहे ? त्यावेळेला चैतन्य गमावलेल्या अचेतन देहाची विल्हेवाट लावण्यासाठी इत्तरांचं सहकार्य घ्यावं लागणार आहे. त्यावेळी कोणीही काही दे , म्हणून मागणी करणार नाही. तेव्हा काही परोपकाराचं पुण्य फळ गाठीला राहावसं वाटत असेल तर प्रयत्न पूर्वक सत्कर्म करावे लागतील. गरजवंतांना दान-धर्म, मदत करावी लागेल. मृत्यू समयी जवळ कितीही संपत्ती असली . तरी सोबत काहीही देत नाहीत. मातीचा अंश असणारा हा देह मातीशीच एकरूप होवून जातो. म्हणून माय, माती आणि माणसांशी गद्दारी करू नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांचे मन शुद्ध आणि दृष्टी निकोप आहे ते आपल्या जीवनात पूर्ण समाधानी असतात.त्यांना कोणत्याही गोष्टीची हाव नसते,तसेच ते जेव्हा दुस-या कडे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात आणि दृष्टीत कसल्याही प्रकारचे वाईट विचार आणत नाहीत किंवा येत नाहीत.ते कधीही दुस-या चे वाईट व्हावे आणि माझे चांगले व्हावे असे कधीच चिंतीत नाहीत. त्यांना आपल्या जीवनात कुठलीही अपेक्षा नसते तसेच ते निरपेक्षवृत्तीने जीवन जगत असतात. अशी माणसे आपल्या जीवनात आनंदी राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सदैव माणसाने मन शुद्ध ठेवावे आणि दृष्टी निकोप असू द्यावी. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥙🌸🥙🌸🥙🌸🥙🌸🥙🌸🥙 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कलुषित - Impure* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिंचेचे झाड* एके दिवशी एक कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले. त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, ' अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. तुझ्या चिंचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.' 'मग काय बिघडले?' चिंचेचे झाड म्हणाले, 'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात'. हे ऐकून बाभळीच्या झाडाला चिंचेच्या झाडाची कीव करावीशी वाटली. ते रागाने म्हणाले, 'तू प्रतिगामी आहेस. तुझे माणसीकरण झाले आहे. तू असा आहेस. तू तसा आहेस'. चिंचेच्या झाडाने त्याचे म्हणणे कांही मनावर घेतले नाही. पण बाभळीच्या झाडाचे पालुपद रोजच चालू असे. ते रोज कांहीतरी नवीन मुद्दा मांडून चिंचेच्या झाडाचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी ते म्हणाले, 'या माणूस नावाच्या प्राण्याने जगभर झाडांची कत्तल चालवली आहे. या माणसांच्याकडे बघून घ्यायला पाहिजे.' झाडांच्या कत्तलींचा मुद्दा ऐकून चिंचेचे झाड थोडे हबकले. आणखी कांही दिवसांनी बाभळीचे झाड खोटेच म्हणाले, ' अरे तुला कळले का, आता माणसे चिंचेच्या झाडांची कत्तल करायला लागले आहेत'. आता मात्र चिंचेचे झाड निराश झाले. त्याला माणसांचा राग यायला लागला. या माणूस नावाच्या प्राण्याला धडा शिकवायचाच असे त्याने ठरवले. काय करावे बरे? त्याला एक आयडीया सुचली. तो आपले मूळ विचार, मूळ गुण विसरून गेला. त्याने ठरवले, आपल्या अंगाला चिंचा लागतात, म्हणून माणसे ती खायला येतात. आपली थंडगार सावली पडते म्हणून माणसे आपल्या सावलीत विसावा घेतात. आता आपण आपल्या अंगाला चिंचाच लावून घ्यायच्या नाहीत. आपली सगळी पाने गाळून टाकायची, म्हणजे सावलीच पडणार नाही. असे केले तर ती माणसे आपल्याकडे कशाला फिरकतील? हे विचार त्याने लगेच अमलात आणले. त्या झाडाची सगळी पाने कांही झाडून गेली. त्या झाडाला आता चिंचा लागेनात. कांही महिन्यातच ते झाड खंगून गेले. वाळले, मेले. आत्तापर्यंत चिंचेच्या सावलीमुळे नीट वाढ होत नसलेले ते बाभळीचे झाड मात्र चांगलेच फोफावू लागले. तात्पर्य : ऐकावे जनाचे करावे मनाचे *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन* * 💥 ठळक घडामोडी :- २००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्या उपग्रहाचे प्रक्षेपण. 💥 जन्म :- १९०० - अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतीकारी 💥 मृत्यू :- १७७९ - रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे, पेशवाईतील न्यायाधीश. १९७८ - प्रा. ना.सी. फडके, मराठी लेखक. १९९१ - ग.म. सोहोनी, देहदान साहाय्यक मंडळाचे संस्थापक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली : आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोर आणि सुरक्षा जवानांची चकमक, तीन सुरक्षा जवान शहीद झाले असून 1 गंभीर जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार : चंद्रकांत पाटील यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केली 77 उमेदवारांची यादी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 87.21 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 78.82 रुपये.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *डेन्मार्क : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालला जेतेपदाने दिली हुलकावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या शतकाच्या बळावर भारताने हा सामना 8 विकेटनी जिंकला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/WjQD6TKpcR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गावाकडच्या आठवणी .....! https://b.sharechat.com/gYLkILcR8Q जरूर वाचावे आणि आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ना सी फडके* नारायण सीताराम फडके (ऑगस्ट ४, १८९४ - ऑक्टोबर २२, १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणार्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते. अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले ?* इ. स. १५५६ *२) कोणत्या शहराला दक्षिण महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?* सोलापूर *३) लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान राज्य कोणते ?* सिक्कीम *४) 'जोक्स फॉर आवर मिलियन्स' या पुस्तकाचे लेखक कोण ?* व्ही. व्ही. गिरी *५) ओडिशाची उपराजधानी कोणती ?* पुरी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● ● ● अमोल शिंदे पाटील ● पस्कॉल डीसुजा ● पांडुरंग कुलकर्णी ● राम गुड्डे ● रमेश शंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक करायला गेलं की दुसरंच उभं रहातं कळत नाही तेंव्हा कसं डोक्याहून पाणी वहातं करायचे ते लवकर करताच येत नाही योग्य वेळ आल्या शिवाय कोणत काम होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 42* पानी केरा बुदबुदा, अस मानस की जात। देखत ही छिप जायेगा, ज्यों सारा परभात।। अर्थ महात्मा कबीर जीवनाची नश्वरता पटवून देताना सांगतात की, मानवी जीवन पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. त्याचा क्षणिकही भरवसा देता येत नाही. कोणत्याही क्षणी त्याचा शेवट होवू शकतो. जसे की सकाळ होऊ लागताच आकाशातल्या मिनमिनत्या तारका लपून बसायला लागतात. माणसाच्या जीवनाचा खरा अर्थ त्याच्या जीवन जगण्यातून कळत असतो. तो किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. उगाच कण्हत कण्हत जगण्यापेक्षा जीवनाचे गाणे म्हणत जगता आले तर जीवनाचे नंदनवन होते. त्यासाठी निखळ आनंदी जगायचा प्रयत्न केला पाहिजे. काही जणांना आपण जन्माला आलो आहोत. आपल्याला सुंदर जगायचे आहे. याची जाणीवच नसते. काही जण जगणं ओझं समजून जगत असतात. त्यांच्या जगण्याचंच इत्तरांना ओझं वाटायला लागतं. खरं तर अशी माणसं जीवंत असूनही वारंवार मरत असतात. खरंच जीवन आनंदाने भरता येतं . हेच विसरतात. खरंचते जीवनाला ,'तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे । तिन्ही लोक आनंदाने भरून वाहू दे रे । हेच सांगायला विसरतात. सर्व क्षमता असूनही सुंदर जगण्याची सुरूवात करण्याआधीच आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यापूर्वीच जीवनाला रामराम ठोकू लागतात. ती घटिका केव्हा येईल हे निश्चित माहित नसतं. आपल्या हाती असलेल्या क्षणांचा सदुपयोग केला पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याजवळ थोडाबहुत पैसाअडका, थोडीबहुत संपत्ती आहे अशा लोकांना या जगात माझ्यासारखे कोणीच नाही असे वाटायला लागते आणि त्याचा अभिमान तो इतरांना वेगळ्या पद्धतीने सांगत सुटतो. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व परिस्थितीने गांजलेल्या लोकांना अगदी गुलामासारखे वागवतो आणि सर्वसाधारण माणसे आपली परिस्थिती बिकट आहे म्हणून ते निमूटपणे सहन करत त्यांच्या हाताखाली जीवन संपवतात.अशी केवळ स्वार्थी, आपमतलबी, गर्विष्ठ, दुस-यांना हीनतेची वागणूक देणारी व दुस-याचे कधीतरी भले करावे अशी अपेक्षा नसलेले निर्दयी असतात.अशा माणसांना चारचौघात किंवा जनमाणसात कुठेही प्रतिष्ठा, मानसन्मान मिळत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिष्ठा - Reputation* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बिरबलाची युक्ती* एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो तुझी मला मुळीच गरज नाही .बिरबल अतिशय स्वाभिमानी होता .तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला .आणि एका गावात वेश बदलून राहू लागला बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही .बादशाहाला मात्र सारखी त्याची उणीव भासे त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहाला त्याच्या शिवाय करमत नव्हते .अन्न गोड लागत नव्हते .त्याने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला परंतु बिरबल सापडत नव्हता बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला .बादशाहने हि बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते .त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली .राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे. लग्न समारंभ थाटात होणार आहे .तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरी सह उपस्थित रहावे .जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना .बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोक हि चिंतेत पडले होते गावाच्या पुढारी ना या समस्येला कसे तोंड ध्यावे समजत नव्हते ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली .अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता त्याने गावकरी ना जाण्याची युक्ती सांगितली .गावकरी खुश झाले .एक दिवस गावातील पाच सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्ली ला गेले दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत .बादशहा जोरात हसला आणि तुम्हाला ही युक्ती कोणी दिली असे विचारले तर त्यांनी गावातील एका शेतकऱ्याने दिली असे सांगितले.बादशाहाने लगेच आज्ञा दिली जा आणि बिरबलाला सन्मानपूर्वक घेऊन या. बादशहाने आणि बिरबलाने आनंदाने मिठी मारली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/10/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- 1969 - अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना 💥 जन्म :- 1916 - लोकशाहीर अमर शेख 1963 - नवज्योतसिंग सिद्धू 1978 - वीरेंद्र सेहवाग 💥 मृत्यू :- 1974 - प्रतिभावान गायक मास्टर कृष्णराव 1999 - समाजवादी नेते, पत्रकार माधवराव लिमये *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळं दुष्काळाचं सावट आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत करू, शिर्डी साई समाधीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ओडिशा - तितली वादळात नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली १ हजार कोटींची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशाचे संविधान जगात सर्वोत्तम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन दीक्षाभूमीच्या विकासासाठी ४0 कोटींचा धनादेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंजाब : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चीनने ब्रम्हपुत्रेचे पाणी अडवले, अरुणाचलमध्ये दुष्काळाचे सावट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *क्रिकेट विश्वामध्ये भारतीय करतात सर्वात जास्त सट्टेबाजी; आयसीसीचा मोठा खुलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/RsYQB4kJ9Q *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गावाकडच्या आठवणी ...* https://b.sharechat.com/gYLkILcR8Q आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकशाहीर अमर शेख* ख्यातनाम मराठी लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७).स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याला काय लिहावं यापेक्षा काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सहय़ाद्री पर्वत राज्याच्या कोणत्या दिशेने पसरला आहे ?* दक्षिण-उत्तर *२) न्यूझिलंडची राजधानी कोणती ?* वेलींग्टन *३) वॉल स्ट्रीट हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे ?* न्यूयॉर्क *४) तामिळनाडूतील थंड हवेचं ठिकाण कोणतं ?* कोडाईकॅनॉल *५) इंडियन मिलिटरी अकादमी कोठे आहे ?* डेहराडून *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गजानन वडजे ● राजेश्वर वावधाने, मुखेड ● संदीप भंडारे, येवती ● आनंद बलकेवाड, येवती ● लक्ष्मण आगलावे, धर्माबाद ● ओम धूळशेट्टे ● अरुण निलावार ● दत्ता सूर्यवंशी ● बंडू अमृतवार ● शिवाजी पाटील ● अतुल जाधव ● इम्तियाज शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *असे जगा* जीवन असे जगा जे इतरांच्या कामी येईल तुमची ओळख फक्त तुमच्या नामी होईल इतरांसाठी जगलात तर तुमची ओळख राहील कोल्ह्या कुत्र्या सारखी नस्ता आपली गत होईल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 41* *हीरा परखै जौहरी* *शब्दहि परखै साध ।* *कबीर परखै साध को* *ताका मता अगाध ॥* अर्थ: हिरा म्हणजे काय असतो बरं ! अज्ञानी माणसाच्या दृष्टीनं तो कोळशाचाच प्रकार. परंतु कोळशाआड दडलेला हिरा ओळखण्याची दृष्टी एखाद दुसर्याकडे म्हणजेच जवाहिर्याकडे असते. अन इत्तरांंच्या दृष्टीत कोळसा असणार्या हिर्यांचं मोल जवाहिर्याचं जाणतो. त्याप्रमाणे शब्दांचं मोल जाणण्याचं सामर्थ्य विवेकी साधू सज्जनांच्या विचारवंताच्याच्या ठायी असतं. महात्मा कबीर सांगतात की जो सज्जन व दुर्जनांना पारखून घेतो. त्याचे मत अधिक गहन गंभीर असते. ज्याच्या उक्ती अन कृतीमध्ये फरक नसतो. तिच व्यक्ती खर्या अर्थाने वंदनीय असते. त्याच्या ठायी लोक कल्याणाची सद्भावना दडलेली असते. ती माणसंच लोकनायक म्हणून अजरामर झाली आहेत. अशा नायकांना पारखून त्यांचे समर्थन करणारेही कौतुकास पात्र ठरले आहेत. याउलट ज्यांनी सत्तेचा व पदांचा दुरूपयोग केला. लोक कळवळा दाखवत लोकांना कळा सोसायला लावल्या असे राजे व त्यांच खरं रूप कळूनही त्यांचा उदो उदो करणारे भाट पात्रे सदैव तिरस्कार व अवहेलनेचेच धनी बनले आहेत किंबहुना ती खलनायक व दुष्टपात्रे म्हणूनंच दुष्किर्ती पावली आहेत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते. जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते. अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे. या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मौल्यवान - Valuable* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वस्तूची किंमत* खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक कामगार आपल्या गाढवासोबत जंगलातून चालला होता. इतक्यात रस्त्याच्या बाजूला त्याला काही चमकताना दिसलं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चमकणारा दगड पडलेला होता. त्यानं तो उचलून आपल्या गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि पुढे चालू लागला. समोरून येणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्यानं गाढवाच्या गळ्यात अडकवलेला तो मौल्यवान दगड बघितला. मग त्यानं गाढवाच्या मालकाला विचारलं, ‘भाऊ मला हा दगड विकत घ्यायचा आहे. तुम्ही याचे किती पैसे घेणार?’. कामगाराला दगडाच्या किंमतीबाबत काहीच कल्पना नव्हती. फक्त शंभर रूपये घेईन, असं त्यानं सांगितलं. त्यावर हिरे-व्यापारी म्हणाला ‘शंभर रूपये तर खूप जास्त आहेत. मी फक्त पन्नास रूपयापेक्षा अधिक रक्कम नाही देणार.’ कामगारानं थोडा विचार केला आणि शंभर पेक्षा कमी रुपये घेणार नाही, असं सांगितलं. व्यापाऱ्याला वाटलं की या मौल्यवान दगडासाठी त्याला कोणी गिऱ्हाइक मिळणार नाही. मग हा कामगार ५० रुपयात हा दगड विकण्यासाठी आपल्या मागं येईल. थोडावेळ जाऊनही कामगार त्या व्यापाऱ्याजवळ आला नाही. अखेर व्यापारीच त्याच्या शोधात निघाला. त्याला दिसलं की दुसरा एक व्यापारी त्याच्याकडून तो मौल्यवान दगड विकत घेत आहे. तो व्यापारी पळत कामगाराजवळ पोहोचला. तोपर्यंत व्यवहार पूर्ण करून समोरचा व्यापारी निघून गेला. त्या व्यापाऱ्यानं कामगाराला विचारलं की, ‘तो दगड तू किती रुपयांना विकला?’. कामगार म्हणाला, ‘२०० रुपये’. व्यापाऱ्यानं त्याला म्हणाला, ‘अरे मुर्खा तो दगड अत्यंत मौल्यवान होता आणि तू अवघ्या २०० रुपयांना विकलास!’ त्यावर कामगार उत्तरला, ‘मूर्ख मी नाही, तुम्ही ठरलात. कारण मला तर तो दगड रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळाला होता आणि त्याची किंमत माहित नव्हती. पण तुम्हाला त्याची किंमत माहित असून देखील तुम्ही अवघ्या ५० रुपयांच्या हव्यासापोटी तो दगड विकत घेतला नाही. १०० रुपयात तो दगड विकत घेतला असता तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा मिळाला असता.’ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनुष्य गौरव दिन* 💥 ठळक घडामोडी :- 💥 जन्म :- १९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार. १९१० - चंद्रशेखर सुब्रमण्यम - नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १९२० - पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक. १९२५ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक. १९५४ - प्राची चिकटे, बाल साहित्यिक. १९५९ - प्रिया तेंडुलकर. अभिनेत्री आणि मराठी कथालेखिका. 💥 मृत्यू :- १९३४ - विश्वनाथ कार, उडिया लेखक व समाजसुधारक. १८९६ मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे नियतकालिक काढले. १९९५- बेबी नाझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री. २००६- श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यात प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांची गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एम. जे. अकबर यांचा राजीनामा स्वीकारला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : शिवसेनेला लक्ष्य करत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *उत्तर आर्यलडच्या ५६ वर्षीय लेखिका अँना बर्न्स यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/GElarZQ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा* https://www.deshdoot.com/dussehra-vijayadashami-special-article-nagorao-yevatikar-breaking-news/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्रीपांडूरंगशास्री आठवले (दादाजी)* आज स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम वंदनीय स्व.पांडुरंगशास्त्रीजी आठवले तथा प.पु.दादाजी यांचा जन्मदिन . . . other is not other ,other is my devine brother all the brotherhood under the fatherhood of god देवाचे प्रेम शाश्वत भाषेत समजावले.त्रिकाल संध्या मधुन देवाविषयीची कृतज्ञता . . .सकाळी झोपेतुन उठवतो सकल मानवाला स्मृतिदान(आठवण) देतो.कोणतेही अन्न खा त्यांचे रक्त बनवतो व त्यातून माणसाला शक्ती देतो म्हणून भगवंताचे दुसरे मोठे देणे म्हणजे शक्ती दान.रात्री झोपल्यानंतर माणसाच्या डोक्यातले सर्व टेन्शन्स काढून त्यांना शांती प्रदान करतो आणि म्हणून भगवंताचे तिसरे मोठे देणे म्हणजे शांतीदान . . निदान या तिनही कारणासाठी तरी देवाचे मनापासुन आभार माना समजावले.कोळी बांधवांमध्ये अस्मिता निर्माण करून आगरि वागरी सागरी या सर्व बांधवांना भावाप्रमाणे प्रेम दिले आणि त्यांच्यामधले व्यसन दुर केली . जागतिक धर्मपरिषदेमध्ये यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर प्रत्येक माणसाला श्रीमद भगवत गीता हा धर्मग्रंथ नसून तो जीवनग्रंथ कसा आहे तो unto the last man पर्यंत पोहचवला.शरीरातील रक्ताचा थेंब न थेंब श्वासाचा प्रत्येक श्वास हा अखंड मानवजातीच्या विकासाकरता ज्यांनी खर्च केला . तू अमृतस्य पुत्र आहेस तू भगवंताचा पुत्र आहे तू दीन नाही तु लाचार नाही तुझ्या मध्ये सुद्धा तेजस्विता तत्परता आणि तन्मयता आहे .तू नचिकेता चा वारस आहे .तू आदर्श ऋषींची संतान आहेस. म्हणून दिन दुबळा समजू नको .लाचार समजून नको .अशी खुमारि माणसा मध्ये भरली .माणसाला माणसाचे नाते समजावले. एकमेकाद्वितीय दुसऱ्याला दुसऱ्याची गरज का हा आदरभाव उभा केला. परकेपणा काढुन माणसांमध्ये आपलेपणा भरला . म्हणूनच अरब अमिरातितिल मुस्लिम धर्मगुरू असो. .वा ख्रिश्चन धर्मगुरू पोप ज्यांच्या जाण्याने दुःखि झाले . . अशा महामानवाला माझे वंदन. तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात सारे जीवांच्या चिंता या लोपती क्षणात. असे म्हणत लाखो स्वाध्यायी आज दादांचा वाढदिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करत आहेत. दादाजी तुम्हाला कृतज्ञतापूर्वक वंदन 🏻संकलन : राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला ?* डॉ. रेने लिनेक *२) भूकंपाची तीव्रता मोजणार्या उपकरणाला काय म्हणतात ?* भूकंपमापी *३) जगातील पहिले तिकट कोठे छापले गेले ?* इंग्लंड *४) 'बहुरूपी' या पुस्तकाचे लेखक कोण ?* चिंतामणराव कोल्हटकर *५) महाराष्ट्रातील प्रमुख लाकूड व्यापार केंद्र कोठे आहे ?* परतवाडा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● निलेश अतकूरकर ● योगेश्वर कंदकूरते ● श्रीनिवास बेंकट ● विशाल शेपाळकर ● अनिरुद्ध कोल्हाटकर ● लतिका चौधरी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••• *भावना* दरवर्षी रावण जाळतो ती वृत्ती जळाली नाही प्रतिकृती पेक्षा वृत्ती जळावी ही गोष्ट कळाली नाही रावणाच्या प्रतिकृती पेक्षा ती वृत्ती जळाली पाहिजे सण समारंभा मागची भावना कळाली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 41* *यह जग कोठी काठ की,* *चहुं दिश लागी आग* *भीतर रहै सो जलि मुअै,* *साधू उबरै भाग।* अर्थ हे मायावी जग यह (मोह) लाकडापासून बनवलेल्या महालासारखे आहे. ज्याच्या चारही दिशांनी षड्विकारांच्या ज्वाला उठत आहेत. त्या इतक्या प्रबळ आहेत की, त्या महालात वावरणारे प्राणी न दिसणार्या आगीत व सतत धुमसणार्या धुरात कोंडी होवूनच मरत असतो. मात्र साधू (सज्जन) अशा विकारी ज्वालांपासून अलिप्त असतात.सामान्यजण विकारांना आहारी जातात तर असामान्य माणसं विकारारांपासून अलिप्त म्हणजे अविकारी असतात. विकार क्रोध उत्पन्न करतो. क्रोधाचं कामंच असतं मधल्या मध्ये जाळून मारणं. क्रोध आगीचं प्रतिक तर स्थिरवृत्ती शांतीचे निदर्शक असते. साधूस सर्व क्रोध-विकारांपासून कोसो दूर असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजळणी - Revision* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरा संन्यासी कोण ?* एकदा एक तरुण, संन्यासीकडे गेला आणि म्हणाला, ‘मी सर्व काही सोडून आलो आहे, माझे मन आता संसारात रमत नाही. मला हा संसार नकोसा झाला आहे. काही तरी उपाय सांगा.’ सन्यासी त्या तरुणाला म्हणाले, ‘तू काही दिवस राजाकडे जा; त्याच्यासोबत राजवाड्यात राहा. तिथे तुला नक्कीच आत्मज्ञान मिळेल.’ साधूमहाराजांच्या या उपायावर तो तरुण संभ्रमात पडला, राजाकडे राहून आपला समस्या कशी दूर होईल असा प्रश्न त्याला पडला. तरुणाची संभ्रमावस्था पाहून साधूमहाराज म्हणाले, ‘तू राजमहालात जाण्याआधीच राजाला तुझ्याबद्दल सर्व माहिती मिळाली असेल.’ संन्यासी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तरुण राजवाड्यात गेला. सगळीकडे सुख समृद्धी असूनही त्या तरुणाचे मन तेथे रमले नाही. पण साधूमहाराजांनी त्याला दिलेल्या सुचनेमुळे त्याला तेथे जबरदस्तीने राहवे लागत होते. एकेदिवशी राजा जवळच असलेल्या नदीत स्नानासाठी उतरला. या तरुणाने देखील स्नान करण्यासाठी जायचे म्हणून आपला अंगरखा काठावर काढून ठेवला होता. तेवढ्यात राजमहालातून आवाज आला, आग लागली… आग लागली… काही क्षणात साऱ्या परिसरात धूर पसरू लागाला. तरुण लगेच पाण्यातून बाहेर आला आणि आपला अंगरखा उचलून जीव वाचवण्यासाठी पळणार, इतक्यात त्याला राजा अगदी निश्चिंत उभा असल्याचे लक्षात आले. काही झालेच नसल्यासारखे भाव राजाच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावर तरुणाने राजला विचारले, ‘राजमहालात आग लागलेली असूनही तुम्ही शांत उभे आहात. असे का बरे?’ याप्रश्नावर राजा म्हणाला, ‘मी या राजमहालाला कधी माझा समजलोच नाही. मी जन्माला आलो नव्हतो तेव्हाही हा राजमहाल होता आणि माझ्या मृत्यूनंतरही तो असेल. पण तू कपड्यांसाठी धावलास. याचा अर्थ तुला तुझे मन अजूनही संसरात आहे. तुला एवढा मोह आहे, तर मग संसारात मन नाही असे का म्हणतोस.’ हे ऐकून तो तरुण राजाच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘मला समजले की संन्यासी महाराजांनी मला तुमच्याकडे का पाठवले. तुमच्याकडे सर्व काही असूनही त्यावर आपला हक्क तुम्ही मानत नाही, मोहावर विजय मिळवला आहे. आणि मी सर्व काही सोडून आल्याचा दावाकरून संसार त्याग करण्याची भाषा बोलत होतो, पण माझं मन अद्यापही संसारातल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकलेले आहे, मोह सुटलेला नाही. संसार करताना देखील मोह न ठेवता संन्यासी सारखे जीवन जगता येते आणि संकटातही स्थिर राहता येते, हे मला आज कळले *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - जगातील पहिले अणुउर्जा केंद्र एलिझाबेथ दुसरीने इंग्लंडच्या कुंब्रिया प्रांतातील सेलाफील्ड येथे सुरू केले. २००३ - भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला 💥 जन्म :- १८१७ - सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक १८६९ - भास्करबुवा बखले, हिंदुस्तानी गायक-संगीतकार, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू १८९२ - नारायणराव बोरावके, पहिले मराठी साखर कारखानदार १९७० - अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८८२ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. शिवसेनेसोबत जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचं जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) आणि अन्य बचत योजनांवरील व्याजाचा दरात वाढ ७.६ टक्के वरून ८ टक्के, केंद्रीय वित्त विभागानं या संदर्भातील परिपत्रक काढलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ठाणे - कल्याण-डोंबिवली मनपाचे 400 कंत्राटी कामगार आजपासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सिऐटल : जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * UEFA Nations League मध्ये इंग्लंडने चुरशीच्या सामन्यात माजी विश्वविजेत्या स्पेनला त्यांच्याच घरच्या मैदानावर ३-२ ने केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *स्वयंघोषित संत रामपालला दोन प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा; हिसार कोर्टाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेटपटूंनी स्थानिक क्रिकेट सामन्यांत 50 षटकांत तब्बल 3 बाद 596 धावा कुटल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 99603583007 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/AbXdmOZ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कथा - संशय* एक।छोटा संशय जीवन कसे उध्वस्त करते हे सांगणारी कथा https://b.sharechat.com/gYbH19ZJ4Q आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दादोबा पांडुरंग तर्खडकर (तथा दादोबा पांडुरंग )* हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणार्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मुर्शिदाबाद हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?* रेशमी आणि हातमाग कापडासाठी *२) कालमापक यंत्राचा शोध कोणी लावला ?* जॉन हॅरिसन *३) सूर्याची उंची तसेच इतर ग्रहगोलांची उंची मोजणारे उपकरण कोणते ?* सेक्सटंन्ट *४) हॉकी स्टीकचे वजन किती असते ?* २00 ते ७९४ ग्रॅम *५) भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?* सात *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● चेतन भैराम ● श्रीनिवास कोलोड ● धनराज पाटील भुमरे ● दीपक टेकाळे ● केशव सटाले ● गीतेश पाटील ● अनिकेत पाटील ● गिरीश तांबोळे ● निंबा पाटील ● गजानन बापूराव भोसकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नीतिमत्ता* माणसातली नीतिमत्ता कुठे पळून गेली आहे इथे सा-या लबाडांचीच गर्दी गोळा झाली आहे लबाडांच्या गर्दी मध्ये नीतिमान कसा सापडेल चिखलात जाईल त्यास सहजच घाण चोपडेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 40* *जब गुण को गाहक मिले,* *तब गुण लाख बिकाई.* *जब गुण को गाहक नहीं,* *तब कौड़ी बदले जाई.* अर्थ : महात्मा कबीर म्हणतात कि, जेव्हा गुणाची पारख असणारे गुणपारखी गाहक मिळतात तेव्हा गुणाची किमत होत असते. परंतु जेव्हा गुणाची पारख नसणारे ग्राहक भेटतात, तेव्हा गुणाची परिपूर्णता असूनही ती वस्तू कवड़ी मोलाने के भावाने विकावी लागते. एका व्यक्तीला रस्त्याने जात असताना दोन खडे चमकताना दिसले. त्याने कुतूहलापोटी ते उचलून सोबत घेतले. आणि तो पुढे निघाला. वाटेने जाताना तो थकून एका हाॅटेलात थोडा वेळ थांबला. हातातले दोन्ही खडे त्याने सहज टेबलावर ठेवलेले. इतक्यात हाॅटेल मालकाची दृप्टी त्या खड्यांवर पडली. त्याच्याकडे पाहून निरखून पाहात तो त्या खडेवाल्याला म्हणाला. 'कुठे भेटले हे दगडी कोळसे?' 'अहो मी त्या माळावरून येत होतो तर हे खडे इत्तर खड्यांपेक्षा वेगळे दिसले म्हणून मी सोबत घेतलेत. तुम्हाला हवा तर घेवून टाका यातला एक.' त्यावर तो दुसरा गृहस्थ म्हणाला, 'मी काय करू याला घेवून . नको तो तुमच्याकडेच राहू देत.' यांचे संभाषण चालू असताना एक जवाहिर्या तेथे आला. त्याची नजर त्या खड्यावर गेली. तो त्या खड्यांना पारखून म्हणाला. 'अरे भाऊ , तू हे खडे मला दिलेस तर मी तुला दोन लाख देईन.' हां ना करीत त्याने ते चार लाखाला घेतले. तो जवाहिर्या आला नसता तर त्या गृहस्थाने कवडीमोल भावाने कुणाला तरी देवून टाकले असते. गुणांची पारख नसली की किमती वस्तूचं मूल्यचं कळत नाही हेच खरं..! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सदैव - Always* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकीचे फळ* एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जीव जाणे, निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासाभरात एक चमत्कार झाला आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, “तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.” त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जीव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मानपूर्वक बोलून मग पुढे जा. माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचन प्रेरणा दिन* *हात धुणे दिन* *जागतिक विद्यार्थी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण. १९९७ - गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरुन पुढे गेले. 💥 जन्म :- १९३१ : मिसाईल मॅन, थोर वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम 💥 मृत्यू :- १९१८: शिर्डीचे साईबाबा यांनी समाधी घेतली. १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *चांगला वाचक हा चांगला लेखक होऊ शकतो असे प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनीही विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत हळूहळू होत आहे सुधारणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव आता ‘प्रयागराज’, बादशाह अकबरानं बदललं होतं ‘प्रयाग’चं नाव, योगी आदित्यानाथ सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची होतंय चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे रौप्यपदक पटकावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर दहा विकेट्स राखून मिळविला दणदणीत विजय मिळवून भारताने कसोटी मालिका २-० अशी खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/ljoUetKq1Q *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वाचन प्रेरणा दिनानिमित डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती *मिसाईल मॅन ते राष्ट्रपती* https://sharechat.com/post/ZQJyEmR आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. अब्दुल कलाम* डॉ. अवूल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. ते भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. बी.एस.सी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार असताना त्यांनी प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) स्ट्रेप्टोमायसीनचा शोध कोणी लावला ?* वेक्सिमन *२) पेरू या देशाची राजधानी कोणती ?* लिमा *३) राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोठे आहे ?* कोल्हापूर *४) भारतातील कोणत्या राज्यात बॉक्साईट सापडते ?* महाराष्ट्र *५) इंडियन इंडपेन्डन्स अँक्ट कधी पास करण्यात आला ?* १८ जुलै १९४७ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● फारुख शेख ● मंगेश फड ● मोहन भुसेवार ● संतोष दौडे ● पृथ्वीराज राहेरकर ● शिवराज काठेवाडे ● सुभाष मेंटेवाड ● संजय पा. कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिंता* आज प्रत्येकाला चिंता आहे रूपाची पण चिंता करावी ती खरी स्वरूपाची वरवर दिसते ते नश्वर रूप असते माणसाच्या मनात खरे स्वरूप असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 39* *कामी अमि नॅ ब्वेयी,* *विष ही कौ लई सोढी |* *कुबुद्धि ना जाई जीव की,* *भावै स्वमभ रहौ प्रमोधि ||* अर्थ दारुच्या व्यसनात गुरफटलेल्या माणसाला दारूंच आवडते. त्याच्या समोर अनमोल असा अमृताचा कुंभ ठेवला तरी त्याला त्याची काहीच किंमत वाटणार नाही. कारण तो व्यसनाधीनतेमुळे सदैव विषाचाच शोध घेत फिरत असतो. मुर्ख माणसाला समजावायला साक्षात ईश्वर जरी आला तरी मुर्खाच्या मुर्खपणासमोर बिचार्या ईश्वराचं काय खरंच नाही ठेवणार तो ! व्यसनाधीनतेत बुडालेला माणूस बुद्धी प्रामाण्य वागत नाही. तो त्याने जी नशा केलेली असते. त्या नशेच्या पूर्णपणे अमलाखाली जावून त्या क्षणी सुचेल त्याप्रमाणे इष्ट-अनिष्ट वर्तन करून बाजुला होत असतो. जसे : गंजेटी झोपडीत गप्पागोष्टी करत चिलीम फुकत बसलेले असतात. एकाने धुंदीत चिलीम सिलगावून जळती काडी भिरकावलेली.हे महाशय झुरक्यात गुंग. झोपडी पेट घेते. तिथे बर्याच जीवनपूरक वस्तू आहेत. अरे जाळ लागलाय पळा . म्हणत ते केवळ चिलीमच घेवून पळतात. त्यांना तीच हवी असते. "गंजेटी बैठे गांजा पिने झोंपडी मे लागी आग, चल रे निकल जोगी अपनी चिलम ले भाग । असं असतं व्यसनी माणसांचं वर्तन ! विचारानं मनावर घेतलं असतं तर बर्याच वस्तू वाचविता आल्या असत्या. परंतु नशेत बुद्धी साबुत राहातेच कुठं ! नको त्या मर्कट लिला करून तो बघणार्यांच्या विनोदाचा किवा दयेचा भाग बणून व्यसनी माणसं जगत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अहंकाररुपी माणूस सुरवातीला दुस-यावर आपला प्रभाव टाकायला जातो, परंतु सुरुवातीला लोकांना माहीत नसते म्हणून त्याच्यातील वर्तनाकडे पाहून थोडे दुर्लक्ष करतात.पुन्हा पुन्हा जर असे वर्तन करत असेल तर त्याची प्रतीष्ठा काय आहे हे चांगलेच ओळखायला लागतात आणि त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवत नाहीत.जर स्वत:चेच तुणतुणे वाजवत असेल तर काही काळात त्यांच्या अहंकाराचे डफडेच वाजवून टाकतात.त्याची कोणतीच प्रतिष्ठा समाजामध्ये ठेवत नाहीत.मग तो जीवनात एकटा पडतो.इतरही लोक त्याला दूर करतात.त्याच्या अहंकाराने त्याचे सगळे संपवलेले असते. माणसाने कधीही अहंकाराची भाषा करु नये.अहंकाररुपी राक्षस एकदा का अंगात आणि मनात शिरला तर त्याचे सर्वस्व संपलेच म्हणून समजावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिकवण - Teachings* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेटवस्तू न स्वीकारणे* अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’ काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले. कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले. ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’ अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७१ : ब्रिटिश सरकारने भारतात क्रिमिनल ट्राइब्स अँक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती आणि जमातींना गुन्हेगारी जमाती ठरवलं. हा कायदा १९४९ मध्ये रद्द केला गेला. २0१३ : ओडिशाच्या किनारपट्टीला 'फायलिन' चक्रीवादळाचा तडाखा. सात जणांचा बळी 💥 जन्म :- १९०९ - विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक 💥 मृत्यू :- १९६७ : थोर नेते राम मनोहर लोहिया *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंतरजिल्हा बदलीमुळे राज्यभरातील त्रस्त शिक्षकाना नव्या निर्णयाचा दिलासा; आवडीच्या जिल्ह्यात राहण्याची संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गाड्यांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांना मोजावे लागणार आता दुप्पट पैसे तर दुचाकी नवीन घेणा-यांना मोटारसायकलच्या किमतीच्या 10 टक्के विम्याचे पैसे भरावे लागणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *श्रीनगर - ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. करण सिंह यांचे पुत्र आणि पीडीपीचे नेते विक्रमादित्य सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ब्राह्मोसची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या निशांत अग्रवालला 7 दिवसांची पोलीस कोठडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हरिद्वार- पर्यावरणवादी गंगाप्रसाद जी अग्रवाल यांचं निधन, गंगा प्रदूषणाविरोधात 111 दिवस बसले होते उपोषणाला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रोहित शर्माकडून कर्णधारपदाची धुरा आता पुन्हा विराट कोहलीकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~*~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/zWj7G4M Follow me on Share Chat ~~~~~~~~~~*~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राम मनोहर लोहिया* समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचा जन्म २३ मार्च १९१0 रोजी उत्तरप्रदेशातील अकबरपूर येथे झाला. अडीच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे वडील महात्मा गांधींचे अनुयायी होते. मुंबईच्या मारवाई शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १९२0 मध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत पहिल्यांदा आंदोलन केले. गांधींच्या आवाहनानुसार त्यांनी दहा वर्षांचे असताना शाळा सोडून दिली. १९२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांची भेट जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत झाली. १९२४ मध्ये ते प्रतिनिधी म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झालेत. १९२५ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली यात त्यांनी ६१ टक्के गुण मिळवले. यानंतर वाराणशीच्या काशी विद्यापीठात शिकायला गेले. पुढे कोलकाता येथे शिक्षण घेतले. अखिल बंग विद्यार्थी संमेलनात नेताजी सुभाषचंद्र बोस न पोहोचल्यामुळे त्यांच्याकडे संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले. १९२८ मध्ये ते काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले. नंतर ते विद्यार्थी संघटनेत सक्रीय झाले. सायमन कमिशन विरोधातील आंदोलनात त्यांनी भाग घेतला. पुढे १९३0मध्ये अग्रवाल समाजाच्या मदतीने शिक्षणासाठी इंग्लंडला व बर्लिनला गेले. भगत सिंग यांना फाशी देण्याचा त्यांनी लीग आँफ नेशन्सच्या बैठकीत निषेध केला.१७ मे१९३४ रोजी त्यांनी समाजवादी पार्टीच्या स्थापनेचा निर्णय घेतला. २२ आँक्टोबर १९३४ रोजी मुंबईत काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सिंगापूरच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* सिंगापूर एअरलाईन्स *२) राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्य नेमू शकतात ?* १२ *३) इराणमधील सर्वात मोठे सरोवर कोणते ?* उर्मिया *४) कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते ?* दुसऱ्या *५) कोणत्या देशात भारतीयांची लोकसंख्या अधिक आहे ?* मॉरिशस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अमित शिंदे ● संपन्न कुलकर्णी ● जगन कुलवंत ● सायारेड्डी जरावाड ● अशोक हाके ● बालाजी सातपुते ● संतोष शाटलवार ● माधवराव धुप्पे ● दीपक वाघमारे ● प्रभू पाटील कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकं* सांगायला गेल की लोकं टांगायला जातात एकत्र करायला गेल की ते पांगायला जातात खरं खोटं काय ते विचार करून ऐकाव खरा विचार करतात त्यांनी कशाला भैकाव शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ●‼ *विचार धन* ‼● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला काल प्रारंभ झाला. नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाईल. घटामध्ये माती घालून त्यात बी रूजत घातलं जातं. देवीसमोर अखंड दीप लावला जातो. देवीपुढे क्रमाक्रमाने वाढत जाणा-या फुलांच्या माळा बांधल्या जातात, आरत्या म्हटल्या जातात. दिवसभर देवी भागवत, श्रीदुर्गासप्तशतीची पारायणं केली जातात. 'जय आंबे माता' असा मोठ्या आवाजात पुकारा केला जातो. रात्री रस्त्यावर मंडप घालून जागोजागी दांडिया खेळला जातो. देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते.* *नवरात्रीचे नऊ दिवस संपून जातील. मंदिरातल्या किंवा देवघरातल्या देवीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरे केले जातात, पण मनात प्रश्न येतो तो घराघरात वावरणा-या देवीचं काय? माता, भगिनी, कन्या, सून, नात या रूपात वावरणा-या देवीचा प्रश्न कधी सुटणार? मंदिरात पूजा आरती करणारे देवीभक्त घरातील देवीकडे कधी लक्ष देणार? प्रत्यक्ष देवाने स्त्री-पुरूष असा भेदभाव कधीही केला नव्हता. प्राचीन काळी पुरूषांनी प्रथम देवीचीच मंदिरं उभारली, मग मध्यंतरीच्या काळात असं काय घडलं ?* *मध्यंतरी वाचलेली एक गोष्ट मला आठवते. एकदा प्रत्यक्ष देव आणि पृथ्वीवरचा माणूस यांची अकस्मात भेट झाली. गंमत म्हणजे लगेचच दोघांनीही एकमेकांशी बोलताना पहिलं वाक्य उच्चारलं, 'माझी निर्मिती केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार !' "खरोखरच प्रथम कोणी कोणाची निर्मिती केली? देवाने माणसाची की माणसाने देवाची ?"* • • ● ‼ *रामकृष्णहरी* ‼● • • 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 37* *आंखि ना देखे बापरा,* *शब्द सुनै नहि कान* *सिर के केश उजल भये,* *आबहु निपत अजान।* अर्थ विधात्याने डोळे दिलेले असले तरी कोणत्याही बाबीला लक्षपूर्वक पाहात नाही. कान दिलेले असून सुनबहिरेपणा करीत असतो. आपूलकीने दिलेला कोणताही उपदेश किवा सल्ला लक्षपूर्वक ऐकत नाही. डोईचे केस काळ्याचे पांढरे होऊन पिकून गेले आहेत. तरी विचारपूर्वक कोणतीही गोष्ट केलेली नाही. त्यामुळे विवेकीपणा त्याच्या अंगी असण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ वयाने नुसतेच ताड-माड वाढून चालत नाही. तर अनुभवाने अंगी समृद्धपणा व परिपूर्णता यायला हवी. निसर्गाविष्कार खूपच मजेदार असतात. त्यामागील कार्यकारणभाव समजून घ्यायला हवे आहेत. बरेच जण या बाबी समजूनच घेत नाहीत. कानोकानी व सांगासांगीवरच विश्वास करून सत्य काय ते जाणूनच घेत नाहीत. अशी मुर्ख माणसेच धूर्त , स्वार्थी व लुटारूंचे कळसुत्री बाहुले बणतात. अंधश्रद्धा व अंधरूढींचे गाढव ओझे ते बिन तक्रार वाहून नेत असतात. अशा माणसांमुळेच समाजातल्या अंधश्रद्धा व वाईट रिवाज विज्ञानयुगातही अबाधित जपल्या जात आहेत. आजही अज्ञानामुळे किंबहुना अर्धशिक्षीतपणामुळेच माणसाची फसगत होत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की, त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो. त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो. त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो. ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत. मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल. हा जन्म परत येणार नाही हे तर माहीत आहेच. यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वास - Believe* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समजून घेऊन वागणे* एक शिकारी एकदा शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने बरेच कुत्रे स्वतःबरोबर घेतले होते. परंतु ते आपल्या मर्जीप्रमाणे इकडेतिकडे पळू नयेत म्हणून त्याने दोन दोन कुत्रे जोडीने एका साखळीने बांधले. त्यांपैकी वाघ्या व पाग्या या नावाच्या दोन कुत्र्यांची एक जोडी होती. ते एकमेकांवर प्रेम करीत असत. ते नेहमी बरोबर खात-पित, नेहमी एकत्र खेळत असत. तेव्हा ते चांगले काम करतील असे त्या शिकार्याला वाटले. पण थोड्या वेळाने पाहतो तर वाघ्या पुढे ओढ घेत असता पाग्या मागे राहू लागला व पाग्याने एका दिशेने ओढ घेतली की वाघ्याने उलट दिशेने घ्यावी असे होऊ लागले. शेवटी दोघेही एकमेकांचे लचके तोडण्याच्या बेतात आले. ते पाहून एक म्हातारा कुत्रा त्यांना म्हणाला, 'मूर्खांनो, तुम्ही दोघांनी थोडी पड घेतली तर भांडणाची वेळ का येईल ? मी आणि माझा सोबती नेहमी एकमेकांच्या मर्जीप्रमाणे वागत असूं, त्यामुळे आमच्यावर कधीही भांडण्याचा प्रसंग आला नाही.' तात्पर्य - एकत्र राहावयाचे असेल तर सर्वांनी एकमेकांना समजून घ्यावे लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/10/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय मुलगी दिन.* 💥 ठळक घडामोडी :- १७२७: दुसरा जॉर्ज व कॅरोलीन, अॅन्सबॅक यांचा राज्यअभिषेक १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी चे उद्घाटन १८९०: डॉटर्स ऑफ द अमेरिकन रिव्होल्यूशन संस्थेची वॉशिंग्टन डी.सी. येथे स्थापना 💥 जन्म :- १९०२: जयप्रकाश नारायण - भारतीय राजकारणी १९०५: फ्रेड ट्रम्प - अमेरिकन उद्योगपती १९१६: नानाजी देशमुख - भारतीय सामाजिक कार्यकर्ते १९४२: अमिताभ बच्चन - भारतीय अभिनेता १९६५: रोनित रॉय - भारतीय अभिनेता 💥 मृत्यू :- १९६८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दर आठवड्याला दुष्काळग्रस्त भागाची करणार पाहणी ; मंत्रीदेखील घेणार परिस्थितीचा आढावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तितली चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उद्या ओडिशातील शाळा, महाविद्यालयं, अंगणवाड्या राहणार बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जेष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून करण्यात आली नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सौदी अरेबिया भारताच्या मदतीला ; अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार, अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधांमुळे चिंतेत असलेल्या भारताला दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक रामप्रहरमध्ये प्रकाशित लेख *" जीवन सुंदर आहे "* http://ramprahar.com/wp-content/uploads/2018/10/Ram-Prahar-11-October-2018-Page-4.jpg लेख वाचून आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. त्यांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. ते आधुनिक काळातील महान संत होते. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'सनी डेज' या पुस्तकाचे लेखक कोण ?* सुनिल गावसकर *२) १९९0 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धा कोठे पार पडल्या ?* बीजिंग *३) पश्चिम बंगालमधील प्रमुख बंदर कोणते ?* कोलकाता *४) भारताची उत्तर-दक्षिण लांबी किती आहे ?* ३,२१४ कि.मी. *५) एक्स रे चा (क्ष किरणांचा) शोध कोणी लावला ?* विल्यम व्हॉन रॉन्टेजन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● प्रवीण वाघमारे ● बाबाराव पाटील कदम ● रवी सितावार ● अजय वाघमारे ● सुमित बोधने ● दिनेश करपे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *माणसं* माणसंच माणसाला जेव्हा पाण्यात पहातील अशा माणसाकडून काय अपेक्षा रहातील माणसाने माणसाची किंमत केली पाहिजे माणसानेच माणसाला हिंमत दिली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 37* *कबीर कूता राम का,* *मुटिया मेरा नाऊ |* *गले राम की जेवड़ी,* *जित खींचे तित जाऊं ||* अर्थ महात्मा कबीर म्हणतात की, मी राम नामाचा सतत जप करतो म्हणून काही जण सततच्या उच्चारामुळे रामाचा कुत्रा म्हणून हिणवतात खाजवतात.. होय मी रामाचा कुत्रा आहे. राम नामाच्या मोत्यांची माला माझ्या गळ्यात मी धारण केलेली आहे, त्यामुळे माझा गळा कसा शोभिवंत दिसतो आहे. मी तिकडे जात असतो. मला गळ्यात घातलेली ही साखळी जिकडे ओढून नेईल. अशा या राम बंधनाच्या प्रेमात जगताना खूप मजा येते. रामाचा अंगीकार केवळ बोलण्यापुरताच नाही तर राम जगण्याचा भाग बनलेला आहे. रामाचा अंगीकार करताना सत्य मार्ग , एकवचनीपणा थोरा मोठ्यांचा सन्मान या बाबी जगताना आपोआपच प्रवृत्तीचा भाग बणून जात आहेत . त्यामुळे जगण्याला एकप्रकारची खुमारी चढते आहे. ती मला हवीहवीशी आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्याने जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपल्या मनाचा तोल जाऊ देऊ नये.परिस्थिती ही आपल्याला परीक्षा घेण्यासाठीच आपल्यासमोर उभी राहते आणि ती आपल्याला द्यावी लागते.तेव्हा आपण शांतवृत्तीने, संयमाने, विचारपूर्वकदृष्टीने परिस्थिती कशी आहे त्यास अनुसरून ती परीक्षा द्यायला सामोरे गेले पाहिजे तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो.जर आपण माघार घेतली तर आपल्या जीवनाला परिपूर्णता ही प्राप्त होऊ शकत नाही.परिस्थिती कोणतीही असो ती एक आपली खरी परीक्षाच आहे. ती दिल्याशिवाय आपल्याला कसे समजेल ?समजण्याआधी आपण तत्पर राहायला शिकले तरच यशस्वी होता येते. अन्यथा परिस्थितीसमोर हार मानून दुःखमय, यातनामय जीवन जगण्यासाठी तयार राहावे लागेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥙🍃🥙🍃🥙🍃🥙🍃🥙🍃🥙 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिस्थिती - situation* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चढ आणि उतार* आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.' बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते. थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले. त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...' *तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/10/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक मानसिक आरोग्य दिन* *जागतिक लापशी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९८ : भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणून आदर्श सेन आनंद यांनी कार्यभार सांभाळला २0१३ : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नवृत्त होत असल्याचे जाहीर केले. 💥 जन्म :- १९१0 : डॉ. द्वारकानाथ कोटणीस १९0६ : ख्यातनाम लेखक आर. के. नारायण १९५४ : हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखा 💥 मृत्यू :- २००६ - सरस्वतीबाई राणे, भारतीय - मराठी गायिका. २००८ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका. २०११ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *हरयाणा: शेतक-यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आम्ही बँकांचे दरवाजे खुले केले पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर नाना पाटेकरांना महिला आयोगाची नोटीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अहमदनगर- शिर्डीच्या साई संस्थानला सुप्रीम कोर्टाचा दणका, चुकीच्या प्रवर्गातून विश्वस्त नेमण्यावर आक्षेप, अपात्र संचालकांना काढून नवे विश्वस्त नेमा सुप्रीम कोर्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सणासुदीच्या तोंडावर राज्यात 1.5 हजार मेगावॅट विजेचा तुटवडा; नाशिक, मुंब्रासह राज्याच्या काही भागात भारनियमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 74.06 रुपये प्रति डॉलर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅलेंचा राजीनामा; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजीनामा मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने अंध क्रिकेट टी-२० तिरंगी मालिकेत इंग्लंडवर मात करीत विजयी घोडदौड राखली कायम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक पार्श्वभूमीमध्ये प्रकाशित लेख *तंबाखूमुक्त एस. टी. होईल काय ?* त्या दिशेने महामंडळाचे एक पाऊल पडत आहे. ते उल्लेखनीय आहे. http://parshvbhumi.com/date/20181010/page/4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कादंबरीकार आर के नारायण* प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण यांचा जन्म १0 आँक्टोबर १९0६ रोजी झाला. त्यांचे पुर्ण नाव रासीपुरम अय्यर नारायणसामी होते. भारतीय लेखकांच्या तीन सर्वात महान साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. कादंबरी आणि कथा प्रकाराच्या माध्यमातून त्यांनी विविध स्तर आणि रुपातील मानवीय विकास आणि अध:पतनाचे चित्रण केले. गाईड कादंबरीसाठी १९६0 मध्ये त्यांना साहित्य अकादमी हा सर्वोच्च सन्मान मिळाला. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी अँन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्या वाचताना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे. यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी कथांमधून उभे केले आहे. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत - आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा - आचार्य विनोबा भावे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्रातील प्रमुख वेधशाळा कोठे आहे ?* पुणे *२) उत्तर व्हिएतनाममधील सोंग की नदीच्या काठावर वसलेलं महत्त्वाचं शहर कोणतं ?* हनोई *३) १९८५ हे वर्ष काय म्हणून साजरं करण्यात आलं ?* इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ *४) आंध्र प्रदेशमध्ये अवकाशयान केंद्र कोठे आहे ?* श्रीहरिकोटा *५) पृथ्वीच्या आपल्या आसाभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात ?* स्वांगपरिभ्रमण गती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● विशाल अन्नमवार ● राजेश्वर भुरे ● सतीश बड्डेवाड ● हरिश्चंद्र भोईर ● पोतना पालंचेवार ● संतोष खेडकर ● गंगाधर पापुलवार ● श्याम देसाई ● राजेंद्र वाघमारे ● संतोष चंदेवाड ● सतीश बोधनकर ● राज वाजीरे ● रेखा अर्गे ● माधव गवळे ● विठ्ठल धुळेवार ● गोविंद पाटील ● वसंत पाटील कदम ● रामा गायकवाड ● कैलास सांगवीकर ● विनोद लोणे ● तुकाराम ढोले ● शंकर बत्तीनवार ● तानाजी पाटील ● अरुण शंकपाळे ● प्रमोद यादव ● शरद घुबे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *मर्यादित* आशा केल्यास माणूस जगाचा दास होतो दास होण्याची चिंता नाही जो सदा उदास रहातो आशा किंवा उदासी एकदम टोकाची नसावी आनंदात जीवन जगण्यास दोन्ही मर्यादित असावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= • • ● ‼ *विचार धन* ‼ ● • • =========ஜ۩۞۩ஜ========= *कामावरून थकून भागून आलेल्या भुकेल्या पुरुषाला बाई जेवायला वाढते. तो जेवताना समोर बसून रहाते. ज्याच्याकरीता प्रेमाने जेवन बनवलं, तो जेवनाचा आस्वाद घेतोय याचं समाधान असतंच. त्या बरोबर भुकेला माणूस जेवताना तल्लीन झालेला असतो. ती तल्लीनता बघण्यासारखी असते. ज्यांना व्यवस्थित खायला मिळतं त्यांच्यासाठी भुकेचा सोहळा असतो. पण जे आन्नालाही तरसतात त्यांच्यासाठी भूक दुश्मन असते.* *एका आत्मकथनात भुकेचा संदर्भ आहे. गरिबी किती असावी ? हगवण लागलेल्या म्हशीच्या मागं पोरं टोपलं घेऊन फिरतात. म्हशीला न पचलेले दाणे शेणात तसेच असतात. ते दाणे धुवून घ्यायचे. दाणे फार नसतात. मग आंब्याच्या कोयीमध्ये निघणारा गर दाण्यांबरोबर दळायचा. त्याची भाकरी करायची आणि भूक भागवायची. अनेकदा वाळलेल्या भाकरी पाण्यात भिजवून खाल्ल्या जातात. उंदीर भाजून खाल्ले जातात. झाडाचा पाला खाऊनही भूक भागविली जाते.* *याउलट सुबत्ता असलेली माणसं भूक लागण्याची वाट पहात नाहीत, नुसते खातच सुटतात. दिवसातून कितीदा खावं यावरही मतमतांतरे आहेत. या वादात पडण्यापेक्षा कडकडून भूक लागली की जेवावं हेच खरं. जेवताना थोडी भूक शिल्लक ठेवून आणि जगात अनेक लोक उपाशी असतात हे वास्तव डोक्यात ठेवून जेवावं, प्रत्येकाला भूक तर लागणारच आहे.* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 36* *जबलग भागती सकामता,* *तबलग निर्फल सेव |* *कहई कबीर वई क्यो मिलई,* *निहकामी निज देव ||* अर्थ जोवर उद्देश ठेवून भक्ती केली जाईल तोवर ती भक्तीरूपी सेवा निष्फळ ठरणार आहे. कारण विधात्याला निष्काम भक्तीची अपेक्षा आहे. त्याला सकाम सहेतुक भक्ती कशी काय आवडणार आहे? निर्गुण, निराकार असणार्या ईश्वराला निष्काम सेवा, निष्काम भक्ती आवडते. निर्व्याज मनाने बुद्धांनी लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग दिला. चक्रधर, संत नामदेव, ज्ञानेश्वर, नाथ , रामदास, तुकोबा, जनाई , कबीर, मीराबाई, मुक्ताई, बहिणाई ,गाडगेबाबा, तुकडोजी आदिंनी निर्हेतूक भक्ती केली . लोक शिक्षणाचं सशक्त पीठंच त्यांनी उभे केले. लोक जागृती हाच उद्देश घेवून ते जगले. ज्ञानदानामागे त्यांचा कुठलाही स्वार्थी व पोटार्थी हेतु नव्हता. जन कळवळ्याचा त्यामागे ध्यास होता. स्वतःची वाताहत झाली तर झाली परंतु सर्वांचं कल्याण व्हावं . दास्य अज्ञानातून त्यांची मुक्तता व्हावी हा उद्देश होता. आजकाल भक्तीचं अवडंबर माजवून भक्तांना भावनिक बणवून त्यांची भावनिक व आर्थिक लुट करणारे महाभागही काही कमी नाहीत. ज्यांनी भौतिक संपत्ती व सुखांच्या मागे न लागता विवेकनिष्ठ चिंतन केलं. त्यांची भक्ती व साहित्य कृती अजरामर ठरली आहे. ज्ञानोबांचा पुढील भक्तीविषयक अभंग वाचला तर भक्ती कशी असावी ते कळते. 'भावेवीण भक्ती भक्तिवीण मुक्ती। बळेवीण शक्ती बोलो नये॥१॥ आपलं कार्यही निखळ व आनंददायी असेल तर ते लौकिकास पात्र ठरणारंच.. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= भूतकाळाचे स्मरण करुन वर्तमानकाळात सावध राहत आणि भविष्यकाळ समोर ठेवून जी व्यक्ती आपले जीवन चांगल्याप्रकारे जगते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🛣🌄🛣🌄🛣🌄🛣🌄🛣🛣 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अनमोल - Priceless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/10/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- *१९८१-फ्रान्समध्ये मृत्यू दंडाची शिक्षा रद्द करण्यात आली २००१ - ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून अँथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली. 💥 जन्म :- १९५३ - टोनी शालूब, अमेरिकन अभिनेता 💥 मृत्यू :- १९८७ - गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमली राहमोन यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव : Dbt मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा फी शिक्षण फी ची रक्कम विद्यार्थ्यांच्या खाती लवकरात लवकर जमा करावी. यातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : शहरातील स्वाईन फ्लुचा ताप वाढतच चालला असून आणखी २१ जणांचा झाला मृत्यू, त्यामुळे शहरातील एकुण मृतांचा आकडा पोहोचला ४१ वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *95 वर्षीय दिलीप कुमार यांना न्युमोनिया, पुन्हा रुग्णालयात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 720.54 कोटी तुटीचा अर्थसंकल्प, कसलीही भाडेवाढ न करता बेस्ट समितीच्या बैठकीत सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यवतमाळ - बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 6 लाखांच्या बनावट नोटा जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला जिंकून दिले दुसरे सुवर्णपदक.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्तीमध्ये आज प्रकाशित लेख *" मतदार जागृती आवश्यक "* http://epaper.ejanshakti.com/m5/1848089/Pune-Janshakti/09-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रेणुका देवीचे माहूर* माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत. माहूर, नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) कुतुबमिनार कोठे आहे ?* नवी दिल्ली *०२) चारमिनार कोठे आहे ?* हैद्राबाद *०३) ताजमहल कोठे आहे ?* आग्रा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● नागनाथ बळीराम शिंदे, धर्माबाद ● स्नेहल श्यामसुंदर ढगे, चिरली ● पल्लवी मदन ढगे, चिरली ● रोहित भोळे ● हणमंत सावंत ● आर जे राठोड ● पिंटू कटलम ● नागेश अशोक धावडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पारख* हिरा अन् गारगोटी पृथ्वी मधून मिळते पारख करणाराला खरा फरक कळते एका खाणीत सारं सारखं असत नाही कोळशाच्या खाणीत हिरे असतात काही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= • • • ● ‼ *विचार धन*‼ ● • • • =========ஜ۩۞۩ஜ========= *दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !* *भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🦆🦆🦆🦆🦆संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 35* *मेरा मुझमे कुछ नही,* *जो कुछ है सो तोर |* *तेरा तुझको सउपता,* *क्या लागई है मोर ||* अर्थ माणसाचा हावरटपणा पाहून महात्मा कबीर उपदेश करताना म्हणतात. हे मानवा ! तुझा हा हावरटपणा म्हणजे, 'माझं माझं अन गाढव ओझं' असा हा प्रकार आहे. माझं जे काही रूप दिसतं ना ते माझं असं स्वतःचं काहीच नाही. जे काही मिळालंय ना ते सारं निसर्गाकडून मिळालेलं आहे. सौंदर्य वगैरे सारं काही विधात्याचंच वरदान. मला मिळालेली शक्तीसुद्धा निसर्गाचीच कृपा. मी तो फक्त भार वाही. जाताना मला संपत्तीसह हा देहही निसर्गालाच द्यायचा आहे. मी येताना काही आणलेलं नाही जातानाही काही नेणार नाही. सारं इथलंच उपभोगलं अन इथचं सोडायचं आहे. निसर्गाचं निसर्गाला द्यायचं आहे. अनेक बलवंतांनी बळाच्या जोरावर जगाला झुलविले. सर्वांना आपले अंकित बनवून ठेवले . सारं भौतिक वैभवं त्याच्या पायी लोळण घेत होतं. असाही एक दिवस उजाडला की सारं वैभव जिथून घेतलं तिथंच ते सोडावं लागलं होतं. वैभव संपत्ती काही जन्मतःच सोबत आणालेली नव्हती. ती जिथून घेतली तिथंच सोडावी लागली होती. जन्मताना आत्म्यासोबत शरीर मिळाल होतं. त्या शरीराला सजवून, शृंगारून खूप जपण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हट्टापायी नको त्या बाबींच्या मागे धावावं लागलं. ते शरीरही साथ सोडून ज्याच्या आधारानं रजाचं गज झालं होतं त्याच निसर्गाला ते अर्पण करावे लागणार आहे. याची जाणीव होताच आपल्या सहकार्यांना 'माझ्या मृत्यूनंतर माझे हात खुलेच ठेवा. जगाला कळू द्या की माणूस कितीही संपत्ती जमा केला तरी जाताना रित्या हातीच जावं लागतं.' हे बोल आहेत जग्गजेत्या ग्रीक सम्राट आलेक्झांडर अर्थात सिकंदराचे. यातून तरी माणसानं बोध घेवून समाधानी व्हायला हवं ! जीवनातल्या परमानंदाची निखळ अनुभूती घेत समाधानी व्हायला हवं ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दुस-यांना आनंद देण्यात जेवढे समाधान आहे तेवढा आनंद दुस-याचा हिरावून घेण्यात नाही. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आपल्याला कोणतेही साधन लागत नाही केवळ तुमचे निर्मळ मन आणि तुमची निकोप दृष्टी असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रास - Trouble* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हुबेहूब कला अवगत असणे.* एक मूर्तिकार मूर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. ज्याची मूर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. त्याने खुर्चीवर बसलेल्या व एका हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता. त्या पुतळय़ाला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढच्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहूब होता की, खराखुराच रखवालदार पहार्यावर बसला असल्याचा चोर-दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत. नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होते. आता 'आपला शंभरीनिमित्त जंगी सत्कार व्हावा' एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती, म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वत:चे नऊ पुतळे केले होते. अगदी हुबेहूब स्वत:सारखे. एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळय़ांत दहावा पुतळा म्हणून निश्चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक असे दहा मूर्तिकार! काही म्हणजे काही फरक नाही! यातल्या कुणाला घेऊ जावे? हा त्यांच्यापुढे पेच पडला. तेवढय़ात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्यांना मुद्दाम म्हणाला, 'बाबांनो, असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे? कारण खर्या मूर्तिकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळय़ांत दाखवायचे राहून गेले आहे. त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, 'उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष तुम्हाला दिसला. हे मुर्तीकार आम्हांला माहिती होते तु बोलणार जर तुझ्याबद्दल मी काही बोललो नसतो तर आम्हाला चिञकार कोण ते ओळखायला आले नसते. चल आता आमच्याबरोबर तु. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दैनंदिन 70 "इंग्रजी सुविचार " मराठी अर्थासहीत.* *1. Knowledge is power.* (ज्ञान ही खरी शक्ती आहे.) *2. Work is worship.* (कर्म हीच पूजा आहे.) *3. Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.) *4. Time is money.* (वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.) *5. Haste makes waste.* (घाईने कामात चुका होतात.) *6. Character is destiny.* (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.) *7. Exuberance is Beauty.* (चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.) *8. Practice makes man perfect.* (सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.) *9. Confidence is a key to success.* (आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.) *10. Sound mind in sound body.* (निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.) *11. Experience is the best teacher.* (अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.) *12. Never have a resistance to change.* (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.) *13. No pains, no gains.* (त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.) *14. Hope is walking dream.* (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.) *15. Charity begins at home.* (सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.) *16. Fortune favours the brave.* (धाडसी लोकांना नशीबही साथ देते./चालणाऱ्याचे नशीबही चालते.) *17. Well beginning is the half done.* (चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.) *18. Positive attitude creates positive peoples.* (सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/समाजाची निर्मिती करते.) *19. Good things happens to good peoples.* (चागल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.) *20. To teach is to learn twice.* (दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.) *21. No wisdoms like silence.* (शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.) *22. Difficulty is a severe instructor.* (आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.) *23. Good luck never comes late.* (चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.) *24. Delay in justice is injustice.* (उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.) *25. Actions speaks louder than words.* (कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.) *26. Progress is the law of life.* (पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे./चलना जीनेका नाम है।) *27. A good deed is never lost.* (चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.) *28. Failure is the first step of success.* (अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.) *29. More you struggle, more you become strong.* (तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.) *30. Every man is the creature of his own fortune.* (प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.) *31. Good handwriting is the mirror of good learning.* (चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.) *32. Slow but steady can win the race.* (हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.) *33. A friend in neef is a friend indeed.* (गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.) *34. Where there is will there is way.* (ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.) *35. Change your thought and you will change your world.* (तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.) *36. A journey of thousand miles begins with a first step.* (हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.) *37. He that burns most, shines most.* (जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.) *38. Patience is a plaster for all sores.* (संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.) *39. He who makes no mistakes makes nothing.* (जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही.) *40. The pen is mightier than sword.* (लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.) *41. He who moves not forward goes backward.* (जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.) *42. If you act to be happy, you will be happy.* (जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.) *43. A positive attitude can overcome a negative situation.* (सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते.) *44. The roots of education are bitter but the fruit is sweet.* (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.) *45. Hard times are the moments of reflection.* (कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.) *46. Your best teacher is your last mistake.* (तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.) *47. I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand.* (मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहले, मी करून पाहले आणी मला समजले.) *48. Every success has a trails of failure behind it.* (प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.) *49. Be concern with action only not with its result.* (आपले कार्य करत रहा त्याच्या फळाचा विचार करू नका.) *50. Every day may not be good but there is something in every day.* (प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.) *51. The only time you fail is when you fall down and stay there.* (तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थाबता.) *52. Hope is the affirmation of positive thought.* (आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.) *53. The life without goal is life without meaning.* (ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.) *54. It's not how long, but how well, we live.* (किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.) *55. The darkest hour is before the dawn.* (कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पुर्विची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.) *56. The brave die once, cowards many times.* (शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.) *57. The great artist is simplifier.* (महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.) *58. It is not work that kills but worry.* (कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.) *59. None but the brave deserves the fair.* (शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.) *60. Desire is the very essence of man.* (अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.) *61. Hearing brings wisdom, speaking repentance.* (ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.) *62. Prayer is the voice of faith.* (प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे./प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आवाज.) *63. Whatever you cannot understand, you cannot possess.* (जो आप समझ नहीं सकते, वो आप कभी हासिल नहीं कर सकते.) *64. United we stand, divided we fall.* (एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.) *65. Character is simply a habit long continued.* (तुमच्या दीर्घ/चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.) *66. True wealth is celebrating the present moment.* (आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे./आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.) *67. Imperfect action is better than perfect inaction.* (परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.) *68. Instead of cursing the darkness, be the one to light a candle.* (परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.) *69. Happines is found in your heart, not in your circumstances.* (आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.) *70. You only lose when you give up.* (तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.) संकलित
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/10/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३२: भारतीय वायुसेनेची स्थापना. २00५:पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीव्र भूकंप. २0१३:ज्येष्ठ पत्रकार ज्योतर्मय डे यांच्या हत्येचा आरोप असलेल्या पॉलसन जोसेफला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला 💥 जन्म :- १९२६ हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित उर्फ राजकुमार १९३५ फ्लाईंग सिख मिल्खा सिंग 💥 मृत्यू :- १९८२: कॅनडाचे नोबेल शांतता पुरस्कार विजेते फिलिप नोएल-बेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद ताजिकिस्तानला पोहोचले; तीन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागरी संरक्षण संचालनालयातील १०९ पदांना मुदतवाढ; पाच महिन्यांसाठी गृहविभागाचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींची संमती, राज्याच्या गृहविभागाने तातडीने तशी अधिसूचना केली जारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित! ; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *इंडोनेशियातील त्सुनामी आणि भूकंपात पाच हजार लोक बेपत्ता ; मदतकार्य मंदगतीने सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारावरील उपचारांसाठी राज्यातील ९0 टक्के नागरिकांना आरोग्य कवच उपलब्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणाविस यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या युवा खेळाडूंनीही जिंकला युवा आशिया चषक, अंतिम सामन्यावर भारताचं निर्विवाद वर्चस्व; श्रीलंकेचा 144 धावांनी धुव्वा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित *आपली माणसं* विषयी गीता देव्हारे यांचा लेख जरूर वाचावे http://epaper.ejanshakti.com/m5/1846778/Pune-Janshakti/08-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अभिनेता राजकुमार* डॉयलॉगचे बेताज बादशहा अभिनेते राजकुमार यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी बलुचिस्तानात झाला. त्यांचे मुळ नाव कुलभूषण पंडीत होते. इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन कुलभूषण यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. दोन चित्रपटानंतर त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. महबूब खान यांच्या १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकर्याच्या भूमिकेत दिसले. या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. यानंतर त्यांची यशस्वी कारकिर्द सुरू झाली. दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनयसम्राटाच्या पदावर पोहचवले. काजल चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता ठरले. वक्त चित्रपटातील ह्यचिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते तसेच ह्यचिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) थर्मास फ्लाक्सचा शोध कोणी लावला ?* जेम्स देवार *२) व्हिएतनाममध्ये कोणती खनिजे सापडतात ?* लोह, कोळसा *३) ग्रनीचवरून जाणार्या काल्पनिक रेखावृत्ताला काय म्हणतात ?* मूळ रेखावृत्त *४) थायलंडमधील नद्या कोणत्या ?* मेकाज, चाओ, प्याहा, मेनाम मुन *५) डमी, नो ट्रम्प, ग्रँड स्लॅम, रिव्होक, रफ या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?* ब्रिज *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● साईनाथ पोतलोड, धर्माबाद ● जगदीश पाटील कळसकर ● कैलास बगाले ● गणेश पेंडकर, येवती ● अमोल सिंगनवाड ● बळीराम शिवाजी खांडरे ● शांतीलाल कुमावत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *नाद* हल्ली आपलीच आपण पाठ थोपटून घेतात थोपटून घेण्याच्या नादात स्वतःच चेपटून घेतात आपली आपण थोपटताना चेपटली तर जाणार शेवटी व्हायचा तो उलट परिणाम होणार शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य. उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.* *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !* *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 34* पहुचेंगे तब कहेंगे, उमडेंगे उस ट्ठाई | अझू बेरा समंड मे, बोली बिगूचे काई || अर्थ अर्धवट ज्ञान असणार्यांनी पांडित्य करू नये. नावेतून प्रवास करीत असताना जेव्हा पैलतीरी जाईन तेव्हाच प्रवास व प्रवास मार्गाविषयी बोलावे. समुद्राच्या लाटामधून नौका दोलायमान अवस्थेत मार्गक्रमण करित असताना समुद्रप्रवासाचा थरार अनुवयाला येतोय . प्रवासही पूर्ण झालेला नाही अशा वेळी त्याबद्दल निश्चित काय सांगता येणार आहे ! पूर्ण अनुभूतीशिवाय कसं बोलायचं. विना अनुभवाची ती निरर्थक बडबड असणार आहे. अशा प्रसंगी तोंडघशी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे महात्मा कबीर पटवून देतात. बरेच जण वासरात लंगडी गाय शहाणी म्हटल्या प्रमाणे समोरच्यांचा अंदाज नसताना नको तीच चुकीची माहिती पुरवून जातात. ऐकणारे सर्वजण अज्ञानी किवा अर्धकच्चे असतातच असे नाही. श्रोत्यातील खूप जण चिंतन मनन करणारे असतात. चला आपल्याला संबंधित विषयावर आणखी काही नवीन ऐकता येईल या हेतूनेही आलेले असतात. अशावेळी जर वक्त्याने चुकीचे संदर्भ किवा माहिती पुरवली तर... उदभवणार्या प्रसंगाची कल्पनाच करायला नको. मध्येच श्रोत्याने चुकीचा संदर्भ खोडला तर वक्त्याची त्रेधातिरपीट उडून हसे होते. म्हणून परिपूर्ण माहिती व आत्मविश्वासाशिवाय गंंभीर व संवेदनशील विषयावर बोलू नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात आनंदाने आणि समाधानाने जगायचे असेल तर जीवनातल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन तोंड दिलेच पाहिजे, जिद्दीने लढायला शिकलेच पाहिजे, समोर कोणतेही असलेले आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवायला शिकले पाहिजे, अपयश आले तरी स्वत:तला आत्मविश्वास ढळू न देता तितक्याच ताकदीने उभे राहायला शिकले पाहिजे. कोण काय म्हणतीय याचा विचार करण्यापेक्षा आपण किती प्रामाणिक प्रयत्न करुन यश मिळवता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. तरच आपण आपल्या जीवनात नवे चैतन्य, नवा जोश अधिक कार्यक्षम होऊन आत्मसन्मानाने जगण्याची दिशा आपोआपच मिळेल. जर का आपणच जगण्यातला विश्वास कमी केला तर मग आपणच आपल्या जीवनात हार खाल्ली आहे असे समजावे. आपल्यापेक्षा इतरांच्या जगण्याकडे पहा आणि ठरवा. त्यांच्या जगण्यामध्ये किती यश अपयशाला तोंड देत संघर्ष करत असतात तरीही त्यात समाधान मानून पुढे पुढे जात असतात मग आपण तर त्यांच्यापेक्षा किती सक्षम आहोत हा विचार सदैव जागृत ठेवावा आणि चांगले जीवन जगण्यासाठी सतत क्रियाशील रहावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कार्यक्षम - Efficient* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मदतीचा हात* *जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.* *ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये."* *त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते की,"या जळालेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा माझे नाव 'आग* *लावणाऱ्यां'त नव्हे, तर 'आग विझणाऱ्यां'त येईल.".* *माणसे जोडणे हाच आमचा धर्म,काम छोटे असो वा मोठे कामाचा हेतु ,मर्म चांगले असणे महत्त्वाचे आहे.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰 मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या श्रद्धा , भावना ह्या जीवनाचा आधार आहे.जीवनात श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे.एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर जेव्हा आपला विश्वास असतो, तेव्हा त्याला विश्वासाची श्रद्धा संबोधली जाते. आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनाला दातृत्वाचं अंग असाव, सेवेचं भान ,ज्ञानाच ककंण, सामर्थ्याचा कवच, त्यागाच बळ, सौजन्याच अधिष्ठान आणि *सत्याचा आधार असावा.* आपल्या जीवनातला *मी पण जेव्हा नाहीसा* होईल, आपला अहंकार जेव्हा नष्ट होईल, आपल्यातील लोभ आणि मोहाचा डोंगर कोसळून पडेल, अज्ञानाचा अंधार निघून जाईल तेव्हा आपले जीवन खरे सार्थकी लागले म्हणावे लागेल. मनुष्याच्या श्रद्धेला पुराव्याची गरज नाही.चांगल्या कर्माची, भलेपणाची , मांगल्याची विश्वास ठेवण्याची वृत्ती त्याने जोपासली पाहिजे.नव्हे ती वृत्ती त्याच्याकडे असतेच परंतु त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. 🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* प्रमिलाताई सेनकुडे 🙏🏻🙏🏻 ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/10/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८६४ - कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी १९१० - पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले 💥 जन्म :- १८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक १९३२ - माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९१ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक. १९९२ - परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी. २०११ - स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्स चे सहसंस्थापक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - रोहिंग्याना माघारी धाडण्याविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्य न्यायालयाने फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्र सरकारने पेट्रोलचे दर अडीच रुपयांनी कमी करण्याचा घेतला निर्णय मात्र, डिझेलचे दर जैसे थे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा बँक व्यवस्थापनाने स्वीकारला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली : राफेल प्रकरणी चौकशी करा; माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, यशवंत सिन्हांसह वकील प्रशांत भूषण यांची CBI कडे मागणी, तिघांनी सीबीआयचे संचालक अलोक वर्मांची घेतली भेट.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *4 ते 8 ऑक्टोबरदरम्यान तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळच्या काही भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *संयुक्त राष्ट्राचे जनरल सेक्रेटरी भारत दौऱ्यावर; अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. वेस्ट इंडीजच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉच्या शतकीय खेळाच्या जोरावर भारत ४ बाद ३६४* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंच, महिलांना न्याय मिळाला का ?* https://www.deshdoot.com/blog-on-shabarimala-temple-supreme-court-issue/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्टीव्ह जॉब्स* स्टीव्ह जॉब्स हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओजचा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचासंचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) सुप्रसिद्ध अजिंक्यताराकिल्ला कोठे आहे ?* सातारा *०२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?* लोणार जि. रायगड *०३) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?* नाईल नदी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● श्रद्धानंद यरमलवाड, येवती ● विष्णू वाघमारे ● बालाजी घोणशेट्टे ● योगेश बोड्डोला, येवती ● काशीनाथ साखरे, वसमत ● भार्गव साईनाथ मुदलोड, येवती ● विशाल फाळके ● किशन पचलिंग, बरबडा ● दीपक रामराव कुलकर्णी ● दिनेश वाडवनकर ● प्रदीप सोमोसे ● साईनाथ पवार ● सुभाष लोखंडे, पांगरी ● रविकांत ढोले ● पाशा शेख ● आकाश जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे विनाशाचे द्वार आहेत जेवढे वाढतील तेवढे डोक्यावर भार आहेत काम क्रोध लोभाने डोक्यावर भार होतो अती झाले म्हणजे केवढाही गार होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 32* *जा कारनी मे ढूँढती* *सन्मुख मिलिया आई |* *धन मैली पीव ऊजला* *लागी ना सकौ पाई ||* अर्थ माणूस सुखाच्या शोधात असतो. प्रत्येकाच्या सुखाच्या धारणा वेगळ्या आहेत. धन, संपत्ती श्रीमंतीत सुख शोधणार्यांची संख्या लक्षणीय आहे. गरजेपुरती धन संपत्ती कमावलीच पाहिजे. चरितार्थ व्यवस्थित झाला तरच मानसाला सांस्कृतिक भूक लागते. मात्र संपत्ती संंपत्तीचा साठा संचय करून ठेवण्यात स्वतःचंच बाहुलं करून घेवून नये. महात्मा कबीर म्हणतात , 'साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय । मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥' माणूस धन संपत्तीच्या शोधात श्रीमंत होण्याच्या वेडात भटकताना हाती असणारे आनंदाचे क्षणही गमावून बसतो. शाश्वत सत्य व विवेकी विचारानं वागून खर्या ईश्वराचा व गुरूचा शोध घेता येतो. त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनानं मन तृप्त होत. मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असतो. तो निखळ आनंद देत असतो. मात्र माणूस उगाच संभ्रमात सापडून चाचपडत राहातो. स्वतःला दुःख व उदासीन बनवत असतो. मात्र अशा निखळ आनंददायी क्षणांचा शोध घेत. जीवनातले भ्रम नाहीसे करणार्या संत सज्जनाचे चरणी नतमस्तक व्हायला हवं . मात्र निरर्थक ताठरपणा मुळं ते अवघड होतं. म्हणून तो दूर सारला पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी. ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *डौलदार - Graceful* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निळूचा नाच* 'मिआव मिआव' निळूने जोरात हाक मारली. नदीपलिकडील झाडीतून आवाज आला 'मिआव मिआव!' मग निळूने पंख पसरून कसेबसे उडत पलिकडील तीर गाठले. काठावर बसून थोडावेळ विसावा घेतला. नदीत वाकून पाणी पिता पिता आपला सुंदर पिसारा पाहून तो खूष झाला. निळा, हिरवा, पिवळा, सोनेरी. कुणीतरी रंगांची जणूकाही उधळणच केली होती. मग डौलदार पावले टाकत तो गवतातून पुढे निघाला. वाटेत बिळांतून डोके वर काढत ससू बोलला, 'वा निळू! आज खूप खूप छान दिसतोस हं तू! किती लांबलचक सुरेख पिसारा आहे रे तुझा!' हे ऐकून निळूला खूप बरे वाटले. आणखी थोडा वेळ पुढे जातो न जातो तोच पिलू हरीण भेटले. एक उंचच उंच उडी घेऊन ते निळूपुढे येऊन उभे राहिले. दचकून निळू दोन पावले मागे सरकला. 'अरे निळू ! आज मी तुला ओळखलेच नाही. किती सुंदर पिसारा आहे रे तुझा. जरा फुलवून दाखवतोस कां?' निळूने हळूच पिसारा हलवून बघितला पण तो गोलाकार कसा करायचा हेच मुळी त्याला कळेना. मग लगबगीने पुढे जात निळू बोलला, 'उद्या दाखवीन हं तुला छानसा पंखा करून!' आता हिरवळ संपून झाडेच झाडे दिसू लागली. वर पक्षांचा किलबिलाट चालला होता. एक राघूंचा थवा आरामात फळे खात होता. निळूकडे लक्ष जाताच सगळीजण कौतुक करू लागली. 'काय सुंदर रंगीबेरंगी पिसारा आहे नाही निळूचा' एकजण बोलला, 'निळू जरा थुई थुई नाचून दाखव ना!' निळूने परत एकदा पिसे हालवून बघितली. पण एक पीस जागचे हलेल तर शपथ! इकडे पोपटांचा थवा कलकलत उडाला. अहा रे गंमत! एका पक्षाला मुळी नाचताच येत नाही.' मग निळू पटकन एका फांदीवर चढून बसला. काय केले असता सुंदर नाचता येईल बरे?.... तो मनाशी विचार करू लागला. हळूच एक एक पाऊल उचलून तुरा हलवत तो इकडे तिकडे डुलला. पण अजूनही मनासारखा नाच काही जमेना. मग निळूला भारी वाईट वाटले. कितीतरी वेळ तो उदास बसून राहिला. हा पिसारा नसता तरी बरे झाले असते असाही विचार मनात डोकावला.अचानक ढग दाटून आले आणि रिमझीम पाऊसाची सुरूवात झाली. निळु आनंदाने फांदीवरून खाली उतरला. आपले पंख पसरून नाचू लागला. सगळे पाहू लागले पण निळूचे कुठं लक्ष होते.तो तर आनंदाने भारावून नाचू लागला होता. *तात्पर्यः आपला आनंद आपणच निर्माण करावा.मग आपल्या आनंदात कोणी सहभागी होऊन प्रेरणा देऊ अथवा नाही हा विचार करायचा नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 🌺 *जीवन विचार* 🌺 ➖➖➖➖➖➖➖ *आपल जीवन अनेकदा युध्दक्षेञ बनत असतं.त्यावेळी मनात मोठा संघर्ष चालू असतो.मनात विसंवादाच वादळ सुरू असतं तेव्हा आपल्या मनात सुसंवाद स्थापन करण्याचा प्रवृत्तीस विवेक असं म्हणावं !* smt.senkude pramila *विवेक आपल्या मनाचं सुकाणू आहे तर विचार आपल्या मनाचं शीड आहे.सुकाणू आणि शीड नीट जागेवर राहून काम करत असतील तर समुद्रात इकडं - तिकडं सुरक्षितपणे फिरता येईल नाहीतर क्षणार्धात जलसमाधी मिळेल.विवेक ही मर्यादशील शक्ती आहे.समुद्राला मर्यादा असते.* *मर्यादा ही मनाच्या कुंपणासारखी असते. संयमाचा लगाम हाती असल्यानंतर जीवन अश्व इकडं - तिकडं कसा उधळेल?* *ज्याप्रमाणे फळावरुन झाडाला ओळखतात, सोन्याला कस लावून सोन्याची पारख करतात, आवाजावरुन घंटेची किंमत ठरवतात; त्याप्रमाणे मनुष्याच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकावरुन करतात.माणसाने कधीही चांगल्या विवेकी लोकांची परिक्षा घेण्याचा प्रयत्न करु नये.कारण ते पाऱ्यासारखे असतात.ते मोडत तर नाहीत परंतु ते त्यांचे चांगले काम सोडत नाही.* 〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• 📅 दि. 04/10/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय एकता दिन* *जागतिक प्राणी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५७ - सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले १९५८ - फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना 💥 जन्म :- १९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक 💥 मृत्यू :- १९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक. १९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी. १९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता. २००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत 7 हजार पंपांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली- रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी हजारो शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानात धडकले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथे महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेची स्थापना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ; केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बँक ऑफ महाराष्ट्र 50 शाखा बंद करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 40 टक्के ते 79 टक्के दिव्यांगांना 800 रुपये तर 80 टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधारकार्डचा इतिहास* https://www.deshdoot.com/nashik-news-29-september-adhar-card-day/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *केशवराव भोसले* केशवराव भोसले हे मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील एक अतिशय गुणी नट आणि उत्तम गायक होते. केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९0 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीवार्दाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९0८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सदर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार या नाटकातील केशवरावांची डेविडची भूमिका अविस्मरणीय आहे. संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= चंद्र आणि चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो. - कवी कालिदास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'वेलिंग वॉल' कोठे आहे ?* जेरुसलेम *२) 'एशियन ड्रामा'चे लेखक कोण ?* गुन्नार र्मदाल *३) स्वतंत्र दर्जा असणारे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे राष्ट्र कोणते ?* व्हॅटकिन *४) क्युबाची राजधानी कोणती ?* हवाना *५) फिलीपाईन्समधील प्रमुख नद्या कोणत्या ?* कागायान, पंपांगा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● संगीता भांडवले, उस्मानाबाद ● सुरेंद्र गादेकर, मुखेड ● विजय पळशीकर, नांदेड ● ओमप्रकाश येवतीवाड, धर्माबाद ● लक्ष्मण पंदोरे, कोपरगाव ● साईनाथ पोरडवार, कुंडलवाडी ● नितेश पांचाळ, नांदेड ● बालाजी इप्तेकार, धर्माबाद ● धनराज एच. शेट्टीगर, मुलकी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगंध* चंदनाचा सुगंध लपवल्याने लपत नाही कोण काय करणार ज्याला तो खपत नाही कितीही लपवला तरी सुगंध बाहेर येणारच चांगल्याचा कधी तरी गाजा वाजा होणारच शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 〰 ‼ *विचार धन* ‼ 〰 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 32* *पूत पियारौ पिता कू,* *गोहनी लागो धाई |* *लोभ मिथाई हाथि दे,* *अपन गयो भुलाई ||* अर्थ विधात्याला विसरून चालणार नाही. विश्वाचा हा कल्पनेबाहेरचा अनाकलनीय खटाटोप त्याच्पाकडून चालूच असतो. ठरल्या वेळी. ठरल्या काळी, त्या त्या क्रिया घडवून आणतो. दिवस-रात्र, ऋतू , उष्णता, प्रकाश, हवा आदि बाबीमुळे चराचराचं अस्तित्व आहे. म्हणून आपण आनंदानं जगत असतो. वरील सर्व बाबीप्रति कृतज्ञता म्हणून त्या ( विधाता) निसर्ग चालक शक्तिला आपण वंदन केले पाहिजे. वरील बाब महात्मा कबीर पुढील दृष्टांताद्वारे लक्षात आणून देतात. लहाण मुलाला वडिल प्रिय असतात, तो वडीलांकडे सतत धाव घेत असतो. वडिलांना आजूबाजुला जावू देत नाही. तेव्हा वडिल त्याला मिठाई आदि खावू देवून समजूत काढत असतात. मुलाला आनंदी ठेवतात. बाहेर गेले तरी बाहेरूनही त्याची काळजी घेत असतात. म्हणून माणसानंही केवळ गरजेच्यावेळीच , कठीण समयी विधात्याला न आठवता आनंदाच्या, सुखा-समाधानाच्या काळात निसर्गाला ओरबाडताना त्याला सजवलंही पाहिजे. हे विसरता कामा नये. केवळ नाम जप नाही तर कृती केली पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या अंगी असलेली कोणतीही कला पहिल्यांदा आपल्याला विकसित करावी लागेल आणि ती विकसित केल्याशिवाय जगासमोर सादर करता येत नाही.कारण ज्या कलेमुळे तुम्ही जगातील लोकांचे एक तर मनोरंजन करणार आहात, तुम्ही लोकांना नवे काहीतरी ज्ञान देणार आहात, त्यांच्यातील दडलेल्या सुप्त कलागुणांना जागे करणार आहात, तुम्ही सादर करणा-या कलेमुळे त्यांना प्रोत्साहित करणार आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या तील अंगभूत असणा-या कलाप्रतिभामुळे त्यांच्यावर इतरांपेक्षा वेगळी छाप पाडून आपली वेगळी ओळख निर्माण करुन देणार असल्यामुळे तुम्ही चांगल्या दृष्टीने लोकांच्या चर्चेत अथवा प्रसिध्दीस येणार आहात.याचे सारे श्रेय तुमच्यातील असणा-या कलेमुळेच ना ! तुमच्या अंगी असणारी कोणतीही कलाप्रतिभा असेल तर तिला प्रोत्साहित करा म्हणजे तुम्ही जगासमोर नेहमी आदर्श म्हणून नावलौकिकास पात्र व्हाल आणि ज्यामुळे तुमच्या कलेचे अनुकरण करून तेही चांगल्या समाजनिर्मितीचे कार्य करतील.नाही तर आपल्या अंगी असलेल्या कला प्रतिभेला प्रोत्साहित केले नाही तर आपल्या हातून कोणतेच कार्य होणार नाही याची खंत नेहमीसाठी लागून राहिल.यापेक्षा आपले कोणते दुर्भाग्य असेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣🌅🛣🌅🛣🌅🛣🌅🛣🌅 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रगट - Revealed* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= समाधानी वृत्तीने जगावे एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या. *तात्पर्यः समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.थोडे मिळाले तरी त्यात समाधान मानले पाहिजे.अती हाव कामाची नसते* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. •••••••••••••••••••••••••••••••••••••
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट •••••••••••••••••••*•••••••••••••••••• 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••*••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••••••*•••••••••••••••••• 📅 दि. 03/10/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६७०- शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली १८६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकननेदरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थँक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला 💥 जन्म :- १९०३- समाजसुधारक व शिक्षण तज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ. १९११ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १५९६ - फ्लोरें क्रेस्टियें, फ्रेंच लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *इराकच्या राष्ट्रपतीपदी कुर्दीश मॉडरेट 'बार्हम सालीह' यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- पंतप्रधान मोदींकडून विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय सौर परिषदेचं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *335 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला बाल्टिक समुद्रात भीषण आग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली- किसान क्रांती पदयात्रेतील शेतकऱ्यांचा दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर ठिय्या; शीघ्र कृती दलाचे जवान तैनात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी दिला राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : वस्त्रहरण नाटकात तात्या सरपंच ह्यांची भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता संतोष मयेकरचं तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून होणार सुरूवात, वेस्ट इंडीज 35 वर्षांचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवणार का ?* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= नाशिक येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक देशदूतच्या blog वर प्रकाशित लेख *महात्मा गांधीजी म्हणजे स्फूर्ती* https://www.deshdoot.com/mahatma-gandhi-birth-anniversary-special-blog-nagorao-yevatikar/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *हद्दपार* जुन्या काळातले शिक्षक म्हटलं की बाणेदार पोरांना घडवणारे होते. प्रसंगी त्यासाठी विद्यार्थ्यांना मारझोड करावी लागली तरी त्याला विद्यार्थ्यांचे आईबाप आणि मास्तर दोघांचीही हरकत नसे. याचे उल्लेख साने गुरुजींच्या 'श्यामची आई' मध्ये सुद्धा आलेत. श्री ना पेंडसेंची ' हद्दपार' सुद्धा अशीच एका बाणेदारपणे आयुष्य जगणाऱ्या शिक्षकाची जिवीतकथा असणारी कादंबरी आहे. कोकणातल्या दापोलिजवळच्या दुर्गेश्वर नावाच्या एका छोट्या गावात शिकवणाऱ्या राजे मास्तरांची. स्वातंत्र्य पूर्वकालीन १९३०-४० च्या काळात घडणारी ही कथा सुरू होते ती मोगल काळापासून राजेंचा मुळपुरुष नुसत्या कोयतिनिशी वाघाशी झुंज देतो आणि घराण्याचा उत्कर्ष सुरू होतो तो राजे मास्तरांच्या वडिलांपर्यन्त भाई पाशी येवून थांबतो. मग पुढे मास्तरांचा जन्म झाल्यावर केलेलं भविष्य त्याला झुगारून जगणारे मास्तर, विद्यार्थी घडवण्यासाठी घेतलेले कष्ट, कोकणतल्या परंपरा, गावात विशेषतः पालखीच्या मानावरून होणारी आणि आयुष्य भर पुरणारी भांडणं यांचं सुरेख वर्णन श्री नां नि 'हद्दपार' मध्ये केलंय. 'हद्दपार' ही त्यांच्या सुरवातीच्या कादंबर्यापैकी एक होती त्यामुळे यात कोकणच्या निसर्गाचं वर्णन मुक्तहस्ते चितारले आहे. कादंबरीची पार्श्वभूमी जरी कोकणची असली, तरी त्यातल्या पात्रांच्या रोजच्या जगण्यात येणारे शब्द बोलण्याची पद्धत मात्र कोकणी न रहाता मराठी आहेत. त्यामुळे थोडंस चुकल्यासारखे वाटते एवढंच काय या कादंबरीत खुसपट काढता येईल. अन्यथा वाचणाऱ्याला बांधून ठेवणारी अत्यंत कसदार अशी कादंबरी म्हणून 'हद्दपार' चा उल्लेख निःसंशय पणे करता येईल. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर कोण होते?* 👉 वर्धमान महावीर *२) वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?* 👉 कुंडलपूर *३) वर्धमान महावीर यांचा जन्म कधी झाला?* 👉 इ. स. पू. ५९९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर ● पूर्वा श्यामसुंदर माडेवार, नांदेड ● नागेश क्यातमवार, परभणी ● विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद ● संदीप कडलग, अहमदनगर ● साईनाथ राचेवाड, बिलोली ● पांडुरंग यलमलवाड, उमरी ● नागनाथ लाड, कुंडलवाडी ● शिवाजी पांडुरंग मुटकुले ● दत्तप्रसाद ढगे, धर्माबाद ● शंकर पाटील डांगे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बापू* सत्य अहिंसेचा आम्हाला तुम्ही दाखवला मार्ग तुमच्या मार्गाने चालल्यास इथेच निर्माण होईल स्वर्ग तुम्ही सांगितलेले सत्य लोक फक्त बोलतात तुमच्या मार्गाने आज खरोखर किती चालतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 31* *साधु शब्द समुद्र है,* *जामे रत्न भराय |* *मंद भाग मुट्ठी भरे,* *कंकर हाथ लगाये ||* अर्थ सज्जन समुद्रासारखे अथांग असतात. समुद्राच्या घोंगावणार्या लाटा , पाणी खारट असलं तरी त्याची खोली अथांग असते. त्याचा तळ काढणे इतके का सोपे असते ! लोकोपयोगी असंख्य बाबी समुद्रातून मिळत असतात. संत वचन कडवट असलं तरी ते सत्य व वास्तवाचं भान करून देणारं असतं. समाजाला दिशादर्शन करून योग्य मार्गानं जाण्याची ते शिकवण देत असतात. संत कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा संयम ढळू देत नाहीत. विपरित समयी माणसानं विचार व विवेकापासून दूर न जाण्याचा सल्ला ते देत असतात. त्यांच्या ठायी दयाभाव व करूणा ओतप्रोत भरलेली असते. याउलट सामान्य व्यक्तीच्या ठायी चंचल प्रवृत्ती असते. जगण्याचा निखळ आनंद देणार्या गोष्टीपेक्षा लालचावणार्या बाबींच त्याला अधिक आकर्षक वाटू लागतात. तो विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्वच गोष्टींच्या मागं ऊर फुटेस्तोवर धावत राहतो. समुद्रकिनार्यावर पांढर्या शुभ्र दिसणार्या कणांनाच मोती समजून उचलावे तर ते सर्व रेतीचेच फसवे कण हाती यावेत. असा हा प्रकार आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही खोटे बोलून जग जिंकत असाल तर ते चुकीचे आहे.तुम्हाला असेही वाटत असेल की, लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपली वाहवा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.पण काहीजण करतीलही ते त्यांना माहित नसेल तिथपर्यंत जर का त्यांना जेव्हा समजेल की, तुम्ही खोटे बोलून स्वत:ची स्तुती करुन घेत आहात तेव्हा मात्र सारे लोक तुमच्यापासून दूर पळायला लागतील. सांगण्याचा तात्पर्य असा की, खोटं बोलून जग जिंकता येत नाही तर खरे बोलून जिंकता येते आणि तेही त्यांच्या हृदयावर आपले शेवटच्या क्षणापर्यंत राज्य करता येईल.म्हणून माणसाने सदैव खरेच बोलावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. ☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्ग - Nature* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्गाचे देणे* मिता कोकणातल्या छोटया खेड्यात रहायची. तिचे गाव शांत, सुंदर आणि समुद्राकाठी वसलेले होते. तिचे बाबा मासळी विकायचे आणि आई घरी पापड, लोणची करुन विकायची. ह्यावर त्यांच्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालत असे. रोज सकाळी पहाटे उठून मिताही त्यांच्या बरोबर समुद्र किनारी जात असे. तिला सकाळच्या उन्हात चमकणारी समुद्राची वाळू खूप आवडत असे. वाळूत ती अनेक प्रकारची नक्षी काढत असे. समुद्रातले अनेक रंगी मासेही तिला खूप आवडत असत. तिचे बाबा मासे पकडत तेंव्हा जाळ्यात अडकलेल्या माश्यांची तडफड तिला अस्वस्थ करुन जात असे. तिने एक दिवस तिच्या बाबांना विचारले," बाबा, आपल्या सारखेच सगळ्यांनी रोजच मासे पकडले तर समुद्रातले मासे एक दिवस संपून जातील? मग सगळ्यांनी बाजारात जाऊन विकायचे काय आणि खायचे काय?" मिताच्या ह्या प्रश्नावर आई-बाबा दोघांनाही हसू आले. त्या दिवशी रात्री मिताच्या आईला अस्वस्थ करणारे स्वप्न पडले. तिने स्वप्नात पाहिले की समुद्रातले सगळे मासेच संपून गेले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणेच कठीण झाले आहे. आईने मिताच्या बाबांनाही हे स्वप्न सांगितले. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे समुद्रावर जाण्याची तयारी झाली. मिताने बघितले की तिच्या आईने मासे ठेवण्याच्या नेहमीच्या टोपलीपेक्षा आकाराने लहान टोपली घेतली होती. तिला काही कळले नाही पण न विचारताच ती शाळेत गेली. आल्यावर मिताने बघितले तर तिचे बाबा नारळाच्या झावळ्या करत होते. आई पापड करण्यात गुंग होती. आज दोघेही जण मासळी बाजारातून लवकर घरी आले होते. मिताने त्याबद्दल विचारताच आई म्हणाली," मिता तुझ्या प्रश्नाने आम्हाला विचार करायला भाग पाडले आहे. आजपासून आम्ही ठरवले आहे की आवश्यकते नुसारच आपल्याला जितके मासे हवेत तितके मासे घ्यायचे. अधिक घेण्याचा हव्यास करायचा नाही. त्यामुळे आपला खर्च भागविण्यासाठी आम्ही इतरही उद्योग करायचे ठरविले आहे.निसर्गाची हानी अजिबात होऊ देणार नाही ."आईचे बोलणे ऐकून मिताला अत्यानंद झाला तिने आईला आनंदाने मिठी मारली." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. •••••••••••••••••••••••••••••••••••••
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ••••••••••••••••••*••••••••••••••••••• 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••*••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••••••••*•••••••••••••••• 📅 दि. 02/10/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती* 💥 ठळक घडामोडी :- २००६ - निकेल माइन्स, पेनसिल्व्हेनियामध्ये चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली. 💥 जन्म :- १८६९ - महात्मा गांधी. १९०४ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान. १९३० - जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३९ - बुधि कुंदरन, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५० - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री. १९७१ - कौशल इनामदार, भारतीय संगीतकार 💥 मृत्यू :- १९७५ - कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ * शिर्डी-दिल्ली विमानसेवेला सुरुवात, मुंबई, हैदराबाद पाठोपाठ स्पाईसजेटकडून दिल्ली विमानसेवा सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यंदाचे मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना जाहीर, कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चंद्रपूर : प्रदुषणाच्या कारणावरून चंद्रपूर एमआयडीसीतील तीन उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली उत्पादन बंदची नोटीस.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *लोकांच्या भूतकाळावरुन नव्हे, तर कृतीवरुन त्यांची पारख करतो- मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *SBI च्या एटीएममधून रोकड काढण्यावर मर्यादा, आता दिवसाला फक्त 20 हजार रुपयेच काढता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मोहम्मद मुश्ताक अहमद हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई - दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= महात्मा गांधीजी यांची जयंती त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *महात्मा गांधी म्हणजे स्फूर्ती* http://epaper.ejanshakti.com/m5/1838811/Pune-Janshakti/02-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लालबहादूर शास्त्री* २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले. वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले महात्मा गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अॅक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे ते 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' असे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय आणि मैत्री झाली. पंडीत नेहरू, आणि शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली पं. नेहरूनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७ मे १९६४ ला पंडीत नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री हे एकमताने भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. - महात्मा गांधीजी* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ?* लालबहादूर शास्त्री *०२) लालबहादूर शास्त्री यांना बालपणी कोणत्या नावाने हाक मारीत ?* नन्हे *०३)लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला कोणता नारा दिला ?* जय जवान, जय किसान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● कनिष्क सोनाळे, नांदेड ● राजू म्याकलवार, वसमत ● मधुकर उन्हाळे, शिक्षक नेते, नांदेड ● सुधाकर पाटील आवरे, लातूर ● प्रल्हाद पिटलेवाड, भोकर ● गंगाधर रामटक्के, बिलोली ● गजानन काशेटवार, देगलूर ● दत्ता यडपलवार, जारीकोट *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सामर्थ्य* सहकार्यामुळे चांगले काम करता येते सहकार्याने मोठे काम हाती धरता येते सहकार्याने कोणतेही कठीण काम सोपे होते मदतीच्या सामर्थाने कठीण काम तडीस जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 30* *तेरा बैरी कोइ नहीं,* *जो मन शीतल होय ।* *तु आपा को डारि दे,* *दया करै सब कोय ।।* महात्मा कबीर सांगतात की मित्र व शत्रू मानवी मनाच्या भावनेतून निर्माण होत असतात. जर मनाला शांत , शितल व पवित्र ठेवले तर आपले शत्रू निर्माण होणार नाहीत. मनाच्या ठायी षड् विकार उत्पन्न होत असतात. ध्यान मनन व चिंतनाद्वारे या विकारांना दूर सारता येते. संवेदनशीलता व दयाभाव ज्याच्या ठायी असतो त्याला इत्तरांच्या वेदनेवर सहज फुंकर घालता येते. दुसर्यांच्या वेदनेला संवेदनेची जोड देता आली तर सर्वांना आपलेसे करून घेता येते. सर्वजण वैरभाव सोडून आपले मित्र बणून जातात. तथागतांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून दिला. वैर्याला प्रेमानं जिंकून युद्धातून होणारा विध्वंस व विनाश टाळता येतो. हे पटवून दिले. हा कल्याणकारी मार्ग ज्यांनी अवलंबिला. ती राज्ये लोक कल्याणकारी ठरली. इतिहासाच्या पानावर त्यांची नोंद भरभराटीचा सुवर्णकाळ म्हणून केली गेली आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा न ठेवा,कुणाचे ऐका किंवा ऐकूही नका,कुणी काहीतरी म्हटलं म्हणून तुम्ही करु नका.त्यांच्या बोलण्यावर तुम्ही काही अंशी खरेही माना परंतु तुमचा खरा विश्वास तुमच्या कर्तृत्वावर आहे ना ? याचा थोडा एकटेपणामध्ये विचार करा म्हणजे तुम्हाला खरे कळेल.पण त्याहीपेक्षा जर तुमच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास असेल तर बाकीच्यांच्या गोष्टी मनावर कधीच घ्यायच्या नाहीत.पण तुमचाच तुमच्या कर्तृत्वावरचा विश्वास थोडाजरी ढळला गेला तरी,तुमच्या जीवनातले सारे जगण्याचे चित्रच बदलून जाते आणि आपण दुस-याच्या हातातले बाहुले बनतो.त्यापेक्षा आपण आपले कर्तृत्व प्रामाणिकपणे करावे आणि तेही आत्मविश्वासाने करावे.असे जर तत्व आपल्या जीवनात अंगीकारले तर आपले जीवन अधिक सुखी व समृद्ध होऊ शकेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्तृत्व - Credentials* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बेचारा_अतृप्त_आत्मा* * एक बार गुरु रामानंद ने कबीर से कहा कि हे कबीर! आज श्राद्ध का दिन है और पितरो के लिये खीर बनानी है. आप जाइये, पितरो की खीर के लिये दूध ले आइये.... कबीर उस समय 9 वर्ष के ही थे.. कबीर दूध का बरतन लेकर चल पडे.....चलते चलते आगे एक गाय मरी हुई पडी मिली....कबीर ने आस पास से घास को उखाड कर, गाय के पास डाल दिया और वही पर बैठ गये...!!! दूध का बरतन भी पास ही रख लिया..... काफी देर हो गयी, कबीर लौटे नहीं, तो गुरु रामानंद ने सोचा.... पितरो को छिकाने का टाइम हो गया है...कबीर अभी तक नही आया....तो रामानंद जी खुद चल पडे दूध लेने. चले जा रहे थे तो आगे देखा कि कबीर एक मरी हुई गाय के पास बरतन रखे बैठे है...!!! गुरु रामानंद बोले, अरे कबीर तू दूध लेने नही गया.? कबीर बोले: स्वामीजी, ये गाय पहले घास खायेगी तभी तो दुध देगी...!!! रामानंद बोले: अरे ये गाय तो मरी हुई है, ये घास कैसे खायेगी?? कबीर बोले: स्वामी जी, ये गाय तो आज मरी है....जब आज मरी गाय घास नही खा सकती...!!! ...तो आपके 100 साल पहले मरे हुए पितर खीर कैसे खायेगे...?? यह सुनते ही रामानन्दजी मौन हो गये..!! उन्हें अपनी भूल का ऐहसास हुआ.! *जिंदा बाप कोई न पुजे* *मरे बाद पुजवाया* *मुठ्ठीभर चावल ले के* *कौवे को बाप बनाया* *----संत कबीर* *भावार्थ:-* *जो जीवित माँ बाप है* *उनकी सेवा करो..!!* *वही सच्चा श्राद्ध है.!!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. •••••••••••••••••••••••••••••••••••••
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● 📅 दि. 01/10/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जेष्ठ नागरिक दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १८६९ - ऑस्ट्रियामध्ये पहिल्यांदा पोस्टकार्डचा वापर १९५८ - नासाची स्थापना. 💥 जन्म :- १९१९ - गीतरामायणकार ग.दि. माडगूळकर, मराठी कवी व साहित्यिक 💥 मृत्यू :- १४०४ - पोप बॉनिफेस नववा १९४२ - अँट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्रत्येक भारतीयाला आपल्या सशस्त्र दलांवर आणि सैन्यातील जवानांवर गर्व आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बातमधून जनतेशी संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंडोनेशियातील त्सुनामीत 832 नागरिकांचा मृत्यू, हजारो जण जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *फिजीला 6.6 रिश्टरस्केल तीव्रतेच्या भुकंपाचा धक्का.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेड : संविधान बचाओ, देश बचाओ या मोहिमे अंतर्गत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचे नांदेडला दहन करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जेट एअरवेजच्या विमानात तांत्रिक बिघाड, 96 प्रवाशांसहित इंदूर विमातळावर इमरजन्सी लँडिंग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागपूर : 270 दिव्यांग व्यक्तींना अत्याधुनिक प्रकारच्या कृत्रिम हाताचे नागपुरात नि:शुल्क वाटप करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा, धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला डच्चू तर पृथ्वी शॉ ला मिळाली संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधार झाले पुन्हा निराधार* http://dainikyashwant.com/epaper/edition/323/october/page/4 आधारकार्ड ने बऱ्याच गोष्टी सुरळीत केल्या आहेत. त्याची चर्चा या लेखात केली आहे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्येष्ठ नागरिक* आई-वडिलांना टाकणाऱ्यांना दट्टा जी मुलं वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. त्यांची रवानगी वृद्धश्रमात करतात, अशा मुलांना 'डिफॉल्टर' ठरवून त्यांची नावं ठळकपणे प्रसिद्ध करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ज्येष्ठ नागरिक धोरणाला मंजुरी देण्यात आली. या धोरणात ही बाब अधोरेखीत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एक कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिक असून १ ऑक्टोबर रोजी असलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पदरी अनोखी भेट पडली आहे. ज्येष्ठ नागरिक धोरणाला अपेक्षेप्रमाणे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ६५ वर्ष वा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक या धोरणातील सुविधांसाठी पात्र धरले जाणार आहेत. जात, वंश, पंथ, लिंग, शैक्षणिक किंवा आर्थिक दर्जा यापासून हे धोरण स्वतंत्र असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. वृध्दापकाळामध्ये आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठीच हे धोरण बनवण्यात आले आहे. झोपविले तुम्हास कोरड्या जागी ।. आईच्या त्या प्रेमळ नेत्रांमध्ये , चुकुनही अश्रु आणु नका ।. जिने फुले आच्छादिली होती , क्षणोक्षणी तुमच्या मार्गात ।. त्या मार्गदर्शकाच्या मार्गातील काटे कधी बनु नका! पैसे तर चिकार मिळेल, पण आई-वडील नाही मिळणार ... *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) हरीतक्रांती कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?* १९६५ मध्ये *२) काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो ?* रौलेट ऍक्ट *३) मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?* ग्रीनीच *४) भारतात पहिली वन संशोधन संस्था कुठे स्थापन करण्यात आली ?* देहरादून *५) परम महासंगणकाची निर्मिती कोणी केली ?* विजय भटकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● डॉ. कु. सारीका रमेश शिंदे ( प्रमिलाताई सेनकुडे यांची कन्या ) ● अर्जुन वाकोरे, नांदेड ● विशाल मस्के, साहित्यिक, बीड ● निलेश पंतमवार, नांदेड ● व्यंकट रेड्डी मुडेले ● गोविंदराव इपकलवार, नांदेड ● आनंद पेंडकर, ग्रामसेवक, येवती ● व्यंकटेश काटकर, साहित्यिक, नांदेड ● गजानन काळे, नांदेड ● सुभाष टेकाळे, माहूर ● श्रीकांत भोसके ● माधव शिंदे, सहशिक्षक ● साईनाथ पलीकोंडावार, येवती ● राहुल कुंटोजी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *काकस्पर्श* प्रयत्न करून हल्ली काकस्पर्श होत नाही तेच ते खाऊन त्यांना थोडाही हर्ष होत नाही त्यांनाही वाटतं जरा भेटावं काही नवे नवे जीवंतपणीच पितरांवर नीट लक्ष द्यायला हवे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 29* *संत न बंधे गाठ्दी* *पेट समाता तेई |* *साईं सू सन्मुख रही* *जहा मांगे तह देई ||* अर्थ संत सज्जनांचं एक महत्वाचं लक्षण महात्मा कबीर सांंगतात. सामान्य माणूस हावरटपणा करीत असतो. धन संपती भौतिक बाबींच्या संचयाच्या मागे लागतो. सत्ता आणि पदं ज्यांच्या हाती आहेत. ती बहुतांश मंडळी सत्तेचा दुरूपयोगंच करते.त्यांच्याशी संबंधितांचं विविध प्रकारे शोषण करते. कोणतीही सत्ता स्वतःच्या स्थान बळकटीकरणा इतका प्रजेच्या बळकटी करणाचा विचार करीत नाही. कोणी विरोध केला तर त्यावर डुख धरून वेळोवेळी त्याला अडचणीत आणलं जातं. परिणामस्वरूप प्रजा देशोधडीला लागते. राजा व सेवक मात्र गब्बर होतात. संत सज्जन कधीच संचय करीत नाहीत. मग तो धन संपतीचा असो की कुणाप्रति वाटणार्या चिडीचा असो. त्यांच्या ओटात एक अन पोटात एक नसतेच कधी. सदैव सदाचार अन सद्वर्तनाचाच मार्ग ते चालत असतात. कधीही अविचार करून विवेकाला ते दूर सारत नाहीत. त्यांना भविष्याची चिंता करण्याची गरजंच काय? विवेकातून निरामयतेची भावना वाढीस लागते. सब्ब भवतु कल्याणम ही वृत्तीच जगाचं कल्याण करू शकते. सर्वेत्र् सुखीनः सन्तु निरामय । ही भावना सज्जन, कलावंत व विचारवंताठायीच असते. म्हणूनच त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावसं वाटतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जे स्वप्न तुम्ही पाहिले आहे ते पूर्ण करु शकत असाल तर मग थांबता कशाला ? ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा.काही व्यत्यय आला तरी थांबू नका. जर तुम्ही थांबलात तर तुम्ही पाहिलेले सर्वप्रथम कधी पूर्ण कराल. जिद्द, चिकाटी, मेहनत,सातत्य ह्यामध्ये कधीच माघार घ्यायची नाही.ती तेवढ्याच जोमाने पुढे चालू ठेवावी की, तुम्ही सुरवातीला स्वप्न पाहताना केली होती. मग थांबता कशाला ?लागा तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने....उठा,जागे व्हा आणि स्वप्नपूर्तीच्या मार्गाला लागा. आता माघार घ्यायची नाही असंच ठरवा. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 💐🍃💐🍃💐🍃💐🍃💐🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मेहनत - Hard work* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दृष्टिकोन* एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले. तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले. ’पाणी चवीला कसे लागले ?‘ गुरूंनी विचारले.'खारट', ‘कडु’ असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले. गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, ‘आता या तळयातील पाणी पिऊन पहा.‘ त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता यापाण्याची चव कशी आहे ?‘ ‘ताजी आणि मधुर !‘ शिष्याने सांगितले. ‘आता तुला मिठाची चव लागतेय ?‘ ‘नाही‘. गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात आतात घेतला. ते म्हणाले, ‘आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा खारटपणा, कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आापण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.‘ तात्पर्यः नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●●
*💐भाषिक उपक्रम💐* *उपक्रमाचे नाव - शब्दफुले,शब्दहार(वाक्य)* 🌸🌹🌸🌹🌸🌹🌸 *इयत्ता*-- *पहिली,दुसरी* 🌹चला चला अक्षरे वेचूया शब्दफुले तयार करुया 🌹छान छान हार बनवूया 🌹शब्दांचा हार बनवुया(वाक्ये) 🌹सर्वात जास्त वाक्य तयारा करु या. *🥗साहीत्य*🥗 - शब्द टोपली,अक्षर कार्ड,शब्दकार्ड कृतीः प्रथम शब्द टोपलीतील अक्षरांचे,शब्दांचे कार्ड सर्व विद्यार्थी घेतील.व नंतर त्यांच्या जवळील शब्दात स्वतःला माहीत असणारे शब्द टाकुन वाक्य तयार करून लिहतील. अक्षरांचे शब्द तयार करून लिहितील, सांगतील. *🌸शब्दफुले,शब्दहार🌸* *उपक्रमाचे फायदे* 🌸 शब्दसंग्रह वाढतो. 🌸जोडशब्द वाचण्याचा सराव होतो. 🌸जोडशब्द लिहण्याचा सराव होतो. 🌸 वाचनाची गती वाढते. 🌸जोडशब्दासारखा किल्ष्ट घटक हसत खेळत शिकतात. 🌸आकलन युक्त वाचनाची सवय लागते. शब्द टोपलीत विविध शब्द तसेच , स्वर,व्यंजन ,बाराखडीतील कोणतेही अक्षर आपण घेऊ शकतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷〰〰〰〰〰〰दिनांक २९/०९/२०१८ ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्जीकल स्ट्राइक डे* 💥 ठळक घडामोडी :- २०१० - आधारकार्ड वाटपासाठी प्रारंभ, महाराष्ट्रातून सुरुवात 💥 जन्म :- १९३० - रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- सर्व वयोगटातील महिलांना आता केरळ मधल्या सबरीमाला मंदिरात करता येणार प्रवेश - सर्वोच्च न्यायालय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *परभणी : केंद्र सरकारच्या एफडीआय व ऑनलाइन खरेदी-विक्री धोरणाविरुद्ध अनेक शहरातील बाजारपेठ बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *इंडोनेशियाला 7.5 तीव्रतेचा भूकंप, सुनात्मीचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी लोकसभेतल्या खासदारकीसह पक्षाचा ही दिला राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आधारशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था कोलमडणार; कंपन्यांनी नवा कायदा करण्याची केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आशिया चषकच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर भारताने बांगलादेशवर तीन विकेट्स राखून मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधारकार्डचा इतिहास* http://epaper.ejanshakti.com/m5/1834777/Pune-Janshakti/29-09-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बनगरवाडी* व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी माणदेशच्या परिसरातील धनगरवस्तीच्या पार्श्वभूमीवर घडते. या कादंबरीचा नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर नव्यानेच शिक्षक म्हणून बनगरवाडीत दाखल होतो. नोकरीवर पहिल्यांदाच रुजू होण्यासाठी आलेल्या राजारामाला बालट्यांच्या धमकीशी सामना करावा लागतो. त्यामुळे आपण बरे आणि आपले काम बरे असा हेतू ठेवून तो गावात राहायला लागतो. जेमतेम पन्नासेक घरांची वस्ती असलेल्या या गावात त्याला शाळा सुरु करण्यासाठी कारभार्याची समर्थ साथ मिळते. शाळा नियमित सुरु होते आणि स्वत:च्या नकळत राजाराम गावातल्या लोकांमध्ये आरामात मिसळून जातो. गावात विविध समस्यांच्या सोडवणूकीत त्याला कारभार्याबरोबर मान मिळायला लागतो. संसाराच्या प्रश्नांबरोबरच गावातले इतरही तंटे तो कारभार्याबरोबर सोडवायला लागतो. दर आठवड्याला गावाकडे जाताना लोकांची कामेही तो करायला लागतो. लोकांची लिहून दिलेली पत्रे पोस्टात टाकणे, मनिऑर्डरी करणे अशा प्रकारची तो कामे करतो. मास्तरला काहीच अशक्य नाही असा भोळाभाबडा विश्वासही या गावाकर्यांमध्ये असतो. यामुळेच शेकूसारखा माणूस पेरणीसाठी गावातून कोणाकडून तरी बैल घेउन दे अशीही विनवणी करतो. पण ती मागणी तो पूर्ण करू शकत नाही. शेकूची गरज आपण भागवू न शकल्यामुळे त्याची बायको नांगराला दुसर्या बैलाच्या जागी जुपूंन घेते हे ऐकल्याने मास्तर हताश होतो. ही येडीबागडी धनगरं आपल्यावर किती विश्वास टाकतात याने तो अस्वस्थ होतो. गावात रहायचे तर गावकर्यांना होईल तेवढी मदत करायला हवी. याच हेतूने रामा धनगराचे राणीच्या पैशाची तालुक्याला जाऊन मोड आणण्याच्या परोपकारात त्याला पैसे चोरीला गेल्याने मनस्तापही भोगावा लागलेला आहे. अशी मदत करत असतानाच कारभार्याच्या अंजीने दिलेली चोळी शिवून आणण्याचे कामही मास्तर करतो. ’मास्तर आपलेच आहेत’ त्यांना काम सांगितले तर बिघडले कोठे ?या भुमिकेतून अंजी काम सांगते. मास्तरही गावातल्यांच्या उपयोगी पडायचे या भुमिकेतून तिचे काम करतात. बालट्याला हे माहित होते आणि कारभार्याकडे तो मास्तराची कागाळी करतो. कारभारी मास्तराशी अबोला धरतो. अखेर आठवड्याभराने काराभारी आपल्या मनातील शंका बोलून दाखवतो. आपल्या आतापर्यंतच्या वागणुकीतून कारभार्याला आपल्याबद्दल विश्वास वाटत नाही हे समजल्यावर मास्तराला सात्विक संताप येतो. आपण चांगल्या भावनेने लोकांच्या उपयोगी पडतोय हाच आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटते. आपण बदलीच करून घ्यावी असे त्याला वाटते. पण कारभार्याचे समाधान होते आणि दोघांमधील अबोला दूर होतो. एकीकडे शाळा सुरळीत चालत असतानाच गावात एखादी कायम स्वरूपी वास्तू असावी असा विचार करून मास्तर गावकर्याच्या मदतीने तालीम बांधून घेतो. पंत सरकारांच्या हस्ते तालीमचे उद्घाटन होते. मास्तरमुळेच आपल्या गावात राजा आला आपल्या आयुष्याचे सार्थक झाले याचे कारभार्याला समाधान वाटते. काही दिवसानंतरच कारभा-याचे निधन होते. कारभार्याच्या निधनानंतर गावाचे रूपच पालटते. गावात दुष्काळ पडतो. सारी वस्ती गावातून बाहेर पडते. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन मास्तरची गावातून बदली होते. तो रिकाम्या गावातून बाहेर पडतो. माडगुळकरांनी कादंबरीत या मुख्य कथानकाबरोबर इतर उपकथानकेही रंगवली आहेत. सताचे लांडगा मारणे, जगन्याचे प्रेमप्रकरण, शेकू-अंजीचे प्रेमप्रकरण, आयुब, आनंदा रामोशी यांचे मास्तरांचे प्रेम, तालीम बांधत असतानाच बाळा धनगराचा आडमुठेपणा, बालट्याला झालेली मारहाण अशा अनेक प्रसंगांनी धनगरांच्या विविध स्वभावाचे चित्रण केले आहे. याचबरोबर धनगरांचे खडतर जिवनही यात येते. सुगीच्या काळातले त्यांचे जगणे आणि दुष्काळ पडल्यानंतरची त्यांची झालेली वाताहत कादंबरीत अनुभवायला मिळते त्यामुळे शिक्षक आणि गावकर्यांमधील जिव्हाळा हा अशाच बनगरवाडीसारख्या कादंबर्यांमधून पहायला मिळणार. बनगरवाडीचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या कादंबरीचा १२ भांषांमध्ये अनुवाद झालेला आहे. मध्यंतरी अमोल पालेकरांनी बनगरवाडीवर चित्रपट देखिल काढला होता *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) गोबीचं वाळवंट किती क्षेत्रफळावर पसरलं आहे ?* १,२९५,000 चौ.कि.मी. *२) बहिष्कृत हितकारिणी सभेचं स्थापना वर्ष कोणतं ?* १९२४ *३) चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला होता ?* डॉ. धनंजयराव गाडगीळ *४) 'ओआयएल'चे विस्तारित रूप काय ?* ऑईल इंडिया लिमिटेड *५) 'हरारे' हे कोणत्या देशातील एक प्रमुख शहर आहे ?* झिम्बाब्वे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● प्रथमेश नागोराव येवतीकर ● सतीश चव्हाण ● मनीष साबळे ● शिवाजी मुपडे ● महेश गायकवाड ● नीलम येसमोड ● राजेश सामला ● संदेश जाधव ● महेश राखेवार, नांदेड ● गणेश पेटेकर, धर्माबाद ● मारोती वाघमारे ● अजय मिसाळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अनर्थ* उसवलं की लगेच शिवता आलं पाहिजे पांगत चाललेलं दो-यात ओवता आलं पाहिजे थोडं फाटल की लगेच पटकन टाका घालावा भविष्यातला अनर्थ सहजा सहज टाळावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 28* *गुरु सामान दाता नहीं* *याचक सीश सामान |* *तीन लोक की सम्पदा* *सो गुरु दीन्ही दान ||* अर्थ गुरूसारखा दानशूर त्रीखंडात कोणीही नाही. सर्व दात्यांचे काहीतरी उद्देश असू शकतात. मात्र ज्ञानदान करताना सर्व विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा पवित्र उद्देश गुरूच्या ठायी असतो. म्हणूनच दातृत्त्वाची श्रीमंती त्यांच्याइतकी कुणाजवळही नसते. शिष्यासारखा (विद्यार्थी) याचकही जगात कोणीच असू शकत नाही. गुरूने कितीही ज्ञानदान दिले तरी खर्या विद्यार्थ्याची ज्ञानतृप्ती होणे अशक्य असते. एक लोक प्रत्यक्ष जगता येतो व दोन लोक काल्पनिक असले तरी त्यांच्यातला विहार असो की तिथली जीवनकल्पना , पुरान, कुरान , वेदाचे तत्वज्ञानावरची चिकित्सा असो. रूढी, परंपरा ,श्रद्धा, ज्ञान विज्ञानाकडे विवेकाने पाहाण्याची दिव्य दृष्टी गुरूच देत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चित्रातले रंग आपल्या कल्पकतेने भरुन चित्र चांगले काढता येते, पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे, कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही. जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रम लागतात, त्याचबरोबर कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचाही प्रसंगानुरूप विचार करावा लागतो. कधीकधी घाई केली तर रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमी जास्त झाले तर रंग बेरंगही होऊन जातात. सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढता आले पाहिजे. नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाते. जीवन सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान ज्यांना अवगत आहे आणि ते ज्यांना साध्य करता येते तोच आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनू शकतो, हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अविश्वास - Unbelief* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म म्हणजे काय ?* एकदा एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता. फिरत फिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलाऊन म्हणाला, कां कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला ओळखतपण नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे वाटते आहे. प्रधान बुचकळ्यात पडला तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला. प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले व तो राजामागे निघाला. दुस-या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदाराशिवाय कोणीच नव्हते. आजुबाजुला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. तो दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता. चौकशी करता कळले की लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात. रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला ब-याचवेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. माल विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील. प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-याला फाशी कां द्यावे वाटले याचा उलगडा झाला. व्यापा-याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंगलहरीनी दुषीत वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते. त्याने त्या दुकानदाराकडे थोडी चंदन खरेदी केली. दुकानदाराला ब-याच दिवसांनी गि-हाईक मिळाल्याने आनंद झाला. प्रधान निघाला आणि राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला. त्याने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन ? प्रधानाने त्या व्यापा-याचे नांव सांगितले. राजा म्हणाला, अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले ! त्या व्यापा-याला कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला. राजा अध्ये मध्ये इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करु लागला. राजाच्या खरेदीने आनंदित व्यापा-याच्या मनात आता राजा मरावा हे येईनासे झाले. चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो मित्र झाला. आपल्या मनात इतरां विषयी चांगले विचार, दयाळुपणा आणला तर इतरांच्या मनातुनही चांगले विचार चांगल्या भावना आपल्यापर्यन्त येतील व आपला उत्कर्ष होईल. मग कर्म म्हणजे काय ? अनेकजण म्हणाले, आपले शब्द, आपली कृती, आपली भावना...पण खरे हेच आहे की, आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय !!! सुडाची भावना, राग आणि अहंकार युक्त भावना त्यागून क्षमाशील राहण्यात जीवनाचे खरे मर्म आहे.. अन्यथा ते न संपनारे दुष्टचक्र आहे. खूप प्रश्न सोडून दिल्याने सुटून जातात।। तेव्हा सहकार्याची भावना आणि करुणामय मन ठेवा.. आनंदी जीवन जगा...। *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने पोलंडचीराजधानी वॉर्सॉ काबीज केली. 💥 जन्म :- १९२९ - भारताची गानकोकिळा लता मंगेशकर 💥 मृत्यू :- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- अयोध्या प्रकरणावर 29 ऑक्टोबरपासून सुनावणी घेण्याच्या निर्णयाचं आरएसएसनं केलं स्वागत* --------------------------------------------------- 2⃣ *राज्यातही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करण्याचे आदेश. शिवसेनेच्या विरोधानंतरही सरकारचा निर्णय. २९ सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करणार.* --------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही, फ्रिजसह 19 ऐशोरामाच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात केली वाढ, यामुळे परदेशातून भारतात आयात होणाऱ्या वस्तू होणार आणखी महाग* --------------------------------------------------- 4⃣ *स्वच्छ भारत अभियान 2018 च्या स्पर्धेत सातारा देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार गौरव* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विनय गव्हाळे एसीबीच्या जाळ्यात.* --------------------------------------------------- 6⃣ *ख्यातनाम सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन* --------------------------------------------------- 7⃣ *आज होणाऱ्या आशिया चषकातील अंतिम क्रिकेट सामन्यात बांगलादेशपेक्षा भारताचेच पारडे जड* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक देशदूत या प्रसिद्ध दैनिकात प्रकाशितलेख *" रांगाच रांगा "* https://www.deshdoot.com/special-blog-on-discipline-of-line-nagorao-yevatikar-nanded-latest-update/ वरील लेख वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता महाजन* कविता महाजन यांचा जन्म नांदेड मध्ये 05 सप्टेंबर 1967 रोजी झाला. त्या मराठी लेखिका, कवयित्री होत्या. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयाच्या एम.ए. होत्या. त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार ● सन 2008 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार ● कवयित्री बहिणाई पुरस्कार ● साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला) ● मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी. अशा या महान साहित्यिक लेखिकेचे आज पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?* अनंत *०२) भारतातील सर्वात मोठे थरचे वाळवंट कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान *०३) जगामध्ये एकूण किती खंड आहेत ?* सात *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● अरुण जांभळे ● सचिन बावणे ● साईनाथ कानगुलवार ● दिनेश घाटोळ ● सोमनाथ एकांडे ● प्रवीण चव्हाण ● ब्रम्हशंकर म्हात्रे ● अमोल घाटेकर ● विजय मुंडे ● विनोद नागटिळक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वच्छता* नको तिथे काही कचरा करतात केलेला कचरा काही आनंदाने भरतात कचरा करणाराला नसते काही लाज लज्जा शरम अस्वच्छता झाली म्हणून इतरांवर होतात गरम शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 27* *कुमति कीच चेला भरा* *गुरु ज्ञान जल होय |* *जनम जनम का मोर्चा* *पल में दारे धोय ||* अर्थ महात्मा कबीर मनुष्य जीवनात गुरूचे महत्त्व पटवून देतात. गुरूशिवाय शिष्य अविचाराने भरलेला जणु चिखलाने माखलेला कुंभ आहे. गुरूकडून मिळणारा उपदेश म्हणजे पाण्याचा वाहता झराच ! गुरूकडून मिळणार्या ज्ञानामुळे वर्षानुवर्षाचा जड मतीवर चढलेला मळ खळखळत्या ज्ञानरूपी पाण्यात क्षणार्धात धुवून निघत असतो. वाल्या व अंगुलीमाल पोटाच्या आगीसाठी म्हणजे कुटूंबाच्या निर्वहनासाठी लोकांना लुटण्याचा व्यवसाय करायचे. वाल्याच्या जीवनात मुनी नारदांचा उपदेश म्हणजे त्याच्या डोळ्यात घातलेलं अंजनंच ! सखोल चिंतनातून जगावर गारूड करणारं महाकाव्यंच देवून वाल्याचा वाल्मिकी होतो. दुसरीकडे लोकांना हिंसेच्या जोरावर लुटून पोट भरणारा , सगळीकडे स्वतःच्या नावाच्या दहशतीचा दरारा निर्माण करणारा अंगुलीमाल कारूण्यमयी तथागतांच्या सान्निध्यात येतो. त्यांच्या नेत्रातून वाहणारं कारूण्य व जीवनाच्या अलौकिक चिंतनाचं तेज , जग कसंही वागत असलं तरी स्वतःच्या तटस्थ व निर्विकार वृत्तीच्या तेजात अंगुलीमालाचं अज्ञान गडप होवून आजन्म अहिंसेचा अनुयायी होणं. ही गुरूंच्या कृपाशीर्वादाची अलौकिक उदाहरणे आहेत. एवढ्या महान विचारांची आमची परंपरा असताना आजही पूर्वाश्रमीच्या असंख्य वाल्या व अंगुलीमालाच्पा प्रवृत्ती विविध क्षेत्रात दडून वावरत आहेत. त्यांची लुट केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी होती. हल्ली यांची मात्र साठवणूक पुढच्या पिढ्यांच्या बेगमी करता धडपड आहे. सगळ्या सुखसोयी असणारेच सुशिक्षित नेते , नोकरशहा आदि लुट व भ्रष्टाचारात माखले जात आहेत . त्यांना नारद व तथागतासारखे सद्गुरू भेटू नयेत. हे आपल्या देशाचं दुर्भाग्यंच ! सद्गुरूंच्या वेषात वावरून समाजाला दिशा देण्याचं काम करण्याऐवजी अबलांच्या असहायतेचा गैरफायदा घेत आश्रमांना वासनापूर्तीच्या कुंटनखान्याचं रूप देवून गुरू परंपरेला डागाळणारे अनेक भामटे गुरू आज गजाआड आहेत. पूर्वी गुरू म्हणजे परीस असायचे. अशा परिसाला ओळखूनच आपण त्यांच्या सान्निध्यात जायला पाहिजे हे शिष्यानं विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्यातील असलेल्या दोषाला खतपाणी घालून पुन्हा पुन्हा त्याचे समर्थन करीत असतो त्यात सुधारणा करत नाही आणि तो आपल्या आयुष्यात कधीही सुधारत नाही अशा व्यक्तीला मुर्खच म्हणावे लागेल.कारण ती व्यक्ती दुस-याच्या जीवनात चांगल्या गोष्टी ऐवजी वाईटच गोष्टी शोधत असतो.चांगल्या गोष्टीही वाईटच दिसायला लागतात.अशा व्यक्ती चांगल्या समाजातील चांगले असलेले वातावरण बिघडून टाकण्यास कारणीभूत ठरु शकतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌳💐🌳💐🌳💐🌳💐🌳💐 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विसर - Forgot* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दुसऱ्यांनी केलेल्या उपकाराचा विसर पडू नये* एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले. त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही. बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला. यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा *कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*पारख* जीवनातील जगणे अवघड झाले येथे अंतसमय येता मरण बेकार झाले येथे मावळत्या सूर्याला नाही नमस्कार येथे अन् डुबत्या नौकेस नाही आधार येथे जीवनातील जगणे...... गोरगरिबाचे, दिन हिनाचे स्वप्न साकार होईना येथे अन् साहसही हळवा होतो सत्याचे चालेना काही येथे जीवनातील जगणे...... भ्रष्टाचार्यांच्या सुकाळात सज्जनांचे साथीदार थोडे येथे सत्य असत्य ह्यातील फरक म्हणूनच जाणतात पारखे येथे जीवनातील जगणे..... सत्य हे कडू लागे लबाडीचे काम करतात येथे खरे बोलण्यार्यांना तोंड दाबून बुक्कयांचा मार देतात येथे जीवनातील जगणे अवघड झाले अंतसमय येता मरणही बेकार झाले येथे 〰〰〰〰〰〰 ✍© प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड. 💥 जन्म :- १९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक. १९३१ - विजय मांजरेकर, माजी भारतीय क्रिकेट खेळाडू. *१९३२ - मनमोहन सिंग, भारतीय माजी पंतप्रधान* 💥 मृत्यू :- १९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती. १९७७ - उदय शंकर, भारतीय नर्तक. १९८८ - शिवरामबुवा दिवेकर, गायक. १९९६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार. २००२ - राम फाटक, मराठी संगीतकार व गायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डागाळलेल्या नेत्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय, कायदा बनवण्याचे सुप्रीम कोर्टाचे संसदेला निर्देश.* --------------------------------------------------- 2⃣ *भोपाळ- महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांना कधीही विसरणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी* --------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्षांना कॅबिनेटचा दर्जा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* --------------------------------------------------- 5⃣ *दसरा मेळाव्यात भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार, पंकजा मुंडेंची ट्विटरवरुन माहिती* --------------------------------------------------- 6⃣ *आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई* --------------------------------------------------- 7⃣ *शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली भारत आणि अफगाणिस्तानमधील लढत अखेर टाय* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *रांगेत जा ............!* लेख वाचल्यावर एक मिनीट जरूर विचार नक्की कराल https://goo.gl/PuAkYC आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लक्ष्मणराव किर्लोस्कर* लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते. इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापली. किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा… ते म्हणजे नाव आणि इज्जत *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'वन लाइफ' चे लेखक कोण ?* ख्रिस्टीन बर्नाड *२)'विधवा विवाहोत्तेजक मंडळा'चे स्थापना वर्ष कोणते ?* १८९३ *३) रशियाच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* एरोफ्लोट *४) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* सहारा, उ.आफ्रिका *५) 'एफबीआय' चे विस्तारित रूप कोणते ?* फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेिस्टगेशन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● सुनील आलूरकर ● विश्वनाथ होले ● सोनाजी बनकर ● प्रवीण खाटके ● विक्रम रिक्कल ● श्री दासरवार ● अजय मिसाळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊस* कुठे धो धो पाऊस कुठे थेंब पडत नाही सर्वोशाम पाऊस झाला असे कधी घडत नाही हल्ली पाऊस खुपच लहरी झाला आहे कमी जास्त पडून कहर केला आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 25* *कबीर हरी सब को भजे* *हरी को भजै न कोई |* *जब लग आस सरीर की* *तब लग दास न होई ||* अर्थ विधात्याची सर्व प्राणी मात्रांवर समदृष्टी असते. सर्व चराचर सृष्टीला कुठल्याही अपेक्षेशिवाय हवा, पाणी,अन्न विधाता निसर्गरूपाने पुरवित असतो. निसर्गच चराचराची सेवा करीत असतो. ही सर्व मोफत सुविधा देवूनही माणूस मात्र निसर्गाला ओरबाडणे , पर्यावरणाची नासधूस करणे, यासारखी स्वतःच्याच विनाशाची करणी तो करतो आहे. तो निसर्गपूजक होतंच नाही. विकासाच्या नावे अमर्याद झाडांची कत्तल होते. त्या बदल्यात तो विकासक झाडे लावीत नाही. वृक्षारोपन फोटोपुरतंच होतं. प्रसिद्भी केली की नीधीची लुट करायला मोकळे . मग वृक्ष संवर्धन व देखरेखीचं काम वागलंच म्हणून समजा ! जिथं माणूस मनाचा गुलाम असतो तिथं बुद्धीचं काय चालणार ! तो षडविकारात गुंतलेला असणार. आंतरिक सौंदर्यापेक्षा शारीरिक बाह्य सौंदर्य जपण्यावरंच माणसाचा भर असतो. असा माणूस विधात्याशी, निसर्गाशी कसा एकरूप होणार ? त्याच्या कडून विवेक व निरामयतेची अपेक्षा कशी करावी ? ही माणसं ईश्वराशी तादात्म्य पावू शकत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्ञानाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या अनुभवास बळकटी मिळते आणि नवी दिशा मिळते तर त्याच ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात अंगीकारला तर चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. ज्ञान हे कधीही माणसाला जीवनात आलेले नैराश्य दूर करुन सुख,समृद्ध जीवन जगण्याचा पायाही मजबूत करतो.म्हणून सदैव माणसाने ज्ञानी माणसांच्या, सज्जनांच्या सहवासात राहून आपले ज्ञान वृद्धिंगत करायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिरेक - Redundancy* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिरेक* एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसर्या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला. तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*अर्धांगिनी* पहाटेचा गारव्यात झुंजुमुंजु सोनसकाळी कुजबुजली गाणी पक्ष्यांची मंजुळवाणी दूर मंदिराच्या दारी घुमे नाद निर्मल्याचा हे पावित्र्याचे सूर मन मंदिरी देई उभारी लगबगीनं निघाली अर्धांगिनीची सवारी धन्यासंग कष्ट करी धरणीचा उदरी हे आभाळं निळसंर कस झाल पिवळंसर हा पिवळ्याचा गोळा आला डोंगर माथ्याला येता सांजवातीला चिमणं बिलगती अंगाला घेऊन कवेत लेकराला समाधानं लाभी तिला. 〰〰〰〰〰〰 ©✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक हृदय दिन.* 💥 जन्म :- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार. १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी. १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक. २००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण केल्याने २०२ मंडळावर गुन्हा दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई : भाजपाचे अरुण अडसड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आठ जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरातील प्राध्यापक आजपासून बेमुदत संपावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्ली: फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी व उपाध्यक्षपदी अजित मोहन यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अनुजा पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत चौथ्या सामन्यात सोमवारी श्रीलंका महिला संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *नो मोबाईल डे* असा ही एक दिवस साजरा करावा लागेल की काय ? अशी भीती सध्या वाटत आहे. तेंव्हा मित्रांनो हा लेख नाईलाजास्तव आपणांस मोबाईलवरच वाचावे लागेल. https://goo.gl/ygcSP3 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाळकृष्ण हरी कोल्हटकर* बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर, हे मराठीतील नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली. कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार नावाचे नाटक लिहिले. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्या होतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) आवाजलहरी निर्माण करणारं यंत्र कोणतं ?* फोनोग्राफ *२) 'नॅशनल हेरॉल्ड' या वृत्तपत्राचं प्रकाशन स्थळ कोणतं ?* दिल्ली *३) उंचीवरुन जमिनीवर अलगद उतरवणारं साधन कोणतं ?* पॅराशूट *४) ज्या पिकापासून तेल काढतात त्यांना काय म्हणतात ?* गळिताची धान्ये *५) १९७४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित झाल्या होत्या ?* तेहरान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● तसनीम पटेल ● रामकृष्ण अंगरोड ● महेंद्रकुमार कुदाळे ● योगेश धनेवार ● सुयश पेटेकर ● शिवशंकर नर्तावर ● संघरत्न लोखंडे ● श्यामसुंदर मोकमोड ● सय्यद जाफर ● कमलकिशोर कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *चिंता* आज प्रत्येकाला चिंता आहे रूपाची पण चिंता करावी ती खरी स्वरूपाची वरवर दिसते ते नश्वर रूप असते माणसाच्या मनात खरे स्वरूप असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 24* *कबीर घोडा प्रेम का* *चेतनी चढ़ी अवसार |* *ज्ञान खडग गहि काल सीरी* *भली मचाई मार ||* अर्थ विवेकाने वागणार्याला सर्वांच्या हृदयी स्थान भेटतं. विवेकानं वागणारा विचाराशी बांधील असतो. तो अविचारानं वागत नाही. अंधश्रद्धा व निरर्थक रुढी परंपरामध्ये स्वतःला गुरफटून घेत नाही. त्याच्या ठायी सर्वाप्रति प्रेमळपणा व आपुलकी असते. चैतन्यशीलता व प्रसन्नता हा विवेकी माणसाचा स्थायी स्वभाव असतो. त्याच्या बळावर तो यशारूढ होतो. ज्ञानामुळे मानसाचे भ्रम नाहिसे होतात. सत्य व वास्तवाचे भान येते. अज्ञानामुळे जीवन अंधःकारमय बनते. अज्ञानी मनुष्य पशुसमान जीवन जगत असतो. साधनेच्या जोरावर माणसाला ज्ञानरूपी तलवार प्राप्त होत असते. ही अज्ञानाच्या चिंधड्या करण्यासाठीव मृत्यू बणून समोर उभी टाकते. अज्ञानावर वार करून ज्ञानाला विजय मिळवून देते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्ञानाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या अनुभवास बळकटी मिळते आणि नवी दिशा मिळते तर त्याच ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात अंगीकारला तर चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. ज्ञान हे कधीही माणसाला जीवनात आलेले नैराश्य दूर करुन सुख,समृद्ध जीवन जगण्याचा पायाही मजबूत करतो.म्हणून सदैव माणसाने ज्ञानी माणसांच्या, सज्जनांच्या सहवासात राहून आपले ज्ञान वृद्धिंगत करायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपूर्ण - Perfect* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपूर्णता / निपूणता* एक मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो, मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ? फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे. मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना. फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे. मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन. फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात). तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर... मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ? मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते. तात्पर्य :- आपल्यावर समोरच्या किती विश्वास आहे आणि आपण त्या कामात निपूण आहोत का नाही हे तपासून पाहणे महत्त्वाचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
संशयाच भूत संशयाच भूत मानगुटीवर बसतं अन् काय सांगू तुम्हाले भल्याभल्यांचा ते जाळ्यात फसतं असा संशय लेकाचा जीव घेतो दुसऱ्याचा अन् ह्याले तुम्ही जागा नाही द्यायची अन् संशयाचा भूताची जागा मनामंदी नाही ठेवायची म्हणून मनतो तुमाले करु नका कोणावर संशय जिवावर होऊन उठतील अन् जीवनभर पेटतील संशयाच भूत मानगुटीवर बसवतील अशा भूतास जागा नाही द्यायची अन् संशयाची भीती मनामंदी नाही ठेवायची कुढत बसणं आणि रूसत बसणं ह्याले जागा नाही द्यायची उद्याचा दिसाची काळजी नाही करायची अन् संशयाचा भूताला जागा नाही द्यायची अन् संशयाची भीती मनामंदी नाही ठेवायची 〰〰〰〰〰〰〰 ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे(हदगाव) जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर. 💥 जन्म :- १९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक. 💥 मृत्यू :- १९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक. २००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, शब्दकोशकार, अनुवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत राज्यभरात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप, भाविकांचा उत्साह शिगेला* --------------------------------------------------- 2⃣ *जळगाव : पहूर ता.जामनेर येथे कापूस खरेदीस शुभारंभ, सहा हजार एकावन्न रुपयांचा मिळाला भाव* --------------------------------------------------- 3⃣ *झारखंड: पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं लोकार्पण* --------------------------------------------------- 4⃣ *गोव्यात नेतृत्त्वबदलाच्या विषयाला पूर्णविराम ; मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच, अमित शहा यांचा निर्णय* --------------------------------------------------- 5⃣ *दिल्ली: राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी - अखिलेश यादव* --------------------------------------------------- 6⃣ *चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन.* --------------------------------------------------- 7⃣ *आशिया चषकमध्ये भारताने पाकिस्तानला नऊ गडी राखून नमविले, शिखर धवन सामनावीर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शाळेचा कणा : मुख्याध्यापक* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_87.html वरील निळ्या अक्षरावर क्लिक करून लेख पूर्ण वाचावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शिवाजी सावंत* शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते. पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'एससी'चे विस्तारित रूप काय ?* सिक्युरिटी कौन्सिल *२) 'भिल्लसेवा मंडळ' या संस्थेची स्थापना कधी झाली ?* १९२२ *३) भारतातील पहिल्या पेट्रोलियम तेलविहिरीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं ?* दिग्बोई *४) श्रीलंकेची राजधानी कोणती ?* कोलंबो *५) उत्तर ध्रुवासभोवतालच्या भू-भागाला काय म्हणतात ?* आर्टिक प्रदेश *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● डॉ. तोफिख खान पठाण ● सारंग दलाल ● राजू यादव ● विरेश भंडारे ● सतीश आरेवाड ● रोहित शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊस* ढगा आडून पाऊस पहातो आपली दशा पशू पक्षांच्या भावना त्याला कळत नाहीत कशा पशू पक्षी प्राण्यांसाठी जरा मनमोकळा पड कष्टकरी कष्ट करून चार घास खातील धड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 23* *जिस मरने यह जग डरे* *सो मेरे आनंद |* *कब महिहू कब देखिहू* *पूरण परमानन्द ||* अर्थ जन्माला आल्यानंतर मृत्यू हा ठरलेलाच. प्रत्येक प्राण्याला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. हे जरी शाश्वत सत्य असलं तरी मृत्यूबद्दल सर्व प्राण्यांच्या ठायी भीती दडलेली. जीवन अनेक , विकारांनी , व्याधींनी, अवहेलनेने भरलेले जरी वाट्याला आले . जीवनभर संसारात इत्तरांना गांजून लुटून अमाप संपत्तीचा संग्रह केलेला. त्या संपत्तीला सांभाळताना जीवनाच्या खर्या आनंदाला मात्र पारखा झालेला. भरपूर अन्न व पैसा असूनही हवे ते खाण्यावर मर्यादा पडलेल्या. जीवनभर कमवून, राबूनही मुलांनी आधाराची काठी व्हावं तिथंच एकाकी टाकून दिलेलं ! तरी सामान्य मानसाची जगण्याची आसक्ती संपत नाही. या मायावी चक्रव्युहातून बाहेर निघावेसे वाटत नाही. खरे तर मरणाने जीवनाचे वर्तुळ पूर्ण होते. थोर साहित्यिक जी.ए, कुलकर्णी मृत्यूला सर्वात जवळचा मित्र माणायला सांगतात. कारण मृत्यूच सर्व व्याधी व दुःखातून आपणास मुक्त करतो. ज्यावेळी सर्वांना आपणनकोसे वाटायला लागतो. तेव्हा आपले दोन्ही बाहू समोर करून आपली कडकडून गळाभेट घेणारा व चिरशांती देणारा एकमेव मित्र म्हणजे मृत्यू ! ज्यांनी आपल्या वाट्याला आलेलं जगणं भरभरून जगून घेतलं. इतरांसाठी ते जगणं म्हणजे एक मार्गदर्शक पायवाट झालेली असते. जीवनाला एक विशिष्ट उंची प्राप्त झालेली असते. अशी उंची असामान्य माणसंच साध्य करू शकतात. ती आभाळ उंची माणसाला मरणानंतरही कायम जीवंत ठेवते. तुकोबाच्या जीवन विषयक चिंतन मननापुढं आपलं थातूरमातूर लोकांना फसवणारं तत्त्वज्ञान टिकाव धरीना म्हणून धर्माच्या (अधर्मी) ठेकेदारांनी डोही बुडवून तुकोबा सदेह वैकुंठाला गेल्याची लबाडी केली. तुकोबा देहिक मारले गेले परंतु लौकिकानं मात्र तुकोबा आभाळाएवढे ठरले. संत, सज्जन, कलावंतांना मरणाचं भय कसलं ? त्यांनी कृतीतून स्वतःचा अमीट ठसा उमटवलेला असतो. त्यांच्या मरणातही जग जगते हे माहित असतं. ते मृत्यूला कवेत घ्यायला सदैव तयार असतात. त्यांच्या मृत्यूचाही उत्सव होत असतो. त्या परमानंदाचं स्वागत करायला संत सदा तयारंच असतात. एकनाथ डुमणे, मुखेड =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या व्यक्तीचे मन प्रसन्न,उदार अंतःकरण, जगाकडे प्रेमाने आणि आपुलकीने पाहण्याचा दृष्टिकोन, प्रसन्न आणि हसरा चेहरा,मनात दुसऱ्या विषयी कोणतीही वाईट भावना नसलेली आणि इतरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्यात समरस होणारी इ.गुण वैशिष्ट्ये आहेत आणि अशी गुणवैशिष्ट्ये असलेली व्यक्ती ही जनमाणसात अधिक लोकप्रिय असते.अशांच्या सहवासात राहणे किंवा अशांचा सहवास लाभने म्हणजे एक आपल्या आयुष्यातली सुसंधीच म्हणावी लागेल.क्वचितच अशी माणसे आपल्या जीवनात येतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🌳🍃🌳🍃🌳🍃🌳🍃🌳🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सहवास - Coitus* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= परिस पदयात्रा करीत असताना मनोहर पंतांना एका जंगलात एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्व अंगावर लोखंडी साखळ दंड होते. रस्त्याने चालत जाताना ती व्यक्ती रस्त्यातील प्रत्येक दगड उचलून हातात घेत होती आणि तो दगड अंगावरील साखळदंडाला लावून पाहात होती. त्या व्यक्तीचा हा उद्योग बराच काळपर्यंत सरू होता.मनोहरपंत है सगळं टक लावुन पाहात होते त्यांना त्याच्या या कृतिचा अर्थ त्यांना लागेना. शेवटी न राहून मनोहरपंतांनी त्यांना विचारले, ‘आपण हे काय करीत आहात? काही शोधत आहात का?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘हा दगड लोखंडाला लावून बघण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे, मी गेले बारा-पंधरा वर्षे परीस शोधतो आहे; पण अजून काही मला सापडला नाही. ” हे ऐकून त्या व्यक्तीच्या बुद्धीची किव करत .तो मूर्ख आहे असं समजून मनोहरपत चालू लागले. मधल्या काळात बरीच वर्षे गेली. पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर मनोहरपंतांना ती व्यक्ती भेटली आणि .त्यांना धक्काच बसला. त्या व्यक्तीच्या अंगावरील साखळदंड सोन्याचे होते; पण तरीही त्यांच्या सर्व क्रिया मागील प्रमाणेच सुरू होत्या. मनोहरपंतांनी त्याला विचारले, ‘ ‘अंगावरील साखळदंड तर सोन्याचे झाले आहे. याचा अर्थ तुम्हाला परीस सापडला आहे. मग आता शोध कशासाठी सुरू?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘ ‘जमिनीवरचा दगड उचलणे, साखळीला लावुन पाहणे आणि टाकून देणे ही क्रिया सतत घडत राहिल्यामुळे परीस हातात आला कधी, तो साखळ्याना लागून त्याचं सोनं झालं कधी आणि नेहमीप्रमाणे मी तो दगड टाकून दिला कधी? हे मला कळलं सुद्धा नाही. आता टाकून दिलेला परीस मी पुन्हा शोधतो आहे. ” *तात्पर्य : परीसासारखी आलेली संधी सोडून दिली तर पुन्हा संधी मिळत नाही.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
गुरुमहिमा चिखल मातीचा गोळ्यास आकार तु देतोस ज्ञानदिपाची ज्योत पेटवूनी अंधकार दूर सारतोस शतशः नमन मी करीते गुरूवंदन करूनी आशीर्वाद मी घेते आयुष्यभर रूणी राहूनी वंदन मी नित्यनेमाने करीते. गुरूवर्य आहेत ज्ञानाचा भांडार अज्ञानाचा नाश करुनी होतील संहार घडवतील मनुष्यजीवना अर्पूनी जीवन आपुले. कर्तव्याचे बिजांकुरण करुनी पेटतील समाजमनाचा उदरी ज्ञानर्जनाची शिदोरी वाटूनी वसतील शिष्यांचा मनमंदीरी 〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६४ - माल्टाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६५ - सिंगापूरला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. १९७२ - फिलिपाईन्समध्ये लश्करी कायदा लागू. १९८१ - बेलिझला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनॉरची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक. १९९१ - आर्मेनियाला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार. १९६३ - कर्टली ऍम्ब्रोस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू १९७९ - क्रिस गेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १७४३ - सवाई जयसिंह, जयपूर संस्थानाचा राजा. १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तुळशीच्या माळेची सजावट* --------------------------------------------------- 2⃣ *मध्य प्रदेशमध्ये गणपती विसर्जनावेळी पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू* --------------------------------------------------- 3⃣ *अकोला - महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे मध्यप्रदेश शासनाद्वारे सन्मानीत* --------------------------------------------------- 4⃣ *केंद्र सरकार छोट्या बचत खात्यांवरचा व्याजदर वाढवणार ; 01 ऑक्टोबरपासून वाढ लागू* --------------------------------------------------- 5⃣ *लखनौ - मायावती यांचा बहुजन समाज पक्ष विधानसभेसाठी जनता काँग्रेसोबत करणार युती, छत्तीसगडमध्ये 35 जागा लढवणार* --------------------------------------------------- 6⃣ *आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताला मोठा धक्का, भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार, त्याच्या जागी दीपक चहलला मिळाली संधी* --------------------------------------------------- 7⃣ *भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व केला फेरीत प्रवेश.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= पाच मिनिटं लागतील वाचायला पण वेळ काढून जरूर वाचावे *नोकरी श्रेष्ठ की शेती* https://goo.gl/WJvP4C आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रांजणगाव - महागणपती* महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावात आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. हा महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे महागणपतीचे स्थान इसवी सनाच्या १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २00२ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी कोण होते ?* संदीप पांडे *२) 'आयएनएस म्हैसूर' ही युद्धनौका देशाला अर्पण केली गेली तो दिवस कोणता ?* २ जून १९९९ *३) आरआरव्हीवायचे विस्तारित रूप काय ?* राष्ट्रीय रेल विकास योजना *४) शृंग घराण्याचा शेवटचा शासक कोण ?* देवभूती *५) इंडियन मुस्लीम लीगचे सा संस्थापक कोण ?* आगाखान, नबाब सलीमुल्ला *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद ● विष्णू गंभीरे, धर्माबाद ● निशांत जिंदमवार, धर्माबाद ● स्मिता मिरजकर वडजे, नांदेड ● आशिष कोलपवार ● सचिन तोटावाड, धानोरा खु. ● गोविंद पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरळ मार्ग* सरळ मार्गाने होत असल्यास वाकड्यात कशाला जायचं पुढचा चांगला असुनही पाण्यात कशाला पाहायचं सरळ मार्गाने गेलं की कामं सरळच होतात गरज नसतांना उगीच माणसं वाकड्यात जातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 21* परनारी रता फिरे , चोरी बिधिता खाही | दिवस चारी सरसा रही , अति समूला जाहि || अर्थ : 'अती तिथं माती ।' हा नियम सर्वत्र लागू होतो. ही बाब सांगताना महात्मा कबीर म्हणतात, परनारीचा मोह बरा नसतो. परनारीच्या आसक्तीनं विषय वासनेत बुडालेला माणूस कामांध होतो. त्या आंधळेपणापुढं त्याला हितचिंतकांनी केलेला उपदेशही तुच्छ वाटू लागतो. घरी त्याची स्वतःची अस्तुरीसमान बायको जी त्याची मनोभावे सेवा करीत असते. तिची अवहेलना करीत दुसर्याच्या उकिरड्यात लोळण्याची त्याची घाणेरडी सवय जात नाही. हा उष्टा घरच्या पतिव्रतेला उपाशी ठेवतो अन शिंदळीसाठी मात्र पदरमोड करू करू स्वतः कवडीमोल होवून रस्त्यावर येतो. ती याला हाकलून बाहेर काढते. याची गत मोकाट कुत्र्यासारखी होते. ना घर ना घाट ! रात्रीला चोरानं चोरी करावी अन काही दिवस त्या चोरीचे द्रव्य संपेतो आस्वाद घेतल्या सारखा वरील प्रकार आहे. चार दिवस सहजतेने विषयानंदात काढलेले. परंतु त्या उपभोगाला व जगण्याला नैतिकतेची कुठंच जोड नसलेली. तोंडावर नसला तरी माघारी कुचेष्ठेचा धनी होण्याचं जगणं वाट्याला आलेलं. हा असला अतिरेक काय कामाचा बरं ! जो माणसाला मुळातूनंच पार उद्ध्वस्त करीत असतो . म्हणून माणसानं विवेक अन विचाराची कास धरलीच पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादा आयुष्यातला चांगला क्षण तुम्ही थोडे दुर्लक्ष केल्यामुळे निसटून गेलाही असेल म्हणून पुन्हा आयुष्यात संधी येणार नाही असे नाही.संधी खूप येतात नि जातात त्या येणा-या संधीचे सोने करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी ठेवावी लागेल,पाण्यातील मासा पकडण्यासाठी बगळा जसा पाण्यात एका पायावर उभा राहून प्रतीक्षा करतो तशी एकाग्रता आपल्या मनाची ठेवायला हवी,येणा-या संधीला प्राप्त करून घेण्यासाठी आपले हातही तितकेच महत्वाचे आहेत.तुमच्या हातांनाही चांगले करण्यासाठी प्रोत्साहित करा.मग पहा कधीही कोणतीही संधी जात नाही.आणि एखादी संधी गेली म्हणून येणा-या संधीला दूर करायचेही नाही. एक लक्षात असू द्या,हातात मुठीत घेतलेली वाळू पूर्णच्या पूर्ण मुठीत राहते का ? नाही ना .मग जी काही राहते ती आपली आयुष्यात असणारी संधी म्हणूनच.मग तिला सोडूच नका. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रोत्साहन - Promotion* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बिट्टी बेडकुळी* सुंदर माझे घर. बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळ्या तळ्यात टिप..टिप..आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजूक, नाजूक काड्यांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हटले माझे घर पाहिले का केवढे मोठे आहे ते? आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. ती कौतुकाने तळ्याकडे पाहत म्हणाली. शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल! मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, कोण आहे? पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. अगंबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते? बिट्टीने विचारले. तर काय! हेच माझे घर! पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. बायांनो! तुम्ही इतक्याजणी छोट्याशा घरात कशा गं राहता? बिट्टीने विचारले. छोटेसे आहे का ते? आत कशा षटकोनी खोल्याच खोल्या आहेत. अगदी आरामात राहता येते सर्वांना. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वार्याने ती इकडून तिकडे लत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढय़ा वार्यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते. बिट्टीने या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली. शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. हो! हे बाकी खरेच! बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणार्या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळ्यात सुंदर सुंदर माझेच घर!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८१ - फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.१९९० - लिश्टनस्टाइनला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. १९९७ - टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.१९९८ - आयकानची स्थापना. 💥 जन्म :- १९५८ - विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९५८ - डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७० - डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता 💥 मृत्यू :- १९९९ - अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक. २००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक. २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याचा सरकारचा निर्णय - राजीव कुमार* --------------------------------------------------- 2⃣ *जालना : मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देणार - राज्यपाल सी. विद्यासागर राव* --------------------------------------------------- 3⃣ *कर्नाटकमध्ये पेट्रोल व डिझेल दोन रुपयांची स्वस्त, कर्नाटक सरकारचा दिलासादायक निर्णय* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - लालप्रसाद यादव आणि राबडी देवी यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, रेल्वे कॅटरींग घोटाळ्याप्रकरणी बजावली नोटीस.* --------------------------------------------------- 5⃣ *पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी* --------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली क्रिकेट संघटनेचा वीरेंद्र सेहवागने दिला राजीनामा* --------------------------------------------------- 7⃣ *Asia Cup 2018: रवी शास्त्री यांच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंग धोनी बजावतोय प्रशिक्षकाची भूमिका* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भीक मागणे एक दुष्कृत्य* https://goo.gl/C34hWu पूर्ण लेख वाचण्यासाठीवरील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *थेऊर - चिंतामणी* थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे.येथे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे.थेऊरचा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'माय जर्नी ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन टू अँक्शन' ही साहित्यसंपदा कोणाची ?* डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम *२) मुंबईतील 'हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' हा तेल शुद्धीकरण कारखाना कधी सुरू झाला ?* जुलै १९५४ *३) कॅमेरूनची राजधानी कोणती ?* योन्डे *४) आयएमएफचे विस्तारित रूप काय ?* इंटरनॅशनल मॉनेटरी फंड *५) आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्ष सोडवण्याचे काम कोणाचे ?* आंतरराष्ट्रीय न्यायालय *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● किरण इंदू केंद्रे ● सुदर्शन वाघमारे ● सचिन महाजन ● रामकृष्ण काकाणी ● देवेंद्र गडमोड ● योगेश शंकरोड ● सुनील पाटील बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *जोश* त्याच त्या गाण्यांचा देवाला डोस आहे नव्या कार्यकर्त्याचा नवा नवा जोश आहे नको ते गाणे ऐकून गणपतीही वैतागतो थोडी शांतता ठेवण्याची भक्ताला मागण मागतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 19* *पतिबरता मैली भली* *गले कांच को पोत |* *सब सखियाँ में यो दिपै* *ज्यो रवि ससी को ज्योत ||* अर्थ मानसाचं व्यक्तिमत्व त्याच्या वर्तनावरून समजतं. चारित्र्यामध्ये शील जपणं अत्यंत महत्वपूर्ण माणलं गेलंय. ज्याला चारित्र्याची जोपासना करता आली त्याचं व्यक्तिमत्व आपोआपच खुलून दिसतं. रग्गड श्रीमंतीत जगणारी, सर्व सुख सोयीं उपभोगणारी , उंची वस्त्रे, अलंकार मिरवणारी, रूप गर्विता असेल. ती शिलाचं पावित्र्य जपत नसेल तर ती क्षण भंगूरतेला भुलून भौतिक सुखाच्या आहारी आत्मसन्मान गमावलेली व्याभिचारिणीच होय. तिच्यात आणि कळवातनीत काय फरक आहे ? द्रव्य लालसेपोटी आपलं सर्वस्व कुणापाशीही त्या गहान टाकित असतात. त्या देहाच्या व भ्रष्ट वासनेच्या पूजकंच मानल्या पाहिजेत. अशा शेकडो रुपगर्विता लावण्यवतीं पेक्षा फुटक्या मण्याचीही अपेक्षा न ठेवणारी. पतिव्रतेचा पातिव्रत्य धर्म जपणारी स्त्री दिसायला कुरूप असो की रंगाने काळी. भलेही तिच्या अंगावर दागदागिने नसू देत . तिला नेसायला उंची वस्त्र नसली तरी तिच्या पातिव्रत्यामुळे ती इत्तर स्त्रीयांधूनही आपसुकच उठून दिसते. भौतिक दारिद्र्य असलं तरी तिच्याकडं मनाची श्रीमंती असते . भलेही चारचौघीत मिरवण्या इतपत सौंदर्य तिच्याठायी नसलं तरी तिच्या पातिव्रत्यापुढे व तपश्चर्येसमोर त्या रूपगर्विता व लावण्यवती पार फिक्या पडतात. चंद्र सूर्याला तेज पुरवण्याचं सामर्थ्य पतिव्रतेच्या तपोबलात असतं . एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या माणसाची परोपकारी वृत्ती नाही, दुस-याला काही देण्याची इच्छा नाही, दुस-याच्या भल्याचा कधीच विचार करत नाही, दुस-यांनी आपल्यासाठी कितिही मदत केली तरी चालेल पण आपण कुणाच्या मदतीला धावून जायचे नाही अशी असणारी माणसे फक्त स्वार्थी आणि आपमतलबी असतात हे खरे आहे. अशी माणसे इतरांच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही त्यांच्या जीवनात पूरेपूर स्वार्थीवृत्ती भरलेली असते अशा लोकांचा सहवास कुणालाही नको असतो. ते तेव्हाच इतरांच्या मनातून निघून गेलेले असतात. * व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सहवास - Coitus*💐 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रसन्न मन* एकदा देवळात भागवत कथेची सांगता झाली.तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवरा-आवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी भेटेल?’’ सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढय़ात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’ आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मनाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले. हव्यास आणि हट्ट सोडणे महत्त्वाचे परमार्थ वेगळे काय शिकवतो? *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*माझा शैक्षणिक व सामाजिक कार्यप्रणालीवरील लेख* नोकरी म्हणून शिक्षकाचा पेशा करणारे अनेक जण असतात. पण हा शिक्षकी पेशा सांभाळताना अनेक उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेणारे तसे कमीच असतात. अश्या कमी पण उत्साही लोकांमध्ये माझी ओळख माझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याने निर्माण झालेली आहे.मी श्रीमती प्रमिलाताई कुंडलिक सेनकुडे उपक्रमशील शिक्षिका म्हणून माझा शिक्षण क्षेत्रात समावेश आहे . मी सध्या जिल्हा नांदेड तालुका हदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव येथे सहशिक्षिका म्हणून बदलीने नव्यानेच रुजू झाली. माझ्या सेवेला सध्या सतरा वर्ष पूर्ण होत आहे. मी सुरुवातीला भानेगाव केंद्र शाळेवर अकरा वर्ष कार्य केले. त्यानंतर मी वाटेगाव व आताच्या गोजेगाव येथील शाळेत कार्य करीत आहे. मी शैक्षणिक क्षेत्रात सतत नाविन्यपूर्ण विविध उपक्रम, राबवित आहे.हे उपक्रम माझ्या ब्लॉगला उपलब्धीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात माझे उल्लेखनीय कार्य म्हणजे नागपूर येथील शिक्षणाची वारी या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील शिक्षकांना उद्बोधन करण्याचे कार्य म्हणून स्टाॕल सहकारी म्हणून सक्रिय सहभाग, मातृभाषा सुलभक म्हणून विभागीय स्तरावर औरंगाबाद येथे प्रशिक्षण,व तालुका स्तरावर सुलभक म्हणून कार्य केले. विविध ठिकाणी अभ्यासदौरा, विद्यार्थ्यांची लेझीम स्पर्धा मी व शाळेतील सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आयोजित करणे व आम्ही बक्षीस मिळवलेे, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, सहली ,क्षेत्रभेटी, पल्स पोलिओ, वृक्षारोपण, तालुकास्तरीय, जिल्हा विज्ञान प्रदर्शन कला महोत्सव सहभागी होणे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत मी आयोजित कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदविला. सहशालेय विविध उपक्रम वाचन प्रेरणा दिन, संविधान दिन, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी शाळेत साजरी करणे, तसेच खेळ व क्रीडा स्पर्धेत हिरीरीने कार्य करून विद्यार्थ्यांची प्रगती तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास साधने हेच ध्येय मी कायमस्वरूपी मनी ठेवून कार्य करीत असते.फ्रेश मॉर्निंग बुलेटीन(whatsgroup) फ्रेश शालेय परिपाठ दलित वाणी ह्या वृत्तपत्राचा माध्यमातून माझे दैनिक सदर बोधकथा हा संकलित उपक्रम असतो. तसेच माझ्या स्वलिखित रचित कविता चारोळी छोटे छोटे विचारनीय लेख , मी राबविलेले शैक्षणिक नाविण्यपूर्ण विविध उपक्रम संकलित शैक्षणिक उपयुक्त माहिती माझ्या शैक्षणिक ब्लॉगला उपलब्ध आहेत. माझी वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांना मदत असते.तसेच अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईच्या पुण्यस्मरणार्थ आर्थिक मदत करीत असते.त्याचप्रमाणे डिजिटल शाळा करण्यासाठी दरवर्षी माझा (वार्षिक उपक्रम) 10 हजार रुपये योगदान करणे हा आहे. तसेच भव्य लेझीम स्पर्धा कवाना येथे आयोजित आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ सावली मंडप जाहीर केला व त्याचे पालन कायमस्वरूपी मी करणार आहे. रोटरी क्लब हदगाव च्या सदस्या म्हणून मी त्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात सहभागी असते . तसेच मी एका विद्यार्थ्यांचा सनः 2002पासून कायमस्वरूपी शैक्षणिक खर्च उचलला आहे . याशिवाय महाराष्ट्र राज्य प्राथमिक महिला आघाडी च्या शिक्षक संघटनेच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी मी कार्य करते. माझा शैक्षणिक व तंत्रज्ञानात्मक उत्कृष्ट वाटचालीमुळे मला विविध सामाजिक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. तसेच ठिकठिकाणी सत्कार झालेले आहेत. माझी ओळख शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमात भाग घेणाऱ्या शिक्षिका म्हणून रुजली आहे आणि मी माझे हे कार्य अविरत अखंडपणे उत्साहाने असेच करीत राहील. असे आपणांस ग्वाही देते. शेवटी आपणास एकच सांगू इच्छिते *'सत्कारासाठी काम करु नये सत्कार्यासाठी कार्य करावे'* बाल चिमुकल्यांचा आशीर्वाद घेणे. त्यांना देशाचे उत्तम नागरिक व उज्वल भविष्य घडविण्याचे तनमनधनाने कार्य करणे, हेच ध्येय मनी ठेवूनी जीवनात बालकांचा आशीर्वाद घेण्याचे कार्य मला व तुम्हां सर्वांना बळ मिळो हीच सदोदित मनोकामना ठेवते. दिनांकः १२-०९-२०१८ *"अगर चाहते हो खुदा मिले* *तो वही करो जिससे दुआ मिले."* 〰〰〰〰〰〰 *माझा सर्व शुभचिंतक व हितचिंतकाचे मनःपूर्वक धन्यवाद.* 🙏 🙏🙏🙏🙏 〰〰〰〰〰〰 ©✍श्रीमती प्रमिलाताई कुंडलीक सेनकुडे (सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. फोन.नंबर- 📞9403046894. 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय अभियंता दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९६८ - सोवियेत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण १९३५ - भारतातील दून स्कूलची स्थापना १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सर्वप्रथम महिला, न्यायाधीश झाली. १९८१ - व्हानुआतुला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले. १९९८ - एम.सी.आय. कम्युनिकेशन्स आणि वर्ल्डकॉम या कंपनीचे एकत्रीकरण. एकविसावे शतक संपादन करा २००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले. २०१३ - नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली 💥 जन्म :- १८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता. १८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक. 💥 मृत्यू :- ६६८ - कॉन्स्टान्स दुसरा, बायझेन्टाइन सम्राट. १८५९ - इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता. १९७३ - गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ, स्वीडनचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग* --------------------------------------------------- 2⃣ *जगाच्या तुलनेत भारतात महागाई कमी; अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा* --------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी विजयी झालो याचा आनंद आहे, आता जबाबदारी आणखी वाढली - सत्यजीत तांबे* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : नवी मुंबईत विनापरवानगी लाऊडस्पीकर लावण्यात आलेल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई न केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना हायकोर्टाची 'कारणे दाखवा' नोटीस* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई: गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास तूर्तास परवानगी नाहीच - हायकोर्ट* --------------------------------------------------- 6⃣ *सोलापूर : राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूर ते पुणे रेल्वेने प्रवास, प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.* --------------------------------------------------- 7⃣ *जपानमध्ये सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रीकांत किदम्बीला पत्करावा लागला पराभव* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाचाल तर वाचाल* http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोरगावचा मोरेश्वर* मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= " आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात " *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'थिऑसॉफकल सोसायटी' या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्थेचं मुख्यालय कोठे आहे ?* चेन्नई *२) बल्लारपूर हे शहर कशासाठी ओळखलं जातं ?* कागदाचा कारखाना *३) लोकांनी निवडून दलेल्या शासनव्यवस्थेला काय म्हणतात ?* लोकशाही *४) बिहार राज्याची राजधानी कोणती ?* पाटणा *५) सुपरसॉनिक आवाजाचे एकक कोणते ? मॅश *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● श्रीनाथ येवतीकर ● डॉ. हंसराज वैद्य ● मनोज साळवे ● अभिमन्यू चव्हाण ● शीतल वाघमारे ● विजय धडेकर ● एकनाथ जिंकले ● माधव पांगरीकर ● राजेंद्र होले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे विनाशाचे द्वार आहेत जेवढे वाढतील तेवढे डोक्यावर भार आहेत काम क्रोध लोभाने डोक्यावर भार होतो अती झाले म्हणजे केवढाही गार होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 17* *सुखिया सब संसार है* *खावै और सोवे |* *दुखिया दास कबीर है* *जागे अरु रावे |* अर्थ महात्मा कबीर मानवाच्या विचित्र वागण्यावर टिप्पणी करताना म्हणतात की, ' प्राणी सुलभ स्वभावानुसार मणुष्य प्राणीही खाणे, पिणे आणि झोपणे यातच धन्यता मानत असेल. माणसाला इत्तर प्राण्यांपेक्षा बोली आणि बुद्धीचं जे आगळंवेगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. त्याचा पुढच्या पिढीला फायदा करून देणार की नाही ? मानवाने बुद्धी चातुर्याच्या बळावर आपल्या पुढील पिढ्यांना संस्कार म्हणून अनुभवाची शिदोरी द्यायला हवी. सामान्य माणूस स्वतःतच गुंग असतो. मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं.हा मानव रूपी अनमोल जन्म विश्व कल्याणासाठी आपणास प्राप्त झाला आहे. या संपूर्ण जगाची चिंता वाहण्याचं काम संत सज्जनंच करीत असतात. अज्ञानात आनंद मानणार्या सकल जणांना जागृत करण्याचं व माया मोहातून उद्भवणार्या दुःखाप्रति सर्वांना सजग करण्याचं महान कार्य संत करीत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण जर पाहिले असेल तर मुंगी आणि कासव या दोघांची चालण्याची आणि धावण्याची गती ही सारखीच असते. त्यांच्यामध्ये कधीच हावरेपणा नसतो. त्यामुळेच ते त्यांच्या जीवनात यशस्वीच होतात. ते कुणाचीही बरोबरी करता नाही किंवा जो कोणी एखादा पुढे जात असेल तर त्यांची बरोबरीही करीत नाही. फक्त ते एवढेच करतात की, आपल्या जीवनाचे ध्येय हे एखादे काम फत्ते करायचे असेल तर मनाची पूर्ण तयारी आणि आपल्या कृतीत सातत्य असले की, आपण चालत असलेल्या मार्गावरुन कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे जीवन जगण्याची यशस्वीता त्यांना निश्चितपणे साधता येऊ शकते. ते कधीच अति मोहाला बळी पडत नाही किंवा इतरांची ही बरोबरी करता नाहीत. अशा संयमीवृत्तीचे या पृथ्वीतलावर हे दोनच जीव पहायला मिळतात. यांचे गुण जर आपण घेतले तर आपणही आपल्या जीवनात खरी प्रगती करु शकतो. आपणही कुणाबद्दल आपल्या मनात वाईट चिंतू नये. आपण जे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच ध्येयाने आपण चाललो तर आपलीही यशस्वीता आपल्या जीवनात सहजपणे आपल्याकडे आणता येते तेही आपल्या शांत, संयमी आणि निगर्वीपणामुळे. एखादी वरकरणी पुढे जात असेल तर जाण्यासाठी आठवायचे नाही. फक्त एक करायचे त्यांना यश कशामुळे मिळाले हा विचार करायचा आणि आपणही त्यांच्या पध्दतीने पुढे कसे जाता येईल आणि जीवन सुखी व समाधानी कसे होता येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुढे जाणारी व्यक्ती मागच्याला नक्कीच प्रेरणा देऊन जातो. त्यांची प्रेरणा ही आपल्या यशस्वीतेकडे घेऊन जाणारी योग्य दिशा ठरू शकेल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सातत्य - Continuity* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वस्वाचा त्याग* देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवावर उदार होऊन प्राणपणाने लढणाऱ्या देशभक्त क्रांतिकारकांची भूमिका ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने अशी असते. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध झालेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्याच्या पुढे अन्य कशाचेही मोल नसते. तळहातावर शिर घेऊन प्राणपणाने झुंजणाऱ्या, दोन क्रांतिकारक भावांना जुलमी सत्तेने फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्यक्ष फाशीच्या वेळेला दोघेही क्रांतिकारक बंधू निश्चल होते. त्यांनी माफीपत्र लिहून दिल्यास त्यांची शिक्षा सौम्य करण्यात येईल, पुढे कधीही उठाव न करण्याच्या बोलीवर सारी शिक्षाही माफ केली जाईल, असे प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. ते सारे त्यांनी झिडकारले. आणि ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही फासावर जात आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. ‘ असे त्यांनी गौरवाने सांगितले. धाकट्या भावाला अगोदर वधस्तंभाकडे नेण्यात आले. निघून त्याने पाहिले तर मोठ्या भावाच्या डोळ्यात असू दाटलेले त्याला दिसले. त्याचा निरोप घेत तो म्हणाला, ‘दादा वाईट .कशाचे वाटून घेतोस? अखेरची घडी आली म्हणून?’ त्यावर ताठ मानेने तो मोठा भाऊ म्हणाला, ‘अरे, नाही रे बंधुराजा डोळ्यात आलेले असू हे प्राण जाणार म्हणून आलेले नसून ते आनंदाश्रू आहेत. हुताम्य पत्करण्याची संधी तू धाकटा असूनह्री तुला प्रथम मिळते आहे, ह्याचा मला आनंद वाटला. *तात्पर्य : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना आपल्या प्राणाची आहुती देण्यातच धन्यता असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*माझी शाळा माझे उपक्रम* *👭👬बालसभा👬👭* 〰〰〰〰〰〰〰 आज दिनांक १२-०९-२०१८ रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथील इयत्ताःपहिली व दुसरी ची बालसभा घेण्यात आली. 👉 बालसभेचा विषयः मुलींचे शिक्षण📚✍📚 👭👭👭👭👭👭 🌻अध्यक्षः वर्ग (१ली) तील आनंद वाघमारे 🌻उपाध्यक्षः साई कदम 🌻प्रमुख पाहुणेः वर्ग (२री) आरती कदम, सुशांत भालेराव, सुरज वाघमारे 💐💐💐💐💐💐 आजच्या बालसभेत *(बालनाट्यः सखु शाळेला आली.)* 👉सहभागी विद्यार्थी पाञ आजीः स्नेहल,बाईःप्रतिक्षा,सखुः संस्कृती,आईः आदिती, वर्गमैञीणीः सोजलः नेहा,आरुषीः अस्मीता, आनंद, युवराज, आदर्श............. सादरीकरण करण्यात आले.व मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. 〰〰🐽〰〰〰〰〰〰〰 *✍शब्दांकन/ वर्गशिक्षिका.* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.) जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. ➖➖➖➖➖➖➖ क्षणचिञे /video 👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले. १९३०: विल्फ्रेड र्होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला. १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते. १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले. १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले. २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले. 💥 जन्म :- १८८०: सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी 💥 मृत्यू :- १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर १९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राजस्थान सरकारनं सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात केली दोन टक्क्यांची वाढ, आता महागाई भत्ता 7 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर* --------------------------------------------------- 2⃣ *जम्मू-काश्मीरमधला उधमपूर जिल्हा हागणदारीमुक्त, 75 हजार शौचालय केले तयार* --------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात मागासवर्ग आयोगाचा प्रगती अहवाल सादर. 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार, मागासवर्ग समितीची हायकोर्टात ग्वाही.* --------------------------------------------------- 4⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अंगणवाडी सेवकांशी संवाद साधत, त्यांच्या मानधनात केली वाढ* --------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी भाजपाच्या गुरप्रीतकौर सोढी यांची नियुक्ती.* --------------------------------------------------- 6⃣ *भारत वि. श्रीलंका महिला क्रिकेट सामन्यात स्मृती मानधनाची फटकेबाजी, भारतीय महिलांचा श्रीलंकेवर मोठा विजय* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पंत ठरला भारताचा पहिला यष्टीरक्षक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आजच्या दैनिक रामप्रहर मध्ये प्रकाशित लेख " पोशाख : व्यक्तीची ओळख " http://ramprahar.com/wp-content/uploads/2018/09/Ram-Prahar-12-September-2018-Page-4.jpg पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *समर्थ रामदास* त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च १६०८, येथे झाला. हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते. दिनांक १३ जानेवारी १६८१ सज्जनगड येथे मृत्यू झाला. त्यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे साहित्य प्रसिद्ध आहे तर जय जय रघुवीर समर्थ हे वचनप्रसिद्ध आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करावं, जग अपोआप सुंदर बनतं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) ' हिरण्य 'कोणत्या धातुचे वैदिक नाव आहे ?* सोने *०२) स्वामी विवेकानंद यांचे जन्मनाव काय होते ?* नरेंद्र *०३) जिम कार्बेट पार्क कुठे आहे ?* उत्तराखंड *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● शिवकन्या शशी ● श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी ● स्वप्नील पुलकंठवार, देगलूर ● विकास पाटील ● साईनाथ बोदुलवार ● श्याम कांबळे ● पुंडलिक बिरगले ● शिवा शिवशेट्टे ● केतन जोशी ● साहिल सुगुरवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *योग्य वापर* हल्ली चोरही रोज सोन्याच्या ताटात खातात पैशावाले नुसतेच रिकामा भार वहातात असलेल्या साधन संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे आहे त्या गोष्टीचा सहज उपभोग घेता आला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 15* *यह तन विष की बेलरी* *गुरु अमृत की खान |* *सीस दिए जो गुरु मिले* *तो भी सस्ता जान ||* अर्थ गुरूचे जीवनातील महत्त्व सांगताना महात्मा कबीर सांगतात की हे शरीर विषवल्ली समान आहे. माणूस देहिक सुखाच्या मागे लागतो. शरीर शृंगार, देह सजावट व शरीराच्या ठेवणीकडे ध्यान पुरवण्यातच जीवनाचा सारा वेळ निघून जातो. खरं तर शरीर नाशीवंत आहे. शरीरविषक आवश्यक बाबी पुरवायला हव्यात. शारीरिक सौंदर्य/श्रीमंती काल मर्यादित आहे. हृदयाची श्रीमंती मात्र अक्षय असते. मनाची सफाई केली तर हे जीवन आनंद व समाधानानं भरून जातं. त्याला जन कळवळ्याची चाड असते. मनाच्या जडणघडणीसाठी स्वतःपाशी जगाकडे पाहण्यासाठी दिव्य दृष्टीची गरज असते. ही दिव्य दृष्टी मानवाठायी उत्पन्न होते ती गुरूमुळं. अज्ञानात खितपत लोकांना गांजणारा अंगुलीमाल तथागतांच्या सान्निध्यात येतो. बुद्धांची प्रेमळ दृष्टी त्याच्यावर पडते. त्यांच्या उपदेशाने त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन आरपार बदलून जातो. अंगुलीमालाचं हृदय परिवर्तन होतं. पूर्वाश्रमीच्या कोणत्याही रानटीपणाच्या खुणा त्याच्या ठायी दिसत नाहीत. तो मानवतावादाचा पुरस्कर्ता बनतो. जग त्याच्याशी कसेही वागले तरी तो अहिंसेचा पुजारी होतो. हे सार गुरूपदेशातलं रहस्य होतं. गुरू अमृतरूपी कुंभ आहेत. ज्याला खरा गुरू मिळाला तो तो अमर झाला आहे. याला इतिहास साक्ष आहे. सांदिपनी-कृष्ण, द्रोण-अर्जून अशा असंख्य गुरू शिष्याच्या जोड्या सिंहावलोकन करता नजरेपुढे सहज फेर धरतील. गुरू शिष्याला कर्तव्याची जाणीव करून देतात. निकोप मनाची घडवणूक करून देण्याची किमया गुरूंचीच ! गुरूंच्या चरणी मस्तक झुकवणंंच काय प्रसंगी प्राणार्पणही कमीच आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिव्यदृष्टी - Divine vision* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *नदीपार* ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली. बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी होता. बालपणापासून त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले होते. एक दिवस राजेसाहेब आपल्या लवाजम्यासह इरावद्दी नदीवर सहलीसाठी गेले. ब्रह्मदेशातील या सर्वांत मोठ्या नदीला ब्रह्मी लोक ‘इतरावत्ती माता’ म्हणतात. ते जिथे गेले होते, तिथे नदीचे पात्र विस्तीर्ण, नजरेच्या टप्प्यात न भरणारे होते. दिवस मावळला. राजाला कंटाळा आला. त्याला यु पॉ ची थट्टा करायची लहर आली. यु पॉ आता दरबारी खूशमस्कर्या होता. त्याला मंत्र्याचा दर्जा होता. ‘यु पॉ ही नदी ओलांडून जाशील का ?’ ‘होय महाराज !’ त्याने तत्काळ उत्तर दिले. ‘तू मला खूश करण्यासाठी हे म्हणतोयस, हे मला ठाऊक आहे; पण ही थट्टा नाही.’ ‘महाराज, खरंच मी नदी पार करून दाखवतो.’ ‘मग आताच्या आता नदी ओलांड पाहू ।’ हे ऐकल्यावर यु पॉने आपला सॅरॉग वर उचलला आणि तो किनार्यावर येरझारा घालू लागला. बर्याच वेळाने राजाने विचारले, ‘ अरे, तू थांबलास का ?’ ‘महाराज, मी बोटीची वाट पाहतोय.” ‘बोटीने तर कोणीही सामान्य माणूस जाईल, मग तूच कशाला हवा ?’! युपॉने राजापुढे गुडघे टेकले. जमिनीवर डोके टेकवून तो म्हणाला, ‘महाराज, त्या सामान्यांतला मी एक सामान्य माणूस आहे.’ राजेसाहेब त्यावर खळखळून हसले, झालं! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली. 💥 जन्म :- १८७२ - रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू. १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते. १८९५ - कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक. १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. १९८९ - संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार. 💥 मृत्यू :- १९८३ - जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान. २००६ - टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - भारत बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आज दुपारनंतर गणपती उत्सवाच्या जादा बसेस सुटणार, परिवहन मंत्री, दिवाकर रावते यांनी दिली माहिती* --------------------------------------------------- 2⃣ *चेन्नई - माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यासाठी तामिळनाडू सरकार करणार शिफारस* --------------------------------------------------- 3⃣ *जळगाव - रुपयाची घसरण आणि इंधनाच्या वाढत्या दरांचा सोन्यावर परिणाम, सोन्याच्या भावांमध्ये 1200 रुपयांनी वाढ* --------------------------------------------------- 4⃣ *येत्या 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी* --------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश - हिमाचल रस्ते परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून 2 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी* --------------------------------------------------- 6⃣ *जपानची नाओमी ओसाका ठरली अमेरिकन ओपनची विजेती, ओसाका ग्रँड स्लॅमचं विजेतेपद पटकावणारी जपानची पहिली टेनिसपटू* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा डाव २९२ धावांवर आटोपला, इंग्लंडकडे ४० धावांची आघाडी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत हवे* http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html वरील लेख वाचण्यासाठीनिळ्या अक्षरावर क्लिक करावे आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीआहार* रोगप्रतिकारक क्षमता किंवा इम्युन सिस्टीम कमजोर झाल्यास विषाणू आणि जीवाणू यांचा शरीरावर हल्ला होता त्यामुळे आपण सतत आजारी पडतो. शरीराला धोकादायक असणारे विषाणू आणि जीवाणू यांच्याशी दोन हात करण्याचे काम शरीराची प्रतिकारशक्ती करत असते. त्यामुळे शरीराची ही संरक्षण व्यवस्था उत्तम ठेवण्यासाठी काही घटकांचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते. लसूण : यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकार क्षमता मजबूत होते. लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जो शरीराला जीवाणू आणि संसगाश्री लढण्याची शक्ती देतो. पालक : पालकाच्या भाजीत मुबलक प्रमाणात फोलेट नावाचा घटक असतो. त्याचबरोबर लोह, तंतुमय पदार्थ, अँटिऑक्सिडंट घटक तसेच ह्यसी जीवनसत्त्व असते त्यामुळे शरीरासाठी या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते. मशरूम : त्यात सेलेनियम, बी जीवनसत्त्व, रिबोफ्लेविन आणि नायसिन नावाचा घटक असतो. मशरूममध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिट्यूमर घटक असतात. हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करतात. ब्रोकोली : त्यात ए, सी आणि के जीवनसत्त्व असतेच शिवाय त्यात अँटिऑक्सिड.ंटही असते. प्रतिकार शक्ती मजबूत कर्णाया या भाजीत प्रथिने आणि कॅल्शिअम असते. हेही लक्षात ठेवा की आपली दिनचर्या सृदृढ राहील याची काळजी घ्यावी. पुरेशी झोप घ्यावी. योग आणि ध्यान करावे.तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन बंद करावे. हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करावे. प्रोबायोटिक आहाराचे सेवन अवश्य करावे.दिवसातून काही वेळ सूर्यप्रकाशात जरूर घालवावा.सर्दी, डोकेदुखी आणि त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यावर योग्य उपचार करावेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= हल्ला करणार्या शत्रूला भिऊ नकोस. पण स्तुती करणार्या मित्रापासून सावध रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) कोणती बँक सेवेत रोबो आणणार आहे ?* एचडीएफसी बँक *२) जागतिक क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?* २९ ऑगस्ट *३) सर्वांत श्रीमंत देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* सातवा *४) जीएसटी मंजूर करणारे सहावे राज्य कोणते ?* गुजरात *५) यंदाची जागतिक कबड्डी स्पर्धा कुठे होणार आहे ?* अहमदाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● ईश्वर येमुल, नांदेड ● विश्वांभर पापुलवाड, धर्माबाद ● प्रवीण भिसे पाटील ● गणेश कोकुलवार, नांदेड ● ज्ञानेश्वर इरलोड ● राजेश्वर बाबुराव चिटकूलवार ● संतोष पांडागळे, नांदेड ● योगेश पोकलवार ● आकाशगाडे ● गंगा पूट्टेवाड ● संभाजी साळुंखे ● अनिरुद्ध वंगरवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पोळा* पोळा म्हणजे बैलांच्या कृतज्ञतेचा सण आहे पशुंचीही पुजा करतो बळीराजाचे मोठे मन आहे पशुंच्याही कृतज्ञतेचा इथे सोहळा होतो पोळ्याच्या सणाला सारा गाव गोळा होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 13* *न गुरु मिल्या ना सिष भय* *लालच खेल्या डाव |* *दुनयू बड़े धार में* *छधी पाथर की नाव ||* अर्थ महात्मा कबीर गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते व त्यांच्याकडील अपेक्षित क्षमतांवर दृष्टीक्षेप टाकतात. गुरू आणि शिष्य लालची असतील तर साधनेतून कोणतेही साध्य साध्य होणार नाही. गुरूचा स्वतःचाच प्रापंचिक मोह सुटलेला नसेल तर तो शिष्याला या मोहमयी दुनियेच्या बंधनातून कसा मुक्त करील? पांडित्य करताना पंडिताचा ताठा , मी एक महा विद्वान आहे. माझ्याशिवाय इथलं पानही हलू शकत हा त्या पंडिताचा अहंकारी स्वभाव त्याला गुरू पदापर्यंत जायला खरा अडसर ठरतो. शिष्याची साधकाची आर्थिक स्थिती पाहून मिळकतीचा विचार करून केवळ दक्षिण्यावर व मिळकतीवर लक्ष केंद्रित करित पूजापाठ व पौरोहित्त्य केलं जाणार असेल तर केलेल्या सेवेला आत्मिक आनंदाची व समाधानाची सर कुठून येणार आहे ? शिष्याने / साधकाने जर स्वार्थी हेतु ठेवून आराधना केली. त्याला जन कळवळ्याची झालर नसेल तर त्याच्या साधनेला अर्थच उरत नाही. असे गूरू आणि शिष्य केवळ भ्रमीत असतात. अशा माणसांचा किवा त्यांच्या कडून इत्तरांचा उद्धार होणे कधीही संभव नाही. कारण ते दोघेही दगडी नावेतले प्रवासी आहेत. दिसायला ती मजबूत दिसत असली तरी पाण्यावरून जाण्यास ती असमर्थ आहे. ती पाण्यावर नेली तर बुडणारच ! गुरू शिष्याचं लालचीपणही हा भवसागर तरायला मदत न करता अर्ध्यातच दोलायमान होवून गटांगळ्या खाऊ लागतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध............✍🏻 --------------------- नेहमी माणूस म्हणतो की,मी स्वतंत्र आहे मला कुणाचीही गरज नाही,माझे कुणावाचून अडत नाही.हे कितपत सत्य आहे ? परंतु एक सत्य आहे माणूस कितीही आणि कसाही वागला तरी एक लक्षात असू द्यावे की,माणसाची खरी मदार तर मुक्या प्राण्यावरच आहे .हेच पहा ना..दूग्धजन्य पदार्थ बनतात ते दूध देणाऱ्या गाई म्हशी,शेळी आणि इतर प्राण्यांपासून, शेतामध्ये काम करण्यासाठी बैल आवश्यक आहे,ओझे वाहून नेण्यासाठी बैल,गाढव,उंट,हत्ती,पिकावर अळी,कीड पडली तर पाखरे,घर,शेत सांभाळण्यासाठी कुत्रे,घरातल्या उंदरापासून संरक्षण हवे असेल तर मांजर अशा कितीतरी प्राणीजीवनाचा आपण उपयोग करुन आपले जीवन जगत असतो.त्यांच्याबद्दलची कृतज्ञता नेहमीच आपल्या मनात असायला हवी.ते जर नसते तर आपण आपले जीवन सुखावह जगलो असतो का ?आपण यांच्याशिवाय जगू शकलो असतो का ? नाही ना ?मग आपण स्वतंत्र नसून त्यांच्या जीवावर जगत असतो.म्हणून आपल्या जीवनाइतकेच त्यांनाही आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान द्यायलाच हवे.ते देखील तितकेच प्रेम आपल्यावर करत असतात.त्यांच्याही भावना आपल्यासारख्याच असतात.म्हणून भूतदया आपणही करायला शिकली पाहिजे.त्यांनाही आपल्या परिवारातील सदस्य समजून घेऊन प्रेम करायला हवे.जर का असे नाही केले तर आपले जीवन अधुरेच आहे असे समजावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🐂🐄🐎🐏🐑🐐🐫🐘🐀🐇🕊🕊 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संरक्षण - Protection* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🌺परोपकाराची भावना*🌺 एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली कबुतर आपल्याच विचारात मश्गुल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्यानेही याच संधीचा फायदा घेत मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला. कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच ..... पण त्याहूनही *परोपकाराची भावना मेल्याचं होतं.* अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जिवनाचे सार्थक ठरते. *-----------------------------------* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ (फ्रेश शालेय परिपाठ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- 💥 ठळक घडामोडी :- ● १८१४: दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला. ● १८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. ● १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे. ● १९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली. ● १९३१: दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. ● १९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश. ● २००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका 💥 जन्म :- ◆ १७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक ◆ १८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड 💥 मृत्यू :- ◆ १६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर ◆ १८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके ◆ १९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी ◆ १९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले ◆ १९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी ◆ १९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग ◆ १९९७: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *साैरऊर्जा प्रकल्प सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरले देशातील पहिले विद्यापीठ* --------------------------------------------------- 2⃣ *हैदराबाद - तेलंगणामध्ये मुदतपूर्व विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार, विधानसभा बरखास्तीच्या प्रस्ताव मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात इंटरपोलनं मिहिर रश्मी बन्साली यांना बजावली रेड कॉर्नर नोटीस* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : अविनाश पवार आणि श्रीकांत पांगारकर यांची सत्र न्यायालयाने केली १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी* --------------------------------------------------- 5⃣ *दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण, हायकोर्टानं तपास यंत्रणांना खडसावलं. सतत माध्यमांसमोर न जाण्याचा सल्ला.* --------------------------------------------------- 6⃣ *कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज ; ब्रायन लाराची स्तुतीसुमने* --------------------------------------------------- 7⃣ *us open tennis: नोव्हाक जोकोव्हिच उपांत्य फेरीत* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आंतरराष्ट्रीयसाक्षरता दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *साक्षर भारत ; समर्थ भारत* https://goo.gl/31q7e5 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत तुकाराम महाराज* संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचं नाव काय ?* तेहरिक-ए-इन्साफ *२) मदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू *३) यंदाची विम्बल्डन महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं ?* अँजेलिक किर्बर *४) 'जागतिक हेपेटायटिस दिवस' कधी साजरा केला जातो ?* २८ जुलै *५) बंगालचे पहिले गव्हर्नर कोण होते ?* वॉरन हेस्टींग्ज *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● गजानन जाधव ● सुमित पेटेकर ● पवन धांडू ● दशरथ याटलवार ● प्रवीण कुमार ● गोविंद पटेल ● प्र. श्री जाधव ● हणमंत गायकवाड ● भारत पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= @@ गुगली @@ *झुला* प्रत्येकाच्या मनात एक आठवणींचा झुला असतो मनमोकळ झुलायला ज्याचा त्याला खुला असतो आठवणींच्या झुल्यावर प्रत्येकाला झुलता येत कटू आठवणी टाळून आनंदाने फुलता येत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 12* *लकड़ी कहे लुहार की* *तू मति जारे मोहि |* *एक दिन ऐसा होयगा* *मई जरौंगी तोही ||* अर्थ : लोहाराचा धंदा म्हटला की भट्टी आणि भाता आलाच. कठीण वाटणार्या लोखंडाला आकार देण्यासाठी लोहार त्याला भट्टीत टाकतो. भट्टीत इतका गरम करतो की ते लालबुंद होवून जातं अन् त्याच्या घनाच्या/ हातोड्याच्या दणक्या सरशी पाहिजे तसा आकार घेवू लागतं. मात्र त्याच्यामागं खरं समर्पण असतं लोहाराकडच्या लाकडांचं ! जसजसा लोखंडाला ताव चढू लागतो तसं तसा लोहार चेव चढतो. भट्टीत लाकडे टाकून भात्याने वार्याला फुस देत लाकडांना लाल इंगळ करीत संपवून टाकतो. त्याचा जोस लाकडांचा कर्दनकाळ असतो. ते पाहून लाकूड म्हणतं की आज मी तुझा अंकित आहे. माझा तुला हवा तसा वापर करून घे. एक दिवस माझाही असेल. त्यावेळी तू निचेष्ट पडलेला असशील. त्यावेळी मी तुला असेच बेमुर्वतपणे भस्मसात करीन. त्यावेळी तुझ्या अस्तिवाच्या खुणाही मागे असणार नाहीत. तात्पर्य: कार्य कर्तृत्त्वासाठी प्रत्येकाला काळ संधी देत असतो. बलशाली माणसे कमकुवतांवर हुकूमत गाजवतात. त्या हुकूमतीला कळवळ्याचा आधार असेल तर ती हुकूमत हवीहवीशी वाटू लागते. परतु ती अतिरेकी मनमानी करणारी असेल तर एक दिवस सहज पत्त्यांचा डाव कोसळावा तशी ती कोलमडते अन अन तिच्या अस्तित्वाच्या खुणाही शेष राहात नाहीत. मगधच्या धनानंद व आॅस्ट्रियाचा राजा सोळावा लुई ही उदाहरणं पाहता सर्वकाही कळून जातं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= निद्रानाशाची अनेक कारणे जरी असली निद्रा लागण्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही जे काही काम केले आहे ते तन आणि मन स्थिर ठेवून व मनात कोणताही वाईट विचार न आणल्यामुळे ते शक्य झाले. त्यात तुम्ही केलेल्या कामात कसलीही कुचराई केली नाही तसेच तुम्ही कामाच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळेल याचीही अपेक्षा न केल्यामुळे ते शक्य झाले. नाही तर एखाद्यावेळी तुमच्या मनात एक आणि कृतीमध्ये एक असेल तर तेच कारण तुमच्या निद्रानाशाचे होऊ शकते. असे करण्यापेक्षा दैनंदिन जीवनात आपण ठरवूनच टाकायचे जे काही करणार ते प्रामाणिकपणे करणार त्यात कसलीही बनावट कृती करणार नाही मग तुम्हाला हवी तेवढी निद्रा शांतपणे लागेल. ठराविक वेळेत तुम्ही तुमची निद्रा घेऊन पुढील कामासाठी तेवढ्याच जोमाने कामाला लागाल आणि शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी तत्पर राहाल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌾🍃🌾🍃🌾🍃🌾🍃🌾🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कुचराई - Scouring* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्गाने नटवूया सृष्टी सारी* गोपीचंद नावाचे एक व्यापारी होते. त्यांचं आधी छोटंसं दुकान होतं. नंतर हळूहळू मोठं दुकान झालं. तिजोरी भरली. मग त्यांनी राहण्यासाठी मोठी जागा घ्यायचं ठरवलं. मग एक जागा बघून तिथे त्यांनी मोठी हवेली बांधली; पण अवतीभोवती दलदल व तुंबलेल्या गटारांमुळे येणार्या दुर्गंधीने ते कंटाळले. लाखो रुपये खर्च करून हवेली बांधली खरी; पण घराभोवतीच्या दुर्गंधीमुळे ती सोडावी लागणार याचं त्यांना दुःख झालं. त्यांचा रमणचंद नावाचा एक घनिष्ट मित्र होता. तो कल्पक होता. त्याने गोपीचंदांस सांगितले, ‘या दुर्गंधीच्या त्रासाने हवेली सोडण्यापेक्षा एक वर्षभर ती माझ्या ताब्यात दे. मी तुला चमत्कार करून दाखवतो.’ त्याप्रमाणे हवेली रमणचंदकडे व पेढीचा कारभार मुनिमाकडे सोपवून गोपीचंद एक वर्षभर तीर्थयात्रेला गेले. इकडे रमणचंदने तो संपूर्ण दलदलीचा परिसर स्वच्छ करून तिथे माती आणून टाकली व निरनिराळ्या प्रकारच्या सुगंधी फुलांची झाडे लावली. बांधावर मोठी झाडं लावली. एक वर्षाच्या आत चमेली, मोगरा, गुलाब, तुळस या सर्वांनी बाग फुलून गेली. आता दूरवरून दुर्गंध आला तरी झाडे तो थोपवू लागली आणि वार्याच्या झोताबरोबर येणार्या सुगंधाने हवेली भरून गेली. गोपीचंद यात्रेहून परतले तेव्हा मध्यरात्र होती. त्यावेळी त्यांना काहीच दिसलं नव्हतं; पण पहाटे जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते सुगंधाने मोहून गेले. अरुणोदयाला त्यांना बागेचं मोहक दृश्य दिसलं. गोपीचंदने कमाल केली होती. आता हवेलीत उदबत्या लावण्याची गरज नव्हती; कारण गोपीचंदने फुलझाडांच्या कितीतरी उदबल्या लावल्या होत्या. *तात्पर्य: कृत्रिम उपायांपेक्षा नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करावा.निसर्गालाच आपले दैवत मानून निसर्गातील झाडांची जोपासना व लागवड करावी.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/09/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम. १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला. १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड. १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली. 💥 जन्म :- १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस १८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले १९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड १९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर १९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर १९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी 💥 मृत्यू :- १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ १९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा, त्यांच्याकडील शिक्षणबाह्य काम कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन* --------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा केलं लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, छातीच्या संसर्गामुळे तातडीने रुग्णालयात हलवलं* --------------------------------------------------- 3⃣ *विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता, पूर्व-विदर्भात 6, 7 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढणार* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर* --------------------------------------------------- 5⃣ *धुळे : बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने चिंचखेडे येथील शिक्षक भास्कर अमृतसागर यांचे धुळे जि.प. समोर कंदील लावून बिऱ्हाड आंदोलन सुरू* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *देशभरात पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच; पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 20 पैशांनी महागले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= खास शिक्षक दिनानिमित्त मनाला भावलेलं *" हाताची जादू ओळखणारा शिक्षक "* लेखक - नागोराव येवतीकर निवेदन - सतीश पाटील https://youtu.be/-R9ZpCSvOok You tube वर एकदा जरूर ऐका. एका मित्राकडून शिक्षक दिनानिमित्त दिलेली खास भेट आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत एकनाथ* संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मानवी तस्करी विरोधी दिन कधी असतो ?* ३० जुलै *२) 'द प्रेस' या गाजलेल्या साहित्यकृतीचे लेखक कोण ?* एम. चलपतराव *३) पृथ्वीचे दोन समान भाग करणार्या आणि पूर्व-पश्चिम दिशेने जाणार्या काल्पिनक वृत्ताला काय म्हणतात ?* विषुववृत्त *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • महेश वडजे • संतोष इनामदार • विठ्ठल तुकडेकर • रितेश पोकलवार • प्रशिक कैवारे • विकास डुमणे • सुनील ठाणेकर • अनिल सोनकांबळे • आनंद गायकवाड • सचिन पाटील • *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बनवा बनवी* करणारे बरोबर बनवा बनवी करतात बनवा बनवी करून तेच चांगले ठरतात कितीही सफाईने बनवा बनवेगिरी उघडी पडते कुठे तोंड लपवावे बनवणाराला पंचाईत पडते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 11* *साईं आगे सांच है,* *साईं सांच सुहाय |* *चाहे बोले केस रख* *चाहे घौत मुंडाय ||* अर्थ : महात्मा कबीर निर्गुणाचे उपासक आहेत. ते मुर्तीपूजक नाहीत. ते कर्मकांड, कर्मठपणा व पाखंडी भक्तीचं समर्थन करीत नाहीत. ईश्वराचं वास्तव्य ते सत्यात पाहतात. सत्याच्या ठिकाणी ईश्वर वसत असतो. ईश्वराला सत्यच आवडत असते. अलिकडे सत्यापेक्षा ढोंग जास्त वाढलंय. कबीर त्याच्यावर फटकार ओढतात. भक्तिचं अवडंबर माजवून आंतरिक शुद्धी न करता बाह्य देखावे कितीही केले तरी ईश्वर कसा काय भुलेल व प्रसन्न होईल ? काही जण भक्तीच्या नावाखाली भले लांब केस वाढवतात. डोक्यातल्या केसांच्या जटा होवून जातात. दाढीमिशाही लांंबच लांब वाढवतात. कुठे तरी जंगलात जावून गुहेत झाडाखाली वास्तव्य करतात. काही जण मिशा काढून दाढी वाढवतात. कुणी दाढी मिशा काढून टाकतात. तर कुणी मुंडण करतात. काही भक्त मूर्तीपूजा करतात , काही नमाज अदा करतात, काही उपासातापासाच्या नादी लागून शारीरिक क्लेश वाढवून घेतात. ही सर्व मंडळी खरे पाहता खर्या ईश्वराला ओळखतच नाहीत. तो प्रत्येकाच्या आत दडलेला असतो. निसर्गानं आपणास दाढी मिशी केस हे शरीर रक्षणासाठी दिलेले आहेत. आवश्यक तेवढे ठेवणे व अनावश्यक काढले पाहिजेत. जशी शारीरिक स्वच्छता करता तशी मनाचीही स्वच्छता करता आली पाहिजे. मनाने निसर्गतः माणूस म्हणून जन्माला आलात तर माणूस म्हणून माणसाला मुक्तपणे जगता आलं पाहिजे. जाती धर्माचा हा देखावा कृत्रीम आहे. पशु पशुत्व सोडत नाहीत. आपआपसात भेदभाव करत नाहीत. पक्षीही भेदभाव न करता सारे कसे एकत्र राहतात? माणसानेही वरवरच्या देखाव्याला भुलून मानवता धर्मातला आनंद गमावता कामा नये. बनावटी व दिखाऊ धर्मातून सत्य व समाधान मिळत नाही . मिळाल्यासारखं वाटलं तरी ते चिरकाल आनंद देवूच शकत नाही. तेव्हा सत्य जाणून. प्रत्येकात दडलेल्या ईश्वराला नैसर्गिकपणे जपायला ह्रवे. हाच खरा कल्याणकारी मानवता धर्म आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या चराचर सृष्टीतील प्रत्येक जीवाला जीवन जगण्यासाठी एकमेव पाण्याची जशी आवश्यकता आहे, त्याप्रमाणे मनुष्याला आपले जीवन सुखी व समृद्ध वैविध्यपूर्ण मानसन्मानाने जगण्यासाठी, आलेल्या संकटावर मात करण्यासाठी, स्वावलंबी होऊन जीवन जगण्यासाठी ख-या ज्ञानाची आवश्यकता आह े.ज्यांच्याजवळ कोणतेच ज्ञान नाही त्यांचे जीवन अर्थहीन आहे.जसे की जीवांना पाण्याविना जगणे अशक्य आहे तसे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान नसेल तर ते मनुष्यरुपी जीवन म्हणून जगणे अर्थहीन आहे. जीवनातल्या प्रत्येक संकटातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर ज्ञानाची कास धरावीच लागेल.त्याच्याशिवाय कोणतीही प्रगती करणे अशक्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📖🎨📖🎨📖🎨📖🎨📖🎨 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रेरणा - Inspiration* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *न्याय सर्वांसाठी* एका राजाने आपल्या महालाबाहेर एक मोठी घंटा बांधून त्याची दोरी खाली सोडली होती. कोणीही सामान्य माणसाने यावे व ती घंटा वाजवून राजाकडे न्याय मागावा अशी त्या न्यायी राजाची व्यवस्था होती. एकदा एक अत्यंत हडकुळा, अशक्त बैल रस्त्याने जाता-जाता महालाबाहेरील हिरव्या वेलीची पाने खाऊ लागला. वेलीच्या बाजूलाच लोंबकळत असलेली त्या न्यायाच्या घंटेची दोरी त्याच्या तोंडात आली व त्याने मान फिरवताच घंटा वाजू लागली. अचानक घंटा वाजलेली पाहून राजाने घंटा वाजवणाऱ्याला दरबारात आणण्याचा फर्मान काढले. पाहातात तर तेथे कोणीच व्यक्ती नव्हती पण तेथे तो बैल होता. त्या बैलालाच शिपाई घेऊन आले. पण बैल तो, तो काय बोलणार? फिर्यादच करू शकला नाही तर त्याला काय न्याय देणार? म्हणून त्याला सोडून देणार तोच मुख्य प्रधान पुढे सरसावला व म्हणाला, “महाराज, या बैलाने घंटा वाजवली म्हणजे नक्कीच त्याची काहीतरी फिर्याद असणार. पहा, तो म्हातारा आहे. म्हणजे मालकाने त्याच्याकडून भरपूर काम करून घेतले व म्हातारपणी त्याला चाराही न देता सोडून दिले. भुकेपोटी हिंडत तो येथे आला व वेल खाऊ लागला. याचा अर्थ त्याच्या मालकाने त्याच्यावर अन्याय केला आहे. महाराज तो आपण दूर करावा.” प्रधानाचे म्हणणे न्यायी राजाला पटले. त्याने तात्काळ बैलाच्या मालकाला बोलावून त्याला दंड केला व बैलाला नीट सांभाळण्यास सांगितले. *तात्पर्य : मुक्या प्राण्यालाही न्याय मिळाला पाहिजे.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌞🙏 *सुमने होऊनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी ।* *देह झिजावा अखंडित हा ज्ञानदान साधनेशी..........॥* 🌹🌹🌹🌹🌹 *ही एकच तळमळ मनात ठेवून नवभारताचे आधारस्तंभ असणारी विद्यार्थीशिल्पे घडविण्यासाठी अविरत प्रयत्नशील असणाऱ्या माझ्या सर्व गुरूजणांना शतशः नमन👏👏 व शिक्षक दिनाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा..!* 💐💐 🙏🙏🙏 शुभेच्छूकः श्रीमती सेनकुडे
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= _*शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दीक शुभेच्छा*_ 💥 ठळक घडामोडी :- १९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू. १९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले. १९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण. २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन १८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर १९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक १९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया १९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत १९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी १९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा 💥 मृत्यू :- १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा १९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर १९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी १९९२: उद्योगपती अतूर संगतानी १९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी १९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा २०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - कोलकाता येथील पूल दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा, संपूर्ण मदतीचे दिले आश्वासन* --------------------------------------------------- 2⃣ *पुणे - डॉ नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी आरोपी शरद कळसकरला १० सप्टेंबरपर्यंत सत्र न्यायालायाने पोलीस कोठडी सुनावली* --------------------------------------------------- 3⃣ *केरळमध्ये 1 ऑगस्टपासून 372 जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याची माहिती.* --------------------------------------------------- 4⃣ *ब्राझीलमधील राष्ट्रीय संग्रहालयाला भीषण आग, 2 कोटींहून अधिक ऐतिहासिक वास्तू भस्मसात* --------------------------------------------------- 5⃣ *नाशिक - शहरातील 71 बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती, 2009 नंतरची ही धार्मिक स्थळे असून बहुतांश मंदिरे खुल्या जागेत आहेत.* --------------------------------------------------- 6⃣ *देवस्थानांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण द्या : भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचे प्रतिपादन* --------------------------------------------------- 7⃣ *भारताच्या ओम प्रकाश मिथर्वालने जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर पिस्तुल प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक दिनानिमित्त खास कथा वाचा प्रतिलिपिवर *" हाताची जादू ओळखणारा शिक्षक "* https://goo.gl/ZNKytm अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत नामदेव महाराज* संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबीव व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्यागुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठीतील'पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= मौन म्हणजे परिस आहे, ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याचे जीवन सुवर्णमय होऊन जाते. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१)'यंग इंडिया' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?* महात्मा गांधी *२) पुण्यातील हिंगणो येथे विधवा अनाथ महिला आश्रमाची स्थापना कोणी केली ?* महर्षी धोंडो केशव कर्वे *३) 'सीएनएस' चे विस्तारित रूप काय ?* चीफ ऑफ नेव्हल स्टाफ *४) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री. मेहरचंद महाजन यांचा कार्यकाल कोणता ?* ४ जाने.१९५४ ते २२ डिसें.१९५४ *५) विधानसभेतील सभासदांची संख्या किती ?* कमीत कमी साठ, जास्तीत जास्त पाचशे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • सौरभ सावंत, नांदेड • एस. व्ही. माडेवार, धर्माबाद • नितीन शिंदे • रत्नाकर चिखले • राजकुमार काळे, बिलोली • रत्नजित शिवाजी पटारे • धोंडोपंत मानवतकर • नरेश रेड्डी • पांडुरंग बोमले • गंगाधर मरकंटवाड • बालाजी आरेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरू* जगावे कसे वागावे कसे शिकवतो तो गुरू ज्ञान ग्रहणाचा प्रयत्न अखंड असतो सुरू माणूस घडवतो तो खरा शिक्षक असतो संस्कृती संस्काराचा तो म्हणजे रक्षक असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 10* *कबीरा ते नर अन्ध है,* *गुरु को कहते और ।* *हरि रूठे गुरु ठौर है,* *गुरु रुठै नहीं ठौर ॥* अर्थ: महात्मा कबीर गुरूंची महत्ती सांगताना म्हणतात की जो माणूस गुरुचे जीवनातील महत्व जाणत नाही , जो गुरूचा अनादर करतो. तो डोळे असूनही आंधळाच समजला पाहिजे. कठीण समयी आपणास देव व दैवाची साथ मिळत नसली तरी आपणास त्या कठीण व नाजूक अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरूच मदत करीत असतात. जर का गुरूनेच साथ सोडली तर मात्र भूतलावर कोणीही साथ देत नाही. कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्गच गुरूपासून सुरू होतो, तर गुरूकडे जाण्यासाठी ईश्वराची मदत घ्यायची गरज असतेच कुठे ? मात्र ईश्वर जाणायचा असेल तर गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे. दाखलेच पाहायचे झाले तर इथल्या व्यवस्थेनं ज्याचं शिक्षण नाकारलं, त्या महाभारतातील एकलव्याचं उदाहरण पहा. गुरूचा पुतळा करून त्याच्यासमोर स्वयं अध्ययनाचे धडे गिरवून सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून लौकिकास पात्र होतो. रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र दत्त ही गुरू शिष्याची जोडी पाहता विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणार्या नरेंद्राला अध्यात्माचा बोध देवून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे विवेकवादी भारतीय तत्त्वज्ञान जगाला देणारा नरेंद्राचा विवेकानंंद परमहंसानी घडवला. हे गुरूचं अदृश्य सामर्थ्य असतं. आदर्श विद्यार्थी एकलव्याचं शिक्षण नाकारणं, इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या धर्माच्या ठेकेदारांनी विवेकानंदांच्या भाषणाला विरोध करणं ही इथल्या व्यवस्थेच्या तोकडेपणाचीच उदाहरणे म्हणावी लागतील. गुरू मात्र आपल्या शिष्याला मजबुतीनं उभं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हे विसरून कसं जमेल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक हे ज्ञानरुपी सागरातले ज्ञानहंस आहेत ते सदैव ज्ञानसागरात स्वच्छंदपणे विहार करत असतात. ज्ञानरुपी सागरात समृद्ध जीवन जगण्यासाठी मन, बुद्धी आणि विश्वास विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवून सन्मार्गाला लावणारी एकमेव विश्वासपात्र व्यक्ती म्हणजे शिक्षक. जो आजही समाज मानसन्मान आणि आदरणीय उच्च स्थानी बसवून त्यांना विनम्र अभिवादन करतो. अशा आदरणीय आणि वंदनीय पूज्य स्थानी फक्त आणि फक्त शिक्षकच आहेत.ज्यांच्याकडून संस्काराचे, चारित्र्यसंपन्न जीवन घडवण्याचे, विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन आणि आदर्श ध्येय समोर ठेवून राष्ट्राच्या उभारणीसाठी पायाभरणीचे कार्य शिक्षकांकडूनच केले जाते. अशा शिक्षकवृंदाना शतशः नमन करून त्यांचा ज्ञानरुपी वारसा सर्वांनी अखंड चालू ठेवायला पाहिजे. ते आपल्या ज्ञानरुपी मंदिरातील देवता आहेत. आजही त्यांचे स्थान शुक्रता-यासारखे अढळ आहे. अशा शिक्षकांना आपल्या जीवनात कधीही अंतर देऊ नये. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚🌸📚🌸📚🌸📚🌸📚🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अंतर - difference* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मन निर्मळ तर प्रत्येक गोष्ट निर्मळ* ‘‘भिक्षां देही’’ म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईंच्या घरासमोर येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, मी फार अस्वस्थ आहे मला काहीतरी उपदेश करा.’’ साधू महाराज म्हणाले, ‘‘माई, आज नाही, पण मी तुला उद्या उपदेश करीन.’’ महाराजांचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना अतिशय राग आला व त्या फणकार्याने म्हणाला, ‘‘मग तुम्हाला मी भिक्षाही उद्याच घालीन.’’ दुसर्या दिवशी साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी पुन्हा त्या घराकडे निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात थोडी माती घेतली. साधू महाराज आज येऊन उपदेश करणार म्हणून मंगलाबाई सुद्धा चांगले दान घेऊन त्यांची वाट पहात होत्या. साधूमहाराजांनी घरासमोर येऊन ‘‘भिक्षां देही’’ अशी आळी दिली. मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घालणार तितक्यात त्यांच्या लक्षात आले की भिक्षा पात्रात माती आहे. त्या पटकन साधूमहाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, भिक्षापात्रात माती आणि कचरा आहे तर मी भिक्षा कशात घालू ?’ महाराज म्हणाले, ‘‘ मला चालेल. तुम्ही भिक्षा घाला.’’ त्यावर मंगलाबाई म्हणाल्या, ‘‘भिक्षापात्रात माती असताना त्यावर मी अन्न घालणार नाही.’’ हे ऐकून महाराज म्हणाले, ‘‘भिक्षापात्र स्वच्छ केल्यावरच तुम्ही भिक्षा घालणार ना. मग तोच तुम्हाला उपदेश आहे. काल तुम्ही दुःख आणि चितेनी ग्रासलेल्या होतात, तुमचे मन अस्वस्थ होते; मग मी तुम्हाला कसा उपदेश केला असता ?’’ गुरुचा उपदेश घेताना मन अगदी निर्मळ असायला हवे. तात्पर्य – मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो. १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले. १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला. १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला. १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली. २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली. २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला 💥 जन्म :- १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी १८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी १९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला १९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा १९४१: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे १९५२: अभिनेता ऋषी कपूर १९६२: यष्टीरक्षक किरण मोरे १९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव १९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर 💥 मृत्यू :- धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये भाविकांची व्हॅन 100 मीटर खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये 9 भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गंगोत्री हायवेवर घडली.* --------------------------------------------------- 2⃣ *भारत आणि सायप्रस यांच्यात दोन सामंजस्य करार* --------------------------------------------------- 3⃣ *पाकिस्तान समोरील कर्जाची समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान परदेशी अर्थतज्ज्ञांची घेणार मदत* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : गोकुळाष्टमी निमित्त पंढरपूर येथील पांडुरंगाला पारंपारिक अलंकाराची वेशभूषा, डोक्याला ११० फुटाचे आकर्षक पागोटे, हातात चांदीची काठी* --------------------------------------------------- 5⃣ *जम्मू-काश्मीर- पुलवामातील अनेक गावांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू; दहशतवादी घुसल्याची शक्यता* --------------------------------------------------- 6⃣ *भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने घेतला निवृत्तीचा निर्णय* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव; इंग्लंडचा मालिका विजय; भारतीय खेळाडू १८४ धावांत तंबूत परतले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक दिनानिमित्त प्रासंगिक लेख *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* वरील लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. https://goo.gl/T2FMmb आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला . त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1988 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूताणी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला. मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले. 1939 मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. 1931 साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली. 1952 साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते. 1957 च्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. 13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले. त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'जंतरमंतर' हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे ?* दिल्ली *२) उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये आढळणारी पाणकोंबडीसारखी कोंबडी कोणती ?* पेलिकल *३) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?* गुरू *४) निरनिराळ्या खनिजांनी बनलेल्या टणक, घनस्वरुपातील भूपृष्ठाच्या वरील आणि आतील भागास काय म्हणतात ?* खडक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • सुनील अस्वले • मुकेश धर्मले • जयेंद्र कुणे • श्रीपाद वसंत जोशी • संगमेश्वर नळगिरे • सायारेड्डी सामोड • मुकेश पटेल • अस्लम शहा • संतोष पेंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अहंकार* पायातला काटा निघाला की चालायला मजा येते जगायला तेंव्हा मजा जेंव्हा मनातून अहंकार वजा होते अहंकार वजा झाला की जगण्यात मजा आहे अहंकारा सोबत जगलात तर जगणं सजा आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 09* *साहेब तेरी साहिबी,* *सब घट रही समाय |* *ज्यो मेहंदी के पात में* *लाली राखी न जाय ||* अर्थ : निसर्ग शक्ती अगाध आहे. माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्गाविष्कारापुढे थिटा पडतो. पंच महाभुतांना रोखण्याचं सामर्थ्य अद्यापही मानवाला प्राप्त झालेलं नाही. माणूस पक्षागत अंतराळी उडत असला तरी आभाळ दाटल्यावर त्यातून वाट काढणं विमानांना कठीण होतं. धुकं फाकण्याची वाट बघावी लागते. निसर्ग निष्णात जादुगर आहे. इवल्या इवल्पा पंंखावर मखमल पेरून किती नजाकतदार रंगांच्या रांगोळी उमटवतो बरं पंखांवर फुलपाखरांच्या ! या अद्मूत निसर्ग चालक शक्तिलाच तर ईश्वर म्हटलं जातं. जगभर हा ईश्वर विभिन्न नावारूपानं मानल्या जातो. महात्मा कबीर याच शक्तीला साहेब म्हणतात. साहीबी म्हणजे या निसर्ग शक्तीनं सर्व घट म्हणजे सजीवांवर केलेली कारागीरी. त्यांना दिलेले सारखे आकार रंग रूप त्यात भरलेलं चैतन्य. हे सारं अनाकलनीयंच ! या सर्वाठायी तो भरून उरलाय. मेंदीच्या पानाला दिलेला हिरवा रंग. लावण्यापूर्वी दिसणारा तिचा शेवाळारंग हातावर लावला की खुलताना त्यात भरणारी लाली कुठून येते बरं ? ही सारी निसर्ग शक्तीचीच जादुगीरी ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे एक ध्येय निश्चित केलेले असते. ते ध्येय म्हणजे " जिंकू किंवा मरु..." समोर असलेल्या शत्रूला तोंड दिले तर आपण विजयी होऊ नाहीतर ठरवलेल्या ध्येयापासून थोडेजरी मन डळमळीत झाले तर निश्चित केलेले ध्येय पूर्ण करु शकत नाही. याचा अर्थ असा होतो की,आपण आपल्या ध्येयापासून दूर जात आहोत म्हणजे आपला पराभव निश्चित तर आहेच त्याचबरोबर आपला जीवही गमवावा लागत आहे. आपण आपल्या जीवनात अयशस्वी होत आहोत. त्यामुळे कोणताही जवान ध्येयापासून परावृत होत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात जर चांगले ध्येय निश्चित केले तर त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला लागा तरच ते ध्येय पूर्ण करु शकाल. नाही तर तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून दूर राहाल.नाहीतर आपणच आपले गुन्हेगार ठरु शकू. त्यामुळे आपल्या जीवनात नैराश्य तर येईलच आणि आपल्या जीवनात जगण्याला काही अर्थ राहणार नाही असे वाटायला लागेल. आपणच आपले अपराधी आहोत असे वाटायला लागेल. त्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने पुढे आगेकूच करायला लागा.तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका.मनाची सकारात्मकता डोळ्यासमोर ठेवून पुढे पुढे चालायला शिका म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच यशस्वी होऊ शकाल यात वादच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *नैराश्य - Depression* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्षमा करून सामंजस्यपणाने चूक सुधारणे* काशीला एक विद्वान पंडित रहात असत. त्यांचा मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास होता त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे जुन्या-नव्या ग्रंथांचा खूप मोठा संग्रह होता. त्यात एक अत्यंत प्राचीन असा तत्त्वज्ञानावरील दुर्मीळ ग्रंथ होता. पंडितांच्याकडे कधी सल्लामसलतीसाठी तर कधी धार्मिक किवा तात्त्विक चर्चेसाठी अनेक विद्वान पंडित, धर्मगुरु येत असत. एकदा एका धर्मगुरूंनी तो दुर्मीळ ग्रंथ वाचायला म्हणून घेतला आणि जाताना बरोबर नेला. ग्रंथाची चोरी लगेच लक्षात आली. ग्रंथ कोणी नेला हे पंडितांच्या लक्षात आले होते पण त्याबद्दल ते फारसे कोणाशी बोलले नाहीत. तिकडे त्या धर्मगुरूंनी तो ग्रंथ विकायला काढला. तो दुर्मीळ ग्रंथ त्यांनी एका श्रीमंत शेठजींना विकायच्या उद्देशाने दाखविला. पण ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हे माहिती करून घेण्यासाठी शेठजी तो ग्रंथ घेऊन त्या पंडितांकडे आले. पंडितांनी तो ग्रंथ पाहिला, ओळखला सुद्धा ! आणि म्हणाले,‘‘ग्रंथ अनमोल आहे.’’ हे ऐकताच शेठजींनी धर्मगुरूंना आपला होकार कळवला. धर्मगुरूंनी शेठजींना विचारले,‘‘तुम्ही हा ग्रंथ कुणाला दाखविलात ?’’ शेठजींनी उत्तर दिले, ‘‘अर्थातच पंडितांना !’’ त्यांचं हे उत्तर ऐकताच धर्मगुरू पंडितांकडे गेले, त्यांचा तो ग्रंथ त्यांना परत करत म्हणाले,‘‘पंडितजी मला क्षमा करा ! मी ग्रंथ चोरला आहे हे माहीत असूनही तुम्ही काहीच बोलला नाहीत. त्यावर पंडितजी हसून म्हणाले,‘‘पश्चातापाची जेव्हा भावना होते त्यावेळेस कोणीच ती चूक पुन्हा करीत नाही. कारण पश्चातापामुळे तो त्या चुकीतून बाहेर पडायला धडपडत असतो. *तात्पर्य – शिक्षेनी नाही तर क्षमा केल्याने चूक सुधारत असते.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव. ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ठळक घडामोडी - ३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले. १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला. १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली. १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले. १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले 💥 जन्म :- १९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज १९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल १९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे १९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार १९३१: नाटककार श्याम फडके १९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी १९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा १९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता १९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन १९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई १९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी १९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय 💥 मृत्यू :- १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर १९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे १९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद २०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर २०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *वॉशिंग्टनः पाकिस्तानला देण्यात येणारी 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत अमेरिकेने रोखली.* --------------------------------------------------- 2⃣ *सातारा : कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला असून पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी कोयनेतील विसर्ग वाढणार, सध्या धरणातून ११४८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे* --------------------------------------------------- 3⃣ *उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस, 24 तासांत 16 जणांचा मृत्यू.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन, केरळमधील पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात* --------------------------------------------------- 5⃣ *भाजपचे कुरुक्षेत्रचे बंडखोर खासदार राजकुमार सैनी यांनी लोकतंत्र सुरक्षा पार्टीची केली घोषणा* --------------------------------------------------- 6⃣ *ठाणे मॅरेथॉन : 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या रणजीत पटेल पहिला तर कोल्हापूरचा दीपक कुंभार दुसरा तर वेस्टर्न रेल्वेचा संतोष पटेल तिसऱ्या क्रमांकावर* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: 18 व्या आशियाई स्पर्धेचे सूप वाजले, 2022 मध्ये चीनमध्ये भरणार कुंभमेळा* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षकांचा सन्मानाचा दिवस* https://goo.gl/QyLSzf आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्री चक्रधर स्वामी* चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.[२]ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली. या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकर्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकर्यांचे पैसे परत केले.[३] या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला. गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले. सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव रिद्धपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) गोपाळ हरी देशमुखांनी कोणतं साप्ताहिक सुरू केलं ?* प्रभाकर *२) मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या नवीन राज्यांची स्थापना कधी झाली ?* २१ जानेवारी १९७२ *३) चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकार्यांची हत्या केली ?* रँड आणि आयस्र्ट *४) इंडियन नॅशनल युनियनचे संस्थापक कोण ?* अँलन ह्युम *५) इंडिया गेटची उंची किती ?* ४२ मीटर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 किरण गायकर 👤 राज कुमारे 👤 प्रदीप पंदिलवाड 👤 भीमराव सोनटक्के 👤 आशिष हातोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *त्यांना अन् यांना* कष्टक-याच्या घामाला अत्तराचा वास येतो कष्ट करतील तेंव्हा त्यांच्या पोटात घास जातो कष्ट करून खाल्लं तरच त्यांना गोड लागतो घास कुदडुस्तोर खाऊन यांना बसल्या जागी उपवास शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 08* *संगती सो सुख उपजे* *कुसंगति सो दुःख होय |* *कह कबीर तह जाइए* *साधू संग जहा होय ||* अर्थ : मराठीमध्ये एक म्हण आहे.' ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाही तरी गुण लागला.' तद्वत संगतीचे परिणाम दिसत असतात. महात्मा कबीर संगतीचे महत्त्व सांगताना म्हणतात . माणसाने सुसंगती धरली तर जीवन सुकर व आनंदी होते. जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित होवून जगणं उत्साही होतं. जीवनात आनंदाची निर्मिती झाली की समाधानाची आपोआप प्राप्ती होते. हाच तर जीवनाचा खरा उद्देश असतो. कुसंगतीमुळे माणूस वाईट बर्या वाईटाचा विचार करणं सोडून देतो. विविध विकारांनी मन दुषित होऊ लागतं. एकदा मन विखारी झालं की वर्तन दुराचारी व्हायला कितीसा अवकाश लागणार बरं ! म्हणतात ना 'मन चिंती ते वैरी न चिंती.' मनंच स्वत:शी प्रतारणा करू लागलं की माणूस स्वत:च्याच नजरेत कमी पडू लागतो. स्वत:च्याच नजरेतून उतरण्याची वेदना सलू लागते. यातून दु:खाची निर्मिती व्हायला लागते. एकदा का माणूस दु:खाच्या आहारी गेला की त्याचा खेळंच खल्लास ! पुन्हा तो उभारी घेणं महत्प्रयासाचंच. महाज्ञानी असूनही कर्ण दुर्योधनाच्या संगतीमुळे अधर्माची बाजू घेवून कायम अवहेलनेचा धनी बणून राहिला तर अर्जुन कृष्ण संगतीत राहून कर्मनिष्ठ होवून धर्मयोद्धा (न्याय धर्म) म्हणून अजरामर झाला. म्हणून माणसानं खर्या साधूची पारख करून सत्संगी व्हावं. सुसंगतीत स्वत:ला रमवावं. स्वत:च स्वत:च्या जीवनाला चांगलं घडवावं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्या जीवनात स्वत:च्या जीवनाकडे सातत्याने नकारात्मक दृष्टीने पाहते ती व्यक्ती कोणतीही प्रगती करु शकत नाही. तो दुस-याकडे त्याचदृष्टीने पाहत असल्यामुळे दुस-यांची होणारी प्रगतीही तो चांगल्या दृष्टीने पाहू शकत नाही. अशी माणसे आपल्या सभोवती असणेही आपल्याला आणि आपल्या जीवनात होणा-या प्रगतीला अडसरच आहे. अशा माणसासमोर चांगले सांगणेही वाईटच असते. अशापासून थोडे सावध असायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सावध - Cautious* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्याचं काम त्यानीच करावं* एकदा एक राजा आपल्या प्रधानाला बरोबर घेऊन शिकारीला जातो. मधेच थोडेसे ढग गोळा होऊन अंधारल्यासारखे वाटते. राजाबरोबर बराच लवाजमा असतो. पाऊस आला तर सुरक्षित जागा शोधायला हवी म्हणून राजा प्रधानाला विचारतो, ‘‘पाऊस पडेल असे तुम्हाला वाटते का ?’’ प्रधान त्यावर ‘‘काही सांगता येत नाही’’ असे उत्तर देतो. तेवढ्यात समोरून एक गुराखी येत असतो. राजा त्यालाही हा प्रश्न विचारतो. त्यावर गुराखी म्हणतो, ‘‘हो, थोडाच वेळाने पाऊस पडेल.’’ आणि थोडावेळाने खरोखर पाऊस पडतो. ते पाहून राजास प्रधानाचा राग येतो आणि इतके साधे उत्तर देता आले नाही म्हणून त्याचे पद काढून त्या जागी गुराख्याची नेमणूक करतो. काही दिवसांनी शत्रूचे राज्यावर आक्रमण होणार आहे अशी बातमी राजाला हेरांकडून समजते. तो नवीन प्रधानाला म्हणजे गुराख्याला युद्धाची तयारी करा अशी आज्ञा करतो. पण मुळात गुराखी असलेला प्रधान घाबरून ‘‘मला युद्धातले काही कळत नाही. मी काय करणार ?’’ असे राजाला सांगतो. तेव्हा राजाला आपली चूक लक्षात येते आणि तो आपल्या प्रधानाला पुन्हा बोलावून घेतो. :: तात्पर्य – ज्याचं काम त्यानीच करावं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार. १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. 💥 जन्म :- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.१९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष. १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी 💥 मृत्यू :- १५७४ - गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु १५८१ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आतापर्यंत 1027 कोटी रुपयांची मदत* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : पहिल्या तिमाहीत देशाच्या विकासदराची झेप, एप्रिल ते जूनदरम्यान विकासदर 8.2 टक्के.* --------------------------------------------------- 3⃣ *रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावररील खड्डे ८ सप्टेंबरपूर्वी भरणार - चंद्रकांत पाटील* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : सोलापूर शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम तीव्र, देगाव रोड येथे अतिक्रमण काढण्याचे काम महापलिकेच्या वतीने सुरू* --------------------------------------------------- 5⃣ *नाशिक : तुकाराम मुंढेंच्या अविश्वास ठरावावर प्रश्नचिन्ह, अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश* --------------------------------------------------- 6⃣ *एशियन गेम्स 2018: महिला हॉकीमध्ये रौप्यपदकावरच मानावे लागले समाधान, भारताच्या पुरुषांसह महिला हॉकी संघालाही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाने दिली हुलकावणी.* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 119 डावात सहा हजार धावा पूर्ण करीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला टाकले पिछाडीवर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांच्या प्रगतीसाठी* वरील लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *परमवीर चक्र* परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत. ग्रेनेडियर्स रेजिमेंट आणि गोरखा रायफल्स या पथकांना प्रत्येकी ३, शीख रेजिमेंट, कुमाऊँ रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स आणि द पूना हॉर्सेस या पथकांना प्रत्येकी २ पुरस्कार दिले गेले. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांपैकी लेफ्टनंट अर्देशर तारापोर हे सगळ्यात वरच्या पदाचे अधिकारी होते. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने १९८३-८५ दरम्यान पंधरा तेलवाहू जहाजे विकत घेतली. यांना त्यावेळच्या १५ परमवीरचक्र विजेत्यांची नावे दिली गेली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?* मा.प्रतिभाताई पाटील *०२) मास्टर विनायकचे पूर्ण नाव काय ?* विनायक दामोदर कर्नाटकी *०३) महाराष्ट्रातील सहकारी कारखान्याचे आद्य प्रवर्तक कोण ?* पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील *०४) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हटले जाते ?* दादासाहेब फाळके *०५) संत एकनाथ यांचा जन्म कोठे झाला ?* पैठण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * विजय भगत वाशीम * धनराज पाटील बाभळीकर * गणेश गिरी धर्माबाद * प्रल्हाद जाधव * कोंडीबा मुत्तलेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *विज्ञाननिष्ठ* विज्ञाननिष्ठ माणूस वाटतो भोळा आहे आजच्या विज्ञानाला कुठे नवा डोळा आहे आजच्या विज्ञानाला नवा डोळा असला पाहिजे विज्ञाननिष्ठ माणूस कधी भोळा नसला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 08* *रात गवई सोय के* *दिवस गवाया खाय |* *हीरा जन्म अनमोल था* *कौड़ी बदले जाय ||* अर्थ : महात्मा कबीर मनुष्य जन्माची दुर्लभता पटवून देतात. सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव जन्म दुर्मिळ असून विश्वाची चिंता वाहण्याचं सामर्थ्य फक्त मानव जन्मातच आहे. मानव प्राणी चिंतनशील व विचारशील आहे. इतरांपेक्षा मानवाला बुद्धी आणि बोलीच वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे तो जगताची काळजी वाहू शकतो. भल्या वाईटाचा विचार करू शकतो,परंतु हल्ली मानव स्वार्थांध झाला आहे. जग आपल्यामुळं सुंदर होवू शकतं. हा भावही तो जणू विसरूनच गेलाय की काय ? अशी परीस्थिती बनलीय. मानवाने विवेकी अन निरामय जगण्यातच त्याची जीवन सार्थकता आहे. परंतु हे मानवा तू देह विलासी बणून रात्र झोपून आळसात गमावत आहेस. दिवसचे दिवस देह शृंगारात व जिभीचे चोचले पुरवण्यातच तू मश्गूल होवून संपवून टाकत आहेस. अशा प्रकारे तू हिर्यासमान असणारा अनमोल असा मनुष्यजन्म उगाच कौडीचेही सार्थक न करता व्यर्थच वाया घालवत आहेस. अशा प्रकारे तुझ्या या जन्माला अर्थच काय राहिला बरे ? असे जगणे तर सर्लच पशू पक्षीही जगत असतात. पुढील संत सुवचन पहा. गेला गेला रे जन्म वाया । फुकाची झिजवली काया । नाही केला रे विचार । नराचा झाला रे खर । एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराने आपल्याला या जगात इतर जीवापेक्षा वेगळा जीव जन्माला घालून काहीतरी आपल्या हातून चांगले कृत्य घडावे म्हणून पाठवले आहे. मनुष्यजन्म हा इतर जीवजन्मापेक्षा सर्वश्रेष्ठ जन्म आहे हेही आपण नाकारू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या हातून काहीतरी सत्कृत्य घडावे, इतर जीवांना आपण आपल्यासारखाच जीव मानावा, त्यांची अवहेलना करु नये, संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जावे, आपण जशी सुखासाठी धडपड करत असतो मग इतर जीवांना का दु:ख द्यावे. परमेश्वराने सगळ्याच जीवांना समान जीव देऊन स्वतंत्रपणे जगण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे त्यांचे स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये ही भावना आपल्या अंत:करणात सतत ठेवून जगायला शिकले पाहिजे,केवळ आपल्या स्वार्थासाठी जगणे नाही तर इतरांसाठी जगणे हा सर्वात मोठा उद्देश आपल्या मनुष्यजन्माचा आहे हे आपण लक्षात ठेऊन मनुष्यजन्माचे सार्थक करावे. ही मनुष्यजन्माची संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून मनुष्य जन्माला विशेष महत्त्व आहे. या चांगल्या, सुंदर जन्माला कलंक लागू न देता जीवन जगायला शिकले पाहिजे तरच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्यरुपी प्रतिनिधींचे कार्य पूर्ण झाल्याचे समाधान वाटेल. नाही तर " आला जन्माला आणि गेला वाराला " असेच होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधान - Solution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= मन निर्मळ हवे देवदत्त अतिशय अस्वस्थ झाला होता. मानसिक ताणाबरोबर त्याची प्रकृतीही बिघडायला लागली होती. गावात एक सिद्ध साधू महाराज होते. देवदत्त त्यांच्याकडे गेला आणि आपली व्यथा सांगू लागला. ‘ ‘महाराज, अति विचार करून मी त्रासून गेलो आहे. या विचारांमुळे रात्र रात्र झोप येत नाही त्यामुळे अस्वस्थपणा फारच वाढतो. आता तर प्रकृतीवरही परिणाम होऊ लागला. यावर काहीतरी उपाय सांगा. ” त्या साधू महाराजांनी देवदत्ताला आपल्या एका स्नेह्याकडे पाठविले आणि त्यांच्याकडे राहून चार-पाच दिवस त्यांची दिनचर्या पाहून येण्यास सांगितले. देवदत्त गुरुंची आज्ञा मानून त्याच्या स्नेह्यांकडे राहून त्यांची सर्व दिनचर्या पाहून परत आला. तरीही या सर्व गोष्टींचा त्याला कांहीच . उलगडा झाला नाही. ‘ ‘तू तिथे काय पाहिलंस?” या साधू महाराजांच्या प्रश्नावर देवदत्त म्हणाला, ‘ अभ्यासण्यासारखी तुमच्या स्नेह्यांची दिनचर्या नाही. ते रात्री सर्व भांडी धुतात आणि रात्रभर त्यांच भांड्यांवर थोडीशी धूळ बसली असेल म्हणून सकाळी पुन्हा ती सर्व भांडी धुऊन काढतात. मी जरा आश्चर्यानेच त्यांना या प्रकाराबद्दल विचारले? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘ ‘मी या मंगल कार्यालयाची व्यवस्था बघतो. धुळीने भरलेली भांडी किंवा कार्यालयातील अस्वच्छता मला आवडत नाही. धुळीने भरलेली भांडी स्वच्छ’ करून ठेवणे माझे कर्तव्य आहे. म्हणून ती मी सकाळ संध्याकाळ स्वच्छ करतो. हे ऐकल्यावर साधू महाराज म्हणाले, ‘ ‘देवदत्ता, जे पाहायला हवं, समजून घ्यायला हवं ते तू समजून नाही घेतलंस. अरे, चित्त निर्मळ तर सुखच सुख. ” *'नाही निर्मळ मन काय करील साबण'.* तात्पर्य : रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम मनातील जाळी जळमटं काढून मन स्वच्छ करून रात्रीला आणि दिवसाला सुरुवात करावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ वर्गः पहिली / दुसरी विषयः गणित उपक्रमाचे नावः ओळख अंकाची. 👉उद्दिष्टः एकक दशक व शतकाची संकल्पना समजणे. 〰〰〰〰〰〰 *(ज्ञानरचनावाद) शैक्षणिक साहित्यः* १) एकक साठी सुट्या काड्या व दशक शतकासाठी काड्यांचे गठ्ठे २) सागरगोटे , मण्याची माळ नकली नोटा. .....इत्यादी ... कृतीः विद्यार्थ्यांच्या संख्येच्या लेखनाचा सरावासाठी व वाचनासाठी मुलांना दोन तीन गटात बसविणे. व त्यानंतर त्यांना काड्यांचे गठ्ठे व सुट्या काड्या देणे गटातील प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार त्या काड्या घेईल आणि बाजुला ठेवून देईल. त्यानंतर त्याने किती एकक दशक शतक ठेवले ते मोजेल आणि सर्वजण त्याचे निरीक्षण करून ती संख्या आपल्या वहित लिहितील *अंकात आणि अक्षरात* हा सराव घेत असताना विद्यार्थ्यांच्या अचूक लेखन व वाचनाचा सरावासाठी उजळणीचा वापर करण्यात येत आहे. असा सराव सागरगोटे शिरगोळे ह्याच्या साह्याने घेणे चालू आहे. गटाचा आवडीनुसार उपलब्ध साहित्याचा वापर केल्यास मुलांना लवकर समजेल आणि मनोरंजक वाटेल. हा सराव रोज , नेहमी घेणे आवश्यक आहे. *👉निष्पत्ती* - संख्या ओळख होणे. एकक दशक शतक ही संकल्पना स्पष्ट होते. 〰〰〰〰〰〰〰 ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.) जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला. १९६२ - त्रिनिदाद आणि टोबॅगोलायुनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले. 💥 जन्म :- १५६९ - जहांगीर, मुघल सम्राट. १८७० - मारिया मॉँटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ. १९४४ - क्लाइव्ह लॉईड,वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू. १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९५ -बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री १९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - चौथ्या BIMSTEC परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यासाठी रवाना* --------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारचा दिलासा, मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्याची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली* --------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून शासकीय कार्यालयांना वॉटर एटीएम भेट.* --------------------------------------------------- 4⃣ *सिंधुदुर्गः सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग* --------------------------------------------------- 5⃣ *नोटाबंदीनंतर 15 लाख नोकऱ्या गमावल्या, गरिबांच्या खिशात हात घालून पैसे काढण्यात आले आणि विकासदर 1 टक्का घसरला - अरुंधती रॉय* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी 4 हजार ठिकाणी काव्यांजली कार्यक्रम, अमित शाह यांची माहिती* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018 : भारताची सुवर्ण हॅट्ट्रिक हुकली, पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला रौप्यपदक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *यंदा कर्तव्य आहे* दैनिक जनशक्ती मध्ये प्रकाशित लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. http://epaper.ejanshakti.com/m5/1797019/Mumbai-Janshakti/31-08-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *भारतरत्न पुरस्कार* भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालिन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'बंगदर्शन' या वृत्तपत्राचे संस्थापक कोण ?* बंकिमचंद्र चट्टोपाध्याय *२) भारतीय अवकाश कार्यक्रमाचे पितामह कोण ?* विक्रम साराभाई *३) एएचक्यूचं विस्तारित रूप काय ?* आर्मी हेड क्वार्टर्स *४) छत्तीसगड या राज्यात किती जिल्हे आहेत?* २७ *५) अरवली पर्वत कुठे आहे ?* राजस्थान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * रत्नाकर कदम चोळखेकर * संतोष पाटील साखरे * सुभाष जाधव * सचिन वाघ * उदय मोहिते * अशोक जायवाड * साईनाथ वाघमारे * प्रकाश कल्याणकार * अशोक मुदलोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास* आपल्या स्वप्नांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांचे भविष्य निश्चित खास म्हणजे खास आहे ज्याला कधीही चांगले स्वप्न पडतात त्यांचे स्वप्न कधीतरी नक्की खरे ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 07* *माया छाया एक सी* *बिरला जाने कोय...* *भागत के पीछे लगे,* *सन्मुख भागे सोय...* अर्थ: संपत्ती आणि पडछायेचा स्वभाव एक सारखा असतो. दोन्हीच्याही ठाई चंचलता ओतप्रोत भरलेली आहे. फारच कमी माणसांना दोन्हींचा चल स्वभाव लक्षात येतो. मात्र अज्ञान व हव्यासासापोटी माणसं ऊर फुटेस्तोवर यांच्या मागे लागतात आणि या दोघी जणी पुढे पुढेच धावत असतात. मोहापोटी माणूस आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्तीच्या संग्रहाच्या मागे लागलेला आहे. चालता चालता माणूस संगत करणार्या सावलीकडे वळून मागे पाहतो तर सोबत असणारी सावली दूर दूर जायला लागते. संपत्तीचेही तसेच आहे. तिच्याकडे वळून पाहिले की तीही दूर जावू लागते. न थांबता आपल्या कर्तव्य पथावर धवणार्या माणसांच्या मागे निमुटपणे संपत्ती आणि सावली पाठीराख्यांसारख्या धावत असतात. म्हणून माणसानं कर्मावर ध्यान देवून संपत्तीचा मोह नाही दाखवला की ती सावलीसारखी आपोआप मागेमागे येत असते. निर्मोही व कर्तव्य तत्पर माणसेच लक्ष्मीपुत्र असतात. धन मोही मात्र लक्ष्मीदासंच समजावेत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण कुणालातरी नाव ठेऊन त्याचा अपमान करुन स्वत: मी काही वेगळा आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा तुम्ही त्यांच्यातील चुका सुधारण्यासाठी प्रेरीत करत आहात हे निश्चित आहे. परंतू आपल्यातल्या दोषांना किंवा चुकांना वृध्दींगत करण्याची संधी देत आहात हे लक्षात असू द्या. कारण आपल्या दोषांना सुधारण्यासाठी संधीच देत नाही. इतरांचे ऐकून घेण्यासारखी मनस्थिती नसते. इतरांचे दोष काढण्यात धन्यता मानता त्यामुळे इतरांना संधी मिळते तर आपली संधी आपल्याच गर्वापायी सुधारण्याची संधी गमावली जाते. असे न करता पहिल्यांदा आपल्यातील दोष शोधून आपणच सुधारण्याची संधी शोधली म्हणजे इतरांना उपदेश देण्याइतपत हक्क आपल्याला कदाचित मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपदेश - Preaching* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *करावं तसं भरावं* उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य डोक्यावर आला होता. एक वाटसरू आपल्या गांवाकडे चालला होता. दमलेल्या, थकलेल्या त्या वाटसरूची नजर एका डेरेदार आंब्याच्या झाडाकडे गेली. त्या झाडाची जमिनीवर चांगली सावली पडली होती. झाडाखाली थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून तो झाडाखाली आडवा झाला. थोड्या वेळातच त्याला झोप लागली. त्या झाडावर एक कोकिळा रहात होती. ती परोपकारी होती. वाटसरूच्या तोंडावर ऊन यायला लागले हे पाहून त्या वाटसरूला सावली कशी मिळेल याचा ती विचार करू लागली. तिला एक कल्पना सुचली. आपले पंख पसरून तिने वाटसरूवर सावली धरली. पण एका दुष्ट कावळ्याला हे पहावलं नाही. कोकिळेला त्रास व्हावा या उद्देशाने त्याने तोंडात धरून आणलेला हाडाचा तुकडा त्या वाटसरूच्या तोंडावर टाकला आणि स्वतः त्या झाडाच्या वरच्या शेंड्यावर जाऊन कोकिळेची होणारी फजिती बघत बसला. हाडाचा तुकडा तोंडावर पडताच वाटसरू जागा झाला. त्याने वर पाहिले त्याला कोकिळा दिसली. संतापून त्याने बाजूला पडलेला दगड उचलला आणि जोराने कोकिळेच्या दिशेने फेकला. दगड इतका जोरात गेला की कोकिळेवरचा नेम चुकून तो वरच्या फांदीवर बसलेल्या कावळ्याला लागला आणि तात्काळ त्याचा मृत्यू ओढवला. *तात्पर्य – करावं तसं भरावं.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. १८३५ - ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहराची स्थापना. १८३५ - अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना. १९८४ - स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन. 💥 जन्म :- १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. १९३० - वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती. १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १४२८ - शोको, जपानी सम्राट १९४९ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ* --------------------------------------------------- 2⃣ *पुरामुळे बंद केलेला केरळमधील कोची विमानतळ पासून पुन्हा सुरु* --------------------------------------------------- 3⃣ **पुणे - इयत्ता दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, बारावीप्रमाणे दहावीचा ही निकाल घसरला, यंदा 23.66 टक्के निकाल, मागील वर्षी 24.44 टक्के निकाल होता.** --------------------------------------------------- 4⃣ *बिग बी शेतकऱ्यांना देणार मदतीचा हात; शहिदांच्या कुटुंबांनादेखील करणार अर्थसहाय्य, 200 शेतकरी आणि 44 शहीद जवानांच्या कुटुंबांना करणारा मदत* --------------------------------------------------- 5⃣ *एन. टी. रामाराव यांचे पुत्र, तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि तेलुगू देसम पार्टीचे नेते नंदमुरी हरिकृष्ण यांचे भीषण अपघातात झाले निधन* --------------------------------------------------- 6⃣ *जालना : नंदुरबार येथे शासकीय अधिकाऱ्यास मारहाणीच्या निषेधार्थ जालना जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी महासंघाचे आज लेखणीबंद आंदोलन* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: तब्बल 48 वर्षांमध्ये भारताला तिहेरी उडीमध्ये पहिले सुवर्णपदक, भारताला अरपिंदर सिंगने तिहेरी उडीमध्ये जिंकवून दिले सुवर्णपदक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दर गुरुवारी प्रकाशित होणारे शैक्षणिक सदर *उपक्रमातून शिक्षण* *क्रांतिकारकांच्या आठवणीने भारावलेली पिसवली शाळा - अजय लिंबाजी पाटील, ठाणे* http://shikshakmitr.blogspot.com/2018/08/blog-post.html आपण ही आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम खालील मोबाईल क्रमांकावर whatsapp द्वारे पाठवू शकता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *घृष्णेश्वर मंदिर* घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिरअसून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) पुष्कर मेला कोठे भरतो ?* - जयपुर *०२) आजाद हिन्द फ़ौजची स्थापना कोठे झाली ?* - सिंगापुर *०३) क्षेत्रफळाच्याबाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक आहे ?* - सातवा *०४) जाकिर हुसैन कशाशी संबंधित आहेत ?* - तबला *०५) लाल बहादुर शास्त्री यांचीसमाधीकोठे आहे ?* - विजय घाट *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * अरुण चव्हाण * नागभूषण माकोड, येवती * गणेश बोळसेकर * दिलीप झरेकर * कृष्णा श्याम दाभडकर * नीरज नागभूषण दुर्गम * नागेश कुऱ्हाडे * माधुरी हतनुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसतं तसं नसतं* दिसतं तसं अगदी सर्व असतं नाही दिसतं तसं नसतं लक्षात ठेवा माणूस फसतं नाही दिसतं त्यापेक्षा कुठेही फार वेगळ असतं विश्वास बसणार नाही असंच सगळं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 06* *पत्ता बोला वृक्ष से* *सुनो वृक्ष बनराय |* *अब के बिछड़े न मिले* *दूर पड़ेंगे जाय ||* अर्थ : संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे. पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्या पान अन मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण कुणालातरी नाव ठेऊन त्याचा अपमान करुन स्वत: मी काही वेगळा आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा तुम्ही त्यांच्यातील चुका सुधारण्यासाठी प्रेरीत करत आहात हे निश्चित आहे. परंतू आपल्यातल्या दोषांना किंवा चुकांना वृध्दींगत करण्याची संधी देत आहात हे लक्षात असू द्या. कारण आपल्या दोषांना सुधारण्यासाठी संधीच देत नाही. इतरांचे ऐकून घेण्यासारखी मनस्थिती नसते. इतरांचे दोष काढण्यात धन्यता मानता त्यामुळे इतरांना संधी मिळते तर आपली संधी आपल्याच गर्वापायी सुधारण्याची संधी गमावली जाते. असे न करता पहिल्यांदा आपल्यातील दोष शोधून आपणच सुधारण्याची संधी शोधली म्हणजे इतरांना उपदेश देण्याइतपत हक्क आपल्याला कदाचित मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बेवारस - Helpless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा* रविवारचा दिवस होता. पाय मोकळे करावे म्हणून घराबाहेर पडलो. फिरता फिरता मुख्य बाजाराच्या रस्त्यावर आलो. रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे बरीच दुकानं बंद होती. रस्त्यावर रहदारी सुद्धा तुरळक होती. मी रमत गमत निघालो होतो. तोच कांही अंतरावर एका बंद दुकानाच्या समोर बरीच गर्दी जमलेली दिसत होती. उत्सुकतेपोटी मी ही त्या गर्दीत सामील झालो. प्रत्येकजण दुकानाच्या पायरीच्या दिशेने पहात होता. मी पण डोकावून पाहू लागलो. दुकानाच्या पायरीवर एक स्वच्छ कापडी पिशवी ठेवलेली दिसत होती आणि ती कशाने तरी गच्च भरलेली होती. त्या पिशवीचा कोणी वारसदार तिथे नव्हता. त्यामुळे त्या पिशवी बद्दल प्रत्येकाच्या मनांत शंका येत होती. गर्दीतील प्रत्येक व्यक्ती त्या बेवारस पिशवीकडे पहात आपलं मत मांडत होती. एकजण म्हणाला, ‘‘कोणी यात्रेकरू चुकून विसरून गेलेला दिसतो आहे.’’ त्यावर दुसरा उद्गारला, ‘छे छे कांहीतरी चोरीची भानगड असावी. तर तिसर्याला वेगळीच शंका, ‘‘कशावरून आंतमध्ये काही वेगळे असू शकते. तात्पर्य – व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/08/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन* *भारतीय क्रीडा दिन* *तेलगू भाषा दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९७४ - चौधरी चरण सिंह यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली. 💥 जन्म :- १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू. १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक. १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : महापुरामुळे केवळ केरळवासियांसाठीच केंद्र सरकराने प्राप्तिकर भरण्याची मुदत वाढविली असून ती आता 15 सप्टेंबरपर्यंत केली आहे.* --------------------------------------------------- 2⃣ *उत्तर प्रदेशात 30 पोलीस अधिका-यांच्या करण्यात आल्या बदल्या* --------------------------------------------------- 3⃣ *पुणे - इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार ऑनलाइन जाहीर* --------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : डीबीटी रद्द करावी या मागणीसाठी स्टुटंड फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा* --------------------------------------------------- 5⃣ *चेन्नई - तामिळनाडूचे माजी अध्यक्ष एम. करुणानिधी यांना भारतरत्न देण्याची डीएमकेची मागणी* --------------------------------------------------- 6⃣ *डॉ. अविनाश सुपे यांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. बी सी रॉय पुरस्कारासाठी निवड* --------------------------------------------------- 7⃣ *एशियन गेम्स 2018: मनजित सिंगने जिंकले अॅथलेटीक्समध्ये सुवर्ण* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *तुझी जात कंची ?* मुंबईहुन प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. http://epaper.ejanshakti.com/m5/1794308/Mumbai-Janshakti/29-08-2018#page/4/1 जरूर वाचावे आणि आवडल्यास share पण करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *केदारनाथ* केदारनाथ हे भारताच्या उत्तराखंडराज्यामधील एक लहान गाव आहे. केदारनाथ येथील अतिप्राचीन केदारनाथ मंदिरासाठीप्रसिद्ध आहे. भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड ह्या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) इ.स.१७७४ मध्ये भारतात कुठे कोळशाची पहिली खाण उत्पादनक्षम झाली ?* राणीगंज *२) 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन'ची स्थापना कधी झाली ?* १९ जुलै १९९० *३) भारतातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय कुठे आहे ?* अलिपूर कोलकाता *४) 'लोकनायक' ही पदवी कुणाला दिली गेली ?* जयप्रकाश नारायण *५) उत्तर प्रदेशमध्ये किती जिल्हे आहेत ?* ७५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * योगिता सुरेश येवतीकर, नांदेड * शिवराज पाटील चोळाखेकर * आशिष जैन * रवींद्र केंचे * गणेश येडमे * ईश्वर सेठीए * सचिन बावणे * विनायक कुटेवाड * योगेश ढगे पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिखावा* हल्ली कामं कमी अन् दिखावा जास्त आहे प्रथम पहाणाराला वाटते हे एकदम मस्त आहे काम कमी अन् दिखावा जास्त व्हायला नको दिखावा करता करता महत्वाचे काम रहायला नको शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 06* *पांच पहर धंधा किया,* *तीन पहर गया सोय |* *एक पहर भी नाम बिन* *मुक्ति कैसे होय ||* अर्थ : दिवसाचे दिन आणि रात्र असे दोन भाग होतात. रात्रीचे चार प्रहर व दिनाचे चार प्रहर असतात. असे एका दिवसाचे आठ प्रहर होतात. त्यापैकी पाच प्रहर म्हणजेच पंधरा तास माणूस नित्याच्या दैनंदिन धावपळीत व्यथित करीत असतो. सहजतेने इतका वेळ नोकरी-चाकरी , मनोरंजन, आदि बाबीत उडवित असतो. तीन प्रहर म्हणजे नऊ तासांचा वेळ दररोज झोपण्यात निघून जातो. खरे तर मनुष्य जन्म इत्तर प्राण्यांपेक्षा भिन्न आहे. बुद्धी आणि बोली यांच्या वेगळेपणामुळे मनन, चिंतन ,चर्चा संवाद-सुसंवाद यांचे माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाचा वारसा मानव प्राणीच चालवू शकतो. गरज आहे ती आपल्या अष्टौ प्रहरापैकी अर्धा-एखाद प्रहर स्वार्थविरहित निरामय भावनेने जीवनाकडे बघण्याची. असा संकल्प सर्वांनी केला तर या अशा प्रगल्भ जगण्यानं या विश्वाचंं कल्याणंच होईल. सर्वांच्या दुःखाच्या व्याधीचं परिमार्जन होईल. अनावश्यक लालसा, मोह टाळता आले तर पृथ्वीवर नंदनवन बनवायला किती अवकाश लागणार आहे ! व्याधी व वेदना मुक्तीचा तोच तर खरा महामार्ग असणार आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे. कारण धनाच्या श्रीमंतीने त्याच्यामध्ये जगातल्या उपभोग्य वस्तू खरेदी करुन तात्पुरता आनंद मिळवता येतो आणि तोही स्वत:साठी. दुसरे असे की, माणसे जोडण्याऐवजी तोडण्यातच तो यशस्वी होतो. एखादी कुणी जरी व्यक्ती आली तरी त्यांच्या मनात फक्त पैसे मागण्यासाठीच आला आहे अशी शंका निर्माण होते. त्यामुळे नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचीच भूमिका त्यांच्या अंगी असते. अशा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही सदैव इतरांच्या मनावर राज्य करत जीवन व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करते. एकमेकांची मने ओळखण्याचे काम, सुखदुःख जाणणे, संकटकाळी धाऊन जाणे, आपले मन कुठेतरी मोकळे करणे, नातेसंबंध दृढ करणे ह्या सा-या गोष्टी मनाच्या श्रीमंती असणा-यामध्ये सदैव वास करत असतात. अशी माणसे सदैव नवीन काहीतरी शोधत असतात की जे आपले आणि इतरांचे नाते दृढ करतात. अशा माणसांमध्ये स्वार्थ, मतभेद, दुरावा, गर्व अशा प्रवृत्ती कधीही वास करत नाहीत. म्हणून मनाची श्रीमंती ही सर्वमान्य असून एक सशक्त समाज घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रवृत्ती - Tendency* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *१००० आरशांची खोली* एका अध्यात्मिक गुरु ना एका माणसाने विचारले "माझे कामगार माझ्याशी प्रामाणिक नाहीत. पत्नी, मुलं, सगळं जग हे स्वार्थी आहे. सगळे चुकीचेच वागतात. अस का?" तेव्हा गुरु हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली. एका गावात एक खोली होती. त्या खोलीत १००० आरसे होते. त्यात खोलीत एक छोटी मुलगी खेळायला जायची. अर्थातच तिला तिच्या भोवती अनेक मुली दिसायच्या. ती खुश व्हायची. ती हसली की त्या सगळ्या हसायच्या. तिने टाळ्या वाजवल्या की त्या सगळ्या टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे तिला ती खोली म्हणजे सर्वोत्तम जागा वाटायची. त्याच खोलीत एकदा एक खूप त्रासलेला, एकदम नाराज माणूस शिरला. त्याला त्याच्या भोवती सगळे चिडलेले, नाराज ,अस्वस्थ चेहरे दिसायला लागले. ते सगळे त्याच्याकडे रोखून पहात होते. त्याने एकदम भडकून त्यांच्यावर हात उगारला तर त्या सगळ्यांनी ही त्याच्यावर हात उगारला. त्याच्या मनात विचार आला अरेच्या काय ही खोली. जगात यापेक्षा वाईट जागा नसेल. हे जग म्हणजे अशाच हजारो आराशांची मोठी खोली आहे. आपण जसे असू तसे त्या आरशातून दिसू. जग म्हणजे स्वर्ग की नरक हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसं पाहू तसं ते दिसेल." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान 💥 जन्म :- १९२५ - नारायण धारप, मराठी लेखक १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल १९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *2019ची लोकसभा निवडणूक आणि 2018मध्ये होणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता सोशल मीडियावर ठेवणार करडी नजर* --------------------------------------------------- 2⃣ *आर. के. स्टुडिओ होणार इतिहासजमा, कपूर कुटुंबाने घेतला विकण्याचा निर्णय !* --------------------------------------------------- 3⃣ *अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला दाखल.* --------------------------------------------------- 4⃣ *डेहराडून- बेबी राणी मौर्य यांनी स्वीकारला उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा पदभार* --------------------------------------------------- 5⃣ *रत्नागिरी - केरळ पुरग्रस्तांसाठी आनंदवनातील कुष्टरोग्यांच्यावतीने डॉ. विकास आमटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला रामगिरी येथे पाच लाख रुपयांचा धनादेश* --------------------------------------------------- 6⃣ *आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सायना नेहवालला.* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासने 45.69 सेकंदाची वेळ नोंदवली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= राखीपौर्णिमा दिनानिमित्त प्रासंगिक कथा *रक्षाबंधन* https://goo.gl/ZUSUiy वरील कथा वाचल्यावर आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *काशी विश्वेश्वर* विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवणूक निघाली. कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने 'मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला' अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले. अशी आख्यायिका सांगितली जाते. या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचेआहे. विश्वनाथाचे दर्शनाअगोदर धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे. या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत. साक्षी विनायक, पश्चिमेला देहली विनायक, उत्तरेला पापशार्थी विनायक, दक्षिणेला दुर्गा विनायक, नैऋत्येला भीमचंद विनायक, वायव्येला उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक. काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे. त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे. तेथे दर्शन घ्यावयाचे तर तीन हार न्यायची पद्धत आहे. एक हार शंकराला, दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पाकव्याप्त काश्मीरची राजधानी कोणती ?* मुझफ्फराबाद *२) 'सेव्हन सिस्टर्स' म्हणून भारतातील कोणत्या भागाला संबोधले जाते ?* ईशान्य भारतातील सात राज्यं *३) दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा हक्क अमान्य करून आंतराष्ट्रीय लवादाकडे कुठल्या देशाने धाव घेतली होती ?* फिलिपिन्स *४) केळीचं सर्वाधिक उत्पादन कुठे होतं ?* तामिळनाडू *५) लष्करातील सर्वोच्च हुद्दा कोणता ?* जनरल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अतुल वैद्य 👤 दत्तप्रसाद सुरकूटवार 👤 प्रशांत रुईकर 👤 बोसू वंगरा 👤 दिगंबर सोळंखे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अस्सल* सोन्यालाच अग्निची परीक्षा द्यावी लागते सोन्याला संकटात खंबीर व्हावे लागले अस्सल ते कोणत्याही कसोटीवर तरले जाते जे खरे आहे ते कुठेही खरे ते खरे ठरले जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 04* *तीर तुपक से जो लादे* *सो तो शूर न होय |* *माया तजि भक्ति करे* *सूर कहावै सोय ||* अर्थ : भात्यात ठेवुनी तीर बनतो का कुणी शुर पाश मायेचे त्यागिता भक्ता देव नसे दूर उगाच पाठीवर भात्यात बाण भरले. खांद्यास धनुष्य अडवून फिरले म्हणून कोणीही महान योद्धा होत नाही. त्यासाठी मरणाचे भय दूर सारून हाती तीरकमटा घ्पावा लागतो. प्रत्यंचा ओढून वेध घेण्यासाठी लक्ष्यावर शर सोडता आला पाहिजे. वेळ प्रसंगी समोरून येणार्या बाणांना छातीवर झेलण्याची तयारी ठेवतो तोच खरा योद्धा . मोह मायेचे फसवे पाश फेकून देवून निरपेक्ष भावनेतून जो ईश्वराची भक्ती करतो. सत्कार्यासाठी तत्पर असतो.त्यालाच ईश्वर प्राप्ती होत होत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगी नम्रता आहे त्यांच्या जीवनात समाधान नांदत असते. त्याचे कारणही तसेच आहे.अशी माणसे दुस-यांच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करीत नाहीत, दुस-यांबद्दल वाईट विचार आपल्या मनात आणत नाहीत, राग-द्वेष-मत्सर ही भावना दुस-याबद्दल करीत नाहीत, ते स्वत: प्रांजळ मतांचे असल्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही अधम कृत्य घडत नाही. सदैव इतरांचा आदर सन्मान करत असतात. अशा सद्गुणी माणसांच्या सहवासात राहिल्याने आपल्यातील असणारे दोष दूर तर होतीलच त्याचबरोबर आपल्यामध्ये नम्रताही हळूहळू वृध्दींगत होऊन आपल्या जीवनात खरे जीवन जगत आहोत ही सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होईल. जीवनात सुखी व समृध्द व्हायचे असेल तर नम्रता ही अंगिकारली पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संशय - Doubt* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याचा विजय* गोविंदा एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला होता. पण लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आपले व आईचे पोट भरण्यासाठी त्याला एका सरदाराच्या घरी चाकरी करावी लागली. गोविंदाला त्या घरात घराची साफसफाई करणे, देवघर साफ करणे, पूजेची तयारी करणे याशिवाय कावडीने विहिरीचे पाणी भरायचे कामसुद्धा त्याच्याकडेच होते. सर्व कामं होता होता दिवस संपत असे त्याला रिकामा असा वेळच मिळत नसे. पण आज वडिलांच्या पश्चात त्याचा आणि आईचा उदारनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एक दिवस वाड्यात गोंधळ झाला होता. सरदार अतिशय रागवलेले होते. वाड्यात प्रत्येकजण कांहीतरी शोधत होता. सरदारांची हिऱ्याची अंगठी हरविली होती. आजपर्यंत वाड्यात कधी वस्तू हरविली नव्हती. गोविदा नवीनच वाड्यात यायला लागला होता त्यामुळे त्याच्यावरच संशय होता. त्याला बोलावून त्याबद्दल विचारले असता, ‘‘मी चोरी केलेली नाही’’ ठामपणे त्याने उत्तर दिले. पण सरदारांनी गोविंदाला देवघरात नेले व देवावरील फूल उचलून खरे बोलण्यास सांगितले. फूल उचलत गोविंदा म्हणाला, ‘‘देवा मी चोरी केलेली नाही. आता खरं काय ते तूच सांग’’ तेवढ्यात सरदारांचे लक्ष देवघरातल्या तीर्थ असलेल्या ताम्हनात गेले. त्यांना त्यात कांहीतरी चमकल्यासारखे वाटले. पाहातात तो अंगठी पूजा करताना त्यात गळून पडली होती. सरदारांनी गोविंदाला, ‘‘तू चोर नाहीस !’’ अशी कबुली दिली. त्यावर गोविदाने देवाला हात जोडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘सत्याचा वाली परमेश्वर !’’ *तात्पर्य – शेवटी सत्याचाच विजय असतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ======= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान 💥 जन्म :- १९२५ - नारायण धारप, मराठी लेखक १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल १९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *2019ची लोकसभा निवडणूक आणि 2018मध्ये होणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता सोशल मीडियावर ठेवणार करडी नजर* --------------------------------------------------- 2⃣ *आर. के. स्टुडिओ होणार इतिहासजमा, कपूर कुटुंबाने घेतला विकण्याचा निर्णय !* --------------------------------------------------- 3⃣ *अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला दाखल.* --------------------------------------------------- 4⃣ *डेहराडून- बेबी राणी मौर्य यांनी स्वीकारला उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा पदभार* --------------------------------------------------- 5⃣ *रत्नागिरी - केरळ पुरग्रस्तांसाठी आनंदवनातील कुष्टरोग्यांच्यावतीने डॉ. विकास आमटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला रामगिरी येथे पाच लाख रुपयांचा धनादेश* --------------------------------------------------- 6⃣ *आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सायना नेहवालला.* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासने 45.69 सेकंदाची वेळ नोंदवली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= राखीपौर्णिमा दिनानिमित्त प्रासंगिक कथा *रक्षाबंधन* https://goo.gl/ZUSUiy वरील कथा वाचल्यावर आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *काशी विश्वेश्वर* विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवणूक निघाली. कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने 'मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला' अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले. अशी आख्यायिका सांगितली जाते. या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचेआहे. विश्वनाथाचे दर्शनाअगोदर धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे. या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत. साक्षी विनायक, पश्चिमेला देहली विनायक, उत्तरेला पापशार्थी विनायक, दक्षिणेला दुर्गा विनायक, नैऋत्येला भीमचंद विनायक, वायव्येला उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक. काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे. त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे. तेथे दर्शन घ्यावयाचे तर तीन हार न्यायची पद्धत आहे. एक हार शंकराला, दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पाकव्याप्त काश्मीरची राजधानी कोणती ?* मुझफ्फराबाद *२) 'सेव्हन सिस्टर्स' म्हणून भारतातील कोणत्या भागाला संबोधले जाते ?* ईशान्य भारतातील सात राज्यं *३) दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा हक्क अमान्य करून आंतराष्ट्रीय लवादाकडे कुठल्या देशाने धाव घेतली होती ?* फिलिपिन्स *४) केळीचं सर्वाधिक उत्पादन कुठे होतं ?* तामिळनाडू *५) लष्करातील सर्वोच्च हुद्दा कोणता ?* जनरल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अतुल वैद्य 👤 दत्तप्रसाद सुरकूटवार 👤 प्रशांत रुईकर 👤 बोसू वंगरा 👤 दिगंबर सोळंखे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अस्सल* सोन्यालाच अग्निची परीक्षा द्यावी लागते सोन्याला संकटात खंबीर व्हावे लागले अस्सल ते कोणत्याही कसोटीवर तरले जाते जे खरे आहे ते कुठेही खरे ते खरे ठरले जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 04* *तीर तुपक से जो लादे* *सो तो शूर न होय |* *माया तजि भक्ति करे* *सूर कहावै सोय ||* अर्थ : भात्यात ठेवुनी तीर बनतो का कुणी शुर पाश मायेचे त्यागिता भक्ता देव नसे दूर उगाच पाठीवर भात्यात बाण भरले. खांद्यास धनुष्य अडवून फिरले म्हणून कोणीही महान योद्धा होत नाही. त्यासाठी मरणाचे भय दूर सारून हाती तीरकमटा घ्पावा लागतो. प्रत्यंचा ओढून वेध घेण्यासाठी लक्ष्यावर शर सोडता आला पाहिजे. वेळ प्रसंगी समोरून येणार्या बाणांना छातीवर झेलण्याची तयारी ठेवतो तोच खरा योद्धा . मोह मायेचे फसवे पाश फेकून देवून निरपेक्ष भावनेतून जो ईश्वराची भक्ती करतो. सत्कार्यासाठी तत्पर असतो.त्यालाच ईश्वर प्राप्ती होत होत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगी नम्रता आहे त्यांच्या जीवनात समाधान नांदत असते. त्याचे कारणही तसेच आहे.अशी माणसे दुस-यांच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करीत नाहीत, दुस-यांबद्दल वाईट विचार आपल्या मनात आणत नाहीत, राग-द्वेष-मत्सर ही भावना दुस-याबद्दल करीत नाहीत, ते स्वत: प्रांजळ मतांचे असल्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही अधम कृत्य घडत नाही. सदैव इतरांचा आदर सन्मान करत असतात. अशा सद्गुणी माणसांच्या सहवासात राहिल्याने आपल्यातील असणारे दोष दूर तर होतीलच त्याचबरोबर आपल्यामध्ये नम्रताही हळूहळू वृध्दींगत होऊन आपल्या जीवनात खरे जीवन जगत आहोत ही सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होईल. जीवनात सुखी व समृध्द व्हायचे असेल तर नम्रता ही अंगिकारली पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संशय - Doubt* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याचा विजय* गोविंदा एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला होता. पण लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आपले व आईचे पोट भरण्यासाठी त्याला एका सरदाराच्या घरी चाकरी करावी लागली. गोविंदाला त्या घरात घराची साफसफाई करणे, देवघर साफ करणे, पूजेची तयारी करणे याशिवाय कावडीने विहिरीचे पाणी भरायचे कामसुद्धा त्याच्याकडेच होते. सर्व कामं होता होता दिवस संपत असे त्याला रिकामा असा वेळच मिळत नसे. पण आज वडिलांच्या पश्चात त्याचा आणि आईचा उदारनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एक दिवस वाड्यात गोंधळ झाला होता. सरदार अतिशय रागवलेले होते. वाड्यात प्रत्येकजण कांहीतरी शोधत होता. सरदारांची हिऱ्याची अंगठी हरविली होती. आजपर्यंत वाड्यात कधी वस्तू हरविली नव्हती. गोविदा नवीनच वाड्यात यायला लागला होता त्यामुळे त्याच्यावरच संशय होता. त्याला बोलावून त्याबद्दल विचारले असता, ‘‘मी चोरी केलेली नाही’’ ठामपणे त्याने उत्तर दिले. पण सरदारांनी गोविंदाला देवघरात नेले व देवावरील फूल उचलून खरे बोलण्यास सांगितले. फूल उचलत गोविंदा म्हणाला, ‘‘देवा मी चोरी केलेली नाही. आता खरं काय ते तूच सांग’’ तेवढ्यात सरदारांचे लक्ष देवघरातल्या तीर्थ असलेल्या ताम्हनात गेले. त्यांना त्यात कांहीतरी चमकल्यासारखे वाटले. पाहातात तो अंगठी पूजा करताना त्यात गळून पडली होती. सरदारांनी गोविंदाला, ‘‘तू चोर नाहीस !’’ अशी कबुली दिली. त्यावर गोविदाने देवाला हात जोडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘सत्याचा वाली परमेश्वर !’’ *तात्पर्य – शेवटी सत्याचाच विजय असतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ======= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत बहिणाबाई चौधरी यांची 139 वी जयंती* * 💥 ठळक घडामोडी :- १९९१ - युक्रेनला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. १९९२ - चीन व दक्षिण कोरियाने राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित केले. १९९२ - हरिकेन अँड्रु हे कॅटेगरी ५चे वादळ फ्लोरिडाच्या किनार्यावर आले. १९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. २००६ - आंतरराष्ट्रीय खगोल संघाने प्लुटो हा ग्रह नसल्याचे ठरवले 💥 जन्म :- १८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक १८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू :- १९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पाटणा- लालजी टंडन यांनी स्वीकारला बिहारच्या राज्यपालपदाचा पदभार* --------------------------------------------------- 2⃣ *पुणे - 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल* --------------------------------------------------- 3⃣ *जालना - शहरातील मोंढा मार्केटमध्ये नगरपालिकेच्या कारवाईत ५ लाख रुपयाचे तीन टन प्लास्टिक जप्त* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची केरळसाठी २५ लाखांची मदत, पूरग्रस्तांसाठी पंढरपूरचा पांडुरंग पावला* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - एसटी महामंडळाकडून केरळ पूरग्रस्तांसाठी 10 कोटींचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द* --------------------------------------------------- 6⃣ *ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन, नवी दिल्लीमध्ये त्यांच्या पार्थिवावर झाले अंत्यसंस्कार.* --------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - कानमंत्र* http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रामेश्वरम* रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये स्थित असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. रामेश्वरम श्रीलंकेच्या मन्नार द्वीपासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर स्थित आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= नियम अगदी थोडा असावा, पण तो प्राणपलीकडे जपावा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) व्हॉलीबॉलच्या मैदानाची लांबीरुंदी किती असते?* 👉 १८× ९ मीटर *२) खो-खो च्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉 २७× १६ मीटर *३) फूटबॉलच्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉 १२०×९० मीटर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीकांत भुजबळ, तहसीलदार 👤 श्याम ठाणेदार, पुणे 👤 सुनीलकुमार बावस्कर 👤 गोपाळ ऐनवाले, धर्माबाद 👤 संजय पाटील 👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद 👤 ऋषिकेश शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* मोठ्यांच्या सावलीत छोटं वाढत नाही मोठ्याने वाढवले असे कुठे घडत नाही मोठयांची अपेक्षा मोठी मोठी असते मोठा वाढवली ही अपेक्षा खोटी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 03* *जो तू चाहे मुक्ति को* *छोड़ दे सबकी आस |* *मुक्त ही जैसा हो रहे* *सब कुछ तेरे पास ||* अर्थ : माणसाला जर या मायावी जगात मुक्त जीवन जगायचे असेल तर मोहविणार्या बाबींचा मोह धरून चालणार नाही. त्या बाबींबद्दलची आसक्ती सोडावीच लागेल. गरजेपुरत्या वस्तूंचा संचय करायला शिकले पाहिजे. उगाच संचय वाढवला तर त्या वस्तू जवळ असूनही त्यांचा मनमुराद आस्वाद घेणंही जमणार नाही. त्यांच्या रक्षणातच जीवनाचा आनंदही गमावून बसावे लागेल. अनाठायी संचय करणे सोडून देता आले पाहिजे. तरच जीवन सुखी व समाधानी होईल. जीवनातल्या हावरट गरजा कमी केल्या की जगणं हलकं फुलकं व सोपं होतं. त्या गोष्टींसाठी माणसाला अनाठायी संघर्ष करण्याऐवजी तो जरा मुक्त राहू लागला तर त्या गोष्टी आपसुकंच माणसाच्या पुढ्यात आलेल्या असतील. मुक्ती आणि प्रबळ आसक्ती एकत्र नांदूच शकत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्यापैकी किंवा तुमच्यातलीच एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात खूप काही चांगले काम करत असेल तर त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा म्हणजे ते अधिक जोमाने काम करतील आणि त्या निवडलेल्या क्षेत्रात अधिक, अद्वितीय कामगिरी करुन ते स्वत:चे आणि तुमचेही नावलौकिक करतील. तुमची प्रेरणा हेच त्यांच्या यशाचे खरे रहस्य असेल. पण तुम्ही असे करु नका की, तो आपल्यापुढे चालला आहे त्याचा आपल्याला काय फायदा ?असं म्हणून त्यांचे पाय मागे खेचू नका किंवा त्यांच्या प्रगतीत अडथळा ही आणू नका.कारण त्यांच्या होणा-या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचे कारण तुम्ही बनू नका.असे न करता केव्हाही जर कोणी चांगले काम करत असेल तर त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून थोड्यातरी तुमच्या अंत:करणातून शुभेच्छा द्या म्हणजे त्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी मूठभर मांस चढेल हे निश्चित *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *खंबीर - Steadfast* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चाणक्यनीती* एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्रा बद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का? 'एक मिनिट थांबा' चाणक्ने उत्तर दिले. 'काही सांगण्या पूर्वी मी थोडाशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला.' ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल? ती व्यक्ती म्हणाली, 'तिहेरी फिल्टर?' ठीक आहे. चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्रा बद्दल माझ्याशी बोलण्या पूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो, आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का? ' थोडस थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही,' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि .......' 'ठीक आहे,' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खर आहे, याची खात्री नाही तुम्हाला?, आता दुसरा फिल्टर, आता चांगुल पणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्रा बद्दल काही तरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?' ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट ........' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,' तू मला त्याच्या बद्दल काही तरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे, आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर..... जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय?' 'नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही' ती व्यक्ती ओशाळत म्हणाली. 'ठीक आहे,' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता, *ते ना सत्य आहे,* *ना चांगले आहे ,* *ना मला उपयोगी आहे,* तर मला ते का सांगता आहात?' प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रियजना बद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. मैत्रीवर भरवसा ठेवा, *हे तिहेरी फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे. आपसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे तिहेरी फिल्टर आचरणात आणा.* *हीच आहे चाणक्य-नीती* खूपदा आपण कोणाच्या सांगण्यावरून कुठल्याही व्यवसायिकां बाबत अशीच भावना व्यक्त करतो ,त्या व्यक्ती बाबत अथवा त्याच्या सेवेबाबत आपल्याला स्वतःला काहीच अनुभव अथवा स्वतः डोळ्याने पाहिलेले पण नसते ,आणि एक समज मनात घर करून घेतो ..त्यामुळे कित्येक चांगल्या गोष्टी समोर येऊन किंवा त्यांच्या समवेत राहून त्याची महती कळत नाही म्हणून ही नीती वापरा स्वतः बरोबर इतरांचे पण हित जोपासा. *माणसे जोडुया* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌷आस🌷* ➖➖➖➖➖➖ अंधारलेल्या वाटेत लढा देणे शिकवतात प्रकाशाची आस वादळातही टिकवतात आव्हानाचा वादळाची लोटून इच्छाशक्ती जिद्द भरारीची आकाशी ठेवतात अन् प्रकाशाची आस वादळातही टिकवतात प्रतिकुलतेवर मात करुनी जग जिंकण्याचे स्वप्न पाहतात अंधार उजेडाचा प्रवास माञ चालूच ठेवतात अन् प्रकाशाची आस वादळातही टिकवतात अंधारात बसलेल्यांना दरीत कोसळलेल्यांना नवजीवनासाठीआवाहन ते करतात अन् प्रकाशाची आस वादळातही टिकवतात वादळातही टिकवतात. 👍👍👍👍👍👍 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. ➖➖➖➖➖➖➖
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १३०५ - देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध. १७०८ - मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक. १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली. १९३९ - दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघानेबाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली. १९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू. 💥 जन्म :- १८५२ - क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष. १९०९ - सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६३ - रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६७ - रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ६३४ - अबु बकर, अरब खलीफा. १८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ. १८९२ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शासकीय आकडेवारीनुसार राज्यात २१ हजार बालके तीव्र कुपोषित, मेळघाटात ३० दिवसांत ३७ बालकांचा मृत्यू* --------------------------------------------------- 2⃣ *राज्यांच्या पैशांच्या हव्यासामुळे पेट्रोल, डिझेल कधीही जीएसटीच्या कक्षेत येण्याची शक्यता कमी* --------------------------------------------------- 3⃣ *2019 पर्यंत राज्यातील रस्ते होतील झकास, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना विश्वास* --------------------------------------------------- 4⃣ *पॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद* --------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर : पुत्रदा एकादशीनिमित्त काल पंढरीत भाविकांची गर्दी, चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ, अनेक मंदिरं व समाधी पाण्याखाली* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *ट्रेंट ब्रिज - तिसऱ्या कसोटीत भारताची इंग्लंडवर 203 धावांनी मात, जसप्रीत बुमराचे पाच बळी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *भीमाशंकर ज्योतिर्लिंग* भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्हांला रंजक वाटणाऱ्या व्यवसायाची निवड करा, यामुळे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावे लागणार नाही *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता?* 👉🏼 शुक्र *२) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?* 👉🏼 गुरू *३) हॅले हा धुमकेतू किती वर्षानी दिसतो?* 👉🏼 ७६ वर्षानी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * अनिलकुमार शिंदे, किनवट * सचिन बोरसे, नांदेड * आनंद यादव, धर्माबाद * बाबुराव पिराईवाड, धर्माबाद * रामदास पेंडपवार, निझामाबाद * भोजन्ना चिंचलोड, येवती * सुनील बेंडे * भारत सर्वे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *ती* मन चिंब भिजले आहे तनात बी रूजले आहे पेरलं की उगवतेच ती सर्वांना जगवतेच शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 02* *अंधो का हाथी सही,* *हाथ टटोल-टटोल ।* *आंखोंसे नहीं देखिया,* *ताते विन-विन बोल।* अर्थ : अंध व्यक्तीसमोर हत्ती उभा केला तर ती व्यक्ती हत्तीला चापळूनच त्याच्या आकृती बद्दलचे मत तयार करते, कारण तो हत्ती आंधळ्याचा आहे. त्याच्या अनुभूतीनुसार त्याची हत्तीविषयीची धारणा आहे. रंग,रूप,आकार जाणण्याइतकी दृष्टी त्याच्याकडे नाही. त्याचं समज विश्व स्पर्श, श्रवण, गंध व रसनेवरचं ! एकाद्या बाबीची अनुभूती घेताना त्या प्रसंगाशी पूर्णपणे एकरूप होता आलं की ती बाब लक्षात येते. पंचेंद्रिय कार्यरत असूनही अज्ञानी व मुढ व्यक्ती अनुभूतीमध्ये समरस होत नाहीत. त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्ती होत नाही व अज्ञानाचे भ्रमही दूर होत नाहीत. त्यामुळे बुद्धी व मनाची सांगड घालून ती बाब तपासायला हवी. तेव्हाच ईश्वराचे खरे स्वरूप कळते. नाही तर अशीच मंडळी निरर्थक बाबी सांगून ईश्वराविषयी अवडंबर वाढवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही. केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल. म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कंत्राट - Contract* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *धनाचा गर्व* एकदा एका उंदराने हिरा गिळला हिऱ्याच्या मालकाने त्या उंदिराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा सगळे उंदिर एक घोळका करून एका दुसऱ्यावर चढून दाटीवाटीने बसले होते पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला होता शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता. हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच उंदराला कसे काय ओळखले? शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..! आयुष्यात धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा पण आपण ज्या समाजात वाढलो जगलो मोठे झालो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आपण ह्या समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका नाहीतर त्या मूर्ख उंदिरामध्ये आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही..! *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌹जीवन विचार🌹* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *माणसाच्या जीवनात चढउतार हा असतोच*.प्रत्येक सजीव जीवन जगत असतो आणि त्याचा अंतही हा अटळ असतोच.जीवनात माणसाला दु:ख , संकटे येणारच ती आली नाहीत तर ते जगणं पण एकतर्फी होऊन जाईल.व अशा एकतर्फी जीवनाची वाटचाल करताना माणूस हताश व निराश होणार व आयुष्याची व आयुष्यात येणाऱ्या माणसांची ओळख पण होणार नाही व किंमत पण कळनार नाही ,प्रत्येक श्वासासोबत क्षणक्षण आयुष्यपण संपत आहे. जगण्यातला हा क्षण अस्ताकडे झुकु लागला आहे. smt.senkude p.k. सहज सिंहावलोकन म्हणुन संपलेल्या आयुष्यावर नजर टाकली, आयुष्याचा मागोवा घेत असताना मन खिन्न होऊन विचारमग्न झाले, अन् खुप अस्वस्थ झाले कारण आयुष्य बरंच संपलं होतं.संपलेल्या आयुष्यात काय मिळवलं ह्याचा मनाला पडलेला प्रश्न अगदी नंदादिपातला ज्योतीसारखा प्रज्वलीत होऊन प्रकाशमय झाला होता???? हेच का ते जीवन? इतके दिवस जे जगले ते व्यर्थच का ?? हा विचार मनाला शिवून गेला.आणि संपलेल्या आयुष्यात आपण कितपत ? माणूसपण जपले ? सामाजिक हित कितपत जोपासले ? हे आणि अशा अनेक प्रश्नांची श्रृंखला ध्यानीमनी ठासत माणसानी माणसाशी माणसासम वागणे हा एकच विचार रुजलेला स्मरणार्थ राहीला, काही माणसं मरत-मरत जगत असतात.काही माणसं जगत-जगत मरत असतात. डोळयांना धुसर अंधारी पण आली पण त्या अंधारल्या वाटेतही काही पाऊलखुणा शाबुत दिसत होत्या.मी हताशपणे अधाशापणे न्याहाळल्याही त्या तेव्हा त्या पाऊलामध्ये मला तुमची छबी दिसली व माझा अस्वस्थपणा शांत झाला कारण जरी आयुष्य बरंच संपलं असलं तरी जगणंही बरंच बाकी आहे हा विचार पक्का झाला होता व मी गमावलेल्या आयुष्यात तुमच्यासारख्या माणसांना कमावलं होतं. माझ्यासाठी तुमचं अस्तित्व अनमोल आहे.ह्याच मला लौकिक आहे.शेवटी काय तर *'माणसाच जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय आणि माणसाचं मरण म्हणजे नियतीच रुदन होय.'* 〰〰〰〰〰〰〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍🔶शब्दांकन/ संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड.🙏
💦🍀💦🍀💦🍀💦 *स्वच्छतेची घेऊया आण* सख्यासोबत्यांनो या हो या स्वच्छता करूया मिळूनिया स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान राबवू या. सुंदर स्वच्छ गाव बनऊया अभिमान गावाचा वाढवूया या हो या हो बालजवानांनो सुंदर भारत स्वच्छ भारत करुया. स्वच्छतेचे दूत आपण आरोग्याचे धडे देऊया रोगराईला पळववून लावूनी निरोगी गाव करुया. घरी बांधूनीया शौचालय वापर त्याचा करुया अभिमान बाळगूनी गावाचा स्वाभिमानाने जीवन जगूया. कचरा कचरा वेचूया विल्हेवाट त्याची लावूया जाणूनी घेऊया पर्यावरणाचे संवर्धन प्रदूषणाला आळा घालूया. या हो या हो सख्यासोबत्यांनो या हो या हो बाल जवानांनो सारेच सारे या हो याहो दूत स्वच्छतेचे बनूया आण आपण घेऊया स्वच्छ भारत करुया. 🍀🌱🍀🌿🍀🌿🍀 ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.) जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/08/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- 💥 जन्म :- १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार. १९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक. 💥 मृत्यू :- १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तिरुअनंतपुरम : केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने आज गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे, 400 हुन अधिक व्यक्ती मृत्युमुखी* --------------------------------------------------- 2⃣ *अमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.* --------------------------------------------------- 3⃣ *गडचिरोलीत पावसाचे थैमान, भामरागडसह अनेक गावे जलमय* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबईच्या तीन प्रवेशद्वारांवर एक महिना टोल नाही; छोट्या गाड्यांना मोठा दिलासा* --------------------------------------------------- 5⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड च्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचे दमदार शतक* --------------------------------------------------- 6⃣ *Asian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय* --------------------------------------------------- 7⃣ *जकार्ता - भारताच्या विनेश फोगाटने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनीगटात घातली सुवर्णपदकाला गवसणी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हम सब एक है* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/15.html वरील निळ्या अक्षरावर क्लिक करून आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *परळी वैजनाथ* परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतात पहिलं पोस्ट ऑफिस कुठे सुरू झालं ?* कलकत्ता *२) फुजियामा पर्वत कोणत्या देशात आहे ?* जपान *३) 'कुली' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण ?* मुल्कराज आनंद मुल्कराज आनंद *४) सौर वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते ?* चैत्र *५) उत्तर आणि दक्षिण भारताच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेला पर्वत कोणता ?* विंध्य पर्वत *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * भूषण परळकर, नांदेड * विश्वास बदापूरकर, येताळा * साईनाथ राचेवाड, बिलोली * दत्ता नरवाडे, बिलोली * पुरुषोत्तम चंद्रात्रे * गोपाळ पवार * संतोष गुम्मलवार, नांदेड * भीमाशंकर जुजगार, धर्माबाद * साईनाथ हवालदार, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* का-हाळ कालून काही बाजूला उभे रहातात काय होईल याची ते लांबून मजा पहातात लांबून मजा पहायला काहींना असते आवड कामापेक्षा रिकाम्या कामला जास्त मिळते सवड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= आजपासून विचारधन ऐवजी कबीराचे बोल हे नवीन सदर सुरू करीत आहोत. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे. *क्रमांक 01* *आवत गारी एक है* *उलटन होय अनेक ।* *कह कबीर नहिं उलटिये* *वही एक की एक ॥* अर्थ : जशास तसे म्हणून जर शिवीला शिवी देत राहिलात तर शिव्यांची लाखोलीच तयार होईल. तुमची शक्तीही निरर्थक वाया जाईल. कोणी जर शिवी दिली आणि त्याला परत शिवी नाही दिली तर शिव्यांची संख्या न वाढता ती देणाराही एकाकी पडतो. शिवी न स्वीकारल्यामुळे ती देणार्याच्याच पदरी राहाते. तो खजिल होतो. पुढचा संघर्षही टळतो. म्हणून मुर्खांच्या तोंडास तोंड न देणे हे कधीही सुज्ञपणाचे लक्षण समजावे, असेच कबिरांचे म्हणणे आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही जणांचे पाय जमिनीवर असले तरी ते कल्पनेच्या जोरावर आकाशातले तारे मोजण्यातच वेळ घालतात तरी त्यांचे तारे मोजणे होत नाहीत कारण जे अशक्य आहे ते कधी प्रत्यक्ष जीवनात साध्य होत नाही.मग विनाकारण वेळ वाया घालवून जीवन व्यर्थच घालवतात.अशांच्या पदरी घोर निराशाच पडते. तर काही लोक जमिनीवर राहूनच आपली पावले कुठपर्यंत जात आहेत याचा वेध घेतात.मग आपल्याला कशी आणि किती प्रगती करायची याचे नियोजन करतात.जे शक्य आहे ते आपल्या हातात आहे हे त्यांना माहीत असते.अशी विचार करणारीच माणसे जीवनात यशस्वी होतात.जे शक्य आहे ते आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करता येते कल्पनेने नाही हे त्यांना माहीत असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विचित्र - odd* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशाचे गणित* आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न? 'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली. 'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली. 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. 'खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/08/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १२०१ - रिगा शहराची स्थापना. २००८ - पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला. 💥 जन्म :- १६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान. १६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे. १८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. 💥 मृत्यू :- १२२७ - चंगीझ खान, मंगोल सम्राट १९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.(चित्रित) १९९८ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री. २००८ - नारायण धारप, मराठी लेखक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळमधील पूरप्रकोपात ३२४ जणांचा मृत्यू, २ लाख नागरिक बेघर, केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.* --------------------------------------------------- 2⃣ *माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मानस कन्येने दिला मंत्राग्नी* --------------------------------------------------- 3⃣ *इस्लामाबाद : इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी करण्यात आली निवड* --------------------------------------------------- 4⃣ *श्रावणसरी : 28 दिवसांच्या खंडानंतर राज्यात सर्वदूर पाऊस; कापूस, तूर पिकाला जीवदान* --------------------------------------------------- 5⃣ *पुणे - आतापर्यंत पावसाने ओढ दिलेल्या उत्तर-मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, हवामान खात्याने दिला इशारा * --------------------------------------------------- 6⃣ *भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतीम संस्कार* --------------------------------------------------- 7⃣ *आज ट्रेंट ब्रिज येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार कसोटी मालिकेतील निर्णायक सामना* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिन्याला पर्याय नाही* http://epaper.ejanshakti.com/m5/1780138/Pune-Janshakti/18-08-2018#page/6/1 आजच्या दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित झालेला लेख आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *महाकालेश्वर ज्योतिर्लिंग* महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून ते भगवान शिव यांना अर्पण केलेले आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तीर्थक्षेत्रांमध्ये भगवान शिवचे सर्वात पवित्र निवासस्थान असे म्हटले जाते. हे मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या प्राचीन शहरामध्ये स्थित आहे. रुद्र सागर तलावच्या बाजूला हे मंदिर आहे. शिवलिंगाचे देवदेव, भगवान शिव हे स्वयंभू आहेत असे समजले जाते, इतर प्रतिमा आणि विधीपूर्वक स्थापित आणि मंत्रशक्तीसह गुंतविले जातात त्याप्रमाणेच स्वतःच्याच शक्ती (शक्ती) च्यामधून शक्तीचा प्रवाह आणला जातो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सुधारणा ही बाहेरुन लादता येत नाही, तिचा उगम आतूनच पाहिजे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) विजयघाट हे सुप्रसिद्ध स्थळ कोठे आहे ?* दिल्ली *२) राष्ट्रा-राष्ट्रांतील नागरिकांचे आरोग्यवर्धन व्हावे म्हणून कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली ?* जागतिक आरोग्य संघटना *३) सुवेझ कालव्यावरील इजिप्तच्या किनारपट्टीवरील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते ?* अलेक्झांड्रिया *४) स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?* मौलाना अब्दुल कलाम आझाद *५) युनोची घटना कुठल्या संमेलनात मंजूर झाली ?* सॅनफ्रान्सिको *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * गजानन देवकर * गणेश थेटे * अगस्त्या तावारे * शेख समधानी * रोहित जंगलेकर * शेखर हेमके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *इंडिया फस्ट* प्रयत्नावर तुमचा अटल विश्वास होता देश विकास हाच एक ध्यास होता संयमाने तोडले तुम्ही सारे संकटाचे फास देश विकासासाठीच घेतला प्रत्येक श्वास शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या जीवनात खरे यशस्वी व्हायचे असेल,आपले जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या कामात तुमचे हात सदैव क्रियाशील ठेवा, मन स्थिर ठेवा, कामातले लक्ष्य विचलित होऊ देऊ नका, कुणाचीही स्पर्धा करु नका की,ज्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय निर्माण होऊन मन अस्थिर होईल आणि कामामध्ये निष्क्रियता येईल, दुस-या चे काम पाहून,त्याची होत असलेली प्रगती पाहून त्याबद्दल मनामध्ये द्वेषाला जागा देऊ नका.आपण आपल्या कामात सदैव कार्यरत रहा त्यातच तुमच्या जीवनात खरे यशस्वी होऊन तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *लाचार - Helpless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे* एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णुला भेटायला गेला. वैकुंठाच्या दारा जवळ ७ कबुतरं होते. त्यातील एका कबुतरा वर यमाची दृष्टी गेली. ते कबुतर खुप घाबरलं. आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सुचेना. इकडे गरुडाने वैकुंठाचं दार उघडुन यमाला आत घेतलं. यम विष्णुला भेटायला गेला. ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलवुन गरुडाला विनंती केली. ” मला इथुन घेऊन जा साता समुद्रापार , कारण यमाची माझ्यावर दृष्टी पडली आहे व तो बाहेर आला वैकुंठातुन कि मला घेऊन जाईल. मला घेऊन चल .” गरुडाला हि त्याची दया आली. गरुडाने मग कबुतराला सातासमुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं जिथे सुर्याची किरणे पण पोचत नव्हती. ती गुहा दलदलीनी भरलेली होती. इकडे यम विष्णुशी बोलुन वैकुंठाच्या दारात आले. त्यानी बघितलं जाताना तर सात कबुतरं होते , आता सहाच कशी काय ? एक कबुतर कुठे गेलं. मग यमानी गरुडाला विचारलं. गरुड म्हणाला , ” तुमची दृष्टी त्या कबुतरावर पडली. ते कबुतर म्हणालं मला सातासमुद्रापार सोड , मी सोडुन आलो. ” ज्या गुहेत गरुडानी कबुतराला सोडलं तिथे जागा कोंदटलेली असल्यामुळे व प्राणवायु नसल्यामुळे त्याचे प्राण गेले. यम गरुडाला म्हणाला , ” मी विष्णुदेवाला हेच विचारायला आलो होतो कि हे कबुतर तर इथे आहे व त्याचा प्राण तर सातासमुद्रापार जाणार असं विधीलिखित आहे . कसं करायचं ? ” पण बघा त्याचा प्राण तिथेच जाणार होता म्हणुन त्याला तशी बुध्दी झाली सातासमुद्रापार जायची व त्याचा जीव घुसमटुन घुसमटुन गेला. *तात्पर्य : तुमच्या नशिबात नियतीने जे लिहिले तसेच होणार. आपण त्यात कुठला हि हस्तक्षेप करु शकत नाही. पण जर आपण इष्टदैवतेची सेवा व भक्ती केली तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८७ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली. 💥 जन्म :- १९५७ - रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - देशभरात 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण* --------------------------------------------------- 2⃣ *माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटरवर ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली भेट* --------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली: डिसेंबरमध्ये लोकसभेची निवडणूक होत असल्यास त्याच वेळी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - वैयक्तिक कारणावरून आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष राणा यांचा राजीनामा, केजरीवालांनी नाकाराला आशुतोष यांचा राजीनामा* --------------------------------------------------- 5⃣ *केरळ - हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा, मुसळधार पावसाचा वर्तवला अंदाज.* --------------------------------------------------- 6⃣ *मेरठ: शरियतच्या धर्तीवर हिंदू महासभेनं देशातील पहिल्या हिंदू न्यायालयाची केली स्थापना केली आहे. या न्यायालयात हिंदूंशी संबंधित खटल्यांवर निकाल देण्यात येतील, असं हिंदू महासभेकडून जाहीर करण्यात आलं आहे.* --------------------------------------------------- 7⃣ *भारताचा महान कर्णधार काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन, जसलोक रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *उद्याची काळजी आज कशाला* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन* हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे. कथा - येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. इतिहास - श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जे काही दिसतंय त्या सगळ्यावरच विश्वास ठेवायचा नसतो. मीठ सुद्धा साखरेसारखं दिसत असतं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'रामाचा शेला' चे लेखक कोण ?* साने गुरुजी *२) कॉस्मिक किरणांचा शोध कुणी लावला ?* व्हिक्टर हेस *३) एका पदार्थातून दुसर्या पदार्थात सूर्यकरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारं उपकरण कोणतं ?* वर्णपटदर्शक *४) युरेनियम अणुकेंद्रावर शून्य कणांचा वर्षाव केला असता काय होतं ?* अणुकेंद्राचं विघटन *५) निरनिराळ्या शारीरिक व्याधींना कारक ठरणार्या अतिसूक्ष्म जंतूंना काय म्हणतात ?* विषाणू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 निखील देवेंद्र खराबे, नागपूर 👤 नरेंद्र नाईक 👤 मिथुन बिजलीकर 👤 अशपाक सय्यद 👤 रमेश बारसमवार 👤 जी. के. प्रसाद 👤 सुभाष पालदेवार 👤 के. राम मोहन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *झुला* प्रत्येकाच्या मनात एक आठवणींचा झुला असतो मनमोकळ झुलायला ज्याचा त्याला खुला असतो आठवणींच्या झुल्यावर प्रत्येकाला झुलता येत कटू आठवणी टाळून आनंदाने फुलता येत शरद ठाकर सेलू जि परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* ••●🔰‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्हाला यशाच्या दिशेने जायचे असेल तर पहिल्यांदा अपयश पचवावे लागेल आणि त्याची कारणेही शोधावी लागतील. असे असेल तर यश तुम्हाला सहज प्राप्त करता येऊ शकेल. अपयशानंतर मिळालेले यश तुमच्या जीवनाची उत्कर्षाकडे जाणारी वाट असेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्कर्ष - Flourish* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🐍नागरुपी भाऊ* पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा तीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर उंच उंच झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – *जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.बहीण भावाची माया ह्या कथेतुन स्पष्ट होते.* *महत्त्व* वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते, तेव्हा भावाची ५ टक्के आध्यात्मिक आणि ३० टक्के व्यावहारिक उन्नती होते. ‘श्रावणमासातील नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी झोका खेळणे, म्हणजे आनंद अनुभवणे होय. स्त्री झोका खेळतांना तिच्या दिशेने ईश्वरी आनंदाचा प्रवाह आकृष्ट होते *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट *आज या बुलेटीन ला तीन वर्षे पूर्ण, चौथ्या वर्षात पदार्पण* 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/08/2018 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय स्वातंत्र्य दिन* घडामोडी १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. जन्म १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री. १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *सध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर* ----------------------------------------------------- 3⃣ *स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन, नॉर्थ, साऊथ ब्लॉकला आकर्षक रोषणाई* ----------------------------------------------------- 4⃣ *मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे छत्तीसगडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त प्रभार* ----------------------------------------------------- 5⃣ *पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार* ----------------------------------------------------- 6⃣ *एक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त* ----------------------------------------------------- 7⃣ *गोवारी समाजाची मागणी 23 वर्षानंतर अखेर पूर्ण, गोवारी आदिवासी आहेत, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वातंत्र्य दिन विशेष लेख* विचार बदला ; देश बदलेल http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय स्वातंत्र्य दिन* स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते संकलन :- प्रल्हाद कापावार ( स.शि.) विद्या निकेतन प्रा.वि. बिलोली. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *त्याग जीवनाचा पाया आहे तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?* 👉🏼 पंडित जवाहरलाल नेहरू *२) भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा किती वर्षे पूर्ण झाली?* 👉🏼 ७१ वर्षे *३) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?* 👉🏼 लॉर्ड माऊंट बॅटन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रमोद शेलार, सहशिक्षक, कोहळी ता हदगाव जि नांदेड 👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक अहमदनगर 👤 शिवानंद सुरकुटवार, नांदेड 👤 साईनाथ चपळे, बन्नाळी 👤 किरणकुमार नामेवार, वसमत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अभिमान " भारतीय स्वातंत्र्य आमच्या अस्मितेची गाथा आहे तिरंग्या पुढे आमचा नतमस्तक माथा आहे तिरंगा म्हणजे आमचा जान की प्राण आहे तिरंगी झेंड्या आम्हाला तुझा अभिमान आहे *स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा* शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *माझा भारत देश महान* अनेक राज्ये अनेक प्रदेश विविध जाती विविध भाष नाही कोणी इथे लहान माझा भारत देश महान तीन रंगाची बात न्यारी निळ्या रंगात चोवीस आरी तिरंगा आमुची आहे शान माझा भारत देश महान दिल्ली आहे देशाची राजधानी सर्वांचे लक्ष घेतो वेधूनी कारभार चालतो एकदम छान माझा भारत देश महान इथे नांदतो सर्वत्र समानता एकमेकामध्ये आहे बंधुता सर्वच गातात एकच गान माझा भारत देश महान जगाच्या कोपऱ्यांत कुठेही एक तरी भारतीय राही कष्टाने राखतो देशाची मान माझा भारत देश महान - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विस्मरण* एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले. त्यांनी शाप दिला *पुढची 12 वर्षे पाऊस पडायचा नाही* व तशी आकाशवाणी हि केली. पृथ्वीवर सर्वदूर हाहाकार माजला. सर्वजण हताश झाले, पाऊस 12 वर्षे येणार नाही म्हणजे सर्व जण दुःकाळाने मरणार या विचाराने घाबरून गेली. एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा. थोड्याच दिवसात जंगलातील पाणी साठाही संपून गेला. शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले... *एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत हॊता.* त्या पिलांनी मोराला विचारले की जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा? मोर म्हणाला, पण *आपण आता पासून नाचणे किंवा नाच शिकणे बंद केले तर जेव्हा 12 वर्षांनी पाऊस पडू लागेल तेव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलो असेल.* शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला. तो धावतच घरी आला, शेतीची अवजारे गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला. आणि कोरडे शेत नांगरु लागला. मुलांना शेतिची कामे शिकवू लागला. मुले चकित होऊन बापाकडे पहात होती. त्यांनी त्याला विचारले, बाबा जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा ? शेतकरी म्हणाला, आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा करणे बंद केली तर 12 वर्षांनी पाऊस पडेल तोपयंत आपण सर्व कामे विसरून जाऊ. आणि पुनः कमाला लागला. इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकऱ्याला काम करताना बघून अचम्बित झाला. त्याने एका ब्राम्हणाचे रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारले, *तू आकाशवाणी ऐकली नाहीस का?* शेतकरी म्हणाला, होय ऐकली. *पण जर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाही तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच काम येणार नाही मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील.* इंद्र सुन्न झाला, स्वर्गात आल्यावर विचार करु लागला कि 12 वर्षे मी पाऊस पाडला नाही तर मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईन, मग सर्व सृष्टी करपुन जाईल, जैव सृष्टी नष्ट होईल. देवाने लगेचच विचार बदलला. आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली. तात्पर्य - *बाह्य परिस्थिती कशीही असो आपण न चुकता आपले कर्तव्य करीत राहायला हवंय. कठीण परिस्थिती मध्येच आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते. मंदी व चणचण असली तरी, किती ही अडचणी आल्या तरी* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक देहदान दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९४३ - रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुखांची नियुक्ती. १९९१ - कन्नड साहित्यिक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर २००२ - के.के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला 💥 जन्म :- १८८० - जॉन लोगी बेअर्ड, दूरचित्रवाणीसंचशोधक १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक. १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :- १७९५ - अहिल्याबाई होळकर. १९८० - पुरुषोत्तम भास्कर भावे मराठी साहित्यिक. १९८८ - गजानन जागीरदार, हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नासाची ऐतिहासिक झेप, सोलर प्रोब यान सूर्याच्या दिशेनं झेपावल.* --------------------------------------------------- 2⃣ *केरळ : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळमधील पुरग्रस्त भागाची केली पाहणी, 100 कोटीचे पॅकेज जाहीर* --------------------------------------------------- 3⃣ *सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचा पारिताेषिक वितरण समारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलता पार पडला, साताऱ्याच्या टाकेवाडीने पटकावला वाॅटर कप* --------------------------------------------------- 4⃣ *रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्य जनतेला मोठा दिलासा, राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.* --------------------------------------------------- 5⃣ *हैदराबाद - आयसिस दहशवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन हैदराबादे येथून दोघांना अटक, एनआयएची कारवाई* --------------------------------------------------- 6⃣ *बीसीसीआयमध्ये होऊ शकते ‘दादागिरी’, अध्यक्षपदावर सौरव गांगुली येण्याची चर्चा* --------------------------------------------------- 7⃣ *लॉर्ड्स कसोटीत भारताचा पराभव, इंग्लंडची भारतावर एक डाव आणि 159 धावांनी मात* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक देहदान दिवस *अवयवदान संकल्प करू या* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शिवराम हरी राजगुरू* शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातहौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठीभाषक, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेवहसत हसत फाशीला सामोरे गेले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मार्च २०१९ पर्यंत राज्यभरातील सगळ्या खेड्यांमध्ये शौचालये उभारण्याचं उद्दिष्ट कोणत्या राज्याने जाहीर केलं आहे ?* पश्चिम बंगाल *२) मौर्य साम्राज्याचा शेवटचा शासक कोण ?* बृहद्रथ *३) संस्कृतचं व्याकरण कोणी लिहिलं ?* पाणिनी *४) लोदी घराण्याचा संस्थापक कोण ?* बहलोल लोदी *५) फिलिपिन्सची राजधानी कोणती ?* मनिला *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुयोग पेनकर, पुणे 👤 प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी 👤 गणेश धाकतोडे 👤 नागेश गुर्जलवार 👤 नरेंद्र रेड्डी, बाळापूर 👤 योगेश येवतीकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *जुगार* पेरणी करून शेतकरी दरवर्षी जुगार खेळतो अस्मानी संकटांशी तो हारतो म्हणजे हारतो रात्रंदिवस फक्त कष्ट कष्टाला कमी नाही तरीही यश मिळेल याची मात्र हमी नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या जीवनात खरे यशस्वी व्हायचे असेल,आपले जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या कामात तुमचे हात सदैव क्रियाशील ठेवा, मन स्थिर ठेवा, कामातले लक्ष्य विचलित होऊ देऊ नका, कुणाचीही स्पर्धा करु नका की, ज्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय निर्माण होऊन मन अस्थिर होईल आणि कामामध्ये निष्क्रियता येईल,दुस-या चे काम पाहून, त्याची होत असलेली प्रगती पाहून त्याबद्दल मनामध्ये द्वेषाला जागा देऊ नका.आपण आपल्या कामात सदैव कार्यरत रहा त्यातच तुमच्या जीवनात खरे यशस्वी होऊन तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *व्यत्यय - Interruption* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रेरणा* संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले.त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले. *तात्पर्य - प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.त्यापेक्षा सुरूवात आपल्यापासूनच करावी.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌹जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 http://www. pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.* *प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.* smt.pramila senkude *यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.* *म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏 ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/08/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५१ - रेने प्लेव्हेन फ्रान्सच्या पंतप्रधानपदी १९५२ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी. १९६० - चाडला फ्रान्सपासून स्वातंत्र्य. १९८७ - ॲलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता. 💥 जन्म :- १९११ - पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. १९२८ - वि.स. वाळिंबे, मराठी लेखक. १९५४ - यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५४ - मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७४ - अंजु जैन, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९०८ - क्रांतिकारक खुदिराम बोस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती* --------------------------------------------------- 2⃣ *यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही; मराठा मोर्चा क्रांती समितीची मोठी घोषणा* --------------------------------------------------- 3⃣ *राज्यसभेचं कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित; पावसाळी अधिवेशनाची सांगता* --------------------------------------------------- 4⃣ *स्टेट बँकेला सलग तिसऱ्या तिमाहीत तोटा, जून 2018 अखेर 4876 कोटी रुपयांचा तोटा. माफ केलेल्या कर्जाच्या वसुलीत 240 टक्क्यांची भरघोस वाढ* --------------------------------------------------- 5⃣ *माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सात आरोपींची सुटका करता येणार नाही : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.* --------------------------------------------------- 6⃣ *वाळूज एमआयडीसीत तोडफोड करणाऱ्यांवर कंपन्या करणार नोकरी बंदीची कारवाई* --------------------------------------------------- 7⃣ *लंडन : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातून शिखर धवन आणि उमेश यादव यांना संघाबाहेर तर चेतेश्वर पुजारा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना संघात देण्यात आले स्थान* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= येत्या 15 ऑगस्ट रोजी फ्रेश मॉर्निंग बुलेटीन तीन वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने वाचकांच्या काही प्रतिक्रिया राजेश जेठेवाड बरबडेकर यांची प्रतिक्रिया http://fmbuleteen.blogspot.com/2018/08/blog-post_9.html आपल्या प्रतिक्रियांचे देखील स्वागत आहे. आपल्या प्रतिक्रिया 9423625769 येथे whatsapp करावे आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मदनलाल धिंग्रा* मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडनयेथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचाअनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंतघराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले. मदनलाल धीग्रा हे भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर हुतात्मा. त्यांचा जन्मअमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टरहोते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाबविद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचाअभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला. ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारतमंत्र्याचा स्वीय साहाय्य्क कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्यासभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. मदनलाल यांना अटक होऊन फाशीचीशिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्घोषात फाशी गेले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सच्चा देशभक्त इतर कोणत्याही अन्याय सहन करेल पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत* 👉 रामनाथ कोविंद *२) प्रख्यात लेखिका तस्लीमा नसरीन कोणत्या देशाच्या आहेत?* 👉 बांग्लादेश *३) भारताचे २०वे सरन्यायाधीश कोण होते?* 👉 सब्यसाची मुखर्जी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सतीश सोनवणे, संपादक 👤 विनायक काकुळते, नाशिक 👤 पठाण सर 👤 उमेश खोसे, उस्मानाबाद 👤 ओमप्रकाश कहाळेकर 👤 लोकडोबा कौटवाड 👤 मुदलोड गंगाप्रसाद 👤 साईप्रसाद मठपती 👤 शरद सूत्रावे 👤 विशाल ढगे 👤 याह्या खान पठाण, संपादक 👤 भास्कर कुमारे 👤 प्रवीण संगमकर 👤 आशिष देशपांडे, कुंडलवाडी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* अपेक्षा भंग झाली की दुःख काय ते कळते अपेक्षा भंग करणाराला तरी सुख कुठे मिळते योग्य मार्ग निवडला की अपेक्षा भंग होत नाही योग्य मेहनत घेतली की कष्ट वाया जात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...* *ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वावलंबी - Self-supporting* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विनम्रता* एक बार नदी को अपने पानी के प्रचंड प्रवाह पर घमंड हो गया। नदी को लगा कि मुझमें इतनी ताकत है कि मैं पहाड़, मकान, पेड़, पशु, मानव आदि सभी को बहाकर ले जा सकती हूँ। एक दिन नदी ने बड़े गर्वीले अंदाज में समुद्र से कहा - बताओ ! मैं तुम्हारे लिए क्या क्या लाऊँ ? मकान, पशु, मानव, वृक्ष आदि जो तुम चाहो, उसे मैं जड़ से उखाड़कर ला सकती हूँ। समुद्र समझ गया कि नदी को अहंकार हो गया है। उसने नदी से कहा यदि तुम मेरे लिए कुछ लाना चाहती हो तो, थोड़ी सी घास उखाड़कर ले आओ। नदी ने कहा बस ! इतनी सी बात ! अभी लेकर आती हूँ। नदी ने अपने जल का पुरा जोर लगाया पर घास नहीं उखड़ी। नदी ने कई बार जोर लगाया पर असफलता ही हाथ लगी। आखिर नदी हारकर समुद्र के पास पहुँची और बोली। मैं वृक्ष, मकान, पहाड़ आदि तो उखाड़कर ला सकती। जब भी घास को उखाड़ने के लिए पुरा जोर लगाती हूं तो वह नीचे की ओर झुक जाती है और मैं खाली हाथ उपर से गुजर जाती हूं समुद्र ने नदी की पूरी बात ध्यान से सुनी और मुस्कुराते हुए बोला - जो पहाड़ और वृक्ष जैसे कठोर होते है, ये आसानी से उखड जाते है, किन्तु घास जैसी विनम्रता जिसने सीख ली हो, उसे प्रचंड आंधी तूफान या प्रचंड वेग भी नहीं उखाड़ सकता। *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १५१९ - फर्डिनांड मेजेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला १८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना. १९२० - पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्य आपसांत वाटून घेतले. १९८८ - दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले. 💥 जन्म :- १८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ. १८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष 💥 मृत्यू :- मृत्यू: १९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९८० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष. २००० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद ; अनेक ठिकाणी रास्ता रोको* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 27 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ईव्हीएम मशिनसंदर्भात होणार चर्चा.* --------------------------------------------------- 3⃣ *गडचिरोली - सीआरपीएफच्या 889 जवानांचा गडचिरोलीत देहदानाचा संकल्प.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर* --------------------------------------------------- 5⃣ *राज्यसभेच्या उपसभापतीपदी एनडीएचे हरिवंश नारायण सिंह ; यूपीएचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव* --------------------------------------------------- 6⃣ *सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरीत लागू करा, जुनी पेंशन योजना लागू करावी, रिक्त जागांची त्वरित भरती करा, तसेच पाच दिवसांचा आठवडा.. आदी मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेला दिवसांचा संप मागे* --------------------------------------------------- 7⃣ *लॉर्डस : भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= येत्या 15 ऑगस्ट रोजी फ्रेश मॉर्निंग बुलेटीन तीन वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने वाचकांच्या काही प्रतिक्रिया श्रीपाद राऊतवाड यांची प्रतिक्रिया http://fmbuleteen.blogspot.com/2018/08/blog-post.html आपण ही आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकावर कळवावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *करुणानिधी* तामिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924 रोजी तामिळनाडूच्या नागापट्टीणम जिल्हात झाला.ते एकूण 13 वेळा विधानसभेवर निवडून आले.1957 ला ते पहिल्यांदा आमदार झाले तर 1969 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.आतापर्यंत त्यांनी एकूण 5 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला.गोरगरीबांसाठी त्यांनी विशेष कार्य केले.हाथ रिक्षा त्यांनी बंद केल्या,महिलांना वडीलोपार्जित मिळकतीत त्यांनी अधिकार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. काल दि.7/8/2018 रोजी त्यांचे निधन झाले.मृत्यूसमयी ते 94 वर्षाचे होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सरदार पटेलांनी मठाचा सत्याग्रह कुठून सुरू केला ?* बारडोली सत्याग्रह *२) नोव्हाक जोकोव्हिच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे ?* सर्बिया *३) तिन्ही सेनादलांचा सर्वोच्च सेनापती कोण ?* राष्ट्रपती *४) 'इंडिपेंडंट' या वृत्तपत्राचे संस्थापक कोण ?* सच्चिदानंद सिंह *५) फ्रान्सची राजधानी कोणती ?* पॅरिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * व्यंकटेश पुलकंठवार * हेमंत पापळे * संतोष येवतीकर * गणेश मोहिते * तुकाराम यनगंदलवाड * डॉ. चंद्रकांत पांचाळ * राहुल मगरे * माधव परसुरे * सचिन सुरबुलवाड * अशोक मगरे * अविनाश गायकवाड * रामदास देशमुख * गोविंदराव शिवशेट्टे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *मौन* रागाला जिंकण्याचा उपाय मौन आहे थोडे दुर्लक्ष करा राग गौन आहे मौन पाळून रागावर विजय मिळवता येतो कितीही मोठा राग मौनाने पळवता येतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा आपल्या मनाची घालमेल होऊन जाते तेव्हा आपल्याला कोणते निर्णय घ्यावे काही सुचत नाही. अशावेळी मनाची घालमेल होऊ न देता मन स्थिर ठेवण्यासाठी तुमची ज्यांच्यावर श्रध्दा आहे अशा परमेश्र्वराचे किंवा संत सज्जनाचे किंवा आपल्या गुरुंचे नामचिंतन, ध्यानस्मरण केल्यास त्यातून नक्कीच काही ना काही मार्ग सापडतो आणि आपल्या होणा-या मनाची घालमेल थांबू शकेल. होणारा संभाव्य धोका किंवा आपल्या हातून होणारी चूक नक्कीच टळू शकेल आणि चांगला मार्ग मिळू शकेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *निर्णय - Decision* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *तीन वाटसरु* तीन वाटसरू एका धर्मशाळेत रात्रीसाठी एकत्र आलेले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं... तिघांनाही भूक लागलेली असते, मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं... पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू...?? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो... गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात... थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो...!! तिघेही चडफडत आणि एकमेकांना शिव्या देत उपाशीच झोपतात....!!!!! स्वतःचा वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता, ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं आणि प्रश्न सुटत नाहीत म्हणून जे तावातावानं फक्त चर्चा करतात... *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰 *🌺 जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 *जोवर प्रकृतीच्या वर उठण्याची धडपड करीत आहे तोवर माणूस हा माणूसच असतो.ह्या प्रकृतीतही अंतःप्रकृती व बहिःप्रकृती अशी दोन उभयविध भाग असते.बाह्य प्रकृतीला जिंकणे ही फार चांगली आणि फार मोठी बाब आहे ह्यात काही शंका नाही.पण आपली अंतःप्रकृती जिंकणे ही खचितच त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे.* आपल्या ह्या उपयुक्तततावादी जीवनात आपले चांगले कर्मच आपल्या सोबत आपल्या अंतदायी स्वरुपात आपल्या दृष्टीआड कामी पडतील कारण आपल्या जीवनाचा जाळ फार मोठ्या विपरीत तान्या-बान्यानी विनला गेला आहे.जे दृष्टीगत होते ते वास्तविक नाही आणि जे आम्हाला दिसत नाही ज्याच्याशी आमचा संबंध नाही ते वास्तविक आहे. smt.pramilatai senkude. सत्य आहे दोन विपरीत किनाऱ्यांच्या मध्ये वाहनार्या नदीचे नाव जीवन सरीता आहे पूर्वेने पश्चिमेकडील याञेवर निघणाऱ्या सूर्याचे नाव🌞जीवन आहे . लोक उगवत्या 🌞सूर्याला तर🙏प्रणाम करतात.परंतु डुबत्या सूर्याला कोणी प्रणाम करत नाही.हीच जीवनाची भूल आहे.जन्म आणि मरणाच्या मध्ये जीवनाचे नीर वाहते,या दोन तटांमध्ये जीवनाची धारा वाहते. जसे जन्माच्या सोबत मृत्यू आणि मृत्यूच्या सोबत जन्माची छाया चालते. सावलीला कोणी पण कधीही वेगळे करू शकत नाही.कोणाच्या सावलीवर पाय ठेवून उभे राहून जा सावली पायाच्या वरती येवून जाईल डोक्याच्या वरती येऊन जाईल परंतु नष्ट होणार नाही.मृत्यूची पण हीच स्थिती आहे. आपण जेव्हापर्यंत संसारामध्ये कर्माच्या सूर्याच्या खाली चालत आहात.तेव्हापर्यंत जन्म मरणाच्या छायेचा अंत करू शकत नाही. म्हणून आपले चांगले कर्मच आपल्या कामी येतात. "मनुष्याच्या रुपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही.माणसाच्या कार्यामुळे,त्याच्या कर्तूत्वामुळेच त्याचा गौरव वाढत असतो." *शेवटी 🙏'कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो'*. *'कर्मे ईशू भजावा'.*🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा. गोजेगाव, हदगाव, नांदेड 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/08/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला. १९४९ - भुतानच्या राष्ट्राची स्थापना. 💥 जन्म :- १९२१ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ. १९४० - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५२ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू १९६८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७३ - शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९७७ - मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९८१ - रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू 💥 मृत्यू :- ८६९ - लोथार, लोथारिंजियाचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दहशतवाद्यां विरोधातील कारवाईत जम्मू काश्मीरमध्ये चार जवान शहीद* --------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली शिफारस* --------------------------------------------------- 3⃣ *अकरावी प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी जाहीर, 49 हजार विद्यार्थ्यांना चौथ्या यादीत प्रवेश* --------------------------------------------------- 4⃣ *मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन घेतले मागे.* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई : सण- उत्सवात बेकायदेशीर मंडप नको, आदेश मोडल्यास कोर्टाच्या अवमानाची कारवाई होणार : हायकोर्ट* --------------------------------------------------- 6⃣ *तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे 5 सप्टेंबरपर्यंत बुजवणार, राज्य सरकारचं हायकोर्टात आश्वासन.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शहीद भगत सिंग* भगत सिंग एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना गळफासाची शिक्षा देण्यात आली व भारतीय स्वतंत्र्यचळवळीमध्ये त्यांचे नाव अजरामर झाले.भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारासा भगतसिंगांचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते. त्याच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखा तो लाहोरच्या खालसा हा स्कूल येथे गेला नाही. त्याच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकार बद्दलची निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्या विरुद्धच्या आंदोलनात तो सामील झाला. गांधीजींने असहकार चळवळ बंद केल्यानंतर सिंग हा गांधींच्या अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाला, व ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचा समर्थक झाला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिध्द हक्क आहे. - शहीद भगतसिंग *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) दुसरे पोप जॉन पॉल यांचे निधन कधी झालं ?* २ एप्रिल २००५ *२) 'देशी व्यापारोत्तेजक मंडळ'चे संस्थापक कोण ?* सार्वजनिक काका *३) जीआयसीचे विस्तारीत रूप काय ?* जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन *४) जून २००१ मध्ये कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला ?* राजेंद्र शहा *५) 'सार्स'चा भारतातील पहिला रुग्ण कोठे आढळला ?* गोवा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अरुण देशपांडे, साहित्यिक, पुणे 👤 शिवानंद बुद्धेवार 👤 बाळाप्रसाद सूर्यवंशी 👤 धनंजय पाटील 👤 ऋषिकेश सोनकांबळे 👤 लक्ष्मण कामशेट्टी 👤 देवन्ना पाशावर 👤 नागेश कानगुलवार 👤 रावजी मारोती बोडके 👤 संतोष वाढवे 👤 रवी वाघमारे 👤 संजय बंटी पाटील 👤 गजानन सावंत 👤 अवधूत पाटील सालेगावकर 👤 चंदू नागुल, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोंधळ* ज्याला काही करायचे नाही ते दोन्हीकडून बोलत असतात चिचभी मेरी पटभी मेरी म्हणून काही गोंधळ घालत असतात बेजबाबदार माणसं कसेही बोलू शकतात या बोटाचा थुका त्या बोटावर घालू शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *माघार - Retreat* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा विन्स्टन चर्चिलची* लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा प्रश्न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/08/2018 वार - मंगळवार =======ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय हातमाग दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९७६ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले. १९९१ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध. 💥 जन्म :- १९२५ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ. १९६६ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक. 💥 मृत्यू :- १९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे थेट हवाई मार्गाने जोडल्यास उभय देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. यादृष्टीने उभय देशांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याच्या मानस अध्यक्ष स्टुअर्ट रॉबर्ट यांनी व्यक्त केले* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - इंदिरा नुयी यांच्याकडून पेप्सिको कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा* --------------------------------------------------- 3⃣ *राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर जाणार, मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह 17 लाख कर्मचारी जाणार संपावर* --------------------------------------------------- 4⃣ *इंडोनेशियात झालेल्या भूकंपात आतापर्यंत 82 लोकांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी* --------------------------------------------------- 5⃣ *राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला होणार मतदान* --------------------------------------------------- 6⃣ *मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर, राज्य सरकार आज हायकोर्टात देणार शपथपत्र* --------------------------------------------------- 7⃣ *India vs England Test : लॉर्ड्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला जसप्रीत बुमरा मुकण्याची शक्यता * --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय हातमाग दिवस - 07 ऑगस्ट* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रांतिसिंह नाना पाटील* क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव. नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'रिडल्स इन हिंदूइझम'चे लेखक कोण ?* डॉ. बाबासाहेब आंबेडकर *२) भारताच्या राष्ट्रध्वजाची निवड कधी करण्यात आली ?* २२ जुलै १९४७ च्या घटनासभेत *३) क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?* सातवा *४) 'केसरी' या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष कोणते ?* १८८१ *५) सौर वर्षाची सुरुवात कधी येते ?* २१ किंवा २२ मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 दत्ता डांगे, प्रकाशक, नांदेड 👤 श्रीनिवास मस्के, साहित्यिक, नांदेड 👤 मनोज रापतवार, धर्माबाद 👤 रवींद्र चातरमल 👤 सिद्धार्थ सिरसे 👤 मोहन हडोळे 👤 मंगेश पेटकर 👤 तुकडेदास धुमलवाड 👤 सतिश कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *शहाणे* उथळ पाण्याला खळखळाट फार असतो वर वर स्वच्छ वाटणा-या पाण्यातच गाळ असतो काही लोकांना वाटते आपण फार शहाणे आहेत माहित नसते त्यांना आपण किती अनजाने आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *देव नाही देव्हा-यात,* *देव नाही देवालयी,* *देव मुर्तीत ना मावे,* *तीर्थक्षेत्रात ना दावे,* *तुझ्या-माझ्या जड देही* *देव भरूनिया राहे.....!* *देवाचे घर कोणते किंवा तो कुठे राहतो ? त्याची भेट घेण्यासाठी डोंगर चढून जायचे की दूर-दूर चालायचे ? परदेशी जायचे की नदीत स्नान करायचे. देवाची आरती ओवाळायची की सुवासिक धूप-अगरबत्ती लावायची ?* *" शेवटी देवाचा शोध हा प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रयत्न आहे आणि जो कोणी देवाला खरेपणाने शोधतो त्याला तो नक्कीच सापडतो."* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते.जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपदेश - preaching* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* रोज शाळा सुटल्यावर भूक लागल्यामुळे चिन्मय धावतच घरी यायचा. त्याची आई रोज त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करायची. कधी इडली, ढोकळा, थालिपीठ, नूडल्स अगदी रोज काहीतरी वेगळे असायचेच. शाळेतल्या मित्रांना त्याचा हेवा वाटायचा. एके दिवशी घरी आल्यावर आई झोपलेली होती. तो घाईने आई जवळ गेला. आईला ताप आला होता. त्याला पाहून क्षीण आवाजात आई म्हणाली, " चिनू बेटा, मला ताप आल्यामुळे अजिबात उठवले जात नाही आहे. मी तुझ्यासाठी काही खायला करु शकले नाही. आजचा दिवस तू सकाळचीच पोळी-भाजी खा आणि दूध पी". हे ऐकल्यावर चिनूला खूपच राग आला. "हे काय डब्याही तेच आणि आताही तेच ? मी नाही काही खात जा" चिन्मय धूसफूसत म्हणाला. शेवटी काही न खाताच तो चिडून खेळायला गेला. आईला बरे नाही म्हणून संध्याकाळी बाबा स्वयंपाक करत होते. "चिनू आज तुझी मला मदत हवी आहे. मटार सोलून दे बरं", बाबा पोळया लाटता लाटता म्हणाले. नाखुषीनेच चिनूने मटार सोलायला घेतले. त्यानंतर तांदूळ निवडले. "बापरे किती वेळ लागतो हे करायला." चिनू वैतागला. बाबाही बराच वेळापासून स्वयंपाकघरात होते पण त्याच्या फक्त पोळया आणि भाजी करुन झाली होती. अजून कुकर लावायचा बाकी होता. "हो ना रे चिनू, आपण इतका वेळ स्वयंपाकघरात आहोत पण दोनच पदार्थ करु शकलो. आई रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ इतके पदार्थ कसे करत असेल ? ते सुध्दा आपली अजिबातच मदत नसतांना?" बाबाच्या ह्या प्रश्नाने चिनूला आपले संध्याकाळचे वागणे आठवले. ताप आलेला असतांनाही आपण आईशी किती वाईट बोललो हे आठवून त्याला खूप वाईट वाटले. धावतच तो आईच्या खोलीत गेला. आईच्या जवळ जाऊन तिला म्हणाला , "आई मला माफ कर. तू आमच्यासाठी किती कष्ट घेतेस. मी मात्र तुला बर नसतांनाही खायला करायचा हटट केला. कधी कधी तर तू प्रेमाने कलेले, मी मात्र आवडत नाही म्हणून सरळ टाकून देतो. माफ कर मला आई". चिन्यमचे हे बोलणे ऐकून आईने त्याला जवळ घेतले.बाबाही पाने आणायला स्वयंपाक घरात गेले.आणि सर्वजण मिळून आनंदाने जेवले. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार. 💥 जन्म :- १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार. 💥 मृत्यू :- १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान. २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्य सरकारी कर्मचार्यांना १ जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनलाभ देण्याची राज्य सरकारने केली घोषणा* --------------------------------------------------- 2⃣ *जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील मेगा भरती थांबवली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा* --------------------------------------------------- 3⃣ *धनगर आरक्षणप्रश्नी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त १३ ऑॅगस्ट रोजी राज्यभर तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय धनगर समाज महासंघातर्फे घेण्यात आला* --------------------------------------------------- 4⃣ *एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट 'आ'वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त* --------------------------------------------------- 5⃣ *भारतातील सर्वात पहिला बेबी स्पा हैदराबाद शहरामध्ये सुरू, हा स्पा खास तान्ह्या मुलांकरिता असून यामध्ये केवळ नऊ महिन्यांपर्यंत वय असलेल्या तान्हय़ा मुलांना प्रवेश दिला जाणार* --------------------------------------------------- 6⃣ *रूपे कार्ड आणि भीम अँप याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास 'जीएसटी'मध्ये सवलत देण्याची योजना केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत करण्यात आली.* --------------------------------------------------- 7⃣ *चीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने केले पराभूत* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांना आळशी बनवू नये* https://storymirror.com/story/5966bd362086f79414698de6 पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारावे आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *दामोदर हरी चाफेकर* दामोदर चाफेकर यांचा जन्म श्री. हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी २५ जून १८६९ रोजी झाला. लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव दामोदरवर होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील एरवडा तुरूंगात फाशी दिली. लहानपणापासूनच दामोदरला व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रमंडळींना संघटीत करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती. इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरि चाफेकर व वासुदेव हरि चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) सर्वात ज्यास्त उस उत्पादक असलेला राज्य कोणता ?* उतरप्रदेश *०२) भारतात हीरेची सर्वात जास्त ठेव कोणत्या राज्यात आहे ?* मध्यप्रदेश *०३) भारतीय संविधान मधील समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेण्यात आली ?* ऑस्ट्रेलिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुदर्शन पाटील जोगदंड 👤 गुलाबलाल जैस्वाल 👤 राजेंद्र पोकलवार 👤 नरसिंह पावडे देशमुख 👤 गंगाधर ढगे 👤 दिनेश दारमोड 👤 दीपक हिवराळे 👤 हर्ष पाटील 👤 इरेश वंचेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूसकी* माणूसकीवरचा विश्वास रोज उडू लागला आहे इथे राजरोस फसवण्याचा प्रकार घडू लागला आहे दुस-याला फसवणारे समाधानी असू शकत नाहीत असले लोक कधीच आनंदाने हसू शकत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *_"मैत्री"_* *'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मैत्री'च्या नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते. त्यातून ख-याखु-या अस्सल 'मैत्री'ची नाती निर्माण होतात.* *बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडेल, आणि 'मैत्री' अभंग राहिल.. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात होऊन गेलेल्या घटना ह्या भूतकाळातल्या असतात आणि त्या कुणालाही बदलता येत नाहीत. परंतु त्यात झालेल्या वाईट गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जपले पाहिजे आणि जी चांगली होऊन गेलेली घटना आहे त्या घटनेला अधिक चांगले कसे करता येईल हे करण्यासाठी आपल्यासमोर भविष्यकाळ आहे तो मात्र आपल्या हातात आहे. म्हणून भूतकाळाला जास्त महत्त्व न देता भविष्याला आपल्या डोळ्यांसमोर सदैव ठेवून जीवन जगायला शिकले पाहिजे हा काळाचाच नियम आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पुनरावृत्ती - Repeat* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नगारा* एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढय़ात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्यावर एका झाडाची फांदी वार्यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्यावर आपला पंजा मारून लागला. तेवढय़ात त्याच्या लक्षात आले की नगार्याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्याचे कातडे कुरतडून फाडले तर.. आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या. तात्पर्य : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/08/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४४ - ज्यूंचे शिरकाण - गेस्टापोने ऍन फ्रँक व तिच्या कुटुंबास अटक केली. १९४७ - जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. १९८३ - थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी. १९८४ - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले. १९९३ - टॅक्सीचालक रॉडनी किंगच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल लॉस एंजेल्सच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना ३० महिन्याची कैद. २००६ - आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी. 💥 जन्म :- १९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक. १९३१ - नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी. 💥 मृत्यू :- १५७८ - सेबास्टियाव पहिला, पोर्तुगालचा राजा. १९१९ - डेव्हिड ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९६७ - पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मराठा आरक्षणाची सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला घेण्याचा हायकोर्टाचा निर्णय, राज्यातील तीव्र आंदोलन, आत्महत्यांची हायकोर्टाकडून दखल.* --------------------------------------------------- 2⃣ *गडचिरोली - 2 महिलांसह एकूण 5 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचे यश* --------------------------------------------------- 3⃣ *भंडारा : येथील जवाहर नवोदय विद्यालय अल्पसंख्याक वसतिगृहाच्या स्थानांतरणास अल्पसंख्यांक विभागाची मान्यता.* --------------------------------------------------- 4⃣ *यवतमाळ : बोगस बिटी-३ बियाणे निर्माण करणाऱ्या कंपनी मालकाला यवतमाळ पोलिसांनी गुजरातमधून केली अटक.* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन, यवतमाळ जि.प. समोर धरणे, मागणीचे निवेदन सादर* --------------------------------------------------- 6⃣ *भारताच्या सायना नेहवालचं जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात* --------------------------------------------------- 7⃣ *इंग्लंडला दुस-या डावात भारताचा गोलंदाज इशांत शर्मा याने एकामागोमाग धक्के दिले, भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा सातव्या स्थानावर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन बाबत प्रतिक्रिया* येत्या 15 ऑगस्ट रोजी फ्रेश मॉर्निंग बुलेटीन ही सेवा तीन वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने या टीमविषयी आपले मत आम्हांला या गुगल फॉर्म द्वारे कळवावे. यापुढे अजून चांगली सेवा देण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न राहील. https://goo.gl/forms/pu7luhvU7SovaB673 तेंव्हा आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चांगल्या प्रतिक्रियेला प्रसिद्धी देण्यात येईल याची नोंद घ्यावी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= अनंत लक्ष्मण कान्हेरे अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. तो इ.स. १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचा सदस्य होता. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारा अनंत कान्हेरे हा खुदीराम बोस याच्या नंतरचा सर्वांत तरूण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंताने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे असे समवयस्क साथीदारांची जोड मिळाली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= 01) इटलीची राजधानी कोणती ? रोम 02) लिट्ल मास्टर या नावाने कोणाला ओळखले जाते ? सुनील गावसकर 03) चॉकलेटमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर होतो ? कोको *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रभू रेब्बावार 👤 व्यंकटेश अमृतवार 👤 प्रतिभा येवतीकर 👤 अहेमद शेख 👤 आनंदराव आवरे 👤 अमित सूर्यवंशी 👤 विठ्ठल पवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वप्न* ऐन मोसमातच पावसाची दडी आहे लहरी पावसाची ही त-हा हर घडी आहे दडी मारल्याने सारे हवाल दिल होतात पाहिलेले स्वप्न सारे हवेत विरून जातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●🔸‼ *विचार धन* ‼🔸●•••• *तीन वर्षांपूर्वी ह्रदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. किडनी निकामी झालेला युसूफ अन्वर नावाचा एक तरूण मृत्यूच्या दारात होता. डायलिसीसवर त्याचा श्वास सुरू होता. दुसरी किडनी घ्यायची तर परिवारात रक्त जुळेना. जितेंद्रसिंग बिट्टा नावाचा दुसरा एक तरूण तिथं आला. त्याचीही किडनी गेलेली आणि कुटुंबात रक्त जुळत नव्हतं. एक दिवस अन्वर-जितेंद्रसिंग ओळख-भेट झाली. समदु:खी म्हणून घनिष्ठता वाढली. परस्परांना हात देण्याचा निर्धार झाला. योग असा की युसूफला जितेंद्रच्या पत्नीची व जितेंद्रला युसूफच्या मामाची किडनी जुळली. दोन्ही परिवारांच्या डोळ्यात कृतज्ञता दाटून आली !* *माणसा-माणसांत भेद करणारे सारे पूल ढासळले आणि दोघांनाही जीवदान मिळालं. आपल्याच राखेतून उडणा-या फिनिक्स पक्षाप्रमाणे जगण्याची नवी उमेद मिळाली. हिंदू मुसलमान भाई-भाई झाले. शरीराला कुठं धर्म ठाऊक असतो ! रक्तालाही कुठला धर्म नसतो. रक्त धर्मावरून नव्हे, रक्तगटावरून जुळते. पण माणसा-माणसांत भिंती उभ्या केल्यात व्यवस्थेनं. या भिंती दगड-विटांच्या नाहीत. त्या धर्म-पंथ-संप्रदायाच्या आहेत. जाती-धर्मावरून तलवारी निघतात. अशा क्षुद्र, निरर्थक गोष्टींसाठी माणसानं आपसात लढायचं का ?* *"धर्म, जाती, पंथ झाले खूप आता* *कोणता झेंडा धरू माणूस व्हाया ?* *रक्त असते लाल सा-यांचे गडेहो..* *लोक का लढतात द्वेषाच्या लढाया ?"* ••●🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• ♦♦♦♦♦♦♦♦♦ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात. असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत. अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी. काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे. अशा ठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे. ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो. या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत, हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधान - Solution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= सकारात्मक पाऊल एक प्राचीन चिनी कथा आहे. डोंगराळ भागात राहणारा एक माणूस आपल्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील एका तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे अनेक वर्षांपासून ठरवत असतो. अंतर खूप असल्याने साधारण रात्री 2 वाजेदरम्यान काळोखातच दर्शनासाठी चालत जावे लागत असे.काही झाले तरी त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायचीच,असा ठाम निश्चय मनाशी करत तो गावकर्यांना व त्या तीर्थक्षेत्राला भेट देणार्या भाविकांना मार्ग व सोबत लागणार्या सामानाविषयीची माहिती विचारतो.गावकरी त्याला आवश्यक सामानाची यादी देतात.सोबत कंदील घेऊन जा,असा सल्लाही देतात.मनाशी निश्चय केल्याप्रमाणे तो रात्री 2 वाजता तीर्थक्षेत्राकडे निघतो.अंधार असतो. कंदिलाच्या प्रकाशात त्याला केवळ दहा पावलांच्या अंतरावरील रस्ताच दिसत असतो.तो मनाशी विचार करतो 20 किलोमीटरचा रस्ता आणि अशा अंधारात कंदिलाच्या मंद प्रकाशात केवळ काही अंतरावरचेच दिसतेय.त्याची पावले जागीच थबकतात.त्याच्या मागोमाग एक साधु महाराज त्याला येताना दिसतात.तो साधुला थांबवतो.म्हणतो,तुमच्याकडे तर माझ्या कंदिलापेक्षाही मंद प्रकाश देणारा कंदील आहे.रस्ता धोकादायक आहे.तुम्ही जाऊ नका?साधु हसतो.त्याला म्हणतो,‘अरे एकदाच दहा पावले कुणाला टाकायचीत?एक पाऊल चालण्याइतका प्रकाश खूप झाला. एक एक पाऊल टाकत हजारो मैल दूरचा टप्पा आपण सहज गाठू शकतो.तो साधु महाराजांनाच गणिताचा तर्क सांगतो.मी तर्कनिष्ठ आहे.मी श्रद्धाळू नाही.मी गणितज्ज्ञ आहे.मला समजावण्याचा तुमचा प्रयत्न निष्फळ आहे.असे सांगत तो पुन्हा त्या मार्गावर न जाण्याची विनंती साधुला करतो.साधू त्याला म्हणतो,बाळा एक पाऊल,अर्थात पहिले पाऊल महत्त्वाचे आहे.पहिले सकारात्मक पाऊल कित्येक किलोमीटरचा तुमचा कठीण प्रवासही सुकर करतो,तर पहिल्याच पावलाला तुमचा विश्वास डगमगल्यास प्रवास कितीही छोटा असू दे,तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहचूच शकत नाहीत. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९०० - फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले. १९२३ - कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी. १९४६ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना. १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य. २००५ - मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव २०१४ - चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार. 💥 जन्म :- १७७० - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा. १८११ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक. १८५५ - ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान. १८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८७२ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा. १९३३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाड १९३७ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू १९४८ - ज्यॉँ-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा. १४६० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा. १७९७ - जेफ्री ऍम्हर्स्ट, इंग्लिश सेनापती. १९२५ - विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९७७ - मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष. १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आर्थिक सुधारणांच्या बाबतीत मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय असल्याचं मत चिनी मीडियानं मांडलं आहे* --------------------------------------------------- 2⃣ *मध्य प्रदेश: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात* --------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - उल्हासनगरात अक्षर प्लास्टिक कारखाना सील, एका टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचे आढळले साहित्य* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर* --------------------------------------------------- 5⃣ *भारतात होऊ घातलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रशिया मीडियाच्या माध्यमातून हस्तक्षेप करण्याची शक्यता ऑक्सफर्ड तज्ज्ञांनी वर्तवली* --------------------------------------------------- 6⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात दिनेश कार्तिकला शून्यावर त्रिफळाचीत करत बेन स्टोक्सने साजरे केले बळींचे शतक* --------------------------------------------------- 7⃣ *World Badminton Championships 2018 : भारताची महिला बॅटमिंटनपटू सानया नेहवालने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक मारली* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *उमाजी नाईक* उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक. होते. नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कलालवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यासस्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) कोणत्या किटकाच्या दंशानं हिवताप होतो ?* डास *२) सूक्ष्म वीजप्रवाह मोजणारं उपकरण कोणतं ?* सूक्ष्मवीजमापी *३) क्षय हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?* फुफ्फुस *४) तापमापकाचा शोध कोणी लावला?* डॅनियल फॅरेनहाइट *५) पेशीविषयक माहिती देणारं शास्त्र कोणते ?* पेशीवंशशास्त्र *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अजय बिरारी 👤 पोतन्ना चिंचलोड 👤 शिरीष पद्माकर देशमुख 👤 प्रदीप काळे 👤 उत्तमराव नरवाडे 👤 भंवर सिंग *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *ध्यास* काही काहींना सतत नव्याचा ध्यास असतो यशस्वी होण्याचा तोच तर खरा श्वास असतो ध्यास धरणाराला खरं यशस्वी होता येत ख-या अर्थाने यशाचं गाणं त्याला गाता येत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.* *'रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.* *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काल तुम्ही तुमच्याबद्दल जो काही विचार केला असेल त्याची आज थोडी उजळणी करून पहा. नक्कीच तुम्ही तुमच्याबद्दल चांगलाच विचार केला असेल आणि तुमच्याच हिताचा असेल की, ज्यामुळे तुमच्या जीवनात काही तरी परिवर्तन घडवून आणण्यासाठी असेल. आता तोच विचार जर तुमच्या जीवनात चांगले परिवर्तन घडून आणतो तर त्याच विचाराला तुम्ही इतरांसमोर मांडून पहा. कदाचित इतरांच्याही जीवनात तुम्ही सांगितलेल्या विचारांशी ते सहमत होतील आणि त्यांच्या जीवनात इष्ट तो बदल घडून येऊन चांगले जीवन बदलण्याची दिशा मिळेल. म्हणजेच तुमच्या हातून एखादे चांगले कार्य इतरांसाठी घडले त्याचे समाधान तुम्हाला वाटेल. तुमच्या एका चांगल्या विचारांमुळे तुमच्या जीवनात रोडवर इतरांच्याही जीवनाचा चांगला विचार करण्याची सुवर्णसंधी आली हे कधीही तुम्ही विसरणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= परिवर्तन - Change संकलक - कुणाल पवारे, कुंडलवाडी 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वतः मध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला कधीही चांगले असते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/08/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ॥ १ ऑगस्ट दिनविशेष ॥ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी - भारत. घडामोडी १९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *रायगड - आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून 2 लाख रुपयांची मदत, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास मिळाले पत्र.* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा कोड विधेयक (दुसरी घटना दुरुस्ती) 2018 लोकसभेत मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर, १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांपैकी ५४ हजार ७२७ विद्यार्थ्यांना प्रवेश.* --------------------------------------------------- 4⃣ *राज्य मागासवर्ग आयोगाची 3, 4 ऑगस्टला बैठक, पाच संस्थांच्या आलेल्या माहितीचं होणार विश्लेषण* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- परराज्यातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात यावेत, यासाठी राजाराम महाराजांनी प्रयत्न केले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* --------------------------------------------------- 6⃣ *बीड - अभिजीत देशमुखच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी* --------------------------------------------------- 7⃣ *World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांतची विजयी सलामी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हमें तो लूट लिया* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लोकमान्य टिळक* लोकमान्य बाळ गंगाधर हे थोर भारतीय नेते,भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखली (ता. दापोली, जि. रत्नागिरी). चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत. गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला. या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला. १८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली. डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते; तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) लॉर्डस हे मैदान कोणत्या खेळाशी संबधित आहे ?* क्रिकेट *२) चौथी महत्त्वाची शासन शाखा म्हणून कशाचा उल्लेख होतो ?* वृत्तपत्रसंस्था *३) पिकातील भुसा स्वच्छ करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?* उफणणी *४) ड्यूस, बॅक, हँड, डबल फॉल्ट या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?* लॉन टेनिस *५) 'मरीनर-९' हे मंगळयान मंगळ ग्रहाकडे कधी झेपावलं ?* ३० मे १९७१ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मंगेश हनवत्ते 👤 गोविंद पाटील जाधव 👤 एकनाथ डुमणे 👤 शिवसांब गणाचार्य 👤 संजीवकुमार हामंद 👤 शिनू दर्शनवाड 👤 बंडू पाटील मोरे 👤 आनंद पेंडकर 👤 मुखीत अहमद 👤 पवनकुमार भाले 👤 शादूल शेख 👤 विश्वनाथ चन्ने 👤 नागेश टिपरे 👤 दिलीप साळुंके 👤 साईनाथ पाटील मोकलीकर 👤 बालाजी गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *गाजरं* बारा महिने कोणी खात नाही बाजरं दाखवून काय होणार लाल लाल गाजरं पहायला मिळण्या पेक्षा खायला मिळालं पाहिजे बारा महिने कोणी काही खात नाही कळालं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणताही माणूस दुस-या माणसाला का फसवतो? विश्वासघात का करतो? कारण आहे त्या सुखात, आहे त्या समाधानात माणूस राहू शकत नाही. माणसाला थोडंफार सुख-समाधान मिळत असतंच. पण त्याची जगण्याची, विचार करण्याची बैठक पक्की नसते, कसं जगायचं, हे एकदा निश्चित ठरवलं की आहे त्या सुखा-समाधानातही माणूस छान राहू शकतो.* *आहे त्या आनंदात समाधान न मानणारी माणसे स्वत:ला आणि इतरांनाही छळत असतात. सुख, समाधान कधी कुणाला मिळालेच नाही असे होत नाही. संकटे आली की माणूस म्हणतो, हे माझ्याच वाट्याला काय आले. एक! दु:खाच्या ठोकरीने तो सुखाच्या जागा विसरून जातो. सुखाशी कृतघ्न होतो. पण तो विसरतो, संकटे येण्यापूर्वी तो पावसात भिजला होता. त्याने सुर्योदय पाहिला होता. फुलांनी बहरलेली झाडं पाहिली होती. उन्हाळ्यात जांभळं खाताना एकमेकांना वाकुल्या दाखविल्या होत्या. सुखाच्या जागा आपल्याजवळच असतात.* 🌹 *॥ रामकृष्णहरी ॥*🌹 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= संकटकाळात आपल्या मदतीस सर्वात प्रथम धावून येणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे आपला जीवलग मित्र. मित्राशी आपले मैत्रीचे नाते अगदी जीवाभावाच्या पलिकडे असते. कौटुंबिक नाते हे जरी रक्ताचे असले तरी मैत्रीचे नाते आपण निर्माण केलेले असते. या मैत्रीमध्ये एकमेकांच्या सुखदुःखाची जवळीकता साधलेली असते. ती निरपेक्षवृत्तीनेच जोपासलेली असते. कोणत्याही कामासाठी कुठलाही विचार न करता पहिल्यांदा आपण आपल्या ओठांवर नाव असते ते मित्राचे. इतरांवर आपण विश्र्वास एकवेळ ठेवणार नाही, परंतु मित्रावर अधिक विश्वास ठेवतो. मित्रही अशीच निवडायचे की, तो आपल्या जीवनात कधीही, कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी तो आपल्या मदतीला धावून आला पाहिजे आणि आपण त्याच्या मदतीला धावून गेले पाहिजे. मैत्रीमध्ये व्यवहार हा नसतोच. असतो तो एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊन त्यातून सोडवण्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे करण्यासाठी. अशाच मित्रांशी मैत्रीचे नाते जोडून आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवून मैत्री या नात्यात अतूट संबंध प्रस्थापित करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. तरच मैत्रीच्या नात्याला अर्थ प्राप्त होईल. स्वार्थापुरती मैत्री काही कामांची नाही किंवा अशा स्वार्थी नात्याला मैत्रीही म्हणता येणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= व्यवहार - Behavior =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत बहिणाबाई* बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या.एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला,"मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले. *तात्पर्य- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "* 〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७५ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियन चा नेता जिमी हॉफा गायब. १९८१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू. १९८७ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान. 💥 जन्म :- १९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. १९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री. 💥 मृत्यू :- १९७२ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान. १९८० - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. १९९३ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालावर ठाम, 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीमध्ये करणार आंदोलन* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - क्रिमीनल लॉ (घटना व दुरूस्ती) सुधारणा विधेयक 2018 लोकसभेत मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद- आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट* -------------------------------------------------- 5⃣ *शिर्डी - गुरुपौर्णिमेला साईचरणी कोट्यवधीचे दान, चार दिवसांत 6 कोटी 66 लाख रुपयांचे दान* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमाला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, प्रो-कबड्डी लीगचा हा सहावा हंगाम असून तीन महिने सामने चालू राहणार* --------------------------------------------------- 7⃣ *कोलंबो : भारतीय युवा (19-वर्षांखालील) संघाचा श्रीलंकेतील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यातही दणदणीत विजय* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *नजर हटी, दुर्घटना घटी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोहम्मद रफी* मोहम्मद रफी हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी,भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्यायआणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते. पुरस्कार आणि सन्मान - पुण्यात रफीच्या नावाची मोहम्मद रफी आर्ट् फाऊंडेशन नावाची संस्था आहे. ती दरवर्षी अंदाज-ए-रफी नावाचा कार्यक्रम करते आणि एखाद्या गायकाला पुरस्कार देते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) स्वतंत्र भारताचे पहिले भू-दल सेनापती कोण होते ?* जनरल के.एम.करिअप्पा *२) कोणत्या नदीला 'बिहारचे अर्शू' असं संबोधलं जातं ?* कोसी *३) झरिया हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?* कोळशाच्या खाणीसाठी *४) संम्पूर्णानन्द संस्कृत विश्वविद्यालय कोठे आहे ?* वाराणसी *५) उद्याने, शेती आणि खाद्यान्न उत्पादने घेण्याच्या दृष्टीने केल्या जाणार्या कृषिव्यवसायाला काय म्हणतात ?* मिर्श शेती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * नागनाथ इळेगावे * देवेंद्र लाड * प्रशिक नंदूरकर * मनोज बुंदेले * कैलास गायकवाड * दिलीप सोळंके * प्रीतम नावंदीकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगंध* ईर्षा असणारा स्वतःची महानता सांगत असतो सुगंध असो की दुर्गंध आपोआप पांगत असतो मी चांगला म्हणायची सुगंधाला आवश्यकता नाही निरीक्षणाने समजतात की गोष्टी ब-याच काही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.* *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.* •••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= संकटकाळात आपल्या मदतीस सर्वात प्रथम धावून येणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे आपला जीवलग मित्र.मित्राशी आपले मैत्रीचे नाते अगदी जीवाभावाच्या पलिकडे असते.कौटुंबिक नाते हे जरी रक्ताचे असले तरी मैत्रीचे नाते आपण निर्माण केलेले असते.या मैत्रीमध्ये एकमेकांच्या सुखदुःखाची जवळीकता साधलेली असते.ती निरपेक्षवृत्तीनेच जोपासलेली असते.कोणत्याही कामासाठी कुठलाही विचार न करता पहिल्यांदा आपण आपल्या ओठांवर नाव असते ते मित्राचे.इतरांवर आपण विश्र्वास एकवेळ ठेवणार नाही, परंतु मित्रावर अधिक विश्वास ठेवतो.मित्रही अशीच निवडायचे की,तो आपल्या जीवनात कधीही,कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी तो आपल्या मदतीला धावून आला पाहिजे आणि आपण त्याच्या मदतीला धावून गेले पाहिजे.मैत्रीमध्ये व्यवहार हा नसतोच.असतो तो एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊन त्यातून सोडवण्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे करण्यासाठी.अशाच मित्रांशी मैत्रीचे नाते जोडून आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवून मैत्री या नात्यात अतूट संबंध प्रस्थापित करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.तरच मैत्रीच्या नात्याला अर्थ प्राप्त होईल.स्वार्थापुरती मैत्री काही कामांची नाही किंवा अशा स्वार्थी नात्याला मैत्रीही म्हणता येणार नाही *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संपत्ती - Wealth* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *घामाचा पैसा* धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी आईकडून घेतला तिसर्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००६ - इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार. २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार. 💥 जन्म :- १९७३ - पार्श्वगायक, सोनू निगम. 💥 मृत्यू :- १९९४ - मराठी साहित्यातील कथा लेखक शंकर पाटील *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशवासियांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावे, पंढरपूरची वारी म्हणजे अद्भूत यात्रा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४६ व्या 'मन की बात ' मधून जनतेशी साधला संवाद* --------------------------------------------------- 2⃣ *मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्या आंदोलक तरुणांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.* --------------------------------------------------- 3⃣ *अपघातातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती* --------------------------------------------------- 4⃣ *उत्तर प्रदेश : मुसळधार पावसामुळे 65 जणांचा मृत्यू, 57 जण जखमी* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : जिल्ह्यातील २४ शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक फौजदारी कारवाईच्या कचाट्यात. बोगस पटसंख्या दाखवून शासकीय योजना लाटल्याचा आरोप* --------------------------------------------------- 6⃣ *भारताच्या स्मृती मंधानाने महिलांच्या क्रिकेट सुपर टी-20 लीगमध्ये जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अखेर नावावर केला* --------------------------------------------------- 7⃣ *Russian Open Badminton 2018 : भारताच्या सौरभ वर्माने यंदाच्या मौसमातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्ती मध्ये प्रकाशित लेख *अध्ययन निश्चिती तपासणी मोहिम* http://epaper.ejanshakti.com/m5/1755626/Mumbai-Janshakti/30-07-2018#page/4/1 पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुलोचना दीदी* मराठी चित्रपटातील सात्विक, सुंदर, सोज्वळ नायिका, आई, वहिनी, जिजाबाई म्हणजे अभिनेत्री सुलोचना दिदी. वहिनीच्या बांगड्या, माझं घर माझी माणसं, अन्नपूर्णा, एकटी, मराठा तितुका मेळवावा असे कितीतरी मराठी चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने सजवले. हिंदीमधल्या अनेक हिरोंची आई त्यांनी पडद्यावर साकारली.आज ३० जुलै २०१८ सुलोचना दिदींचा ९० वा वाढदिवस आहे.आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. हा एक सुंदर योग आहे. अतिशय साधं, निगर्वी, समाधानी कृतार्थ व्यक्तिमत्त्व म्हणजे सुलोचना दीदी. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला आहे ?* स्वित्झर्लंड *२) चोल राजघराण्याचा संस्थापक कोण ?* राजा विजयालय *३) एफटीआयआयच्या संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?* भूपेंद्र कँथोला *४) 'महिलांना मग-२१ विमान उडवण्याची भीती वाटते' असे विधान करणारे खासदार कोण ?* अर्जुन राम मेघवाल *५) यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्या मराठी गायकाचे नाव काय ?* महेश काळे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागनाथ इळेगावे 👤 सचिन गादेवार 👤 प्रवीण कॅटरवाड 👤 विजय कुऱ्हाडे 👤 प्रियांका घुमडे 👤 शेख नवाज 👤 निलेश कोरडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *उमेद* ध्येय तेच गाठतात ज्यांच्यात उमेद आहे ध्येय गाठणे अशक्य जर वागण्यात भेद आहे ध्येय गाठायचे तर उमेद असली पाहिजे खडतर प्रयत्ना मध्ये कुरकूर नसली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ? बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!* *कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?* *" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "* •••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●••• 🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनात येणारी वेळ आणि येणारी संधी ती येणारच. तिची वाट पाहत बसू नका. कारण तिच्या वाट पाहण्यात आजचा वेळ वाया घालवू नका. आजचा वेळ जर तुम्ही वाट पाहण्यात घालवला तर तुम्ही ठरवलेले काम पूर्ण होणार नाही. विनाकारण तुमचा वेळ वाया जाईल आणि हातात घेतलेले काम अर्धवटच राहील. येणारी संधी ही संधीच राहील एखाद्या मृगजळासारखी. म्हणून आज घेतलेले काम मन लावून पूर्ण करा आणि ते काम बाजूला सारा. जेव्हा तुमचा तुम्हाला काम झाल्याचा पूर्ण विश्वास होईल तेव्हा उद्याची वेळ आणि संधी तेवढीच तुम्हाला चांगल्या यशाकडे आणि पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रेरीत करेल. अन्यथा यशाऐवजी अपयशाकडे नेण्यासाठी आपणच कारणीभूत होऊ शकतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अर्धवट - Partial* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रयत्नांती यश* थोमस अल्व्हा एडिसन यांची ही कथा.आपल्या अनेक शोधांनी अवघ्या मानवजातीचे आयुष्य उजळवून टाकणारा ,ते सुखमय करणारा हा संशोधक . सतत कसले ना कसले प्रयोग करीत प्रयोगशाळेत दिवसभर संशोधन करणे हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन करणे,हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन केल्यावर त्यांना दिव्याचा शोध लागला .त्यावेळी भेटावयास ,त्यांचे कौतुक करावयास आलेल्या व्यक्तींनी त्यांना विचारले,'या शोधासाठी तुम्हाला किती प्रयोग करावे लागले ?"'एक हजार ...' एडिसनम्हणाला .त्यांना पुन्हा विचारण्यात आले ,'आपण एक हजार वेळा प्रयोग केलेत .परत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर खरतर आज लाभलेल्या यशाबद्दल आपणाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया काय ?' यावर एडिसन म्हणाला ९९९ प्रयोगांनी दिवा बनवता येत नाही ,हेच मला कळल.' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 🌺🍁जीवन विचार🍁🌺 〰〰〰〰〰〰〰 जो आपणास ज्ञानाशी एकरुप करून टाकतो त्यास गुरू म्हणतात.गुरू म्हणजे सतत उचंबळणारा ज्ञानसागर होय. नम्रता आणि सेवा हे ज्ञानप्राप्तीचे खरे मार्ग आहेत. जो सर्व भूतकाळ दाखवितो वर्तमानकाळाची ओळख करून देतो, भविष्यकाळाची दिशा सांगतो, 🙏गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचं आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढं मोठं असेल त्या मानानं गुरूकडून ज्ञान घेता येईल. ज्ञान अनंत असतं हे ओळखूनच न्यूटन म्हणतो , ' माझ ज्ञान सिंधूत बिंदू आहे .' सॉक्रेटिस म्हणतो , ' मला काय समजत नाही एवढच मला समजतं.' 🙏 गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्तीच , तळमळ , सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/07/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९०७ - कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले. १९०८ - किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला. १९०९ - लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडीपार केली. १९१७ - कॅनडात आयकर लागू १९२५ - सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना १९३४ - ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या. १९४३ - दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीचीहकालट्टी. १९५२ - पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले. १९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली. १९७३ - सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित. १९८४ - सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्कायाअंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर १९९७ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी. १९९९ - लान्स आर्मस्ट्रॉँगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली. २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी. 💥 जन्म :- ११०९ - अफोन्सो पहिला, पोर्तुगालचा राजा. १५६२ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. १८४८ - आर्थर बॅलफोर, युनायटेड किंग्डमचे ३३वे पंतप्रधान १९०८ - बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी. १९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी 💥 मृत्यू :- ३०६ - कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट. १४०९ - मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा. १४९२ - पोप इनोसंट आठवा.१९३४ - एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर १९७३ - लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर : राज्यातील मंत्र्यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार, सोलापुरातील पोलीस सूत्रांनी दिली माहिती* --------------------------------------------------- 2⃣ *मराठा आरक्षण - आंदोलनादरम्यान जाळपोळ, हिंसा करु नका - शरद पवार यांचे अवाहन* --------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद - वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाच्या अडचणीमुळे मराठा क्रांती मोर्चाचे कायगाव टोका येथील आंदोलन स्थगित* --------------------------------------------------- 4⃣ *पिंपरी - पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा* --------------------------------------------------- 5⃣ *ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण- न्यायालयानं कार्लो गेरोसाच्या विरोधात केलं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी* --------------------------------------------------- 6⃣ *आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका सुधा नरवणे यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *सोलापूर : राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या कौस्तुभ तळीखेडेला गोल्ड मेडल* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हेडफोन पासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सोमनाथ चॅटर्जी सोमनाथ चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते आहेत. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान मतदारसंघातून आणि इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल राज्यातील जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते इ.स. १९८५ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला. अभ्यासू वृत्ती,आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला.. जुलै इ.स. २००८मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे कार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी इ.स. २००९ ची लोकसभा निवडणुक न लढवता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'जातककथा'च्या अनुवादिका कोण ?* दुर्गा भागवत *२) व्ही.एस.एस.सी.चे विस्तारित रूप काय ?* विक्रम साराभाई स्पेस सेंटर *३) नायलॉन, प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?* कराथर्स *४) पी. ए. संगमा यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली. ?* 'नॅशनल पीपल्स पार्टी' *५) र्जमन नॅशनल सोशालिस्ट पार्टीची स्थापना कधी झाली ?* ५ जानेवारी १९१९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * रामकुमार चिलकेवार * श्यामकुमार चिलकेवार * साईनाथ कामीनवार * श्रीधर चिंचोलकर * प्रा. सौ. संगीता भालसिंग * नरेंद्र राठोड * ऋचाली चंदेल बायस * लक्ष्मण सुरकार * अभिषेक येरावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= @@ गुगली @@ *खरं सुख* जीवनात मानलं तर सुख आहे नाही तर क्षणोक्षणी कशातही दु:ख आहे खरं सुख हे मानण्यात असते मानलं नाही तर सारे दु:ख असते शरद ठाकर सेलू जि परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.* *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....* *"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."* *तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.* *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगात, विचारात आणि कृतीत सर्व मानवतावादी मूल्ये रुजलेली आहेत ह्यांनाच आपण खरे विद्वान म्हणावे. केवळ वरवर ज्ञान मिळवून चार लोकांत आपलाच उदोउदो करुन घेणारे महाभागही या जगात पुष्कळ आहेत. त्यांच्या ओठांवर एक आणि पोटात एक असते. अशी माणसे तेव्हाच काळाबरोबर लुप्त होतात. ते कधीच नंतरच्या काळात टिकत नाहीत अर्थात ते अल्पायुषी ठरतात. ज्यांना काळाबरोबर आणि काळाप्रमाणे पुढे पुढे जायचे आहे ते मात्र कशाचाही विचार न करता जगतात. तेच खरे मानवतेची मूल्य जोपासत कोणत्याही कालप्रवाहात चिरंजीव असतात हे मात्र सत्य आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मर्यादा - Limit* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मैत्रीच्या मर्यादा* एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.' एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!' 'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!' तात्पर्य - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४३ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली. १९६५ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले. 💥 जन्म :- १९१७ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९४५ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- १९७० - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती. १९८० - पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त वर्षा येथील शासकीय निवासस्थानी केली सपत्नीक विठ्ठलपूजा* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथीन फरझाना या महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निकाह हलाला संपुष्टात आणण्याची केली मागणी* --------------------------------------------------- 3⃣ *पटणा - लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर चरण त्रिपाठी यांची पक्षातून हकालपट्टी, मोदींसोबतच्या गळाभेटीवरुन राहुल गांधींवर केली होती टीका.* --------------------------------------------------- 4⃣ *पटणा - बिहार विधानसभेत दारुबंदी विधेयक मंजूर, मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी केले सडेतोड भाषण.* --------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न सन्मान द्या, खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी* --------------------------------------------------- 6⃣ *राज्य शासनाकडून ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार डॉ. किसन महाराज साखरे यांना जाहीर.* --------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *छडी लागे ( ना ) छम छम ....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1747581/Mumbai-Janshakti/24-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अझीम हशिम प्रेमजी* अझीम हशिम प्रेमजी (जन्म २४ जुलै १९४५) हे भारतीय उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ४१ व्या स्थानावर आहेत. गेल्या चार दशकात त्यांनी विप्रो कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून उदयास आणली. २००० साली एशियावीक ने त्यांची जगातील २० सर्वाधिक शक्तिशाली पुरुषांच्या यादीत निवड केली. टाईम नियतकालिकाने दोनदा त्यांचा जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देऊन गौरव केला. २००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) अलाहाबाद कोणत्या संगमावर वसले आहे ?* गंगा-यमुना संगम *२) आकाशस्थ ग्रहगोलातील अंतर मोजण्याचे एकक कोणते ?* प्रकाश वर्ष *३) अन्नाचे रक्तात रूपांतर करण्यासाठी मदत करणार्या पाचक द्रव्यांना काय म्हणतात ?* एन्झिम *४) मेंदूकवटीशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो ?* मेंदू आणि कवठी रचनाशास्त्राचा *५) कोर्बिलियन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* टेबल टेनिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष लवांडे 👤 विष्णू रामोड, धर्माबाद 👤 गोविंद कोकुलवार, नांदेड 👤 राजेश पाटील मनूरकर 👤 सचिन टेकाळे, कुपटी, 👤 संतोष मुलकोड, 👤 धिरजसिंग चौहान 👤 दीपक पांचाळ 👤 प्रमोद फुलारी 👤 कल्याण बागल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ======== *सावज* सावज थकलं की शिकार करता येते थकलेल पाहून आशा धरता येते सावज मिळे पर्यंत काही शाश्वती नसते काहींची महत्वाकांक्षा फार मोठी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'सहजस्थिती किंवा नीजस्थिती' कशी असते यासाठी एक साधे मोटारचे उदाहरण घेऊन स्पष्ट करू. मोटार चालकापाशी क्लच, ब्रेक, आणि अॅक्सिलेटर या तीन गोष्टी महत्वाची भूमिका बजावत असतात. चालकाचे काम संतुलित, संयमित मोटर चालविणे हे असते. त्याच्या पायाखालच्या अॅक्सिलेटरमुळे गाडीचा वेग वाढतो. आपल्या आयुष्यात सुखकारक, आनंददायक घटना घडल्या की आपल्या चित्तवृत्ती उचंबळून येतात. मन था-यावर रहात नाही... आणि प्रतिकूल, क्लेशकारक, घटना घडली की तेच मन काळवंडते, कोमेजते, मलूल, उदास आणि खिन्न होते. गाडीसमोर कोणी अनपेक्षित आले की आपण कचकन् ब्रेक दाबतो. तेव्हा होते तशी ही अवस्था असते.* *पण गाडी तर चालू राहिली पाहिजे आणि इंजिनशी तिचा असलेला थेट संबंध काही इच्छित काळापुरता तुटला पाहिजे, तेव्हा आपण क्लच दाबतो. ही जी अवस्था ती स्थिर, शांत, आणि समधात अवस्था. म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपले मन स्वच्छ, नितळ, पारदर्शी, भाव-विकाररहित झाले आहे. लिंग-देह-सुख-दु:ख यांच्या पलिकडील ही अवस्था. यावेळी आपल्याला येणारी आनंदाची अनुभूती केवळ शब्दातीत - ती चिदानंद स्वरूपाची. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास सर्व संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...* *'नामापरते सुख नाही रे सर्वथा !'* *--हाच तो सदगुरूपदेश...* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगात,विचारात आणि कृतीत सर्व मानवतावादी मूल्ये रुजलेली आहेत ह्यांनाच आपण खरे विद्वान म्हणावे.केवळ वरवर ज्ञान मिळवून चार लोकांत आपलाच उदोउदो करुन घेणारे महाभागही या जगात पुष्कळ आहेत.त्यांच्या ओठांवर एक आणि पोटात एक असते.अशी माणसे तेव्हाच काळाबरोबर लुप्त होतात.ते कधीच नंतरच्या काळात टिकत नाहीत अर्थात ते अल्पायुषी ठरतात.ज्यांना काळाबरोबर आणि काळाप्रमाणे पुढे पुढे जायचे आहे ते मात्र कशाचाही विचार न करता जगतात.तेच खरे मानवतेची मूल्य जोपासत कोणत्याही कालप्रवाहात चिरंजीव असतात हे मात्र सत्य आहे *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगंध - Fragrance* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरू ,परीक्षा ,शिष्य* गुरुकुलातून तीन शिष्य उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल. आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं. दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला.. तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी आपल्याला लवकरात लवकर मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर.. तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत.. ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे. तात्पर्य : अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*आमची पंढरी* ज्ञानीयाची पंढरी आहे आमची शाळा फुलतो तिथे नित्य बालकांचा मळा विठुराया सारखे बालक आहेत आमचे सावळे आणि गोजीरे फुलतात त्यांच्यानी आनंदाचे मळे कसे साजीरे ज्ञानदानाने, प्रेमाने करुया त्यांची पूजा आणि भक्ती विठुरायाचा दर्शनाची हीच आहे बघा युक्ती पंढरीचा विठूबाचे दर्शन आम्हा होणार सकाळ सकाळी हसरे चेहरे फुलणार विद्या आमची माऊली विठोबाची सावली चिमुकल्यांचा रुपात अशी आम्हास भावली. 🙏🌹🌹🌹🙏 〰〰〰〰〰〰 ✍ ©प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड ➖➖➖➖➖➖➖
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/07/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७० - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण. १९७२ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी. १९७६ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या. 💥 जन्म :- १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक. 💥 मृत्यू :- २००१ - शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता. २००२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - मोदी सरकार विरोधात दाखविलेला अविश्वास प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मविश्वासाने जिंकला* --------------------------------------------------- 2⃣ *नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मंजूर, जळगाव विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव* --------------------------------------------------- 3⃣ *कोल्हापूर - राधानगरी धरणाचे ३ व ६ नंबर दरवाजे उघडले, विद्युत विमोचकासह ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू.* --------------------------------------------------- 4⃣ *नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण भिंतीलगत असलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याने दोन कारचे नुकसान.* --------------------------------------------------- 5⃣ *नागपूरः राज्य सरकारने दूध दरवाढीसंबंधी घेतलेला निर्णय स्वागतार्ह दूध दरवाढीचे आंदोलन मागे - राजू शेट्टी यांची घोषणा* --------------------------------------------------- 6⃣ *झामन आणि इमाम उल हक या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 304 धावांची भागीदारी रचत विश्वविक्रमाला घातली गवसणी* --------------------------------------------------- 7⃣ *हॉकी 2017च्या आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला सलामीच्याच सामन्यात यजमान इंग्लंडचा करावा लागणार सामना* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आंतरराष्ट्रीय पालक दिनाच्या निमित्ताने ....... *गरज पालकांची शाळा भरवायची* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1743658/Mumbai-Janshakti/21-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सिकंदर* महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे : अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया, फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी(मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत. - महात्मा ज्योतिबा फुले *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) जगात एकूण किती खंड आहेत ?* सात *०२) जगात एकूण किती महासागर आहेत ?* पाच *०३) जगात सर्वात मोठा खंड कोणता ?* आशिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 वृषाली शिंदे 👤 शशी खांडाळकर 👤 व्यंकटराव तोटावाड 👤 विजय वाठोरे सरसमकर 👤 रामचंद्र कडलवार 👤 कवयित्री सोनाली चंदनशिवे 👤 शिवराज मोराडे 👤 रविकांत कुलकर्णी 👤 संजीव गंजगुडे 👤 चिंतामणी जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प स्वच्छतेचा* चला सारे स्वच्छतेचा मनी संकल्प करू स्वच्छता तिथे आरोग्य नेहमी ध्यानी धरू लक्षात ठेवा स्वच्छता असेल जिथे तिथे आनंद अन् आरोग्य नांदेल तिथे तिथे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य. उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.* *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !* *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.* ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानाला दूर घालवायचे असेल, दु:खाला दूर करायचे असेल, आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल, इतरांना आपलेसे करावे वाटत असेल, अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे. ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही. ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अज्ञान - Ignorance* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले. १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले. १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले. १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला. १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली. १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली. १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली. १९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला. १९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले. १९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली. १९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. १९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील. १९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले. १९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले. २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर. २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले. 💥 जन्म :- १८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल १८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ १९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी १९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी १९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद १९२९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार १९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती 💥 मृत्यू :- १९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त १९७२: अभिनेत्री गीता दत्त १९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली १९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस २०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दूधाच्या दरात वाढ करावी यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेतली. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची सरकारतर्फे करण्यात आली घोषणा* --------------------------------------------------- 2⃣ *महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन' ! प्रवास भत्ता तिपटीने वाढला, अधिवेशानात सुधारणा विधेयक एकमताने करण्यात आला मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने करणार मतदान* --------------------------------------------------- 5⃣ *शनी शिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या ताब्यात, राज्य सरकारकडून विधेयकाला विधानसभेत मंजुरी. शनैश्चर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018 ला मंजुरी.* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : शरीरसौष्ठवपटूंचे आश्रयदाते असलेल्या प्रशांत आपटे यांची महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड* --------------------------------------------------- 7⃣ *हॉकीच्या पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर एडमंड हिलरी* सर एडमंड हिलरी हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली. एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले, उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला. त्यांनी हिमालयातील साहस मोहिमांबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात - गौतम बुद्ध *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भीमबेटका गुहा कोठे आहेत ?* मध्य प्रदेश *२) सामान्यत संसदेची किती अधिवेशने असतात ?* तीन *३) आशियायी खेळात पदक मिळवणारी पहिली भारतीय स्त्री कोण ?* कमलजीत संधू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * साईनाथ माळगे, प्र. केंद्रप्रमुख, धर्माबाद * व्यंकट चिलवरवार, सहशिक्षक * श्रीराम भंडारे * लक्ष्मण दावणकर * जय माचेवाड * बजरंग अर्गेलू * ज्ञानेश्वर कोकरे * दिनेश राठोड * राहुल लोखंडे * गंगाधर पालकृतवार, सहशिक्षक * नितीन पवार * साईकुमार ईबीतवार * दत्तात्रय तोटावाड * रवींद्र पांडागळे * मोहन कुलकर्णी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक प्रश्न* जगावरचा अन्याय हल्ली स्वतःवरचा वाटू लागतो जगाशी भिडण्यासाठी कोणाशीही खेटू लागतो जगाचं दुःख होईल पण माय बापाचं काही नाही जागतिक प्रश्न सोडवत हे फिरतात दिशा दाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मुंबईतच प्रवास करीत असताना रिक्षा सिग्नलला थांबली. बाजूच्या रिक्षात एक बोकड शांतपणे बसला होता. त्याच्या शेजारचा माणूस निर्विकार होता. 'विश्वासघात' हा असाच शांतपणे बसलेला असतो. समोरच्याला कल्पना नसते, आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे. बोकडाला काय माहीत? आपला कर्दनकाळच आपल्या शेजारी बसला आहे.* *आयुष्यातही अनेकदा असेच घडते. आपल्या आजूबाजूला शांतपणे वावरणारी माणसेच आपल्याला अडचणीत आणत असतात. विश्वासघात, फसवणूक, खोटे बोलणे या सगळ्या गोष्टी अनेकजण सराईतपणे करत असतात. ठेच लागल्यावर आपल्याला कळते, कुणामुळे जखम झाली आहे. राजकारणात, समाजात, व्यक्तिगत आयुष्यातही सर्रासपणे असे घडते. माणूस हतबल होतो, अनेकदा माणसे त्यातून सावरत नाहीत. "अशावेळी शांतपणे आपली मनोवृत्ती स्थिर ठेवणे गरजेचे असतं."* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की, आपल्या जीवनात कोणत्याही बाबतीत हार मानायची नाही किंवा माघार घ्यायची नाही. कारण आपण ज्या गोष्टी साध्य करणार आहोत त्या गोष्टींसाठी मनात जिद्द ठेवून आणि यश मिळविण्याचे लक्ष आपल्यासमोर ठेवून समोर येणा-या आव्हानाला प्रयत्नाने आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्याने साध्य करण्यासाठी सज्ज झालात तर यश हे तुमच्यापासून कधीच दूर जात नाही. तुमच्या मनात हारण्याचीदेखील भावना स्पर्श करणार नाही. सदैव तुम्ही दिवसेंदिवस यशाकडेच मार्गक्रमण करत राहणार. पण तुमच्या मनाचा थोडा जरी आत्मविश्र्वास कमी झाला तरी तुमच्या यशस्वी जीवनामध्ये बाधा निर्माण करुन तुम्हाला तुम्हीच अपयशाला कारणीभूत ठरु शकाल हे मात्र नक्कीच. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प - Resolution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सदशिष्य* एकदा गुरुजी यात्रेसाठी जायला निघाले. त्यांचे हर्षल व गौतम नावाचे दोन शिष्य होते. जातांना त्यांनी दोघांनाही पाच पाच चणे दिले व ते जपून ठेवण्यास सांगितले व गुरुजी यात्रेला निघून गेले. हर्षलने ते चणे व्यवस्थित कागदाच्या पुडीत बांधून डबीत ठेवले. गौतमने ते चणे घेतले व तुळशी वृंदावनात टाकुन दिले. हर्षल रोज गुरुजींनी दिलेले चणे नीट आहेत की नाहीत बघून त्यांची पुजा करत असे. गौतम मात्र जेथे चणे टाकले होते नित्य नियमाने पाणी देत असे. सात आठ दिवसांत तुळशी वृंदावनात चण्यांची छान रोपं झाली. दिवसागणीक रोपं वाढली व त्याल चणे लागले. गौतमने ते चणे काढले व दुसर्या मोठया कुंडीत टाकले. नित्य नियमाने तो रोपांना पाणी टाकत असे व त्यांची काळजी घेत असे. आता ह्या वेळेला चणे बरेच। व निघाले. गौतमने ते चणे काढून पुन्हा शेतात टाकले. हळूहळू करता करता पाच चण्यांचे पोतंभर चणे झाले. एक दोन वर्षाने गुरुजी परत आले. दिलेल्या चण्यांबद्दल विचारले. हर्षलने पुजेत ठेवलेली चण्याची डबी उघडली व चणे गुरुजींच्या हातावर ठेवले. गौतमने पोतं आणून गुरुजींच्या पुढे ठेवलं, गुरुजी खुष झाले. गुरूजी हर्षलला म्हणाले 'जपून ठेवण्याचा खरा अर्थ गौतमला उमगला. तु मात्र नुसतीच पुजा करत राहिलास आतले चणे किड लागून खराब ही झाले असतील'. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/07/2018 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली. १८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली. १९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली १९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली. १९०५: लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. १९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई. १९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली. १९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. १९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले. १९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली. १९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९९२: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर. १९९३: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. १९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. 💥 जन्म :- १८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट १८२७: क्रांतिकारक मंगल पांडे १८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास १८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन १८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय १९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर १९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य १९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा १९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर १९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे १९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी १९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले 💥 मृत्यू :- ९३१: जपानचे सम्राट उडा १३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ १८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर १९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन रही १९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड १९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम २००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - लोकसभेत विरोधक आणि टीडीपीने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी.* --------------------------------------------------- 2⃣ *नागपूर - तोट्यातील महामंडळे बंद करणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा* --------------------------------------------------- 3⃣ *महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना, 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* --------------------------------------------------- 4⃣ *गोव्यात आयात करण्यात येणाऱ्या मासळीवर बंदी. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती.* --------------------------------------------------- 5⃣ *हिंगोली : पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे उत्तम असोले तर उपसभापती शिवसेनेचे नामदेव राठोड यांची निवड* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - सोन्याच्या किंमतीत 600 ते 800 रुपयांनी घट, सोन्याचा कालचा दर होता 30,500 रुपये* --------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली - एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड, भुवनेश्वर कुमारला विश्रांती तर ऋषभ पंतला मिळाली संधी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *फ्रेश शालेय परिपाठ* PDF मध्ये पाहण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://goo.gl/mmT6K2 *साभार : दैनिक दलितवाणी* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= डॉ. जयंत विष्णू नारळीकर डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्यागणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.... *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) हिंदू पुराणांची एकूण संख्या किती आहे ?* अठरा *२) 'शुल्बसूत्र' ग्रंथ कोणत्या विषयाशी निगडित आहे ?* भूमिती *३) 'स्वाजीलँड' या देशाचं नवीन नाव काय आहे ?* किंग्डम ऑफ इस्वातीनी *४) 'शेरशाह का मकबरा' ही वास्तू कुठे आहे ?* सासाराम, बिहार *५) 'दीपशिखा' हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?* महादेवी वर्मा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * मनोज बढे * अनिकेत पडघन * अमोल पाटील सावंत * गजानन शिराळे * श्रीनिवास मुरके * स्वप्नील शेंडगे * जगजीत ठाकूर * दीपक चामे * अमोल कदम * दीपक कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *ईच्छा* छोटा असो की मोठा प्रत्येकाला हाव आहे चोरालाही वाटते आपण साव आहे एक झाली की एक ईच्छा कुठे पुर्ण होते अती झालं की मग कधी तरी अजीर्ण होते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?* *आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे.* 🎪 *॥ रामकृष्णहरी ॥* 🎪 🎄🎄🎄🎄🎄🎄 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो. हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे. वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समृद्ध - Prosperous* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. १८१९: अॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले. १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित. १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील. १९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी. १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले. १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली. १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. १९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान. १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले. २०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर. २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. 💥 जन्म :- १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य १९१९: संगीतकार स्नेहल भाटकर १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर १९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल 💥 मृत्यू :- १९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर १९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी २०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील केंद्रीय कोटाच्या 15 टक्के जागांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, अशी कृती करण्यास हायकोर्टाने केली मनाई, त्यामुळे प्रवेश यंत्रणेला पुढे जाण्यापूर्वी आवश्यक काळजी घ्यावी लागणार* --------------------------------------------------- 2⃣ *कोकण विभागीय बोर्डाची 9018 घरांची लॉटरी निघणार ; 18 जुलैपासून भरता येणार अर्ज, 19 ऑगस्टला घरांसाठी सोडत* --------------------------------------------------- 3⃣ *दुधाची नासाडी टाळत दूध उत्पादकांचं अनोखं आंदोलन, कुठे वारकऱ्यांना मोफत दूध ; तर कुठे विद्यार्थ्यांमध्ये केलं दुधाचं वाटप; आंदोलकांकडून दूध सत्कारणी* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : खड्डे बुजवले जाईपर्यंत टोल वसूल करू नका, सार्वजनिक बांधकाम विभागाची सरकारला शिफारस* --------------------------------------------------- 5⃣ *नागपूर : पावसाळ्यात ताडोबा पूर्ण बंद ठेवण्याची विनंती हायकोर्टाकडून अमान्य, बफर झोनमध्ये पर्यटन राहणार सुरु* --------------------------------------------------- 6⃣ *नाशिकचे गंगापूर धरण पंधरवड्यात 75 टक्के भरल्याने गोदापात्रात विसर्ग सुरु, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस* --------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जसे चारित्र्य तसे जीवन* वरील लेख पूर्ण ऐकण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1599966110130157&id=100003503492582 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाबुराव रामजी बागूल* बाबुराव बागूल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. बाबुराव बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाला. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कँपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?* १९०६ *२) वंगभंग चळवळीचे नेतृत्त्व कोणी केले ?* सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर *३) अब्दुल लतीफ यांनी बंगालमध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली ?* द मोहमेडन लिटररी सोसायटी *४) लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारावासात कोणता ग्रंथ लिहिला ?* गीतारहस्य *५) सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी कोणत्या वर्षी मागे घेतली ?* १९३४ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * माधव गैनवार, * अनिलकुमार बिंगेवार * रामचंद्र गादेवार * दिगंबर कदम * पुरुषोत्तम केसरे * मधुकर फुलारी * विशु पाटील चंदापुरे * अरिफा शेख * आनंद पंगेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बढाई* काम कमी अन् श्रेयासाठी लढाई असते काम नकरणाराचीच जास्त बढाई असते काम करणाराचे काम झाकल्याने झाकत नसते बढाया मारणारांच्या पदरात कोणी काही टाकत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.* *आम्ही विठ्ठलाचे वीर ।* *फोडू कळी काळाचे शीर ।।* *तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.* *ज्ञानदेवे रचिला पाया !* *तुका झालासे कळस' !!* *इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."* ••●🔔‼ *रामकृष्णहरी* ‼🔔 ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मानवी जीवन म्हटले की, त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी अडचण येणारच. अशावेळी त्या अडचणींवर काहीतरी उपाय अथवा पर्याय शोधून काढावाच लागतो. अडचण आली म्हणून स्तब्ध बसता येणार नाही किंवा काहीच न करता शांत ही बसता येणार नाही. असे जर केले तर अडचणींवर मातही करता येणार नाही. त्यावर काही ना काही उपाय शोधून काढावेच लागणार आहे. अशावेळी स्वत:ला जर काही सुचत नसेल तर आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून किंवा अनुभवी माणसांकडून त्यावर सल्ला घ्यावा व आपली अडचण दूर करुन घेऊन सुलभ जीवन जगण्याचा मार्ग काढावा यातच खरे जीवन जगण्याचे कौशल्य आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास - Believe* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मित्रांची कथा* एक जंगल. जंगलात दोन वाघ. दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो. दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?". वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल". *तात्पर्य :-* "फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल". *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. १८१९: अॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले. १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित. १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील. १९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी. १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले. १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली. १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. १९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान. १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले. २०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर. २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. 💥 जन्म :- १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य १९१९: संगीतकार स्नेहल भाटकर १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर १९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल 💥 मृत्यू :- १९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर १९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी २०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील केंद्रीय कोटाच्या 15 टक्के जागांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, अशी कृती करण्यास हायकोर्टाने केली मनाई, त्यामुळे प्रवेश यंत्रणेला पुढे जाण्यापूर्वी आवश्यक काळजी घ्यावी लागणार* --------------------------------------------------- 2⃣ *कोकण विभागीय बोर्डाची 9018 घरांची लॉटरी निघणार ; 18 जुलैपासून भरता येणार अर्ज, 19 ऑगस्टला घरांसाठी सोडत* --------------------------------------------------- 3⃣ *दुधाची नासाडी टाळत दूध उत्पादकांचं अनोखं आंदोलन, कुठे वारकऱ्यांना मोफत दूध ; तर कुठे विद्यार्थ्यांमध्ये केलं दुधाचं वाटप; आंदोलकांकडून दूध सत्कारणी* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : खड्डे बुजवले जाईपर्यंत टोल वसूल करू नका, सार्वजनिक बांधकाम विभागाची सरकारला शिफारस* --------------------------------------------------- 5⃣ *नागपूर : पावसाळ्यात ताडोबा पूर्ण बंद ठेवण्याची विनंती हायकोर्टाकडून अमान्य, बफर झोनमध्ये पर्यटन राहणार सुरु* --------------------------------------------------- 6⃣ *नाशिकचे गंगापूर धरण पंधरवड्यात 75 टक्के भरल्याने गोदापात्रात विसर्ग सुरु, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस* --------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जसे चारित्र्य तसे जीवन* वरील लेख पूर्ण ऐकण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1599966110130157&id=100003503492582 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाबुराव रामजी बागूल* बाबुराव बागूल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. बाबुराव बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाला. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कँपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?* १९०६ *२) वंगभंग चळवळीचे नेतृत्त्व कोणी केले ?* सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर *३) अब्दुल लतीफ यांनी बंगालमध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली ?* द मोहमेडन लिटररी सोसायटी *४) लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारावासात कोणता ग्रंथ लिहिला ?* गीतारहस्य *५) सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी कोणत्या वर्षी मागे घेतली ?* १९३४ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * माधव गैनवार, * अनिलकुमार बिंगेवार * रामचंद्र गादेवार * दिगंबर कदम * पुरुषोत्तम केसरे * मधुकर फुलारी * विशु पाटील चंदापुरे * अरिफा शेख * आनंद पंगेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बढाई* काम कमी अन् श्रेयासाठी लढाई असते काम नकरणाराचीच जास्त बढाई असते काम करणाराचे काम झाकल्याने झाकत नसते बढाया मारणारांच्या पदरात कोणी काही टाकत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.* *आम्ही विठ्ठलाचे वीर ।* *फोडू कळी काळाचे शीर ।।* *तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.* *ज्ञानदेवे रचिला पाया !* *तुका झालासे कळस' !!* *इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."* ••●🔔‼ *रामकृष्णहरी* ‼🔔 ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मानवी जीवन म्हटले की, त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी अडचण येणारच. अशावेळी त्या अडचणींवर काहीतरी उपाय अथवा पर्याय शोधून काढावाच लागतो. अडचण आली म्हणून स्तब्ध बसता येणार नाही किंवा काहीच न करता शांत ही बसता येणार नाही. असे जर केले तर अडचणींवर मातही करता येणार नाही. त्यावर काही ना काही उपाय शोधून काढावेच लागणार आहे. अशावेळी स्वत:ला जर काही सुचत नसेल तर आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून किंवा अनुभवी माणसांकडून त्यावर सल्ला घ्यावा व आपली अडचण दूर करुन घेऊन सुलभ जीवन जगण्याचा मार्ग काढावा यातच खरे जीवन जगण्याचे कौशल्य आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास - Believe* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मित्रांची कथा* एक जंगल. जंगलात दोन वाघ. दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो. दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?". वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल". *तात्पर्य :-* "फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल". *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक सर्प दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली. १६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या. १९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले. १९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी. १९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले. १९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण. १९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. १९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय. 💥 जन्म :- १९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली १९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती १९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे १९१७: नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथूर १९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव १९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ १९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज १९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे १९६८: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले १९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर १९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक १९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ 💥 मृत्यू :- १९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे १९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ १९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तिरुपती बालाजी मंदिराचा मोठा निर्णय; भक्तांना दर्शनासाठी नो एंट्री, पहिल्यांदाच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, 11 ते 17 ऑगस्ट या सहा दिवसांत भाविकांना घेता येणार नाही दर्शन* ----------------------------------------------------- 2⃣ *चेन्नई : केंद्र सरकारच्या 'एक भारत, एक निवडणूक'च्या प्रस्तावाला तमिळनाडू राज्यातून विरोध केला जात असला तरी मात्र, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रस्तावाला दर्शवला पाठिंबा* ----------------------------------------------------- 3⃣ *लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून एसीचा प्रवास करणाऱ्यासांठी एक वाईट बातमी, लवकरच एसीचा प्रवास महागण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 4⃣ *उद्योगपती मुकेश अंबानी बनले आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती* ----------------------------------------------------- 5⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा भारतावर 86 धावांनी विजय* ----------------------------------------------------- 6⃣ *थायलंड ओपन विश्व टूर सुपर ५०० टूर्नामेंटच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये पी. व्ही. सिंधूला करावा लागला पराभवाचा सामना* ----------------------------------------------------- 7⃣ *Wimbledon येथील सेंटर कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन पुरूष एकेरी स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसनवर 6-2, 6-2, 7-6 ( 7-3) असा सहज विजय मिळवित 13 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षणाचा काय फायदा ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुणा असफ अली* अरुणा असफ अली यांचा जन्म १६ जुलै१९०८ साली झाला. मूळच्या त्या अरुणा गांगुली. इ.स. १९४२ सालच्या चले जाव मोहिमेत गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. यासाठी त्यांची खास आठवण ठेवली जाते. अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते.. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'ब्रोकन विंग' कादंबरी कुणी लिहिली आहे ?* खलिल जिब्रान *२) सध्याचे लष्करप्रमुख कोण आहेत ?* ज. बिपिन रावत *३) जागतिक रेडक्रॉस दिवस कधी साजरा केला जातो ?* ०८ मे *४) जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार अधिकारी कोण होता ?* जनरल डायर *५) 'अप्पर कट' ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बॉक्सिंग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * जयवंत हंगरगे, सहशिक्षक, धर्माबाद * संगीता संगेवार, धर्माबाद * कपिल भाऊ * मारोती गाडेकर * सुरेश भाग्यवंत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *"रूची "* न आवडणाराला वाटते हे काही धड नाही साखर खाऊ घातली तरी वाटते गोड नाही रूची असल्या शिवाय निर्माण होत नाही आवड रूचीहीन कशाला कोण काढील सांगा बरं सवड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.* *"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण केलेल्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेले फळ हे दैव समजावे, कर्माप्रमाणे जे काही करु त्याची प्रचिती ताबडतोब मिळते त्याला वाट पहावी लागत नाही, परंतु काहीच न करता दैवाप्रमाणे जे काही मिळते ते योगायोगाने मिळाले असे समजावे आणि ते मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही.म्हणून दैवापेक्षा आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला हवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपकार - Thank You* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दुसऱ्यांचे उपकार* एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले. त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही. बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला. यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/07/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १७८९: फ्रेंच क्रांतीची सुरवात. १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले. १९५८: इराकमध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर. १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले. १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या. १९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली. २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघद्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला. २०१३: डाकतार विभागाची १६३ वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली. 💥 जन्म :- १८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर १८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट १८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे १८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण १९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार विल्यम हनी १९१७: संगीतकार राजेश रोशन १९२०: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण १९४७: मॉरिशसचे ३रे व ६वे पंतप्रधान नवीन रामगुलाम १९६७: श्रीलंकेचे क्रिकेटपटू हशन तिलकरत्ने 💥 मृत्यू :- १९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी आणि ५वे राष्ट्राध्यक्ष पॉल क्रुगर १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी १९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती १९७५: संगीतकार मदनमोहन १९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब १९९८: मॅकडॉनल्डचे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड २००३: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस २००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या २००८: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : नाणार प्रकल्प लादणार नाही; चर्चा करून निर्णय घेऊ - नाणार बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन* ----------------------------------------------------- 2⃣ *लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक.* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे - डोंबिवली आणि परिसरात जाणवले 2.8 मॅग्निट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - महाराष्ट्र सरकारने 6 व्या वर्गाच्या भूगोलाच्या पुस्तकात केला गुजराती भाषेचा वापर, विरोधकांचा गोंधळ* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी मनपा निवडणुकीच्या तयारीबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी.* ----------------------------------------------------- 6⃣ *2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार* ----------------------------------------------------- 7⃣ *विम्बल्डन 2018 : मॅरेथॉन लढतीत अँडरसनची बाजी, इस्नरला नमवून गाठली अंतिम फेरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शनिवारची दप्तरमुक्त शाळा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://goo.gl/5seL7t आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= डाॅ. शंकरराव भाऊराव चव्हाण डॉ. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले. 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजींच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. २६ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रामायण कोणी लिहिलं आहे ?* महर्षी वाल्मिकी *२) पंजाबची राजधानी कोणती ?* चंदीगड *३) 'जायकवाडी धरण' कोणत्या राज्यात आहे ?* महाराष्ट्र ( औरंगाबाद ) *४) 'भारुडे कोणाची प्रसिद्ध आहेत ?* संत एकनाथ *५) लीळा चरित्र कोणी लिहिले ?* श्री चक्रधर स्वामी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * मिलींद व्यवहारे, नांदेड * धनंजय गुम्मलवार, नांदेड * नितीन काळे * भगवान अंजनीकर, नांदेड * नागेश स्वामी * आकाश यडपलवार, धर्माबाद * नंदकिशोर मोरे * चंद्रकांत वाडगे * शंकर कंदेवाड * इरवंत जामनोर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= "पेरणी " पेरून ठेवले तेच उगवुन येत असते चांगले पेरलेले ते वाया जात नसते पेरतांना कधी ही पेरून ठेवा चांगले चांगले पेरल्यावर उगवेल कसे वागले शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनेक वेळा जावा-जावा, भाऊ-भाऊ, सासू-सुना, मित्र-मैत्रिणी अशा मानवी नातेसंबंधात रूसण्यामुळे घरं दुभंगली आहेत. रूसण्याच्या वर्तुळाचा विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टीत रूसवे-फुगवे होतात. ज्यांच्यात भांडायची ताकद नसते ते रडत बसतात, दु:खी होतात. बिनबुडाची भांडणं असतात. दुस-याचा रूसवा-फुगवा किती ताणायचा यालाही काही मर्यादा असतात.* *रूसव्यातला फोलपणा कळला तर राग राहात नाही. आपणही निवळत गेले पाहिजे. रूसवे-फुगवे प्रत्येक नात्यात असतात, म्हणून काय संबंध बिघडावयचे का? सहजगत्या रूसवा निघाला तर ठिक नाहीतर प्रत्येकाचे रस्ते वेगवेगळे असतात. आपण चालत राहायचे. अनाथ असलेला मुलगाही 'नारायण सुर्वे' होऊ शकतो.* *"कुणावाचून कुणाचे अडत नाही.* *आपल्या रस्त्याने हसत पुढे निघायचे."* *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण केलेल्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेले फळ हे दैव समजावे, कर्माप्रमाणे जे काही करु त्याची प्रचिती ताबडतोब मिळते त्याला वाट पहावी लागत नाही,परंतु काहीच न करता दैवाप्रमाणे जे काही मिळते ते योगायोगाने मिळाले असे समजावे आणि ते मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही.म्हणून दैवापेक्षा आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला हवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दैव - Fortune* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मनःशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महाकवी कालिदास दिन* 💥 ठळक घडामोडी :- १६६०: पावनखिंडीतील लढाई. १८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले. १८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला. १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी. १९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला. १९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली. २०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी 💥 जन्म : १८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर १९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड १९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक १९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स १९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी 💥 मृत्यू :- १६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिले आपल्या प्राणाचे बलिदान १७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात १९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद १९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा १९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान १९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे २०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत २००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले २०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यात वर्ष २०१२ पासून शिक्षकांची भरती बंद असल्यामुळे राज्यात २४ हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली* ----------------------------------------------------- 2⃣ *महाराष्ट्रातील विशेषत मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पूणे, चंद्रपूर, सोलापूर या शहरासह१७ शहरे प्रदूषित पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षाचे होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *चाइल्ड राइटस अँण्ड यू (क्राय) या प्रख्यात एनजीओच्या अहवालानुसार देशात १५ ते १८ वयोगटातील तब्बल २ कोटी ३0 लाख मुले 'कामगार' असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूर- यशोमती ठाकूर यांना उत्कृष्ट महिला आमदार पुरस्कार प्रदान* ----------------------------------------------------- 6⃣ *भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक* ----------------------------------------------------- 7⃣ *क्रोएशियाने इंग्लंडवर २-१ अशी मात करत पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिली धडक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिण्याला पर्याय नाही* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/WZziPziK7uA आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाजीप्रभू देशपांडे* बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* १३६ वा *२) अंतराळवीर कल्पना चावला यांचे जन्मगाव कोणतं ?* कर्नाल, हरियाणा *३) सोयुझ टी-११ हे कोणत्या देशाचे अवकाशयान आहे ?* रशिया *४) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत ?* सचिन तेंडूलकर *५) एअरफोर्स अँकॅडमी कुठे आहे ?* अँडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील जंजाळ 👤 रवी येलमोड 👤 शेख अहमद 👤 श्रीनिवास मोरे 👤 गणेश पांडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= " विकृती " हल्ली समाजात विकृती वाढत आहे घडोघडी कुठेही अपराध घडत आहे अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे शिक्षा पाहून पुन्हा चूक नाही केली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते.* *"साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी* *सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी* *अवती भवती झगमगती नक्षत्रे होती* *पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्य जीवन जगण्यासाठी काही ना काहीतरी धडपड करत असतो. त्या धडपड करण्यातून त्याला आपल्या जीवनासाठी काहीतरी साध्य करायचे असते. धडपड करणे हा मानवी स्वभाव आहे. जीवनात चांगले साध्य करण्यासाठी अंत:करणातून आपले चांगले हित साध्य करत करत दुस-याला दु:ख होणार नाही याचे देखील भान असू द्यावे. तरच आपल्या धडपड करण्याचा फायदा होईल. अन्यथा आपली केलेली धडपड वाया जाण्याची दाट शक्यता असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वभाव - Temperament* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटीशी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकाॕप्टर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकाॕप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/07/2018 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला. १७९९: रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले. १९३५: प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. १९६१: पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले. १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली. १९८५: पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले. १९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. १९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला. १९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान. २००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्री थोरो १८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर १८६४: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे १९०९: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय १९१३: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर १९२०: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड १९४७: भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती १९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार १९६५: क्रिकेटपटू संजय मांजरेकर 💥 मृत्यू :- १६६०: बाजी प्रभू देशपांडे १९९४: हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे १९९९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार २०००: मराठी कवयित्री इंदिरा संत २०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग २०१३: चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण २०१३: बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मेडिकल केंद्रीय कोटयात ओबीसी आरक्षण देण्याच्या प्रकरणात हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला बजावली नोटीस* ----------------------------------------------------- 2⃣ *पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सहकार मंत्री सुभाष देशमुख* ----------------------------------------------------- 3⃣ *आषाढीसाठी येणाऱ्या भक्तांना मिनरल वॉटरची सोय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : पावसाचा अंदाज घेऊन शाळांनी सुट्टीचा निर्णय घ्यावा - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे* ----------------------------------------------------- 5⃣ *महावितरणला 30 हजार कोटी रुपयांचा तोटा. ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-काश्मीर- कुपवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद* ----------------------------------------------------- 7⃣ *हॉकीला अच्छे दिन... केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता देण्याचे केले जाहीर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *छडी लागे ( ना ) छम छम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना. मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= "तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे." *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* १३६ वा *२) अंतराळवीर कल्पना चावला यांचे जन्मगाव कोणतं ?* कर्नाल, हरियाणा *३) सोयुझ टी-११ हे कोणत्या देशाचे अवकाशयान आहे ?* रशिया *४) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत ?* सचिन तेंडूलकर *५) एअरफोर्स अँकॅडमी कुठे आहे ?* अँडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * दत्ताहरी जगदंबे, सहशिक्षक * हरिहर धुतमल, पत्रकार * माधव उमरे * साई गादगे, सहशिक्षक * दादाराव जाधव * अभिजित राजपूत * नागेश पडकूटलावार * नंदकुमार कौठकर, सहशिक्षक * प्रवीण दाभाडे पाटील, सहशिक्षक * वैभव सकनुरे * हणमंत गुरुपवार * शिल्पा जोशी, साहित्यिक * अविनाश पांडे * सुनील देवकरे * नमन यादव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= "विचारपुर्वक " जरा काही झालं की लगेचच भिडतात विचार करत पुन्हा खुप वेळ रडतात भिडण्यापूर्वी जरा विचार केला पाहिजे विचारपुर्वक निर्णय अमलात आला पाहिजे =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●⚜‼ *विचार धन* ‼⚜●•••• *घर..ज्याची अनिवार, आंतरिक ओढ असते माणसाला. संध्याकाळ झाली की पावलं आपोआप वळतात घराकडे. काही अनुबंध जुळलेले असतात. घराशी एक उत्कट नातं असतं, जीव गुंतलेला असतो प्रत्येकाचा, पण घरा-घरामध्ये अंतर असतं. जमीन अस्मानाचं. काही घरं प्रसन्न वाटतात. लहान असो, मोठे असो. प्रश्न घराच्या आकाराचा नसतो. कुणाची झोपडी असो, महाल असो, घर मातीचं असो की विटांचं. काय फरक पडतो ? प्रश्न घरातल्या माणसांचा... त्यांच्यातल्या कटु-गोड नात्यांचा असतो. विचारांची, सुखदु:खांची जिथं मोकळेपणाने देवाणघेवाण असते, ती घरं प्रसन्नतेचं दान देतात. संवादानं आयुष्यातले चढउतार सहज पार होऊन जातात...* *माणसं प्रेमळ असली की झोपडीचा ताजमहल होऊन जातो. एकमेकांच्या आधारानं, वात्सल्याची कस्तुरी जणू घराच्या भिंतीमध्ये मिसळून गेलेली असते. कधीकधी मोठमोठे राजवाडे माणसाला भुरळ पाडतात. पण जवळ गेले की अंतर्बाह्य उदास-भकास वाटतात. सुखचैनीचे चंद्रतारे घरात टांगलेले असताना तिथले चेहरे ताणतणावांनी कोमेजलेले असतात. सुखाचा संबंध संपत्तीशी असतोच कुठे? सुखाचा बाजारही नसतो, ते विकत आणायला. तरीही संपत्तीसाठी का तुटतात परिवार? परिवार जिथे गुण्यागोविंदाने नांदतो त्यालाच तर घर म्हणतात. घर म्हणजे जिथं ह्रदयाच्या तारा जुळून आलेल्या असतात, संसाराच्या सुरेल गाण्यासाठी !* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात. असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत. अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे. अशा ठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा. पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे. ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो. या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत. हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रद्धा - Reverence* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटीशी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकाॕप्टर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकाॕप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. मित्रांनो 👉तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/07/2018 वार - बुध =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक लोकसंख्या दिन* 💥 ठळक घडामोडी :- २००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू. २००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला. २००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार. 💥 जन्म :- १९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान. १९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री. १९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *माए साई - गेल्या 15 दिवसांपासून नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांची सुरू असलेली मोहिम आज फत्ते झाली. थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 मुलांची सुटका करण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयानं व्यवसाय सुलभतेत आंध्र प्रदेशला दिला नंबर एकचा क्रमांक* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई- जलयुक्त शिवार योजनेची स्वतंत्र चौकशी करून ऑडिट करा, माजी कुलगुरू व तज्ज्ञांची कमिटी नेमून पाहणी करा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई- दूध भुकटी निर्यातदार संघांना 50 रुपयांचं अनुदान, दूध निर्यातदार संघांना 5 रुपये अनुदान, दूध संघासाठी सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *अकरावी प्रवेशांना पुन्हा मुदतवाढ, विद्यार्थ्यांना 11 जुलै सायंकाळी 5 पर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर - शेतकऱ्यांना तुरीचे तुकारे 15 दिवसांत दिले जाणार, सहकारमंत्री सुभाष देशमुखांची विधान परिषदेत माहिती* ----------------------------------------------------- 7⃣ *आय सी सी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का, भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक लोकसंख्या दिन* 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्ज अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जात आहे. वाढत असलेली लोकसंख्या ही जगासमोर .......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_9.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गीतकार शांताराम नांदगावकर* शांताराम नांदगावकर हे मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर त्यांची सून आहे. मूळचे कोकणातील कणकवलीच्या नांदगावाचे होते. लहानपणी ते मुंबईत आले. मुंबईत परळ येथील शिरोडकर हायस्कुलात त्यांचे शिक्षण झाले. पुढे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी विपुल प्रमाणात गीते लिहिली. अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, पैजेचा विडा यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी नांदगावकरांनी गीतलेखन केले पुढे इ.स. १९८५ साली ते शिवसेनेकडून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून गेले होते. उतारवयात ते मधुमेह व अल्झायमराने आजारी होते. जुलै ११, इ.स. २००९ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी किती सदस्य आहेत ?* पाच *२) जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ?* सरिमाओ भंडारनायके *३) ब्राझीलने आतापर्यंत फुटबॉल वर्ल्डकप किती वेळा जिंकला आहे ?* पाच *४) जागतिक दृष्टिदान दिन कधी असतो ?* 10 जून *५) इंडियन नेव्हल अकॅडमी कुठे आहे ?* एडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अवधूतवार साईकिरण, बोधन 👤 अनुपमा अजय मुंजे 👤 शिवाजी सूर्यवंशी, सहशिक्षक 👤 प्रभू देशमुख 👤 संतोष चौहान 👤 नरेश गौतम 👤 प्रमोद मंगनाळे 👤 प्रकाश नाईक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरं सुख* जीवनात मानलं तर सुख आहे नाही तर क्षणोक्षणी कशातही दु:ख आहे खरं सुख हे मानण्यात असते मानलं नाही तर सारे दु:ख असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●🚩‼ *विचार धन* ‼🚩●•••• *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••●🚩‼ *रामकृष्णहरी* ‼🚩●•• 🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते. ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही. उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही. जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा. हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्कर्ष - Flourish* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विद्या विनियेनं शोभते* राजा ज्ञानसेनच्या दरबारात दररोज शास्त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्त्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्हणून घोषित केले जात असत त्यांना राजा धन आणि मान देऊन सन्मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्या दरबारात असाच शास्त्रार्थ चालला होता. त्या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्यात आले. राजाने त्याचा भरसभेत सत्कार केला व मान देण्यासाठी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ राजा स्वत: त्याला चव-या ढाळत त्याला घरापर्यंत सोडण्यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्मानाने घरी आला हे पाहून भारवीच्या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्याबरोबर भारवीने मातेला साष्टांग नमस्कार केला पण पित्याला मात्र उपेक्षेने उभ्याउभ्याच नमस्कार केला. त्याच्या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्याने त्याच्या त्याही नमस्काराचा स्वीकार केला आणि त्याला चिरंजीवी भव असे म्हटले. गोष्ट इथेच संपली असे नाही. मात्यापित्यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्हते. याचे कारणही स्पष्ट होते की भारवीला यश पचविता आले नव्हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्या धुंदीत शिष्टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्त्रार्थ करायला जाणार होतास त्याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्या काळात ते परमेश्वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्यांनी कितीतरी स्वत:च्या इच्छा दाबून ठेवल्या व तुला शास्त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्मत्त होऊन तू त्यांची उपेक्षा केलीस हेच आम्हा दोघांच्या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्याने मातापित्याच्या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्यात पुन्हा कधीही त्याने मातापित्यांची सेवा करण्यात कसूर केली नाही. तात्पर्य :- आयुष्यात आपल्याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास मिळाली तरी त्यापाठीमागे आपल्या आईवडीलांची पुण्याई असते हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना. २००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री. १९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार. १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक. २००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम, सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली.* ----------------------------------------------------- 2⃣ *न्यूयॉर्क - जगातील सर्वात शक्तिशाली 25 देशांची यादी जाहीर, यात अमेरिका प्रथम क्रमांकावर तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन तिसऱ्या स्थानावर असून भारताचा 15 वा नंबर आहे* ----------------------------------------------------- 3⃣ *पावसामुळे मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा* ----------------------------------------------------- 4⃣ *अकरावी ऑनलाईन ऍडमिशन पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश घेण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ* ----------------------------------------------------- 5⃣ *'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील डॉक्टर हंसराज हाथी यांची भूमिका साकारणारे विनोदी अभिनेते कवि कुमार आझाद यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले.* ----------------------------------------------------- 7⃣ *सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मिळविला सहज प्रवेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *दप्तरमुक्त शाळेतील आनंद* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *पद्मा गोळे* पद्मा गोळे ह्या मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार आहेत. त्या कवयित्री 'पद्मा' या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रितीपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी (१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह. प्रितीपथावर या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वत:च्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक,चिंतनशील आणि स्वप्नदश्री व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर,संपन्न निसर्ग प्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. पद्मा गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) अभियंता दिन कधी साजरा केला जातो ?* १५ सप्टेंबर *२) सुप्रसिद्ध झुकता मनोरा कोठे आहे ?* पिसा (इटली) *३) मोर्ले-मंटो सुधारणा कायदा कधी करण्यात आला ?* १९०६ *४) फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?* अँथॉलॉजी *५) जहाजबांधणी व्यवसायात अग्रेसर असलेला देश कोणता ?* जपान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागनाथ वाढवणे, सहशिक्षक 👤 महेश लबडे, सहशिक्षक 👤 युवराज माने 👤 साई गायकवाड 👤 मिलिंद चावरे 👤 प्रकाश येलमे 👤 लक्ष्मण मुंडकर, सहशिक्षक 👤 शिवाजी वासरे 👤 ज्ञानेश्वर जगताप, सहशिक्षक 👤 गणेश अंगरवार 👤 चरणसिंग चौहान 👤 बालाजी दुसेवार 👤 प्रियंका घुमडे 👤 मन्सूर शेख 👤 पिराजी चन्नावार 👤 दगडू गारकर, सहशिक्षक 👤 लक्ष्मीकांत पलोडे 👤 विठ्ठल रामलू चिंचलोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरे ज्ञान* कसे जगावे माहित असणे खरे ज्ञान आहे जे चांगले जगतात त्यांना जगात मान आहे शिकून सवरून माणसाला चांगले जगता यावे चार माणसांत माणसाला माणसा सारखे वागता यावे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.* *माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.* *'हे ईश्वरा माझे हाती काम दे* *परी ते करण्याची शक्ती दे.'* ••●⚡‼ *रामकृष्णहरी* ‼⚡●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दुस-याला दोष देणे किंवा नाव ठेवणे फार सोपे आहे. दुस-याला दोष देताना स्वत:ला मोठेपणा वाटून घेण्यात धन्यता मानतो. आपल्यातले दोष दुस-याला समजले तर आपला अपमान झाल्यासारखे वाटते आणि लगेच त्याला प्रतिउत्तर देतो. असे करण्याने आपल्यातल्या दोषांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतो. अर्थात आपल्या दोषाला खतपाणी घालते ते आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जर आपण असे ठरवले तर आपली प्रगती होणे अशक्य आहे. पहिल्यांदा आपल्यामध्ये दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि मगच इतरांच्या होणा-या चूका असतील तर त्यांचा अपमान न करता त्याची होणारी चूक लक्षात आणून देऊन सुधारणा करण्यासाठी प्रवृत्त करावे. तो निश्चितच स्वीकार करेल कारण तुम्ही त्यांच्यासाठी आदर्श असाल. तुमच्या विचारांचा नि उपदेशाचा नक्कीच स्वीकार करेल. " केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे " याप्रमाणे आपण आधी कृती करावी मग इतरांना करायला सांगावी. म्हणजे आपल्यातील आणि इतरांतील दोष कमी होण्यास मदत होईल व आपण आपल्या जीवनात काहीतरी केल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *निश्चित - Fixed* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक निरुद्योगी माशी* एकदा एक मधमाशी आपल्या मनाशीच विचार करू लागली की, 'मी सारखं कामाला जुंपलेलं असावं असं का? ही फुलपाखरं पहा ! किती आनंदात वेळ घालवतात. मीसुद्धा त्यांच्यासारखं का होऊ नये ?' त्या दिवसापासून तिने काम करायचं सोडले. इतर मधमाशांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण तो फुकट गेला. असे होता होता पावसाळा आला व पाऊस पडू लागला तेव्हा ती मधमाशी पोळ्याजवळ आली, पण त्याची सर्व दारे बंद झाली होती. शेवटी भुकेने व थंडीने ती मरण पावली. *तात्पर्य - स्वतःच्या पोटाकरता कसलातरी उद्योग करणे योग्य.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८७३: मुंबई शेअर बाजार सुरू झाला. १८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली. १८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली यशस्वी ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे केली. १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. २०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला. २०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती. 💥 जन्म :- १६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन १७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ १८१९: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होव १९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी १९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त १९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन १९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर १९३८: हिंदी अभिनेते हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार १९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म. 💥 मृत्यू :- १८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो १९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट १९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर २००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शाळांत यापुढे मुलांना छडी न मारण्याचे, कोणतीही शिक्षा न करण्याचे आदेश शिक्षण खात्याने काढले आहेत.* ----------------------------------------------------- 2⃣ *10 जुलैला मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा.. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात लातूर, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेडमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज* ----------------------------------------------------- 3⃣ *विधानपरिषद निवडणूक : भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख उमेदवारी अर्ज उद्या मागे घेण्याची शक्यता, अर्ज मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होणार* ----------------------------------------------------- 4⃣ *अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस, नगर शहर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर आणि सुप्यात पाऊस, तर जामखेड, श्रीगोंद्यात ढगाळ वातावरण* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : अमळनेर येथील अंबर्षी टेकडीवर ११११ वृक्षांची लागवड करण्यात आली.* ----------------------------------------------------- 6⃣ 'हीट मॅन' रोहित शर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-20 लढतीत इंग्लंडवर सात विकेट्स राखून मिळविला विजय* ----------------------------------------------------- 7⃣ *तुर्की - विश्व चॅम्पियन चषक स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्टिक दीपा कर्माकरने सुवर्णपदक जिंकले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पोशाख म्हणजे व्यक्तीची ओळख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1728108/Mumbai-Janshakti/09-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा कोणत्या खनिज साठ्यात भारतात प्रथम क्रमांक लागतो?* 👉 मॅगनीज *२) मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय?* 👉 मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु *३) दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?* 👉 सिंकदराबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीकृष्ण राचमाळे 👤 घनश्याम सोनवणे 👤 साईनाथ विश्वब्रम्ह 👤 बाबुराव नरवाडे 👤 अनिल उडतेवार 👤 पंडीत पवळे 👤 गौतमीपुत्र वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *डावपेच* राजकारणात प्रत्येकाच वेगळा डाव असतो आपणच भाग्यविधाते असलाच आव असतो पडद्या आड केलेले डावपेचही लक्षात येतात अंधारातले डावपेच एक दिवस उजेडात येतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी जीवन अनमोल आहे. पण ते फुकट मिळालेलं आहे. न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठे असते ! आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं. दिवस येतात, जातात. जीवन मात्र अडगळीत असतं. खरंतर माणूस जगतो कशासाठी? तर जगण्यासाठीच ! जीवन जटील नाहीच. पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत... त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो. माणूस वयानं जसजसा वाढू लागतो, तसतसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेह-यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात ! एवढं सुंदर जीवन हातात असताना झूटया भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते.* *माणूस धावत राहतो अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो. जीव गुदमरून टाकणा-या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठे हातात असतात ! काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या शेवटच्या प्रवासात एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.* ••●♦‼ *रामकृष्णहरी* ‼♦●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सर्वसामान्यपणे माणसाच्या मनाला भुरळ पाडणा-या काही गोष्टी आहेत.त्या मनाला विचलीत करतात,त्याच्याबद्दलचे आकर्षण अधिक वाढते,नात्यात कधी दूरावा आणतात किंवा द्वेषही निर्माण करतात.त्या गोष्टी म्हणजे पैसा, संपत्ती, सौंदर्य आणि गर्व ह्या आहेत.या गोष्टी आपल्या मनाला विचलीत तर करतातच त्यासोबत आपल्या आयुष्याची दिशाही बदलून टाकतात.म्हणून शक्यतो यापासून जास्त मोहात न पडता दूर राहिलेलेच बरे.या गोष्टींचा अतिरेक व्हायला नको.अतिरेक झाला तर आपल्याला जीवनातून हद्दपार करण्यास कारणीभूत ठरु शकतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *गर्व - Pride =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रोधाला संयमाने जिंकणे* एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,’’ तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’ तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड. १९६४ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६६ - मलावी प्रजासत्ताक झाले. १९६७ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले. 💥 जन्म :- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक. १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष. १८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार. १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते . १९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. १९३९ - मनसूद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी. २००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर: आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 3⃣ *मुकेश अंबानींकडून जिओ फोन-2 ची घोषणा; नव्या फोनमध्ये चालणार व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि यु ट्यूब* ----------------------------------------------------- 4⃣ *डॉ. वि.ल.धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबईत आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता, तर रायगडमध्ये पुढील 4 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता. हवामान विभागाचा इशारा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे शुक्रवारपासून स्ट्रक्चरल ऑडिट, अंधेरी येथील दुर्घटनेनंतर मनपा आणि रेल्वे प्रशासनाला आली जाग* ----------------------------------------------------- 7⃣ *इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन - भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चीनच्या चेन युफेई कडून पत्करावा लागला पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नटसम्राट* कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर याच्या काव्यात्म, प्रगल्भ प्रतिमेतून साकारलेली एक उत्तुग शोकात्मिका. नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाटकाचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पहिला फॅक्टरी अँक्ट कोणी बनवला ?* लॉर्ड रिपन *२) 'पद्मावत' हे काव्य कोणी लिहिलं आहे ?* मलिक मुहम्मद जायसी *३) रक्त गोठण्याला कोणतं व्हिटॅमिन सहाय्यक ठरतं ?* व्हिटॅमीन के *४) क्लोरोफ्लुरो कार्बनचं वैज्ञानिक नाव काय ?* फ्रेऑन *५) जेनेटिक्सचे पितामह कोणाला म्हणतात ?* ग्रेगर जॉन मेंडेल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष मानेलू, सहशिक्षक, धर्माबाद 👤 सुभाष इमनेलू 👤 व्यंकट चन्नावार 👤 मोहन भूमकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अशोक इमनेलू,सहशिक्षक, धर्माबाद 👤 शंकर सोनटक्के, सहशिक्षक, धर्माबाद 👤 साजीद शेख,सहशिक्षक, बिलोली 👤 शिवाजी जिंदमवार, सहशिक्षक, नायगाव 👤 आबासाहेब उस्केलवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 श्रीकांत पुलकंठवार 👤 अतुल बागडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 शंकर स्वामी 👤 मधुकर कांबळे 👤 अरफत इनामदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *खोटं पण रेटून* चारचौघात बोलायचं खोटं पण रेटून गुपचूप पाय धरायचे अंधारात भेटून अंधारात पाय धरलेले जगाला दिसत नाहीत चारचौघात बोललं म्हणून कोणी मोठे असत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जर विहिरीमध्ये खारट पाणी असेल तर वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले, तर एखादे वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो. मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल.* *तसेच ज्याला 'निंदा' आवडते त्याच्या अंत:करणामध्ये निंदेची घाण असणारच, निंदा करणे हिन पणाचे लक्षण आहे. जर आपण निंदा बंद केली, अभिमान टाकला आणि अंतर्मुख होऊन भगवंताचा शोध घेतला, तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतःकरण त्या प्रेमाने भरून जाईल. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या अंत:करणाची परिक्षा होते. आपल्याकडे अशी म्हणच आहे की -* *"जे आडात आहे तेच पोह-यात येणार."* ⛳ *॥ रामकृष्णहरी* ॥ ⛳ 🌻🌻🌻🌻🌻🌻 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्या मनात दुस-यांचे वाईट व्हावे आणि आपले चांगले व्हावे अशी भावना ठेवून काम करत असेल तर ते कदापिही त्या कामात यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या मनात कधीही कुणाविषयी मनात वाईट विचार किंवा वाईट भावना ठेवून काम करण्याचे ठरवले तर ते पहिल्यांदा आपलेच बिघडून जाते. त्यापेक्षा नेहमी आपल्या मनात आपलेही काम चांगले व्हावे आणि आपल्या कामाबरोबरच इतरांचेही काम चांगले व्हावे अशी शुद्ध भावना मनात ठेवली तर ती व्यक्ती आपल्या जीवनात सदैव यशस्वी तर होतोच. इतरांच्या बाबतीत आपल्यासारखा सदैव विचार मनात ठेवला तर जीवन सुखावहच होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी -इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिवृष्टी - Heavy rain* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता.अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती. तात्पर्य- आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/07/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वातंत्र्यदिन - अमेरिका 💥 ठळक घडामोडी :- १७७६ - अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले. 💥 जन्म :- १८९८ - गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान. १९३० - जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती. १९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार. 💥 मृत्यू :- १९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला विचारल्या शिवाय करू नये सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश* ----------------------------------------------------- 2⃣ *बोंडअळीसाठी आत्तापर्यंत १८ लाख १६ हजार ५५७ शेतकर्यांच्या खात्यात त्यासाठीच्या विम्याची रक्कम जमा झाली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले* ----------------------------------------------------- 3⃣ *अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची घटना दुर्दैवी असून, चौकशीचे आदेश दिल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.* ----------------------------------------------------- 4⃣ *एटीएममधून पैसे काढण्यावर लागणार अधिक शुल्क, पहिले फ्री ट्रांजेक्शन संपल्यावर वसूल केल्या जाणार्या शुल्कात १८ रूपयांऐवजी २३ रुपए अशी वाढ होण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *हवामान विभागाने मुंबईत बुधवार, गुरुवार दोन दिवसांत मुसळधार पावसाची वर्तवली शक्यता.* ----------------------------------------------------- 6⃣ *ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल यांच्या आक्रमक खेळीमुळे भारत 'अ' ने इंग्लंड लायन्सवर पाच गड्यांनी मात करीत तिरंगी मालिका जिंकली* ----------------------------------------------------- 7⃣ *फिफा विषवचषक 2018 - मेक्सिकोला मात देत ब्राझिल उपांत्यपूर्व फेरीत दाखल* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वामी विवेकानंद* विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. ११ सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषदेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली. या परिषदेत विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे, असे प्रतिपादन त्यांनी करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी, असे केले. पुढे वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये व्याख्याने दिली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार नसाल तर, तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) शांतीवन हे कुणाच्या समाधीचं नाव आहे ?* जवाहरलाल नेहरू *२) इकेबाना हा प्रकार कशाशी संबंधित आहे ?* फुलांच्या सजावटीशी *३) कर्नाटक संगीताचे पितामह कुणाला म्हणतात ?* पुरंदरदास *४) फॅदोमीटरने काय मोजलं जातं ?* समुद्राची खोली *५) 'सारे जहां से अच्छा' या गीताचे गीतकार कोण आहेत ?* कवी इक्बाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 बंडोपंत लोखंडे, सहशिक्षक, नांदेड 👤 बंडू अंबटकर, सामाजिक कार्यकर्ता 👤 कमलाकर जमदाडे, बिलोली 👤वृषाली सानप काळे, साहित्यिक 👤 नवनाथ मुसळे 👤 राजकुमार बिरादार 👤 बालाजी मंडाळेकर 👤 गणेश मंडाळे 👤 प्रभाकर भादेकर 👤 श्रीधर जोशी 👤 परमेश्वर मेहेत्रे 👤 गोविंद कवळे 👤 प्रभाकर शेळके 👤 उदय स्वामी 👤 श्याम उपरे 👤 अविनाश खोकले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊस* सगळ्यांचीच आता पावसाकडे नजर आहे ये रे ये पावसा फक्त हाच एक गजर आहे पावसा तु आता असा मनमोकळा ये पशु पक्षी प्राण्यांना तू समाधान दे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगरणीची गोष्ट सर्वांना माहित असेल. सुगरणीचा नक्षीदार खोपा नर बांधतो. सुगरण या खोप्यात आनंदाने राहते. अंडी घालते आणि नंतर दुस-यासोबत उडून जाते. अशी बेवफाई जिव्हारी लागते. खेड्यापाड्यतल्या अनेक म्हातारा-म्हातारींची अवस्था अशीच आहे. ज्यांच्याकडे बघत स्वप्नांचे झुले बांधले ती अंगाखांद्यावर खेळलेली पाखरं पंख फुटल्यावर बेईमान होऊन कायमची उडून गेली खोप्याला मागे सोडून. जख्खड चोचीने भरवलेला दाणा, दुष्काळी झळांमध्ये चोचीत थेंब-थेंब ओतलेलं पाणी, कसं विसरून गेले सारं..!* *या पाखरांना घरच्यांनीच मुभा दिली होती, दूरदेशी जाऊन चार दाणे चोचीत भरून आणतील या आशेवर भरवंसा होता. पण एकदा उडालेले पंख परतून माघारी फिरले नाहीत. म्हातारपण आजही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे. हे त्यांचं वाट बघणं वेदनादायी आहे. सकाळी रानात सोडलेली गाय सांजेला दावणीला आली नाही तर तिच्या ओढीने व्याकूळ वासरू टिपं गाळत हंबरतं. ते काळीज पिळवटून टाकतं, तसंच यांचं मूकपणे वाट पाहणं, हुंदका गिळून गहिवरणं. आपल्याच माणसांनी झोळीत टाकलेलं लाचारपण घेऊन निराधाराचे रडगा-हाणे कोणाला सांगणार ? आपल्या मोडक्या, गळक्या कुडाची इज्जत गहाण ठेवून थकलेले, भागलेले हताश पाय कशीबशी वाट चालतात. पाखरांची परतीच्या दिवसाची खुळी आशा मनात घेऊन वाट पाहता पाहता पडक्या घराच्या मुंडारीवर उगवलेले गवत वाळुन जाते पण पाखरं ...परततच नाहीत...???* 😢😌 ••●🌿 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌿●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या माणसाजवळ जे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वत:साठीच करतो त्याला ज्ञानी म्हणताच येत नाही. कारण त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा प्रसार न झाल्याने ते त्याच्यापुरतेच मर्यादित राहते. त्यापेक्षा त्याचा प्रसार केल्यास चांगल्या विचारांची देवाणघेवाण होऊन स्वत:च्याही ज्ञानात अधिक वाढ होते व इतरांनाही आपण काहीतरी नवे ज्ञान दिल्याचे समाधान वाटते. हा ज्ञान असल्येल्या माणसाने विचार करायला हवा. जर इतरांसाठी ज्ञानदानाचे कार्य करत नसेल तर ज्ञानी असूनही अज्ञानीच म्हणायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रसार - Spread* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मांजराच्या गळ्यात घंटा* वाऱ्यावर लाथा मारून काही उपयोग होत नसे. तसेच कल्पना या कितीही चांगल्या असल्या तरी जोपर्यंत त्या अंमलात येण्याजोग्या असल्या तरचत्यांचा योग्य तो उपयोग होऊ शकतो , जस हे बघा ... मांजरापासून कसं वाचायचं ,यासाठी सर्व उंदरांनी एक सभा घेतली .त्या सभेचा विषय होता .मांजरापासून कसं वाचायचं , तेव्हा प्रत्येक उंदीर आपापल्या कल्पना सांगू लागले .अस करूया,तस करूया.तेव्हा एक तरुण उंदीर जोशाने म्हणाला की, जर आपण त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधली तर कसं राहील.म्हणजे बघा न त्या घंटेचा आवाज आला की, आपल्याला सावध होता येईल . मग ठरलं तर मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची .ही सुंदर कल्पना तिथे बसलेला एक वृध्द उंदीर ऐकत होता . तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, ''ठीक आहे , ही कल्पना फार सुंदर आहे ,पण जरा विचार केला काय ? *ही घंटा बांधणार कोण?''.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ॥ ३ जुलै दिनविशेष ॥ घडामोडी १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. २००४ - थायलंडची राजधानी बँगकॉकची भुयारी रेल्वे सुरू. २००६ - २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला. 💥 जन्म :- १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ. १९२४ - सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष. १९८० - हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १३५० - संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ). १९१८ - महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट. १९३३ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष. १९३५ - आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : एसबीआय लाईफ चे माजी सीईओ अर्जित बसू यांची स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - इंधनाचे दर पुन्हा वाढणार, खनिज तेलाच्या दरात वाढ* ----------------------------------------------------- 3⃣ *दहा दिवसांत लोकपाल नियुक्त करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तराखंड: आठ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळा डिजिटल करणार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *भारतीय क्रिकेट संघाचा 'द वॉल' म्हणजेच माजी कर्णधार राहुल द्रविडचा आयसीसीच्या प्रतिष्ठित 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, हा सन्मान मिळवणारे राहुल द्रविड बनले पाचवे भारतीय खेळाडु* ----------------------------------------------------- 7⃣ *आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० ने विजय मिळवताच भारतीय संघाने टी-२० क्रमवारीत दुसर्या स्थानी घेतली झेप* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वांना मोफत शालेय गणवेष द्यावे* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_30.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *आळस* आलसस्य कुतो विद्या, अवद्यस्य कुतो धनम। अधिनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुत सुखम॥ अर्थ - आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हटलं जातं. लहानपणापासून ही शिकवण मनावर रूजवण्याचा प्रयत्न केला जातो. तरिही आळशी लोकांची संख्या कमी दिसत नाही. वर दिलेल्या संस्कृत श्लोकामध्ये आळशी लोकांना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो, याचं सुंदर विवेचन केलं आहे. आळशी माणूस नीट शिक्षण घेऊ शकत नाही. योग्य ज्ञान न मिळाल्यानं अशा व्यक्तीला सर्वांगिण प्रगती साधता येत नाही. पुरेसं ज्ञान, पुरेशी शैक्षणिक योग्यता नसल्यामुळे अशा व्यक्तीला उत्तम कारकिर्दीपासून वंचित रहावं लागतं. साहजिक उत्तम कारकिर्द नसल्यानं ही व्यक्ती उत्तम धन मिळवू शकत नाही. त्याला आर्थिक पातळीवरही समाधान प्राप्त होत नाही. या शिवाय अशी कोणतीच योग्यता नसलेल्या व्यक्तीला वाईट प्रसंगी साथ देणारे चांगले मित्र लाभू शकत नाहीत. त्यामुळे एकटेपण वाट्याला येतं. प्रतिकूल परिस्थितीत खंबीर साथ देणारे, प्रसंगी योग्य सहकार्य तसेच मार्गदर्शन करणारे जिवाभावाचे मित्र नसल्यानं जीवनात एक प्रकारची पोकळी जाणवते. ही सारी परिस्थिती केवळ आळसामुळे निर्माण होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जगातील सगळ्यात छोटा पक्षी कोणता ?* हमिंगबर्ड *२) पहिली अखिल भारतीय किसान सभा कुठे आयोजित केली होती ?* लखनौ *३) रामकृष्ण शिनची स्थापना कुणी केली होती ?* स्वामी विवेकानंद *४) आम आदमी पार्टीची स्थापना कधी झाली ?* २६ नोव्हेंबर २०१२ *५)'गदर पार्टी'चं मुख्यालय कुठे आहे ?* सॅन फ्रान्सिस्को *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 लंके विजय 👤 श्रीराम पाटील 👤 गोविंद सागर 👤 बालाजी मुंडलोड 👤 उत्तमराव नरवाडे 👤 सविता सावंत 👤 संतोष नलबलवार 👤 दिगंबर माने 👤 साहेबराव कांबळे 👤 लक्ष्मीकांत गिरोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अफवा* हल्ली अफवांचे पेव खुप फुटले आहेत चोर सोडून संन्याशीच जास्त लुटले आहेत खरं काय खोटं काय पडताळा घेतला पाहिजे मगच काय तो सारा गोंधळ घातला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●☀‼ *विचार धन*‼☀●•••• *जसा एखाद्या देशाला शत्रू असतो तसा प्रत्येक माणसालाही असतो. खरंतर माणूसच स्वत:चा एकमेव शत्रू असतो. आळस हा त्याचा सर्वात मोठा शत्रू. आळसाला जिंकल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. त्यासाठी प्रत्येक काम वेळेवर करावे. 'एकच ध्यास, एकच ध्येय' मनात बाळगून धडपडणारी माणसं आशावादी असतात. अवगुणी माणसे आळशी असतात. जिथं अवगुण तिथं फजिती. संत तुकोबा म्हणतात,'अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती.' आळशी माणसे आपल्या हातांनी स्वत:ची फजिती करून घेतात. ती ध्येयशून्य तसेच समाजवृक्षावर उगवलेली बांडगुळं असतात.* *माणसांच्या जीवनातील खरा आनंद म्हणजे एखाद्या मोठ्या ध्येयासाठी चाललेली अखंड धडपड. त्यासाठी अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत ठेवावा लागतो. सोहिरोबा अंबिये सांगतात की, 'अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे' आपल्या अंतरंगात उत्कटतेला, भव्यतेला, उदात्ततेला आणि उत्तुंगतेला महापूर आला की, त्यामध्ये आळसाचे महावृक्ष कोसळून वाहत जातात. ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करणारांना परमेश्वरसुद्धा मदत करतो. ध्येयासक्त माणसांच्या हाती माती दिली तर त्याचे तो सोने करून दाखवितो. मात्र, आळशी माणसाच्या हाती सोने दिले तर तो त्याची माती करून टाकतो. खरे उद्योगी विश्रांती घेण्याचे विसरतात. आळशी माणसे इतकी आळशी असतात की, ते आळशीपणा करायलाही आळस करतात.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रगत - Advanced* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नाग* एक कोल्हा एकदा त्याला राहण्यासाठी एक बीळ खणीत होता. खणत असताना तो बराच खोल गेला तर तेथे एक म्हातारा नाग त्याला दिसला. त्याला पाहाताच कोल्ह्याला फार भीती वाटली. तो नम्रपणे नागास म्हणाला, 'आजोबा, आपली मी झोपमोड केली याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण आपण इथं जे रात्रंदिवस बसून राहता त्यात आपल्याला काय सुख मिळतं ?' नाग त्यावर म्हणाला, ' बाबा, माझं नशीबच तसं त्याला काय करणार ?' कोल्हा म्हणाला, 'पण इथे खूप धन असूनही तुम्हाला चैन करताना मी पाहात नाही, किंवा आपण एक पैसासुद्धा कोणाला देत नाही. तर या धनाचा उपयोग काय?' नाग म्हणाला, 'ते मला समजत नाही. पण मला त्याचं रक्षण करायला देवानं सांगितलं आहे. नशिबात असेल ते भोगल्यावाचून सुटका नाही.' कोल्हा म्हणाला, 'तर मग मी धनवान नाही हे देवाचे माझ्यावर मोठे उपकारच आहेत. कारण तुमच्या इतका दुःखी प्राणी सगळ्या जगात कोणी नसेल !' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 02/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००० - मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो ॲक्सियाँ नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड. २००१ - ॲबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण. २००२ - स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला. २०१० - काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता. 💥 मृत्यू :- १९२८ - नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार. १९३२ - मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा. १९६३ - सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ. १९९६ - राजकुमार, हिंदी अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेची प्रशंसा* ----------------------------------------------------- 2⃣ *केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ* ----------------------------------------------------- 3⃣ *अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ, अनुदानित सिलेंडरच्या दरात २.७१ पैसे वाढ तर ५५.५० पैशांनी विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे* ----------------------------------------------------- 4⃣ *एसटी महामंडळातील कर्मचार्यांचा २०१६ ते २०२०च्या वेतनकराराला राज्य सरकारने दिली मंजुरी* ----------------------------------------------------- 5⃣ *दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्या पावसामुळे अमरनाथ यात्रेवर अस्मानी संकट* ----------------------------------------------------- 7⃣ *दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने तुल्यबळ प्रतिस्पर्धी इराणचे आव्हान ४४-२६ असं मोडून काढीत पटकावले विजेतेपद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= तीन लेख एकाच पानावर वाचा *प्लॉस्टिक बंदी, शिक्षकांचा काय दोष, निरोगी जीवनासाठी योग्य* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://dainikyashwant.com/epaper/edition/239/july/page/4 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुळ खाण्याचे फायदे* रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही. रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात. सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो. गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील. गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो. गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= भविष्य उज्वल त्यांचे आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) दुसरी गोलमेज परिषद कधी पार पडली ?* १९३१ *२) भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर कोण ?* कार्निलिया सोराबजी *३) खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?* आयसीआयसीआय *४) एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरूण महिला कोण ?* डिक डोमा *५) देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण ?* अजित डोवाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शिवानंद सिध्दप्पा चौगुले, विशेष कार्यकारी अधिकारी, चिंचवड 👤 विक्रांत दलाल, नांदेड 👤 पंडित दगडगावे,सहशिक्षक, धर्माबाद 👤 श्याम जाधव 👤 सतीश संजू 👤 शैलेश तरले 👤 वसंत घोगरे पाटील 👤 श्रीनिवास पुल्लावर 👤 जेजेराव सोनकांबळे 👤 चिमणाजी हिवराळे 👤 मारोती जाधव 👤 साईनाथ सावंत 👤 बाबू हातोडे 👤 शिवा पांचाळ 👤 गोपाळ पामस्कर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *आदेश* आदेशावर आदेश कृतीचा पत्ता नसतो त्याच त्या आदेशांचा पुन्हा पुन्हा कित्ता असतो आदेश मिळाला की काम व्हावे जोमाने आदेशाला महत्व येते केलेल्या कामाने शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, नकाराकडून सकाराकडे जीवन समृद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षण हे जीवनाला आकार देण्याचे, संस्कारक्षम बनवण्याचे, यश मिळवून देण्याचे,समाजात मानसन्मान मिळवून देण्याचे आणि जीवन समृध्द करण्याचे काम तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ देण्याचे काम शिक्षणच करते. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणासारखा दुसरा कोणताही दिशादर्शक आणि प्रभावी मार्ग नाही. म्हणून शिक्षणप्रवाहात नेहमी असायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रभावी - Effective* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वासाचा सुगंध* चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?'' चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.'' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*निरोप* दाटला मनीचा कंठ निरोप सर्वांचा घेतांना भेटणार काय पुन्हा सहवास त्यांचा परततांना अनमोल आठवणी घेऊन सख्या माझ्या भेटेन गेलेल्या क्षणा क्षणाचा विसर कसा पडेन निरोप घेत मैत्रीचा नयनअश्रु ओसरेल दाटल्या भावनांचा बांध मनी फुटेल हसून सारे जीवन मैत्रीत गेले विसरून सुखदुःखाचे धागेदोरे घेतले होते जुळवून सहा सोबतीनी आम्ही नजरेत प्रेम सदा बरसावे विखुरलेल्या पंखानसमवे जीवन गाणे गात जावे 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/06/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- शिवराज्याभिषेकदिन - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले. १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला. 💥 जन्म :- १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी. १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष. १९६३ - मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा. २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आमच्या सरकारने संसदेत संविधान दिन साजरा केला - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *कारंजा : पुस्तकांची गुढी उभारून अभिनव पद्धतीने ‘प्रवेशोत्सव’, कारंजा तालुक्यातील कामरगाव जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली भारताच्या दौ-यावर, तीन दिवस भारतातल्या वरिष्ठ अधिका-यांचा घेणार भेटीगाठी* ----------------------------------------------------- 4⃣ *नांदेड : जुन्या मोंढ्यात जवळपास 2 टन प्लास्टिक जप्त, महापालिका आयुक्त लहुराज माळी यांची कारवाई.* ----------------------------------------------------- 5⃣ *नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार 2018 ने गौरवण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद व सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान* ----------------------------------------------------- 6⃣ *कोल्हापूर : राजर्षि शाहू मिलच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत 20 जुलैनंतर बैठक घेणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील* ----------------------------------------------------- 7⃣ *FIFA World Cup 2018: पहिल्या सत्रात फ्रान्स आणि डेन्मार्क सामना गोलशून्य बरोबरीत* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जसे चारित्र्य तसे जीवन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/38.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सारं काही हृदयासाठी* हृदयाला तणावापासून दूर ठेवावं. अतिरिक्त तणावाचा हृदयावर विपरित परिणाम होतो. ताण आला की हृदयगती आणि रक्तदाब वाढतो. यामुळे शरीराला अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासते. यामुळे छातीत दुखू लागतं. त्यामुळे आनंदी आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. *ताजी फळं, भाज्या, पूर्ण धान्याचा समावेश असलेला समतोल आहार घ्या.* *आहारातले सॅच्युरेटेड फॅट्स, कोलेस्टेरॉल, फॅट्स तसंच सोडियमचं मूल्यांकन करा.* *आहारातलं तेलाचं प्रमाण कमी ठेवा.* *दिवसाला फक्त दोन ते तीन चमचे तेल खा.* *दररोज ३0 ग्रॅम कच्चं लसूण खा.* *वजनावर नियंत्रण ठेवा.* *स्थूलतेमुळे रक्तातल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. यामुळे उच्च रक्तदाब तसंच हृदयाच्या धमन्यांवर ताण येतो.* *धूम्रपान टाळा, सतत धूम्रपान केल्यामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे धमन्यांमध्ये चरबीयुक्त स्राव साचू लागतो. याचं रूपांतर रक्ताच्या गुठळ्यांमध्ये होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.* *मधुमेही व्यक्तींना हृदयविकाराचा धोका बराच जास्त असतो. त्यामुळे मधुमेहींनी रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवायला हवं.* *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= मी नरकात सुद्धा चांगल्या पुस्तकांचे स्वागत करीन, कारण त्यांच्यामध्ये नरकाचे ही स्वर्गात रूपांतर करण्याची शक्ती आहे. - लोकमान्य टिळक *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= १) 'ग्रेट व्हिक्टोरिया' वाळवंट कुठे आहे? ऑस्ट्रेलिया २) देशातील पहिली नॅशनल स्पोर्टस युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? मणिपूर ३) रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? महेशकुमार जैन ४) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती? ताज उल मशीद ५) मायकल फेल्प्स कोणत्या क्रीडाप्रकाराशी संबंधित आहे? जलतरण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुशील कापसे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अनुपमा जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्ता* माणसातला माणूस संपवते सत्ता माणसा माणसात जुंपवते सत्ता निर्माण करते हाव सत्तेपाई सारे कुटील डाव शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी जीवन अनमोल आहे. पण ते फुकट मिळालेलं आहे. न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठे असते ! आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं. दिवस येतात, जातात. जीवन मात्र अडगळीत असतं. खरंतर माणूस जगतो कशासाठी? तर जगण्यासाठीच ! जीवन जटील नाहीच. पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत... त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो. माणूस वयानं जसजसा वाढू लागतो, तसतसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेह-यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात ! एवढं सुंदर जीवन हातात असताना झूटया भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते.* *माणूस धावत राहतो अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो. जीव गुदमरून टाकणा-या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठे हातात असतात ! काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या शेवटच्या प्रवासात एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.* ••●♦‼ *रामकृष्णहरी* ‼♦●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही तुमच्या आवडीने हाती घेतलेले काम तेवढ्याच आवडीने मन लावून करा.लोक काय म्हणतील याचा विचार करु नका.कारण जगाची एक रीतच आहे की,जी माणसं चांगली कामं करतात त्यांना काहीतरी नाव ठेऊन त्यांच्या चांगल्या करत असलेल्या कामात व्यत्यय आणतात.त्यांना तुमचे चांगले पाहवत नाही.त्यांच्या बोलण्याकडे किंवा काकदृष्टीने पाहणा-याकडे लक्ष देऊ नका.कारण त्यांना तुमच्यासारखे येत नाही आणि जमतही नाही.ते तुमचे चांगले कसे पाहवणार ? म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी कारण अशी माणसं जर नसती तर आपल्याला प्रोत्साहनतरी कसे मिळेल.उलट आपण त्यांच्या बोलण्याकडे किंवा काकदृष्टीने पाहणा-याकडे काना डोळा करुन मनात असे ठरवून टाकायचे की,आपल्याला अधिक प्रोत्साहन देत आहेत.काही दिवस ते करतीलही आणि काही दिवसांनंतर स्वत: होऊन आपल्याकडे दुर्लक्ष करून निघून जातील आणि आपला मार्ग बदलूनही टाकतील.कदाचित काही दिवसांनंतर तुम्हाला म्हणतीलही आमचे चुकले आम्हाला माफ करा.अशावेळी आपण वेगळ्या पद्धतीने उत्तर द्या की,तुमच्यामुळेच मला प्रोत्साहन मिळाले त्यामुळे आमची प्रगती झाली.अशा तुमच्या बोलण्याने कदाचित त्यांच्या जीवनशैलीत फरक पडेल आणि तुम्हाला तुमच्याकडे पाहण्याचा ही दृष्टिकोन बदलूनही जाईल.केवळ तुमच्या शांत,संयमी आणि तुम्ही करत असलेले चांगले काम पाहून.चार शब्द बोलून दाखवण्यापेक्षा आपल्या चांगल्या करत असलेल्या कृतीतून नक्कीच बोध घेतील आणि चांगल्या दृष्टीने जीवन जगण्याचा प्रयत्नही करतील हे केवळ तुमच्यामुळेच.नेहमी माणसाने आपल्या जीवनात आपल्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत चांगला दृष्टिकोन ठेवून जगायला शिकले पाहिजे *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दृष्टिकोन* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌻☘🌻☘🌻☘🌻 *माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ *✍सुविचार मौक्तिके* ➖➖➖➖➖➖➖ *📚१) युवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की, ज्यामुळे ते स्वतःपुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील.* *📚२) शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजोपयोगी विकास.* *📚३) आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी समर्थ असते तेच शिक्षण होय.* *📚४) मनुष्याची सुखद व स्वाभाविक स्थिती म्हणजे शांती.* *📚५) शञूची व रोगाची उपेक्षा करु नये.* ➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *🙏 शब्दांकन/ संकलन 🙏* *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/06/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफरसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता 💥 जन्म :- १९०० - लुई माउंटबॅटन, इंग्लंडचा भारतातील व्हाइसरॉय. १९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान. १९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९७८ - आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९९७ - जाक-इवेस कूस्तू, फ्रेंच संशोधक. २००९ - फाराह फॉसेट, अमेरिकन अभिनेत्री. २००९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असून देशात प्रामाणिक लोकांमध्ये जीएसटीबद्दल उत्साहपूर्ण वातावरण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी होणार मतदान* ----------------------------------------------------- 3⃣ *विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी अहमदाबादमध्ये केली आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या नवीन संघटनेची स्थापना* ----------------------------------------------------- 4⃣ *२०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही मिळणार प्रवेश* ----------------------------------------------------- 5⃣ *रेल्वे फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारून येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्यावी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली* ----------------------------------------------------- 6⃣ *विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधरच्या मतदारसंघासाठी आज मतदान* ----------------------------------------------------- 7⃣ *दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेत भारताने सलग दुसर्या विजयाची केली नोंद, पाकिस्ताननंतर केनियावर मिळविला विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाढदिवसाची मेणबत्ती विझविण्यापूर्वी...* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/39.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गेट वे ओफ इंडिया* मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे. भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. जॉर्ज विटटे यांच्या कल्पनेतून साकार झालेली वास्तू असून वास्तूचे बांधकाम पिवळ्या बसातर दगडात केले आहे. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. या वास्तूचे बांधकाम आणि त्यावरील सुंदर गुजराती शिल्पकला वाख्ण्याजोगी आहे. अशी भव्य-दिव्य वास्तू पहिल्या नंतर येथून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या. गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात. या फेरी बोटांचा प्रवास सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असून या बोटीतून प्रवास करण्यासाठी ८० ते १२० रुपये पर्यंत तिकीट आकारले जाते. त्याचबरोबर येथील देशी-परदेशी लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यागाड्या आणि टांगे. प्राचीन मुंबईत आलेल्या प्रत्येक पर्यटकाची पहिली पसंती असलेल्या या वास्तूसमोर छायाचित्र काढण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. गेट वे ऑफ इंडिया व भव्य विशाल अशा ताज होटेल समोर वेगवेगळ्या पोझमध्ये उभे राहून पर्यटकांचे फोटो काढण्यास अनेक छायाचित्रकार असतात. निव्वळ २० ते ५० रुपये आकारून हे फोटो काढून दिले जातात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) निकोबार द्वीपसमुहात किती बेटे आहेत ?* १९ *२) भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते ?* उत्तर प्रदेश *३) पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे पार पडली ?* नवी दिल्ली *४) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?* कृषी क्षेत्र *५) विल्यम शेक्सपिअरच्या निधनाला किती वर्षे पूर्ण झाली ?* ४०० *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 योगेश कात्रे, लिपिक आय सी डी एस बिलोली 👤 सुरेश कात्रे, धर्माबाद 👤 सौरभ लाखे 👤 प्रल्हाद कापावार 👤 ओम पालकृतवार, धर्माबाद 👤 अशोक तनमुदले, येवती 👤 रुपेश पांचाळ 👤 श्रेयस इंगळे पाटील 👤 संदेश कोडगिरे, धर्माबाद 👤 राजेश अलगुंडे 👤 रमाकांत गोणे 👤 नादयाप्पा स्वामी 👤 आदर्श गावंडे 👤 दीपक जायवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= @@ गुगली @@ *जग पहाते* डोळे झाकून दुध पिले तरी जग पहाते झाकून दुध पिले म्हणून दिसायचे थोडे रहाते कधीतरी अंधारातलं उजेडात येतच असते लपवून ठेवलेल गुपित माहित होतंच असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खलील जिब्रान म्हणतात, 'शिल्पकार व चित्रकार यांच्या कामापेक्षा एखाद्या शेतक-याचे, सामान्य कामगाराचे काम श्रेष्ठ दर्जाचे असते.' जीवन म्हणजे खरोखर अंधार. भर उन्हांत काम करणारा शेतकरी, धडधडत्या यंत्राबरोबर काम करणारा कामगार, धगधगत्या भट्टीजवळ काम करणारा मजूर आणि सीमेवर जीव धोक्यात घालणारा सैनिक ही कामातून केल्या जाणा-या अत्युच्च त्यागाची उदाहरणे. तुम्ही काम करता तेव्हा स्वत:ला स्वत:शी, इतरांशी आणि देवाशी जोडत असता. एखाद्या हमालाच्या अंगातून वाहणा-या घामाच्या धारा पाहिल्या की रक्ताचे पाणी करणे काय असते हे संवेदनशिल मनाला सहज कळते. पण कष्टाच्या भाकरीवर फार थोड्यांची श्रद्धा आहे.* *शेक्सपिअरच्या एका नाटकात काॅरिन नावाचा साधाभोळा मेंढपाळ भेटतो. तो म्हणतो.. मी खरा श्रमकर्ता, कष्टकरी आहे. माझी भाकरी मी मिळवतो. माझे कपडेही मीच बनवतो. मी कुणाची निंदा करत नाही. कुणाच्या आनंदाचा हेवा करत नाही. इतर लोकांच्या चांगल्या गोष्टी पाहून मला आनंद होतो. माझे दु:ख मी माझ्याशी ठेवतो. माझ्या जीवनात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या शेळ्यामेंढ्या चरताना पाहणं आणि त्या कोकरांना दूध पिताना पाहणं. काॅरिनच्या जीवनाची साधीसुधी संकल्पना पाहून माणसं जगू लागली तर आपल्या जीवनात कित्येक प्रश्न निर्माण होणार नाहीत. एक साधा मेंढपाळ एवढ्या नैतिक उंचीवरून बोलू शकतो तर शिकल्या सवरलेल्यांनी कोणत्या उंचीवरून बोलले, वागले पाहिजे हे सांगितलेच पाहिजे असे नाही.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ईश्वराचे नामस्मरण करणे म्हणजे विचलीत झालेल्या मनाला स्थिर करुन आपल्यातील नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे वळविणे होय. दैनंदिन जीवनात अनेक लहान मोठे प्रसंग घडतात. काही प्रसंग मनाला अस्वस्थ करतात तर काही मनाला प्रेरणा देतात. पण एखादा प्रसंग अस्वस्थ करणारा हा मनावर इतका परिणाम करतो की, कोणत्याही कामात अडथळा निर्माण करतो. मग अशावेळी आपणच म्हणतो की, आज काय झाले आहे ? शेवटी मार्ग सापडतो तो ईश्वराच्या नामस्मरणाचा आणि हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नामस्मरण केले असता आपल्यातील नकारात्मक उर्जा हळूहळू लोप पावायला लागते. आपला विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. एकप्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन समोर येणा-या अडचणींवर मात करुन यशस्वी होण्यास मदत होते. दिवसभराच्या कामात आळस येत नाही की, कितीही कठीण काम असले तरी ते सहज उरकल्या जाते. म्हणून आपल्या जीवनाला नवी उभारी, नवा उत्साह, नवा जोश, चांगले हातून काम करण्यासाठी, आनंदी प्रसन्न जीवन जगण्यासाठी ईश्वराचे नित्य नामस्मरण करायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रसन्न* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मातृभक्ती* त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*माझी शाळा माझे उपक्रम* 〰〰〰〰〰〰 *🎂वाढदिवस🎂* 💐💐💐💐💐💐💐 आज दि. २२/०६/२०१८ रोजी माझ्या वर्ग पहिलीतील आदर्श वाघमारे चा वाढदिवस वहिपेन व पुष्पगुच्छ 💐देऊन परिपाठाचा वेळेस साजरा करण्यात आला. शाळेतील आम्ही सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी आदर्श चा वाढदिवस आनंदाने साजरा केला. 〰〰〰〰〰〰〰 ✍🙏शब्दांकन🙏 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (वर्गशिक्षिका) जि.प.प्रा.गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌻🌻🌻🌻🌻🌻
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/06/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १३७७ - वयाच्या दहाव्या वर्षी दुसरा रिर्चड इंग्लंडच्या गादीवर बसला. १५१७ - अपंगांना कृत्रिम हातपाय पुरवणारे आणि रक्तवाहिन्या शिवून रक्तस्त्राव थांबविण्याची कल्पना मांडणारे अॅब्रायस्ते पेरी यांचा जन्म. १९४० - सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. फ्रान्सने अधिकृत शरनागती पत्करुन हीटलरसमोर गुडघे टेकले. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला 💥 जन्म :- १९३५ - वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १८९६ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता. १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक 💥 मृत्यू :- १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ. २००१ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दुभंगलेला समाज, विखुरलेल्या कुटुंबांना जोडण्याचे काम योग करते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त व्यक्त केले* ----------------------------------------------------- 2⃣ *कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (इपीएफओ) भविष्य निर्वाह निधी पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध येण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 3⃣ *आता राज्य सरकारमार्फत खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती करण्यात येणार, शासनाने घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 4⃣ *तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या वाट्याचे तापी खोर्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास गुजरात सरकारने दिला स्पष्ट नकार* ----------------------------------------------------- 5⃣ *शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिर ट्रस्टने राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी दिले तब्बल ७१ कोटी रुपयांचे 'दान'* ----------------------------------------------------- 6⃣ *इंग्लंडच्या पुरुष संघासह महिला क्रिकेट संघाने टी-२0 मध्ये २५0 धावांचा केला विक्रमी डोंगर* ----------------------------------------------------- 7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत गुरुवारला झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बलाढय़ डेन्मार्कला १-१ असे बरोबरीत रोखले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *अभ्यास एके अभ्यास* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_2.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *चिखलदरा* अमरावती- सातपुडा पर्वतांच्या कुशीत वसलेल्या चिखलदरा हे विलोभनीय पर्यटनस्थळ देश-विदेशातील पर्यटकांचे पावसाळ्यात लक्ष वेधून घेते. वर्षभरही पर्यटक मोठ्या संख्येने येते येत असतात. सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा नेहमीच आपल्या सौंदर्याने पर्यटकांना खुणावते. या संग्रहातील फोटोंमधून पाहूया चिखलदराचे सौंदर्य.. धुक्यात हरवतो रस्ता.. पावसाळ्यात दाट धुके आणि हिरवळीनं सजलेल्या पर्वतरांगा चिखलद-याच्या सौंदर्यात कमालीची भर घालतात. अवघा मेळघाटच पावसाळ्यात उठून दिसतो. येथील जंगल शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. परिसरात नेहमीसाठी थंड आणि आरोग्यदायी हवामान असते. जैवविविधतेसाठी चिखलदरा पोषक आहे. हे आहेत प्रेक्षणीय स्थळे.... चिखलदरा येथे 12 महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यामध्ये पंचबोल (इको पॉईंट), देवी पॉईंट, नर्सरी गार्डन, प्रॉस्पेट पॉईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, बेलेन्टाईन पॉईंट अशी स्थळ आहेत. धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेला भीमकुंड, मंकी पॉईंट, लॉग पॉईंट, लेन पॉईंट, वैराट पॉईंट व हरिकेन पॉईंट अशी स्थळंही आपल्याला आकर्षित करतील. येथील स्थळांची नावे ही ब्रिटिश अधिका-यांनी दिलेली आहेत. कसे जावे महामार्ग - राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर अमरावती हे शहर आहे. तेथून चिखलदरा हे 94 किमी अंतरावर आहे. तेथून चिखलदरा येथे येण्यासाठी थेट एसटी सेवा आहे. रेल्वेने- मुंबई-हावडा या मुख्य रेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तेथून अमरावतीसाठी एस.टी. किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. अमरावतीहून चिखलदरा 94 किमी अंतरावर आहे. एसटी व खाजगी वाहन सहज मिळते. पर्यटकांना खुणावणारा चिखलदरा! महाराट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वंतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते. चिखलदरा या ठिकाणाला मनोरंजक इतिहास आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पार महाभारतात जावे लागते. पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदर्यात घालवला होता, असे म्हणतात. भीमाने येथील राजा कीचकचा वध करून एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकदरीचे रूपांतर चिखलदरीत झाले व चिखलदरीचे चिखलदर्यात. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भात सर्वाधिक ऊन असते. निसर्गाची शितलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. चिखलदरा येथील हजारो फूट खोल दर्या या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात. दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केली होती, त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे. असे म्हणतात. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. मेळघाट परिसर हा व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे चिखलदर्याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते. मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरीन तर मुक्त संचार करतात. उन्हाळ्यात मात्र येथे पानझडी सुरू होते. कारण हा जंगल परिसर शुष्क पानझडी अरण्याच्या प्रकारात मोडते. परंतु पावसाळा व हिवाळ्यात सातपुड्याला सह्यादी पर्वताचे रूप प्राप्त होत असते. चिखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात. दरीच्या पायथ्याशी काही पायर्या उतरून गेले असता देवी पॉइंट आहे. डोंगराच्या एक भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे. कुंडातून पाणी सरळ दरीत उडी घेते. देवीचे दर्शन झाल्यानंतर फेसाळलेला धबधबा मनमोहून टाकतो. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेत पॉइंटही आहे. वनोद्यानात संध्याकाळी कुटुंबियांसोबत फिरायला मज्जा येते. रात्री वाघांच्या डरकाड्या ऐकायला येतात. लहान मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही सोय येथे करण्यात आली आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कॉफी व स्ट्रॉबेरी. येथे कॉफी व स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. चिखलदर्याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर गविलगड़ किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहे. पंचबोल पॉइंट तर पर्यटकांना चक्राऊन टाकणारा आहे. चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट. चिखलदऱ्यापासून 11 किलोमीटर दूर डोंगरावर विराट देवीचे मंदिर बांधलेले आहे. देवीचे मंदीर पश्चिमेकडील खोल दरीत एका भुयारात आहे. तेथे जाणे अशक्य असल्याने नवे मंदिर बांधण्यात आले.कसे जाल?महामार्ग-राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर अमरावती हे शहर आहे. तेथून चिखलदरा हे 94 किमी अंतरावर आहे. तेथून चिखलदरा येथे येण्यासाठी थेट एसटी सेवा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱 09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा.. की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= १) कोळशाचं सर्वात जास्त उत्पादन करणारा देश कोणता? अमेरिका २) 'जागतिक दृष्टीदान दिन' कधी साजरा केला जातो? 10 जून ३) 'लोसांग' हा उत्सव कुठे साजरा केला जातो? सिक्कीम ४) अमीर खुस्रो या कवीचं मूळ नाव काय आहे? मुहम्मद हसन ५) 'ए सुटेबल बॉय' हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? विक्रम सेठ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 गंगाधर तोटलोड, धर्माबाद माजी जि.प. सदस्य, नांदेड 👤 गजानन पामे, तंत्रस्नेही शिक्षक, परभणी 👤 स्वप्नील पाटील 👤 सुधीर वाघमारे 👤 भिमराव तायडे 👤 माधव बोडके, सहशिक्षक 👤 गंगाधर बोमलवाड, सहशिक्षक 👤 आशा मानकवार 👤 अभिषेक बकवाड 👤 लक्ष्मण श्रीरामे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *नेक* ज्यांचे खायचे अन् दाखवायचे दात एक असतात त्यांचे विचार खरोखर नेहमी नेक असतात खायचे अन् दाखवायचे नेहमी एक असले पाहिजे सोन्या सारख्या माणसाचे वागणे फेक नसले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'चहा' आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग, नुसते पेय नाही तर वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याला खास स्थान आहे.* *'चहा' ही दोन अनोळखी माणसांमधल्या नात्याची सुरूवात असते व त्यांच्यातील गहि-या होत जाणा-या नात्याचा 'चहा' एक साक्षीदार असतो.चहाभोवती अनेक आठवणी पिंगा घालत असतात.* *यातलंच एक अतिशय सुंदर, नाजुक,* *कधी हवंहवसं वाटणारं...* *आणि कधी आयुष्यभराची सल,* *देऊन जाणारं हळुवार नातं....** *'त्याचं आणि तिचं!'* *'चहा' च्या साक्षीने* *गुंफलं जाणारं..* *गुलाबी नातं....!* ••●🍵 ‼ *रामकृष्णहरी* ‼🍵●•• ☕☕☕☕☕☕☕☕☕ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही या जगात आलात आणि तुमची ओळख माणूस म्हणूनच झाली. जन्मानंतर आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो. तिथून मात्र आपण आपल्यासाठी काहीना काही करायला लागतो आणि कशाच्यातरी मोहात पडतो. हे माझं ते माझं म्हणत म्हणत सारं आयुष्य संपवतो. शेवटी आपण जन्माला येताना सोबत काहीच आणले नव्हते आणि शेवटी जे काही मिळवले ते इथेच सोडून गेले. मग मनुष्य जन्माला येऊन काय केले ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर काहीच सापडत नाही. याचे जर खरेच काही उत्तर मिळवायचे असेल तर आयुष्यात चांगले जगायचे असेल तर, आपल्या पश्चात इतरांसाठी काही ठेवायचे असेल तर पहिल्यांदा कोणत्याही गोष्टींचा मोह टाळायला शिका, आपल्यातला मीपणा नष्ट करा,एकटेपणात जीवन जगण्यापेक्षा इतरांमध्ये जगायला शिका. पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी आपले सुंदर जीवन दु:खाच्या खाईत लोटू नका, इतरांमध्ये सामील होऊन सुखदु:खांत मदतीचा हात पुढे करा, इतरांपेक्षा आपण जन्माला आलो आणि वेगळे काही करून आपला ठसा जनमानसावर उमटवा जेणेकरून तुम्ही मनुष्यजीवनाला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. पुन्हा आपल्याला ही संधी कधीच मिळणार नाही हे लक्षात असू द्या. मग तुमच्याच लक्षात येईल की, आपणास काय करायचे आणि काय करावे लागणार याचा नक्कीच उलगडा होईल आणि अनेक मोहापासून आपली सुटका होईल. आपले जीवन अधिक सुसह्य होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सार्थक* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*आज जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.ता.हदगाव जिल्हा नांदेड* येथे आंतरराष्ट्रीय योगादिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी प.स.हदगावचे विषयतज्ञ श्री एस.एन.कदम सर, शाळेतील श्री कर्जतकर सर, श्री पतंगे सर, श्रीमती सेनकुडे मॕडम, श्रीमती हिवराळे मॕडम आदी शिक्षक उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व योगाचा प्रकाराची माहिती आणि आरोग्यदायी माहिती सांगण्यात आली. अशाप्रकारे आजचा योगदिन साजरा करण्यात आला. 🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍ शब्दांकन श्रीमती सेनकुडे ( स.शि.) ☘🌻☘🌻☘🌻☘
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/06/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६६ - शिव सेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली. १९७८ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण. 💥 जन्म :- १५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद १९४५ - ऑँग सान सू की, म्यानमारची राजकारणी. १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक. 💥 मृत्यू :- १८६७ - मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट मृत्यूदंड. १९०२ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तेलंगणात जाण्याचा नाद सोडा, पालकमंत्री म्हणून तुमच्या भागासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळाचा २५ टक्के निधी सर्व विकास कामासाठी खर्च करू, कालबद्ध कार्यक्रमातंर्गत सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी धर्माबाद सरपंच संघटनेला दिली ग्वाही* ----------------------------------------------------- 2⃣ *डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात वाहतूकदारांनी आजपासून पुकारला देशव्यापी बेमुदत संप .* ----------------------------------------------------- 3⃣ *हागणदारीमुक्ती, स्वच्छता या क्षेत्रात महाराष्ट्राचे काम देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार काढत केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वर अय्यर यांनी राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह या क्षेत्रात काम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांचे केले अभिनंदन.* ----------------------------------------------------- 4⃣ *दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजवरुन ब्रॉड गेज रुपांतरास वन संवर्धन कायद्याची मिळाली परवानगी* ----------------------------------------------------- 5⃣ *शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना मिळाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा* ----------------------------------------------------- 6⃣ *उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथे राहणार्या एका चहावाल्याची मुलगी १२ वी मध्ये सीबीएसई बोर्डातून ९८ टक्के मिळवणार्या सुदीक्षा भाटी हिला अमेरिकेच्या प्रतिष्ठित बॉबसन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी मिळाली 3.8 कोटीची शिष्यवृत्ती* ----------------------------------------------------- 7⃣ *1008 रुपये देऊन मिळवा, 24 हजार रुपये पेन्शन! मोदी सरकारने 2015 मध्ये केली अटल पेन्शन योजना* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कॉलेजच्या विद्यार्थ्याची बायोमेट्रिक हजेरी!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_18.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ग्रामपंचायत* छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पहाते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. महाराष्टात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना असतात. ग्रामपंचायत कायद्यातील कलमे ▪मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी. ▪ग्रामपंचायतीचे कार्य चालविण्यास गावातील लोक आपले प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाने निवडतील. सदर सदस्यांचे मतदान हे प्रोढ व गुप्त मतदान पद्धतीने होईल. ▪ आरक्षण :- अ) ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ५०% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ब) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. क) इतर मागासवर्गीय घटकामध्ये मोडणाऱ्यांसाठी लोकांकरीता २७ % जागा आरक्षित आहेत. ▪ सद्स्यांची पात्रता :- १) तो गावातील ग्रामसभेचा सदस्य असावा. २ त्याचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. ३) त्याने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत. ▪ कृषी व पतपुरवठा क्षेत्रातील सहकार सोसायटीच्या अध्यक्षांना सहयोगी सदस्य म्हणून घेता येते. मात्र त्यास ग्रामपंचायतीची परवानगी लागते, आता ही पद्धत बंद झाली आहे. ▪ मुदत – ग्रामपंचायतिची मुदत ५ वर्षांसाठी आहे. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ६ महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक आहे व कोणत्याही परीस्थित मुदतवाढ मिळत नाही. ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा करण्याचा अधिकार राज्यशासन आहे. जर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिला तर पोटनिवडणूक घेण्याचा निर्देश किंवा बरखास्ती निर्णय राज्यशासन घेते. त्या संदर्भातील अहवाल जिल्ह्याधिकारी शासनाकडे पाठवितो. ▪ डोंगरी भागातील लोकसंख्येस ३०० ते १५०० लोकसंख्येत सात सदस्य असतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरुळ* 📱 9403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= १) 'इटर्नल इंडिया' हे पुस्तक कुणी लिहिलं आहे? इंदिरा गांधी २) भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? हिकेटियस ३) दह्यात कोणतं अँसिड असतं ? लॅक्टिक ऍसिड *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रताप भिसे, सहशिक्षक, नांदेड 👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली स्तंभलेखक, दैनिक देशोन्नती 👤 सुभाष दरबस्तेवार, पत्रकार दैनिक गोदातीर समाचार, कुंडलवाडी 👤 नारायण शिंगारे 👤 शंकर बेल्लूरवाड 👤 नागेश कोसकेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिखावा* आपल्याकडे कामं कमी अन् दिखावाच जास्त आहे असले काम करणाराला वाटते आपलेच रास्त आहे दिखाव्या पेक्षा जास्त आपल काम बोलत असतं दिखाव्यावाल्यांच काम जास्त दिवस चालत नसतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुखकर्ता आणि दुखहर्ता ही गणेशाची स्तुती फक्त स्तुतीच्या पातळीवर न राहता आपल्यात कशी परिवर्तीत होईल याकडे लक्ष हवे. आपले उलट होते आरतीतल्या शब्दांपेक्षा सगळे लक्ष प्रसादावर असते. त्यामुळे आसक्ती वाढते. आरती म्हणणे ही चार चौघांमधली सक्ती होऊन बसते आणि सक्तीने केलेले कोणतेही काम फलप्रद नसते. घरातल्या माणसांना जेवायला लागते म्हणून स्वयंपाक करायचा आणि मन:पुर्वक स्वयंपाक करायचा यात जो मुलभूत फरक, तोच फरक जगण्यातल्या अध्यात्मात आहे.* *तो फरक जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच बदल घडेल. अन्यथा फक्त प्रतिक्रिया घडत राहील. प्रतिक्रियावादी असणे आणि गुन्हेगार असणे यात व्यापक अर्थाने फार फरक नाही. जगण्याच्या व्याप-तापात माणूसपण संभाळणे गरजेचे असते. सामाजिक उत्सव आणि उपक्रमांत ते संभाळण्याची संधी असते, पण त्या संधीचे सोने किती लोक करत असतील ? समाजातील जास्तीत जास्त वर्ग अशा उत्सवांतून उजळून निघायला हवा.* ☘ *॥ रामकृष्णहरी ॥* ☘ 🍀🍀🍀🍀🍀🍀 -- *संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सर्वसामान्यपणे माणसाच्या जीवनात जीवन जगत असताना एखादे पुढचे पाऊल उचलायचे झाले तर तो एकदा सोडून दहावेळेस विचार करतो. कारण त्याला त्याचे धाडस नसते. जर आपण एखादे धाडस केले नि यश मिळाले नाही तर आपण पार बुडालो असे वाटते आणि यश मिळाले तर त्याचा त्याला आत्मविश्वास वाटत नाही. मग करायचे काय हा प्रश्न सतत भेडसावत राहतो. अशावेळी सर्वसामान्यपणे एक आपल्या मनाशी ठाम निश्चय करायचा आपण उचललेले पाऊल हे नक्कीच चांगले आहे त्यात आपल्याला नक्कीच यश मिळणार आणि यश मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण आपले पाऊल टाकण्याचे ठरवले तर नक्कीच यश मिळेल. अशावेळी कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही तर आपण केलेला निर्धार हाच तुमचा खरा साथीदार आहे. त्यानेच तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रवृत्त केले. तुमच्या चलबिचल होणा-या मनाला संयमीत ठेवून पुढे पाऊल टाकण्याची प्रेरणा दिली.म्हणून आत्मविश्वासाला कधीही ढळू देऊ नये. हे सर्व सामान्यपणे जीवन जगणा-या माणसाने ठरवले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हिऱ्याची पारख* थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !! राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत." तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे." आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय" राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे" सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !! सारांश जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !! *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. वाजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/06/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८३ - सॅली राइड पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री झाली. २०१३ - भारताच्या उत्तराखंड राज्यात मुसळधार पाउस पडून मंदाकिनी व अलकनंदा नद्यांना महापूर. शेकडो मृत्युमुखी, हजारो बेघर 💥 जन्म :- १८१८ - जेरोम कार्ल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९३२ - डडली आर. हर्शबाख, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९६४ - उदय हुसेन, इराकी नेता. 💥 मृत्यू :- १९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार या मासिकाचे संपादक. १९७१ - पॉल कारर, स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, मराठी साहित्यिक २००३ - जानकीदास, भारतीय चरित्र अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एम्स रुग्णालयात घेतली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - पुरग्रस्त राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल - पंतप्रधान, नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला नितीश कुमार यांचा पाठिंबा बिहारलाही विशेष राज्याचा दर्जा देण्याची केली मागणी* ----------------------------------------------------- 4⃣ *इंजिनियरिंग प्रवेश अर्ज भरण्यासाठी २३ तारखेपर्यंत मुदत वाढ* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई: काही तासांच्या विश्रांतीनंतर दक्षिण मुंबई आणि परळ भागात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली- केजरीवालाबरोबर उपोषणाला बसलेल्या सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात केलं दाखल, उपोषणामुळे प्रकृती बिघडली* ----------------------------------------------------- 7⃣ *फिफा वर्ल्डकप २०१८: जगज्जेत्या जर्मनीला मेक्सिकोने 1-0 ने हरवले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागरूक पालक हेच मालक* मनुष्याच्या जीवन विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे मनुष्य सुसंस्कारी, सदाचारी आणि शीलवान बनतो. शिक्षणामुळे त्याला जीवन जगण्याची एक नवी दृष्टी मिळते. ज्याच्या आधारावर तो स्वतःचा विकास तर करतोच शिवाय........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_61.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नीरजा* आज आपल्या पैकी खुप जणांना "नीरजा भनोत" कोण हे ही माहीत नसेल. "नीरजा भनोत" ही एक भारतीय विरांगना होती जीने 1986 साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचवीले .आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची "अशोक चक्र" हां वीरता पदक मिळविनारी भारतीय ठरली होती. पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगणेला विसरून गेले. नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी. 5 सप्टेम्बर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात 400 प्रवासी होते. निरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते. विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली. त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले. निरिजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यां पर्यंत पोहोचविले. निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन निरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या. अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तिन जणांना मारून टाकले. निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला. निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तीचा अंत झाला . 17 तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवुन निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला. निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला. त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे. भारताने निरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले. पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हां सर्वोच्च पुरस्कार दिला. अमेरिकेने जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड हां वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले. खरच, नीरजच्या बहादुरीला आणि तिच्या समयसूचकतेला विसरून चालणार नाही. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ औरंगाबाद* 📱 9403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील, तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= १) भारतात पहिल्यांदा कधी आणीबाणी जाहीर केली होती? १९६२ २) आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी असतो? २१ जून ३) पहिला फॅक्टरी अँक्ट कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला? लॉर्ड रिपन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनंत उत्तरवार, सहशिक्षक, माहूर 👤 उद्धव भाईवाल 👤 कवी गंगाधर हरणे, वसमत 👤 भीमराव रुद्रवाड 👤 वैभव कुमारे, पांगरी 👤 सुनील लोखंडे 👤जयदीप वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *आंधळी भक्ती* काही भक्तांची खुपच आंधळी भक्ती असते आंधळ्या भक्तिवाल्यांना कधीच मुक्ती नसते आंधळ्या भक्तिवाले फार लवकर फसतात फसल्याचे कळाले की क्लेश करत बसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृषिसंस्कृतीत सापाला अनन्य स्थान आहे. वावरात साप दिसला की तो आपला राखणदार आहे, असं लोकमानस मानतं. शेतक-याची संपत्ती म्हणजे त्याचं शेत आणि कुठल्याही संपत्तीचं; विशेषत: गुप्तधनाचं साप राखण करतो, अशी लोकांची भाबडी श्रद्धा असते.* *काया वावरात सरप ताजातुजा* *मारू नको बापा पुरवधीचा राजा* *अशी लोकवाङमयाची शिकवण असते. शेतक-यांच्या आणि सापांच्या कितीतरी लोककथा आहेत. सापाला पुरूषतत्वाचे प्रतिक मानतात. त्यामुळेच वारूळस्थ नागाची पूजा करतात. पृथ्वी स्त्रीरूप आणि साप पुरूषरूप.. त्यांच्या संयोगातून समृद्धी नांदते अशी लोकसमजूत असते. मुळात साप शेतीचा सहाय्यक म्हणून रक्षणकर्ता असतो, पण तो राखणदार असतो ही लोकश्रद्धा. काही का असेना पण वावरातील सापाला सहसा मारत नाहीत. तो शेतीला उपद्रवी उंदरांसारख्या प्राण्यांचा नाश करतो म्हणून शेतक-यांचा मित्र असतोच.* *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दूध तापविल्यानंतरच दूधापासून अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात आणि त्याचा खाण्याचा मनसोक्त आनंद सारेजण घेतात.त्याचप्रमाणे परोपकारी माणसांचेही तसेच आहे.ते स्वत:च्या जीवनाचा कधीच विचार करत नाहीत.त्यांचे जीवन म्हणजे एक ज्ञानकुंडच असते.ते नेहमी आपल्याकडून जे जे काही इतरांना देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करत असतात.ज्या आपल्या देण्याने इतरांना आनंद आणि समाधान मिळेल.परार्थासाठी दूधाप्रमाणे आपले जीवन समर्पित करीत असतात.ते कधीही मी केले आहे,माझ्यामुळेच शक्य झाले आहे असे म्हणत नाहीत किंवा म्हणूनही दाखवत नाहीत. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समुद्र* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चुकीची कबुली* " एक बैल जंगलात चरण्यासाठी जात असे. त्या जंगलात जवळच गवताळ कुरण होते तिथे बैल चरत होता. त्याच्या नकळत एक सिंह त्याच्यवर लक्ष ठेऊन होता. लांबवर एका झुडपाच्या मागे लपून सिंह, बैल शिकारीच्या टप्यात येण्याची वाट बघत होता. सिंहाने बैलावर हल्ला केला पण बैलाने संधी साधून सिंहच्या तावडीतून स्वताची कशीबशी सुटका करून घेतली. बैल एका गुहेत आश्रयासाठी पळून गेला. या गुहेचा वापर मेंढपाळ स्वतासाठी आणि मेंढयांसाठी करीत असत. जोरदार पाउस किंवा वादळवारे सुटलेल्या मेंढपाळ मेंढ्यांना या गुहेत नेत असत. बैल गुहेत शिरला तेव्हा त्या गुहेत एक बोकड राहिलेले होता. गुहेत बैल आलेला पाहून बोकड रागावला. आपल्या ताकतीची पर्वा न करता तो बैलाच्या अंगावर धावून गेला. आपल्या छोठ्याशा शिंगांनी बैलाला जखमी करण्याचा तो प्रयत्न करू लागला. बैल त्याला काहीच प्रतिकार करत नव्हता. गुहेच्या बाहेर सिंह उभा आहे हे माहीत असल्यामुळे बैलाने त्याला प्रतिकार केला नाही. बैल बोकडाला म्हणाला ,मी तुला घाबरत आहे असे तू वाटू देऊ नको. तू मनातही असा विचार अनु नकोस. ज्या क्षणी सिंह गुहेच्या दारापासून निघून जाईल त्या क्षणी मी तुला आयुष्यभर लक्षत राहील असा धडा शिकवेन . बोकडाला आपली चूक समजली आणि त्याने बैलाची क्षमा मागितली. *तात्पर्य - आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते."* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा. गोजेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
दि.१३-०६-२०१८ *प्रकाश किरण* उजळून गेल्या दाही दिशा प्रकाश किरणे पसरली अंगणी नवतेजाचा झगमगाने पुलकीत झाली धरणी हिरव्या हिरव्या रानात गिरक्या घाली नभात पानाफुलांचा साजात पक्षी येईल घरट्यात अशी सृष्टी नटलेली प्रकाश किरणांचा तेजाने रंगबिरंगीफुलांच्या सुगंधाने पुलकीत होऊनी सजलेली साज सृष्टीचा पाहता मन होईल हर्षउल्हासित धरणी मायेचा ममतेत होईल सारे नतमस्तक 〰〰〰〰〰〰 ©✍प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/06/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ६६७: वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. १८४४: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट. 💥 जन्म :- १८७८: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट १८९८: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर 💥 मृत्यू :- १५३४: योगी चैतन्य महाप्रभू १९३१: अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर १९७९: कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- जामा मशीदचे शाही इमाम यांनी ईद 16 जूनला साजरी करण्याची केली घोषणा, देशात कोठेही काल दिसला नव्हता चंद्र.* ----------------------------------------------------- 2⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पणजीत दाखल* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबईकरांचं पिण्याचं पाणी महागलं, पाणीपट्टीत आठ टक्क्यांची वाढ.* ----------------------------------------------------- 4⃣ *छत्तीसगड: पंतप्रधान नरेंद्र मोदींची भिलाई स्टिल कारखान्याला भेट* ----------------------------------------------------- 5⃣ *दिल्ली: अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह घेणार महत्त्वपूर्ण बैठक. २८ जूनपासून यात्रेला होणार सुरुवात.* ----------------------------------------------------- 6⃣ *एकविसाव्या फिफा विश्वचषकाला कालपासून सुरुवात, जगभरात फुटबॉल ज्वर शिगेला* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत वि अफगाणिस्तान कसोटी- मुरली विजयचं शानदार शतक. कसोटी कारकीर्दीतील 12 वं शतक.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक-विद्यार्थी संबंध वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सिद्धिविनायक (सिद्धटेक) सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती. इतिहास पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते. मंदिर मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते. भौगोलिक श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे. • सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर होड्या चालू असतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात. • दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे • पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. *संग्राहक* *राजेंद्र महाजन वेरुळ* 📱 9403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= *" फ्रेश सुविचार "* =========ஜ۩۞۩ஜ========= निवडलेला रस्ताच सुंदर असेल, तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणी असो वा नसो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= १) मँग्नीजचं सर्वात जास्त उत्पादन कोणता देश घेतो? रशिया २) विंध्याचल किंवा सातपुडा पर्वतरांगांमधून वाहणारी नदी कोणती? नर्मदा ३) आग्रा शहराची स्थापना कुणी केली? सिकंदर लोदी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनिल कांबळे, सहशिक्षक, नांदेड 👤 चंद्रकांत दुडकावार, सहशिक्षक, देगलूर 👤 दिगंबर मरकंटे, सहशिक्षक, बिलोली 👤 गणपतराव कात्रे, जेष्ठ शिवसैनिक, धर्माबाद 👤 किरण अन्नमवार, देगलूर 👤 आनंद पाटील,सहशिक्षक, धर्माबाद 👤 माधव उरेकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 संजय गैनवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 संजय नोमुलवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गोकूळ दुधारे सहशिक्षक प्रा.शा.तिसगाव कें.गल्लेबोरगाव ता.खुलताबाद जि.औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *विचार* दुस-याच्या विचारात लोक वेळ घालवतात कोणाला काय वाटेल स्वतःशीच बोलतात कोणाला काय वाटतं यापेक्षा स्वतःला काय पटतं ते पहावं रिकामे विचार करण्यापेक्षा आपलं आपण आनंदात रहावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *वंश टिकला तरच आपल्याला अन्नपान मिळत राहील, ही पितरांची काळजी कालिदासने 'शाकुंतल' मध्ये व्यक्त केली आहे. राजा दुष्यंतास मूल नसल्याने त्याची पितरे दुष्यंताच्या मृत्यूनंतर आपल्याला पिंडदान कोण करणार ? या विचाराने रडवेली होत. राजाने अर्पण केलेल्या जलाने आपले अश्रू धुवून मग उरलेले जल ती प्राशन करीत. अशा परिस्थितीत धार्मिकदृष्या बघितले तरी पितरे आपले वाईट करतील असा विचार करणे तितकेसे योग्य नाही. उलट त्यांच्याबद्दल आदरभाव राखला जावा.* *कुटुंबातील हयात ज्येष्ठांचा आदर करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आपले आई-वडिल जिवंत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अगर त्यांचा अपमान करणे, त्यांची काळजी न घेणे आणि मृत्यूनंतर मात्र पितरांचा त्रास होऊ नये म्हणून निरनिराळी कर्मकांडे करणे व्यर्थ होय. मातृदेवो भव:, पितृदेवो भव: असा उपदेश आपल्या संस्कृतीने केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करायचे, हे तर्कसंगत नाही. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, ज्येष्ठांचा आदर करणे सर्वात महत्वाचे आहे. अर्थातच ज्यांची कोणाची श्रद्धा असेल तर त्याने श्राद्धकर्मे जरूर करावीत.* •◆● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●◆• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात प्रत्येकजन कशानं कशाची मनात कोणती ना कोणती आशा ठेवून जगत असतो आणि त्या आशेमुळे काही ना सफल होईपर्यंत प्रयत्नही करत असतो. पण प्रत्येकवेळी त्यात यशस्वी होतोच असे नाही.अपयश आले तरी ते यश मिळवण्यासाठी प्रयत्नवादी असावे.निराश किंवा हताश होऊन चालणार नाही.प्रयत्नामध्ये सातत्य,आपल्या हाती घेतलेल्या कामावर ठाम विश्वास,मनाची एकाग्रता आणि आपल्यासमोर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर काम केले तर आपल्या मनातली असणारी प्रबळ इच्छा नक्कीच पूर्ण होईल.केवळ हातपाय न हलवता किंवा कोणतेही ध्येय आपल्यासमोर नसेल तर आपल्या जीवनात आशेच्याऐवजी पदरात घोर निराशा पडल्यावाचून राहणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुरक्षा* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मुंग्याची शिकवण* उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?' तात्पर्य: ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *🌺 जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 *जगातील सर्व माणसं सुखासाठी धडपडतात.अनेक संकटांना तोंड देतात.कधी हरतात ,तर कधी जिंकतात. जिंकण आणि हरणं हे शेवटी एका क्षणाचं असतं.हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस अंतर्मुख होऊन विचार करतो.* *आपल्या आत्मयाचा आवाज परमात्मयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो देवापुढं काही मागणं मागतो.अस मागण म्हणजे तो प्रार्थना करतो.* smt.pramilatai senkude. *या प्रार्थनारुपी हाकेतून आत्म्याची निश्चित उत्कंठा करतो.प्रार्थना ही पण दोन प्रकारे केली जाते.सकाम आणि निष्काम प्रार्थना.जेव्हा आपण देवापुढ काही मागतो ते सकाम प्रार्थना आणि जेव्हा आपलं काही देवापुढ मागणं नसतं आहे त्यात समाधान मानने असते ही झाली निष्काम प्रार्थना.* *प्रार्थना ही धैर्य आणि आत्मबलाची जननी आहे.आपले जैविक आणि आत्मबल वाढविण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत* *आहे.स्वार्थारहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना होय.* *संत तुकाराम महाराज म्हणतात , 'न लगे मुक्ती धनसंपदा ' संत तुकाराम महाराजांनी देवापुढं मुक्ती मागितली नाही तर भक्ती मागितली.ईश्वराविषयीचा उत्कट प्रेमातून प्रार्थना जेव्हा जन्म घेते तेव्हा ती खरीखूरी भक्तीमय प्रार्थना असते.*👏🙏 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in *🙏शब्दांकन/संकलन🙏* ✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) सह.शिक्षिका जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
*मावळतीचा दिस* मावळतीचा दिस आजही नेहमीप्रमाणेच भेटला शांत रुप त्याचे समाधानी हसला मावळतीचा दिस आजही भेटला............. स्तब्ध होती सृष्टी सारी गगनी घाले पक्षी भरारी क्षितीजाला टेकणारी सूर्यकिरणे होती अंबरी मावळतीचा दिस आजही भेटला.......... आतुरतेने बळीराजा पावसाची वाट बघण्यात आयुष्यातील अंतःसमयी जगण्यात,अनाथ अपंग, वृद्धांचे दुःखही जाणण्यास मावळतीचा दिस आजही भेटला...... हरवलेल्या निळाईत ओथंबलेल्या नजरेत स्थिरावलेल्या नयनात तेजाच्या वलयात मावळतीचा दिस आजही भेटला........... सृष्टीचा वात्सलेत वृक्षाच्या पर्णात पावसाच्या थेंबात धरतीचा सुगंधात मावळतीचा दिस आजही भेटला............ 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) नांदेड.
दि.१३-०६-२०१८ *प्रकाश किरण* उजळून गेल्या दाही दिशा प्रकाश किरणे पसरली अंगणी नवतेजाचा झगमगाने पुलकीत झाली धरणी हिरव्या हिरव्या रानात गिरक्या घाली नभात पानाफुलांचा साजात पक्षी येईल घरट्यात अशी सृष्टी नटलेली प्रकाश किरणांचा तेजाने रंगबिरंगीफुलांच्या सुगंधाने पुलकीत होऊनी सजलेली साज सृष्टीचा पाहता मन होईल हर्षउल्हासित धरणी मायेचा ममतेत होईल सारे नतमस्तक 〰〰〰〰〰〰 ©✍प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*शाळा प्रवेश घोषवाक्ये* 👫👫👫👫👫👫 १)ताई ,माई याहो शाळेत बालकास आणा ओ २) ज्ञानवृंद्धीगत करुया शाळेचा अभिमान वाढूया ३) छान छान आमची जि.प.शाळा बालकास लागेल इथे लळा ४) हसत खेळत बागडूनी घेऊया शिक्षण आनंदानी ५) शिक्षणाचे महत्त्व जाणूया बालकाचे भवितव्य घडूया ६) गाव,शाळा परिसर स्वच्छ ठेवूया सुजाण भारताचे नागरीक घडूया ७) शाळेत रोज जाणार नव्या शतकाकडे वळणार ८) विज्ञानाची कास आपण धरु तंत्रज्ञानाचा वापर करु ९) ध्येय आपले एकच असावे बालकं रोज शाळेत दिसावे १०) तनमनधनाने कार्य करु प्रगत महाराष्ट्र साकार करु. 〰〰〰〰〰〰〰👫👫👫👫👫 ✍ ©प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*मावळतीचा दिस* मावळतीचा दिस आजही नेहमीप्रमाणेच भेटला शांत रुप त्याचे समाधानी हसला मावळतीचा दिस आजही भेटला............. स्तब्ध होती सृष्टी सारी गगनी घाले पक्षी भरारी क्षितीजाला टेकणारी सूर्यकिरणे होती अंबरी मावळतीचा दिस आजही भेटला.......... हरवलेल्या निळाईत ओथंबलेल्या नजरेत स्थिरावलेल्या नयनात तेजाच्या वलयात मावळतीचा दिस आजही भेटला........... सृष्टीचा वात्सलेत वृक्षाच्या पर्णात पावसाच्या थेंबात धरतीचा सुगंधात मावळतीचा दिस आजही भेटला............ 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*🙏 मायेची उब*🙏 मातेच्या ममतेत सारे देवगण न्हाऊन गेले जन्माला येण्यास तिच्या पोटी सारे धरञीवर आले अशी मायेची ममता काय वर्णु मी तिची गाथा तिचा संगे हो राहता स्वर्गही फिका भासे मज आता माऊली तुझ्या चरण स्पर्शाची उणीव भासते क्षणाक्षणात तुझ्या आठवणीने कंठ ही दाटते किती झिजली तुझी काया दिलास तु आधार चौफेर तुझ्या यातनाला नाही तोड तु नाही जगी जरी या प्रेमस्वरूप वात्सल्याचा सिंधू आहेस माता तू ठेवीला चरणी माता तुझ्या आशीर्वाद दिलास तू जगी या सर्वश्रेष्ठ आहेस तु माऊली तुझ्याच आशीर्वादाची मिळाली मज सावली 〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰 🙏🙏🙏🙏🙏🙏
*महाराष्ट्र दिनानिमीत्त काव्य* महाराष्ट्र आहे माझा पराक्रमाची खाण त्यातच आहे जीव माझा तोच माझा अभिमान .. वार झेलले कित्येकांनी आपल्या छातीवरती... असेच वीर जन्मले या महाराष्ट्राच्या भुमीवरती.. महाराष्ट्र आहे माझी शान साधूसंताची भूमी महान अभिमानाने गातो आम्ही शिवरायांचे गुणगाण.... पुण्यभूमीत महाराष्ट्राचा कृष्णा कोयना गोदावरी संगम आहे नद्यांचा... गंगा ,जमूना कावेरी.. सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमतो पराक्रमाचा आवाज शिवरायांचे मावळे आम्ही महाराष्ट्राचा ताज... 〰〰〰〰〰〰 ✍प्रमिलाताई सेनकुडे हदगाव (जिल्हा नांदेड)
*किमया* नभात इंद्रधनूसंगे भास्कर खेळते रंगाची किमयासारी तेजांकित भासते प्रभातकाळी विहंग मिळे संध्याकाळी न्याहाळावे मावळतीचे सुरेल रंग फुलवूनी मनोमनीचे काजवे इंद्रधनूचा सप्तसूरात व्यापून टाकु जीवन आपुले वसुंधरेचा प्रितीत फुलवून टाकु जीवन आपुले धरञीचीही संगत न्यारी सकल जणांना जीवन देऊनी शांतताही सारी इंद्रधनुचा रंगाचीही किमया भारी 〰〰〰〰〰〰〰 ✍प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/04/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९१६: होम रुल लीगची स्थापना झाली. 💥 जन्म :- १९३१: लेखक मधु मंगेश कर्णिक 💥 मृत्यू :- १९९२: ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *UPSC चा निकाल जाहीर, उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीष बदोले यांचा महाराष्ट्रातून पहिला, तर देशात विसावा क्रमांक* ----------------------------------------------------- 2⃣ *डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात 20.6 टक्के वाढ; उद्योग समूहाचा एकूण नफा 36,075 कोटी* ----------------------------------------------------- 4⃣ *९८ वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन मुलुंडमध्ये होणार; १३ ते १५ जून कालावधीत संमेलन होणार* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली पाठोपाठ छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान.* ----------------------------------------------------- 6⃣ *जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाकडून घेण्यात आलेल्या कथा आणि काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर, कथा स्पर्धेत नागोराव येवतीकर यांच्या प्रामाणिक वसंता या कथेला प्रथम पारितोषिक* ----------------------------------------------------- 7⃣ *IPL 2018 : दिल्लीचा कोलकात्यावर 55 धावांनी विजय* ----------------------------------------------------- *विशेष सूचना - शाळेला सुट्या लागल्यामुळे उद्यापासून दिनांक 15 जूनपर्यंत ही सेवा उपलब्ध होणार नाही. याची सर्व वाचक मित्रांनी नोंद घ्यावी.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परावलंबी जीवन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जळगाव* जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते., ही शेती भारतातील इतर शेतकर्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर,अंजनी प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची हा जिल्हा ही कर्मभूमी होती. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) लाल बहादुर शास्त्री यांची समाधि कोठे आहे ?* 👉🏼 विजयघाट *२) भारतात हरितक्रांति चे जनक कोणास म्हटले आहे ?* 👉🏼 एम. एस. स्वामीनाथन *३) शेवटचे मुगल शासक कोण होते ?* 👉🏼 बहादुर शाह जफर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागेश चिंतावार, प्राथमिक शिक्षक सचिव, भास्कर पतपेढी, नायगाव 👤 गौतम वाघमारे 👤 विवेक बैसकर 👤 नामदेव पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *पारदर्शकता* पारदर्शकता म्हणतात ती खरंच असते का? पारदर्शकता म्हणतात ती तिथं असते का? पारदर्शक म्हटले तरी त्यावर आळ असतो खरंच पाहिलं तर तिथे ही घोळ असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'गुरू' हे जन्मालाच यावे लागतात, त्यांच्याकडे गुरूपदाला पोहचण्याची विद्वत्ता असते, पात्रता असते. धर्माचरण कडक पाळण्याची त्यांची दक्षता असते. अशा गुरूंच्या वाणीला सामर्थ्य आलेले असते, त्यांना अपरोक्षज्ञान प्राप्त असते. सतत ईश्वराच्या नामस्मरणामुळे मन:शांती असते. शरीरात वास करीत असलेल्या ईश्वराला कसलाच त्रास होऊ नये म्हणून कडक शुचिर्भूतता पाळलेली असते. गुरूंनी तर, ज्या शरीरात ईश्वराचे वास्तव्य आहे त्या शरीराला वस्त्रांचाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने वस्त्र परिधान केलेली असत.* *'गुरू' मानणे हे कोणाला कमीपणाचे वाटत असेल तर तो माणूस कधीच शिक्षणास पात्र होऊ शकत नाही. आपल्याकडे 'गुरूशिष्य' परंपरा महान आहे, आणि गुरूप्रती विनम्र भाव ठेवल्यास गुरू प्रसन्न होऊन त्यांच्याकडचे ज्ञानभांडार शिष्यांपुढे मोकळे करतात. जे जे म्हणून गुरूपदी पोहचले ते सर्व आधी उत्तम शिष्य झाले आणि नंतर गुरूपदी पोहचले. असे काही गुरूशिष्य पाहाताना ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार होतो.* ••●🥀‼ *रामकृष्णहरी* ‼🥀●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= देशाच्या सीमेवर लढणारा जवान कधीच मागे वळून पाहत नाही. कारण मागे आपण सुरक्षित आहोत हे त्याला माहीत असते. धोका आहे फक्त समोर. समोरच्या शत्रूला आपण कसे नष्ट करू हाच विचार सदैव त्याच्या समोर असतो. जर का आपण थोडे जरी दूर्लक्ष केलो तरी आपण आपला जीव गमावू शकतो म्हणून तो समोर येणा-या संकटाला डोळ्यात तेल घालून जागत असतो. ज्याप्रमाणे सीमेवरच्या जवानाचे आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यपणे जीवन जगणा-या माणसांचेही आहे. जीवनात समोर येणारे कोणतेही संकट सांगून थोडेच येणार आहे ? मग ते आर्थिक असो, कौटुंबिक असो किंवा अजून कोणतेही असो. यांना आपण कसे तोंड देता येईल आणि बाजूला कसे दूर करता येईल याची जर सावधानता बाळगली तर कोणतीही काळजी करायची गरज नाही. मागे गेलेल्या काळाला पहायची गरज नाही परंतु येणा-या काळाला जर आपण दक्ष राहिले तर कोणतेही संकट निश्चितच दूर होऊ शकते आणि जीवन सुखावह होऊ शकेल. हा विचार नेहमी माणसाने सातत्याने करायला पाहिजे आणि त्यासाठी माघार न घेता सतर्क राहायला शिकले तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/8087917063. ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *ओळखीचे चार जीवे न सोडी* - ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृती* एका गावात एक गरीब माणूस राहत होता शिक्षण नाही त्यामुळे कोणते चांगले कामही मिळत नव्हते, तो भिक्षा मागून आपले पोट भरत होता. एके दिवशी त्याला भिक्षेच्या रुपात तांदूळ मिळाले, तांदूळ त्याला फार दिवसांनी मिळाले होते. तो फार आनंदी होता. दुसऱ्या एका घरातून त्याला भाकरी आणि भाजी मिळाली. त्याने ती भाजीभाकरी खाल्ली आणि तांदूळ एका मडक्यात भरून भिंतीला असलेल्या खुंटीला अडकवून ठेवले. तो खाटेवर पडून आराम करू लागला.मडक्याला पाहून तो विचार करू लागला, त्यात आज तांदूळ आहेत. उद्याही तांदूळ मिळाले तर मडके अर्धे भरून जाईल, आणि असे जर तांदूळ मिळताच राहिले तर काही दिवसातच मडके तांदळाने भरून जाईल.मग आपण तांदळासाठी अशी ४-५ मडकी करू. २-३ महिन्यानंतर एक लहान पोतेभर तांदूळ जमा झाले कि ते तांदूळ आपण विकून टाकू. त्यातून पैसा मिळेल मग आपण अजून तांदूळ खरेदी करू ते जास्त भावाने विकू त्यात पैसा मिळेल असे करता करता आपल्याला भरपूर पैसा मिळू लागेल. पैसा जमा झाला कि आपण लग्न करू, मग मुले होतील, ती सुंदर आणि खोडकर असतील. मुलांना मी चांगले संस्कार करेन, त्यांनी जर ऐकले नाही तर तर त्यांना लाथ मारेन, असे विचार करत असताना त्याने खरोखरीच एक लाथ हवेत मारली आणि त्याच्या दुर्दैवाने ती लाथ तांदळाच्या मडक्याला बसली. त्याबरोबर ते मडके लाथेने हवेत भिरकावले गेले आणि मडके खाली पडून फुटले. त्यातील सगळे तांदूळ घरात साचलेल्या घाणेरड्या जागेत पडले. त्यासोबतच त्याचे स्वप्न भंग पावले. *तात्पर्य-कृती महत्वाची आहे. कृती आणि विचार यात जर साम्य नसेल तर हानी होते. जे विचारात आहे तेच कृतीत असायला हवे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/04/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले. १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले. 💥 जन्म :- ५७०: इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर. (अनिश्चित) १४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य १५६४: इंग्लिश नाटककार आणि अभिनेता विल्यम शेक्सपिअर 💥 मृत्यू :- १९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन १९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू १९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यातील आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यामध्ये यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश.* ----------------------------------------------------- 2⃣ *विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील २४ बोगस विद्यापीठांची नावे केली जाहीर, त्यात महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश* ----------------------------------------------------- 3⃣ *आसाराम बापूसह तीन आरोपींना जोधपूर कारागृह विशेष कोर्टाने ठरवलं दोषी. कोर्टानंं सुनावली जन्मठेपेची शिक्षा* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - भारताने जागतिक बँकेसोबतच्या 125 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर केली स्वाक्षरी.* ----------------------------------------------------- 5⃣ *बीसीसीआयकडून स्मृती मानधाना आणि शिखर धवनची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस.* ----------------------------------------------------- 6⃣ *आयपीएल 2018: गौतम गंभीरनं सोडलं दिल्ली डेअरडेव्हिल्सचं कर्णधारपद ; श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद* ----------------------------------------------------- 7⃣ *महिला क्रिकेट विश्वचषक 2019 : 30 मेपासून स्पर्धेला सुरुवात, इंग्लंड आणि द. आफ्रिकेत पहिला सामना* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी - ग्रामीण बँक कर्मचाऱ्यांना 3 महिन्याच्या आत पेंशन योजना लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहित्यसेवा हेच खरे साहित्यिकांचे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नांदेड* नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, मान्याद व पैनगंगा. नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), बिलोली येथे मशिद, कंधारचा भुईकोट किल्ला, लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, सहस्रकुंडचा धबधबा किनवट तालुका, देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल), नांदेडचा किल्ला व मुखेड येथील वीरभद्र शिवमंदिर प्रसिद्ध आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ‘स्वतचा अहंकार चेपणे व दुसऱ्याचा अहंकार जपणे’ ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली.’ *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एकपेशीय कवकांना काय म्हणतात ?* 👉 किण्व *२) एल. पी. जी. (LPG) मध्ये कोणते घटक असतात ?* 👉 ब्युटेन आणि आयसोब्युटेन *३) कोणत्या शहरात वायुगळतीमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले ?* 👉 भोपाळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक 👤 विद्या बायस ठाकूर, साहित्यिक 👤 प्रदीप खपाटे बन्नाळीकर 👤 महेश शिटोळे 👤 गणेश मोतेवार, धर्माबाद 👤 रवी पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसत ते* वरवर दिसत ते सारं खरं नसतं खोलात जाण्या पेक्षा वरवर बरं असतं जास्त खोलात गेलं की नको ते सारं कळतं आपुलकी आपलेपण सारं खुप दूर पळतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* 🍀 *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀 ⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कलाकाराच्या जीवनात कितीही सुखदु:खाचे चढ उतार असलेतरी तो प्रेक्षकांना निखळ आनंद देतो.तो आपले दु:ख कधीच सांगत नाही.तो इतरांच्या जीवनात असलेले थोडेबहुत दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करण्याचे काम करतो.ही देखील एक सेवाच आहे. आपणही त्याचपद्धतीने आपापल्या परीने इतरांच्या जीवनातले दु:ख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केल्यासआपल्यालाही आत्मिक समाधान मिळते. काही तरी आपल्या जीवनात एक चांगले काम केल्याचे समाधान वाटेल.आपणही आपल्या जीवनाचे कलाकार आहोत.फक्त कोणती कला कुठे आणि कशी उपयोगात आणावी यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.आपले दु:ख सांगण्यापेक्षा इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.ही देखील एक सेवाच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उधारीचे पोते सव्वाहात रिते* - उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मिळकतीचे व्यवस्थापन* एकदा धर्मपुर नगराचा राजा सोमसेन शिकारीवरून परतत असताना काही कारणाने आपल्या सर्व साथीदारापासून रस्ता चुकला आणि वेगळ्याच रस्त्याला लागला. जंगलातून रस्ता काढत काढत तो नगराच्या दिशेने वाटचाल करू लागला. रस्त्याने चालत असताना त्याला एक माणूस खांद्यावर कु-हाड घेवून व तोंडाने बासरी वाजवत चाललेला दिसून आला. तो माणूस हि नगराच्या दिशेने चाललेला होता तेंव्हा राजाने त्याच्यासोबत जाण्याचे ठरविले. दोघांनी एकमेकांशी संभाषण सुरु केले. राजाने त्या माणसाला विचारले,"तू कोण आहे?, तुझा व्यवसाय काय? आणि तू जे काही मिळवतो त्यात तू खुश आहे आहे काय?" त्या माणसाने उत्तर दिले,"महाराज! मी एक लाकुडतोड्या असून लाकडे तोडण्याचे काम करतो. रोज मला चार रुपये मिळतात. त्यापैकी पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो, दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो, तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो." या म्हणण्याचा अर्थ राजाला काही समजण्याच्या आतच राजाचे सैनिक शोधत तेथे आले व राजा त्यांच्यासोबत निघून गेला. राजाला त्या लाकुडतोड्याचे म्हणणे शांत बसू देईना, त्याने भर दरबारात हा प्रश्न उपस्थित केला,"तो लाकुडतोड्या जे चार रुपये खर्च करतो, ते कसे ते मला सांगा?" कोणालाच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मग राजाने निर्णय घेतला कि त्या लाकुडतोड्याला दरबारात बोलवायचे. राजाने तसा आदेश दिला व दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्याला घेवून सैनिक हजर झाले. लाकुडतोड्या आलेला दिसताच राजा सोमसेन त्याला म्हणाला,"तुझ्या धनाचे तू जे व्यवस्थापन करतो ते कसे ते मला सांग? मला काल काहीच कळले नाही." लाकुडतोड्या हसून म्हणाला, "महाराज! पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो म्हणजे मी माझ्या परिवाराचे पोषण करतो., दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांच्यासाठी खर्च करतो., तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो म्हणजे म्हणजे मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जेणे करून ते शिकून माझ्या म्हातारपणी मला सांभाळतील.तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो म्हणजे धर्म, दक्षिणा, दान यात खर्च करतो म्हणजे जेंव्हा मी मरेन त्याचे पुण्य मला मिळेल." राजाने हे उत्तर ऐकताच आनंदित होवून लाकुडतोड्याचा मोठा सन्मान केला आणि मोठे इनाम देवून त्याला त्याच्या घरी पाठविले. *तात्पर्यः आपण कमविलेल्या मिळकतीचा उपयोग कसा करावा त्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे जेणेकरुन सर्वांना लाभदायक होईल.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/04/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले. १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले. 💥 जन्म :- ५७०: इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर. (अनिश्चित) १४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य १५६४: इंग्लिश नाटककार आणि अभिनेता विल्यम शेक्सपिअर 💥 मृत्यू :- १९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन १९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू १९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यातील आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यामध्ये यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश.* ----------------------------------------------------- 2⃣ *विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील २४ बोगस विद्यापीठांची नावे केली जाहीर, त्यात महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश* ----------------------------------------------------- 3⃣ *आसाराम बापूसह तीन आरोपींना जोधपूर कारागृह विशेष कोर्टाने ठरवलं दोषी. कोर्टानंं सुनावली जन्मठेपेची शिक्षा* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - भारताने जागतिक बँकेसोबतच्या 125 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर केली स्वाक्षरी.* ----------------------------------------------------- 5⃣ *बीसीसीआयकडून स्मृती मानधाना आणि शिखर धवनची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस.* ----------------------------------------------------- 6⃣ *आयपीएल 2018: गौतम गंभीरनं सोडलं दिल्ली डेअरडेव्हिल्सचं कर्णधारपद ; श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद* ----------------------------------------------------- 7⃣ *महिला क्रिकेट विश्वचषक 2019 : 30 मेपासून स्पर्धेला सुरुवात, इंग्लंड आणि द. आफ्रिकेत पहिला सामना* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी - ग्रामीण बँक कर्मचाऱ्यांना 3 महिन्याच्या आत पेंशन योजना लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहित्यसेवा हेच खरे साहित्यिकांचे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नांदेड* नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, मान्याद व पैनगंगा. नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), बिलोली येथे मशिद, कंधारचा भुईकोट किल्ला, लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, सहस्रकुंडचा धबधबा किनवट तालुका, देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल), नांदेडचा किल्ला व मुखेड येथील वीरभद्र शिवमंदिर प्रसिद्ध आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ‘स्वतचा अहंकार चेपणे व दुसऱ्याचा अहंकार जपणे’ ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली.’ *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एकपेशीय कवकांना काय म्हणतात ?* 👉 किण्व *२) एल. पी. जी. (LPG) मध्ये कोणते घटक असतात ?* 👉 ब्युटेन आणि आयसोब्युटेन *३) कोणत्या शहरात वायुगळतीमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले ?* 👉 भोपाळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक 👤 विद्या बायस ठाकूर, साहित्यिक 👤 प्रदीप खपाटे बन्नाळीकर 👤 महेश शिटोळे 👤 गणेश मोतेवार, धर्माबाद 👤 रवी पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसत ते* वरवर दिसत ते सारं खरं नसतं खोलात जाण्या पेक्षा वरवर बरं असतं जास्त खोलात गेलं की नको ते सारं कळतं आपुलकी आपलेपण सारं खुप दूर पळतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* 🍀 *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀 ⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कलाकाराच्या जीवनात कितीही सुखदु:खाचे चढ उतार असलेतरी तो प्रेक्षकांना निखळ आनंद देतो.तो आपले दु:ख कधीच सांगत नाही.तो इतरांच्या जीवनात असलेले थोडेबहुत दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करण्याचे काम करतो.ही देखील एक सेवाच आहे. आपणही त्याचपद्धतीने आपापल्या परीने इतरांच्या जीवनातले दु:ख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केल्यासआपल्यालाही आत्मिक समाधान मिळते. काही तरी आपल्या जीवनात एक चांगले काम केल्याचे समाधान वाटेल.आपणही आपल्या जीवनाचे कलाकार आहोत.फक्त कोणती कला कुठे आणि कशी उपयोगात आणावी यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.आपले दु:ख सांगण्यापेक्षा इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.ही देखील एक सेवाच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उधारीचे पोते सव्वाहात रिते* - उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मिळकतीचे व्यवस्थापन* एकदा धर्मपुर नगराचा राजा सोमसेन शिकारीवरून परतत असताना काही कारणाने आपल्या सर्व साथीदारापासून रस्ता चुकला आणि वेगळ्याच रस्त्याला लागला. जंगलातून रस्ता काढत काढत तो नगराच्या दिशेने वाटचाल करू लागला. रस्त्याने चालत असताना त्याला एक माणूस खांद्यावर कु-हाड घेवून व तोंडाने बासरी वाजवत चाललेला दिसून आला. तो माणूस हि नगराच्या दिशेने चाललेला होता तेंव्हा राजाने त्याच्यासोबत जाण्याचे ठरविले. दोघांनी एकमेकांशी संभाषण सुरु केले. राजाने त्या माणसाला विचारले,"तू कोण आहे?, तुझा व्यवसाय काय? आणि तू जे काही मिळवतो त्यात तू खुश आहे आहे काय?" त्या माणसाने उत्तर दिले,"महाराज! मी एक लाकुडतोड्या असून लाकडे तोडण्याचे काम करतो. रोज मला चार रुपये मिळतात. त्यापैकी पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो, दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो, तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो." या म्हणण्याचा अर्थ राजाला काही समजण्याच्या आतच राजाचे सैनिक शोधत तेथे आले व राजा त्यांच्यासोबत निघून गेला. राजाला त्या लाकुडतोड्याचे म्हणणे शांत बसू देईना, त्याने भर दरबारात हा प्रश्न उपस्थित केला,"तो लाकुडतोड्या जे चार रुपये खर्च करतो, ते कसे ते मला सांगा?" कोणालाच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मग राजाने निर्णय घेतला कि त्या लाकुडतोड्याला दरबारात बोलवायचे. राजाने तसा आदेश दिला व दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्याला घेवून सैनिक हजर झाले. लाकुडतोड्या आलेला दिसताच राजा सोमसेन त्याला म्हणाला,"तुझ्या धनाचे तू जे व्यवस्थापन करतो ते कसे ते मला सांग? मला काल काहीच कळले नाही." लाकुडतोड्या हसून म्हणाला, "महाराज! पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो म्हणजे मी माझ्या परिवाराचे पोषण करतो., दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांच्यासाठी खर्च करतो., तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो म्हणजे म्हणजे मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जेणे करून ते शिकून माझ्या म्हातारपणी मला सांभाळतील.तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो म्हणजे धर्म, दक्षिणा, दान यात खर्च करतो म्हणजे जेंव्हा मी मरेन त्याचे पुण्य मला मिळेल." राजाने हे उत्तर ऐकताच आनंदित होवून लाकुडतोड्याचा मोठा सन्मान केला आणि मोठे इनाम देवून त्याला त्याच्या घरी पाठविले. *तात्पर्यः आपण कमविलेल्या मिळकतीचा उपयोग कसा करावा त्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे जेणेकरुन सर्वांना लाभदायक होईल.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/04/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक मलेरिया दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले. १९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला. २०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. २०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले. 💥 जन्म :- १८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी 💥 मृत्यू :- १९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *ययेत्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठलाचे दर्शन टोकन पद्धतीने, दर्शनाची रांग संपविण्याचा समितीचा प्रयत्न* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताच्या गोळीबारात पाच पाकिस्तानी सैनिक ठार* ----------------------------------------------------- 3⃣ *कोकणवासियांचं हित लक्षात घेऊन नाणार प्रकल्पावर निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांना देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात* ----------------------------------------------------- 6⃣ *भाजी विक्रेतीची मुलगी साताऱ्यातील स्नेहा म्हस्के एमपीएससीत सहावी; आता मंत्रालयात करणार काम* ----------------------------------------------------- 7⃣ *वर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत द. आफ्रिकेविरुद्ध ५ जून रोजी तर पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *रक्तदानाविषयी लोकजागृती ( सामना )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://www.saamana.com/blood-donation/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सांगली* सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे. सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरजतालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जततालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटकसीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे. सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ==== *१) बबालगंधर्व यांचे पूर्ण नाव काय ?* 👉 नारायण श्रीपाद राजहंस *२) जागतिक मलेरिया दिवस केंव्हा साजरी करतात ?* 👉 25 एप्रिल *३) राजमाता जिजाऊचे जन्मस्थान कोणते ?* 👉 सिंदखेडराजा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीकांत जिंदमवार, धर्माबाद 👤 शशांक भरणे 👤 अनिकेत देशमुख, कवी, अकोला 👤 श्रीकृष्ण कतुलवाड 👤 सिध्दोधन कांबळे 👤 राजेश अवधुतवार 👤 गुरुनाथ तुकाराम मालीपाटील 👤 साईनाथ मदनुरकर 👤 चंद्रकांत तनमुदले, येवती 👤 कांतराव राजरवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *कागदी घोडे* सरकारी कामं म्हणजे कागदी घोडे आहेत कागदावर जास्त अन् प्रत्यक्षात थोडे आहेत प्रत्यक्षात कमी कागदावर पक्के आकडे असतात प्रत्यक्षात पाहणाराचे तोंड वाकडे असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्यांच्याशी आपण संगत करातो, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.* *देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर संतसंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ? प्रवासात आपल्या शेजारी विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. "सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. संतसंगतीपासून 'सद्भावना' आणि 'सद्विचार' प्राप्त होतात."* ♻ *॥ रामकृष्णहरी ॥* ♻ ☘☘☘☘☘☘ *--संजय नलावडे, चांदिवली* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की, मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उडत्या पाखराची पिसे मोजणे* - अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ======== *उपयुक्त जीवन* कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. *तात्पर्य-जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌹जीवन विचार*🌹 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 आनंद हा अमृतासमान असतो त्यासाठी दुःखाचे समुद्र मंथन करावे लागते तरच जीवनाचा खरा आनंद उमजतो आणि हा उमजलेला आनंदरुपी आनंद अमृतासमान असतो. आनंद आणि दुःख हे दोन्हीही अविभाज्य असतात.आणि अनेकदा बरोबरच येतात.जीवनात दुःखाशिवाय आनंदाची किंमत कळत नाही.तापलेल्या लोखंडाला हातोड्याचे घाव सहन करूनच मगच त्याला हत्याराचा आकार प्राप्त होतो. जीवनात अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात.आपल्या या जीवनात जीवनरुपी सागरात सुखाचे मोती आणि शिंपलेही आहेत.आनंद हा सर्व सृष्टीत , आपुलकीत कौतुकात, मैत्रीत अशा अनेकविध मध्ये सामावलेला आहे.फक्त तशी दृष्टी हवी. जीवनात सुख दुःखाचा खेळ हा अविरत सुरू असतो. 〰〰〰〰〰〰 ☘☘☘☘☘☘☘ 🙏शब्दांकन / संकलन🙏 ✍ प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/04/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक पुस्तक दिन* 💥 ठळक घडामोडी :- १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली 💥 जन्म :- १८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती 💥 मृत्यू :- १९९२: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात जाणार चीनच्या दौऱ्यावर, 27 आणि 28 एप्रिलला शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - काबूल आणि बगलान येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा भारताने केला निषेध, जखमींवरील इलाजासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन* ----------------------------------------------------- 3⃣ *सावंतवाडी - वेंगुर्लेत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ उंच उंच लाटा समुद्र सुरक्षा रक्षकासह पोलीस वेंगुर्ले बंदरावर दाखल परस्थिती नियंत्रणात* ----------------------------------------------------- 4⃣ *जम्मू-काश्मीर - हंदवादा येथे पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा भांडाफोड, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली - भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात नक्षल- पोलीस चकमकीत 14 नक्षलवादी ठार, आतपर्यंतच्या नक्षलविरोधी अभियानातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : हज यात्रेचे सरकारी अनुदान बंद झाल्यानंतर, प्रथमच होत असलेल्या हज यात्रेला भारतातून यंदा १ लाख ७५ हजार २५ यात्रेकरू जाणार आहेत* ----------------------------------------------------- 7⃣ *मोक्याच्यावेळी केलेल्या चुका महागात पडल्याने पुन्हा एकदा गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हातातील सामना गमवावा लागला, राजस्थानचा रॉयल विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पोशाख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा http://nasayeotikar.blogspot.com/2017/01/dress-code-system.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सांस्कृतिक राजधानी - पुणे* पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे - पुणे तिथे काय उणे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर नैर्ऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. जगप्रसिद्ध पुणे विद्यापीठ पुणे शहरात असून पुण्यास पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि संत तुकारामांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकर्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात. शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= चांगल्या विचारांच्या पुस्तकांनी मस्तक सुधारते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* 👉 व्यंकटेश माडगुळकर *२) फकिरा ही कादंबरी कोणाची ?* 👉 अण्णाभाऊ साठे *३) बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले ?* 👉 पु.ल.देशपांडे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अभिषेक संगम, धर्माबाद 👤 तेजस मार्कंडेय, औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *पुस्तक* सुधारवायचे असेल आपले मस्तक तर नेहमी वाचत राहावे नवनवीन पुस्तक पुस्तकविना कोणी आपला दोस्त नाही त्याशिवाय आपले जीवन मस्त नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृषिसंस्कृतीत सापाला अनन्य स्थान आहे. वावरात साप दिसला की तो आपला राखणदार आहे, असं लोकमानस मानतं. शेतक-याची संपत्ती म्हणजे त्याचं शेत आणि कुठल्याही संपत्तीचं; विशेषत: गुप्तधनाचं साप राखण करतो, अशी लोकांची भाबडी श्रद्धा असते.* *काया वावरात सरप ताजातुजा* *मारू नको बापा पुरवधीचा राजा* *अशी लोकवाङमयाची शिकवण असते. शेतक-यांच्या आणि सापांच्या कितीतरी लोककथा आहेत. सापाला पुरूषतत्वाचे प्रतिक मानतात. त्यामुळेच वारूळस्थ नागाची पूजा करतात. पृथ्वी स्त्रीरूप आणि साप पुरूषरूप.. त्यांच्या संयोगातून समृद्धी नांदते अशी लोकसमजूत असते. मुळात साप शेतीचा सहाय्यक म्हणून रक्षणकर्ता असतो, पण तो राखणदार असतो ही लोकश्रद्धा. काही का असेना पण वावरातील सापाला सहसा मारत नाहीत. तो शेतीला उपद्रवी उंदरांसारख्या प्राण्यांचा नाश करतो म्हणून शेतक-यांचा मित्र असतोच.* ••●🌺‼ *रामकृष्णहरी* ‼🌺●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादे सकस बियाणे जमिनीत टाकले तर त्या बियाणापासून सकस धान्य उपजले जाते हा विश्र्वास बियाणे टाकणा-या शेतक-याला जसे माहित असते. त्याचप्रमाणे एखादा चांगला विचार चारचौघांमध्ये जर रुजला तर त्याच विचारांचे इतरही जनमानसात विचार रुजून एक सशक्त चांगल्या विचारांची पिढी निर्माण होऊन एक चांगला सशक्त समाज नक्कीच निर्माण होऊ शकेल असा चांगला विचार करणा-या विचारवंताला माहित असतो.तो देण्याचा स्वातंत्र्याने प्रयत्न करतो.परंतु एखादा वाईट विचार हा संपूर्ण समाजाला तळागाळापर्यंत पोहचला तर एक चांगली सशक्त पिढी विनाशाकडे नक्कीच जाऊ शकेल.त्यापेक्षा केव्हाही चांगल्या विचारांची कास धरुन आपले जीवन व सामाजिक जीवन समृद्ध करण्यास सहाय्य करावे.यापेक्षा अन्य महामंत्र कोणताच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अहो रूपम अहो ध्वनी* - एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जाणीव स्वत्वाची* एका जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न राहिल्याने आपल्या जमातीतील प्राणी कसे वागतात याचे त्याला ज्ञान नव्हते. एके दिवशी बकऱ्या चरत असताना एक वाघ त्यांना पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बक-या शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वाघाचे पिल्लू पण हिंडत आहे. बकऱ्याना त्या पिल्लाची भीती वाटत नाही म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात वाढलेले आहे हे त्याच्या लक्षात येते. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि गर्जना करतो, त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो तसे ते वाघाचे पिल्लू पण पळायला सुरुवात करते, पण मोठा वाघ त्याला अडवतो आणि म्हणतो," अरे! मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळाल्या हे ठीक आहे. पण तू का पळत आहेस? आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत आहेस? बकऱ्या पळून जाणे साहजिक आहे पण मी थांब म्हंटल्यावर तू थांबला याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला देतो " असे म्हणून मोठा वाघ पिल्लाला घेवून पाण्याजवळ जातो तेथे त्याचे प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातील वाघ असण्याची जाणीव करून देतो. पिल्लाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते व ते आपल्या वाघांच्या समुहात राहायला जाते. *तात्पर्य- स्वत्वाची जाणीव होणे हि मोठी गोष्ट आहे.आपण आपल्यातील आपल्याला जोपर्यंत ओळखत नाहीत तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणे राहते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/04/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली. 💥 जन्म :- १९४५: भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन १९५०: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम 💥 मृत्यू :- २०१३: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *लंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनहून जर्मनीला रवाना, जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल यांची घेणार भेट* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत टायपिंग एरर असल्यानं CBSEच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना भरपाई म्हणून 2 मार्क अधिक देणार* ----------------------------------------------------- 3⃣ *जळगाव - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव-मुंबई विमानसेवेस पुन्हा प्रारंभ* ----------------------------------------------------- 4⃣ *अहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल* ----------------------------------------------------- 5⃣ *कर्नाटक निवडणूक 2018- काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जून खरगे यांचा मुलगा प्रियंक खरगे यांनी भरला उमेदवारी अर्ज. चित्तपूरमधून भरला अर्ज.* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर - प्रहार सामाजिक संस्थेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन, 1971 च्या युद्धात त्यांना मिळाले होते विशिष्ट सेवा पदक* ----------------------------------------------------- 7⃣ *IPL 2018 : चेन्नईचा राजस्थानवर 64 धावांनी विजय, शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.wordpress.com/2018/04/20/शिक्षकांच्या-ऑनलाइन-बदल्/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वर्धा* वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते. सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा हे वर्ध्यामधील एक हिंदी विद्यापीठ आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २०२० साली होणारे ऑलिंपिक कोणते देशामध्ये होणार आहेत ?* 👉 जपान *२) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?* 👉 यमुना *३) भारताचे 12 वे प्रधानमंत्री कोण होते ?* 👉 इंद्रकुमार गुजराल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रचावाड लक्ष्मण, पाळज 👤 बालाजी नारायणराव भांगे 👤 वीरभद्र कोटलवाड 👤 हणमंत पाटील आवरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *नाटकं* किती नाटकं लोक करतात जगा समोर चांगले ठरतात जग नाटकं ओळखून सोडतं दुस-या वेळेस बाजूला पाडतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत कबीर यांनी मानवी जगण्यातल्या खोटेपणावर प्रहार करीत ख-या भक्तीची जाणीव आपल्या रचनांमधून करून दिली. त्या रचना फारच दिलासा देणा-या आहेत. कुणाचीही वेदना ही आपली सहवेदना झाली पाहिजे यावर भर देत संतानी जो विचार मांडला तो अमूल्य जीवनाचा विचार आहे. गुरूस्वरूप असणा-या संताबद्दल कबीर म्हणतात....* *संगत संतनकी कर ले।* *जनमका सार्थक कछु कर ले।* *उत्तम नरदेह पाया प्राणी इसका* *हित कछु कर ले ॥* *या सांगण्यातून कबीरांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हेच सांगितले. त्या सार्थकतेच्या पाठीमागे आपण केव्हा आणि कधी जाणार आहेत, याचा विचार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायला हवा. संत हे कृपादृष्टी करणारे असल्याने त्यांच्याकडून कधीही कठोर वागणूक मिळणे अशक्य आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग ही 'प्रकाशवाट' असते.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एके दिवशी कुणीतरी आपल्यावर दया करुन दिलेल्या एका भाकरीपेक्षा कष्टाने आणि स्वाभिमानाने मिळवलेली अर्धी भाकरी अधिक सुखाची असते. ती लाचारी कधीच स्वीकारत नाही तर आपला स्वाभिमान जागृत करुन जगासमोर जगायला शिकवते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आलीया भोगाशी असावे सादर* - कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत बहिणाबाई* बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या.एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला,"मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले. *तात्पर्य- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*व्याकुळलेला जीव* 💧💧💧💧💧 पाण्यासाठी भटकंती करावी लागते व्याकुळलेल्या जिवाला माञ तहान कशीबशी भागवावी लागते थेंब थेंब पाण्याचे मोल माणसाने जाणावे पर्यावरणाचा समतोल राखून झाडे माञ जगवावे नदी नाले गेलीत आटून आणि सुकुन लहानसा जीव बघा उघड्या अंगानी पाणी पितोय वाकून उन्हाच्या लाहीचे तो सोसतोय अंगावर चटके पाण्यासाठी त्याला सोसावे लागते फटके. आटलेल्या झर्याला पाझर कधी फुटणार व्याकुळलेल्या जीवाची तहान कधी भागणार तहान कधी भागणार??????? 〰〰〰〰✍स्वरचित रचना
*जाणीव* बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.* 〰〰〰〰〰〰〰 🙏 *संकलन*🙏
संकलित
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/04/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले. 💥 जन्म :- ७८८: आदि शंकराचार्य यांचा जन्म. 💥 मृत्यू :- १९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *98 व्या मराठी नाट्यसंंमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार, 13,14 आणि 15 जूनला मुंबईत होणार नाट्य संमेलन* ----------------------------------------------------- 2⃣ *उद्यापर्यंत संपुष्टात येईल देशातील रोख टंचाई - एसबीआय प्रमुखांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहा येथील तीन राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे केले भूमिपूजन* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे- मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर. 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन.* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक-मुंबई विमानसेवेला पुन्हा एकदा सुरूवात. यआजपासून वेळापत्रकानुसार नियमित सेवा सुरू होणार. ओझरहून सकाळी 6.5 वाजता मुंबईच्या दिशेने उड्डाण होणार.* ----------------------------------------------------- 6⃣ *बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, यंदा पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचे भाकीत.* ----------------------------------------------------- 7⃣ *IPL 2018- पंजाबने हैद्राबाद ला 15 धावांनी नमविले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरकारी शाळेत हाऊसफुल्ल पाटी ( सकाळ )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.google.co.in/amp/amp.esakal.com/saptarang/house-full-slate-public-school-22282?source=images आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वाशिम* हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांचीराजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस ही आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- श्री संत अमरदास बाबा मंदिर ऋषीवट (रिसोड),श्री पिंगळाशी देवी(रिसोड),श्री सितला मंदिर (रिसोड),आप्पास्वामी मंदिर (रिसोड),बालाजी मंदिर (वाशीम), श्रीक्षेत्र पोहरादेवी, पद्मतीर्थ शिवमंदिर, अंतरीक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर, नृसिंह सरस्वती मंदिर (करंजा), सखाराम महाराज मंदिर (लोणी), चामुंडा देवी *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर कोण होते?* 👉 वर्धमान महावीर *२) वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?* 👉 कुंडलपूर *३) वर्धमान महावीर यांचा जन्म कधी झाला?* 👉 इ. स. पू. ५९९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विलास इंगळे, 👤 साईनाथ मुलकोड, येवती 👤 दिलीप सहस्त्रबुद्धे 👤 अक्षय निरावार 👤 रमेश हातोडे 👤 छाया पुयड 👤 स्वप्नील सूर्यवंशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाटणारे* इथे वाटणारा पेक्षा जास्त लाटणारे आहेत बोटावर मोजता येईल एवढे वाटणारे आहेत लाटणारा पेक्षा जास्त आनंदी वाटणारे असतात उगीच रडत कुढत सदा लाटणारे बसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येक व्यक्तिची एक स्वतंत्र ओळख असते. त्याची स्वत:ची एक प्रकृती असते. त्याचं अवतीभवतीचे वातावरण वेगळे असते. त्याची आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमी निराळी असते. त्याच्यावर झालेले संस्कार भिन्न असतात. एकाच पर्यावरणात राहिलेले व एकाच माता-पित्याच्या पोटी जन्माला आलेली भावंडसुद्धा सारख्या विचारांची नसतात.* *कारण प्रत्येक व्यक्तिचं भावविश्व वेगळं असतं. त्याची भावनिक व मानसिक गरज भिन्न असते. अंगभूत संवेदनशिलताही वेगळी असते. एखादा प्रसंग बघितला अथवा घडलेला असला तर त्यावरील प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो.* ••●⚡‼ *रामकृष्णहरी* ‼⚡●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादे सकस बियाणे जमिनीत टाकले तर त्या बियाणापासून सकस धान्य उपजले जाते हा विश्र्वास बियाणे टाकणा-या शेतक-याला जसे माहित असते. त्याचप्रमाणे एखादा चांगला विचार चारचौघांमध्ये जर रुजला तर त्याच विचारांचे इतरही जनमानसात विचार रुजून एक सशक्त चांगल्या विचारांची पिढी निर्माण होऊन एक चांगला सशक्त समाज नक्कीच निर्माण होऊ शकेल असा चांगला विचार करणा-या विचारवंताला माहित असतो.तो देण्याचा स्वातंत्र्याने प्रयत्न करतो.परंतु एखादा वाईट विचार हा संपूर्ण समाजाला तळागाळापर्यंत पोहचला तर एक चांगली सशक्त पिढी विनाशाकडे नक्कीच जाऊ शकेल.त्यापेक्षा केव्हाही चांगल्या विचारांची कास धरुन आपले जीवन व सामाजिक जीवन समृद्ध करण्यास सहाय्य करावे.यापेक्षा अन्य महामंत्र कोणताच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधी बुद्धि जाते नंतर लक्ष्मी जाते* - अगोदरच आचरण बिघडते नंतर दशा बदलते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जाणीव* बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/04/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. १९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला. 💥 जन्म :- १९३३: ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म. १९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म. १९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म. १९८७: रशियन लॉनटेनिस खे 💥 मृत्यू :- १९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, भारतात मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक रुग्णांत वाढ* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - जस्टिस लोया यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज करणार सुनावणी.* ----------------------------------------------------- 3⃣ *ग्रामीण शेतक-यांना आठवडी बाजारात राखीव जागा देणार, 25 टक्के जागा राखीव ठेवणार, मनपा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय.* ----------------------------------------------------- 4⃣ *लंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली पिन्स चार्ल्स यांची भेट* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूर - नागपूर मेट्रोला मिळाले सुरक्षा प्रमाणपत्र, मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - पुण्यातील आयपीएल सामन्यांचे आयोजन संकटात, पुण्यातील सामन्यांना सरकारने पाणी न देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश* ----------------------------------------------------- 7⃣ * IPL 2018 : केकेआरचा दणदणीत विजय, राजस्थानचा ७ गड्यांनी पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बलात्काराचे वाढते प्रमाण ( जनशक्ती )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/बलात्काराचे-वाढते-प्रमाण/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अकोला* अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हे आहे.अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे. ही नदी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्णा नदीस शहानूर, पठार, विद्रूपा, आस, इत्यादी नद्या उत्तरेकडून येऊन मिळतात . उमा, काटेपूर्णा, मोर्णा व मन ह्या नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात. याशिवाय निर्गुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते. वाशीम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीचा उगम आहे. ही नदी बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व अकोला या तालुक्यांतून वाहते. ती लाईत गावाजवळ पूर्णा नदीस मिळते. मूर्तिजापूर तालुक्यात सांगवी या ठिकाणाजवळ पूर्णा व उमा नद्यांचा संगम झाला आहे. मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ झाला आहे. अकोला जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डॊंगरराळ भागात जास्त वने आहेत. वनात साग , ऐन, खैर, अंजन, इत्यादी वृक्ष आढळतात. तसेच मोर, रानकोंबडा, इत्यादी पक्षीही वनांत आहेत. पातूर तालुक्यात साग, चंदन, आढळते तसेच चारोळीचे उत्पादनही होते. जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जे काही दिसतंय त्या सगळ्यावरच विश्वास ठेवायचा नसतो. मीठ सुद्धा साखरेसारखं दिसत असतं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जागतिक कविता दिवस कधी साजरा केला जातो ?* 👉. 21 मार्च *२) जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो ?* 👉. 21 जून *३) जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो ?* 👉 15 मे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 ओमप्रकाश सूर्यवंशी 👤 संतोष पुरणशेट्टीवार, धर्माबाद 👤 संदीप बोलचेटवार, धर्माबाद 👤 साई साखरे 👤 भक्ती जठार 👤 बालाजी पोरडवार 👤 संदीप काटमवाड 👤 सचिन कनोजवार 👤 कृष्णा राय *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मपरीक्षण* कोणावर कोणाचे पाय धरायची वेळ का येते कोण बरोबर कोण चूक ही घालमेल का होते कोण चूक बरोबर या पेक्षा आत्मपरीक्षण महत्वाचे माणूस संपला तरी प्रश्न सुटणार नाही तत्वाचे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्राचीन काळापासून एखाद्या नैसर्गिक घटनेनंतर अनुभवास आलेल्या चांगल्या अगर वाईट गोष्टींशी त्या घटनेचा संबध जोडला जातो. यातून शकुन आणि अपशकुनाच्या कल्पना जन्म पावतात. भारतातील बहुतांश प्रदेशात 'घुबड' अशुभ मानले जाते. मात्र बंगालमध्ये ते लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजले जाते. वैदिक संस्कृतीने कबुतराला मृत्यूच्या देवतेशी संबधीत ठरवून अशुभ मानले होते-इतके की कबुतर घरात शिरल्यास शांती करावी लागते. मात्र आता अनेक ठिकाणी लोक कबुतरांना मुद्दाम खाऊ घालतात. पाश्चात्य संस्कृतीने तेरा हा आकडा अशुभ मानल्याने मोठमोठ्या पंचतारांकित हाॅटेल्समध्येसुद्धा त्या क्रमांकाचा मजला किंवा खोली नसते.* *चमत्कृतींनी भरलेल्या मानवी मनाचा थांग लागणे कठीण असते. लबाड आणि संकुचित मनोवृत्तीचे लोक अनेकदा केवळ आपण असहिष्णु आणि पुढारलेले आहोत हे भासविण्यासाठी आपण रूढी परंपरा वगैरे मानत नाही असे दाखवतात. वास्तविक पाहता पारंपारिक पोशाखातील खेडवळ माणूस विश्वासार्ह, मनमिळाऊ असू शकतो आणि आधुनिक पोशाखातील उच्चशिक्षित व्यक्ति बुरसटलेल्या विचाराची, अहंमन्य आणि लबाड असू शकते.* ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●•• 🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगात,विचारात आणि कृतीत सर्व मानवतावादी मूल्ये रुजलेली आहेत ह्यांनाच आपण खरे विद्वान म्हणावे.केवळ वरवर ज्ञान मिळवून चार लोकांत आपलाच उदोउदो करुन घेणारे महाभाग ही आहेत.त्यांच्या ओठांवर एक आणि पोटात अर्थात अंत: करणात एक असते.अशी माणसे तेव्हाच काळाबरोबर लुप्त होतात.ते कधीच नंतरच्या काळात टिकत नसतात.अर्थात ते अल्पायुषी ठरतात.ज्यांना काळाबरोबर आणि काळाप्रमाणे पुढे पुढे जायचे आहे ते मात्र कशाचाही विचार न करता जगतात तेच खरे मानवतेची मूल्य जोपासत कोणत्याही कालप्रवाहात चिरंजीव असतात हे मात्र सत्य आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपलेच दात आपलेच ओठ* - आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हारजीत* एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमधेही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या महाविद्यालयातील गणेश नावाचा एक विद्यार्थी प्राचार्यांना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,"सर! मी संजयपेक्षाही जास्त अचूकतेने नेम साधू शकतो. संजयला पराजित करणे हे माझे उद्दिष्ट आहे." प्राचार्य मंदसे हसले आणि पुढे गेले, कारण त्यांना माहित होते कि संजयला हरवणे इतके सोपे काम नाही. स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एका धाग्याला एक लाकडी फळ बांधले होते, त्याचा वेध नेमबाजांनी घ्यायचा होता. सर्व नेमबाजांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना यश मिळाले नाही. फक्त गणेश आणि संजय हे दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले. गणेशने यावेळी पुढाकार घेतला. त्याने पहिला नेम साधला तो अचूकपणे, दुसरा नेम त्याचा हुकला आणि तिसराही नेम योग्य पद्धतीने साधला. आता संजयची वेळ होती. संजय नेमबाजीला उभारला कि मुलांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. संजयने पहिला नेम मारला तो चुकला, दुसरा मारला तोही चुकला आणि तिसराही नेम त्याला मारता आला नाही. संजय पराजित झाला. सारी मुले, शिक्षक हिरमुसले झाले. संजय प्रथमच पराजित झाला होता. प्राचार्यांना व शिक्षकांना संजय हरला यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याला एकटे बोलावून घेतले. अनेकांनी त्याला विचारले पण तो काही सांगायला तयार होईना. शेवटी प्राचार्यांनी त्याच्यावर दबाव टाकला तेंव्हा त्याने सांगितले,"सर ! गणेशला मी बाहेर त्याच्या मित्रांबरोबर बोलताना ऐकले कि त्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे या पुरस्काराच्या रकमेतून त्याची फी तो भरणार आहे. मी या गोष्टीची अनेक मित्रांकडून खात्री केली. सर माझ्या हरण्याने जर कुणाचे आयुष्याचे कल्याण होत असेल तर मी कायम हरायला तयार आहे. सर माफ करा यामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला पण त्यातून एका विद्यार्थ्याचे आयुष्य उभारेल याचे मला समाधान आहे." या त्याच्या बोलण्याने सर्वच उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या व प्राचार्यांनी संजयचे एक विशेष गुणवान विद्यार्थी म्हणून अभिनंदन केले. तात्पर्य-आपल्या सदवर्तन करण्याने कुणाचे ना कुणाचे चांगले कसे करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/04/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *अक्षय्य तृतीया व महात्मा बसवेश्वर जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली. १८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली. १९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली. 💥 जन्म :- १८५८: स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे 💥 मृत्यू :- १८५९: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *स्टॉकहोम - आंतरराष्ट्रीय मंचावर स्वीडन आणि भारत एकमेकांचे चांगले सहयोगी आहेत, हे सहकार्य पुढेही सुरू राहील - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *मध्य प्रदेशात सोन नदीत ट्रक पडल्याने दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.* ----------------------------------------------------- 3⃣ *श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे, मंत्रिमंंडळात होणार फेरबदल* ----------------------------------------------------- 4⃣ *तांत्रिक बिघाडामुळे सोशल मीडियातील अग्रेसर ट्विटर ठप्प* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली: संसदीय समितीकडून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना 17 मे रोजी उपस्थित राहण्यासाठी समन्स* ----------------------------------------------------- 6⃣ *2018 मध्ये भारताच्या विकासाचा दर 7.3% असेल; वर्ल्ड बँकेचा अंदाज* ----------------------------------------------------- 7⃣ *IPL 2018 : मुंबईचा बंगळुरुवर 46 धावांनी विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालविवाह कसे रोखता येतील ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://www.saamana.com/child-marriage/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने उस्मानाबादजिल्ह्या्चे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. लातूर हे महाराष्ट्राच्या,आंध्र प्रदेशाच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा व रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी व्यतिरिक्त कन्नड आणि तेलुगू भाषा सहज बोलतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतीय संविधान दिवस कोणत्या तारखेला साजरी केली जाते ?* 👉 २६ नोव्हेंबर *२) विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोठून सुरू केलीे ?* 👉 आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली *३) ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?* 👉 ग्रामसेवक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शेखर गिरी, साहित्यिक 👤 चंद्रशेखर अनारे 👤 राजू मेकाले 👤 चंद्रकांत तालोड 👤 योगेश मरकंटी 👤 देवराव पाटील कदम ( आजचा वाढदिवस काल चुकून पोस्ट झाला होता. टीम दिलगीर आहे.) *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस* माणूस किती मोठा संयमावरून दिसते माणसाचं मोठेपण उथळपणात नसते जेवढा संयम मोठा माणूस तेवढा मोठा संयम नसलेला मात्र माणूस खुप छोटा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🔻🔻🔻🔻🔻🔻 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास* - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बुद्धी हीच सर्वश्रेष्ठ* दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला. *तात्पर्य- बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
:: मराठी साहित्यिक लेखक व त्यांचे टोपणनाव :: दासोपंत दिगंबर देशपांडे [दासोपंत] पुरूषोत्तम धाक्रस [फडकरी] चिंतामण त्र्यंबक खानोलकर [आरती प्रभु] लक्ष्मीकांत तांबोळी [लता जिंतूरकर] शाहीर अनंत घोलप [अनंत फंदी] रघुनाथ चंदावरकर [रघुनाथ पंडित] गोविंद त्र्यंबक दरेकर [गोविंद] संजीवनी रामचंद्र मराठे [संजीवनी] माणिक शंकर गोडघाटे [ग्रेस] स.अ.शुक्ल [कुमुद] शंकर केशव कानेटकर [गिरीश] वीरसेन आनंद कदम [बाबा कदम] रघुनाथ दामोदर सबनीस [वसंत सबनीस] मेहबूब पठाण [अमरशेख] वि.ल.बर्वे [आनंद] भागवत वना नेमाडे [भालचंद्र नेमाडे] आत्माराम शेटये [शेषन कार्तिक] गोपाळ नरहर नातू [मनमोहन] नारायण गजानन आठवले [राजा ठकार] बा.सी.मर्ढेकर [मकरंद] तुकाराम बोल्होबा अंबिले [संत तुकाराम] प्रमोद नवलकर [भटक्या] बंधु माधव मोडक (कांबळे) [बंधुमाधव] राम गणेश गडकरी [बाळकराम (विनोदासाठी)] मालतीबाई विश्राम बेडेकर [विभावरी शिरुरकर] प्र.न.जोशी [पुष्पदंत] गणेश वासुदेव जोशी [सार्वजनिक काका] दत्तत्रय कोंडदेव घाटे [दत्त (कवी)] रा.वि.टिकेकर [धनुर्धारी] सुखराम हिवलादे [सुगंधा गोरे] दिवाकर कृष्ण केळकर [दिवाकर कृष्ण] वसंत नारायण मंगळवेढेकर [राजा मंगळवेढेकर] के.ज.पुरोहित [शांताराम] विनायक नरहर भावे [विनोबा] ल.गो.जोशी [नृसिंहाग्रज] नारायणराव राजहंस [बालगंधर्व] कृष्णाजी केशव दामले [केशवसुत] म.पा.भावे [मधू दारूवाला] विनायक जनार्दन करंदीकर [विनायक] विष्णु भिकाजी गोखले [विष्णुबुवा ब्रम्हचारी] धोंडो वासुदेव गद्रे [काव्यविहारी] विष्णुशास्त्री चिपळूणकर [गोल्या घुबड] मीनाक्षी दादरकर [लोककवी श्री मनमोहन] रा.श्री.जोग [निशिगंध] डॉ. काशिनाथ हरि मोडक [माधवानुज] माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट [तुकडोजी महाराज] प्रल्हाद वडेर [रूप] नारायण मुरलीधर गुप्ते [बी] अशोक रानडे [दक्षकर्ण] गोविंद विनायक करंदीकर [विंदा करंदीकर] दत्तात्रय विष्णू तेंडोलकर [प्रफुल्लदत्त] होनाजी शेलार खाने+ बाळा कारंजकर [होनाजी बाळा] न. रा. फाटक [फरिश्ता] नारायण वामन टिळक [रे. टिळक] दगडू मारुती पवार [जागल्या (कथालेखक)] कृष्ण गंगाधर दीक्षित [संजीव] ज्ञानेश्वर नाडकर्णी [तुकाराम शेंगदाणे] पद्मा विष्णू गोळे [पद्मा] दिनकर दत्तात्रय भोसले [चारुता सागर] प्रभाकर नारायण पाध्ये [भाऊ पाध्ये] लक्ष्मणराव सरदेसाई [पराशंर] नरहर सदाशिव जोशी [विष्णुदास] राम गणेश गडकरी [गोविंदाग्रज] हरिहर गुरुनाथ कुलकर्णी [कुंजविहारी] वि.ग कानिटकर [रा. म. शास्त्री] वि.वा.शिरवाडकर [कुसुमाग्रज] गंगाधर कुलकर्णी [रसगंगाधर] आप्पाराव धुंडिराज मुरतुले [सुमंत] बळवंत जनार्दन करंदीकर [रमाकांत नागावकर(गंधर्व)] मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी [मुक्ताबाई (संत)] मो.ग.रांगणेकर [धुंडिराज] निवृत्ती रावजी पाटील [पी.सावळाराम] भा.रा.भागवत [संप्रस्त] वामन नरहर शेखे [वामन पंडित] ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णी [ज्ञानदेव (संत)] शिवराम महादेव गो-हे [चंद्रिका /चंद्रशेखर] सौदागर नागनाथ गोरे [छोटा गंधर्व] सुनंदा बलरामन कुलकर्णी [सानिया] प्रभाकर जनार्दन दातार [प्रभाकर (शाहीर)] भार्गव विट्ठल वरेरकर [मामा वरेरकर] चंद्रकांत सखाराम चव्हाण [बाबुराव अर्नाळकर] दिनकर गंगाधर केळकर [अज्ञातवासी] गोपाळ हरि देशमुख [लोकहितवादी] सेतू माधव पगडी [कृष्णकुमार] ब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकर [श्रीधर] न.रा.फाटक [करिश्मा] नागेश गणेश नवरे [नागेश] विश्वनाथ वामन बापट [वसंत बापट] मो.शं.भडभडे [शशिकांत पूनर्वसू] लीला भागवत [भानुदास रोहेकर] वि.शा.काळे [बाबुलनाथ] हणमंत नरहर जोशी [सुधांशु] कृष्णाजी अनंत एकबोटे [सहकरी कृष्ण] ग.दि.माडगुळकर [गदिमा] प्र.के. अत्रे [केशवकुमार] देवदत्त टिळक [लक्ष्मीनंदन] संजीवनी मराठे [जीवन] माधव त्र्यंबक पटवर्धन [माधव ज्युलियन] कृष्णाजी विनायक पोटे [भानुदास] जयवंत दळवी [ठणठणपाल/अलाणे-फलाणे] वा.गो.मायदेव [वनमाळी] द.पा.खंबिरे [मंडणमित्र] बाळकृष्ण भगवंत बोरकर [बाकीबा] दत्तात्रय अनंत आपटे [अनंततनय] कृष्ण पांडुरंग लिमये [राधारमण] यशवंत दत्ताजी महाडिक [यशवंत दत्त] दगडू मारुती पवार [द्या पवार (कवी)] दा.वि.नेने [दादुमिया] नारायण गजानन आठवले [अनिरुध्द पुनर्वसू] यशवंत दिनकर पेंढारकर [यशवंत] वसंत हजरनीस [वशा] शंकर काशिनाथ गर्गे [दिवाकर] मोरेश्वर रामचंद्र पराडकर [मोरोपंत] त्र्यंबक बापूजी ठोंबरे [बालकवी] ना.वि.काकतकर [विजय मराठे] व्दारकानाथ माधवराव पितके [नाथमाधव] मो.ग.रांगणेकर [मंगलमूर्ती] भगवान रघुनाथ कुलकर्णी [बी रघुनाथ] आत्माराम रावजी देशपांडे [अनिल] अरुण गोडबोले [हरफन मौला] कॅ. मा कृ. शिंदे [मिलिंद माधव] किशोर कदम [सौमित्र
संकलित
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/04/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली. १९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली 💥 जन्म :- १४७८: हिन्दी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास 💥 मृत्यू :- १९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवासाच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर रवाना* ----------------------------------------------------- 2⃣ *सीरियातील अस्थिरतेमुळे पेट्रोलचे दर 90 रूपयांवर जाण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 3⃣ *जालना : जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांची बदली. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी म्हणून होणार रुजू.* ----------------------------------------------------- 4⃣ *रत्नागिरी : ॲट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत - केंद्रीय मंत्री रामदास आठवले* ----------------------------------------------------- 5⃣ *सावंतवाडी येथे भरती मेळावे घेतलेल्या २२ कंपन्यांना गोवा सरकारच्या नोटिसा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मक्का मशीद स्फोट: सुनावणी घेणारे विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश आर. रेड्डी यांनी दिला राजीनामा* ----------------------------------------------------- 7⃣ *‘आयपीएलच्या बॅनर’मुळे पश्चिम रेल्वेला ‘ब्रेक’ !, कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पर्यावरण आणि मानवी जीवन ( सामना )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://www.saamana.com/environment-and-human-life/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौध्द लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ(य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे.मुंबई व पुण्याप्रमाणेच नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले शहर आहे. पंचवटी हाही नाशिकचा एक भाग आहे.नाशिक मधील अशी धार्मिक स्थळ पाहिल्याबरोबर आपल्याला पुरातन काळाचे महत्व कळते. नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव 'नासिक' असे पडले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) बांगलादेशाची स्थापना केंव्हा झाली ?* 👉 1971 *२) बभारतात पहिली लोकसभा केंव्हा अस्तित्वात आली ?* 👉 1952 *३) भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते ?* 👉 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शेखर गिरी, साहित्यिक 👤 चंद्रशेखर अनारे 👤 राजू मेकाले 👤 चंद्रकांत तालोड 👤 योगेश मरकंटी 👤 देवराव पाटील कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीमंती* पैसा असला म्हणून कोणी श्रीमंत होत नसतो प्रचंड पैसेवालाही एखादा गरीब रहात असतो श्रीमंती धनाची नाही मनाची असावी लागते गरीब व्यक्ती श्रीमंता पेक्षा चांगली वागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीपूर येथील राजा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्यपदी बसविण्यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्याची माता त्याला हिंमत देत असे व योग्य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्या राज्यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्याला हार पत्करावी लागली हे ऐकले तेव्हा राजमातेने मनातल्या मनात काही ठरवले.* *राजवीर झोपण्याआधी राजमातेचे दर्शन घेण्यासाठी आला तेव्हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्या मोठ्या तुकड्याला तोडण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्हणाली,’’खरं बोललास, संख्येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्हा. शत्रूची कितीही संख्या तुम्हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्यात आहे ती जागृत करा. तुमच्या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादा चांगला विचार तुमच्या जीवनात खूप काही चांगली प्रेरणा देते आणि जीवनच बदलून टाकते.त्या एका चांगल्या विचारामुळेच तुमचा जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक मजबूत बनतो.तुम्ही भूतकाळ विसरून येणा-या भविष्याची अधिक चांगली अपेक्षा कराल.तुम्हाला काहीतरी नवे करण्याची इच्छा निर्माण होते आणि तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करते. पण एखादा वाईट विचार जर केलात तर तुम्ही तुमच्या जीवनात अपमान, मानहानी, जीवनात निरुत्साह निर्माण करुन तुमच्या जीवनाला अधोगतीकडे नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवन आनंदी, सुखी, समाधानी जगायचे असेल तर दररोज एक चांगला विचार संतांचा, विचारवंतांचा किंवा ज्यांनी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरीत केले त्यांना कधीही विसरु नका.कारण ते तुमच्या जीवनाचे खरे प्रेरणास्थान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली* - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अर्थ* एक पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला कि राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी हरवू शकत नाही याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले कि राजाला आपली विद्वत्ता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे त्याच्या मनात होते. त्यानुसार ठरवून तो राजदरबारात गेला, त्याने पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुरोहीताने पंडिताला प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला,"पाच मी, पाच शी, पाच न मी आणि पाच न शी याचा अर्थ सांगा?" राजपुरोहीताला प्रश्न समजला नाही. त्याने राज्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागून घेतली. राजाने मुदत दिली मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच. सात दिवसात पुरोहिताने उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने,नशिबाने साथ दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांना हि या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण त्यानाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताने विचाराची दिशा सोडून दिली, आता फक्त मृत्यूचा विचार तो करत होता. मृत्युच्या भीतीने त्याने नगर सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालून चालून थकला तेंव्हा एका झोपडीपाशी जावून बसला. योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत होता,"माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने राजपुरोहित मरणार हे खरे ! अगं ! पंधरा तिथीमध्ये पाच तिथी अशा असतात कि त्यांच्या पुढे 'मी' प्रत्यय लागतो -पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात ज्यामध्ये 'शी' प्रत्यय लागतो-एकादशी,द्वादशी,त्रयोदशी,चतुर्दशी आणि पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मीही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही-प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. बघ हे उत्तर राजपुरोहीताला कधीच येणार नाही." हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात उत्तर दिले व स्वत:चा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला. *तात्पर्य- दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जावू शकतो.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/04/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- 1853 - भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे लोहमार्गाने धावली. 💥 जन्म :- 1867 - विल्बर राईट, अमेरिकन विमान संशोधक 1889 - चार्ली चाप्लिन, विनोदी अभिनेता 💥 मृत्यू :- २०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गडचिरोली - महिला व बाल रुग्णालयाचे उदघाटन प्रसंगी दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्याला बेघरमुक्त करणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले* ----------------------------------------------------- 2⃣ *आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू २० एप्रिलला करणार उपोषण* ----------------------------------------------------- 3⃣ *राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण यांना घोषित. * ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी १ मे पर्यंतची मुदत वाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *गोल्ड कोस्टवर सोन्याची लयलूट करत भारतानं जिंकली एकूण ६६ पदकं* ----------------------------------------------------- 6⃣ *इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी 'महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब' पटकावला* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताचे सुवर्ण हुकले, किदम्बी श्रीकांतला रौप्य पदकावर मानावे लागले समाधान* ----------------------------------------------------- *आय पी एल बातमी - : रोमहर्षक लढतीत पंजाबचा चेन्नईवर चार धावांनी विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *देशातील एकता कशी टिकेल ? ( सकाळ )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.google.co.in/amp/amp.esakal.com/citizen-journalism/esakal-news-nagorao-yevtikar-writes-about-unity-79766?source=images आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जळगाव* जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते., ही शेती भारतातील इतर शेतकर्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर,अंजनी प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची हा जिल्हा ही कर्मभूमी होती. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधिशाची नेमणूक कोण करते?* 👉 राज्यपाल *२) कोणत्या कायदान्वये भारतात निवडणुकांचा पाया घातला गेला?* 👉 भारतीय परीषद कायदा १८९२ *३) भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्यपणे अंदाजपत्रक हा शब्द कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे?* 👉 कलम २६६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कु. हिंदुजा शिवाजी अन्नमवार, नांदेड 👤 नितीनकुमार अंबेकर, भावसार 👤राज नागुल, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिखावा* आपल्याकडे कामं कमी अन् दिखावाच जास्त आहे असले काम करणाराला वाटते आपलेच रास्त आहे दिखाव्या पेक्षा जास्त आपल काम बोलत असतं दिखाव्यावाल्यांच काम जास्त दिवस चालत नसतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीपूर येथील राजा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्यपदी बसविण्यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्याची माता त्याला हिंमत देत असे व योग्य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्या राज्यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्याला हार पत्करावी लागली हे ऐकले तेव्हा राजमातेने मनातल्या मनात काही ठरवले.* *राजवीर झोपण्याआधी राजमातेचे दर्शन घेण्यासाठी आला तेव्हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्या मोठ्या तुकड्याला तोडण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्हणाली,’’खरं बोललास, संख्येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्हा. शत्रूची कितीही संख्या तुम्हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्यात आहे ती जागृत करा. तुमच्या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आचार भ्रष्टी सदा कष्टी - ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो दुःखी असतो.* *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विनम्रता* राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले. सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली. *तात्पर्य-विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती. १९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना. 💥 जन्म :- १९१३ - दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत. 💥 मृत्यू :- २००८ - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात वैजापूर तालुक्यातील फरीदाबाद येथील रहिवासी जवान किरण थोरात यांना वीरमरण* ----------------------------------------------------- 2⃣ *अॅट्रॉसिटी : कोर्टाला कायदा बदलण्याचा अधिकार नाही; केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड - कुंडलवाडी नगरपालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचे शेख मुखत्यार विजयी, सत्ताधारी भाजप उमेदवाराचा 252 मतांनी केला पराभव* ----------------------------------------------------- 4⃣ *वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड* ----------------------------------------------------- 5⃣ *परभणी - परभणी येथे महसूल आयुक्तालय स्थापन करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू* ----------------------------------------------------- 6⃣ *राष्ट्रकुल स्पर्धा: महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेने सुवर्णपदक जिंकले* ----------------------------------------------------- 7⃣ *गोल्ड कोस्ट - कुस्तीपटू सुशील कुमारने पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात जिंकले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *किदम्बी श्रीकांत ठरला जगातील अव्वल बॅडमिंटनपटू, श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील पुरुषांच्या विभागात डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसनला पिछाडीवर टाकत अव्वल स्थानाला गवसणी घातली आहे* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणीचे महत्व ( सामना )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://www.saamana.com/nagorao-yevatikar-article-on-born-and-dead-registration/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बीड जिल्हा* हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका म्हणून ओळखला जातो.मांजरसुभाहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो. परळी येथे वैद्यनाथ मंदिर आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?* 👉 २४ नोव्हेंबर *२) स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?* 👉 राजस्थान *३) मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्याना मजूरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते ?* 👉 ग्रामसेवक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विठ्ठल वाघमारे 👤 दर्शन जोशी 👤 यश सब्बनवार 👤 व्यंकटेश पाटील 👤 यादव ऋरामे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाणी* लोक या बोटावरचं त्या बोटावर आणतात आपण तसं केलच नाही असे राजरोस म्हणतात खुप जपावं लागत आपल्या जबानीला अशाने किंमत कशी राहील बोलणा-याच्या वाणीला शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आयुष्यात' संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. 'संतसंगती' लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्यांच्याशी आपण संगत करातो, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.* *देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर संतसंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ?* *प्रवासात आपल्या शेजारी विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते.* *"सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. संतसंगतीपासून 'सद्भावना' आणि 'सद्विचार' प्राप्त होतात."* ••●🌱‼ *रामकृष्णहरी* ‼🌱●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *असतील शिते तर जमतील भुते* - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चतुर ससे* एका जंगलात दोन चतुर ससे राहत होते.ते एकदा जंगलात फिरत आसतांना त्यांना एका झाडाखाली एक वाघ बसलेला दिसला.ससे खूपखूप घाबरले पण ते खूपच चतुर होते.त्यातील एकाने झाडाच्या फांद्या तोडल्या व अंगाभोवती गुंडाळल्या.उड्या मारतमारत तो वाघासमोरून निघून गेला.वाघ पाहतच राहिला. लगेचच दुसरा ससा ऐटीत वाघासमोर आला व म्हणाला ,"वाघदादा आपल्या जंगलात चालणारे व प्राण्यांना खाणारे झाड आले,ते तुम्ही पाहिले का?" वाघ मनातून घाबरला.त्याने नुकतेच चालणारे झाड पाहिले होते.वाघ काहीच बोलला नाही.तेवढयात दुसरा ससाही तेथून पळून गेला.अशा त-हेने मोठ्या युक्तीने सशांनी आपली सुटका करून घेतली. *बोधः "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ".* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निर्माण झाली जन्मापासून माणसाची नाती संपतील ना कधी या जीवनी माणुसकीची नाती माणुसकीचा या नात्यात व्देष भावना नसावी प्रेमाचा धाग्यांची प्रिती माञ दिसावी जोडून सारे नाते आपुले शब्दाशब्दात प्रेम असावे स्वार्थाविना जोडूनीया प्रेमाविना रिते नसावे. निर्माण झाली जन्मापासून माणसाची ही नाती कधी न तुटावी आपुली माणुसकीची नाती. 〰〰〰〰〰〰〰 ✍प्रमिलाताई सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/04/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - युझनेटवर सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली. १९९७ - भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा. 💥 जन्म :- १९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे 💥 मृत्यू :- २३८ - गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट. २३८ - गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - नाणार प्रकल्प होणारच, सौदी अरेबियातील अरामको कंपनीशी सामंजस्य करार, रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला केंद्राचा हिरवा कंदिल* ----------------------------------------------------- 2⃣ *जम्मू काश्मीर - कुलगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक जवान शहीद, दोन जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या वेतनात वाढ करण्यास कॅबिनेटची मंजुरीस, ही वाढ 1 जानेवारी 2016 च्या वेतनापासून लागू असेल* ----------------------------------------------------- 4⃣ *हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन.* ----------------------------------------------------- 5⃣ *अकोल्यामध्ये काल 41.4 अंश सेल्सिअस सर्वोच्च तापमानाची नोंद* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली : 2 एप्रिलला भारत बंदमुळे घेण्यात न आलेली सीबीएसईची परीक्षा आता 27 एप्रिलला घेण्यात येणार आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत भारताला आणखी एक सुवर्ण पदक, महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात श्रेयसी सिंहला सुवर्ण पदक.* ----------------------------------------------------- *IPL - कावेरी पाणी वाटपावरुन गेले काही दिवस तामिळनाडूतील वातावरण तापलेलं आहे. त्यामुळेच चेन्नईतील सामने इतरत्र खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्याचं वृत्त एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. * ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व ( लोकपत्र )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://elokpatra.com/मातृभाषेतील-शिक्षणाचे-मह/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *यवतमाळ* ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे यवतमाळ जिल्हा असे नामकरण करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा : उत्तर दिशा - वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा,पूर्व दिशा - चंद्रपूर जिल्हा,दक्षिण दिशा - आंध्र प्रदेश राज्य व नांदेड जिल्हापश्चिम दिशा - हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे. हवामान व भौगोलिक : जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो. लोकजीवन : जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११) आहे. जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात. जिल्ह्यातील धरणं : यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा नदी वरील बेंबळा धरण, अरूणावती नदी वरील अरूणावती धरण व पुस नदी वरील पुस धरण हे मोठे व प्रमुख धरणं आहेत. यापैकी बेंबळा धरण हे सर्वात मोठे धरण आहे. जिल्ह्यातील व्यवसाय : जिल्ह्यात हातविणकाम (हँडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके- कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर-डाळ. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार केंद्रे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे : घंटीबाबा जत्रा (दिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वणी), इतर जत्रेची ठिकाणे- कळंब, घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर(वणी) इत्यादी. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्या-कुट्याना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 गोदावरी नदी *२) राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 भोगावती *३) गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?* 👉 नाशिक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मनोज दातार 👤 गजानन कुरेवाड, चिकना 👤 बालाजी चुनुपवार, येवती 👤 उमेश पोवाडे 👤 कलीमोद्दीन शेख 👤 मिनाज सय्यद 👤 आकाश वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *भूमिका* मी कोण? स्वतः स्वतःची ओळख पटायला पाहिजे स्वतःची भूमिका अगदी स्पष्ट वाटायला पाहिजे भूमिका स्पष्ट असल्या शिवाय तुम्ही ठाम राहू शकत नाही तुमचे कोणतेच स्वप्न पूर्ण झालेले तुम्ही पाहू शकत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्यात महत्वाच्या काही कामांच्या बाबतीत आळस करणारी माणसं दोन प्रकारे विचार करतात. एक, 'आयुष्य आणखी खूप शिल्लक आहे, करू कधीतरी.' आणि दोन, 'आयुष्य राहिलंच किती? कधीही संपून जाईल. आता कुठं वेळ राहिला?' अशी निमित्त करून असा विचार करणारे लोक अंगावर जबाबदारी पडू देत नाहीत. आयुष्य 'खूप बाकी आहे' म्हणणारा, शेवटच्या क्षणाला काम हातात घेईल तर कसं पूर्ण करेल? आणि 'आयुष्य राहिलंच किती' म्हणणारा कामाला सुरुवातच करणार नाही, तर तेही पूर्ण होणार कधी? आणि यांना मदत तरी कोण करणार?* *म्हणून, माणसानं 'काम करत राहिलं पाहिजे. जोपर्यंत मरण प्रत्यक्ष येत नाही, तोपर्यंत आयुष्य बाकी आहे किंवा संपलं आहे, असं म्हणत कुणी 'शांत' राहू नये. मरणाविषयी माणसानं 'अविचारी'पणा करू नये. "एका माणसानं नदीच्या पलीकडील तीरावर जाण्यासाठी पाण्यातून जाताना 'बुडू नये म्हणून' कमरेला भोपळा बांधण्याऐवजी दगड बांधून घेतले आणि नदीच्या मध्यभागी गेल्यावर बुडू लागला तेंव्हा 'धावा हो धावा' असं म्हणू लागला. परंतु त्यानं जाणीवपूर्वक 'दगड' बांधून घेतल्यामुळे अशावेळी कोण धावणार? त्याच्याच कमरेला दगड बांधलेले आहेत म्हटल्यावर कोण पाण्यात उडी घालील?" पाण्यात तरायचं असेल तर भोपळे बांधले पाहिजेत, दगड नाही. अशा पद्धतीने दगड बांधले तर आपलाच घात होईल.* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे एखाद्या रोगाला नष्ट करण्यासाठी एखाद्या चांगल्या औषधाची मात्रा काही ठराविक कालावधीत द्यावी लागते तेव्हा तो रोग नष्ट होतो.त्याचप्रमाणे एखाद्या माणसाच्या अंगी काही वाईट विचारांची प्रवृत्ती बळावलेली असते ती लवकर नष्ट होत नाही.अशा प्रवृत्ती असणा-या लोकांवर सातत्याने चांगल्या विचारांची मात्रा पुन्हा पुन्हा देत राहिली तर काही काळानंतर का होईना त्यांच्या अंगी असलेल्या वाईट प्रवृत्तींना हळूहळू प्रतिबंध घालता येतो आणि सत्प्रवृत्तीकडे नेता येते हे तितकेच खरे आहे. सुरवातीला अवघड जाईल पण नंतर मात्र आपोआपच सन्मार्गाला लागेल. त्याची त्याला चूक लक्षात येते तेव्हा वाईट विचार करण्याची प्रवृत्ती सुद्धा कमी व्हायला लागते. त्याचे त्यालाच कळून चुकते की,आपण आपल्या जीवनात हे काय करुन बसलो आहोत. मग पुन्हा तो त्या वाटेकडे जाणार नाही.वेळ लागेल पण सुधारणा नक्कीच होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधी शिदोरी मग जेजुरी* - आधी भोजन मग देवपूजा. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता.अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती. तात्पर्य- आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/04/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १२४१ - मोंगोल सरदार बाटु खान याने हंगेरीचा राजा बेला चौथा यास मोहीच्या लढाईत पराभूत केले. 💥 जन्म :- १९०४ - के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक 💥 मृत्यु :- १६१२ - इमॅन्युएल फान मेटरेन, फ्लेमिश इतिहासकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - पिंपरी-चिंचवडला मिळणार नवे पोलीस आयुक्तालय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय* ----------------------------------------------------- 2⃣ *झारखंड - सिमडेगा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *अहमदनगर : शिवसैनिक हत्या प्रकरण - भाजपा अामदार शिवाजी कर्डिले यांच्या कोठडीत 12 एप्रिलपर्यंत वाढ, तर आणखी २२ जणांना न्यायालयीन कोठडी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : राज्य कर्मचा-यांचा सरकारला इशारा, सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा आंदोलन करु.* ----------------------------------------------------- 5⃣ *रत्नागिरी - बँक अॉफ इंडियाच्या कडवई (ता. संगमेश्वर) शाखेत ५१ लाखांचा सोनेतारण घोटाळा, चार वर्षे खोटे सोने ठेवले गहाण.* ----------------------------------------------------- 6⃣ *गोल्ड कोस्ट - भारताच्या हीना सिद्धूने महिला नेमबाजीच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- 7⃣ *आशिया कप - यूएईमध्ये 13 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार सामने, भारत पाकसहीत 6 संघ होणार सहभागी* ----------------------------------------------------- *आय पी एल मध्ये चेन्नईचा कोलकाता संघावर मात* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *गड-किल्ले इतिहासाचे मूक साक्षीदार (जनशक्ती)* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/गड-किल्ले-इतिहासाचे-मूक-स/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हाव पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे. परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी साईबाबायांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी) व संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओँकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली. आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे. परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वेळ कसा घालावयाचा याचा सामान्य माणसे विचार करतात, तर बुद्धिमान त्या वेळेचा सदुपयोग करतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राला किती कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे?* 👉🏼 ७२० कि. मी. *२) रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते?* 👉🏼 कुलाबा *३) महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखल्या जातो?* 👉🏼 सोलापूर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रवीण कोडम, अहमदनगर संपादक, सा.मनपद्मशाली 👤 रामदास वाघमारे, औरंगाबाद संपादक, जीवन गौरव मासिक 👤 सुरेश द्विदेवार 👤 साईनाथ हवालदार 👤 देविदास बसवदे, शिक्षक नेते, 👤 विनोद चिलकेवार 👤 माधव गंटोड 👤 संजय नागरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *राजकारण* राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकते आपल्याच माणसाचा जीव घेऊ शकते अडथळा बनणाराचा आपलेच काढतात काटा काटा काढून थोड्या मोकळ्या होतात वाटा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.* *याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादा चांगला विचार तुमच्या जीवनात खूप काही चांगली प्रेरणा देते आणि जीवनच बदलून टाकते.त्या एका चांगल्या विचारामुळेच तुमचा जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक मजबूत बनतो.तुम्ही भूतकाळ विसरून येणा-या भविष्याची अधिक चांगली अपेक्षा कराल.तुम्हाला काहीतरी नवे करण्याची इच्छा निर्माण होते आणि तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करते. पण एखादा वाईट विचार जर केलात तर तुम्ही तुमच्या जीवनात अपमान, मानहानी, जीवनात निरुत्साह निर्माण करुन तुमच्या जीवनाला अधोगतीकडे नेल्याशिवाय राहत नाही.म्हणून जीवन आनंदी,सुखी,समाधानी जगायचे असेल तर दररोज एक चांगला विचार संतांचा, विचारवंतांचा किंवा ज्यांनी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरीत केले त्यांना कधीही विसरु नका.कारण ते तुमच्या जीवनाचे खरे प्रेरणास्थान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे* - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= बुद्धीचा योग्य वापर एक राजा कुशल प्रशासक होता. प्रजेचे सुख- दु:ख जाणून घेण्यासाठी तो साधारण वेशभूषा करून फिरत होता. एक दिवस जेंव्हा तो नगरातून जात होता तेंव्हा त्याला काही घोडेस्वार आपल्याकडे येताना दिसले, ते चोर असून आपल्याला लुटण्यासाठी येत आहेत असे राजाने हेरले. धाडसी राजा आता घाबरून जाण्याऐवजी लढण्यासाठी तयार झाला. त्याचवेळी त्याच्या घोड्याचा पाय खड्ड्यात अडकला. घोडा थोडासाही इकडे तिकडे हळू शकत नव्हता आणि चोर तर जवळ आले होते. तेवढ्यात तेथे काही तरुण आले. परिस्थिती ओळखून त्यांनी चोरांवर प्रतिहल्ला केला व हाकलून लावले. राजा यामुळे खुश झाला. त्याने त्या तरुणांना आपली ओळख दिली व बक्षीस म्हणून काही ना काही मागण्यास सांगितले. एका तरुणाने धन मागितले, दुसऱ्याने घर, तिसऱ्याने शेती, चौथ्याने सरपंचपद, पाचव्याने गावापर्यंत रस्ता बनवून मागितला आणि सहाव्याने म्हंटले, "महाराज ! मला काही देण्यापेक्षा तुम्हीच माझ्या घराचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी माझ्या घरी वर्षातून दोन वेळा यावे." राजाने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या व सहाव्या तरुणाला घरी येण्याचे वचन दिले. राजा त्याच्या घरी गेला तेंव्हा त्याचे घर खूप जीर्ण झाले होते. राजाला ते पाहवले नाही ते त्याने बांधून देण्याची आज्ञा केली. तसेच येण्याजाण्यासाठी चांगला रस्ता करून दिला. राजा हा पाहुणा म्हणून येत असल्याने त्याचा गावातील गावातील सन्मान वाढला. प्रतिष्ठा वाढली, राजाच्या जवळचा असल्याने राजदरबारी त्याचे म्हणणे मांडता येवू लागले. राजाने प्रत्येक वेळी त्याला काही ना काही वस्तू भेट दिल्याने त्याची श्रीमंती वाढत गेली. त्याच्या अक्कल हुशारीने तो गावातील प्रतिष्ठित नागरिक बनला. तात्पर्य- योग्य संधी मिळेल तेंव्हा बुद्धीचा वापर योग्य पद्धतीने केल्यास चांगले लाभ पदरात पडून घेता येतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*माझी शाळा माझे उपक्रम* 👫👭👭👫👭👫 *विषयः कला* *वर्गः तिसरी* 〰〰〰〰〰〰 *प्रात्यक्षिकःकृती* 🌸🌸🌸🌸🌸🌸 *आज कला या विषय अंतर्गत माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी* *मातीच्या विविध घरगुती वस्तू ,वाहतूकीची साधने,प्राणी (बैल,गाय), योगा साहित्य,खेळाचे साहित्य, तसेच मुर्ती इत्यादी वस्तू तयार केल्या.मुलांना हे सर्व तयार करतांना खूप आनंद वाटत होता.* *उद्दिष्ट*📚 *☘कलेची आवड निर्माण होणे.* *☘श्रमाचे महत्त्व समजणे.* *☘ नवनिर्मीतीचा आनंद मिळणे.* 〰〰〰〰〰〰〰 *✍ प्रमिलाताई सेनकुडे* *(वर्गशिक्षिका)* *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* 🙏🙏🙏🙏
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/04/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २०१० - रशियातील स्मोलेन्स्क शहरातील विमानतळावर उतरत असताना झालेल्या विमान दुर्घटनेत पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व इतर अनेक उच्चाधिकार्यांसह ९७ व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती. १९०७ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार. १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका. 💥 मृत्यू :- २०१३ - रॉबर्ट एडवर्डस् *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी 9-10 एप्रिलला सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार बंद.* ----------------------------------------------------- 2⃣ *कावेरी पाणी प्रश्न : सुप्रीम कोर्टात सुनावणी 3 मे रोजी होणार, याप्रकरणी केंद्र सरकार सुद्धा ड्राफ्ट फाईल करणार.* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर कारागृहातील गोदामाला आग, घटनास्थळी पाच अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल.* ----------------------------------------------------- 4⃣ *नंदुरबार- वेतन निश्चितीसाठी शिक्षकांकडून आठ हजारांची लाच घेताना वेतन परिक्षक ज्ञानदेव कचरे यांना रंगेहात अटक. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगरः भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी* ----------------------------------------------------- 6⃣ *हिंगोली : मार्च एन्डनंतर बाजारपेठेत हळदीच्या खरेदीस सुरूवात, पहिल्याच दिवशी झाली 10 हजार पोत्याची आवक.* ----------------------------------------------------- 7⃣ *Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक ; सायना ठरली विजयाची शिल्पकार* ----------------------------------------------------- *आय पी एल बातमी - कोलकातां नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी केला पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सैनिक देशाचा खरा संरक्षक ( जनशक्ती )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/सैनिक-देशाचा-खरा-संरक्षक/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= जालना जिल्हा हा स्वतंत्र भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. तसेच मराठवाडा विभागात उत्तर दिशेस स्थित आहे. जिल्ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्थान म्हणजे १९०१ उत्तर ते २,१०३ उत्तर अक्षवृत्तीय व ७,५०४ पुर्व ते ७,६०४ पुर्व रेखावृत्तीय. जालना जिल्हा हा पूर्वी निझाम राज्याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर औरंगाबाद जिल्ह्यामधील एक जालना तालुकाझाला. जालना जिल्ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्रामामध्येमहत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जनार्दन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहूती दिलेली आहे. हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मि.मी. इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरीनदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पिके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्त्वाचे हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे. बिडीचेही कारखाने आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतात विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ७ नोव्हेंबर *२) भारतात शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ११ नोव्हेंबर *३) भारतात बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 १४ नोव्हेंबर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागेश एल. तांबोळी 👤 सुभाष बोडके 👤 लक्ष्मण येवतीवाड 👤 श्रीनिवास चव्हाण 👤 श्यामानंद लिंगमपल्ले 👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक 👤 सचिन पवळे 👤 डॉ. शेख MWH, नांदेड 👤 शिवराज वडजे, सहशिक्षक 👤 बालाजी मुपडे 👤 नंदकिशोर बारडकर, सहशिक्षक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *घोर* लोकाच कसं होईल याचाच घोर असतो दुस-याचाच विचार करायचा जोर असतो जगाचा विचार करण्यात घालतात सगळा वेळ स्वतः च्या आयुष्याचा अशात बसत नाही मेळ शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्-भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही लोक जेव्हा आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यासमोर तुमची स्तुती करतात,तेव्हा तुम्ही समजून घ्या की,तुमच्याकडे त्याचे काहीतरी काम आहे.जे की तुमच्याकडून त्यांना करुन घ्यायचे आहे.तुम्ही तेव्हा त्यांच्या स्तुतीसुमनाने हुरळून जाऊ नका.कारण तुमच्या स्वभावात तो गुण नाही.खरच त्याची निकड आहे हे का पडताळून पहा.योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमच्या अंत: करणातून जरुर मदत करा.परंतू तो म्हणत आहे म्हणून आपण केले पाहिजे असा विचार सोडून द्या.अशी माणसे आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकतात.एखाद्यावेळी तुम्हाला संकटात टाकून ते निघून जातात आणि आपण पश्चातापात किंवा एखाद्या संकटात अडकतो.असे करण्यापेक्षा त्यांच्या स्तुतीसुमनांना बळी न पडता आपण स्वत: तुमच्या मनाला खरे वाटत असेल तर मदत करा अन्यथा अशा लोकांना मदत नाही केली तरी काही आपले वाईट होणार नाही.पण अशी माणसे जर आपण एकदा ओळखायला लागली की,भविष्यात होणारे संभाव्य धोके निश्चितपणे टळू शकतील आणि समाधानाने जीवन जगता येईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. 📲 9421839590/8087917063. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अडला हरी गाढवाचे पाय धरी* - एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.'' तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/04/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले. १९९०: लता मंगेशकर यांना 💥 जन्म :- १९२६: अॅमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस १९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी १९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलती 💥 मृत्यू :- २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई- राज्यातील शासकीय नोक-यांमध्ये आणि शिक्षणात अनाथ मुलांना 1% समांतर आरक्षण देण्याचे फडणवीस सरकारचे निर्देश* ----------------------------------------------------- 2⃣ *सीबीएसई पेपरफुटी प्रकरण- पकडलेल्या सर्व आरोपींना दिल्ली कोर्टाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कस्टडी.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली: अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; 10 दिवसांत पुढील निर्णय घेणार.* ----------------------------------------------------- 4⃣ *इराकमध्ये मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली: सीबीएसईची दहावीची गणिताची फेरपरीक्षा होणार नाही, विद्यार्थ्यांना दिलासा* ----------------------------------------------------- 6⃣ *आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर टीडीपी खासदारांचा राज्यसभेत गदारोळ; गदारोळामुळे दिवसभराचे कामकाज स्थगित* ----------------------------------------------------- 7⃣ *सन 1970 सालानंतर ऑस्ट्रेलियालाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय, मायदेशात पहिला कसोटी मालिका विजय साकारला.* ----------------------------------------------------- *दुःखद निधन :- नेल्सन मंडेला यांची घटस्फोटित पत्नी विनी मंडेला यांचे निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *टॉयलेट नॉट टू लेट* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/टॉयलेट-नॉट-टू-लेट/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळजिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. रष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत. कंधारचे पूर्वीचे नाव पंचालपुरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला अशी आख्यायिका आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉 शेकरू *२) औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉 ५२ *३) जागतिक चिमणी दिवस म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉 २० मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रताप रायघोळ, नांदेड 👤 सुधाकर पाटील 👤 माधव हणमंते, पत्रकार, धर्माबाद 👤 गणेश कोकुलवार, नांदेड 👤 अंकुश शिंगाडे, लेखक, नागपूर 👤 श्रीकांत गोडबोले 👤 आशा प्रदीप कसबे 👤 शंकर भोजराज, जारीकोट 👤 शिवाजी भोसले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *चिड* दुस-याला फसवता फसवता आपण स्वतः ही फसतो दुस-याला फसवून आपणच घोड्यावर बसतो दुस-याला फसवतांना कोणाचीच भिड नसते स्वतःला फसवले म्हणून स्वतः चीच चिड असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●🌱‼ *रामकृष्णहरी* ‼🌱●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा आपली परिस्थिती नाजुक असते तेव्हा कोणताही प्रसंग आपल्याला आभाळाएवढा मोठा झाल्यासारखा वाटतो.त्या प्रसंगाला किंवा संकटाला बाजूला कसे दूर करावे काही सुचत नाही आणि कुणाची मदत घ्यावी तर अशावेळी मदतीला कोणी धावूनही येत नाही.सारे जण दूरुनच पाहतात. अशावेळी आपली बुद्धीही चालत नाही आणि एक करायला गेलो तर दुसरेच काही होऊन बसते.एखाद्या पाशात/जाळ्यात अडकलेल्या हरिणासारखी अवस्था होऊन जाते.संकटं येतात ती आपली परीक्षा पाहण्यासाठीच ! पण अशावेळी न डगमगता,न घाबरता,मनाची चलबिचल अवस्था न होता,शांत चित्ताने विचार करुन त्यावर कसा तोडगा काढता येईल याचा विचार करायला शिकावे नक्कीच काही ना काहीतरी मार्ग सापडतो. संकटं ही आपल्या जीवनात आव्हानं म्हणूनच येतात तशी आपण आव्हानं म्हणूनच स्वीकारली आणि त्याला प्रतिकार केला तर ती आपल्यापासून दूरही जातात.पण अशावेळी आपल्या जीवन जगण्यातला आत्मविश्वास गमावून बसू नये.जर का आपला आपण आत्मविश्वास गमावला तर जीवन जगणे कठीण जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590 🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अति तिथे माती* - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मनियंत्रणाचे महत्त्व* एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. *तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌹जीवन विचार🌹* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍माणसाच्या जीवनात चढउतार हा असतोच.प्रत्येक सजीव जीवन जगत असतो आणि त्याचा अंतही हा अटळ असतोच.जीवनात माणसाला दु:ख , संकटे येणारच ती आली नाहीत तर ते जगणं पण एकतर्फी होऊन जाईल.व अशा एकतर्फी जीवनाची वाटचाल करताना माणूस हताश व निराश होणार व आयुष्याची व आयुष्यात येणाऱ्या माणसांची ओळख पण होणार नाही व किंमत पण कळनार नाही ,प्रत्येक श्वासासोबत क्षणक्षण आयुष्यपण संपत आहे. जगण्यातला हा क्षण अस्ताकडे झुकु लागला आहे. या हर्षमय चंद्राचा प्रकाश समोर दिसत असतांना सहज सिंहावलोकन म्हणुन संपलेल्या आयुष्यावर नजर टाकली, आयुष्याचा मागोवा घेत असताना मन खिन्न होऊन विचारमग्न झाले, अन् खुप अस्वस्थ झाले कारण आयुष्य बरंच संपलं होतं.संपलेल्या आयुष्यात काय मिळवलं ह्याचा मनाला पडलेला प्रश्न अगदी नंदादिपातला ज्योतीसारखा प्रज्वलीत होऊन प्रकाशमय झाला होता???? हेच का ते जीवन? इतके दिवस जे जगले ते व्यर्थच का ?? हा विचार मनाला शिवून गेला.आणि संपलेल्या आयुष्यात आपण कितपत ? माणूसपण जपले ? सामाजिक हित कितपत जोपासले ?आजपर्यंत कितपत सामाजिक कार्य केले आणि पुढील आयुष्यात आणखीही सामाजिक हिताचे कार्य हे आणि अशा अनेक प्रश्नांची श्रृंखला ध्यानीमनी ठासत माणसानी माणसाशी माणसासम वागणे हा एकच विचार रुजलेला स्मरणार्थ राहीला, काही माणसं मरत-मरत जगत असतात.काही माणसं जगत-जगत मरत असतात. डोळयांना धुसर अंधारी पण आली पण त्या अंधारल्या वाटेतही काही पाऊलखुणा शाबुत दिसत होत्या.मी हताशपणे अधाशपणे न्याहाळल्याही त्या तेव्हा त्या पाऊलामध्ये मला तुमची छबी दिसली व माझा अस्वस्थपणा शांत झाला कारण जरी आयुष्य बरंच संपलं असलं तरी जगणंही बरंच बाकी आहे हा विचार पक्का झाला होता व मी गमावलेल्या आयुष्यात तुमच्यासारख्या माणसांना कमावलं होतं. माझ्यासाठी तुमचं अस्तित्व अनमोल आहे.ह्याच मला लौकिक आहे.शेवटी काय तर 'माणसाच जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय आणि माणसाचं मरण म्हणजे नियतीच रुदन होय.' 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 💐शब्दांकन💐 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.( हदगाव) http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/04/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले. १९९०: लता मंगेशकर यांना 💥 जन्म :- १९२६: अॅमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस १९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी १९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलती 💥 मृत्यू :- २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई- राज्यातील शासकीय नोक-यांमध्ये आणि शिक्षणात अनाथ मुलांना 1% समांतर आरक्षण देण्याचे फडणवीस सरकारचे निर्देश* ----------------------------------------------------- 2⃣ *सीबीएसई पेपरफुटी प्रकरण- पकडलेल्या सर्व आरोपींना दिल्ली कोर्टाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कस्टडी.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली: अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; 10 दिवसांत पुढील निर्णय घेणार.* ----------------------------------------------------- 4⃣ *इराकमध्ये मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली: सीबीएसईची दहावीची गणिताची फेरपरीक्षा होणार नाही, विद्यार्थ्यांना दिलासा* ----------------------------------------------------- 6⃣ *आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर टीडीपी खासदारांचा राज्यसभेत गदारोळ; गदारोळामुळे दिवसभराचे कामकाज स्थगित* ----------------------------------------------------- 7⃣ *सन 1970 सालानंतर ऑस्ट्रेलियालाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय, मायदेशात पहिला कसोटी मालिका विजय साकारला.* ----------------------------------------------------- *दुःखद निधन :- नेल्सन मंडेला यांची घटस्फोटित पत्नी विनी मंडेला यांचे निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *टॉयलेट नॉट टू लेट* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/टॉयलेट-नॉट-टू-लेट/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळजिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. धनबुरुजावर अंबारी नावाची तोफ आहे. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. हा किल्ला १५ एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. रष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज असून अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत. कंधारचे पूर्वीचे नाव पंचालपुरी असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला अशी आख्यायिका आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉 शेकरू *२) औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉 ५२ *३) जागतिक चिमणी दिवस म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉 २० मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रताप रायघोळ, नांदेड 👤 सुधाकर पाटील 👤 माधव हणमंते, पत्रकार, धर्माबाद 👤 गणेश कोकुलवार, नांदेड 👤 अंकुश शिंगाडे, लेखक, नागपूर 👤 श्रीकांत गोडबोले 👤 आशा प्रदीप कसबे 👤 शंकर भोजराज, जारीकोट 👤 शिवाजी भोसले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *चिड* दुस-याला फसवता फसवता आपण स्वतः ही फसतो दुस-याला फसवून आपणच घोड्यावर बसतो दुस-याला फसवतांना कोणाचीच भिड नसते स्वतःला फसवले म्हणून स्वतः चीच चिड असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●🌱‼ *रामकृष्णहरी* ‼🌱●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा आपली परिस्थिती नाजुक असते तेव्हा कोणताही प्रसंग आपल्याला आभाळाएवढा मोठा झाल्यासारखा वाटतो.त्या प्रसंगाला किंवा संकटाला बाजूला कसे दूर करावे काही सुचत नाही आणि कुणाची मदत घ्यावी तर अशावेळी मदतीला कोणी धावूनही येत नाही.सारे जण दूरुनच पाहतात. अशावेळी आपली बुद्धीही चालत नाही आणि एक करायला गेलो तर दुसरेच काही होऊन बसते.एखाद्या पाशात/जाळ्यात अडकलेल्या हरिणासारखी अवस्था होऊन जाते.संकटं येतात ती आपली परीक्षा पाहण्यासाठीच ! पण अशावेळी न डगमगता,न घाबरता,मनाची चलबिचल अवस्था न होता,शांत चित्ताने विचार करुन त्यावर कसा तोडगा काढता येईल याचा विचार करायला शिकावे नक्कीच काही ना काहीतरी मार्ग सापडतो. संकटं ही आपल्या जीवनात आव्हानं म्हणूनच येतात तशी आपण आव्हानं म्हणूनच स्वीकारली आणि त्याला प्रतिकार केला तर ती आपल्यापासून दूरही जातात.पण अशावेळी आपल्या जीवन जगण्यातला आत्मविश्वास गमावून बसू नये.जर का आपला आपण आत्मविश्वास गमावला तर जीवन जगणे कठीण जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590 🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀💠🌀 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अति तिथे माती* - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मनियंत्रणाचे महत्त्व* एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. *तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*आटलेले झरे* 💧 थेंबाथेंबाने मी साचतो गरज तुमची भागवतो माझे मोल जाणावे तुम्ही सजीव सृष्टीचा मी जीव वाचवतो लागवड वृक्षांची करा तुम्ही पावसाचे पाणी साचवा आटलेल्या झऱ्यालाही पाणी पावसाचे पाणी तुम्ही वाचवा.. पाणी पुनर्भरनाची उपाययोजना भरभरून तुम्ही करा नाहीतर पुढच्या पिढीला शोधावा लागेल झरा.. 💧 आटलेला झरा सांगतो तुम्हास थेंब थेंब पाण्याचे मोल.. पावसाच्या पाण्याची करा कदर पाणी आहे खरोखरच अनमोल ☘🌴☘🌴☘🌴 〰〰〰〰〰〰 *✍प्रमिलाताई सेनकुडे* 🙏🙏 〰〰〰〰〰〰〰
*निलगगनाची साथ* इवल्याशा विश्वात माझ्या तुझा आहे अफाट पसारा शांत निळाईत पसरुनी तुच या जगाचा निवारा तुझी निलगगनाची सोबत मला माया ममतेची साथ मिळेल वास्तविक जीवनातील आयुष्याची मिळकत कळेल डोळ्यांत अश्रूंची सोबत घेते तुझ्यापर्यंत भरारी परतताना माघारी यावी नेत्रांना या नवी करारी निलगगनाची साथ तुझी शांत निळाईत रंगलेली जगावेगळी नाती माझी स्वच्छंदपणे वसलेली. 〰〰〰〰〰〰 *✍ प्रमिला सेनकुडे* *हदगाव जि.नांदेड.*
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *हनुमान जन्मोत्सव* 💥 ठळक घडामोडी :- १८६७ - प्रार्थना समाजची स्थापना. १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला. १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान. २००१ - भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या. 💥 जन्म :- १८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी 💥 मृत्यू :- २०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग २००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम संकलक- संतोष रहांगडाले गोंदिया 9404277208 *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - सहा महिन्यांत मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा उपोषणाला बसणार - अण्णा हजारे* ----------------------------------------------------- 2⃣ *मध्यप्रदेश : राज्य कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय 60 हून 62 करण्यात आले आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *बेंगळुरूः जातीय आणि बनावट बातम्या दिल्याप्रकरणी 'पोस्टकार्ड न्यूज'चे संस्थापक महेश हेगडे यांना अटक* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - देशातील आरटीई कायद्यातील शाळांकडून ७ एप्रिलला एकदिवसीय बंदची घोषणा* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक - गोदावरीच्या दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत, आरोग्याचा प्रश्न गंभीर* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : शोभा यात्रेत डीजेचा वापर केल्या प्रकरणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. डीजेचे वाहन जप्त* ----------------------------------------------------- 7⃣ *राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीरमधील शाळेसाठी 40 लाख रुपयांची केली मदत* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सैनिक : देशाचा संरक्षक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे. कोल्हापूर हे शहर व इथली माणसं ही मन जिंकून घेतात. कोल्हापूर हे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापुरी चपल ही खूप प्रसिद्ध आहे .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. श्री करवीर निवासिनी चे मंदिर खूप सुंदर आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) नोटा व पोस्टाची तिकिटे छापण्याचा कारखाना कोठे आहे ?* 👉 नाशिक *२) भारतातील दुसरी महिला मुख्यमंत्री कोण होते ?* 👉 जयललिता *३) हुतात्मा दिन कोणत्या दिवशी येतो ?* 👉 30 जानेवारी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 वंदना गुरुपवार, नांदेड 👤 गंगाधर बेलूरवाड 👤 एस. जे. पल्लेवाड 👤 विश्वनाथ आडेराव 👤 शंकर गंगुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *सोस* नको त्या गोष्टींचा काहींना सोस असतो आपण काय करतो याचाही होश नसतो नको त्या गोष्टींचा सोस नसला पाहिजे काय करतो याचा होश असला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼ 🔶🔶🔶🔶🔶🔶 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दुभत्या गाईच्या लाथा गोड* - फायदा करून देणार्याने दिलेला त्रासही सहन करावा लागतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा-समोर आले तेव्हा,कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या! दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले की, आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार...तितक्यात, श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, "पार्थ, आधी तू रथाच्या खाली उतर." त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतरच स्वतः रथाच्या खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला. जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला "अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? " तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, "युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही करू शकले नाहीत. ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भोवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस." त्याच प्रमाणे मानवी देह आहे. जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद ,सुख ,ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मोल जाणूया सत्याचे* कलीयुगात सत्याचे मोल झाले कमी प्राणीमाञाबद्दल जिव्हाळ्याची दिसत नाही हमी जन्मदात्याचा उपकाराची जाणीव नाही राहिली मनी कावडीने काशी दर्शनासाठी नेणारा श्रावण बाळ आहे का कोणी ? कलयुगात सत्याच मोल झाले कमी तोंडापुरते गोड बोलणाऱ्याची आज मिळते हमी रोष आणि विरोध दिसते इथे सारे चांगले काम करणाऱ्याला माञ बांधावे लागतात पसारे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार इथे असतो असा फापटपसारा रोज माञ दिसतो कलीयुगात सत्याचे मोल झाले कमी हरिशचंद्रासारखा राजाची आज आहे कमी 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला. 💥 जन्म :- १८९२ - कार्नेली हेमन्स, फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता. १९१० - इंग्रीड, डेन्मार्कची राणी. 💥 मृत्यू :- १९९२ - आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू. १९९७ - श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या २००० - शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ञ आणि लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम,व्हीव्हीपॅटचा वापर करणार - निवडणूक आयोग* ----------------------------------------------------- 2⃣ *अॅट्रॉसिटीच्या निर्णयातील बदलांविरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात जाणार* ----------------------------------------------------- 3⃣ *रायगडमधील भिरा येथे उच्चांकी तापमानाची नोंद. भिराचं तापमान 45 अंश सेल्सिअस.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - बँकांना फक्त दोन दिवस सुट्टी, नवीन परिपत्रकानुसार फक्त गुरुवार आणि शुक्रवारी बँकांना सुट्टी* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - मुंबईतील कमाल तापमानात घट, उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ गंगाधर विठोबाजी पाणतावणे यांचे आज दुःखद निधन* ----------------------------------------------------- 7⃣ *स्मिथच्या प्रकरणामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 2 लाख भाविक दाखल.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जुनी पेंशन योजना* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/10/blog-post_21.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. गंगाधर पानतावणे* गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपुरात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरातच झालं. 1956 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी बी ए आणि एमएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीही प्राप्त केली. महत्त्वाचं म्हणजे त्याच विद्यापीठात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. खरं तर पानतावणे यांनी मॅट्रिकनंतर लिखानाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांनी लिहिलेले `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती, शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्मितादर्श नावाचे नियतकालिक देखील त्यांनी चालविले. गंगाधर पानतावणे यांनी 2009 मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपले।दैनंदिन कर्तव्य रोजच्या रोज आणि वेळेवर पूर्ण करा त्यामुळे कामात सुसूत्रता येते.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मन:स्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?* 👉 विसर्ग संधी *२) लोकसभा सभापतीची निवड कोण करते?* 👉 लोकसभा सदस्य *३) सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण?* 👉 कार्ल लिनिअस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जयश्री पाटील, वसमत सहशिक्षिका तथा लेखिका 👤 स्वानंद बेदरकर, नाशिक 👤 प्रल्हाद धडे 👤दीपक कैवारे 👤 रमेश राजफोडे 👤विपुल पाटील जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *मन* आपण जसे असतो तसे प्रत्येकजण असत नाही कोणाच्या मनात काय आहे कोणालाच दिसत नाही कोणाच्या मनाचा कोणाला ठाव घेता येत नसतो अनुभवल्या शिवाय कोणाला भाव देता येत नसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼ 🔶🔶🔶🔶🔶🔶 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाच ही बोटे सारखे नसतात* - सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्याची दिशा* भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.'' *तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰 मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या श्रद्धा , भावना ह्या जीवनाचा आधार आहे.जीवनात श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे.एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर जेव्हा आपला विश्वास असतो, तेव्हा त्याला विश्वासाची श्रद्धा संबोधली जाते. आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनाला दातृत्वाचं अंग असाव, सेवेचं भान ,ज्ञानाच ककंण, सामर्थ्याचा कवच, त्यागाच बळ, सौजन्याच अधिष्ठान आणि *सत्याचा आधार असावा.* आपल्या जीवनातला *मी पण जेव्हा नाहीसा* होईल, आपला अहंकार जेव्हा नष्ट होईल, आपल्यातील लोभ आणि मोहाचा डोंगर कोसळून पडेल, अज्ञानाचा अंधार निघून जाईल तेव्हा आपले जीवन खरे सार्थकी लागले म्हणावे लागेल. मनुष्याच्या श्रद्धेला पुराव्याची गरज नाही.चांगल्या कर्माची, भलेपणाची , मांगल्याची विश्वास ठेवण्याची वृत्ती त्याने जोपासली पाहिजे.नव्हे ती वृत्ती त्याच्याकडे असतेच परंतु त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. 🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* प्रमिलाताई सेनकुडे 🙏🏻🙏🏻 ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/03/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८९३ - केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली १९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान. २००० - चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर. २००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. 💥 जन्म :- १९४१ - इव्हान गास्पारोविच, स्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष. १९६३ - क्वेंटिन टारान्टिनो, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक. १९७० - मरायाह केरी, अमेरिकन गायिका. 💥 मृत्यू :- १९८१ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार. १९९२ - प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय. १९९७ - भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- कृषिमूल्य आयोगाची नेमणूक करा, कृषिमूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा द्या- अण्णा हजारे* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - संभाजी भिडेला अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घातल्याशिवाय जाणार नाही, प्रकाश आंबेडकरांचा इशारा* ----------------------------------------------------- 3⃣ *रशियातील शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, 37 जणांचा होरपळून मृत्यू* ----------------------------------------------------- 4⃣ *यवतमाळ - यवतमाळ जिल्हा परिषदेचा २९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, स्वउत्पन्नात १४ कोटींची वाढ* ----------------------------------------------------- 5⃣ *चंद्रपूर - वरोरा येथील स्टेट बँक एटीएमचे लॉक हायजॅक करून 23 लाख रुपये उडविले, 9 मार्चची घटना आज बँकेच्या निदर्शनास आली* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि कुसुमाग्रज यांचे बंधू डॉ. के. रं. शिरवाडकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *सुनीत जाधवचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. * ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : मागील तीन दिवसांपासून कमाल तपमान वाढत असून काल पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिते व्हा......!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड, (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, मार्च १०, इ.स. १८६३ - मृत्यू : मुंबई, फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालां दरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही मोठी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४). *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) यंदाचा महाराष्ट्र केसरी कोणाला मिळाला?* 👉 अभिजीत कटके *२) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत?* 👉 शरद पवार *३) हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?* 👉 जयराम ठाकूर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कु. समिक्षा सत्यजित टिप्रेसवार, नांदेड 👤 प्रमोद मोहिते 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤वैदेही चिल्का, ठाणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लबाड* स्वतःची बिडी पेटवायला दुस-याच माडी जाळतात अशांना स्पष्ट बोलायचं लोक का?बरं टाळतात स्पष्ट न बोलल्यामूळे अशा लबाडांचे फावते लबाड स्वहिता पुढे लोकाला काडी लावते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना मदत करण्यासाठीच करत असे. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली.* *राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे, पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला...व साधूला बोलावून घेतले आणि विचारले तुला विद्या शिकविण्याची आज्ञा केली, तर तू नकार दिला. पण मी तुझ्याजवळ राहून ही कला शिकलो आहे.* *साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते. ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्हे.* ••●💡‼ *रामकृष्णहरी* ‼💡●•• 💡💡💡💡💡💡 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उथळ पाण्याला खळखळाट फार* - केवळ बडबड करणार्यां कडून काम होत नाही. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मनियंत्रणाणाचे महत्त्व* एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. *तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/03/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९०२ - नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व देशमान्य झाले. १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले. 💥 जन्म :- १९६९ - विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९७ - नवकमल फिरोदिया, ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती. १९९८ - डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक. १९९९ - आनंद शंकर, संगीतकार. २००१ - जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी. २००३ - हरेन पंड्या, गुजरातचे माजी मंत्री(हत्या). २००३ - देविदास सडेकर, मराठी पत्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान संपूर्ण देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवणार मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - गिरीश महाजन आज सकाळी रामलीला मैदानावर जाणार, अण्णा हजारे यांच्याकडे सरकारचा प्रस्ताव मांडणार* ----------------------------------------------------- 3⃣ *कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आज सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर बसणार उपोषणाला, विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन ५ मार्च रोजी मागे घेतले होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : आजपासून पुणे ते रायपूर थेट नवीन विमानसेवा सुरू होणार* ----------------------------------------------------- 5⃣ *विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मुंबई शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला एका सामन्यासाठी केले निलंबित* ----------------------------------------------------- 7⃣ *मोहम्मद शमी कार अपघातात जखमी, ट्रकने कारला धडक दिल्याने झाला अपघात* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : श्रीरामनवमी संपूर्ण भारतात उत्साहात साजरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - गुरुदक्षिणा* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत. बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात. जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जो व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच व्यक्ती तुमच्या जीवनाला अर्थ देऊ शकते -,स्वामी विवेकानंद *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) दर्पण पेपर कोणी सुरू केले ?* आचार्य बाळशास्त्री जांभेकर *2) मराठा व केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?* लोकमान्य टिळक *3) साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केले ?* साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेश जेठेवाड, बरबडा 👤 महेश मुतूकले 👤 अविनाश कामटकर 👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद 👤 श्रीकांत सारकलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास* गमावलेला विश्वास पुन्हा मिळत नसतो मेलेला घोडा कोणाचा पुन्हा पळत नसतो एकदा विश्वास उडाला की पुन्हा विश्वास रहात नसतो कितीही विश्वास आहे म्हणा मनात अविश्वास जात असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्-भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते.जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *डोळ्यात केर नि कानात फुंकर* - रोग एक प्रकारचा व त्यावर उपाय भलतेच. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मुंगी आणि झाडाचे पान* एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती. एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या पानाचा आकार मुंगीच्या शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा होता. तरी सुद्धा मुंगी ते पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या व्यापार्या ला मजा वाटली व त्याने त्या मुंगीचे निरिक्षण करायला सुरवात केली. ती मुंगी तिच्या कामामध्ये ‘फुल्ली कॉन्सन्ट्रेडेड’ होती. ती इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिला तिचा मार्ग अचुक ठाऊक होता. ती उगीचच इकडे तिकडे भरकटत नव्हती किंवा आपला मार्ग चुकत नव्हती. तिच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. पण ते सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन चालली होती. हे बघून त्या व्यापार्याला त्या मुंगीचे कौतूक वाटू लागले होते. पण तिच्या मार्गात एक भला थोरला अडथळा आलाच. ती मुंगी ज्या कॉन्क्रीटच्या स्लॅबवरून चालली होती त्या स्लॅबला मोठी क्रॅक गेली होती. या क्रॅकच्या दोन्ही टोकांमधील अंतर बरेच जास्त होते. मुंगीला पानासकट ते अंतर पार करणे अशक्य होते. फक्त एकटी मुंगीच काय ती जाऊ शकणार होती. आता मुंगी काय करते या विषयी त्या व्यापार्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. त्या मुंगीने ते झाडाचे पान खाली ठेवले. थोडावेळ इकडे तिकडे भटकली. परिस्थितीचे निरिक्षण केले. मग ते पान एका टोकाकडून उचलले व त्या कॉक्रिटच्या फटीवर अशा रितीने टाकले की त्या पानाचा पुल तयार होईल. मग मुंगी त्या पानाच्या पुलावरून पलीकडे गेली आणि पलीकडच्या भागात पानाचे जे टोक आले होते त्याला धरून ते पान उचलून चालू लागली. मुंगीची ही कल्पकता बघून तो त्यापारी थक्क झाला. मुंगी ती केवढीशी तर तिचा मेंदू तर किती छोटा- बघायला मायक्रोस्कोपच हवा. पण मुंगीच्या या छोट्या मेंदुमध्ये सुद्धा परिस्थितीचे निरिक्षण करण्याची आकलन शक्ती तर होतीच पण आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी लागणारी कल्पनाशक्ती पण होती. सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन तिच्या वारुळापाशी आली. तिला ते पान आता आत, वारूळात न्यायचे होते. पण वारूळाचे दार म्हणजे एक छोटे छिद्र होते. त्या छोट्या छिद्रातून ते झाडाचे पान काही केल्या आता जाईना. मुंगीने थोडावेळ प्रयत्न केला. पण नंतर तिने तो नाद सोडून तिला व ते पान तेथेच टाकून एकटीच आत निघून गेली. महत्प्रयासाने त्या मुंगीने आणलेले झाडाचे पान काही तिला वारुळात नेता आले नाही. तिची सर्व मेहेनत बेकार गेली याचे त्या व्यापार्याच्या लक्षात आले व याचे त्याला खूप वाईटपण वाटले. पण त्याच्या लक्षात आले की अरे माणसांचे पण असेच असते. माणसे आयुष्यभर निरनिराळी पाने गोळा करत असतात, काहीजण तर यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. मग ही पाने विद्वत्तेची असोत, डिग्री-डिप्लोमा- सर्टिफिकेट सारख्या शैक्षणीक पात्रतेची असोत, धन-दौलत- श्रिमंतीची असोत, मान-सन्मान-प्रतिष्ठेची असोत, ऍवॉर्ड-बक्षीसे- मानाच्या पदव्यांची असोत नाहीतर अजुन कसलीतरी असोत. पण माणुस जेव्हा मृत्युच्या दारात पोचतो तेव्हा त्याला ही पाने मागेच ठेवावी लागतात, त्याला आपल्याबरोबर ही पाने काही नेता येत नाही. मग माणूस ढेर मेहेनत करून ही पाने का गोळा करत बसतो? आणि यातील किती पाने स्वतःसाठी व किती पाने इतरांसाठी दाखवण्यासाठी असतात? याचा अर्थ माणसाने पाने गोळा करू नयेत असा होत नाही. माणसाने पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा! ती मुंगी पान नेताना इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिच्या मार्गात अनेक सुंदर फुलांचे ताटवे येत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्या फुलांचा सुगंध येत होता तो तीला जाणवत नव्हता. आजुबाजुला अनेक सुंदर दृष्ये होती पण ती तिला दिसत नव्हती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून वारुळाच्या तोंडापर्यंत नेलेले पान काही तिला वारुळात नेता आले नाही. आपली अवस्था त्या मुंगीसारखी तर होणार नाही ना याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी नाही का? 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🙏महती माऊलीची 🙏* आई तुझ्या कुशीत जगले मी निवांत तुझ्या आठवणीचा वेदना सोसेन मी मनात शांत आई तुझे शिक्षण शाळेहून मोठे जीवनातील वाटेत अडले न मज कोठे नाहीस तु या जगात विलीन झाली अनंतात कुठं टेकू मी माथा सांगाया आयुष्याची गाथा रामकृष्ण आले गेले मीही पामर जाईल तुझी महती या जगी कायमचीही राहील आई तु आहेस मातृत्वाचा झरा तुझ्या नावातच आहे जीवनाचा अर्थ खरा नाही उमगणार आई ज्यास आहे आई डोळे भरुनी येई ज्यास नाही आई चरणी ठेवूनी माथा वंदिते मी तुजला उर भरुनी येते मजला काय सांगू मी तूजला तुझविन नाही कोणी आई तुच आहे या जगतातील माई जगी तुझ्या गातील गाथा म्हणूनच तुज संबोधतात माता 🙏🙏🙏🙏🙏 〰〰〰〰〰〰 *✍ प्रमिला सेनकुडे* ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
*प्रभु श्रीरामांची वंशावळ* ०० - ब्रह्मा ०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची. ०२ - मरीची चा पुत्र कश्यप. ०३ - कश्यप चा पुत्र विवस्वान. ०४ - विवस्वान चा पुत्र वैवस्वत मनु. (याच्याच काळात जलप्रलय झाला) ०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु, १० पैकी. (याने अयोध्याला राजधानी व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली) ०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी. ०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी. ०८ - विकुक्षीचा पुत्र बाण. ०९ - बाणचा पुत्र अनरण्य. १० - अनरण्यचा पुत्र पृथु. ११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु. १२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार. १३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व. १४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता. १५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी. १६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित. १७ - ध्रुवसंधी चा पुत्र भरत. १८ - भरतचा पुत्र असित. १९ - असितचा पुत्र सगर. २० - सगरचा पुत्र असमंज. २१ - असमंजचा पुत्र अंशुमान. २२ - अंशुमानचा पुत्र दिलीप. २३ - दिलीपचा पुत्र भगीरथ. (यानेच गंगा पृथ्वीवर आणली) २४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ. २५ - ककुत्स्थचा पुत्र रघु. (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू कुळ हे *रघुकुळ* म्हणुन प्रसिद्ध झाले) २६ - रघुचा पुत्र प्रवृद्ध. २७ - प्रवृद्धचा पुत्र शंखण. २८ - शंखणचा पुत्र सुदर्शन. २९ - सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण. ३० - अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग. ३१ - शीघ्रगचा पुत्र मरु. (याच्या सत्तेने आताचे अरबस्तान # मारुधर, मरुस्थान किंवा मरूभूमी म्हणून ओळखले जायचे) ३२ - मरुचा पुत्र प्रशुश्रुक. ३३ - प्रशुश्रुकचा पुत्र अम्बरीष. (राजाने कायम संन्यस्त असावे याचा परिपाठ यांनीच घातला) ३४ - अम्बरीषचा पुत्र नहुष. (यांच्यापासुन कुरुवंश सुरु होतो) ३५ - नहुषचा पुत्र ययाति. ३६ - ययातिचा पुत्र नाभाग. ३७ - नाभागचा पुत्र अज. ३८ - अजचा पुत्र दशरथ. ३९ - दशरथचे चार पुत्र *राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.* ब्रह्माच्या *४०व्या पीढ़ीत* श्रीराम जन्मले. *चाळीस पिढ्यात* *असं झालं नाही, अस केलं नाही,* 👆चाळीस पिढ्या हे वाक् प्रचार यातुन जन्माला आले. अतिषय दुर्मिळ माहीती शेअर करित आहे ती वाचा नक्की आवडेल . ज्याने ही माहीती मिळवली त्याला माझे शतश: प्रणाम.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹💐💐💐
बिना लग्नाच्या मुलांची कविता *लग्न* वय झालं तरी अजून जमत नाही लग्न त्यात पोरींच्या अपेक्षांनी आडवं येतय विघ्न काय तर म्हणे ....... " व्यावसायिक नको नोकरीवाला पाहिजे पगार त्याचा सरकारी पाहिजे काळा नको गोरा गोरापान हवा सगळ्या बाबतीत कोरा करकरीत नवा घरा असावे दोन ताळी माडी दारात त्याच्या चार चाकी गाडी खेड्या ऐवजी शहरात असावा सासू सासऱ्याचा थोडाही त्रास नसावा तो असेल राजा मी होईल राणी कुणाचा डिस्टर्ब नको जेव्हा गाईन गाणी गर् गर् फिरणारा जो असेल भवरा माझ्या तालावर नाचेल तोच करीन नवरा ." संख्या कमी म्हणून मुलींचा रूबाब वाढलाय आधीच्या पिढीचा राग त्यांनी आमच्यावर काढलाय आमच्यासाठी आईबापानी मारल्या पोटातच मुली सांगा आता कशा पेटतील आमच्या संसारात चुली
संकलित
स्वार्थाची परिभाषा जगावे इतके छान नसावा अभिमान स्वार्थाची परिभाषा नसावी अंगात हेच मर्म बाळगावे जीवनात कुणाचा व्देष करुन नेशील तरी काय मानवा हेच वेळ आहे आता तरी सुधारणा कर तु मानवा नको बाळगु तु स्वार्थाची परिभाषा संपून जातील तुझ्या सार्या आशा होईल तुझ्यापासुन नातीगोती पारखी स्वार्थाचा परिभाषेने नको करुस परकी. 〰〰〰〰〰〰 ✍©प्रमिलाताई सेनकुडे हदगाव (नांदेड)
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट झं 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८५५ - आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली. 💥 जन्म :- १८८४ - पीटर डेब्ये, नोबेल पारितोषिक विजेता डच रसायनशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- १९४६ - अलेक्झांडर अलेखिन, रशियन बुद्धिबळ खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *बंगळुरू: कर्नाटक सरकारकडून लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची घोषणा* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : रामलीला मैदानावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू.* ----------------------------------------------------- 4⃣ *यवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ.* ----------------------------------------------------- 5⃣ *तिरूवनंतपूरम : वरून काटे व आत गोड, रसाळ गरे असलेल्या फणसाला केरळ राज्याने बुधवारी राज्यफळाचा मान बहाल* ----------------------------------------------------- 6⃣ *महाबळेश्वरमध्ये तापमानात कमालीची घट, तापमान 10.3 अंशांवर.* ----------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली - गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज 27 मार्चपर्यंत स्थगित* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीरामनवमी विशेष* रघुपती राघव राजाराम ..... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ नदीच्या अगदी पात्रात एक समाधी आहे. ती ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची आहे. त्यांचे नाव आताच्या पिढीला माहीत नसल्यास आश्चर्य नाही. विधी आणि वैद्यक या शास्त्रांचा अभ्यास केलेले अण्णासाहेब समाजकारणातील आणि राजकारणातील धुरिण होते. इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. ते अत्यंत तेजस्वी बुद्धीचे स्वदेश व स्वधर्म याबद्दल प्रखर अभिमान बाळगणारे होते. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने दिपून न जाता भारतीय संस्कृतीच्या व संस्कारांच्या तागडीत ती तोलून पाहण्याची बुद्धी त्यांच्यात होती. इंग्रजी राज्य आणि पाश्चात्य संस्कृती यांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांच्या उठावाला मान देण्यापासून विधवा विवाहापर्यंत आणि परराष्ट्रीय चळवळीपर्यंत सर्व उपक्रम करण्याची त्यांची तयारी होती. यामध्ये संस्था स्थापन करणे, वृत्तपत्रे काढणे कारखाने उभारून स्वदेशी उत्पादन करणे या सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव होता.- जगदीश विष्णू जोशी *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ?* संत ज्ञानेश्वर *2) अभंगवाणी कोणाची प्रसिद्ध आहे ?* संत तुकाराम *3) मनाचे श्लोक कोणी लिहिले ?* संत रामदास *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सोमनाथ वाळके, सहशिक्षक, बीड 👤 राम मठवाले,सहशिक्षक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *ध्यास* काही काहींना सतत नव्याचा ध्यास असतो यशस्वी होण्याचा तोच तर खरा श्वास असतो ध्यास धरणाराला खरं यशस्वी होता येत ख-या अर्थाने यशाचं गाणं त्याला गाता येत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.* *रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.* 🌹 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹 🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना वादच करायचा असतो त्यांना कोणतेही कारण लावून करता येतो.अशा वादांमुळे माणसांचे असलेले चांगले संबंध विनाकारण बिघडून जातात.पण ज्यांना सुसंवाद साधायचा असतो ते मात्र एखादे चांगले कारण शोधून जीवनात काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे त्या जीवनात इष्ट बदल घडवून नवे करण्याची जीवनाला मिळावी व जीवन समृद्ध व्हावे यासाठी एक सुसंवादातून दिशा मिळते.म्हणून जीवनात वाद करण्यापेक्षा सुसंवाद साधण्याचे अधिक प्रयत्न करायला हवेत. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *जशी देणावळ तशी धूणावळ* - जशी मजुरी द्याल, तसेच काम होईल. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ========ஜ۩۞۩ஜ= 〰〰〰〰〰〰 *मूल्यांकन* एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,"तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?" सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही." मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला," मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे." हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले. *तात्पर्य-व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून किंवा त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात.* 〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✍ *मै झुकता हूँ, क्योंकि मुझे रिश्ते निभाने का शौक है...;* *वरना* *गलत तो हम कल भी* *नहीं थे और आज भी नहीं हैं...* *मैं अपने गम में रहता हूँ,* *नबाबों की तरह..!* *परायी खुशियों के पास* *जाना मेरी आदत नहीं...!* *सबको हँसता ही देखना* *चाहता हूँ मैं*, *किसी को धोखे से भी* *रुलाना मेरी आदत नहीं..,* *बाँटना चाहता हूँ, तो बस* *प्यार और मोहब्बत...,* *यूँ नफरत फैलाना मेरी* *आदत नहीं...!!* *जिंदगी मिट जाए, किसी* *के खातिर गम नहीं,* *कोई बद्दुआ दे मरने की* *यूँ जीना मेरी आदतनहीं...!* *दोस्ती होती है, दिलों से* *चाहने पर*, *जबरदस्ती दोस्ती करना,* *मेरी आदत नहीं..!* *नाम छोटा है, मगर दिल* *बड़ा रखता हूँ...,* *पैसों से उतना अमीर नहीं हूँ...,* *मगर,* *अपने यारों के गम...* *खरीदने की हैसियत रखता हूँ।*
*विंचा पीडी नांगी ।* *ज्याचा दोष त्याचे अंगी ।।१।।* *केला पाहिजे विचार ।* *मन मित्र दावेदार ।।ध्रु.।।* *मधुरा उत्तरीं ।* *रावा खेळे उरावरी ।।२।।* *तुका म्हणे रेडा ।* *सुखें जाती ऐशा पीडा ।।३।।* *विवरण:* संत तुकाराम महाराज म्हणतात- मी सुखी असेल, तर याला कारण माझा स्वभाव असतो. आणि मी दुःखी असेल, तर यालाही कारण माझा स्वभावच असतो. मला सुख माझ्यामुळं, आणि दुःख मात्र दुसऱ्यांमुळं... असं नसतं. आपल्या सुख-दुःखाच्या कारणांविषयी स्वतःच स्वतःच्या बाबतीत विचार केला पाहिजे, यासाठी तुकाराम महाराज 'विंचू, पोपट आणि रेडा' यांच्या स्वभावाच्या चांगल्या वाईट परिणामांचा परिचय करून देताना म्हणतात... .... आपल्या अंगातले गुणदोषच आपल्या सुखदुःखाला कारण असतात. "जसं, विंचवाच्या नांगीत विष असतं, त्यामुळं तर लोक विंचवाला पाहिल्याबरोबर त्याला मारायचा विचार करतात." अर्थात विंचवाच्या दुःखाला कारण त्याच्याच नांगीतील विष असते. यावरून, आपलं मनंच आपला मित्र आणि आपला शत्रू असतो; असा प्रत्येकानं विचार केला पाहिजे." आपल्या त्रासाला, दुःखाला आपला स्वभाव म्हणजेच मन आहे, असा विचार करून 'दुरुस्ती दुसऱ्याची नाही, तर स्वतःचीच केली पाहिजे. ..... विंचवाच्या विपरीत पोपटाचं उदाहरण देताना तुकोबा म्हणतात, "पोपट गोड बोलतो, म्हणून तर लोक त्याला जवळ करतात आणि तोही लोकांच्या मस्तपैकी अंगाखांद्यावर खेळतो...अर्थात पोपटाच्या सुखाला कारण, त्याचंच गोड बोलणं असतं. ... आता विंचवाच्या दुःखाचं आणि पोपटाच्या सुखाचं कारण सांगून तुकोबा रेड्याविषयी बोलताना सांगतात, "रेड्याच्या अंगी कोणताही लोकप्रिय गुण नाही आणि कोणताही लोकप्रिय दोषही नाही. त्यामुळं, त्याला पोपटासारखं कुणी अंगाखांद्यावर खेळवावं असं सुख नाही आणि त्याला पाहून कुणी मारून टाकण्याची इच्छा धरावी, असं विंचवासारखं दुःखही नाही. विंचवाला दुःख त्याच्याच नांगीमुळं होय. पोपटाला सुख त्याच्याच गोड बोलण्यामुळं होय. रेड्याला सुख आणि दुःख दोन्हीही नाही, याला कारण त्याचाच स्वभाव होय. यावरून तुकोबांना म्हणायचं आहे की, 'माझ्या सुखाला आणि दुःखाला कारण दुसरं कुणीच नाही तर, माझाच स्वभाव आहे आणि असाच प्रत्येकानं विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या दुःखाचे दोष आपण आपल्याच जवळच्या माणसांना देऊन त्यांना दुःखी करणार नाही.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/03/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक हवामान दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९३१ - भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी. 💥 जन्म :- १९३८ - मेनार्ड जॅक्सन, अटलांटाचा पहिला श्यामवर्णीय महापौर. १९७९ - इमरान हाश्मी, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- २००७ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. २००८ - गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शेतकऱ्यांना एकूण 3373 कोटी 71 लाख रूपयांची मदत जाहीर, केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे उचलणार खर्चाचा भार* ----------------------------------------------------- 2⃣ *संसदेकडून 'पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी (Payment of Gratuity) कायद्यात सुधारणा सुचविणाऱ्या विधेयकाला मंजूरी देण्यात आली, त्यामुळे भविष्यात २० लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युईटी करमुक्त असेल. यापूर्वी ही मर्यादा 10 लाख रुपये इतकी होती* ----------------------------------------------------- 3⃣ *उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरींचं नाव; खडसेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - उबेर टॅक्सीचालकांचा संप मागे, बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांनी संप घेतला मागे* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- गोदावरी नदीसह कोणत्याही नदीत रासायनिक पाणी सोडल्यास उद्योजकावर कारवाई करणार. प्रसंगी कारखाने सील करणार. आयुक्त तुकाराम मुंढे यांची उद्योजकांना तंबी.* ----------------------------------------------------- 6⃣ *मोहम्मद शामीवरील मॅच फिक्सिंगचे ग्रहण सुटले, बीसीसीआयकडून क्लीन चीट* ----------------------------------------------------- 7⃣ *तिरंगी मालिकेत भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्महत्या : एक चिंतन* ......जेंव्हा जगणेच मुश्कील होऊन बसते आणि यापेक्षा मेलेले बरे असा जेंव्हा विचार मनात येतो तेंव्हा आपोआप ती पाऊले आत्महत्येकडे वळतात. एकाच बाबीवर जास्तीत जास्त वेळा विचार केला की माणूस टोकाची भूमिका घेऊ शकतो. माणसासमोर अनंत कष्ट आणि अडचणी असतात. त्या सर्व समस्येवर कुठे ना कुठे पर्याय असतो. मात्र ही समस्या सुटणार नाही आणि माझे काही खरे नाही असे जेंव्हा आपल्या मनाला वाटते तेंव्हा माणूस जीवन संपविण्याचा मार्ग धरतो. मात्र आजची वेळ उद्या नसते........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कल्पना चावला ( मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात ) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीपला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जसजशी प्रगती होत जाते, तसतशा प्रगतीच्या मर्यादा जास्त जास्त जाणवू लागतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) गीतांजली कोणी लिहिले ?* रवींद्रनाथ टागोर *2) आनंदमठ कोणी लिहिले ?* बंकिमचंद्र चॅटर्जी *3) श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण ?* साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मल्लिकार्जुन शिवाजी तांदळे रा.तांदुळवाडी जि. परभणी 👤 सूर्यकांत आचार्य, निवृत्त शिक्षक 👤 साईनाथ सूत्रावे, करखेली 👤 विनायक नरवाडे 👤 अशोक गड्डमवार 👤 संजय मनुरे, हिंदी कवी, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लोखंड* लोखंड गरम आहे तोवर घाव घालता येतो दक्ष राहून विरोधकाचा कसाही डाव टाळता येतो योग्य वेळी माणसाला घाव घालता आला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा सहज योग्य तुकडा केला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजच्या प्रसारमाध्यमांनी मनातल्या भावनांना बंदीस्त करुन टाकले आहे. मनातले विचार प्रकट करण्यासाठी संधीच उपलब्ध करून देत नसल्यामुळे माणसांच्या विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे चांगल्याही विचारांना मनातून बाहेर येण्यासाठी बांध घातला गेला आहे. त्यामुळे सुखी कोण..? आणि दुःखी कोण..? हे शोधणे अवघड होऊन बसले आहे. या सा-यांतून सुटका करायची असेल तर या प्रसारमाध्यमांपासून थोडे दूर राहून प्रचलित प्रसारमाध्यमांबद्दलचा मोह थोडा दूर ठेवला पाहिजे.* *त्याऐवजी थोडा संवाद, चर्चा, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करुन आपुलकीचे, प्रेमाचे, स्नेहाचे संबंध जोडण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. तरच प्रत्येकाला एकमेकांबद्दलची मनातली असणारी ओढ पूर्वीसारखी कायमची राहील. माणूस माणसाला विचारायला लागेल आणि जीवनव्यवहार सुरळीत चालायला लागतील. हाच माणुसकीचा धर्म जीवंत राहील अन्यथा माणसांपासून माणूस दूर जावून माणसामध्ये दडून बसलेली विकृती जन्मास येऊन सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही केलेला एक चांगला विचार तुम्हाला तर आनंद देतोच आणि त्या तुमच्या आनंदाबरोबरच इतरांनाही तुमच्या चांगल्या विचारांमुळे आनंद आणि प्रेरणा मिळते.म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या आनंदी जीवनाचा विचार करत नाही तर इतरांच्याही आनंदी जीवनाचा विचार करत आहात हे लक्षात असू द्या. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *हलवायाच्या घरावर तूळशीपत्र*- दुसर्याच्या जिवावर स्वतः उदार पणा दाखवणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म आणि धर्म* भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते. दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला," महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते." यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले," चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे." तात्पर्य- कर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?* 🙏🏼👇🏼 एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?" या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला. नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले." 🙏राम कृष्ण हरी🙏 *"जसे कर्म, तसे फळ."* *"कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."* 🌹🌺 🌺🌹
*आटलेले झरे* 💧 थेंबाथेंबाने मी साचतो गरज तुमची भागवतो माझे मोल जाणावे तुम्ही तुमचा जीव वाचवेन मी 🌴☘ ☘ 🌴☘🌴 लागवड वृक्षांची करा तुम्ही पावसाचे पाणी साचवा तुम्ही 💦 आटलेल्या झर्याला पाणी येईल तेव्हाच मानवीजीवन सुखी होईल. 💧 पुनर्भरनाची उपाययोजना भरभरून करा नाहीतर पुढच्या पिढीला शोधावा लागेल झरा 💧 आटलेला झरा सांगतो तुम्हा थेंब थेंब पाण्याचे मोल तुम्ही जाणा 💧 पावसाच्या पाण्याची वाट तुम्ही पहा पण त्याअगोदर एक तरी झाड लावा आणि जगवा. ☘🌴☘🌴☘🌴 〰〰〰〰〰〰 *✍प्रमिलाताई सेनकुडे* 🙏🙏 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक जलदिन* 💥 ठळक घडामोडी :- १८६८ - रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - एमिलियो अग्विनाल्डो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष. 💥 जन्म :- १९८४ - प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी पत्रकार, लेखक. 💥 मृत्यू :- *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जम्मू-काश्मिरच्या कुपवाडा येथे अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत चार जवान शहीद. चार अतिरेक्यांना कंठस्नान. तिघांचा शोध सुरू.* ----------------------------------------------------- 2⃣ *यवतमाळ : नगरपरिषदेने थकीत वीज बिलाचे एक कोटी रुपये भरल्याने बुधवारी होणारी वीज कपातीची नामुष्की टळली. नगरपरिषदेकडे दोन कोटी ८१ लाख रुपये थकीत.* ----------------------------------------------------- 3⃣ *जळगाव : मनपाच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सलग दुसऱ्या दिवशी बंद. कोट्यवधींची उलाढाल ठप्प.* ----------------------------------------------------- 4⃣ *जगभरातील रेल्वेगाड्यांना ‘चाकण’चे इंजीन, जर्मनीतील प्रकल्प येणार भारतात* ----------------------------------------------------- 5⃣ *हिंगोली : कर न भरल्याने औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयास महसूल विभागाने सील ठोकले.* ----------------------------------------------------- 6⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे लवकरच न्यायालय सुरू होणार, राज्याच्या मंत्रिमंडळाने यासंदर्भात घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *सलग दोन वेळा मि. इंडिया 'किताब जिंकणाऱ्या सुनीत जाधवला पुण्यात हॅटट्रिक नोंदवण्याचा विश्वास* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक जलदिन निमित्ताने..* पाणी म्हणजे जीवन वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/04.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रमेश देव* हे मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेत्री सीमा देव त्यांची पत्नी असून अभिनय देव आणि अजिंक्य देव ही यांची मुले आहेत. राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पंजाबची राजधानी कोणती ?* 👉 चंदीगड *२) चंद्रपूरच्या अभयारण्यचे नाव काय आहे ?* 👉 ताडोबा *३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?* 👉 पुणे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रमेश कत्तूरवार, पत्रकार, धर्माबाद 👤 सनीदेवल जाधव 👤 शंकर वर्ताळे 👤 गणेश मैद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोंधळ* रोजच्या गोंधळाला लोक हसत असतात अंधारात केलेल्या गोष्टी उजेडात येत असतात अंधारात करा की उजेडात गोंधळ बाहेर येतो आपल्याला वाटत नसला तरी चर्चेचा विषय होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका सोनाराच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले,,"दादा, आपले दुःख खरे तर एकसमान आहे. दोघांनाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"* *लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुस-याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."* *"माणसांचेही तसेच आहे, आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो."* ••●❤‼ *रामकृष्णहरी* ‼❤●•• ❤❤❤❤❤❤ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *हत्ती गेला नि शेपूट राहिले* - कार्याचा मोठा भाग पार पाडून, थोडेसे कार्य शिल्लक राहणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सवयीचा परिणाम* एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला. तात्पर्य : - जास्त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९३ - डन्स स्कोट्सला पोप जॉन पॉल द्वितीयने संतपद बहाल केले. २००५ - मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले. 💥 जन्म :- १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १६१७ - पोकाहोन्टास, मूळ अमेरिकन स्त्री, पोव्हाटनची मुलगी. १८४३ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीत नागरिकांना अडचणीला तोंड द्यावे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. बृहन्मुंबई महापालिकेला त्यासाठी ५ कोटी रुपये निधी देण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले.* ----------------------------------------------------- 2⃣ *ऊर्जा निर्मिती व रेल्वेसाठी लागणारी इंजिन्स पहिल्यांदाच तयार होणार भारतात. फोर्स मोटर्स आणि रोल्स रॉईस यांच्यात 300 कोटींचा करार* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे 15 मार्चपासून बंद. जळगाव-मुंबई विमानसेवाही बंद.* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३२० कोटी ७ लाख रूपयांचा अर्थसंकल्प वादळी चर्चेनंतर अनेक कपात सुचना मान्य करत मंजूर* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर : माळीनगर भागातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात पार्सलमध्ये स्फोट, तीन जण जखमी, पोलिसांकडून तपास सुरु.* ----------------------------------------------------- 6⃣ *आजपासून महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या पुर्नपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू, एक तास उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात मिळणार प्रवेश* ----------------------------------------------------- 7⃣ *चॅम्पियन्स ट्रॉफी 20 षटकांची व्हावी, ही तर आयसीसीची इच्छा; बीसीसीआयचा मात्र विरोध* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"हसता हसता सामोरे जा आयुष्याला* *तरच घडवू शकाल भविष्याला* *कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही* *आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मुंडा आदिवासी जमात अधिक वास्तव्य असणारे राज्य कोणते?* 👉 झारखंड *२) दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?* 👉 संयूग *३) संयूगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या सौजन्या व अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयूगाच्या केलेल्या लेखनास काय म्हणतात?* 👉 रेणूसुत्र *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 स्नेहलता कुलथे, साहित्यिक 👤 पी. अनिल, तेलंगणा 👤 शिवा जी. गुडेवार 👤 प्रवीण बडेराव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *क्षमा* लक्षात ठेवा दुबळ्यांना फक्त द्वेष करता येतो दुस-या विषयी मनात आकस धरता येतो वीर मात्र चूकणाराला क्षमा करत असतात चूकणाराला क्षमा करणारे श्रेष्ठ ठरत असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'स्पर्शसुख' म्हणजे प्रेम नक्कीच नाही. तो प्रीतीचा मुळ रंग नव्हे. तो नुसता अभिलाषेचा तवंग ! एक सवंग लालसा ! जाता येता भेटत राहते, जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लार्कने तिकीट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ऑफिसरने फाईल देताना तेच. हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुध्दा सुटाबुटात चिकटुन जाते. वर पुन्हा ‘सॉरी’चं गुलाबपाणी शिंपडायचं आणि एक औशट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलिकडचा पुरूषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत. स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील.. पुटं !* *महाभारततील युध्द समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं. तरी कृष्णाचं ऐकुन तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच, अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितलं, ‘कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. जर मी अगोदर उतरलो असतो, तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता.’ आयुष्यभर "स्त्रीदेहाचं संरक्षण असाच कुणी अज्ञात कृष्ण करीत असला पाहिजे. नाहीतर पुरूषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वीच जळून गेला असता."* *~वपुर्झा* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔱🔱🔱🔱🔱🔱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्तेपुढे शहाणपण नाही* - ज्याच्या हाती सत्ता आहे :त्याच्या मतापूढ़े इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एकदा *एका उंदराने हिरा* गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या *उंदिराला मारण्यासाठी* एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा *सगळे उंदिर एक घोळका* करून एका दुसऱ्यावर *चढून दाटीवाटीने* बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून *वेगळा बसला* होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच *उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.* हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच *उंदराला कसे काय ओळखले?* शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, *जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!* आयुष्यात *धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा* पण *आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो.* आपण ह्या *समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका..* नाहीतर त्या *मूर्ख उंदिरामध्ये* आणि *आपल्यात* काहीच *फरक* उरणार नाही..! *माणसे जोडा* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🦅🦅🦅🦅🦅🦅 *साद चिऊताईची* 🦅🦅🦅🦅🦅🦅 दिसामागून दिस गेली संख्या माझी ढळत गेली अजुनही मानवी मनाला साद कशी नाही आली 💧💦☘💧💦☘ अशी व्यथा माझी कोणी बर केली मुक्या जीवा माझा वेदना ही सोसेना झाली ☘💦☘💧☘💧☘ एकएक करूनी वाढायचे सोडूनी कमी होत चाललो आम्ही आभायातुनी ☘💧💦💧☘💧 आमच्या जीवाची हाक तुम्हांला सांगू तुमच्या सोयीसाठी जीव नका आमचा टांगु छपरावर घराचा दाणा पाणी मला ठेवा हाच माझा जीवनातील अनमोल मेवा ☘🌴💧☘💦💧☘ जिव माझा वाचेल तुमच्या हातुन हीच साद घालुनी येते मी परतूनी ☘💧💦☘💧☘ अशी चिऊचिऊची साद मि घालते अंगणी येते आनंदाने बागडते 🦅🦅🦅🦅🦅 🙏🙏🙏🙏 *✍©प्रमिलाताई सेनकुडे* 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/03/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक चिमणी दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १७३९ - नादीरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली. 💥 जन्म :- १७२५ - अब्दुल हमीद पहिला, ऑट्टोमन सम्राट. 💥 मृत्यू :- १९३४ - एम्मा, नेदरलँड्सची राणी. २००४ - जुलियाना, नेदरलँड्सची राणी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीचं वय 65 वर्ष. मानधनही 1500 रूपयांनी वाढवणार. पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा.* ----------------------------------------------------- 2⃣ *पंजाब सरकारने घेतला राज्यात हुक्का बारवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद : पैठणगेट येथे किसानपुत्र आणि शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक, विद्यार्थी, वकील आदींचा उपोषणात सहभाग.* ----------------------------------------------------- 4⃣ *दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरींची मागितली माफी. नितीन गडकरींकडून पटियाला हाऊस कोर्टातील खटला मागे.* ----------------------------------------------------- 5⃣ *चारा घोटाळा: राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव चौथ्या खटल्यातही दोषी* ----------------------------------------------------- 6⃣ *विशेष टाडा कोर्टाने फारुख टकला याला सुनावली 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी* ----------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये भारताचा फिरकीपटू युजूवेंद्र चहलची 12 स्थानाची कमाई करीत दुसऱ्या स्थानावर झेप* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने धर्माबाद येथे पक्षीमित्र क्रांती बुद्धेवार यांचेकडून पक्षी चित्रप्रदर्शनाचे आयोजन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने* क्रांती बुद्धेवार यांच्या कॅमेराने काढलेल्या विविध पक्ष्याच्या छायाचित्राचे चित्र प्रदर्शन दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10 ते 04 या वेळात धर्माबाद येथे होणार आहे. तरी आपण सर्वजण उपस्थित राहावे ही विनंती. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1462945973832172&id=100003503492582 वरील facebook वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर* द.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६) हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. १९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतातर्फे राष्ट्रकुलस्पर्धेत कोणत्या कुस्तीपटूने सुवर्णपदक पटकाविले?* 👉 सुशीलकुमार *२) देशातील पहिला हरीत रेल्वेमार्ग कोणता?* 👉 रामेश्वरम-मनामदुराई *३) दतमहात्म्य' हा सात हजा ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 वासुदेव बळवंत फडके *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जी. ए. अडकीने, केंद्रप्रमुख, बिलोली 👤 योगेश राजापुरकर, सहशिक्षक, येताळा 👤 रामदयाल राऊत, सहशिक्षक 👤 नागेश चिंतावार, सहशिक्षक, बिलोली 👤 गणेश गुरुपवार, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरे खोटे* खोटं बोलणाराला लोक समजतात चतूर ख-याला मात्र लोक होतात इथे फितूर खरं काय खोटं काय पडताळता आलं पाहिजे खरं खोटं काय ते स्पष्ट झालं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?*' *त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ, शोभीवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.* *"मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये."* ••✹✹‼ *रामकृष्णहरी* ‼✹✹•• 🌲🌲🌲🌲🌲🌲 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे. कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात. हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *साखरेचे खाणार त्याला देव देणार* - भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिच अनुकूल असते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *'विद्या विनयेनं शोभते'* *आईवडिलांची पुण्यायी* राजा ज्ञानसेनच्या दरबारात दररोज शास्त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्त्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्हणून घोषित केले जात असत त्यांना राजा धन आणि मान देऊन सन्मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्या दरबारात असाच शास्त्रार्थ चालला होता. त्या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्यात आले. राजाने त्याचा भरसभेत सत्कार केला व मान देण्यासाठी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ राजा स्वत: त्याला चव-या ढाळत त्याला घरापर्यंत सोडण्यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्मानाने घरी आला हे पाहून भारवीच्या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्याबरोबर भारवीने मातेला साष्टांग नमस्कार केला पण पित्याला मात्र उपेक्षेने उभ्याउभ्याच नमस्कार केला. त्याच्या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्याने त्याच्या त्याही नमस्काराचा स्वीकार केला आणि त्याला चिरंजीवी भव असे म्हटले. गोष्ट इथेच संपली असे नाही. मात्यापित्यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्हते. याचे कारणही स्पष्ट होते की भारवीला यश पचविता आले नव्हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्या धुंदीत शिष्टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्त्रार्थ करायला जाणार होतास त्याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्या काळात ते परमेश्वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्यांनी कितीतरी स्वत:च्या इच्छा दाबून ठेवल्या व तुला शास्त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्मत्त होऊन तू त्यांची उपेक्षा केलीस हेच आम्हा दोघांच्या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्याने मातापित्याच्या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्यात पुन्हा कधीही त्याने मातापित्यांची सेवा करण्यात कसूर केली नाही. तात्पर्य :- आयुष्यात आपल्याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास मिळाली तरी त्यापाठीमागे आपल्या आईवडीलांची पुण्याई असते हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/03/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००४ - तैवानच्या राष्ट्राध्यक्ष चेन शुइ-बियान वर हल्ला. २०१३ - राष्ट्रीय महामार्ग १७वरील खेडजवळ जगबुडी नदीवरील पुलावरुन बस नदीपात्रात कोळून ३७ ठार, १५ जखमी. 💥 जन्म :- १९८४ - तनुश्री दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. कर्करोगाचे त्वरित निदान झाल्यास उपचाराचा खर्च कमी होतो व रोगाची गुंतागुंतही कमी होते, कर्करोगाच्या उपचारांसाठी भरीव मदत देणार - मुख्यमंत्री ददेवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - देशातील प्रत्येक धर्मातील तरुण आणि तरुणांच्या शक्तीशिवाय देश बदलणे शक्य नाही : राहुल गांधी ,काँग्रेस अध्यक्ष* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर -2022 पर्यंत देशाला मोतीबिंदू मुक्त करणार - केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा* ----------------------------------------------------- 4⃣ *पाटणा - बिहारमधील सीतामढी येथे बस उलटून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 5⃣ *पालघरमध्ये रात्री 11 वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू, वीजपुरवठा खंडित* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर : विदर्भाच्या संघाने रणजी करंडकापाठोपाठ इराणी करंडकावरही कोरलं नाव* ----------------------------------------------------- 7⃣ *फायनलमध्ये भारताचा थरारक विजय, बांगलादेशचा केला चार विकेटने पराभव, निदाहस मालिका जिंकली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गणेश हरी खरे* गणेश हरी खरे (जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू०५ जून १९८५) हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) नुकतेच निधन झालेले नीरज व्होरा कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?* 👉 चित्रपट *२) दादाभाई नौरोजीनी कोणता सिध्दांत मांडला?* 👉 संपत्तीचे अपहरण *३) नुकताच कोणत्या देशाने चित्रपटगृहावरून बंदी उठवली आहे?* 👉 सौदी अरेबिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 केदार ढगे, बिलोली तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पत्रकार 👤 अशोक सोनवणे, मूर्तिकार तथा सहशिक्षक जिल्हा परिषद धुळे 👤 व्यंकटी पावडे, नांदेड 👤 मंजूषा देशमुख, अमरावती 👤 मनोज शेटकार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अनुकूल प्रतिकूल* प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कधीच अनुकूल नसते एकाला अनुकूल गोष्ट दुस-याला प्रतिकूल असते प्रतिकूल गोष्टींनाही अनुकूल करायचं असतं प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी ठरायचं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••● *ॐ 🚩 विचार धन 🚩 ॐ* ●•• *वसंतोत्सवातील उधाण आणि नवचैतन्याचा भर थोडा शमत येतो. झाडांना आलेली कोवळी पालवी चकचकीत रूप धारण करते. विविध रंगाची फुलं मनाला मोहून टाकतात. नव-अनुभूतीच्या स्पर्शानं मनाला उभारी येते आणि चैत्रपालवीच्या साक्षीनं नवीन वर्षाचा आरंभ होतो, _'वर्षप्रतिपदा !'_ घराघरातून गुढी उभारून त्याच्या आगमनाचं आम्ही स्वागत करतो. हिंदू मान्यतेप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. जीवनातील कोणत्याही नवीन कार्यप्रकल्पाची सुरूवात करण्यासाठी 'शुभदिवस.'* *खरं पाहता हा क्षण असतो गतकाळातील जीवनचक्राच्या पूर्ण झालेल्या एका फे-यात आम्ही काय मिळवलं, याचा शोध घेण्याचा. आत्मपरिक्षण करण्याचा आणि भविष्याचा वेध घेऊन नवा संकल्प निर्धारित करण्याचा. मानवनिर्मित फे-यांच्या वेदनादायी संघर्षातून स्वत:ची मुक्तता केली तरच जीवन आनंददायी होऊ शकेल. गुढीपाडव्याला आपण सर्वांनी आपल्या जीवन-जाणिवांची पुनर्तपासणी करण्याची आवश्यकता आहे. गरज आहे ती मानवनिर्मित अभिलाषांमधून स्वत:ची मुक्तता करून घेणा-या _'संकल्प गुढी'_ उभारण्याची !* ••●🚩 *रामकृष्णहरी* 🚩●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी. हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌻🌺🌸🌼🌹🌷🌻🌺🌸🌼🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलाचे पाय पाळण्यात दिसतात* - एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मनाची एकाग्रता* एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.'' तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*ओढ मायेची* मायेच्या माणसांची असते कशी ओढ म्हणूनच जगात नाही त्याला तोड.. मायेच्याच ओढीने मिळतो जीवनाला खरा अर्थ म्हणूनच त्यात नसतो कुठला स्वार्थ.. मायेच्याच आधारावर जग चालते म्हणूनच जीवन जगण्याचे ते अमृतच असते... मायेची माणसं आपली असो वा परकी म्हणूनच आपल्यालाही वाटत असतात हवीहवीशी सारखी मायेच्या माणसांना नसतो कुठलाही स्वार्थ जगण्याच्या आयुष्यातला हाच खरा अर्थ... मायेच्या माणसाचे उपकार कधीच नाही फिटत जीवन संपत आले तरी त्यांची आठवण नाही मिटत 〰〰〰〰〰〰〰 ••●===◆==◆===●•• *✍प्रमिलाताई सेनकुडे*
युगे युगे क्रीडेत रंगले अवकाशाचे असीम अंगण तेजोनिधिभोवती फिरतसे अचूक ग्रहगोलांचे रिंगण. धूमकेतुही येती जाती नक्षत्रांच्या रचना सुंदर उल्का तेजे क्षणिक तळपती खेळ चालला असा निरंतर मंथर गती या वसुंधरेची साथीला छोटासा चंदर प्रदक्षिणेची होता पूर्ती म्हणतो आले नव संवत्सर दिन रजनीचे येणे जाणे सहा ऋतूंचे सहा तराणे गतीमान त्या हिंदोळ्यावर तुमचे अमुचे झुलते जगणे. आदि अंत ना या जिवनायाखेळाच्या वळणावरती या थांबुन करुया नववर्षाला नवा सलाम 👏👏👏👏👏👏👏👏
संकलित
🌿🎸 *लाखमोलाचं वाक्य* 🎸🌿 ✍ *ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!* *जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.* *आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणी मन स्वच्छ असावं .* 🙏🙏 *👉नातं रक्ताच असो किंवा मानलेल....* *मदतीच्या वेळी जे आधार देत ते खरं नातं.
*चारोळी* *आयुष्याच्या वेलिवरती* *फुले फुलावी स्वप्नाची* *दुःख जाओ आनंद राहो* *साथ असो नात्यांची* *गोडी वाढो नव्या दिनीची* ✍📚 *शब्द संपत्ती वाढवुया* *गुढी ज्ञानाची उभारुया* 💐💐💐💐 *हीच शुभेच्छा मनी!* *नूतन वर्षाभिनंदनी !* 💐💐💐💐💐💐 *शुभेच्छूक* ✍प्रमिलाताई सेनकुडे म.रा.प्रा.शि.महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://nasayeotikar.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/03/2018 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 घडामोडी :- १९६९ - गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 💥 जन्म :- १९२६ - सीगफ्रीड लेन्झ, जर्मन लेखक. १९४५ - मायकेल हेडन, सी.आय.ए.चा निदेशक. 💥 मृत्यू :- १८८२ - विष्णुशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी, विक्रेत्यांसोबत प्लास्टिक वापरणा-यांवरही करणार कारवाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 2⃣ *अविश्वास प्रस्तावासाठी टीडीपीला शुभेच्छा. प्रस्ताव सभागृहात मांडला गेल्यास मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार: सूत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *भाजपाचा स्थापनादिनी म्हणजे 06 एप्रिल रोजी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : केंद्र सरकारचे उप सचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली.* ----------------------------------------------------- 5⃣ *पी. व्ही. सिंधूची ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक, उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहारावर केली मात* ----------------------------------------------------- 6⃣ *पंजाब - मानवी तस्करी प्रकरणात दलेर मेहंदी दोषी, पतियाळा कोर्टाचा निर्णय,थोड्याच वेळात शिक्षेची सुनावणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *अटीतटीच्या लढतीत श्रीलंकेला नमवून बांगलादेश फायनलमध्ये* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी :- कंधार येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ. माधव कुद्रे यांना राज्यस्तरीय साहित्य सेवारत्न पुरस्कार चंद्रपूर येथे प्रदान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गुढीपाडवा - विकारी विचारावर विजयाचा दिवस* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_12.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वेरूळची लेणी* महाराष्ट्रातील मराठवाडा भागात औरंगाबाद पासून ३० किमी अंतरावर वेरूळ हे एक गाव असून येथे प्राचीन लेणी आहेत. येथे १७ हिंदू, १२ बौद्ध आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे. वेरूळची लेणी साधरणत: इसवी सनाच्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरली असून प्राचीन भारतातील हिंदू ,बौद्ध आणि जैन धर्मातील परस्परसंहिता प्रकर्षाने या लेण्यामध्ये दिसून येते वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी, आणि जैन लेणी अशी विभागणी केली आहे. हिंदू लेण्यामध्ये शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पे आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. अशी लेणी कोरण्यासाठी कारागीरांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्याचा उल्लेख आहे. हिंदू लेण्यामधील वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातील सर्वात मोठे कोरीव शिल्प असून या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर निर्मिलेली आहे. मंदिर निर्माण करायला अंदाजे दोन लाख टन वजनाचा एक अखंड खडक वापरण्यात असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे. हे प्रचंड कोरीव काम पुरे करण्यासाठी अनेक दशके लागली असतील. वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी विहार स्वरुपाची असून काही विहारात पूजेसाठी मूर्तीही आहेत. या सर्व लेण्यांमध्ये विश्वकर्मा लेणी प्रसिद्ध आहेत. हे अत्यंत सुबक व नाजूक कोरीव काम असून जणू दगडा ऐवजी लाकूड कोरले आहे असे वाटते. या स्तूपात भगवान गौतम बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील मूर्ती आहे. जैन लेणी हिंदू व बौद्ध लेण्याच्या तुलनेत असून या लेण्यामधून जैन धर्माची वैराग्य भावना दर्शवितात. या बरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या जैन लेण्यांची महती सांगतात. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत त्याचा उद्देश वाटसरुंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. सोबतच त्यांना राजाश्रय, धर्माश्रय, लोकाश्रय प्राप्त असे ह्यासाठीच या लेण्याची निर्मिती केली असावी. वेरूळ लेण्याला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *"प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी"* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?* 👉🏼 गंगा नदी *२) ही नदी कोणत्या दोन देशातून वाहते?* 👉🏼 भारत व बांग्लादेश *३) या नदीची लांबी किती आहे?* 👉🏼 २,५२५ कि. मी. *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाराम ( बाबू ) गुरुपवार, बिलोली 👤 अंगद मारोती कांडले, बिलोली 👤 विलास पाटील, देगलूर 👤 जयानंद मठपती, धर्माबाद 👤 अमरसिंग चौहान, भंडारा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जिद्द* पराभव झाला तरी प्रयत्न करत राहिले पाहिजे प्रयत्न करत यशाचे स्वप्न पाहिले पाहिजे पराभव झाला म्हणून हिंमत हारायची नसते संकटाशी जिद्दीनेच लढाई लढायची असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या जीवनात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नेहमीच असतात. जीवनसरिता पुढे पुढे वाहात जाते. पाणी पुढे वाहात जाते तेव्हा मागील काळ हा भूतकाळ असतो. पाण्याला पुढे जायचे असते तेव्हा पुढचा काळ हा भविष्यकाळ असतो. जीवनप्रवाहाचे तसेच आहे. एखादे मुल वाढत असते, ते मोठे होते, तरूणवयात हे मुल असते, तैव्हा बालपण हा भूतकाळ असतो. तारूण्य हे वर्तमान असते, वृद्धावस्था हा भविष्यकाळ असतो. ग.दि.माडगुळकर यांनी या काळाचं सुंदर वर्णन एका गीतात शब्दांकित केले आहे...* *मुकी अंगडी बाळपणाची* *रंगीत वसने तारूण्याची* *जीर्ण शाल मग उरे शेवटी* *लेणे वार्धक्याचे...* *एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे।* *जीवनात खरी प्रगती करायची असेल, तर भूतकाळाला कधीही विसरता कामा नये; कारण भूतकाळ हा इतिहास असतो. एका तत्ववेत्त्याने फार सुंदर शब्दात भूत, भविष्य आणि वर्तमान या काळांचे आपल्या जीवनातले महत्व सांगितले आहे. भूतकाळाच्या खांद्यावर बसूनच वर्तमानकाळ, भविष्यकाळाची सुंदर स्वप्ने पाहू शकतो. म्हणून भूतकाळ मागे टाका; पण त्याला विसरू नका, वर्तमान जगा; पण भूतकाळाला आठवा तरच उज्ज्वल भविष्य घडविता येईल, हा विचार खरंच मोलाचा आहे.* ••●🔰 ‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..८०८७९१७०६३/९४२१८३९५९० ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎡 *म्हणी व त्याचा अर्थ* 🎡 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शेरास सव्वाशेर* - समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस*. नांदेड सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ===== ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *छोटी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*" नातं कसं असावं "* नातं सन्मानित करणारे असावे, अपमानित करणारे नसावे। नातं प्रेरणा देणारे असावे, वेदना देणारे नसावे। नातं बळ देणारे असावे, घाव देणारे नसावे। नातं साथ देणारे असावे, स्वार्थ पाहणारे नसावे। नातं सुखावणारे असावे, मन दुखावणारे नसावे। नातं बदल घडवणारे असावे, बदला घेणारे नसावे। नातं समज देणारे असावे, गैरसमज वाढवणारे नसावे। नातं कौतुकास्पद असावे, संशयास्पद नसावे। नातं विश्वसनीय असावे, प्रशंसनीय नसावे। नातं खोडकर असावे, बंडखोर नसावे। नात्यात वाद असावा, राग नसावा। नात्यात परखडपणा असावा, परकेपणा नसावा। नात्यात प्रामाणिकपणाला वाव असावा, आविर्भाव नसावा। नात्यात उपकार असावा, अहंकार नसावा। नात्यात मोकळीक असावी, देख-रेख नसावी। नात्यात मर्यादा असावी, बांधिलकी नसावी। नात्यात परिचय असावा, संशय नसावा। नात्यात चिडवणे असावे, फसवणे नसावे। नात्यात रूसणे असावे, नात्यात उसणे नसावे। नात्यात विचारपूस असावी, चौकशी नसावी। नात्यात तृष्णा असावी, वासना नसावीl नात्यात ओढ असावी, नको ती खोड नसावी। नातं समाधानकारक असावे, बंधनकारक नसावे। नातं उपायकारक असावे, अपायकारक नसावे। नातं शोभनीय असावे, उल्लेखनीय नसावे। नातं म्हणजे संवाद, नसे ते अपवाद। नात्यात असे शब्दांना जाग, भासे आठवणींचा भाग। नातं म्हणजे तात्पुरता सहवास नसावा, आयुष्यभराचा प्रवास असावा। नात्यांमुळे जीवनाला अर्थ, नात्यांविना सारं काही व्यर्थ।l *Relation is Great* *Creation of the God !!!* 💐🌳👌☘☘👍🌱🌴👏🌴🌱☘☘🌳💐💐
*पाऊसाच येणं* 💧🌧🌧🌧💦💧☔ असा पाऊस लेकाचा कळेना झाला म्या मनल एकाले काहो ऋतु कोणता आला थो मने मले काय सांगू तुमाले मार्चचा टॕक्स बसला असेल उन्हाळ्याले. असं पावसाच येणं बघा अचंबित झाल उन्हाळा आहे का पावसाळा काही कळेनासं झालं माणसावानी पाऊस वाटला कसा आज इकडे तर उद्या तिकडे दिसला जसा म्या मनलं त्यायले काहो अस म्हणता माणसाच्या परीने आणि पावसाचा सरीने बदलतील वाटा ☘🌴🌳🌲☘🌴 निसर्गाच्या रक्षणासाठी करावे लागेल कष्ट नाहीतर होईल बघा सार हळूहळू नष्ट 〰〰〰〰〰〰〰 *✍ ©प्रमिलाताई सेनकुडे* हदगाव (नांदेड)
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/03/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००५ - सम्राट कनिष्क या एर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली. 💥 जन्म :- १८७७ - मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा. १९४१ - रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा. 💥 मृत्यू :- १९४५ - गणेश दामोदर सावरकर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यातील शहरांपैकी १५२ शहरांसाठी १८५६ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *कोकणासह मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज. राज्यात हलका पाऊस होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 3⃣ *पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत आणखी एक घोटाळा झाल्याची तक्रार. 9.9 कोटींचा घोटाळा झाल्याची पोलिसात तक्रार दाखल.* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा ही जागा बिनविरोध* ----------------------------------------------------- 5⃣ *संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक न केल्यास मोर्चा काढू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : बिलोली पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी अजितकुमार डोके यांचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. 60 लाखांच्या घोटाळ्यात मुख्य आरोपी असल्याचा न्यायालयाचा अभिप्राय.* ----------------------------------------------------- 7⃣ *टी-20 मध्ये युवराज सिंगचा 74 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडणारा रोहित शर्मा ठरला भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा मॅगनीज खनिज साठ्यात भारतात कितवा क्रमांक लागतो?* 👉 प्रथम *२) मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?* 👉 मदर तेरेसा *३) दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?* 👉 सिंकदराबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रा. डॉ. सुरेश तेलंग, यशवंत महाविद्यालय, नांदेड 👤 अँड. कैलाश देशमुख गोरठेकर, उमरी 👤 अनिलकुमार जैस्वाल, कुपटी, माहूर 👤 अनिल कांबळे, जि. प. नांदेड 👤 कैलास एम. राखेवार, नांदेड 👤 बबलू भुसेवार, नांदेड 👤 सशिवम भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो खोटा खोटा विश्वास नुकसान करू शकतो आत्मविश्वास असावा पण खोटा नसला पाहिजे आत्मविश्वास म्हणजे आत्मविश्वास असला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• ☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *शितावरून भाताची परीक्षा* - एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= संत राबिया संत राबियाची ईश्वरभक्ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्वराचे स्मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्वरनिर्मिती मानून त्यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्त असताना तिच्या घरात चोर घुसला. त्याला राबियाच्या घरी धन तर सापडणार नव्हते. त्याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्याने डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्याला थोपटून पाहिले. तेव्हा त्याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्हा पुन्हा त्याची तीच अवस्थ झाली. चादर खाली ठेवली की त्याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्हा त्याला कोणीतरी म्हटल्याचा भास झाला,’’ तू स्वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्वत:चे अस्तित्व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्हा एक मित्र झोपतो तेव्हा दुसरा जागा असतो. मग त्याची कोणतीही वस्तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या राबियाचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला. तात्पर्य :-ईश्वराशी आपण एकरूप झालो की ईश्वरही आपली मनापासून काळजी करतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.'' तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना. 💥 जन्म :- १६३८ - शुंझी, चीनी सम्राट. १७६७ - अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष. १७७९ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिक : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने गोदा काठावर दोन हजार वादकांकडून ढोल ताशांचे महावादन जल्लोषात सुरू* ----------------------------------------------------- 2⃣ *नेपाळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 51 वर पोहचली, तर 20 जणांवर उपचार सुरु आहेत.* ----------------------------------------------------- 3⃣ *अयोध्या प्रकरणाची न्यायालयात 23 मार्चपासून सुरू होणार सलग सुनावणी* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तर प्रदेश - गोरखपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा उमेदवार 21 हजार 961 मतांनी विजयी* ----------------------------------------------------- 5⃣ *सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात सर्वत्र अवकाळी पाऊस ; आंबा काजू बागायतदारांवर अर्थिक संकट.* ----------------------------------------------------- 6⃣ *अभिनेता नरेंद्र झा यांचे वयाच्या 55 व्या वर्षी मृत्यू आणि शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांचं निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *निदाहास ट्रॉफी 2018 : बांगलादेशवर 17 धावांनी मात करत भारत तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये केला प्रवेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. जगदीशचंद्र बोस* पूर्वबंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २०२० साली होणारे ऑलिंपिक कोणते देशामध्ये होणार आहेत?* 👉 जपान *२) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?* 👉 यमुना *३) हेमाडपंत मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?* 👉 यादवांचा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक 👤 विलास फुटाणे, प्रकाशक 👤 संतोष कळसकर, देगलूर 👤 बालाजी मामीलवाड, मुखेड 👤 लक्ष्मण चिंतावार, बाळापूर 👤 लक्ष्मीकांत धुप्पे, नांदेड 👤 अंबादास पवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *शब्द* कोणी शब्द दिला की विश्वास ठेवला जातो लगेच विश्वास ठेवला की वेगळा अर्थ लावला जातो शब्द देणारा कडून शब्द पाळला जात नाही नंतर आरडून ओरडून काही फायदा होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *विरेंद्रराजे या नावाचे एक संस्थानिक होते. नगरप्रदक्षिणा करण्यासाठी ते आपला दरबारी लवाजमा घेऊन पहाणी करीत होते. एक दगडफोड्या अत्यंत एकाग्रतेने दगड फोडण्याचे काम करीत होता. राजा समोर येऊन उभा राहिला तरी त्याचे लक्ष नव्हते. शरीरातून घाम गळत होता, त्याचा घण आघात करीत होता. राजा गुणग्राहक होता, त्याला त्याची एकाग्रता भावली. राजाने त्याला आपल्या दरबारात काही काम दिले. प्रत्येक काम तो एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे व चोखपणे करू लागला. राजाची त्याच्यावर मर्जी बसली, बढती देता देता राजाने त्याला प्रधानपद दिले.* *प्रधानाने राज्याला प्रगतीशिल बनवले. राजाने त्याचा सत्कार केला. अनेक चित्रकारांकडून प्रधानाची उत्कृष्ट चित्र काढली. त्यातील तीन उत्कृष्ट चित्रांतून प्रधानाला एक सर्वोत्तम चित्र निवडायला सांगितले. प्रधानाने एक चित्र निवडले, राजाने त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला..पूर्वी मी दगडफोड्या होतो, या चित्रात दगडफोड्याही दाखवला आहे, माझा भूतकाळ उभा केला. म्हणून हेच चित्र सुंदर आहे. प्रधान आपला भूतकाळ विसरला नव्हता.* ••●🌟‼ *रामकृष्णहरी* ‼🌟●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात यश आणि अपयश हे आपल्या कर्मानुसार अथवा कृतीनुसार मिळत असते.जर तुम्ही तुमच्या निवडलेल्या कामात मन लावले आणि एकाग्रता ठेवली तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडले जाऊ शकते. त्याबरोबरच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.जर का तुम्ही कामात कामचुकारपणा केला की,नक्की समजून घ्या तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात आहे. म्हणून यश अपयश मिळवणे हे आपल्या करणा-या ब-यावाईट कर्मानुसार मिळत असते.मग आपणच ठरवावे की,आपण जीवनात यशस्वी व्हायचे की अयशस्वी ..! *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *लेकी बोले, सुने लागे* - एकाला उद्देशून, पण दुसर्याला लागेल असे बोलणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.* *त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...* *त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल......."* *मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये* *पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला* *वरुन माती पडतचं* *होती...काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.....सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून* *पाहीले,तर तो पहातचं राहीला...अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.* *लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.....* *असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला....* *आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???* *आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.* *म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो....शांत मनाने ती हाताळा.... खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....* *झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.* *मस्त रहा,आनंदी जगा....हेच जीवनाचे सार आहे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🦅☘हरवली पाखरं*🦅☘ उंच उंच आभायातुनी इवल्या इवल्या पंखानी झेप घेत दाही दिशांनी परतशील काय तु नभातुनी असा ओलावा मायेचा ओढ लावी जिवाला खोप्यामधील पिलाला आणशील तु खायला उंच उंच आभायातुनी इवल्या इवल्या पंखानी झेप घेत दाही दिशांनी परतशील काय नभातूनी रानीवनी फिरुनी काडी काडी जमा करुनी घरटी तुझी बांधशील असा तुझा जीव टांगशील उंच उंच आभायातुनी इवल्या इवल्या पंखानी झेप घेत दाही दिशांनी परतशील काय नभातूनी किलबिल पाखरांची बघा झाली पहाट हरवलेल्या पांखरांना मिळाली पुन्हा वाट 〰〰〰〰〰〰〰 स्वरचित काव्य ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
*👩🏻भातुकली*👳♂ जन्मोजन्मीचा संसार थाटला होता मनात भातुकलीचा खेळावानी मोडून पडला क्षणात सुखदुःखाचे धागेदोरे जुळले होते सगेसोयरे विसरू कशी मी तरी रे सोडूनी तू गेला जरी रे आईबापाचा आधार मागितला जरी जीवनभर सोडूनी गेले मज जरी वात्सल्याची ही नजर खेळ मांडूनी मायेचा सारा संसार विस्कटला पिलासाठी जीव तुझा का नाही गुंतला जन्मोजन्मीचा बंधनाचा धागा हा जुळला भातुकलीचा खेळ माझा स्वप्नासारखा तोडला साकडं तुझ्या वचनाच बंधन बांधून जन्माच आहे भास तुझा मनात येशील रोज स्वप्नात. 〰〰〰〰〰〰 *स्वरचित* *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित. १९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. 💥 जन्म :- १९६५ - आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १८८३ - कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोरेगाव-भीमा हिंसाचारावर विधानपरिषदेत निवेदन, सरकार 9 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने वाढवली आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ; यापूर्वी आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती.* ----------------------------------------------------- 3⃣ *दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कायदा. तीन वर्ष शिक्षेची तरतूद करणारा कायदा आणणार. अन्न-औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांची माहिती. विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना केली घोषणा.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - समृद्ध जीवन फूडचा प्रमोटर महेश मोतेवार याची 101.30 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *बारावी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल 4 चुका. या चुकांमुळे विद्यार्थ्यांना 7 मार्क मिळण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ - जिल्ह्यात १७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा, १२७ विहिरींचे केले अधिग्रहण, पाणीटंचाईने धारण केले उग्ररुप* ----------------------------------------------------- 7⃣ *एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी कर्णधार सरदार सिंगलाच हॉकी संघातून डच्चू, संघाचे नेतृत्व मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुंधती रॉय* अरुंधती रॉय ( जन्म: २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात ) या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे. अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, ,मेघालय येथे झाला. त्यांचे हिंदूधर्मीय वडील रणजित रॉय हे चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत. दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सतीची प्रथा कोणी बंद केली?* 👉 राजा राममोहन रॉय *२) गीतांजली कोणी लिहिली ?* 👉 रविंद्रनाथ टागोर *३) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?* 👉 महात्मा फुले *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संजय भोसले 👤 धर्मपाल धरम 👤 व्यंकट भंडारे 👤 पार्थ पवार 👤 भगवान कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *गंडे दोरे* अशिक्षितासह सुशिक्षितही गंड्या दो-याच्या मागे जातात गंड्या दो-याच्या नादाने बळी गेल्यावर जागे होतात सुशिक्षितही अशिक्षिता सारखे वागू लागतात सुशिक्षित म्हणून हे असे कसे जगू शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चार अर्थपूर्ण वाक्य एकत्र आली की,सुंदर अर्थपूर्ण रचना किंवा परिच्छेद तयार होतो.अर्थात एक वाक्य दुस-यावर आधारीत असते त्यामुळेच एकमेकांचा एकमेकांशी सुसंगत अर्थ जुळतो. त्याचप्रमाणे चार माणसे एकत्र आली आणि एखाद्या चांगल्या आणि विधायक विषयावर चर्चा घडवून आणली तर एकमेकांचा जीवनव्यवहारही व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतो.म्हणून माणसाने एकत्र येऊन विचार विनिमय केल्यास जीवनविषयक असणारे प्रश्नही सहज सुलभतेने सोडविण्यासाठी मदत होईल.त्यासाठी माणसाने एकत्रीत येण्याची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *लहान तोंडी मोठा घास* - आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वावलंबन* एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्याच शहरात चालले होते. त्यांच्यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्वाराच्या हातून चाबूक खाली पडला. त्या व्यक्तिने त्या घोडेस्वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्याची तयारी दर्शविली पण त्या सहका-यास नम्रपणे नकार देत स्वत: खाली उतरून त्या घोडेस्वाराने चाबूक स्वत:च हातात घेतला. खालून मदत करणा-या व्यक्तिने याचे कारण घोडेस्वारास विचारले असता घोडेस्वार उत्तरला,''आपण ज्यावेळी घोड्यावर बसतो तेव्हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण राहिलो तरच आपल्याला यशाची खात्री आहे असे समजावे.'' तात्पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्वावलंबनाचा स्वीकार केल्याने यश मिळतेच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/03/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली 💥 जन्म :- १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे 💥 मृत्यू :- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी हवाई कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात, 40 जणांचा मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती* ----------------------------------------------------- 2⃣ * सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगितले. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या सहीचे पत्र देण्यात आले असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पटलावर सर्व पूर्ण मागण्या मांडणार असल्याची माहिती जे.पी. गावित यांनी सांगितली.* ----------------------------------------------------- 3⃣ *संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार : अशोक ढवळे* ----------------------------------------------------- 4⃣ *देशातील एक टक्के लोकांच्या हाती चार वर्षापूर्वी ४९ टक्के मालमत्ता होती, त्याचे प्रमाण आत्ता ७३ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. अर्थात सरकारच्या नितीमुळे गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत - सिताराम येचुरी* ----------------------------------------------------- 5⃣ *परभणी : पाथरी येथे 15 पथकाद्वारे महावितरणची विशेष वसुली मोहीम सुरु. पहिल्या दिवशीच केला 350 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, यात पाथरी पंचायत समितीचाही समावेश* ----------------------------------------------------- 6⃣ *अहमदनगर : महापालिकेकडून दरमहा मिळणारे पाच लाख प्रमाणे ८० लाख रुपये थकल्याने अभिकर्ता संस्था यशवंत अॅटोने सोमवारी सकाळपासून शहर बससेवा केली बंद.* ----------------------------------------------------- 7⃣ *निदाहास चषक -भारताचा श्रीलंकेवर 6 विकेट्सनं विजय* ----------------------------------------------------- *निधन वार्ता : धर्माबाद जि. नांदेड येथील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक मोहन नारसिमलू कामिनवार यांचे निधन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गोपीनाथ गणेश तळवलकर* गोपीनाथ गणेश तळवलकर (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पिनकोडचे विस्तारीत रूप काय आहे?* 👉 postal Index Number *२) पिनकोडमध्ये किती अंक असतात?* 👉 ६ *३) भारतात पिनकोड कधीपासून सुरू झाला?* 👉 १५ ऑगस्ट १९७२ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 भगवान कांबळे, पत्रकार, धर्माबाद 👤 रुस्तुम शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *बळी* कोणी कोणाचा उगीच अंत पहायला नको अंत पहायला म्हणून नुकसान व्हायला नको अंतच पहात गेलो की उलट परिणाम होतो वाईटा बरोबर चांगल्याचा मग त्यात बळी जातो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मनी वसे, ते स्वप्नी दिसे* - जशी इच्छा असेल, तशी स्वप्ने पडणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कड्यावर चरताना पाहिला. तेव्हा तेथे आपल्याला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन तो बकर्याला म्हणाला, 'अरे तू अशा उंच आणि अवघड जागी सगळा दिवस चरतोस, हे बरं नाही. एखादे वेळी पाय घसरून खाली पडलास तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा या मैदानात कोवळे गवत आणि गोड अशी झाडाची पानं आहेत ती खा, त्याने तुला जास्त समाधान मिळेल.' त्यावर बकरा म्हणाला, 'बाबा रे, तू म्हणतोस ते खरं, पण मला तू भुकेला दिसतो आहेस, म्हणून तू जिथे आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही.' तात्पर्य : - जे लोक स्वार्थी असतात, त्यांनी आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवूं नये, कारण त्यात काहीतरी कपट असते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/03/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज. १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला). 💥 जन्म :- १८१२ - विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री. १९५७ - ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक. 💥 मृत्यू :- १९१३ - हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी. १९९८ - लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : लोकसभेच्या पोटनिवडणुकीत फुलपूरमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३८ टक्के तर गोरखपूरमध्ये ४३ टक्के मतदान* ----------------------------------------------------- 2⃣ *पनवेल शहराचा तापमान तब्बल ३९ अंशावर पोहचल्याने नागरिकांची चांगलीच काहिली उडाली* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक, शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करणार ; विविध खात्यांचे पदाधिकारी चर्चेत उपस्थित राहणार : गिरीश महाजन* ----------------------------------------------------- 4⃣ *रायगड: राेहा येथे शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या संसदिय कारिर्दिवरील विशेष लघुपटाचे प्रकाशन व प्रसारण* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर : राज्याचा अर्थसंकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या एकाचवेळी ३६ जिल्ह्यात पत्रकार परिषदा, नगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली योजनांची माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड - नांदेड शहारासह माहूर हदगाव, अर्धापुर, नायगाव मध्ये जोरदार पाऊस. शहरात वादळी वा-यासह पाऊस, अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत* ----------------------------------------------------- 7⃣ *नेमबाजी विश्वचषक : अखिल शेओरान याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल प्रकारात जिंकले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सेमी इंग्रजीची समस्या* राज्याचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार यांनी नुकतेच बीड मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजून दोन वर्षे या पदावर राहिलो तर सेमी इंग्रजी बंद करू कारण अर्धे हे अर्धे ते असे नको तर आपणास दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे अवगत असणे गरजेचे आहे. सचिव साहेबांनी हा सेमी इंग्रजीचा मुद्दा खरोखरच विचारात घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यात सेमी इंग्रजी ही एक समस्या बनून समोर येऊ नये.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *आशापूर्णा देवी* आशापूर्णा देवी ( 8 जनवरी 1909-13 जुलाई 1995) भारत से बांग्ला भाषा की कवयित्री और उपन्यासकार थीं, जिन्होंने 13 वर्ष की अवस्था से लेखन प्रारम्भ किया और आजीवन साहित्य रचना से जुड़ीं रहीं। गृहस्थ जीवन के सारे दायित्व को निभाते हुए उन्होंने लगभग दो सौ कृतियाँ लिखीं, जिनमें से अनेक कृतियों का भारत की लगभग सभी भाषाओं में अनुवाद हो चुका है। उनके सृजन में नारी जीवन के विभिन्न पक्ष, पारिवारिक जीवन की समस्यायें, समाज की कुंठा और लिप्सा अत्यंत पैनेपन के साथ उजागर हुई हैं। उनकी कृतियों में नारी का व्यक्ती-स्वातन्त्र्य और उसकी महिमा नई दीप्ति के साथ मुखरित हुई है। उनकी प्रमुख रचनाएँ हैं स्वर्णलता, प्रथम प्रतिश्रुति, प्रेम और प्रयोजन, बकुलकथा, गाछे पाता नील, जल, आगुन आदि। उन्हें 1976 में ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया था। यह पुरस्कार प्राप्त करने वाली वे पहली महिला हैं। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?* 👉 आंबोली *२) धातूच्या वाहकामध्ये भारवहनाचे कार्य कोण करतो?* 👉 इलेक्ट्रॉन *३) महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?* 👉 लोणार *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सशिवराम पेंडकर, येवती 👤 विठ्ठल हिवराळे 👤 मधुकर काठेवाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुंद मनं* आता आमचे रस्ते रूंद झाले आहेत पण आमचे मनं अरूंद झाले आहेत रस्त्यां सारखेच मनं वाढवावे लागतील माणूस म्हणून जगणारे घडवावे लागतील शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान* *ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।* *ज्ञान आणि कर्म यांचा जीवन व्यवहारात अन्योन्य संबंध कसा असावा आणि त्यानं जीवनविकास कसा घडवावा, हा अर्थपूर्ण संदेश या गीतात आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर ज्ञानानं कर्मशील व्हावं आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश या गीतात आहे. सर्व विद्यामंदिरात ज्ञानसाधना कर्ममार्गानंच झाली पाहिजे, कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले पाहिजेत, तरच ज्ञानाचा उपयोग जीवन उभारणीसाठी होईल.* *विज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी जर विनाशाचा मार्ग दाखवला, तर ते विज्ञान आणि ती विज्ञानाची प्रगती नसलेलीच बरी. विज्ञानानं करूणेच्या चरणाशी नत व्हायला हवं; कारण करूणा हा सामाजिक, सामूहिक उत्थानाचा शांतीमार्ग असतो. या शांतीमार्गाने मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ' ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान ' हा संदेश सर्वांनी अंगी बाणवला पाहिजे.* ••●🌴‼ *रामकृष्णहरी* ‼🌴●•• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी आपली मानसिकता असावी लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही* – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्म-भाव* एक आदमी संत तुकाराम का कीर्तन सुनने तो नित्य ही आता पर उनसे बहुत द्वेष रखता। वह मन ही मन किसी अवसर पर संत तुकाराम को नीचा दिखाने की ताक में रहा करता था।एक दिन तुकाराम की भैंस उसके बाग के कुछ पौधे चर आई। बस वह आकर लगा गालियाँ सुनाने। इस पर भी जब संत उत्तेजित न हुए तो उसे और भी गुस्सा आया और एक काँटों वाली छड़ी लेकर तुकाराम को इतना पीटा, कि रक्त बहने लगा। फिर भी तुकाराम को न क्रोध आया, न प्रतिरोध ही किया। संध्या समय जब वह व्यक्ति नित्य की भाँति कीर्तन में नहीं आया तो संत तुकाराम स्वयं उसके घर गए और स्नेहपूर्वक भैंस की गलती की क्षमा माँगते हुए उसे कीर्तन में ले गए। अब वह व्यक्ति तुकाराम के चरणों में पड़ा और क्षमा-याचना कर रहा था। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*पतंग* आयुष्यातील वाटचाल झेप घेते भरारीने पतंगासारखे उडवून जाते आकाशाने जीवनाच्या वाटचालीत किती भोगशीलरे वेदना उंच उंच गेला तरी हातातील दोर सूटेना सुटेल जरी दोर हातातुनी कसा उडशील तु नभातुनी माझा मनाचा मागोवा घेशील का मनातुनी गाभाऱ्यातुनी आज पतंगासमवे उडशील का उंच उंच आकाशात झेप घेत भरारीने येशील का? 〰〰〰〰〰〰〰 ✍प्रमिलाताई सेनकुडे हदगाव.(नांदेड)
🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩 *११ मार्च - धर्मवीर शंभूराजे बलिदान दिन...* *संभाजी महाराज..... एक वादळी आयुष्य....* *संभाजी महाराजांचे एकूणच आयुष्य अनेक वादळांनी भरलेलं होत... परंतु अश्या सगळ्याचं वादळांना कायम झुंज देत ते लढत राहिले...म्हणूनच इतिहास त्यांना, "सर्जा" आणि "रौद्रशंभू" सारख्या नावांनी ओळखतो...शिवराय आणि सईबाईंच्या संसारवेलीवर "शंभू" नावाचे "सूर्यफुल" जन्माला आले.. हो, हो त्यांना सूर्यफुलच म्हणावे लागेल... कारण त्यांच्यात जशी सूर्याची आग आणि तेजस्वीपणा होता.... तसेच फुलासारखे कोमल कवीचे हृदय, कविमन सुद्धा होते...असे हे सूर्यफुल अजाणते पणाच्या वयातच आपल्या आईच्या मायेला पारखे झाले... हा होता नियतीचा पहिला आघात...जिजाऊ मांसाहेबांच्या छत्रछायेखाली, आणि शिवरायांच्या, महाराजांच्या सोबतीत शंभूराजे मोठे झाले...छत्रपतींचेच संस्कार त्यांच्यावर झालेलं... मग मावळ्यांच्या सोबतीला ते कसे पारखे होतील ??? लहानपणापासूनच शंभूराजेंना, रयतेची मावळ्यांची ओढ होती... त्यातूनच रायाप्पा महार सारखे जिवलग हिरे ह्याच मावळ खोर्यातून त्यांनी निवडले होते...वाढत्या वयाच्या तिप्पट वेगाने, मनाने आणि मेंदूने शंभूराजे वाढत होते... ज्या वयात मुलं खेळ, आणि बाजारगप्पा मध्ये रमतात... त्या वयात शंभू राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून सगळ्यांना अवाक करून सोडले होते... नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक या ग्रंथांची सुद्धा त्यांनी निर्मिती केली..त्यांची समशेरीवरची पकड... त्यांच्यातल्या योद्ध्याची जाणीव करून द्यायची.... त्यांनी घोड्यावरची मांड ठोकून बसण्याची पद्धत त्यांच्यातल्या वायुवेगाची चुणूक दाखवायची... त्यांनी घोड्यांचा वापर फक्त युद्धासाठी केला नाही तर त्याचे अश्वप्रेम सुद्धा त्याच तोडीचे होते...आई नकळत्या वयात गेल्यानंतर, जिजाउंच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती,,,, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसात हि मायेची पाखर सुद्धा हरपली...* *हा होता नियतीचा दुसरा आघात...यानंतर अनेक राजकारणी आघात सुद्धा त्यांनी सोसले पण ते खंबीरपणे उभे राहिले... पण जेव्हा शिवरायांचे निधन झाले... तेव्हा त्यांचा उरला सुरला भक्कम आधार सुद्धा नाहीसा झाला... आणि ते पूर्ण खचून गेले... पण त्यांच्या या मनावरच्या आघाताचा त्यांनी स्वराज्यावर परिणाम होऊ दिला नाही....रौद्रशंभू, दुप्पट तेजाने उजळून निघाले... एकाच वेळी पाच पाच शाह्या मोडून काढण्यासाठी ते जोमाने उभे राहिले.... त्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात, बुऱ्हाणपूर वरील छापा, मुरुडजंजिरा, आरमार उभारणी, यासारखी अनेक आव्हाने आणि घटना घडून गेल्या...केवळ ९ वर्षाच्या कारकिर्दीत, स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत त्यांनी पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही.मातीसाठी लढलेल्या ह्या राजाने मातीसाठी आपला देह ठेवला... स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे करून मृत्यूला मिठी मारली...* *ते "शिवपुत्र" म्हणून जन्माला आले... पण "सिंहाचा छावा" बनून जगले...स्वराज्याच्या ह्या दुसर्या रणधुरंधर, राजबिंड्या वादळास माझा मानाचा मुजरा...* *जय जय रौद्रशंभो !!* *जय जय शंभुराजे !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *शंभूराजांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.......🙏🙏🙏*
माझी मुलगी मोठी झाली. एके दिवशी सहज म्हणाली, *"पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?"* मी म्हटलं, "का रे पिल्लू असं का विचारतेस?" ती : "काही नाही असंच." मी : "नीट आठवत नाही. पण एकदा " ती : "कधी?" तिनं अधिरतेनं विचारलं. मी म्हणालो, "तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं. कारण मला बघायचं होतं की, तू काय उचलतेस? तुझी निवड ठरविणार होती की, मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस. जसे *पैसे* म्हणजे संपत्ती, *पेन* म्हणजे बुद्धी आणि *खेळणं* म्हणजे आनंद. मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो. मला बघायची होती तुझी निवड. तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो. तू रांगत-रांगत पुढे आलीस. मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस. माझ्या लक्षातच नाही आलं की, "या सगळ्यांबरोबर मीसुद्धा एक *निवड* असू शकतो." ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस. *खास मुलींच्या पप्पांसाठी.* खरंच मुलगी पाहिजेच. One of the best message received.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*ज्याने रचना केली त्याला 1,00,000 वेळा सलाम करतो..* छान कविता..... 👍👍👍🙏👌👌👌 घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊 म्हणून आत्महत्या करते ? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही 🐅 घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ?🎭 हात नाहीत सुगरणी ला फक्त चोच घेउन जगते स्वतःच विणते घरटे छान कोणतं पॅकेज मागते ?🕴 कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी निवेदन घेउन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी ? घरधन्याच्या संरक्षणाला धाऊन येतो कुत्रा लाईफ इन्शुरन्स काढला का ? अस विचारत नाही मित्रा 🐕 राब राब राबून बैल कमाउन धन देतात सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂 कष्टकर्याची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या रोपा सारखं पाषाणावर टिकलं पाहिजे🤕 कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित तरीही मोर फुलवतो पिसारा अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧 🐝मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही घाबरू नको कर्जाला भय, चिंता फासावर टांग जिव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकाऊण सांग😎 काळ्या आईचा लेक कधी संकटापुढे झुकला का ? कितीही तापला सुर्य तरी समुद्र कधी सुकला का ?🌊💦 निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय तु फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑 निर्धाराने जिंकु आपण पुन्हा यशाचा गड आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ👊 फक्त हिमतीने लढ👊 🌺🌷!!
🌺🌺महाराष्ट्रीयन🌺🌺 एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला. काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॅालमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. मालकाने त्याला बोलावले व पूर्वानुभवाबद्दल चौकशी करून त्याला नोकरी दिली. दुस-या दिवशी तो गृहस्थ कामावर आला. दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले. मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले. त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला. मालक चिडला व म्हणाला बाकीच्यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ! तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल. मालक चिडूनच पुढे म्हणाले किती डॅालरचा व्यवसाय केलास ? कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील...? असा विचार मालकाने केला. तो गृहस्थ म्हणाला दीड लाख डॉलर ! क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच ! बाकीचे सेल्समनही अचंबित झाले. मालक म्हणाले, काय विकलेस तू त्याला ? तो म्हणाला एक मासे पकडायचा गळ विकला. पण त्याचे एवढे पैसे कसे..? मी त्याला फिशिंग रॅाडही विकला. मग गळाला लागणारे खाद्य विकले. मासे जास्त जिथे मिळतात त्या ठिकाणचे पाणी खोल आहे व तो भाग दुर्गम आहे, त्यामुळे बोटीने जावे लागेल, म्हणून आपल्या बेसमेन्टमधल्या गोडावूनमधून एक डबल इंजीनवाली मोटरबोट विकली. तिकडे आठवडाभर रहाव लागेल म्हणून पुरेल एवढे खाद्य पदार्थ व दोन क्रेट बीयरही त्यालाच विकली सर ! एव्हाना मालकाचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते. मालक म्हणाले, कसला रे माणूस आहेस तू ? केवळ एक गळ विकत घ्यायला आलेल्या माणसाला तू हे विकून दाखवलेस...! तो गृहस्थ म्हणाला, नाही सर, तो माणूस डोकेदुखीवरचे औषध व बाम मागत होता. मी त्याला पटवून सांगितले की, डोकेदुखी घालवायची असेल तर फिशींग करा. आणि हे सर्व घडून आले. मालक म्हणाले, आजपासून तू माझ्या खुर्चीत बस बाबा ! गुरु आहेस तू कुठे काम करत होतास भारतात ! तो म्हणाला, महाराष्ट्र राज्यात शिक्षक होतो !!!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". smt.pramilatai senkude. नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणूनच कन्फ्यूशियसने म्हणले आहे 'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.' ================= 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐
🙏📚✍ *विद्येची खरी देवता..!* *ज्यांनी आपले आयुष्य गोर-गरीब, उपेक्षित घटकांच्या उध्दारासाठी वाहून घेतले..!* *स्त्री शिक्षणासाठी अनंत अडचणीवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला !* *अशा या महान व्यक्ति...* _*'सावित्रीमाई फुले'*_ *यांच्या पूण्यतिथीनिमित्त...* _*विनम्र अभिवादन..!!!*_ 💐💐💐🙏🏻💐💐💐 smt.senkude. 🙏
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज. १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला). 💥 जन्म :- १८१२ - विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री. 💥 मृत्यू :- १९१३ - हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी. १८९७ - सावित्रीबाई फुले १९९८ - लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात मदत करण्याची अमेरिकेच्या निओडॉक्टो फाउंडेशन कंपनीने दाखवली तयारी* ----------------------------------------------------- 2⃣ *काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. पंतगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन* ----------------------------------------------------- 3⃣ *महापुरुषांचं साहित्य वेब पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटींची तरतूद.* ----------------------------------------------------- 4⃣ *जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटींची तरतूद. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवण्यासाठी उपाययोजना.* ----------------------------------------------------- 5⃣ *नंदुरबार- दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला शहादा सेंटरवर कॉपी पुरविणारे तीन शिक्षक निलंबित. व्ही.के.शहा विद्यालयातील केंद्रावर घडला होता प्रकार.* ----------------------------------------------------- 6⃣ *हरियाणा- फरिदाबादमधील कृष्णा कॉलनी सेक्टर 25मधील पूल कोसळला. जडवाहन जात असताना घडली घटना. जिवीतहानी नाही.* ----------------------------------------------------- 7⃣ *कोणत्याही खेळाडूची कॉपी करु नका - अंजिक्य रहाणेचा सल्ला* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धेत सहभागी प्रमाणपत्र http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_3.html सहभागी सर्व स्पर्धकांनी हे प्रमाणपत्र download करून घ्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सावित्रीबाईनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथना आश्रय मिळवा हि त्याची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच १८७६ – ७७ मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या. आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांना मृत्यू आला. समाजातल्या दिनदलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचारणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) बावनकशी हे पुस्तक कोणी लिहिले ?* सावित्रीबाई फुले *02) सावित्रीबाई फुले यांचा जन्म केंव्हा झाला ?* 03 जानेवारी 03) हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?* बालिका दिन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शिवराज सावंत, सहशिक्षक, रत्नागिरी 👤 वीरभद्र मिरेवाड, सहशिक्षक तथा कवी 👤 साईनाथ शिरपूरे, भाजपा कार्यकर्ता 👤 नागनाथ लाड, सहशिक्षक, कुंडलवाडी 👤 विठ्ठल नवाथे, सहशिक्षक, सायखेड 👤 संतोष पवार 👤 उमाकांत बांगडकर 👤 शिवाजी जाधव, साहित्यिक, मरखेल 👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक 👤 माधव आप्पा पडोळे, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *तुलना* तुलना करावी पण अवहेलना करू नये तुलना म्हणजे कोणाची अवहेलना ठरू नये अवहेलना केल्याने व्यक्ती एकदम खचतो अवहेलनात्मक शब्द त्याला सारखा बोचतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.* *खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼ ★●•• 🔰🔰🌺🌺🔰🔰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वप्न पहायला परिश्रम,वेळ आणि पैसा कधीच लागत नाही परंतु पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी वेळ, परिश्रम आणि पैसा हा लागतोच तेव्हा कुठे स्वप्न पूर्ण होतात.केवळ स्वप्नांना कल्पनेत न ठेवता ती प्रत्यक्षात उतरावयाची असतील तर हे तुम्हाला करावेच लागेल.अन्यथा स्वप्न स्वप्नच राहतील. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये* - एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हरिण व कोल्हा* एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.' तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.' 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात. १९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला. 💥 जन्म :- १९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष. १९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू. 💥 मृत्यू :- १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट. १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 📺📺📺📺📺📺📺📺📺📺 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तारापूर एमआयडीसी मधील रामदेव केमिकल ह्या कंपनीला आग लागून बॉयलरचा स्फोट, बोईसर,पालघर,सातपाटी आदी 20 किमी क्षेत्रात जाणवले हादरे, भूकंप झाल्या* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्याचा 2018-19 चा अर्थसंकल्प आज विधिमंडळात होणार सादर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी साधला संवाद* ----------------------------------------------------- 3⃣ *नागालँड- नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो व मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई- राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर यांना भाजपाकडून उमेदवारी* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- 1993 बॉम्ब स्फोटातील फारूख टकलाला मुंबईत आणलं. 1993 च्या बॉम्बस्फोटात फारूखचा हात. टकलाला 1995 साली दिली होती रेड कॉर्नर नोटीस.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - तेलगू देशम पार्टीच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी दिले राजीनामे* ----------------------------------------------------- 7⃣ *निदाहास चषक 2018 : भारताचा बांगलादेशवर सहा विकेटने विजय, धवनचे अर्धशतक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *वेळ नाही मला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विद्याधर गंगाधर पुंडलिक* मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी. पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे. साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *श्वास व विश्वास दोन्हीं अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो?* 👉 २४ नोव्हेंबर *२) स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?* 👉 राजस्थान *३) मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्याना मजूरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते?* 👉 ग्रामसेवक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शिवा वसमतकर, वसमत 👤 शिवाजी साखरे 👤 अरविंद फुलसिंग आडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अहंकार* अहंकाराच्या गोष्टी स्वतःलाच मान्य होतात अहंकार येतो तेंव्हा तुम्ही शून्य होतात अहंकाराच्या अंधारात मोठा माणूस छोटा होतो अहंकार सुटला की माणूस फार मोठा होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"* 😢 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 😢 😰😰😰😰😰😰😰😰😰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *भीक नको : पण कुत्रा आवर* - ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता, उलट संकट ओढवणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल. अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते, "This too shall pass " म्हणजे "हाही क्षण निघून जाईल" केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले, " महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये." This too shall pass ! हे क्षणही निघून जातील. ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे. ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *🌺 जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 *जगातील सर्व माणसं सुखासाठी धडपडतात.अनेक संकटांना तोंड देतात.कधी हरतात ,तर कधी जिंकतात. जिंकण आणि हरणं हे शेवटी एका क्षणाचं असतं.हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस अंतर्मुख होऊन विचार करतो.* *आपल्या आत्मयाचा आवाज परमात्मयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो देवापुढं काही मागणं मागतो.अस मागण म्हणजे तो प्रार्थना करतो.* smt.pramilatai senkude. *या प्रार्थनारुपी हाकेतून आत्म्याची निश्चित उत्कंठा करतो.प्रार्थना ही पण दोन प्रकारे केली जाते.सकाम आणि निष्काम प्रार्थना.जेव्हा आपण देवापुढ काही मागतो ते सकाम प्रार्थना आणि जेव्हा आपलं काही देवापुढ मागणं नसतं आहे त्यात समाधान मानने असते ही झाली निष्काम प्रार्थना.* *प्रार्थना ही धैर्य आणि आत्मबलाची जननी आहे.आपले जैविक आणि आत्मबल वाढविण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत* *आहे.स्वार्थारहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना होय.* *संत तुकाराम महाराज म्हणतात , 'न लगे मुक्ती धनसंपदा ' संत तुकाराम महाराजांनी देवापुढं मुक्ती मागितली नाही तर भक्ती मागितली.ईश्वराविषयीचा उत्कट प्रेमातून प्रार्थना जेव्हा जन्म घेते तेव्हा ती खरीखूरी भक्तीमय प्रार्थना असते.*👏🙏 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 🙏श🔶ब्दांकन/संकलन🙏* ✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) सह.शिक्षिका जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक महिला दिन.* 💥 ठळक घडामोडी :- १९४३ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला. १९८८ - फोर्ट कॅम्पबेल, केन्टकी येथे दोन हेलिकॉप्टरची टक्कर. १७ सैनिक ठार. 💥 जन्म :- १९६३ - गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 📺📺📺📺📺📺📺📺📺📺 *ही audio* ऐकण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे. https://drive.google.com/file/d/1P5wSFlTAzNcKDSzWhtG0oFFpLlp2P_yx/view?usp=drivesdk *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात सिंगापूर आणि इंडोनेशियाचा दौरा करणार असल्याची सुत्रांची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - आजारपणावरील उपचारांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेला रवाना* ----------------------------------------------------- 3⃣ *समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना राज्यसभेची उमेदवारी.* ----------------------------------------------------- 4⃣ *अमरावतीत तयार होणार विमान हल्ला विरोधी तोफा, 540 एकरावर, 400 कोटींची गुंतवणूक, भारत डायनॅमिक्स लिमिटेड चे अध्यक्ष व्ही. उदय भास्कर यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *नंदुरबार : अपंग युनिट अंतर्गत बोगस शिक्षक भरती प्रकरणी विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा, एसआयटी द्वारे चौकशी करण्याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा* ----------------------------------------------------- 6⃣ *उस्मानाबाद : बोगस परीक्षार्थीला बसवून सरकारी सेवेत रुजू झालेले 15 अधिकारी अटकेत.* ----------------------------------------------------- 7⃣ *गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कॅप्टनपदी नियुक्ती.* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : मराठी राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर, डॉ. शरयु शहा, अथर्व सुतार, रुचिता महानोर आणि दीप्ती क्षीरसागर यांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= साहित्य स्पंदन आणि आपली माणसं समुहाकडून जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित *मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धा* निकाल .....! निकाल ......! निकाल ..... http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_13.html पूर्ण निकाल पाहण्यासाठी वरील ब्लॉगला भेट द्यावे. =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक महिला दिन* महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करावा यासाठी आवाहन केले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) यूनोने जाहिर केलेले जागतिक महिला वर्ष कोणते ?* 1975 02) जगात पहिला महिला दिन केव्हा आणि कुठे साजरा झाला ? २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क *03) भारतात जागतिक महिला दिन केव्हा पासुन सुरुवात झाली ?* 1943 *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ नुतिवाड, पेंटर, नायगांव ध. 👤 संभाजी पाटील, सहशिक्षक, जळगाव 👤 बालाजी कदम, चिरली 👤 मारोती भोसले, सहशिक्षक, धर्माबाद 👤 उत्तम शिंदे, सहशिक्षक, नायगांव 👤 श्रीनिवास भुतावळे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्त्री शक्ती* बाहेर फक्त घोषणा देतो स्त्री म्हणजे शक्ती आहे माय माऊलीला खरंच घरात किती मुक्ती आहे कर्मात अन् विचारात तिला मुक्ती असावी वरवर दाखवण्या पुर्ती महिला भक्ती नसावी महिला दिनाच्या शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 दि.08:03:2018 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"* 😢 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 😢 😰😰😰😰😰😰😰😰😰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चांगल्या आणि उच्च विचारांची पायाभरणी ही आपल्यावर झालेल्या संस्कार आणि शुद्ध आचरणावरच अवलंबून असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *भित्यापाठी ब्रह्मराक्षस* - भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *माझी वाटचाल* स्त्री जन्माला आली तु हीच आहे तुझी पुण्यायी घेऊन नवी दिशा नवी वाट आज महिला दिनाची आहे मंगलमय पहाट जीवन असले आपुले संघर्षाचे वाटेत काटे रुजतील धोक्याचे कुणास न घाबरता जग तू अभिमानाने यशाचा शिखरावर जा तू प्रयत्नाने जीवनाच्या या लढाईत आहेस तू मजबूत सक्षम होऊनी चालूया समानतेचा हक्काने जगूया स्त्री जन्माला आली तू हीच आहे तुझी पुण्यायी 〰〰〰〰〰〰〰 *✍स्वरचित काव्य* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.(सहशिक्षिका)* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
स्वरचित काव्यरचना *माझी वाटचाल* स्ञी जन्माला आली तु हीच आहे तुझी पुण्यायी घेऊन नवी दिशा नवी वाट आज महिला दिनाची आहे मंगलमय पहाट जीवन असले आपुले संघर्षाचे वाटेत काटे रुजतील धोक्याचे कुणास न घाबरता जग तू अभिमानाने यशाचा शिखरावर जा तू प्रयत्नाने जीवनाच्या या लढाईत आहेस तू मजबूत सक्षम होऊनी चालूया समानतेचा हक्काने जगूया स्ञी जन्माला आली तू हीच आहे तुझी पुण्यायी 💐🌺🌹☘🌹💐🌹 *महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा!* 〰〰〰〰〰〰 *✍स्वरचित काव्य* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.(सहशिक्षिका) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰
फुलवूया ज्ञानाचा मळा ज्ञानाचा मळा आहे तुझी माझी शाळा आपल्याच मेहनतीने लागेल बालकास लळा llधृll मराठी शाळेची गोडी आहे बघा न्यारी; जिल्हा परिषद शाळा आमची लई लई भारी ! नवी दृष्टी ,नवी सृष्टी लाभते ही ग्रामीण भागाला; विशाल करुनी भावविश्वा सुंदर करते जीवनाला. ध्यास लागला शाळेचा फुलवू मळा गुणवत्तेचा; सार्थक होईल जीवनाचे, करुनी उद्धार बालकाचा.. 〰〰〰〰〰〰 ✍स्वलिखित रचना श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.(सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰〰 *🌺 जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰〰 *जोवर प्रकृतीच्या वर उठण्याची धडपड करीत आहे तोवर माणूस हा माणूसच असतो.ह्या प्रकृतीतही अंतःप्रकृती व बहिःप्रकृती अशी दोन उभयविध भाग असते.बाह्य प्रकृतीला जिंकणे ही फार चांगली आणि फार मोठी बाब आहे ह्यात काही शंका नाही.पण आपली अंतःप्रकृती जिंकणे ही खचितच त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे.* आपल्या ह्या उपयुक्तततावादी जीवनात आपले चांगले कर्मच आपल्या सोबत आपल्या अंतदायी स्वरुपात आपल्या दृष्टीआड कामी पडतील कारण आपल्या जीवनाचा जाळ फार मोठ्या विपरीत तान्या-बान्यानी विनला गेला आहे.जे दृष्टीगत होते ते वास्तविक नाही आणि जे आम्हाला दिसत नाही ज्याच्याशी आमचा संबंध नाही ते वास्तविक आहे. सत्य आहे दोन विपरीत किनाऱ्यांच्या मध्ये वाहनार्या नदीचे नाव जीवन सरीता आहे पूर्वेने पश्चिमेकडील याञेवर निघणाऱ्या सूर्याचे नाव🌞जीवन आहे . लोक उगवत्या 🌞सूर्याला तर🙏प्रणाम करतात.परंतु डुबत्या सूर्याला कोणी प्रणाम करत नाही.हीच जीवनाची भूल आहे.जन्म आणि मरणाच्या मध्ये जीवनाचे नीर वाहते,या दोन तटांमध्ये जीवनाची धारा वाहते. जसे जन्माच्या सोबत मृत्यू आणि मृत्यूच्या सोबत जन्माची छाया चालते. सावलीला कोणी पण कधीही वेगळे करू शकत नाही.कोणाच्या सावलीवर पाय ठेवून उभे राहून जा सावली पायाच्या वरती येवून जाईल डोक्याच्या वरती येऊन जाईल परंतु नष्ट होणार नाही.मृत्यूची पण हीच स्थिती आहे. आपण जेव्हापर्यंत संसारामध्ये कर्माच्या सूर्याच्या खाली चालत आहात.तेव्हापर्यंत जन्म मरणाच्या छायेचा अंत करू शकत नाही. म्हणून आपले चांगले कर्मच आपल्या कामी येतात. "मनुष्याच्या रुपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही.माणसाच्या कार्यामुळे,त्याच्या कर्तूत्वामुळेच त्याचा गौरव वाढत असतो." *शेवटी 🙏'कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो'*. *'कर्मे ईशू भजावा'.*🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) जि.प.प्रा.शा. वाटेगाव, हदगाव, नांदेड 〰〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐
जीवनातली रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या सहभागामुळे, विविध रंगांमुळे....!!! आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्यात सामील होतात.... आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात...... प्रत्येकाचे रंग निराळे....!!! मग हे रंग कधी शहाणपणाचे कधी वेडेपणाचे; कधी उत्साहाचे तर कधी नैराश्याचे... कधी शांततेचे...धीरगंभीरतेचे....आतुरतेचे तर कधी विरहाचे.......अशी ही आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांनी सजलेली रंगपंचमी आपल्या आयुष्यात कधी आपल्याला हसवते...कधी रडवते...खिन्नता आणते...विचार करायला लावते... विचारहीन बनवते... कधी अपराधी बनवते...हतबल बनवते... संयमी बनवते.... अचानक गप्प बसवते...आणि या विविध मानवी भावनांच्या कल्लोळात अचानक एकटं पाडते.... पुढच्याच क्षणी आपल्या एखादया दडवून ठेवलेल्या आठवणींचं रान मोकळं करते, अन् मग सुरु होतो पुन्हा एक लढा.... भूतकाळ आणि वर्तमानात दोलायमान झालेल्या मनाचा.... आणि पुन्हा त्या मनाला सावरण्याचा....!!! मात्र या सगळ्यातून एक मानवी मन किती अन् काय काय शिकतं, जे आयुष्यभराची शिदोरी म्हणून कायम रहातं........ एक माणूस म्हणून घडताना......!!!!
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/02/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. 💥 जन्म :- १९५७ - अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी. १९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार. १९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९५४ - पॉल, ग्रीसचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= ह्या बातमीपत्राची audio खालील लिंकवर ऐकता येईल. https://goo.gl/8jnrr8 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडें यांच्याविरुद्ध विरोधी पक्ष आणणार अविश्वास ठराव.* ----------------------------------------------------- 2⃣ *नांदेड : पॅथॉलॉजिस्ट विना सुरु असलेल्या नांदेड शहरातील 22 पॅथॉलॉजींचे परवाने मनपा आयुक्तांकडून निलंबित* ----------------------------------------------------- 3⃣ *अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे बारावी पेपर तपासणी बहिष्कार आंदोलन मागे* ----------------------------------------------------- 5⃣ *'द शेप ऑफ वॉटर' ठरला ऑस्कर 2018 यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट* ----------------------------------------------------- 6⃣ *मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली.* ----------------------------------------------------- 7⃣ *मेक्सिको येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टर प्रकारात पटकावले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्त्री जन्माचे स्वागत करू या* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= लोणावळा हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणेजिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे. पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे. मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाचीपॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"उद्योगी मनुष्य जीवनात यशस्वी होतो व त्याची भरभराट होते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) जालियनवाला बाग हत्याकांड कुणी घडविले ?* जनरल डायर *02) पोलाद तयार करताना कशाचा वापर होतो ?* मँगनीज *03) वन डे वंडर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* कपिल देव *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुरेश बावनकुळे, सहशिक्षक, माहूर 👤 श्रीकांत संतोष येवतीकर 👤 दत्ताहरी शिवलिंग दुड्डे, चिकना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *बुडबुडे* कितीही छान दिसो बुडबुडा फुटत असतो एकदा बुडबुडा फुटला की पुन्हा जुटत नसतो उगीच कोणी असे भ्रमात रहायला नको नको ते स्वप्न पाहून स्वप्नभंग व्हायला नको शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एकदा एक गृहस्थ आपली कैफियत घेऊन संत एकनाथांकडे गेला व म्हणाला...मला कसं जगावं हे समजत नाही, गोंधळल्यासारखं होतं. आपण त्याविषयी काही सांगावं. एकनाथ शांतपणे म्हणाले- "अरे तू तर थोड्या दिवसांचा सोबती आहेस. आठ दिवसांत तुझा मृत्यू होणार आहे. तू परोपकाराची कृत्य कर. जमलं तर दानधर्मही कर. म्हणजे लोक तुला दुवा ही देतील. जेवढं चांगलं करता येईल तेवढं कर, तुझं आनंदी आयुष्य तुला परत मिळेल.* *त्याप्रमाणे तो सारं करत राहिला. त्यात तो पूर्णपणे मग्न होऊन गेला. हळूहळू आठ दिवस संपले. आठव्या दिवशी तो झोपेतून जागा झाला, आपण जिवंत आहोत हे त्याच्या लक्षात आले. तो एकनाथांना म्हणाला..मी आठ दिवसांनीसुद्धा जिवंत आहे, हे कसे काय? संत एकनाथ म्हणाले-* *"त्यालाच तर आयुष्य म्हणतात. आठ दिवसांतील तुझे वर्तन-क्रिया आठवून बघ, म्हणजे आयुष्याचा अर्थ कळेल."* ⛳ *॥ रामकृष्णहरी ॥* ⛳ 🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻 *संजय नलावडे, चांदिवली,मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही लोकांचे म्हणणे असे आहे की, रंगमंचावरील कलाकार हे सगळ्यात आनंदी आणि सुखी असतात. पण माझे म्हणणे असे आहे की,सगळेच आनंदी आणि सुखी असतीलच असे नाही. कारण कलाकार हा आपल्या जीवनातल्या दु:खाला प्रेक्षकांसमोर किंवा जगासमोर कधीच येऊ देत नाही.तो फक्त लोकांच्या जीवनात असलेले दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करणे एवढेच काम करतो. तो आपल्या कलेच्या सहाय्याने निखळ मनोरंजन करणे व त्यांना आनंदी ठेवणे एवढेच माहीत असल्यामुळे आपल्या जीवनातले दु:खरे दु:ख मांडत बसलो तर प्रेक्षक म्हणतील घरी ते दारी काही जीवनात फरक आहे का ? कलाकार हा काही काळापुरता का होईना तो प्रेक्षकांच्या समोर असतो तेव्हा त्याचे सारे दु:ख विसरतो आणि रममाण होतो. म्हणून मला इथे म्हणायचे आपले दु:ख इतरांसमोर मांडून दु:खी न करता इतरांना कसे सुखात आणि आनंदात कसे पाहता येईल याचा विचार आपण सदैव करायला हवा, ज्यातून आपल्यालाही काही काळ सा-यांच्या सहवासात आपले असलेले दु:ख विसरून आनंदात घालवता येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बळी तो कान पिळी* - बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दूरदृष्टी* एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला. 'माणूस किती कृतघ्न असतो? स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचतो, धान्य संपले, मग मेंढया, मेंढया संपल्यावर बैल, कदाचित बैल संपल्यावर हा आपल्यालाही मारून खाईल, त्यापेक्षा आपण इथून पळून जाणेच चांगले' असा विचार करून कुत्रा तेथून पळून गेला. तात्पर्य 'अडचणीत सापडलेला मनूष्य स्वत:ची सुटका करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सात कोड्यांना आई ने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??* *मुले म्हणाली ,तलवार...* *आईने सांगितले.. जीभ..* *कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसर्याचा अपमान करतो, दुसर्याला दुखावतो, दुसर्याच्या भावनांना धक्का पोचवतो.* 💝💝 *या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??* *एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...* *आई म्हणाली...भूतकाळ.* *माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणार्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.* 💝💝 *या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???* *दुसर्याने सांगितले की, पृथ्वी, पर्वत, सूर्य.* *आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे..हाव.* *लोक दुःखी होतात त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.* 💝💝 *पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???* *तिसर्या ने उत्तर दिलं... पोलाद, लोखंड, हत्ती.* *आई म्हणाली, सगळ्यात कठिण वस्तू... वचन.* *वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.* 💝💝 *पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??* *चौथा म्हणाला .. कापूस, हवा, धूळ, पाने.* *आई म्हणाली, सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.* *पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणार्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.* 💝💝 *पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???* *पाचव्याने सांगितले, आई, वडिल, मित्र, नातेवाईक.* *आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे 'मृत्यू'.* *कारण कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.* 💝💝 *शेवटचा प्रश्न..* *या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??* *मुले म्हणाली खाणे, झोपणे, फिरायला जाणे.* *आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे. संकलित *
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/02/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे. २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. 💥 जन्म :- १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान. १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मेघालयचे पुढचे मुख्यमंत्री असणार कोनराड संगमा, नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद नाही- हिमंत बिस्वा, भाजपा* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर कर्नाटकमध्ये भाजपाच बाजी मारणार- अमित शहा* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात गारांचा पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा* ----------------------------------------------------- 5⃣ *विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.* ----------------------------------------------------- 6⃣ *आयपीएल : दिनेश कार्तिकची कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार म्हणून निवड.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मतदार जागृती आवश्यक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अलिबाग* अलिबाग (इंग्रजी - Alibaug) हे रायगड जिल्ह्याचे शासकीय मुख्यालय आहे. अलिबाग शहर समुद्रकिनार्याला लागून आहे. हे शहर महाराष्ट्रातील कोकण विभागात येते.अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचेसेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. आताचा रामनाथ परिसर हे तेव्हाचे मुख्य गाव होते. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे त्या वेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात. त्या काळात येथे बर्याच लढाया झाल्या. १७२२ मध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी कुलाब्यावर एकत्रित हल्ला केला होता, पण ते ती लढाई हरले होते. १८५२ मध्ये अलिबागला तालुक्याचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) महाराष्ट्रात खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?* लोणार जि. बुलढाणा *02) सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती ?* चार *03) फिरोजशहा कोटला मैदान कोठे आहे ?* नवी दिल्ली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक 👤 गंगाधर मदनूरकर, सहशिक्षक 👤 बाळू भगत 👤 अशोक कहाळेकर 👤 गं.बा. नुकूलवार, सहशिक्षक, देगलूर 👤बालाजी तिप्रेसवार, उमरी 👤 रमेश मेरलवार, करखेली 👤 समाधान शिंदे, कवी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *समर्पण* महत्त्व असेतच त्याग अन् समर्पणाला कोणाचे काय समर्पण माहित असते मनाला समर्पणा शिवाय कोणत काम होत नाही समर्पण नसेल तर त्यात राम रहात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस जाणतो की तो स्वार्थधुंदीत असत्याचा प्रयोग करीत आहे; पण सुखकर जगण्याच्या नादात त्याला अंतर्मनाविरूद्ध व्यवहार करावे लागतात. म्हणूनच आजही आपण पहातोच की जो 'नंबर दोन'चे धंदे करतो त्याच्याकडे संपत्ती-सुखे नांदताना दिसतात. आणि जो सत्य घेऊन बसला तो जागोजागी निराश, हताश होत दु:ख भोगताना दिसतो. कालपरवापर्यंत सामान्य जीवन जगणारा माणूस राजकारणात सत्तापदी पोहचताच पाहता-पाहता तो संपत्तीच्या राशीवर लोळताना दिसतो. मग 'सत्यमेव जयते'चे काय? सत्याचाच विजय होतो हे माणूस जाणत असूनही तो असत्याचा कैवारी का होतो? का होतोच नव्हे, तर होत आला, होत आहे आणि होत राहील.* *माणूस असा का वागतो? चोरी, भ्रष्टाचार ही पापकृत्य माहित असूनही तो का अंगीकारतो? त्याचे बाह्यमन अंतर्मनापासून अंतर ठेवून वागत असते तेव्हा ते बेडर आणि बेपर्वा झालेले असते. तेव्हा माणूस अपकृत्यात यशस्वी होणे ही अक्कलहुशारी समजून असत्याच्या नरकातील राज्यपद भोगत जातो. पण एक क्षण केव्हातरी त्याच्या जीवनात असा येतो की तो आपली असत्य कार्ये आपल्या अंतर्मनाजवळ मान्य करतो. कबुलीजबाब देतो. पश्चातापदग्ध होतो. परंतु काही लोक मरेपर्यंत अंतर्मनाशी संवाद करू शकत नाहीत. अशांना त्यांच्या पापकृत्यांची तमा नसेल तर त्यांचे अंतर्मनही मुक्ती मिळू देत नाही. कारण मुक्तीचा मार्ग हा अंतर्मनातून जातो.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रयत्नांती परमेश्वर* - कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांती साध्य होते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गर्विष्ठ मेणबत्ती* एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?' तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट. 💥 जन्म :- १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा. १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- १७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट. २००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचा गौप्यस्फोट* ----------------------------------------------------- 2⃣ *कीर्ती चिदंबरमची मॅरेथॉन चौकशी, सीबीआयने पुरावे दाखवत मागितले स्पष्टीकरण * ----------------------------------------------------- 3⃣ *डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाही, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर* ----------------------------------------------------- 4⃣ *वॉशिंग्टन- अमेरिकेतल्या सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीत झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू- एएफपी.* ----------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : शहरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. यावेळी शिख बांधवांनी प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढली. सचखंड गुरूद्वारा याठिकाणी "अरदास" करुन या मिरवणूकीला सुरूवात झाली.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : प्रसिद्ध उद्योजक गणपतराव बळीराम मोरगे यांचे मुंबई येथील लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने झाले निधन, आज त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यविधी* ----------------------------------------------------- 7⃣ *कराची : बीसीसीआयने या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानात होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपसाठी संघ पाठवण्यास दिला नकार. * ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कॉपी म्हणजे एक कलंक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= रंजना देशमुख (जन्मतारीख अज्ञात, इ.स. १९५५ - मार्च ३, इ.स. २०००; मुंबई, महाराष्ट्र ) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८० च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून इ.स. १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा इ.स. १९८० सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. इ.स. १९८३ साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कीर्तीची अतिरेकी अभिलाषा माणसाला विवेकशून्य बनविते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) नोटा व पोस्टाची तिकीटे छापण्याचा कारखाना कोठे आहे ?* नाशिक *02) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?* उपराष्ट्रपती *03) लोकहितवादी या टोपणनावाने प्रसिद्ध व्यक्ती कोणती ?* गोपाळ हरी देशमुख *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रुबिना शेख, सहशिक्षिका, पुणे 👤 दादाराव कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 एकनाथ पाटील 👤 परमेश्वर वाघमारे, चिरली 👤 कैलास माधवराव गंगुलवार 👤 जयश्री उमरीकर, वसमत 👤 गोविंद चव्हाण 👤 सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद 👤 सुरेश कटकमवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाटोळ* इथे कुंपणच शेत खात आहे म्हणून व्यवस्थेच वाटोळ होत आहे कुंपण शेत खायला लागले नको ते प्रकार व्हायला लागले शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा, अयोग्य दिशेने जाणारे पाऊल, आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते. तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590/8087917063. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पुढच्यास ठेच, मागचा शहाणा* - दुसर्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे. कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का? ते म्हणाले, हो एकच आहे. बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे" योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले. मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय" १९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात." मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!" मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?" बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे. आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत्व असायला हव. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वांतत्र्य आंदोलन दिन - दक्षिण कोरिया. 💥 ठळक घडामोडी :- १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण. १९६२ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले. 💥 जन्म :- १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली: ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत जीडीपी दरात वाढ, देशाचा जीडीपी दर ७.२ टक्क्यांवर.* ----------------------------------------------------- 3⃣ *कांचीपुरम पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी पंचत्वात विलीन, पती बोनी कपूर यांनी दिला मुखाग्नी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर : विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन अखेर मागे; समितीचा अहवाल विधान परिषदेत सादर.* ----------------------------------------------------- 6⃣ *आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्या, एसटी कामगारांनी राज्यपाल - मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *टी-20 मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी 5.6 लाख रुपये ‘द गिफ्ट ऑफ द गिव्हर्स फाऊंडेशन’ला केले दान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= 09 क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/09.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= गौरी देशपांडे (फेब्रुवारी ११, १९४२ - मार्च १, २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत. प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका.गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= दुसऱ्याच विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ?* नेवासे *02) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?* गंगापूर जि. नाशिक *03) कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते ?* मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 आशा तेलंगे, उपक्रमशील शिक्षिका, मुंबई 👤 अमोल आलगुडे, लातूर 👤 साहेबराव बोणे, मोबाईल टीचर, धर्माबाद 👤 विक्रम अडसूळ, संयोजक ATM *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* कर्तव्य शुन्य अन् अपेक्षांच ओझं असतं कर्तव्य न करताही मोठेपण माझं असतं कर्तव्य न करता अपेक्षा खरंच किती व्यर्थ आहे कर्तव्यावीना अपेक्षा याला काय अर्थ आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= समयसुचकतेनुसार आपल्या विचारांशी इतर लोक सहमत नसतील तर आपला विचार बदलायला काहीच हरकत नाही, त्याबाबतीत आपलीही भूमिका आग्रही असू नये. त्यात इतरांचे नुकसान होणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी.म्हणून आपलेच खरे म्हणण्यापेक्षा इतरांच्याही चांगल्या आणि योग्य विचारांना प्राधान्य देऊन त्यात दोघांचेही हित साधून जीवनव्यवहार व्यवस्थितपणे पार पाडता येईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..8087917063/9421839590. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= पालथ्या घागरीवर (घड्यावर) पाणी - केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *नदी,मासा,युक्ती* एका नदीच्या तिरावर एक 👳🏽♀कोळी मासे 🐟🐠🐬🦈🐳🐋🐠🐟धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही 🕸म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा 🐠बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. 〰〰〰〰〰〰 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/02/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक मराठी राजभाषा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी. 💥 जन्म :- १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 💥 मृत्यू :- १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद नसल्यानं विरोधक संतप्त, सभागृहाबाहेर विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी* ----------------------------------------------------- 2⃣ *गडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कायाकल्प ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यात प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या संपामुळे बारावीच्या 65 लाख उत्तरपत्रिका तपासणीअभावी पडून, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : शासनाविरोधात सोलापूर जिल्हा परिषदेवर अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्या प्रकरणी डीएसके यांच्या ताब्यातील आलिशान गाड्या जप्त, पुणे पोलिसांनी केली कारवाई* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द* ----------------------------------------------------- 7⃣ *केप टाऊन - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका असेल मॉर्केलची शेवटची मालिका* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शालेय विद्यार्थी आणि खुल्या गटासाठी *मराठी दिनानिमित्त हस्ताक्षर लेखन स्पर्धा* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_26.html आज सकाळी 09 ते सायंकाळी 06 पर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वि. वा. शिरवाडकर* विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) मराठी साहित्यात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण होते ?* वि. स. खांडेकर *02) कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता कोण करत होते ?* वि. वा. शिरवाडकर *03) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?* मराठी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 गंगाधर मुटे, वर्धा 👤 श्यामल पाटील 👤 साई पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *जीव* मुठभर धान्यासाठी जातो कोणाचा जीव सामान्याविषयी कोणाला कुठे वाटत नाही कीव चुना लावून पळतात त्यांच कोण काय करतो चार घास मिळवण्यासाठी सामान्य माणूस मरतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पळसाला पाने तीनच* - कोठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *उंदीर कोंबडा आणि मांजर* एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही. वर्तमानपत्रातून संग्रहित 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*✍स्वरचित चारोळी* *स्वार्थ* १)स्वार्थाविना जीवन जगणे ह्यालाच आहे अर्थ नाहीतर सर्व जीवन असेल व्यर्थ. 〰〰〰〰〰〰〰 २) स्वार्थपणा कधी बाळगून वागू नये माणसाने माणुसकी सोडून कधी जगू नये. 〰〰〰〰〰〰 3) आई -वडिलांच्या मायेत नसतो कुठला स्वार्थ म्हणूनच मानतात त्यांना ईश्वर या अर्थ. 〰〰〰〰〰〰 ४) नात असो कुठलही नसावा त्यात स्वार्थ जगून घ्याव छान हाच संदेश सर्वार्थ. 〰〰〰〰〰〰 ५) स्वार्थाने राहू नकोस मानवा, कामात ठेव तुझा निस्वार्थ होईल सर्वांचे कल्याण हाच खरा परमार्थ. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 〰〰〰〰〰〰 *✍©श्रीमती प्रमिला सेनकुडे* हदगाव (नांदेड)
मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द.. ::-सेवा करायची असेल तर, घड्याळात पाहू नका..! ::-प्रसाद घ्यायचा असेल तर, चव घेऊ नका..! ::-संत्सग ऐकायचा असेल तर, जागा पाहू नका..! ::-विनंती करायची असेल तर, स्वार्थ पाहू नका..! ::-समर्पण करायचे असेल तर, खर्च किती झाला हे पाहू नका..! ::-दान करायचे असेल तर, गरज पाहू नका..! 🌹
*आपली माणसं कशी ऒळखायची..?* या प्रश्नाचं शोधलेलं उत्तर अडचणीत ज्या व्यक्तीची आठवण येते ती व्यक्ती आपली असते... आपल्या घरात कुठेतरी काडी पेटी असते. ती कुठे आहे हे आपणाला माहीत पण असतं, ती जागेवर आहे इतकच आपण पाहतो आणि परत आपल्या कामाला लागतो किंवा आपली कामं करतो. आपलं रुटीन सुरु आहे, काडीपेटी तिच्या जागी आहे. तुम्ही तुमच्या जागी आहात. तुमच्या रोजच्या जीवनात त्या काडीपेटीचं फक्त अस्तित्व आहे. काम काहीच नाही पण अस्तित्व मात्र आहे, हे तुम्हालाही माहित आहे. कधी कधी काही वस्तू साफसुफ करताना आपण काडीपेटीलाही साफ करतो आणि परत जागेवर ठेवतो. आपल्या ध्यानी मनी नसताना कोणा एका रात्री अचानक लाईट जाते आणि डोळ्यासमोर गुडूप अंधार होतो. आपल्याकडे डोळे आहेत. ते उघडेही आहेत पण त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आपण पटकन डोळे बंद करतो आणि घरात आपण जिथे आहोत तिथून डोळे झाकून काडीपेटीच्या दिशेने पावलं टाकतो. हात पुढे करतो. आपल्या हातात काडीपेटी येते कारण ती कुठे आहे हे आपणास माहीत असते. आपण त्यातील एक काडी पेटवतो आणि घरात प्रकाश करतो आणि मेणबत्ती शोधतो आणि ती पेटवून चहुकडे कायम स्वरूपी प्रकाश करतो. आता आपण घटनेचे विश्लेषण करू या. 1) काडीपेटीची आवश्यकता नव्हती त्या काळात सुध्दा तिची काळजी घेतली. आवश्यक तेथे सुरक्षित ठेवली तशीच आपल्या अवती भोवती असणारे आपले मित्र, आपले नातेवाईक, शेजारी यांची काळजी घ्या त्यांची विचारपुस करा. आणि परत रिलेशन अपडेट ठेवा. हीच माणसं संकट समयी आपल्याला मदत करतात. 2)अंधार पडला तेव्हा तुमच्याकडे डोळे होते पण तरीही त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. तसंच कधी कधी होतं, संकट किंवा समस्या आल्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या क्षमता चालत नाहीत किंवा कमी पडतात. 3) अंधार पडल्यानंतर आणि आपल्या क्षमतांचा उपयोग होत नाही म्हटल्या नंतर आपण डोळे बंद करून काडीपेटी पर्यंत पोहोचलो. इतका पक्का विश्वास आपणाला असतो की आपण हात पुढे केला आहे आणि भरलेली काडीपेटी तुमच्या हातात येते आपण काडी पेटवतो आणि मग डोळे उघडतो. इतका विश्वास त्या काडीपेटीचा आपणाला असतो. तसंच आपण जपलेली माणसं जर मनापासून जपलेली असतील तर अजिबात धोका होत नाही कारण आपण ती काळजी आपण रोज घेतलेली असते त्यामुळे आपण कॉन्फिडंट असतो. आता आपण पाहू या आपली माणसं कोण आणि त्यांना कुणी जपलं.? अ) आपणं रोज चालताना नमस्काराला कंजूषी करू नका. ब) लोकांशी भरपूर बोला संवाद करा. क) आपणही लोकांना छोट्या मोठ्या कामात मदत करा. ड) आणि आपली काडीपेटी किंवा काडीपेट्या जपून ठेवा त्यांची काळजी घ्या. त्यांचं अस्तित्व मान्य करा. 🙏संकलित.🙏
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४७ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना. 💥 जन्म :- १९४० - पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :- २००४ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. २००४ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये २३ फेब्रुवारीपासून पुढील ७२ तासांच्या कालावधीत वादळी वा-यासह गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *कीटकनाशकामुळे शेतकरी मृत्यू प्रकरण : मृत शेतक-यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत द्या, मंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश* ----------------------------------------------------- 3⃣ *पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल अॅडमिशन प्रक्रियेत राज्याच्या कोट्याकरिता डोमिसाईल सर्टिफिकेटचा नियम रद्द ,मुंबई हायकोर्टाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - मुंबई महानगरपालिका अधिनियम-1988, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात, 8.65 वरुन 8.55 टक्क्यांवर* ----------------------------------------------------- 6⃣ *पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत मांडला अर्थसंकल्प* ----------------------------------------------------- 7⃣ *'खेळात करिअर करा, नवनव्या संधी निर्माण होताहेत'; असा सल्ला भारताचा विक्रमादित्य क्रिकेटवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाप आणि पुण्य* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/16.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= मोहिनीआट्टम् : केरळमधील एक पारंपारिक शास्त्रीय नृत्यप्रकार. ⇨ कथकळि नृत्यदेखील केरळमधीलच आहे; पण तो केवळ पुरुषांनीच नाचायचा, तांडव (उद्धत प्रणाली) युक्त नृत्यनाट्यप्रकार आहे; तर मोहिनीआट्टम् म्हणजे केवळ स्त्रियांनीच करायचा लास्य (सुकुमार प्रणाली) युक्त नर्तनप्रकार आहे. पुराणांमध्ये अमृतमंथन व भस्मासुर वध या कथांमध्ये विष्णूने मोहिनीचे- अतिशय लावण्यवती स्त्रीचे-रूप घेतल्याचा उल्लेख आहे. या कथांच्या संदर्भात या शैलीकडे पाहिले असता, मोहिनीआट्टम् या शब्दातील मोहिनी हा शब्द मोहकतेचा द्योतक वाटतो. आट किंवा ‘आट्टम्’ म्हणजे नृत्य. या नृत्यशैलीस ही मोहकता, त्यामधील अंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार व अर्धगोलाकार हालचालींमुळे प्राप्त होते. चेहऱ्यामध्येही ‘उत्क्षिप्त शिर’ (किंचित एका बाजूस झुकलेले डोके) व ‘साची दृष्टी’ (तिरका कटाक्ष) यांमुळे हाच परिणाम साधला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 *सहाय :- राजू भद्रे, बिलोली* =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= समाजासाठी सेवाभाव बाळगून नि:स्वार्थपणे काम करणाऱ्याच्या सेवेस सारे जग मदतीला येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) कोकणातील मुख्य पीक कोणते ?* भात *02) तीन ही दलाचा सर्वोच्च प्रमुख कोण असतो ?* राष्ट्रपती *03) विमानाचा शोध कुणी लावला ?* राईट बंधू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 डोखे विवेक मच्छिंद्र 👤 शशिकांत तालिमकर 👤 मारोती बोईनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लक्ष्य* सर्वस्व पणाला लावले की लक्ष्य गाठता येते कितीही मैलांचे अंतर जिद्दीने काटता येते सर्वस्व पणाला लावले की यश पदरात पडते असाध्य ते साध्य करिता सायास असेच काही घडते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आनंद' आणि 'दिर्घायुष्य' यातले नाते शोधले पाहिजे. अलिकडे दिवाळी येते आणि जाते. समाजातील एका वर्गाला तर या सणाचे आकर्षणच वाटेनासे झाले आहे. कारण आम्ही राजे झालो आहोत आणि राजाला रोजच दिवाळी असते. वर्षभर पंचपक्वान्, ऋतुनुसार तेलं, क्रीम्स, अभ्यंग रोजचेच, कपडेच काय पण फर्निचरही वर्षाला नवीन, फटाकेही नेहमीचेच मग 'दिवाळी आनंद' वेगळा काय असतो ?* *'आनंद' हा दिर्घायुष्यासाठी प्रथम क्रमांकावर. वाणसामानाच्या सटरफटर गोष्टींसारखी दिर्घायुष्यासाठीच्या गोष्टींची यादी करून ती फडकवणारे पुष्कळ. पण अचानक त्यांचीच विकेट पडते. जगणे हीच शिकवणी असताना, आपण त्रास न करून घेणे ही दिर्घायुष्याची दुसरी पायरी. इतरांना त्यांच्या त-हेने जगू देणे एवढेच आपल्या हाती असल्याने त्यात आनंद मानता यायला हवा. इतरांना शिकवत बसण्यात अर्थ नसतो, त्यासाठी आपला जन्म असतो का ?* 🌹 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी आपल्या कल्पनेने काढलेल्या रेखाटनामध्ये रंग भरते सोपे असते.कारण त्यात स्वातंत्र्य आणि कलात्मक दृष्टीकोन असतो.परंतु जीवनात रंग भरणे अतिशय कठीण असते.त्यात जीवनाचे अनेक रंग असतात.ते रंग कुठे आणि कसे भरायचे यासाठी आपले एक विशिष्ट कसब वापरावे लागते तेही समोरची व्यक्ती पाहून.ते एकदा त्याला जमले तर जीवन सुसह्य होते नाही तर आयुष्यभर असह्य होते.तेव्हा मात्र आपले कसब वापरण्यासाठी समोरच्यांच्या भावनिकतेचा विचार करावा लागतो.मग हे जमण्यासाठी अधिक मानसिकतेचा व आपल्या बुद्धीचातुर्याचा विचार करावा लागतो.तेव्हाच आपल्या नि इतरांच्या जीवनात रंग अधिक खुलून दिसतात व जीवन समृद्ध व्हायला मदत होते. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *न कर्त्याचा वार शनिवार* - अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बुड घागरी* बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणतो दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 माणुस जन्माला येतो तेव्हा त्याचं वजन अडिच किलोच्या आसपास असते.पण जेव्हा माणुस मरतो तेव्हा त्याच्या अस्थिंची राखही अडिच किलो भरत नाही. मग जन्म आणि मृत्यु या मधल्या काळात तो कोणत्या गोष्टींचं संचित करतो यावरुन त्याच्या जीवनाचा अर्थ उलगडतो. आयुष्यभर दुखः,चिंता,द्वेष,क्रोध,मोह, नकारात्मकता या गोष्टीत अडकुन राहण्यापेक्षा सुख,समाधान,आनंद,प्रेम, सकारात्मकता या गोष्टींनी आयुष्य बहरुन टाकायला नको का ???? जीवन छोटं असुनही त्याचा क्षणोक्षणी आनंद घेणारं फुलपाखरु हाच तर संदेश देतं. आयुष्य जगलात किती हे महत्वाचं नाही, तर आयुष्य जगलात कसं ? हे महत्वाचं!!.... 〰〰〰〰〰〰〰 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 ✍ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐🍀
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे. १७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिं 💥 जन्म :- १८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे 💥 मृत्यू :- १९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राबविलेल्या नो हॉर्न डे'चा उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार असल्याची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची घोषणा* ----------------------------------------------------- 2⃣ *बीड - श्रीक्षेत्र नारायणगडावरील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन, पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. विनायक मेटे होते उपस्थित* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - अस्वस्थ वाटू लागल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना लीलावती रुग्णालयात केले दाखल* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण, नीरव मोदी आणि गीतांजली शोरूमवर छापे, नीरव मोदीचे 5 हजार 100 कोटींचे हिरे जप्त करण्यात यश* ----------------------------------------------------- 5⃣ *बडोदा - मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडीस सुरुवात, साहित्यिकांसह बडोदेकर मराठी माणसांचा लक्षणीय सहभाग* ----------------------------------------------------- 6⃣ *शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा, खडगा प्रसाद ओली होणार नवे पंतप्रधान.* ----------------------------------------------------- 7⃣ *आयपीएलच्या आगामी सत्राची ७ एप्रिलपासून सुरुवात होणार असून सलामीला गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *एकच ध्यास ; वाचन विकास* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धुंडिराज गोविंद फाळके* धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= 1) कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे ? पुणे 2) सूर्यग्रहण फक्त कोणत्या तिथीला होते ? अमावस्या 3) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 बाप्पा महाजन, नाशिक 👤 प्रदीप वाघमारे, पुणे 👤 सतीश चौहान, चौसाळा 👤 प्रमोद हिवराळे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *यशाचा मंत्र* कठोर परिश्रमच यशाचा मंत्र आहे यशस्वी व्हायचे तेच एक तंत्र आहे कठीण परिश्रम घेईल त्याला यश मिळते परिश्रम करणारालाच यशाची किंमत कळते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शरण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दैव देते, कर्म नेते* - अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरी नक्कल* भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला. त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला. भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला. दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला. त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’ बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’ बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/02/2018 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ३९९: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली 💥 जन्म :- १९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ 💥 मृत्यू :- १८६९: ऊर्दू शायर मिर्झा गालिब *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबईत मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णय,मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : बेस्ट कर्मचा-यांचा संप पुढे ढकलला, औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतर संप स्थगित.* ----------------------------------------------------- 3⃣ *मराठवाड्यात गेल्या 3 दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे 4 लाख 91 हजार 680 एकर पिकांचे नुकसान, 4 लाख 28 हजार एकरवरील पिकांचे 33 टक्के नुकसान* ----------------------------------------------------- 4⃣ *अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळणार; कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 5⃣ *पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत 10 हजार कोटींची घोटाळा* ----------------------------------------------------- 6⃣ *विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवडलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकांमध्ये कुठलाही अश्लील वा आक्षेपार्ह मजकूर नाही - शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे* ----------------------------------------------------- 7⃣ *पाचव्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मानं तोडला सचिन, सेहवाग आणि युवराजचा विक्रम* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वसंत गोवारीकर* वसंत रणछोड गोवारीकर (२५ मार्च, इ.स. १९३३; पुणे, ब्रिटिश भारत - २ जानेवारी, इ.स. २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्याशाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारिकरांचे नाव देण्यात आले आहे. वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च, इ.स. १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी. आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे?* 👉 पुणे *२) वॉर ॲंड पिस हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 लिओ टॉल्स्टॉय *३) कोणत्या पर्वतामुळे महाराष्ट्राच्या जलस्त्रोताचे दोन भाग झाले आहेत?* 👉 सह्याद्री *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अशोक गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक, बिलोली 👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक, करखेली 👤 किरण गौड, धर्माबाद 👤 घनश्याम नानम, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *थंडी* घराबाहेर पडायला मनात धुडधूडी आहे जिकडे तिकडे आता थंडीची हुडहुडी आहे थंडीच्या हुडहुडीत होतात सारे गपगार घरात बसतात सारे लावून खिडक्या दार शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी आणि त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *देव तारी त्याला कोण मारी ?* - देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही, अशी भावना. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌺सहशालेय उपक्रम🌺* 〰〰〰〰〰〰〰 *आज दिनांक १५/०२/२०१८ रोजी* *जि.प.प्रा. शाळा वाटेगाव* येथे *संत श्री जगतगुरु सेवालाल महाराज* यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.💐💐💐💐💐 👉शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री चव्हाण सर यांनी प्रतिमा पूजन केले. व शाळेतील आम्ही सर्वांनी व विद्यार्थ्यांनी प्रतिमा पूजन केले. 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 👉त्यानंतर श्रीमती सेनकुडे मॕडम, श्रीमती झाडे मॕडम ,श्री चव्हाण सर श्री राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना संत श्री सेवालाल महाराज यांच्याविषयी माहिती सांगितली.👉तसेच श्री राठोड सर यांच्याकडून गोड चाॕकलेट खाऊ वाटप केला व अशाप्रकारे आज जयंती साजरी करण्यात आली आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍वृत्तांत लेखन* श्रीमती सेनकुडे मॕडम (सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/02/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना. १९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना. १९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले. २०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला. 💥 जन्म :- १९१६: कवयित्री संजीवनी मराठे १९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया 💥 मृत्यू :- १४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेणा-या 100हून अधिक महिलांची मोदींनी घेतली भेट* ----------------------------------------------------- 2⃣ *धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला मिळणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून उर्जा मंत्रालयात अहवाल सादर* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - बोफोर्स घोटाळा प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली, सर्वोच्च न्यायालयात 28 मार्चला सुनावणी.* ----------------------------------------------------- 4⃣ *हिंगोली - औंढा नागनाथ येथे काल भाविकांची शिवलिंगाच्या दर्शनासाठी रीघ, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. राजीव सातव, आ. डॉ संतोष टारफे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी केली महापूजा* ----------------------------------------------------- 5⃣ *राज्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने हजारो हेक्टरवरील रबी पिकांना फटका* ----------------------------------------------------- 6⃣ *पोर्ट एलिझाबेथ - भारताने दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी हरवले. मालिका खिशात* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेचा टी-20च्या सामन्यात 7 विकेट्सनं केला पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* जगाला प्रेम अर्पावे .....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवी संजीवनी मराठे* संजीवनी रामचंद्र मराठे ( १४ फेब्रुवारी, इ.स. १९१६ पुणे, महाराष्ट्र - १ एप्रिल, इ.स. २०००:पुणे) या एक कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या. संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगाव सोडून सांगलीस गेले. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा रामकृपा नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. संजीवनी मराठे यांना मिनी, भारती, अंजू या तीन मुली आणि प्रताप नावाचा मुलगा होता. प्रताप हा वैमानिक होता. अंजूने लग्नानंतर पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली. महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बॅडमिंटन *2) बुद्धचरित हे प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिले ?* कवी अश्वघोष *3) भारतात सर्वात पहिले कापड गिरणी कुठे सुरू झाली ?* नागपुर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर 👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम 👤 विकास बडवे, सहशिक्षक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लाभार्थी* गारपीट म्हणजे काहींची मजा आहे शेतक-यांना मात्र निव्वळ सजा आहे संकटातही काही हात धुवून घेतात लाभार्थ्या पेक्षा दुसरेच माला माल होतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•• *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दुरून डोंगर साजरे* - कोणतीही गोष्ट वा वस्तु लांबून चांगली दिसते, जवळुन तिचे खरे स्वरुप कळून येते. (मुख्य दोष कळून येतात.) *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चांगल्या कर्माचे फलीत* एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती . आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत . एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.* प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले. *तात्पर्य :-* *एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
१) करंगळी 2)चवळी 3)आठळी 4)कवळी 5)केरळी 6)पन्हाळी 7)अळी 8 पळी 9होळी 10सुकेळी 11 चाफेकळी 12झोळी 13 भूपाळी 14टाळी 15विळी 16झावळी 17मासोळी 18 काळी 19टकळी 20कोळी 21गोळी 22मोळी 23लव्हाळी 24 25 कळी 26आंबोळी 27चारोळी 28पोळी 29बाळी 30 आरोळी 31रांगोळी 32पुरणपोळी 33कडबोळी 34 गवळी 35माळी 36दिवाळी 37नव्हाळी 38काळी 39खळी 40बळी
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/02/2018 वार- शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १२५८ - मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००. १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली. १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना. २०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी 💥 जन्म :- १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू. 💥 मृत्यू :- १२४२ - शिजो जपानी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत जमा करू नका, हायकोर्टाचा शिक्षणमंत्री विनोद तावडेंना दणका* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - लोकसभेचं कामकाज 5 मार्चपर्यंत स्थगित.* ----------------------------------------------------- 3⃣ *यवतमाळ : जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून जाहीर. जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाची घोषणा. १६३ गावांची भूजल पातळी दीड मीटरने घटली.* ----------------------------------------------------- 4⃣ *तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार, गणवेश घालून न आलेल्या अधिका-याला बैठकीतून काढलं बाहेर* ----------------------------------------------------- 5⃣ *बर्ड फ्ल्यूच्या भीतीमुळे सौदी अरेबियाने भारतातून कुक्कुटपालन उत्पादनाच्या आयतीवर बंदी घातली.* ----------------------------------------------------- 6⃣ *पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या पहिल्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील आदित्य ठाकरेचे अकोल्यात स्वगृही आगमन* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी :- महंत परमपूज्य गुरू दौलतपुरी महाराज यांच्या 11 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नांदेडच्या चौफाळा भागात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हेडफोन पासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. ४६ शैक्षणिक विभाग आहेत.४७४ महाविद्यालये आणि सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आपले विचार म्हणजे विचार, उच्चार आणि आचार यांचा एकात्म आविष्कार हवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= 1) अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो ? 20 ऑगस्ट 2) रोमन संख्याचिन्हांत 50 या संख्येला काय लिहितात ? L 3) गौतम बुद्धाचे मूळ नाव काय होते ? सिद्धार्थ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, बिलोली 👤 अमिन जी. चौहान, सहशिक्षक यवतमाळ 👤 विजय रच्चावार, संपादक, नांदेड 👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, बिलोली 👤 राहूल कतूरवार, धर्माबाद 👤 सुधाकर अपुलवाड 👤 राजू गोडगुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *बढाई* काम कमी अन् श्रेयासाठी लढाई असते काम नकरणाराचीच जास्त बढाई असते काम करणाराचे काम झाकल्याने झाकत नसते बढाया मारणारांच्या पदरात कोणी काही टाकत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.* *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....* *"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."* *तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी*‼⚜●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दाम करी काम* - पैशाने सर्व कामे साध्य होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले. तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/02/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले. २०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय. 💥 जन्म :- १८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन 💥 मृत्यू :- १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड तास दिले लोकसभेत भाषण* ----------------------------------------------------- 2⃣ *केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला देण्यात आली मंजुरी* ----------------------------------------------------- 3⃣ *इलाहाबाद - गंगेच्या शुद्धिकरणासाठी 20 हजार कोटींची तरतूद, शुद्धिकरणाच्या 189 प्रकल्पांपैकी 47 प्रकल्प पूर्ण* ----------------------------------------------------- 4⃣ *चंद्रपूर : प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लायड्स स्टील कंपनीला 48 तासात बंद करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश. काही वेळापूर्वीच कंपनीला दिले पत्र.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी 231 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज* ----------------------------------------------------- 6⃣ *विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत वनडे मालिकेत विजयी हॅटट्रिक साधली.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा उडवला 178 धावांनी धुव्वा, एकदिवसीय मालिकेत घेतली 2-0 अशी विजयी आघाडी* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी - राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त मा. नंदकुमार साहेब हे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी साधणार संवाद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. झाकिर हुसेन* (८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते; पण झाकिर हुसेन नऊ वर्षांचे होते, तेव्हा ते वारले. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांस अनेक ठिकाणी हिंडावे लागले. इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेऊन अखेर त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व तिचे झाकिर हुसेन १९२६ मध्ये कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे (१९२६–४८) या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. शैक्षणिक वाटचालीतील त्यांची स्फूर्तिस्थाने दोन होती : म. गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर. विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य पुरेपुर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१९४८–५६). १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले (१९६२). १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला. त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या. स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. संदर्भ : Noorani, A. G. Zakir Husain, Bombay, 1967. लेखक : मु. मा. घाणेकर स्त्रोत : मराठी विश्वकोश *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत ?* मा. विनोद तावडे *2) राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त कोण आहेत ?* मा. नंदकुमार *3) राज्याचे शालेय शिक्षण सचिव कोण आहेत ?* मा. असीम गुप्ता *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील ठमके, नांदेड 👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर 👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद 👤 दिलीप खोब्रागडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे विनाशाचे द्वार आहेत जेवढे वाढतील तेवढे डोक्यावर भार आहेत काम क्रोध लोभाने डोक्यावर भार होतो अती झाले म्हणजे केवढाही गार होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'* *ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.* *याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उधारीचे पोते, सव्वा हात रिते.* - उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वतःचे अस्तित्व जाणणे* एका बागेतील एका काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.' तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली.दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरया असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
मुलांना अवांतर वाचनासाठी पुस्तके यादी ही पुस्तके मुलांनी वाचायलाच हवीत. क्र. पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक 01 तोत्तोचान चेतना सरदेशमुख नॅशनल बुक ट्रस्ट 02 एक होता कार्व्हर वीणा गवाणकर राजहंस प्रकाशन 04 काडेपेट्यांची करामत भाग1 रेखा माजगावकर राजहंस प्रकाशन 05 आपला स्वातंत्र्य लढा वि.स. वाळिंबे राजहंस प्रकाशन 06 काडेपेट्यांची करामत भाग2 रेखा माजगावकर राजहंस प्रकाशन 07 गंमतशाळा भाग1 राजीव तांबे राजहंस प्रकाशन 08 गंमतशाळा भाग2 राजीव तांबे राजहंस प्रकाशन 09 गंमतशाळा भाग3 राजीव तांबे राजहंस प्रकाशन 10 थोडे विज्ञान थोडी गंमत कुलकर्णी राजहंस प्रकाशन 11 कोंबडू आणि इतर कथा राजीव तांबे राजहंस प्रकाशन 12 मोरू आणि इतर कथा राजीव तांबे राजहंस प्रकाशन 13 मांजरू आणि इतर कथा राजीव तांबे राजहंस प्रकाशन 14 मगरू आणि इतर कथा राजीव तांबे राजहंस प्रकाशन 15 गणित गप्पा भाग1 मंगला नारळीकर राजहंस प्रकाशन 16 गणित गप्पा भाग2 मंगला नारळीकर राजहंस प्रकाशन 17 किमयागार अच्युत गोडबोले राजहंस प्रकाशन 18 देनिसच्या गोष्टी भाग1 द्रागुन्सकी ऊर्जा प्रकाशन पुणे 19 देनिसच्या गोष्टी भाग2 द्रागुन्सकी ऊर्जा प्रकाशन पुणे 20 रानातला प्रकाश जी.ए. कुलकर्णी ऊर्जा प्रकाशन पुणे 21 डॉ. सुस ऊर्जा प्रकाशन पुणे 22 शेरलीकहोम्सच्या चातूर्य कथा (भाग 1 ते 6) भालबा केळकर 23 पाडस राम पटवर्धन मौज प्रकाशन 23 द ब्रेड विनर मेहता प्रकाशन 24 परवाना मेहता प्रकाशन 25 शौजिया मेहता प्रकाशन 26 आफ्रिकन सफारी ऊर्जा प्रकाशन 27 पंखा प्रकाश संत मौज प्रकाशन 28 वनवास प्रकाश संत मौज प्रकाशन 29 झुंबर प्रकाश संत मौज प्रकाशन 30 शारदा संगीत प्रकाश संत मौज प्रकाशन 31 द बॉय इन स्ट्राइप्ड पायजमा मेहता प्रकाशन 32 एकविशंती रविंद्रनाथ टागोर साहित्य अकादमी 33 हास्य चिंतामणी चिं. वि. जोशी 34 बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर मौज प्रकाशन 35 महाभारतानंतच्या कथा महाश्वेतादेवी 36 हजार चुराशीर मां महाश्वेतादेवी 37 मीठ महाश्वेतादेवी 38 आमचा काय गुन्हा रेणू गावसकर मनोविकास 39 अग्नीपंख कलाम राजहंस प्रकाशन 40 खारीच्या वाटा ल.म.कडू राजहंस प्रकाशन 41 विचार तर कराल नरेंद्र दाभोलकर राजहंस प्रकाशन 42 एका दिशेचा शोध संदीप वासलेकर राजहंस प्रकाशन 43 मेळघाटावरील मोहोर मृणालिनी चितळे राजहंस प्रकाशन 44 यक्षांची देणगी जयंत नारळीकर मौज 45 प्रेमळ भूत. भाग 1 राजीव तांबे रोहन प्रकाशन 46 प्रेमळ भूत. भाग 2 राजीव तांबे रोहन प्रकाशन 47 प्रेमळ भूत. भाग 3 राजीव तांबे रोहन प्रकाशन 48 प्रेमळ भूत. भाग 4 राजीव तांबे रोहन प्रकाशन 49 रस्टीचे पराक्रम रस्कीन बॉंड नॅशनल बुक ट्रस्ट 50 मालगुडी डेज आर के नारायण नॅशनल बुक ट्रस्ट 51 पक्षी जाय दिगंतरा मारूती चित्तमपल्ली 52 रावीपार गुलझार मेहता प्रकाशन 53 काळी आई पर्ल बक मेहता प्रकाशन 54 नाईट मेहता प्रकाशन 55 किलिंग फिल्डस् मेहता प्रकाशन 56 हॅनाची सुटकेस ज्योत्स्ना प्रकाशन 57 गुलाबी सई राजीव तांबे ज्योत्स्ना प्रकाशन 58 होय मी सुध्दा राजीव तांबे ज्योत्स्ना प्रकाशन 59 कार्यरत अनील अवचट मौज 60 ॲगाथा ख्रिस्ती भाग 1 ते 20 रेखा देशपांडे पद्मगंधा प्रकाशन 61 फेलूदा. भाग 1 ते 6 अशोक जैन रोहन प्रकाशन 62 नापासांची शाळा रोहन प्रकाशन 63 व्योमकेश बक्षी. भाग 1 ते 6 रोहन प्रकाशन 64 व्यक्ती आणि वल्ली पु. ल. देशपांडे मौज 65 हसवणूक फसवणूक पु. ल. देशपांडे मौज 66 निवडक पु ल देशपांडे मॅजेस्टिक प्रकाशन 67 जंगल बूक रुडयार्ड किपलींग साकेत 68 माणसं अनिल अवचट मौज 69 कुसुमगुंजा जी. ए. कुलकर्णी 70 बखर बिम्मची जी. ए. कुलकर्णी 71 मुग्धाची रंगीत गोष्ट जी. ए. कुलकर्णी 72 खेकडा रत्नाकर मतकरी मेहता प्रकाशन 73 माकड मेवा द.मा मिरासदार मेहता प्रकाशन 74 रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर मौज 75 फिडेल चे आणि क्रांती अरुण साधू राजहंस प्रकाशन 76 आणि ड्रॅगन जागा झाला अरूण साधू राजहंस 77 माओनंतरचा चीन अरूण साधू राजहंस 78 माझं लंडन मीना प्रभू पुरंदरे प्रकाशन 79 चिनीमाती मीना प्रभू पुरंदरे प्रकाशन 80 रोमायन मीना प्रभू पुरंदरे प्रकाशन 81 बब्बड. भाग 1 ते 4 राजीव तांबे मेहता प्रकाशन 82 ससोबा हसोबा. भाग 1 ते 6 राजीव तांबे मेहता प्रकाशन 83 बंटू. भाग 1 ते 2 राजीव तांबे मेहता प्रकाशन 84 फ्रॅंकलीनच्या गोष्टी. भाग 1 ते 10 अनुवादित मेहता प्रकाशन 85 पंचतंत्र मेहता प्रकाशन 86 काबुलीवाला रविंद्रनाथ टागोर मेहता प्रकाशन 87 पोस्ट मास्तर रविंद्रनाथ टागोर मेहता प्रकाशन 88 इसापनीती मेहता प्रकाशन 89 निळावंती मारूती चित्तमपल्ली 90 मानजातीची कथा साने गुरुजी साधना प्रकाशन 91 चंदूकाका निलमकुमार खैरे ज्योत्स्ना प्रकाशन 92 लाट ज्योत्स्ना प्रकाशन 93 शिवाजी ज्योत्स्ना प्रकाशन 94 रामायण ज्योत्स्ना प्रकाशन 95 महाभारत ज्योत्स्ना प्रकाशन 96 अजबखाना विंदा करंदीकर पॉप्युलर प्रकाशन 97 समिधा साधना आ
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/02/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 💥 जन्म :- १९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म. 💥 मृत्यू :- २००३: ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे २००८: योग गुरू महर्षी महेश योगी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गेल्या २ वर्षांत केंद्र सरकारमध्ये जवळपास अडीच लाख नोक-या निर्माण झाल्या, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली* ----------------------------------------------------- 2⃣ *तिजोरीत खडखडाट नाही खणखणाट आहे, राज्याची अर्थव्यवस्था रूळावर - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार* ----------------------------------------------------- 3⃣ *जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बोर्डावर नामुष्की, बीसीसीआयची वेबसाईट निघाली विक्रीला* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद - औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी स्वतंत्र धर्मासाठी लिंगायत समाजाचा मोर्चा, लिंगायत समन्वय समितीच्या बैठीत निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *भारताच्या फिरकीपुढे द. आफ्रिकेचे लोटांगण, विराटसेनेची २-० आघाडी* ----------------------------------------------------- 6⃣ *इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधुला उपविजेतेपद, अंतिम सामन्यात बिव्हेन झँगने केला पराभव. १८-२१, २१-११, २०-२२ अशा तीन सेटमध्ये सिंधूवर मात* ----------------------------------------------------- 7⃣ *डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - बदल्याचा बळी* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_2.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत. बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात. जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ३९वे मराठवाडा साहित्य संमेलन कोठे झाले?* 👉 बीड *२) राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री कोण आहेत?* 👉 पंकजा मुंडे *३) बीसीसीआयचे नवीन महाव्यवस्थापक कोण आहेत?* 👉 साबा करीम *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सौ. रंजना जोशी, सहशिक्षिका, धर्माबाद 👤 सदाशिव मोकमवार, येताळा 👤 निलेश गोधने, सहशिक्षक, नांदेड 👤 भीमराव वाघमारे 👤 संदीप मुंगले, धर्माबाद 👤 श्याम राजफोडे 👤 विठ्ठल पेंडपवार, नांदेड 👤 बाळासाहेब कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अच्युत पाटील खानसोळे, सहशिक्षक, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *जाहिरात* जाहिरातीत खोटं ते खरं असे ठसवले जाते खोट्याला खरं म्हणून डोक्यात बसवले जाते विश्वसनिय वाटणारीही जाहिरात फसवी असते जाहिरात म्हणजे फक्त खिसे उसवा उसवी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपले नाक कापून दुसर्याला अपशकुन.* - दुसर्याचे वाईट व्हावे म्हणून अगोदरच स्वतः चे वाईट करून घेणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?' तात्पर्यः - नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्याच असतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥 *100% तंत्रस्नेही शिक्षक 2018* *DIECPD नांदेड* दिनांक02/02/2018 ते 03/02/2018 या दोन दिवशीय रोजी झालेल्या DIECPD नांदेड येथे 3 तालुक्यातील प्रशिक्षकांचे तंञस्नेही प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला *जेष्ठ अधिव्याख्याता मा.आठवले मॅडम(DIECPD नांदेड)* यांनी उपस्थित शिक्षकांना *100%तंत्रस्नेही शिक्षक जिल्हा* करण्यामागची भूमिका स्पष्ट केली,तसेच 100 % तंत्रस्नेही जिल्हा करण्यामध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांची भूमिका खुप मोलाची आहे.आपण सर्व जण या इतिहासाचे साक्षीदार असणार आहात व या महान अशा कार्याचा एक भाग आपण आहात अशा शब्दात गौरव उदगार काढले व शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐💐💐 या नंतर उपस्थित सर्वांचे DIECPD मार्फत स्वागत करण्यात आले.💐💐💐💐 त्यानंतर नियोजनाप्रमाणे दोन दिवसात (लेवल वन) चे मोडुल timetable नुसार उपयुक्त( app )ची माहिती video निर्मिती , online test, wps office.,,.,.....अशा विविध उपयुक्त app ची माहिती व सोबतच कृती मोबाईल व लॕपटाॕप वर सर्वांच्या कडून करून घेतली. *(विषयाचे कृतीयुक्त मार्गदर्शन*) करण्यात आले. 👉 या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये 👉श्री.संतोष केंद्रे सर,श्री हेमंत देशपांडे सर ,श्री.दीपक भांगे सर,श्रीमती 👉शबनम शेख मॕडम, अश्विनी क्षत्रिय मॅडम,शोभा तोटावाड मॕडम, 👉अनिल कांबळे सर ,कौशल्या करवेडकर मॕडम ,अनुप नाईक सर , या सर्वांनी सुलभकाची भूमिका उत्कृष्ट पार पाडली. ☘🌺🖥☘🌺🖥☘ *संदेश* *'विज्ञान तंञज्ञानाची धरु या कास , करू या देशाचा विकास'.* *〰〰〰〰〰〰〰* *✍संकलन/ वृत्तांत लेखन* *🌹प्रशिक्षणार्थी*🌹 *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.)* *ता.हदगाव जिल्हा नांदेड* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/02/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. 💥 जन्म :- १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- उपनगरीय रेल्वे-मेट्रोच्या डब्यांची लातूरमध्ये निर्मिती, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *बिहार - पाटणा येथील फतुहा येथे गंगा नदीत बोट उलटून 5 जणांचा मृत्यू, 15 जण करत होते प्रवास, कुटुंबियांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा बिहार सरकारने घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *वॉशिंग्टन : ज्यांच्याकडे चांगलं शिक्षण आणि ज्यांची चांगली वर्तणूक आहे, अशांना 12 वर्ष अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तर भारतात भूकंपाचा धक्का, दिल्ली-एनसीआर, जम्मू-श्रीनगरमध्ये जाणवले भूकंपाचे हादरे.* ----------------------------------------------------- 5⃣ *कोल्हापूर - आंबाबाई मंदिराचा 80 कोटींचा विकास आराखडा मंजूर* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी लाँच केला 'खेलो इंडिया' स्कूल गेम्स कार्यक्रम* ----------------------------------------------------- 7⃣ *पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचे केले कौतुक.* ----------------------------------------------------- विशेष बातमी :- *आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *नासा येवतीकर* या blog ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://goo.gl/A2cY7L आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कल्पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यपण एक रांगोळीच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?* वाघ *2) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* मोर *3) भारताचा राष्ट्रीय फुल कोणते ?* कमळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विठ्ठल चिंचोलकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 शिवानंद सूर्यवंशी 👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख, नांदेड 👤 कवी गजेंद्र ढवळापुरीकर, औरंगाबाद 👤 सादिक शेख 👤 अतुल भुसारे 👤 शिवम पडोळे 👤 शिवराज रंगावार 👤 राजेश हाक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छ* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म* दोष देतात लोक नेहमी फक्त धर्माला पण दोष असतो तो आपल्या वाईट कर्माला वाईट कर्माचा परिणाम कधीही वाईट असतो चांगले काम करत रहा परिणाम राईट असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपल्या लहानपणचं गावं लहान होतं. शंभर-दोनशे उंब-यांचं.. तिथं मरीआईचं आणि मारूतीचं अशी दोन मंदिरं होती. गावात बहुतेक शेतकरी, कामकरी, कष्टकरी. गावात कधी वासूदेव यायचा; पोतराज, बहुरूपी, गारूडी, नंदीबैलवाला, जोगतिणी यायच्या; जादूगार, अस्वलं-माकडं घेऊन येणारे, कसरतपटू येत. शिवाय डोंबारी..डोक्यावर लाल फेटा, पांढरा मळकट शर्ट, खाली धोतर, जुन्या फाटक्या चपला आणि गळ्यात ढोल अडकवून तो वाजवणारा कर्ता पुरूष, त्याची बायको आणि मुलांचा गोतावळा. नवरा-बायको सफाईने गुणिले(×) आकाराचे दोन दोन खांब मातीत घट्ट पुरायचे आणि त्यांना जोडणारा दणकट दोरखंड.* *मग त्याची मुलगी हातात पाच-सहा फूट लांब काठी घेऊन दोरखंडावर एका टोकाला उभी रहायची. खाली तिचा ढोलकर बाप, आई लोकगीत म्हणत असे आणि लहान भावंडं मातीत खेळत असत. डोंबा-याच्या वाद्यातून येणारा आवाज आसमंत भारून टाकायचा. त्याच्या दिशेने मग गावातील आबालवृद्ध गोळा व्हायचे. मग ती दोरखंडावर उभी असलेली मुलगी हातांतली काठी आडवी करीत, आपला तोल सांभाळत, खांबाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जायची. ती दोराच्या मध्ये जेव्हा यायची तेव्हा तिचा तोल जाऊन ती खाली पडणार की काय असे वाटायचे. प्रेक्षकांची ह्रदयं त्या दृश्यानं क्षणभर थांबल्याचा भास व्हायचा. पण दोरावरची मुलगी वाकबगार. तिचा बाप मग प्रेक्षकांतून तबक फिरवायचा.* *"जसं ती मुलगी काठीच्या आधाराने तोल सांभाळते, संसारात आपण स्वत:ला असं सांभाळत गेलो की आयुष्याचं सार्थक झालं असं समजलं जातं."* ••●🌷‼ *रामकृष्णहरी* ‼🌷●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही केलेला एक चांगला विचार तुम्हाला तर आनंद देतोच आणि त्या तुमच्या आनंदाबरोबरच इतरांनाही तुमच्या चांगल्या विचारांमुळे आनंद आणि प्रेरणा मिळते.म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या आनंदी जीवनाचा विचार करत नाही तर इतरांच्याही आनंदी जीवनाचा विचार करत आहात हे लक्षात असू द्या. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही* - मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= घोडा आणि नदी एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :- १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी. १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर, अमेरिका सर्वात श्रीमंत* ----------------------------------------------------- 2⃣ *कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित वीरेंद्र तावेडला जामीन मंजूर.* ----------------------------------------------------- 3⃣ *वॉशिंग्टन - अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) उपसंचालक अॅन्ड्यू मॅकबेक यांनी पदाचा राजीनामा दिला* ----------------------------------------------------- 4⃣ *मुर्शिदाबाद- पश्चिम बंगालमधील बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 42 वर* ----------------------------------------------------- 5⃣ *अलिबाग : आयकर विभागाकडून अभिनेता शाहरूख खानचं फार्महाऊस सील.* ----------------------------------------------------- 6⃣ *चंद्रदर्शनाचा आज तिहेरी योग, खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.* ----------------------------------------------------- 7⃣ *अंडर 19 वर्ल्ड कप - भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, 69 धावांवर पाकिस्तान ऑल आऊट, भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *व्यसन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सुरैया (१५ जून १९२९ – ३१ जनवरी २००४) भारतीय सिनेमा की गायिका और अभिनेत्री थीं। उन्होंने ४० और ५० के दशक में हिन्दी सिनेमा में अपना योगदान दिया। उन्हें उनकी प्रतिभा के लिए उपमहाद्वीप की मलिका-ए-तरान्नुम से नवाज़ा गया। ३१ जनवरी २००४ को सुरैया का निधन हो गया। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *"" फ्रेश सुविचार ""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) राष्ट्रगीत कोणी लिहिले ?* 👉🏼 रवींद्रनाथ टागोर *2) वंदे मातरम कोणी लिहिले ?* 👉🏼 बंकिमचंद्र चॅटर्जी *3) खरा धर्म ही कविता कोणी लिहिली ?* 👉🏼 साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 हिलाल पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म* दोष देतात लोक नेहमी फक्त धर्माला पण दोष असतो तो आपल्या वाईट कर्माला वाईट कर्माचा परिणाम कधीही वाईट असतो चांगले काम करत रहा परिणाम राईट असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●• *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आंधळं दळत अन कुत्र पिठ खातं* - परिश्रम एकाचे, फायदा दुसर्याचा. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ= ======== 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *समयसुचकता* एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.' तात्पर्य प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/01/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :- १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्हे, बडोदा संस्थानचे राजकवी. 💥 मृत्यू :- १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत चालणार आहे- सुमित्रा महाजन* ----------------------------------------------------- 2⃣ *जकार्ता : भारताची फुलराणी सायना नेहवालचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत झाला पराभव* ----------------------------------------------------- 3⃣ *दिल्लीच्या राजपथावर फडकला भगवा, प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला प्रथम क्रमांक* ----------------------------------------------------- 4⃣ *ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या वर्षी नव्या शब्दाच्या रूपात 'आधार' ला मिळाली जागा* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला गती द्या; मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ : उमरखेड येथे राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं उद्घाटन.* ----------------------------------------------------- 7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने आफ्रिकेवर 63 धावांनी मात करत मालिकेचा अखेर गोड केला आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= थॉमस पेन (अंग्रेज़ी: Thomas Paine, जन्म: 9 फ़रवरी 1737, देहांत: 8 जून 1809) एक लेखक, अविष्कारक, बुद्धिजीवी, क्रांतिकारी और संयुक्त राज्य अमेरिका के राष्ट्रपिताओं में से एक थे। उनका जन्म इंग्लैण्ड के नॉर्फ़ककाउंटी (ज़िले) के थ़ॅटफ़र्ड शहर में हुआ था और सन् 1774 में वे इंग्लैण्ड छोड़ अमेरिका में जा बसे। उन्होंने सन् 1776 की अमेरिकी क्रांति में अहम भूमिका निभाई। उन्होने अमेरिका में क्रांति की उठती लहर को अपनी लिखाई के ज़रिये अपनी राजनैतिक सोच का ढाँचा दिया। उनकी दो सब से प्रभावशाली लिखईयाँ थीं - "आम सूझबूझ" (Common Sense, कॉमन सॅन्स) नाम की पुस्तिका जिसमें अमेरिका की ब्रिटेनसे आज़ादी की दलील दी गई"अमेरिकी बवंडर" (The American Crisis, द अमॅरिकन क्राइसिस) नाम की पत्रिकाएँ जो 1776-1783 तक चलीं और जिनमें अमेरिका की क्रांति की भारी हिमायत की गई "कॉमन सॅन्स" अमेरिका में स्वतंत्रता के लिए जागरूकता लाने में इतनी कामयाब हुई के जॉन ऐडम्स (अमेरिका के दूसरे राष्ट्रपति) ने कहा के "कॉमन सॅन्स के लेखक की क़लम के बिना वाशिंगटन का तलवार उठाना बेकार जाता"। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *"" फ्रेश सुविचार ""* =========ஜ۩۞۩ஜ========= मोठा विचार केला तरच मोठे बनू शकाल *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)मुंडा आदिवासी जमात अधिक वास्तव्य असणारे राज्य कोणते?* 👉 झारखंड *२) दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?* 👉 संयूग *३)संयूगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या सौजन्या व अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयूगाच्या केलेल्या लेखनास काय म्हणतात?* 👉 रेणूसुत्र *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील वानखेडे, सहशिक्षक, किनवट 👤 वीरभद्र कारे 👤 कोंडीराम केशवे 👤 नरेंद्र जोशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *झाड लावणारा* झाड लावणाराच आज उन्हात उभा आहे नवख्या माणसाचा झाडावर ताबा आहे झाड न लावता फळाची काही आशा धरतात झाड लावणाराला हळूच बाजूला करतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही. कामाचा दर्जाही घसरेल, मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्यक्ष अनुभव* *साप, डोक,शेपुट* (तीन शब्दांवरुन कथा) एकदा एका सापाच्या शेपटाने त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले. ते म्हणाले, 'कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटानं वाटेल तिकडं जावं अन् दुसर्या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलुमाची गोष्ट आहे.' हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, 'शेपटाला डोळे नाहीत, मेंदू नाही. यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य नाही.' पण डोक्याचा हा युक्तिवाद शेपटास आवडला नाही. त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला. ते पाहून डोक्यास फार राग आला. त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली. मग शेपटाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली. साप शेपटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले. आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेपटास फार लाज वाटली व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले. तात्पर्य प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगारी काय आहे हे मनुष्यास समजत नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *माझी शाळा माझे उपक्रम* 🌺 *जीवन विचार* 🌺 ➖➖➖➖➖➖➖ *आपल जीवन अनेकदा युध्दक्षेञ बनत असतं.त्यावेळी मनात मोठा संघर्ष चालू असतो.मनात विसंवादाच वादळ सुरू असतं तेव्हा आपल्या मनात सुसंवाद स्थापन करण्याचा प्रवृत्तीस विवेक असं म्हणावं !* *विवेक आपल्या मनाचं सुकाणू आहे तर विचार आपल्या मनाचं शीड आहे.सुकाणू आणि शीड नीट जागेवर राहून काम करत असतील तर समुद्रात इकडं - तिकडं सुरक्षितपणे फिरता येईल नाहीतर क्षणार्धात जलसमाधी मिळेल.विवेक ही मर्यादशील शक्ती आहे.समुद्राला मर्यादा असते.* pramila senkude *मर्यादा ही मनाच्या कुंपणासारखी असते. संयमाचा लगाम हाती असल्यानंतर जीवन अश्व इकडं - तिकडं कसा उधळेल?* *ज्याप्रमाणे फळावरुन झाडाला ओळखतात, सोन्याला कस लावून सोन्याची पारख करतात, आवाजावरुन घंटेची किंमत ठरवतात; त्याप्रमाणे मनुष्याच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकावरुन करतात.* 〰〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰
*🌹🌷🌹सस्नेह* *निमंत्रण*🌹🌷🌹 💃💃💃💃💃💃 🇮🇳 उत्सव नृत्याचा , आनंदाचा , जोशाचा , ताशाचा , बलशाली , आनंदीत , हर्शीत होण्याचा नवनवोन्मेष घेण्याचा 🇮🇳 💃💃💃💃💃💃 जिल्हा परिषद *प्राथमिक* *शाळा वाटेगाव* शाळेत *बालमहोत्सव* सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन, समाजप्रबोधन आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. 🙏🙏 ठिकाण- *जिल्हा* *परिषद* *प्राथमिक* *शाळा वाटेगाव* *वेळ* - *सकाळी ठीक* *10 ..वा* *दि* *25/01/2018* *🙏🏻विनीत*🙏🏻 *शाळा* *व्यवस्थापन* *समिती* तथा *मुख्याध्यापक* व *सर्व* *शिक्षक* *वृंद* *जिल्हा* *परिषद* *प्राथमिक* *शाळा* वाटेगाव. (श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.) धन्यवाद 🙏 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/01/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले. १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान. १९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान. २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न प्रदान. 💥 जन्म :- १८६३: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे 💥 मृत्यू :- १६६५: सोनोपंत डबीर १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते १९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर मेट्रो येत्या मार्चपासून रुळावर धावणार, नागपूरकरांची प्रतीक्षा संपली.* ----------------------------------------------------- 2⃣ *नांदेड : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंग झाल्याची पोलीसात तक्रार. दोषींवर कारवाईसाठी विद्यार्थ्यांनी पुकारला बंद.* ----------------------------------------------------- 3⃣ *रांची : चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा कारावास.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित करणार नाही, मल्टिप्लेक्स असोसिएशनचा निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - 38 जम्मू-काश्मीर पोलिसांना यंदाचा शौर्य पुरस्कार जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣ *मेलबर्न - रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक, उपांत्यपूर्व लढतीत थॉमस बर्डिचवर ७-६(१), ६-३, ६-४ अशा फरकाने केली मात* ----------------------------------------------------- 7⃣ *जोहान्सबर्ग कसोटी - भारताचा पहिला डाव १८७ धावांवर आटोपला, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची अर्धशतके* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* राष्ट्रीय मतदार राजा जागा हो....! इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रमाबाई रानडे* रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी साताराजिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदीआणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करतात ? * 👉 28 फेब्रुवारी *२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करतात ?* 👉 11 मे *३) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करतात ?* 👉 29 ऑगस्ट *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर साहित्य स्पंदन समूह, संचालिका 👤 ललेश पाटील मंगनाळीकर 👤 राजीव सेवेकर 👤 महेबूब पठाण 👤 अंबादास कदम 👤 राहुल आवळे 👤 नरेश दंडवते *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपक्व* काही काही लोक नुसते बकत रहातात चांगल्या वाईटातून काही शिकत रहातात जिथून शिकता येईल तिथून शिकत रहावं जेवढ होता येईल तेवढ परिपक्व व्हावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवी कुसुमाग्रज, अब्दुल कलाम, आगरकर किंवा तुकोबा यांना काय म्हणावं, ही खरंच वेगळी माणसं होती का? 'वेडी' होती का? आणि हे 'वेड' असलंच तर ते कोणत्या प्रकारचं होतं? ही एवढी बुद्धिमान, कर्तबगार माणसं पण 'अर्थप्राप्ती' ला त्यांच्या जीवनात नगण्य स्थान होतं. 'जोडोनिय धन उत्तम व्यवहारे' हे त्यांना कळलं नसेल का?* *जगरहाटी वेगळी असते. लिओ टाॅलस्टाॅय यांची 'हाऊ मच लँड डज ए मॅन नीड?' ही कथा आहे. पाखोम हा शेतकरी तीचा नायक. त्याला जमीन घेण्याचं वेड आहे. शेवटी त्याची बश्कीर समुदायाच्या लोकांशी ओळख होते. ते पाखोमला अत्यल्प किंमतीला जमीन विकायला तयार होतात. मात्र एक अट असते. पाखोमने सूर्योदयाला धावायला सुरूवात करायची आणि सूर्यास्ताला थांबायचे. त्या दरम्यान जितकी जागा तो चालेल, तेवढी त्याला मिळेल. दुस-या दिवशी पाखोम धावू लागतो. सूर्यास्तापूर्वी तो मूळ जागेवर बश्कीरना भेटायला आणि आपण किती अंतर तुडवले हे सांगायला परततोही. बश्कीरांना तो ते सांगतोही. पण अतिश्रमाने तो कोसळतो.* *वर उल्लेखिलेल्या ध्येय वेड्यांच्या अगदी विरूद्ध टोकाची वृत्ती पाखोमची. माणसाला जन्मत:च काही मूलभूत वृत्ती प्राप्त झालेल्या असतात. काही स्वत:साठी झटतात; काही दुस-यांसाठी. अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्त्या' नावाचा सुंदर लघुनिबंध लिहिला आहे. त्यात रात्रभर तेवत राहून इतरांना प्रकाश देणारी एक आणि जिचा काहीच उपयोग न झाल्याने सडून, कुरतडून गेलेली दुसरी अशा मेणबत्त्यांचे सुरेख दर्शन घडवले आहे. शेवटी ज्याने त्याने आपली मेणबत्ती कोणती हे ठरवायचे आहे !* ••●🔶‼ *रामकृष्णहरी* ‼🔶●•• 🔶🔹🔶🔹🔶🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो. अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा.म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल. *©व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃🏹🌸🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *गरज सरो, वैद्य मरो* - आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृती महत्वाची* स्वावामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*माझी शाळा माझे उपक्रम* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *🌺आनंदनगरी*🌺 〰〰〰〰〰〰〰 *दि.२२जानेवारी २०१८ आमच्या जि.प.प्रा.शाळा वाटेगाव* येथे आनंदनगरी हा उपक्रम घेण्यात आलेला आहे. 👭👭👭👬👬👭👭 सर्वांनी आनंदाने भाग घेतला.विविध पदार्थ व त्यामधून मिळणारा आनंद याचा आस्वाद बालचिमुकल्यांनी व आम्ही सर्वांनी घेतला. 👉 *उद्दिष्ट* वस्तूंची देवाणघेवाण व व्यवहारी ज्ञान प्राप्त होणे. खरेदी विक्री नाणी नोटा यांचा वापर जमा शिल्लक परत हे समजणे. 〰〰〰〰〰〰〰 *✍शैक्षणिक चारोळी* *"छोट्या छोट्या उपक्रमातुन*, *मिळतो आनंद आणि ज्ञान* *जि.प.शाळेचा आहे आम्हांस अभिमान*" 〰〰〰〰〰〰 ✍ वृत्तलेखन/आयोजक श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगाव (स.शिक्षिका) ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/01/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन. 💥 जन्म :- १८९७ - भारतीय क्रांतिकारक, नेताजी सुभाषचंद्र बोस १९२६ - मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे 💥 मृत्यू :- ११९९ - याकुब, खलिफा. १५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सन 2017-18 या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त मान्यवर कलाकारांची नावे केली घोषित* ----------------------------------------------------- 2⃣ *गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आज मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून घेणार शपथ* ----------------------------------------------------- 3⃣ *अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक - मोहन जोशींचा अध्यक्षपदाचा अर्ज अपात्र.* ----------------------------------------------------- 4⃣ *शेअर बाजाराची घौडदौड सुरूच. शेअर बाजार 35 हजार 650 वर पोहचला. शेअर बाजार 36 हजारांवर पोहचण्याची चिन्ह.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा, 25 जानेवारीपर्यंत 50 कोटी भरण्याचा आदेश.* ----------------------------------------------------- 6⃣ *सहा वेळचा चॅम्पियन नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई - 6 एप्रिलला रंगणार आयपीएल 11 चा उदघाटन सोहळा, राजीव शुक्ला यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालविवाह कसे रोखता येतील ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नेताजी सुभाषचंद्र बोस* सुभाषचंद्र बोस (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५ ) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली?* 👉 १९८९ *२) दिल्लीत १९७६ मध्ये महिला दक्षता समितीची स्थापना कोणी केली?* 👉 प्रमिला दंडवते *३) शिक्षण संक्रमण हे मासिक कोण प्रकाशित करते?* 👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष बोधनकर, नांदेड 👤 भालचंद्र गावडे, सोलापूर 👤 दिनेश चिंतावाड, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* काटा काट्या सारखं वागला म्हणून फुलाने तसे वागावे का? शहाण्या माणसाने म्हणून मुर्खा सारखे जगावे का? काटा काट्या सारखं वागेल चांगली अपेक्षा धरू नका काट्या कडून फुला प्रमाणे वागण्याचा हट्ट करू नका शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल. जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासुच्या जीवावर जावई उदार* - दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चल रे भोपळया टुणुक टुणुक* एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌹🌹🌹🌹🌹🌹 *🌺जीवन विचार*🌺 *〰〰〰〰〰〰〰* *"प्रयत्न तो देव जाणाव"* *"देवासकट सर्वकाही प्राप्त करून देण्याच"* *सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून* *प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय".* *प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की , *प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो.थोडक्यात प्रयत्न करीत रहाणे हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून त्रिकालबाधित निसर्गनियमांशी ते सुसंगत आहे. "प्रयत्न करून यश मिळणे हा नियम आहे" हे सत्य माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. मात्र प्रयत्न योग्य दिशेने होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत . नुसते कष्ट केल्याने किंवा प्रयत्न केल्याने यश मिळत नसते . अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्याने माणसाला यशाचे शिखर लवकर गाठता येते.* *थोडक्यात अभ्यासपूर्वक व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने माणसांना जे धन व यश प्राप्त होते , ते त्यांना सुख शांती , समाधान , यश व समृद्धी प्राप्त करून तर देतेच शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो. कोणतीही गोष्ट सातत्याने प्रयत्नपूर्वक केली असता यश नक्कीच प्राप्त होते.* 〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड *~~~~~~~~~~~~~~* http://www.pramilasenkude.blogspot.in ~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/01/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार. 💥 जन्म :- १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर १९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट. १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाचे सौंदर्य खुलविण्यासाठी बांधणार पारदर्शक स्काय वॉक, पहिल्या टप्प्यातील ५ कोटींचा प्रस्ताव सादर* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - ओम प्रकाश रावत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- आप पक्षाच्या 20 आमदारांचं सदस्यत्व रद्द, निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसाच्या दावोस (स्विर्त्झलँड) दौऱ्यावर; वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात होणार सहभागी* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्यावर महानाटय 'जाणता राजा'चे 6 ते 10 एप्रिल दरम्यान होणार प्रयोग* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई: इथिओपियाचा सॉलोमन डेकसिसा 'मुंबई मॅरेथॉन'चा विजेता: दोन तास ९ मिनिटं ३३ सेकंदात पूर्ण केली शर्यत* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली : अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघाने प्रत्येकाला आपल्या खेळातून प्रेरणा दिली, त्यांचा देशाला अभिमान आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक पुस्तक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत नामदेव* संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतीय पूर्व किनारपट्टीवरील सागरजलाची क्षारता किती टक्के आहे?* 👉 34% *२) सयुंक्त राष्ट्रसंघाने जागतिक शैक्षणिक वर्ष कधी घोषित केले होते?* 👉 १९७० *३) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली?* 👉 २० सप्टेंबर १९८५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 स्वप्नील ईबीतवार, येवती 👤 हरीश बल्केवाड, येवती 👤 महेश मुदलोड, येवती 👤 नरेश मुंगा पाटील 👤 हुशन्ना मुदलोड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *तडजोड* अन्यायाशी तडजोड सर्वात मोठे पाप आहे अन्याय सहन करणं म्हणजे उलटं माप आहे योग्य वेळी अन्यायाला वाचा फुटली पाहिजे अन्यायग्रस्त व्यक्ती त्यातून सुटली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *धावणे ही आजची कमालीची गरज झाली आहे. महानगरी, चाकरमाणी असो की खेड्यातला शेतकरी, 'कशासाठी पोटासाठी' करीत तो सकाळपासून रात्रीपर्यंत अविश्रांत धावतो. असाध्य ते साध्य करणे हे त्याचे पोटाच्या पुढचे ध्येय असते. प्रपंचाच्या जबाबदा-यांचे पालन करता करता त्याला धावण्याची एवढी सवय होते की तो थांबणे विसरूनच जातो. 'पाॅज' नावाची मनाला आणि शरीराला उभारी देणारी, ताजेपणा देणारी युक्ती आपणही स्वीकारू शकतो, हेच त्याच्या स्मरणापलीकडे जाते.* *'जीवन फार धकाधकीचे झाले आहे' हे वा अशाप्रकारची वाक्य आता गुळगुळीत झालीत. कारण त्यातील अर्थ सर्वमान्य झाला आहे. मात्र, हे धकाधकीचे जीवन अल्पकालीन ठरू नये, यासाठी 'चार युक्तीच्या गोष्टी' मधील एक गोष्ट 'क्षणभर विश्रांती' ची आहे, हे लक्षात घेऊन त्याचा अंगिकार होणे आवश्यक आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *-संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ?जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोगलगाय नि पोटात पाय* - एखाद्याचे खरे स्वरुप न दिसणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नगारा* एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्यावर एका झाडाची फांदी वार्यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या. उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏👏 🏆🏆🏆🏆🏆🏆 *दि.१८/१९जानेवारी २०१८ आमच्या जि.प.प्रा.शाळा वाटेगाव* येथे विविध खेळांचा स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. 👭👭👭👬👬👭👭 स्पर्धेत सर्वांनी आनंदाने भाग घेतला.विविध खेळ व त्यामधून मिळणारा आनंद आणि होत असलेला अशा अनेक बाबींचा कौशल्य विकास हेच उद्दिष्ट. 〰〰〰〰〰〰 ✍स्पर्धा आयोजक श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शिक्षिका) ता.हदगाव जिल्हा नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/01/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महर्षी मार्कंडेय ऋषी जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर. १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८७१: टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमशेटजी टाटा १९०६ - ऍरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती. १९३० - बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर. 💥 मृत्यू :- १९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात. १९५१: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’चा आराखडा अंतिम, मराठवाडा, विदर्भातील 5149 गावांना होणार फायदा; राज्याला मिळणार 2800 कोटी रुपयांची मदत* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्ली: 'आप'च्या २० आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई विद्यापीठाच्या ४०२ परीक्षांपैकी १२९ परीक्षांचे निकाल जाहीर, एकूण ६ हजार १६७ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर.* ----------------------------------------------------- 4⃣ *वणी (यवतमाळ) येथे 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे* ----------------------------------------------------- 6⃣ *पुण्याच्या शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी, पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवत, झिम्बाब्वे विरुद्ध दहा विकेटनं मिळवला दणदणीत विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मार्कंडेय जयंती विशेष लेख* *महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत* ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा मृकंड यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, " तुमच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नाही, परंतु माझी एवढी कठोर तपश्चर्या केल्यामुळे, मी आपणास एक पुत्र देत आहे. मात्र त्याचे आयुष्य फार....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_17.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्री रतनजी टाटा* रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले, हे खरे असले, तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. इ.स. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इ.स. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्क्यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. इ.स. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. इ.स. १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इ.स. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नााही हे टाटांनी सिद्ध केलं. हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते त्या गाळाला काय म्हणतात?* 👉 हिमोढ *२) मृत समुद्राच्या पाण्याची क्षारता किती टक्के आहे?* 👉 332% *३) कोणत्या दोन देशाच्या सीमेवर मृत समुद्र आहे?* 👉 जॉर्डन व इस्त्राईल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 किशोर पाटील, युनिक कॉम्प्युटर्स, धर्माबाद 👤 अहमद लड्डा, पत्रकार, धर्माबाद 👤 शंकर बेल्लूरकर 👤 संतोष शेटकार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *मातीचे पाय* कितीही मोठे व्हा पण मातीचे पाय असू द्या मोठे झाल्याचा मनात पण अहंकार नसू द्या मोठं होऊनही असतात ज्यांचे मातीचेच पाय त्यांच्या पेक्षा मोठे जगात कोणीच नाय शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *धावणे ही आजची कमालीची गरज झाली आहे. महानगरी, चाकरमाणी असो की खेड्यातला शेतकरी, 'कशासाठी पोटासाठी' करीत तो सकाळपासून रात्रीपर्यंत अविश्रांत धावतो. असाध्य ते साध्य करणे हे त्याचे पोटाच्या पुढचे ध्येय असते. प्रपंचाच्या जबाबदा-यांचे पालन करता करता त्याला धावण्याची एवढी सवय होते की तो थांबणे विसरूनच जातो. 'पाॅज' नावाची मनाला आणि शरीराला उभारी देणारी, ताजेपणा देणारी युक्ती आपणही स्वीकारू शकतो, हेच त्याच्या स्मरणापलीकडे जाते.* *'जीवन फार धकाधकीचे झाले आहे' हे वा अशाप्रकारची वाक्य आता गुळगुळीत झालीत. कारण त्यातील अर्थ सर्वमान्य झाला आहे. मात्र, हे धकाधकीचे जीवन अल्पकालीन ठरू नये, यासाठी 'चार युक्तीच्या गोष्टी' मधील एक गोष्ट 'क्षणभर विश्रांती' ची आहे, हे लक्षात घेऊन त्याचा अंगिकार होणे आवश्यक आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *-संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेथे विचारांना अनुभवाचे खतपाणी घातले की, जीवनातल्या वेलीवर सौंदर्याची आणि आनंदाची फुले अधिक जोमाने फुलायला लागतात आणि त्यांचा सुगंध इतरत्र दरवळायला लागतो.त्या दरवळणा-या सुगंधामुळे इतर लोकही धुंद होऊन जातात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक* - एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *पारधी व कबूतर* एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात होते. तिकडून येणारे जाणारे लोकसुद्धा त्या वडाच्या सावलीत बसून विश्रांती घेत होते. त्या झाडावर लघुपतनक नावाचा कावळा रहात होता. एकदा खाण्यसाठी काही मिळते का हे बघण्यसाठी लघुपतनक गावाकडे उडत जात होता. एवढ्यात त्याच्या नजरेस काळाकभिन्न पारधी जाळे घेऊन जात असलेला दिसला. ते बघून कावळ्याला वाटले, ''हा दुष्ट पारधी वडाच्या झाडाकडेच चालला असणार. म्हणजे आपल्या पक्षी बांधवांवर कदाचित संकट येणार तर....! कावळा तसाच वडाच्या झाडावर परत आला. आणि सर्व पक्षांना म्हणाला, '' हा दुष्ट पारधी धान्य टाकून तुम्हाला जाळ्यात अडकवण्यास येत आहे. तुम्ही धान्य खाण्याच्या मोहाने जर गेलात तर त्या जाळ्यात अडकाल!'' पारधी थोड्यावेळातच त्या झाडाजवळ आला आणि जाळं टाकून बाजूला बसला. तेवढ्यात चित्रगीव नावाचा कबूतरांचा राजा आपल्या परिवारासमवेत अन्नाच्या शोधासाठी आकाशातून उडत होता. त्याच्या नजरेस पारध्याने टाकलेले धान्य दिसले. तेव्हा लघुपतनक त्या चित्रग्रीवाला 'नको नको' म्हणत असतानाही चित्रग्रीव आणि कुटुंबीय त्या धान्यावर तटून पडले. खरं म्हणजे चित्रग्रीव स्वत: अतिशय हुशार आणि चाणाक्ष पण चित्रग्रवीच्या नशिबातच संकट असल्यास त्याला तो तरी काय करणार? चित्रग्रीव आपल्या कुटुंबीयांसकट त्या जाळ्यात अडकला. बरीच कबुतरे जाळ्यात अडकल्याचे बघून पारधी खूष झाला. त्या कबुतरांना मारण्यासाठी पारधी काठी घेऊन धावत आला. त्या बरोबर चित्रग्रीवाने सर्व कबुतरांना जोर करून जाळ्यासकट उडण्याचा आदेश दिला. त्याबरोबर जाळ्यासकट कबुतरांनी आसमंत गाठला. पारधी त्यांचा पाठलाग करू लागला, तशी कबुतरे वेगाने उडू लागली. शेवटी पारधी स्वत:च्या नशिबाला दोष देत मागे फिरला. पारध्याच्या संकटातून पार पडल्याचे लक्षात येताच चित्रग्रीव म्हणाला, ''हिरण्यक नावाचा एक उंदीर माझा मित्र आहे. आपल्याला मोकळं करण्यासाठी त्याची मदत होईल.'' हिरण्यक एका टेकडीच्या बिळात रहात होता. तिकडे पोहोचल्यावर चित्रग्रवाने हिरण्यकाला मदतीची हाक दिली. त्याबरोबर हिरण्यक धावत आला. चित्रग्रीवाने घडलेली हकीगत सांगून जाळ्याचे पाश तोडण्याची विनंती केली. हिरण्यकाने मित्रप्रेमखातर आणि संकटात सापडलेल्यास मदत करण्याच्या वृत्तीने चित्रग्रीवास मोकळा करू लागला. तेव्हा चित्रग्रीवाने हिरण्यकास सांगितले की, ''आधी माझ्या परिवारचे पाश तोड. आपल्या प्रजेला संकटात ठेवून राजाने सर्वांच्या आधी संकटमुक्त होणे योग्य ठरणार नाही. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे कृती कर.'' हिरण्यकाला चित्रग्रीवाचे विचार ऐकून खूप आनंद झाला. हिरण्यकाने चित्रग्रीवाच्या परिवाराला आधी मोकळे केले आणि नंतर चित्रग्रीवास मोकळे केले. चित्रग्रीवाने हिरण्यकाचे आभार मानले असता, हिरण्यक उद्गारतो, ''कधी संकट आले तर मला जरूर हाक मार. मी मदतीला धावून येईन.'' तात्पर्य : संकटसमयी जो मित्र धावून येतो तोच खरा मित्र. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
स्त्री स्त्री सिर्फ तब तक तुम्हारी होती है जब तक वो तुमसे रूठ लेती है,लड लेती है आंसू बहा बहाकर , और दे देती है दो चार उलाहना तुम्हे। कह देती है जो मन में आता है उसके बिना सोचे,बेधडक लेकिन जब वो देख लेती है उसके रूठने का, उसके आंसुओं का कोई फर्क नहीं है तुम पर तो एकाएक वो रूठना छोड देती है रोना छोड देती है। मुस्कुराकर देने लगती है जवाब तुम्हारी बातों पर, समेट लेती है वो खुद को किसी कछुए की तरह अपने ही कवच में , और तुम समझ लेते हो कि सब कुछ ठीक हो गया है। तुम जान ही नही पाते कि ये शांत नही है मृतप्राय हो चुकी है, कहीं न कहीं गला घोंट दिया है उसने अपनी भावनाओं का , और अब जो तुम्हारे पास है, वो तुम्हारी होकर भी तुम्हारी नहीं है। क्योंकि स्त्री , सिर्फ तब तक तुम्हारी होती है जब तक….
संकलित
🙏🏻🌹 नमस्कार मंडळी 🌹🙏🏻 मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही... किती वेळ लागतो... बोअरिंग काम... इंग्रजित कसं पटापट टाईप होतं... तुमचं मराठी म्हणजे......" मी त्याला सांगितलं, "अरे बाबा श्रीमंत आणि गरिबामध्ये तेवढा फरक असणारच". तो खुश होऊन म्हणाला "चला म्हणजे मराठी गरीब हे तू मान्य केलंस तर"?? मी म्हटलं "मित्रा चुकतोयस तू.. इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?" तो म्हणाला २६.. मी म्हटलं "मराठीत याच्या दुप्पट ५२ आहेत.. इंग्रजिच्या दुप्पट मालमत्ता आहे आमची.. आता सांग, कोण गरीब आणि कोण श्रीमंत? केवळ जीन्स घालून बाहेर पडणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते.. पण भरजरी कपडे घालून सर्व दागदागिने धालून बाहेर पडणारी स्त्री जास्त वेळ घेणारच.. आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते.. म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही, तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात." 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदिंचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली. कुणी लिहिली हे कदाचित विकी'पीडी'या लाच ठाऊक असेल. वाचाच, मस्त आहे..! 🌹 *शृंगार मराठीचा* _*अनुस्वारी*_ शुभकुंकुम ते भाळी सौदामिनी | _*प्रश्नचिन्ही*_ डुलती झुमके सुंदर तव कानी | नाकावरती _*स्वल्पविरामी*_ शोभे तव नथनी | _*काना*_-काना गुंफुनी माला खुलवी तुज मानिनी | _*वेलांटी*_चा पदर शोभे तुझीया माथ्याला | _*मात्रां*_चा मग सूवर्णचाफा वेणीवर माळला | _*उद्गारा*_चा तो गे छल्ला लटके कमरेला | _*अवतरणां*_च्या बटा मनोहर भावती चेहर्याला | _*उ*_काराचे पैंजण झुमझुम पदकमलांच्यावरी | _*पूर्णविरामी*_ तिलोत्तम तो शोभे गालावरी ॥ *अनामिका* 🌹मराठी भाषेचा श्रृंगार
संकलित
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/01/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरुपात आयुर्विमा महामंडळ झाले. १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी. १९९६ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड २००७ - सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला. 💥 जन्म :- १८९२ - चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक. १९०६ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते. 💥 मृत्यू :- १९०५ - देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी. १९५१ - अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी. १९६० - दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक. १९९० - रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जी एस टी मध्ये पेट्रोल-डिझेलबाबत कोणताही निर्णय नाही, सामान्यांची निराशा* ----------------------------------------------------- 2⃣ *29 वस्तूंवरील कर माफ तर 49 वस्तूंवरील कर कपात, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडलेला पद्मावत' सिनेमा सर्व राज्यांमध्ये होणार प्रदर्शित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय* ----------------------------------------------------- 4⃣ *एमपीएससीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; २२ जानेवारीपर्यंत भरता येणार आनलाईन अर्ज* ----------------------------------------------------- 5⃣ *रहस्यमय 'राक्षस' या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच, 23 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित* ----------------------------------------------------- 6⃣ *उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील सब ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या महाराष्ट्र संघात तेजस मंगेश चव्हाण याची निवड* ----------------------------------------------------- 7⃣ *वर्षभर 'विराट' कामगिरी करणा-या विराट कोहलीला ICC चा प्रतिष्ठेचा 'क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हमें तो लूट लिया* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *चिंतामण विनायक जोशी* *चिंतामण विनायक जोशी* (जानेवारी १९, १८९२:पुणे, महाराष्ट्र - नोव्हेंबर २१, १९६३:पुणे) हे विनोदी साहित्याकररि प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते तसेच आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे त्यांनी काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. त्यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत. दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी केले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतातर्फे राष्ट्रकुलस्पर्धेत कोणत्या कुस्तीपटूने सुवर्णपदक पटकाविले?* 👉 सुशीलकुमार *२) देशातील पहिला हरीत रेल्वेमार्ग कोणता?* 👉 रामेश्वरम-मनामदुराई *३) दतमहात्म्य' हा सात हजा ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 वासुदेव बळवंत फडके *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अजय कोंडलवाडे, सहशिक्षक, बिलोली 👤 अजय परगेवार उमरेकर 👤 माधव चपळे 👤 शिवशंकर स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *गाजरं* बारा महिने कोणी खात नाही बाजरं दाखवून काय होणार लाल लाल गाजरं पहायला मिळण्या पेक्षा खायला मिळालं पाहिजे बारा महिने कोणी काही खात नाही कळालं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्याने आपल्या जीवनात परिस्थिती वेगवेगळी रूपे घेऊन आपली परीक्षा घेत असते.त्या परीक्षेत जीवनात कधी दु:खाचे,कधी सुखाचे तर कधी न सुटणारेही अवघड प्रश्न येतात आणि त्याच्या मानसिकतेनुसार, अनुभवानुसार सोडविण्याचा प्रयत्न करतात.जर समजा प्रयत्न नाहीच केला तर जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होता येत नाही.जर व्हायचेच असेल तर समोर येणा-या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्याची मानसिकता तयार करावी लागेल आणि न घाबरता ,न डगमगता मन संयमीत ठेऊन सदविवेक बुध्दीने सारासार विचार करून धैर्याने आणि हिंमतीने हाताळायला शिकले तरच जीवनाच्या ख-या परीक्षेत यशस्वी होता येईल हे तितकेच सत्य आहे. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 💕🌱💕🌱💕🌱💕🌱💕🌱💕 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कुर्हाडीचा दांडा गोतास काळ* - आपलाच माणूस आपल्या नुकसानीस कारण होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका गाढवाची गोष्ट* एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली. एके रात्री पुनवेचे पिटूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, 'कोल्होबा, या चांदण्यांमुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?' कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही आणि गाणार? म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा!' 'का रे, मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते?' असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्ह्याला म्हणाले, 'आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना? कोल्हा म्हणाला, 'नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल, तर खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत. खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही चोप देईल.' गाढव म्हणाले, 'कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का? उलट तो माझा सन्मानच करील.' हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहून तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूच्र्छा येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखणदाराने त्याच्या गळय़ात दोरखंडाने एक उखळ बांधले. एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच शुध्दीवर आलेले ते गाढव गळय़ात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊलागले, तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, 'गाढवमामा, तुमचा दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्याने तुमच्या सन्मानार्थ हा 'भव्य मणी' तुमच्या गळय़ात बांधला का?' पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🙏👏सस्नेह नमस्कार* 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 *बक्षिस वितरण सोहळा* 〰〰〰〰〰〰 (श्री संत नंदी महाराज पुण्यतिथी व याञा महोत्सवानिमित्त) *मौजे कवाना ता.हदगाव जिल्हा नांदेड* *दि.१० जानेवारी २०१८* *〰〰〰〰〰〰* वरील आयोजित भव्य शालेय लेझीम स्पर्धेत आमच्या जि.प.प्रा.शाळा वाटेगाव येथील संघाला *पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक (३,१११रु).* मिळाले आहे. 👉त्या अनुषंगाने आम्ही शाळेतील बालचिमुकल्यांसाठी उत्तम दर्जाचे *(Lunch box ,bottle )*बक्षिस म्हणून आज दि.१७-०१-२०१८ रोजी खाऊ वाटप करून करण्यात आले आहे. या यशस्वीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमास वाटेगाव नगरीचे मा.शि.वि.अ.श्री पि.वाय.जाधव साहेब , शा.व्य.स.चे श्री जाधव साहेब तसेच शाळेचे मा.मु.अ.साहेब श्री चव्हाण सर व गावकरी मंडळी व शाळेतील सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा हर्षमय कार्यक्रम पार पडला. सर्वांनी केलेल्या कौतुकाने व अभिनंदनीय💐💐 शुभेच्छारुपी आशीर्वादाने शाळेतील सर्व बाल चिमुकले विद्यार्थी व आमच्या सर्व गुरूजणांची मने आनंदाने भारावून गेली. 👭👬👭👬👭 =============== *माझा नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम* मी राबवित असलेल्या अनेक शैक्षणिक व सामाजिक नाविण्यपूर्ण उपक्रमापैकीचा हा उपक्रम 👇👇👇👇👇👇 *मौजे कवाना येथे दरवर्षी घेण्यात येत असलेल्या भव्य लेझीम स्पर्धेच्या ठिकाणी* *माझे स्वर्गीय आईवडील* *(सौ.लक्ष्मीबाई कुंडलीक सेनकुडे)* *यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ म्हणून स्पर्धासाठी आलेल्या तेथील प्रेक्षकांना व बालचिमुकले विद्यार्थी यांना पुढील वर्षीपासून दरवर्षी सावलीसाठी मंडप उपलब्ध करून देण्याचे तिथेच मी देऊ(जाहीर)केले.〰〰〰〰〰〰* 🙏आईवडिलांचा आशीर्वादरुपी वरदहस्त आणि तुमच्या सर्वांचा प्रेरणेमुळे मला हे सर्व कार्य करण्याचे बळ मिळत आहे. *🙏धन्यवाद*🙏 ✍आपलीच सहकारी *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* *(स.शिक्षिका)* (लेझीम पथक प्रमुख व मार्गदर्शक) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :- २००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जीएसटी परिषदेच्या 18 जानेवारीला होणा-या बैठकीत जीएसटीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा समावेश करण्यावर चर्चा होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 2⃣ *हज यात्रेचं अनुदान यंदापासूनच बंद, केंद्र सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश दिले.* ----------------------------------------------------- 4⃣ *भारताच्या अंडर 19 च्या संघाने पापुआ न्यू गिनियावर (PNG) 10 विकेट्स राखून मोठा विजय.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन.* ----------------------------------------------------- 6⃣ *तिस-या कसोटीसाठी दुखापतग्रस्त वुद्धीमान सहाच्या जागी दिनेश कार्तिकची निवड.* ----------------------------------------------------- 7⃣ *सेंच्युरियन कसोटी -दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांवर आटोपला, भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे आव्हान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शकुंतलाबाई परांजपे* शकुंतलाबाई परांजपे या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती. जन्म- १७ जानेवारी १९०६ पुणे मृत्यू- ३ मे २००० जोडीदार - युरा स्लेप्टझॉफ अपत्ये सई परांजपे पुरस्कारपद्मभूषण(१९९१) *व्यक्तिगत माहिती* रँग्लर परांजपे हे त्यांचे वडील होते. सई परांजपे ही त्यांची कन्या आहे. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत. *शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके* अरे संसार संसार, काही आंबट काही गोड, दुभंग, निवडक शकुंतला परांजपे (संपादन - विनया खडपेकर), भिल्लिणीची बोरे *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना कोठे झाली?* 👉 पुणे *२) आयसीसी क्रमवारीत रोहित शर्मा कितव्या स्थानावर आहे?* 👉 पाचव्या *३) आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थानावर कोणता खेळाडू आहे?* 👉 विराट कोहली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद 👤 शेखर घुंगरवार 👤 सचिन पाटील पार्डीकर 👤 धम्मपाल कांबळे 👤 यश चेलमेल 👤 राम घंटे 👤 मन्मथ भुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *संगत* ज्यांची असते सदा असंगाशी संग ते होतात नेहमी असंगाने तंग तंग व्हायचे नसेल तर संगत चांगली करा आनंदी रहायचा हा मार्ग आहे खरा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या पृथ्वीतलावर पर्वत, नद्या , स्थावर-जंगम आहे तोवर लोकसमूहात रामायणाची कीर्ती गाजत राहणार आहे.. या शब्दांत महर्षि वाल्मिकींनी रामायण कथेची कालातीत स्थिरता कोरून ठेवली आहे. या भूतलावरील प्रत्येक मानवी वृत्ती व प्रवृत्तीचं प्रातिनिधिक रूप या महाकाव्यात रंगविलं आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सेवक, आदर्श राजा अशा आदर्शांचा प्रतिनिधी म्हणून श्रीरामाचं चरित्र आपल्यापुढं येतं. संतानी, भक्तांनी, कवींनी त्याला देवत्वाला पोहोचवलं आहे.* *रामायणातील अगतिकता नि वेदनांच्या आंतरिक संघर्षाच्या तळाशी पोहचल्याशिवाय श्रीरामाच्या मानव ते 'मर्यादा पुरूषोत्तम प्रभूराम' या देवत्वरूपाशी तादात्म्य पावताच येणार नाही. गदिमांनी गीतरामायणात प्रभूरामाच्या जीवनपटाचा माणूस म्हणून सारांश मांडताना अतिशय उत्कटतेने वलयांकित केलेले-* *'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा* *पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.'* *हे श्रीरामाचं रूप आधिक यथार्थ वाटतं..* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांचे मन आणि बुद्धी सक्षम असतील तर त्यांनी करत असलेले विचारही सक्षम असतात कारण की,अशा विचारांमुळे स्वत:च्या जीवनाबरोबर इतराच्यांही जीवनाचा सकारात्मक विचार करायला तो तयार असतो.त्याच्या मनात इतरांबद्दल वाईट भावना कधीच येत नाहीत.पण ज्यांचे मन आणि बुद्धी जर सक्षम नसतील तर ते मन आणि बुद्धी वाईट विचार करायला लागते.त्यातस्वत:चे आणि इतरांचे चांगले होत आहे की वाईट होत आहे ह्याचा विचारही त्याच्या मनाला आणि बुध्दीला स्पर्श करत नाही. अशावेळी भरकटलेल्या मनाला आणि बुध्दीला आपल्या वशमध्ये ठेवण्यासाठी शांत आणि संयमी वृत्ती जोपासायला हवी.हा स्वभाव जर विकसित केला आणि जोपासला तर आपले मन आणि विचार सकारात्मक दृष्टिकोनाच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहेत असे समजावे. अशामुळे स्वत:चे आणि इतरांचेही कल्याण होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कामापुरता मामा* - गरजेपुरते गोड बोलणारा ; मतलबी माणूस. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *घामाचा पैसा* धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी आईकडून घेतला तिसर्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/01/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या. १९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. २००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण 💥 जन्म :- १९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. मृत्यू १९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ १९०५ - दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार. १९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. २००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता. २००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपत 💥 मृत्यू :- १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय १९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आता चेहऱ्याद्वारे होणार आधारकार्डची पडताळणी. बोटांचे ठसे न उमटल्यास चेहरा ग्राह्य धरला जाणार.* ----------------------------------------------------- 2⃣ *भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन 17 जानेवारीला सुखोई-30 मधून उड्डाण करणार.* ----------------------------------------------------- 3⃣ *सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीशांमधील वाद मिटला - मनन मिश्रा, बार काऊन्सिलचे अध्यक्ष.* ----------------------------------------------------- 4⃣ *हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला दाखवला हिरवा कंदिल.* ----------------------------------------------------- 5⃣ *ठाणे- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या मंजुषा जाधव तर राष्ट्रवादीचे मुरबाड येथील सुभाष पवार उपाध्यक्ष बिनविरोध विजयी. 36 सदस्यांच्या पाठबळावर शिवसेना- राष्ट्रवादी सत्ता स्थापन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री रघुनाथ झा यांचं राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *सेंच्युरियन- भारत वि.दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी. कॅप्टन विराट कोहलीचं दमदार शतक. कारकीर्दीतील 21 वं शतक. खेळ थांबेपर्यंत दक्षिण आफ्रिकेकडे 96 धावांची आघाडी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे* प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर* द.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६) हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. १९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मतदानसक्तीचे प्रस्ताव देणारे देशातील पहिले राज्य कोणते?* 👉 गुजरात *२) अमेरिकेमध्ये लॉस वेगास इथे आयोजित मिस युनिव्हर्स २०१७ चा पुरस्कार कोणाला मिळाला?* 👉 डनी ले नेल *३) नीरज व्होरा यांनी कोणत्या चित्रपटातून अभिनयाचा श्रीगणेशा केला?* 👉 होली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ सायबलू, सहशिक्षक, धर्माबाद 👤 सचिन होरे, धर्माबाद 👤 किरण शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वप्न* कागदाची नाव करून समुद्र पार करता येत नाही स्वप्न पाहून सत्य होईल असे गृहीत धरता येत नाही स्वप्न सत्यात उतरवायचे तर प्रयत्न करावे लागतात स्वप्न त्यांचेच पुर्ण होते जे नेहमी प्रयत्नपूर्वक वागतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी* - एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे - यापैकी एकाचीच निवड करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुंदर माझे घर* सुंदर माझे घर बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*माणूस होशील का* ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि कुणीतरी त्याचं केलेलं मराठीकरण .... आलास..? ये, दार उघडंच आहे ...आत ये पण क्षणभर थांब....!! दारातील पायपुसण्यावर अहंकार झटकून ये...!! भिंतीला बिलगून वर चढलेल्या मधुमालतीच्या वेलावर नाराजी सोडून ये...!! तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये... बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!! पायातल्या चपलांबरोबर मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..!! बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून थोडा खेळकरपणा मागून आण.. गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू चेहेऱ्याला लावून आण...!! ये... तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न माझ्यावर सोपव... तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!! ही बघ.... तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी.. सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि आकाशी गुलालाची उधळण केलीयं... अन प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर चहा उकळत ठेवलाय... तो घोट घोट घे.... ऐक ना ... इतकंही अवघड नाहीये रे जगणं ...! फक्त...... तू *माणूस* बनून ये... 🙏🙏🙏 संकलन
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/01/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो. १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १९५६ - उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती 💥 मृत्यू :- १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन. १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचं दिल्लीत झाले आगमन, ते सहा दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्ली: २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट; तीन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची माहिती.* ----------------------------------------------------- 3⃣ *सांगली - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार - मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सवाल* ----------------------------------------------------- 4⃣ *सातारा : ‘उपरा’कार लक्ष्मण माने रुग्णालयात दाखल, बेमुदत उपोषणादरम्यान प्रकृती बिघडली* ----------------------------------------------------- 5⃣ *सद्भावना एकता रॅलीनंतर चक्कर येऊन मृत झालेल्या शाळकरी मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली पाच लाखाची मदत.* ----------------------------------------------------- 6⃣ *आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपच्या स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारत मिळवला विजय* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 183 धावा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मकर संक्रांती निमित्त लेख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुलजारीलाल नन्दा* गुलजारीलाल नन्दा (4 जुलाई, 1898 - 15 जनवरी, 1998) भारतीय राजनीतिज्ञ थे। उनका जन्म सियालकोट, पंजाब, पाकिस्तान में हुआ था। वे १९६४ में प्रथम भारतीय प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू की मृत्युपश्चात् भारत के प्रधानमंत्री बने। कांग्रेस पार्टी के प्रति समर्पित गुलज़ारी लाल नंदा प्रथम बार पंडित जवाहरलाल नेहरू की मृत्यु के बाद 1964 में कार्यवाहक प्रधानमंत्री बनाए गए। दूसरी बार लाल बहादुर शास्त्री की मृत्यु के बाद 1966 में यह कार्यवाहक प्रधानमंत्री बने। इनका कार्यकाल दोनों बार उसी समय तक सीमित रहा जब तक की कांग्रेस पार्टी ने अपने नए नेता का चयन नहीं कर लिया। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे?* 👉 पुणे *२) वॉर ॲंड पिस हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 लिओ टॉल्स्टॉय *३) कोणत्या पर्वतामुळे महाराष्ट्राच्या जलस्त्रोताचे दोन भाग झाले आहेत?* 👉 सह्याद्री *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड 👤 नामदेव हिंगणे 👤 सलीम शेख 👤 बौद्धप्रिय धडेकर 👤 व्ही. एम. पाटील 👤 बालाजी ईबीतदार 👤 एकनाथ पावडे 👤 दत्ता बेलूरवाड 👤 कोमल ए. रोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *तत्त्व* तत्त्वाला कधीही खुप महत्व आहे पण पुस्तकातच सारे तत्व आहे बोलतांना सा-यांचे तत्वाचे बोल असतात आचरणात आनणारे शुन्या इतके गोल असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची संक्रांत ही काही निराळी नाही. दरवर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्यावेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्यावेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष जगामध्ये 'क्रांती' काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी. 'संज्ञा' म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हाला चांगलं ज्ञान झालं पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी, 'तिळगुळ घ्या', याचा अर्थ, तिळा तिळाने माणूस जमवा. माझं ह्रदय दुसर्यासाठी तीळ-तीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा, आणि मी डंख कसा मारतो... विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा?* *एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही. ते प्रतीक आहे. - गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा. प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? 'संक्रांत' याचा अर्थ,'सम+क्रांत' असा सुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते.* *एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा-* *"दुर्दम्य होतील आशा आकांक्षा* *होतील संग्राम गीते पुरी।* *देशार्थ होतील त्यागी विरागी* *होईल संक्रांत तेव्हा खरी ॥"* *नुसत्या तीळगुळाने, हलव्याने होणार नाही. 'स्वत:च्या मनाला हलवा', असं ज्यावेळी मी स्वत:ला सांगेन, त्या दिवशी खरी संक्रांत साजरी होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟✨🌟✨🌟✨🌟✨🌟 *मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!!* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯. विचारवेध.........✍🏼 ------------------------- रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *खाण तशी माती* (बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा) - आईवडिलां प्रमाणे मुलांची वर्तणूक असणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चतूर न्यायमुर्ती* एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना. आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?' जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.' या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?' जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही. न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे ! न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.' न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*अतिशय छान आहे एकदाच वाचा* *देवाचा मित्र* एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो. . *स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार?* *देवाचा मित्र व्हा* 💐💐💐💐💐💐💐💐💐
⛳🌻🌷🌻🌷🌻⛳✍ *सहशालेय उपक्रम* *🌹जयंती सोहळा🌹* *जि. प. उच्च प्राथ. शाळा वाटेगाव येथे दि.१२ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*. 👉 🎤 विद्यार्थ्यांची भाषणे व🎤 गीते झाली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरिञावर माहिती श्रीमती सेनकुडे मँडम,श्री चव्हाण सर,श्री राठोड सर , श्रीमती झाडे मँडम इत्यादींनी विद्यार्थ्याना सांगितली. 🎤कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार *कु.विजया चव्हाण,कोमल मानेगोविंदवाड (सातवी)* हीने केले.याप्रसंगीचे काही क्षणचिञे👇👇👇👇 *==================* ✏वृत्त लेखन ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (स. शि.)* जि .प .उच्च प्राथ शाळा वाटेगाव ता. हदगाव जी.नांदेड . 🌺♻🌺♻🌺♻🌺
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/01/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित. 💥 जन्म :- १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा. 💥 मृत्यू :- १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गोव्यात मंगळवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सव, १0 हजारांहून अधिक विद्यार्थी घेणार भाग* ----------------------------------------------------- 2⃣ *डोंबिवली - राष्ट्रीय शिक्षण संस्थे चा स्वामी विवेकानंद पुरस्कार अविनाश धर्माधिकारी याना प्रदान.* ----------------------------------------------------- 3⃣ *माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत याचा आप पक्षात प्रवेश* ----------------------------------------------------- 4⃣ *इस्त्रोच्या शंभराव्या उपग्रहाचं प्रक्षेपण. 3 भारतीय, 28 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण.* ----------------------------------------------------- 5⃣ *चार न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याशी बातचित, सूत्रांची माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने देगलूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माधव शंखपाळे बडतर्फ* ----------------------------------------------------- 7⃣ *महाराष्ट्र कुस्ती लीगची घोषणा. ९ मार्चपासून सुरु होणार दंगल* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *तरुण भारत देश* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *राकेश शर्मा* हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते. पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) डिसेंबरमध्ये इराणमधील कोणत्या बंदराचे उद्घाटन झाले?* 👉 चाबहार *२) इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?* 👉 रोहित पवार *३) इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची स्थापना कोणत्या झाली?* 👉 १९३२ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली 👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 विजयकुमार चिकलोड 👤 बालाजी देशमाने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *मी अन् माझं* जिकडे तिकडे फक्त मी अन् माझं आहे मी साठी किती बरं अपेक्षांच ओझं आहे कुठेही असावं वाटतं फक्त मी महत्वाचा विचार कोण करतो सांगा इथे तत्त्वाचा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मानवी' नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते.* *बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.शस्त्राची जखम शरीरावर होते नि काही काळ राहून ती मिटूनही जाते. परंतु एखादा शब्द जर आपण विचार पूर्वक न वापरला तर तो थेट काळजाला जाऊन लागतो आणि त्याची एवढी जखम होते की,ती आयुष्यभर तशीच काळजाला चिकटून राहते कधीच कमी होत नाही. म्हणून दैनंदिन जीवनव्यवहारात वावरत असताना मोजक्या आणि योग्य शब्दांचा,कुणालाही न लागणा-या शब्दांचा वापर करून आपण आणि इतरांनाही समाधानी रुपात रहावे.जेणेकरुन दोघांच्याही जीवनात आनंद आणि एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे.केवळ तुम्ही विचार न करता बोललेल्या एकाच शब्दाने वैरत्वाची भावना निर्माण होते तर त्याच एका शब्दाने इतरांची मने जिंकून जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून शस्त्रापेक्षाही शब्दांना आपल्या जीवनात अधिक जास्त जपले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *असंगाशी संग प्राणाशी गाठ* - अयोग्य माणसाशी संगत केल्याने प्रसंगी आपले प्राण गमवावे लागतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आरसा* एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला. रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’ *तात्पर्य : आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
☘☘☘☘☘☘☘ *भव्य शालेय लेझीम स्पर्धा* (श्री संत नंदी महाराज पुण्यतिथी व याञा महोत्सवानिमित्त) *मौजे कवाना ता.हदगाव जिल्हा नांदेड* *दि.१० जानेवारी २०१८* *स्पर्धा संयोजकः श्री सादुलवार सर.* *〰〰〰〰〰〰* वरील आयोजित भव्य शालेय लेझीम स्पर्धेत आमच्या जि.प.प्रा.शाळा वाटेगाव येथील संघाला *पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक (३,१११रु).* मिळाले आहे. 💐🌹💐🌹💐🌹 👉शाळेतील या यशस्वीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमास वाटेगाव नगरीचे मा.शि.वि.अ.श्री जाधव साहेब तसेच शाळेचे मा.मु.अ.साहेब श्री चव्हाण सर व सर्व गावकरी मंडळी यांनी केलेल्या कौतुकाने व अभिनंदनीय💐💐 शुभेच्छारुपी आशीर्वादाने शाळेतील सर्व बाल चिमुकले विद्यार्थी व आमच्या सर्व गुरूजणांची मने आनंदाने 😃भारावून गेली. 👭👬👭👬👭👬 *लेझीम पथक प्रमुख व मार्गदर्शकः* 👉 श्रीमती सेनकुडे मँडम 👉 श्रीमती झाडे मँडम 🌿☘🌿 *सहकार्यः* 👉 श्री चव्हाण सर ,राठोड सर,श्रीमती लोने मँडम,श्री रामटेके सर, काकडे मँडम. 👭👭👭👭👭👭 👍Dare to Dream..👍Dare to challenge..👍Dare to win...👍👍👍👍 *🙏धन्यवाद 🙏* *==================* *टीपः सदरील पारितोषिकाचा बक्षिस वितरण सोहळा पुढील सप्ताहात आयोजित केला आहे.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍वृत्तलेखन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* *(स.शिक्षिका)* *(लेझीम पथक प्रमुख व मार्गदर्शक)* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. १७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. 💥 जन्म :- १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन १९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास 💥 मृत्यू :- १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नाही, सुप्रीम कोर्टाचा सुधारित आदेश, मात्र राष्ट्रगीत लावल्यास प्रेक्षकांना उभे राहावेच लागेल* ----------------------------------------------------- 2⃣ *नगराध्यक्षाच्या खुर्चीला अभय, अडीच वर्षे अविश्वास ठराव घेता येणार नाही* ----------------------------------------------------- 3⃣ *अहमदनगर : महिला बचतगटांच्या उत्पादनांचे सरकार करणार ब्रॅंडिंग- पंकजा मुंडे* ----------------------------------------------------- 4⃣ *पाकिस्तान : क्वेटामध्ये बलुचिस्तान विधानसभा परिसरात बॉम्बस्फोट, सहा जणांचा मृत्यू.* ----------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : किनवट नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे श्रीनिवास नेम्मानीवार यांची बिनविरोध निवड* ----------------------------------------------------- 6⃣ *उत्तर भारतात थंडीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत, वाहतूक सेवा 17 ते 20 तास उशिरानं.* ----------------------------------------------------- 7⃣ *क्रिकेटपटू युसुफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी. पाच महिन्यांसाठी निलंबन. उत्तेजक चाचणीत प्रतिबंधीत घटक आढळल्याने दोषी.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गणेश हरी खरे* गणेश हरी खरे (जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू०५ जून १९८५) हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) नुकतेच निधन झालेले नीरज व्होरा कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?* 👉 चित्रपट *२) दादाभाई नौरोजीनी कोणता सिध्दांत मांडला?* 👉 संपत्तीचे अपहरण *३) नुकताच कोणत्या देशाने चित्रपटगृहावरून बंदी उठवली आहे?* 👉 सौदी अरेबिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद 👤 साईनाथ सोनटक्के 👤 राजेश कुंटोलू 👤 गणेश वाघमारे 👤 शत्रूघन झुरे 👤 स्वरूप खांडरे 👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *विचार* वेळ प्रसंगी माणसं अश्रू ढाळतं असतात दिला शब्द कोणाचा कधी पाळत नसतात वेळ प्रसंगी डोळ्यात अश्रू आला पाहिजे पण अश्रू का आला हा विचार झाला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी. हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌻🌺🌸🌼🌹🌷🌻🌺🌸🌼🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कर नाही :त्याला डर कशाला ?* - ज्यांच्याकडून गुन्हा घडलेला नाही :त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= (तीन शब्दांवरुन)कथा *गुरू ,परीक्षा ,शिष्य* गुरुकुलातून तीन शिष्य उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल. आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं. दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला.. तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी आपल्याला लवकरात लवकर मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर.. तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत.. ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे. *तात्पर्यः* अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*तयास मानव का म्हणावे ?* ज्ञान नाही विद्या नाही ते घेणेची गोडी नाही बुध्दी असुनि चालत नाही तयास मानव का म्हणावे ?||१|| दे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव का म्हणावे ? ||२|| बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राही पशू पक्षात ऐसे नाही तयास मानव का म्हणावे ? ||३|| दुसर्यास मदत नाही सेवा त्याग दया माया ही जयापाशी सदगुण नाही तयास मानव का म्हणावे ? ||४|| पशुपक्षी माकड माणुसही जन्ममृत्यु सर्वानाही याचे ज्ञान जराही नाही तयास मानव का म्हणावे ?||५ || *कवयित्री- सवित्रीबाई फुले*
संकलित
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/01/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला. २००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले. २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले. २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला. 💥 जन्म :- १९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हरगोबिंद खुराना १९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर 💥 मृत्यू :- १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर २००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ न्यू यॉर्क- अमेरिकेतल्या ट्रम्प टॉवरला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही, ट्रम्प टॉवरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचंही निवासस्थान आहे. ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात प्रशासनाची परवानगी न घेतलेल्या धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात येणार* ----------------------------------------------------- 3⃣ *शेअर बाजाराची उसळी, सेन्सेक्स 178 अंकांनी वर, निफ्टीनेही साडेदहा हजारांचा टप्पा ओलांडला.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली- सर्वोच न्यायालयानं राजकीय पक्ष बनवणं आणि पक्षाचं कोणतंही पद घेण्यास बंदी घालण्यात आलेल्या प्रकरणातील सुनावणी 12 फेब्रुवारीपर्यंत केली स्थगित* ----------------------------------------------------- 5⃣ *चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचं निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *काश्मीर- पाकिस्तानानं भारताच्या 147 मच्छीमारांची केली सुटका, वाघा बॉर्डरमार्गे मच्छीमारांनी केला भारतात प्रवेश* ----------------------------------------------------- 7⃣ *केपटाऊन कसोटीत भारताचा 72 धावांनी पराभव, फिलँडरचे सहा बळी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *महेन्द्र कपूर* (९ जनवरी १९३४-२७ सितंबर २००८) हिन्दी फ़िल्मों के एक प्रसिद्ध पार्श्वगायक थे। उन्होंने बी आर चोपड़ा की फिल्मों हमराज़, ग़ुमराह, धूल का फूल, वक़्त, धुंध में विशेष रूप से यादगार गाने गाए। संगीतकार रवि ने इनमें से अधिकाश फ़िल्मों में संगीत दिया। महेंद्र कपूर का जन्म अमृतसर में हुआ था। पार्श्वगायन में कैरियर बनाने के लिए वे कम उम्र में ही मुंबई आ गए थे। 1953 की फिल्म ‘मदमस्त’ के साहिर लुधियानवी के गीत आप आए तो खयाल-ए-दिल-ए नाशाद आया से उन्होंने फिल्मी करियर की शुरुआत की थी। २७ सितंबर २००८ को बीमारी से लड़ने के पश्चात उनका देहावसान हो गया। *पुरस्कार और सम्मान* 1963 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - चलो इक बार फ़िर से (ग़ुमराह) 1967 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नीले गगन के तले (हमराज़) 1974 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नहीं नहीं (रोटी कपड़ा और मकान) *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?* 👉 पाडेगाव *२) कोणत्या क्रिकेटपटूने तीनवेळा द्विशतक झळकाविण्याचा पराक्रम केला?* 👉 रोहित शर्मा *३) जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो?* 👉 राज्यपाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुहास अनिल देशमुख 👤 अजित राठोड 👤 भीमाशंकर भालेकर 👤 माधव नरवाडे 👤 राजेश रामगिरवार 👤 गजानन सोनटक्के 👤 माधव नरवाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *खोटं* लोक खोटं पण रेटून बोलतात मनात अढी ठेवून भेटून डोलतात केळ सोलल्यावर जसं बाहेर पडतं नकळतपणे त्या माणसाचं तसंच घडतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.* *शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.* *"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात जशी चांगल्या विचारांची गरज आहे तशीच चांगल्या माणसांच्या सहवासाची गरज आहे.हे दोघेही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असून ते आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत.यांना कधीही अंतर देऊ नका. त्यांची आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगी सामोरे जाण्यासाठी गरज लागते.परंतु गरजेपुरता वापर करत असताल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी कठीण होऊन बसेल.त्यांना आपल्या नात्यांप्रमाणे जपायला हवे. तरच तुमचे जीवन कृतार्थ बनेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= * इकडे आड, तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *छोटी-छोटी बातें* पूर्व काल में घोडे का बहुत महत्व था। घोड़ों के पैरों मे नाल ठोंका करते थे। एक बार एक सवार ने कुछ दुर्लक्ष किया। उसके घोड़े की एक नाल का एक कीला निकल गया था। वह कुछ ही क्षणों का छोटा सा काम था; परन्तु उसने वह नहीं किया। संयोगवश उस दिन उसे एक महत्वपूर्ण संदेशा पहुंचाने का कार्य दिया गया। शत्रु सेना पर एक ही समय दोनों तरफ से आक्रमण करना निश्चिनत हुआ। किस समय किस ढंग से सेना का दूसरा भाग आक्रमण करेगा, इसकी विस्तृत सूचना लिखकर वह लिफाफा इस सवार को दिया गया। उसे वह दूसरे सेनापति को पहुंचाना था। वह लिफाफा लेकर घोड़े पर सवार हुआ। उसने अपने घोडे को बहुत तेजी से दौड़ाया। आधा अंतर उसने पार कर लिया होगा, तभी एकाएक नाल की और दो कीलें ढीली हो गयीं और नाल सर्र से बाहर निकल आयी। घोड़ा पूर्ण वेग से दौड रहा था। बाहर निकली हुई नाल किसी वृक्ष मूल में अटकी और घोडा अपने सवारी सहित धड़ाम् से गिर पडा। घोड़े के मर्मस्थल पर चोट लगने से वह वहीं मर गया। सवार घायल हुआ। बेहोश भी हुआ। थोडी देर के बाद उसे होश आया। घोडे को मरा पा कर उसे बहुत दुख हुआ। वह उठा और लंगडाते-कराहते भागने लगा। उसे महत्वपूर्ण संदेशा जो पहुंचाना था, उसने बहुत प्र यास किया परन्तु वह निर्धारित स्थान पर ठीक समय पर नहीं पहुंच सका। अतः व्यूह रचना असफल हुई। उसका देश युद्ध में हार गया, एक छोटी सी कील के कारण। कील न ठुकाई, घोडा मरा। स्वार न पहुंचा देश हारा॥ अतः हमें छोटे-छोटे कामों में भी सुव्यवस्था और तत्परता रखनी चाहिये। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
मैत्रिणी..... दुःख वाटून घेणाऱ्या सुख वाटत जाणाऱ्या सल्ला देणाऱ्या सल्ला घेणाऱ्या खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणार्या. शाबासकीची पहीली थाप पाठीवर देणाऱ्या . खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या. मैत्रिणी आयुष्याला मिळालेलं एक वरदान. जागेपणीचं स्वप्न छान पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान. सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर हळूवार हात पुसतात डोळ्यातले नीर उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर मैत्रिणी गातात नाचतात खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम. त्या सुगरण असोत नसोत. प्रत्येक घास वाटतो अमृताहून गोड. मैत्रित नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती लहान थोर शहर गाव. मैत्री असते एक सरीता या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी. ,, मैत्री.... माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी समर्पित...
*माकडा , कोल्हा व जंगल* (प्राणी) एकदा एक 🐒वानर व कोल्हा 🐕यांची जंगलात 🌳☘🌿🌱🍃🍀🌳🌴🍂🍁☘🌿🌱🌴🌳🌳 भेट झाली तेव्हा माकड🐒 कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देतोसका तर तो मी लावून वार्यापासून माझं रक्षण करीन. मला त्याचा उपयोग होईल.तुझे शेपूट खूप झुबकेदार आहे.तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे माकडा तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.' तात्पर्यः काही स्वार्थी प्रवृत्तीचा माणसांजवळ सर्व असून पण ते दुसऱ्याचा उपयोगी येत नाही.खर तर माणसाने इतरांच्या मदतीला कसे जाता येईल हा विचार नेहमी ध्यानीमनी ठेवून जगावे. 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
प्रेम आणि द्वेष...! प्रेम आणि द्वेष... यात काय फरक असतो...! फरकापेक्षा त्यात... साम्यचं अधिक असतं...! दोघांचीही अक्षरे अडीच... दोघांचाही उगम एकच.. दोघेही मनातच वसतात..! मनांतन भावना बनतात..! दोघांची कक्षा अनंत...! दोघांनाही नसे अंत...! दोघेही नजरेत येतात..! दोघेही आसवांत भिजतात...! प्रेम आणि द्वेष... यात फरक इतकाच असतो...! एकात माणुस मनात बसतो... दुसऱ्यात मात्र नजरेतुन उतरतो..!
यमु आजीचं वयाच्या १६व्या वर्षी लग्न झालं. घर मध्यमवर्गी पांढरपेशी. घरात छोटी छोटे दीर नणंदा. वहिनी वहिनी करून भोवती रुंजी घालणा-या. पण घरात सास-यांची कडक शिस्त. आणि त्या काळाचे आता विचित्र वाटणारे दंडक. त्या काळी बाई माणसाने दुकानात जाऊन " shopping करायची पध्दत नव्हती. वर्षाकाठी दोन लुगडी . एक दांडीवर आणि दुसरं .........वर. तीही दुकानदार चार पाच लुगडी घरी पाठवायचा आणि त्यातलं निवडावं लागायचं. त्याप्रमाणे लुगडी घरी आली. षोडश वर्षीय यमुनानं आपल्या भावभावनांना अनुसरून गुलाबी आणि अबोली रंग निवडले. संध्याकाळी सास-यांनी घरी आल्यावर लुगडी पाहिली आणि त्यांनी गर्जना केली, " हे कसले रंग निवडलेत? धुवायला साबण किती लागेल कल्पना आहे का ? उद्या ही लुगडी दुकानी पाठवून द्या आणि मळखाऊ रंगाची लुगडी मागवा. " अल्लड सुनेचा उतरलेला चेहरा सासुबाईच्या नजरेतून सुटला नाही. माजघरातून त्यांनी सगळ ऐकलेलेच होतं . रात्री त्यांनी दोनही लुगडी पाण्यात भिजवली. कारण पूर्वी नवकोर वस्त्र भिजवल्याखेरीज नेसण्याची पध्दत नव्हती. दुस-या दिवशी सास-यांनी बाहेर पडताना सासुबाईंना लुगडी द्यायला सांगितल्यावर चेहरा शक्य तेवढा कावराबावरा करून खाल मानेनं त्या पुटपुटल्या ," अग बाई, परत का करायची होती लुगडी ? मी ती रात्रीच भिजवली. मला बापडीला काय कल्पना. चुकलंच बरीक माझं. '' आपल्या सासूचा हा समंजसपणा सांगताना आज ८९व्या वर्षीही यमु आजींचा चेहरा तरुण यमुसारखाच कृतज्ञ होतो. हे जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं नाही का? म्हणजे आजींच्या शब्दात सांगायचं झालं तर " सासुबाईनी माझंही मन जाणलं पण त्याचवेळी मामंजींनाही दुखवलं नाही. आणखीही एक प्रसंग सांगताना यमु आजी खुसूखुसू हसतात. त्यांच दंतविहीन बोळकं लहान मुलासारखच निरागस वाटतं. यमु कुठेशी बाहेर गेली होती. परतायला थोडासा वेळ झाला. उंबरठ्याशी येताच मामंजींनी फर्मान सोडलं, " आत पाऊल टाकायचं नाही. बाहेरच रहा. " पुढे बोलायची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे यमु वाड्याच्या अंगणात मुकाट्याने उभी राहिली. नेहमी कामात असलेली वहिनी बाहेर कशी म्हणून मुलं विचारायला लागली, " वहिनी तुम्ही बाहेर का उभ्या ? घशाशी येणारा आवंढा गिळत यमु म्हणाली, " अरे, तुमचा खेळ बघतेय. " बराच वेळ गेला तसा सास-यांचा राग शांत झाला. तशा सासूबाई तडक यमुकडे येऊन मोठ्याने म्हणाल्या, " काय ग करतेस अंगणात इतक्या वेळ ? पानं नाही का घ्यायची ? " तोवर सास-यांचाही राग शांत झाला होता आणि कोणाला काहीही पत्ता न लागता यमु परत घरात नेहमीसारखी वावरायला लागली. हे जे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढायचं शहाणपण आज आपल्यापैकी किती जणात आहे? आम्ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो., पण त्याचवेळी दुस-याच्या मनाचा कितीसा विचार करतो? आपण आपला मुद्दा पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. आपले आवाजही कधी कधी गगनाला भिडतात. पण ही नि:शब्द जपवणूक खूप काही शिकवून जाते.
*नक्की वाचा खुप सुंदर आहे* एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात. खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की, "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत". नवरा म्हणतो साबण संपला असेल. दुसर्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की, "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत" कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील. नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते. एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्याला म्हणते "अहो ऐकलंत का? समोरच्या वहिनी सुधारल्या. त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते. आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत" तेवढयात नवरा बोलतो "राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या. काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते. परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती. समोरचे नाही आपणच सुधारलोय. आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्या कडे पाहिले पाहिजे. नेहमी नजर चांगली ठेवा, जग खुप सुंदर आहे. "मातीने" एकी केली तर विट बनते.., "विटेनी" एकी केली तर भिंत बनते.., आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते. या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का...❔🍂 . . "विचार" असे मांडा की , तुमच्या विचारांवर कुणीतरी . "विचार" *केलाच पाहिजे*
आई वडील आम्ही काय तुम्हांला जन्मभर पुरणार आहोत का? अस आई सहज म्हणून गेली ऐकून हे माझ्या काळजात आरपार एक कळ निघून गेली... त्रिवार सत्य होत पण पटतच नव्हते मनाला कधीच विसरणार नाहीत आपण त्यांच्या सोबतच्या क्षणांला आई बोलुन गेली पण वडील पाहून हसत होते खर सांगु का तेव्हा ते दोघेही मला विठ्ठल रुक्मिणीच वाटत होते... लेकरांच्या सुखातच त्यांच सुख असत दडलेल..... आपण सुंदर शिल्प असतोत त्यांच्याच हातुन घडलेल... मी म्हणाले आईला तु कीती सहज बोलून गेलीस तुमच्या शिवाय जगण्याची तु कल्पनाच कशी केलीस जग दाखवले तुम्ही आम्हांला कीती छान बनवलंत अनेकदा ठेच लागण्यापासुन तुम्हीच तर सावरलत... तुमच्या चेहर्यावर हसु पाहण्या साठी आम्ही काहीही करू तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही यशाचेच रंग भरु.... आई वडील म्हणजेच घरातील चालता बोलते देव आहेत हे देव नैवेद्या पेक्षा फक्त प्रेम व आधाराचेच भुकेले आहेत... कल्पवृक्षाखाली बसले होते फळेफुले माझ्यावरच पडत होती आई वडिल अनमोल आहेत असे प्रत्येक पाकळी सांगत होती थकलीय आज आई प्रत्येकाची वडीलही थकले आहेत.... घरट्यातल्या पिल्लाने उडु नयेत फक्त एवढ्याच त्यांच्या अपेक्षा आहेत. .... माझ्या या विचाराने आई खुप खुप सुखावली होती वडिलांची नजर न बोलताही सारे काही सांगुन जात होती.......
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/01/2018 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले. 💥 जन्म :- १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज १९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर १९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले १९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात १९४८: विदुषी व लेखिका शोभा डे 💥 मृत्यू :- २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक गुंतवणूक परिषदेच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन. 18 व 19 फेब्रुवारीला बीकेसीमध्ये होणा-या परिषदेचं पंतप्रधान करणार उद्घाटन.* ----------------------------------------------------- 2⃣ *कांजूरमार्ग सिने विस्टा स्टुडिओला भीषण आग. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल.* ----------------------------------------------------- 3⃣ *चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा, रांची कोर्टाचा निकाल.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबईतील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारचा पुढाकार. पालिका आयुक्त अजोय मेहता यांची विनंती मान्य करीत स्वच्छतेसाठी काम करण्याची दर्शवली तयारी.* ----------------------------------------------------- 5⃣ *महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार गणवेश वितरण सोहळा कार्यक्रमाला सुरुवात झाली.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुख्यमंत्र्यांकडून सुभाष देसाईंना प्रशस्तीपत्र, उद्योग विभागाचा यशाचा दर अन्य विभागांपेक्षा 20 टक्के अधिक.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत वि द आफ्रिका पहिली कसोटी- दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिका 2 बाद 65 धावा. दक्षिण आफ्रिकेकडे 142 धावांची आघाडी.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *चंद्रकांत रघुनाथ गोखले* चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते, चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हे देखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉 शेकरू *२) औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉 ५२ *३) जागतिक जलदिन म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉 २२मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार सामना, कुंडलवाडी शहर प्रतिनिधी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लेखणी* सामान्याचे दुःख मांडते तुमच्या हातची लेखणी शब्दांना त्या धार येऊन ती अधिकच होते देखणी शब्दांना धार आणायचे सामर्थ्य तुमच्या हाती आहे सत्य उजेडात आणणारी लेखणी म्हणजे ज्योती आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध.............✍🏼 ***************************** सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अंथरूण पाहून पाय पसरावे* - ऐपतीच्या मानाने खर्च करावा. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वतः मध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला कधीही चांगले असते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/01/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९२४ - वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका. 💥 जन्म :- १८१२ - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *भारतीय तटरक्षक दलाचे जहाज C-161 सेवेत दाखल, गुजरातच्या पोरबंदर येथे झाला कार्यक्रम.* ----------------------------------------------------- 2⃣ *लालू प्रसाद यादव यांच्या वकिलाचा रांची विशेष सीबीआय न्यायालयात याचिका, तब्बेतीच्या कारणामुळे कमीत कमी शिक्षा सुनावण्याची मागणी, आज सुनावल्या जाणार शिक्षा* ----------------------------------------------------- 3⃣ *मध्य प्रदेश- कडाक्याच्या थंडीमुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांना 6 ते 13 जानेवारीपर्यंत सुट्टी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबईः विद्यापीठाच्या चार अधिकार मंडळाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर. ७ फेब्रुवारीला होणार निवडणूक.* ----------------------------------------------------- 5⃣ *ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचे निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *भारत विरुद्द दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना - दक्षिण आफ्रिका 286 धावांवर गारद.* ----------------------------------------------------- 7⃣ *ऱाष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आचार्य बाळशास्त्री जांभेकर* बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_5.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कपिलदेव निखंज* कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. == क्रिकेट क्षेत्रातील योगदान ==कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव आज त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करतो आहे (जन्म १९५९, चंडीगढ) . रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणत्या महिलेने सुवर्णपदक पटकाविले?* 👉 संजीवनी जाधव *२) भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स पुरुषांच्या स्पर्धेत कोणी सुवर्णपदक पटकाविले?* 👉रणजीतकुमार *३) मोबाईल इंटरनेटचा स्पीडमध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेला देश कोणता?* 👉 नॉर्वे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अभिषेक अडकटलवार 👤 साईनाथ जगदमवार 👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे 👤 बजरंग माने 👤 सुदर्शन कोंपलवार 👤 श्रीनिवास गंगुलवार 👤 मोहन घोसले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प स्वच्छतेचा* चला सारे स्वच्छतेचा मनी संकल्प करू स्वच्छता तिथे आरोग्य नेहमी ध्यानी धरू लक्षात ठेवा स्वच्छता असेल जिथे तिथे आनंद अन् आरोग्य नांदेल तिथे तिथे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिबिंबांचं देखणेपण आधिक भावतं माणसाला. म्हणूनच बाहेर पडण्याआधी, एखाद्या समारंभाला जाण्याआधी आपण आरशातील आपलं प्रतिबिंब पुन्हा पुन्हा निरखून पाहत असतो. मनाची खात्री झाल्यावर दर्पणाच्या मोहातून मुक्त होत असतो. हे आपण असं का करीत असतो तर स्वत:सह इतर बघ्यांनाही बरं वाटावं म्हणून.* *स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही असं नीट-नेटकंपण राखून समूहात मिरवायला आवडत असतं. अशावेळी महिलांना महिलांकडून मिळणा-या दादेपेक्षा एखाद्या नजरेत भरणा-या अनोळखी पुरूषानं नजरेनं वा उदगारानं दिलेली दाद स्त्रियांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप हुरळून टाकणारी असते. त्यावेळी ती स्त्री धन्यतेने कधी स्वत:कडे तर कधी त्या पुरूषाच्या नजरेकडे नजर सोडवत पाहत असते. अशावेळी स्वत:कडे पुन्हा पुन्हा कौतुकानं निरखून पाहणं हे आरशातील प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या अनेकपट सुंदर असतं. ज्या उद्देशानं आरशात वारंवार पाहून ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्याची मनभावक फलश्रुती त्या व्यक्तीने अनुभवलेली असते. हेच पुरूषांच्या बाबतीतही घडतं. पण या मनाच्या सहजधर्म व्यवहारात पुरूषाला महिलेनं द्यावयाची दाद जरा संभाळून द्यायची असते. कारण पुरूषी नजर सळसळून तिच्या नजरेवर रेंगाळायला फार काळजी घेत नाही. लवकरच ती नजर 'आपलीशी' वाटायला लागते. कारण स्त्रियांइतका पुरूषी संकोच सावध नसतो.* *मुक्त मनाच्या अशा तरलतरंगी लहरी-लहरा प्रत्येक जण अनुभवत असतो. म्हणून स्त्री-पुरूषानं, त्याहीपेक्षा पती-पत्नीनं परस्परांच्या प्रतिबिंबाला जपावं. ते इतरांच्या नजरेत खुपावं असं काही घडू नये.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👁👀👁👀👁👀👁👀👁👀 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध.............✍🏼 ***************************** सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= * आधी पोटोबा मग विठोबा - आधी स्वतः च्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे व नंतर अन्य (परमार्थाचे) काम करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हुशार गोनू* मिथिला नगरीत राहणार्या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.' शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?' गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.' आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते. स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला. तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला. आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला १,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला १,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला ५00 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.' 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*चालू घडामोडी 2017 महत्त्वाच्या नेमणूका* 1) राष्ट्रपती = रामनाथ कोविंद ( 14 वे ) 2) उपराष्ट्रपती= व्यंकय्या नायडू ( 13 वे ) 1) पंतप्रधान = नरेंद्र मोदी (14 वे ) 4) राज्यपाल = सी. विद्यासागर राव (18 वे ) 5) मुख्यमंत्री = देवेंद्र फडणवीस (18 वे ) 6) विधानसभापती= हरिभाऊ बागडे 7) विरोधी पक्षनेते = राधाकृष्ण विखे पाटील 8) विधान परिषद अध्यक्ष= रामराजे नाईक निंबाळकर 9) विधान परिषद उपाध्यक्ष = माणिकराव ठाकरे 10) विरोधी पक्षनेते= धनंजय मुंडे 11) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश= मंजुला चेल्लुर (दुसऱ्या महिला) 12) भारताच्या सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश= दिपक मिश्रा ( 45 वे ) *महान्यायवादी = k.k. वेणुगोपाल* 13) महालेखापाल= सायंतानी जाफा 14) महाधिवक्ता = रणजित कुमार 15) राज्याचे माहिती आयुक्त = रत्नाकर गायकवाड 16) राज्याचे मुख्य सचिव = सुमित मलिक 17) राज्याचे लोकायुक्त = मदनलाल टहलियानी 18) उपलोकायुक्त = जॉनी जोसेफ 19) पोलीस महासंचालक = सतीश माथुर (40 वे ) 20) मुंबई पोलीस आयुक्त = दत्तात्रय पडसलगीकर 21) केंद्रीय माहिती आयुक्त = आर.के.माथूर ( 8 वे ) 22) नीती आयोगाचे उपाध्यक्ष = राजीव कुमार ( 2 रे ) 23) नीती आयोगाचे सचिव = अमिताभ कांत 24) राज्य निवडणूक आयुक्त = जे. एस.सहारिया 25) केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त = अचलकुमार ज्योति (21 वे) 26) सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष= ए.के.माथुर 27) 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष= वाय.व्ही.रेड्डी 28) इस्रोचे अध्यक्ष= एस.किरण कुमार 29) नरेंद्र मोदी चे सचिव= नृपेंद्र मिश्रा 30) महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा = विजया रहाटकर 31) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा = ललिता कुमारमंगलम 32) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष = न्या. H.L.दत्तु 33) महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष = न्या. बन्नूरमठ 34) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष = सईद गैरूल हसन 35) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष = राम शंकर कथेरिआ 36) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष = नंदकुमार साई 37) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष = न्या. ईश्वरैय्या 38) अनुऊर्जा आयोग अध्यक्ष = डॉ. शेखर बसू 39) राष्ट्रीय हरित न्यायालय अध्यक्ष = न्या स्वतंत्रकुमार 40) RBI चे गव्हर्नर = उर्जित पटेल ( 24 वे ) 41) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार = अजित डोवाल 42) आधार UIDAI CEO = जे. सत्यनारायन 43) कृषि व मूल्य आयोग अध्यक्ष = अशोक गुलाटी 44) २१ व्या विधी आयोगाचे अध्यक्ष = बलवीरसिंह चौहान 45) राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अध्यक्ष = स्तुती नारायण कक्कड ------------------------------- *लष्कर 👮 प्रमुख* 1) भुदल प्रमुख = बिपीन रावत (26 वे ) 2) हवाई दल प्रमुख = बि. एस.धनोवा (25 वे) 3) नोदल प्रमुख = सुनिल लांबा ( 23 वे ) *संसदीय 🎓 पदाधिकारी* 1) लोकसभेचे अध्यक्ष = सुमित्रा महाजन ( दुसऱ्या महिला ) 2) लोकसभेचे उपाध्यक्ष = एम. थुबीदुराई 3) राज्यसभा अध्यक्ष = व्यंकय्या नायडू 4) राज्यसभा उपाध्यक्ष = पी.जे. कुरियन 5) राज्यसभेचे विरोधी पक्षनेते= गुलाब नबी आझाद.
*अध्यापनाची खरी पद्धत...* _(प्रत्येक शिक्षकाने अवश्य वाचावे...)_ एकदा आम्हा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते. आम्ही दिवसभर व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे? स्पेलिंग पाठ करावेत की नाही? कविता कशी शिकवायची? अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे? याचा काथ्याकूट करीत होतो. संध्याकाळी ५ वाजले. सर्वांना जाण्याची घाई होती. आम्ही उठू लागताच ते निवृत्त शिक्षक बोलायला उठले आणि म्हणाले, *_"मी फक्त ३ मिनीटे बोलणार आहे."_* वैतागाने आम्ही सारे खाली बसलो. ते शिक्षक म्हणाले, _"दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली. मी एक छोटे उदाहरण सांगतो. ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल."_ 'आता आणखी काय उपदेश ऐकायचा' अशा भावनेने आम्ही ऐकू लागलो... ते म्हणाले की, _"एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे. तिथे एक आदिवासी नवरा बायको राहतात. त्यांना एक ६ महिन्याचं मूल आहे. आजूबाजूला एक ही घर नाही. एकदा संध्याकाळी नवर्याला अचानक गावाला जावे लागले. पत्नी आणि मूल एकटेच आहेत. रात्री दोघे झोपले आणि अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले._ _ती आई काय करेल?_ _सांगा ना काय करेल?_" ते आम्हाला विचारू लागले. आम्ही सारे शांत झालो. कुणीच काही बोलेना. ते शिक्षक पुन्हा आम्हाला विचारू लागले, _"ती आई बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहील का? की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहील?"_ _"सांगा ना... काय करेल यातलं?"_ आम्हाला मुद्दा कळला होता. ते किंचित हसले आणि पुढे म्हणाले, _"ती यातले काहीच करणार नाही. ती तिला जे सुचेल ते करील. ती त्याला कडेवर घेईल. छातीशी कवटाळेल... त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल, त्याच्यापुढे नाचून दाखवील, गाणी म्हणेल, त्याला दूध पाजील, त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविल. हे सारं सारं ती तिथपर्यंत करील की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही."_ ते पुढे म्हणाले की, _"हे सारे ती का करील?"_ _"हे तिला सारे का सुचेल?"_ *_"कारण ते तिचे मूल आहे म्हणून...!!!"_* त्या शिक्षकांनी क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले, _"त्या बाईसारखे तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का? तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल तर माझ्या मित्रांनो, तुम्ही जे काही वर्गात कराल, तेच उपक्रम असतील, तीच अध्यापनाची पद्धती असेल. तुम्ही हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल आणि तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल."_ _"यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते...!"_ आणि ते शिक्षक शांतपणे खाली बसले. आम्ही थक्क झालो... सुन्न झालो...!
*तीन शब्दावरून गोष्ट तयार करणे* १) *कासव , ससा , डोंगर* २) *लाकुडतोडया , कुराड , परी* ३) *सिंह, उंदीर , जाळ* ४) *कावळा , तहान , माठ* ५) *शिकारी , कबुतर ,मुंगी* ६) *गाढव , मीठ ,व्यापारी* ७) *राजा , परीस , राजकुमारी* ८) *धनगरांचा मुलगा , लांडगा , मेंढया* ९) *सिंह , कोंबडा , गाढव* १०) *शेतकरी , चार मुले , काठी* ११) *बहिणभाऊ , भाऊबीज ,भोपळा* १२) *आजी , जंगल , भोपळा* १३) *माकड , मांजरे , लोणी* १४) *माकड , मांजर , घागर* १५) *कावळा , चिमणी , पाऊस* १६) *माकड , मगर ,काळीज* १७) *लांडगा , करडू , खडक* १८) *सिंह , उंदीर , जाळे* १९) *चिमण्या , शिकारी , जाळे* २०) *राजा , परीक्षा , दगड* २१) *पारधी , कबुतर , जाळे* *२२)आई, घर ,शाळा* *२३)बाहुली ,आजी, मुलगी* *२४)पाऊस, पूर ,शाळा* *२५)जंगल, प्राणी ,दोन मूले*. 〰〰〰〰〰〰〰
🌹कविता🌹 विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही .. माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही .... संकलित 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
👧👧 *लेक शिकवा अभियान* 👧👧 👧👧👧 *घोषवाक्ये* 👧👧👧 १.मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या. २.मोळी विक, पण शाळा शिक. ३.उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही. ४.मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण. ५.आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण. ६.जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने. ७.मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी. ८.आई बाबा मला शिकू द्या, घाई नको लग्नाची, मी शिकेन-कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची. ९.आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण हा मुलींचाही हक्क. १०.मुलगा मुलगा दोघे समान, दोघांनाही शिकवू छान. ११.मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन. १२.बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू. १३.शिक्षण घेऊन होऊ विचारी, घेऊ आम्ही उंच भरारी. १४.घडविण्या राष्ट्राचा विकास, मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास. १५.कळी उमलणार नाही जीवनरसावाचून, मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून. १६.लडका शान है, तो लडकी सम्मान है । १७.शिक्षण करा गं धारण, सर्वसिद्धिचे कारण. १८.सोडून द्या वाईट चालीरीती, आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती. १९.लडकी होने का गम नहीं, लडकी लडके से कम नहीं । २०.आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य. २१.नियमितपणाची धरूया कास, मुलींना शिकवू एकच ध्यास. २२.हम भारत की किशोरियॉं, फूल भी है और चिंगारियॉं। २३.जब तक सुरज चॉंद रहेगा, ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा । २४.सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध, मुलींचे शिक्षण हाच खरा आनंद. २५.जिच्या हाती पेन्सिल पाटी, तीच सुखाचे मंदिर गाठी. २६.अंकुर फूलला कलिकेचा जन्म झाला, अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला. २७.काळ बदलला तूही बदललीस, चूल-मूल ची चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस. २८.शिक्षणाच्या दानाने बंधनाचा सोडवला फास, मुली घेत आहेत आता मोकळा श्वास. २९.भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी, मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी. ३०.मुलासह मुलीलाही देता शिक्षण, जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण. ३१.शिक्षणाचा झाला आता कायदा, त्यामुळेच होईल मुलींचा फायदा. ३२.कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर, मुलींना करा शिक्षणाचा आहेर. ३३.नको पैसा नको सोने चांदी, मुलींनाही द्या शिकण्याची संधी. ३४.बेटा-बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान. ३५.सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार. ३६.मंत्र आहे नव्या युगाचा, मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा. ( *घोषवाक्य स्त्रोत: विकासपीडिया, सामाजिक जागृती विभाग*)
सुंदर बोधकथा आहे, आवडल्यास इतरांनाही सांगावी अशी ..... एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते. कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही.बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?" वडील कावळा म्हणाला "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!" मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे. वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा "होय" म्हणाला. त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको." वडील कावळा म्हणाला, "थांब, तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ. तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे." मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ? पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला. मग तो झाडावर येवून बसला. वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?" थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते. फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते. आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते. खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा.. गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे. आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते. कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला, "बाबा, हे असेच नेहमी होते का? आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?" कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही. माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात." इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले.
🙏 *"मुलींना दिली सरस्वतीची सावली* *अशी ही थोर माऊली"*🙏 🙏 *विनम्र अभिवादन*🙏 👭🌹 *साविञीबाई फुले जयंती /बालिका दिन.*👭🌹 🎤 *आज जि.प.प्रा.शा.वाटेगाव येथे अतिशय उत्साही वातावरणात बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले.* 🎤 *💐प्रतिमा पुजन मा.मु.अ.नी केले तसेच श्रीम.सेनकुडे श्रीम.झाडे मॅडमने व काही मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले.* *त्यानंतर गीत गायन केले विविध घोषणा देण्यात आल्या.* 👭👭👭👭👭👭 *"मुलगा मुलगी दोघे समान,* *दोघांनाही शिकवू छान."* *=========================* *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.)* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/01/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *बालिका दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५० - पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी. १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहास संशोधक. 💥 मृत्यू :- १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *भीमा कोरेगाव प्रकरण - सरकारच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचं आवाहन - प्रकाश आंबेडकर* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- आज स्कूल बस न चालवण्याचा निर्णय, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर संघटनेचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : रॉचे माजी प्रमुख राजिंदर खन्ना यांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्तीला कॅबिनेटने दिली मंजुरी.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज शाळांना सुट्टी नाही, सुट्टी देण्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नकार दिल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली* ----------------------------------------------------- 5⃣ *कोळसा खाण घोटाळा : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला दिल्ली न्यायालयाकडून स्थगिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : जिल्हाधिका-यांची गाडी फोडली, शिवाजीनगर परिसरातील घटना, सुदैवानं गाडीत कुणीही नव्हतं.* ----------------------------------------------------- 7⃣ *चंद्रपूर - 220 केव्ही वीज उपकेंद्रात भीषण आग, आगीमुळे परिसरातील 35 गावांचा वीजपुरवठा ठप्प.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशवंत दिनकर फडके* यशवंत दिनकर फडके (जानेवारी ३, १९३१ - जानेवारी ११, २००८) हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१ रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्.डी. पदवी मिळवली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस स्वत:च एक खणखणीत नाणं असतो. ~ वपु काळे | इतर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 डॉ. आंबेडकर *२) भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगररांगामुळे विभक्त झाली आहेत?* 👉 महादेव *३) दूरदर्शनने सुरू केलेली सर्वात पहिली मालिका कोणती?* 👉 श्वेतांबरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर 👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद 👤 रतन बहिर, भीर, महाराष्ट्र 👤 शुभांगी परळकर, नांदेड 👤 माधव पवार, पत्रकार, नायगाव 👤 संदीप जाधव, देगलूर 👤 प्रशांत बोड्डेवाड, येवती 👤 वीरेंद्र डोंगरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमकुवत* नव वर्षाची सुरवात कोणाची शनी दर्शनाने कमकुवत असतात कोणी कोणी मनाने हे कमजोर मनाचे जातात कुठेही शरण डोळे झाकून लवायचे एवढेच त्यांचे धोरण शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.* *तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.* *ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अती शहाणा त्याचा बैल रिकामा* - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो, त्याच्या हातून काम बिघडते. *संकलक :- छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गाढव आणी निर्दय मालक* एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे. असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला. तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, 'अरे, दुष्ट माणसा, हे सगळं नुकसान तुझ्याचमुळे झालं. तू जर मला नीट खाऊ घातलं असतंस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझं मी सहज उचलू शकलो असतो.' तात्पर्य - काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏🙏🙏 नमस्कार. 🙏🙏🙏 " स्वच्छ विद्यालय , स्वच्छ महाराष्ट्र" मोहीम उद्यापासून शाळेत सुरु होणार त्यासाठी खास ... घोषवाक्ये, 1) स्वच्छता आली अंगणात, समाज का अंधारात. 2) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू. 3) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुन लावा. 4) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी. 5) नका बसु उघड्यावर संडासाला ,संधि मिळेल रोगाराई पसरण्याला. 6) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट. 7) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नका तुमच्या हाताने. 8) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र. 9) ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबता. 10) रंग भगवा त्यागाचा, मार्ग स्विकारू स्वच्छतेचा. 11) पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू. 12) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, सर्व रोगराईना दूर पळवू . 13) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती. 14) " स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते. 15) वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ति. 16) हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचाला बसलयं कोण. 17) जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा दात. 18) नखे कापा बोटाची , नाही होणार व्याधि पोटाची. 19) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ सृष्टि. 20) संडास बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल त्याच्या दारी. 21) सांडपाण्याला आळा , रोगाराई टाळा. 22) स्वच्छ सुंदर परिसर , जीवन निरोगी निरंतर. 23) स्वच्छ शाळा करा हातांनी , सुंदर गाणी गाऊ मुखांनी. 24) स्वच्छ सुंदर परिसरातनुच , सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात. 25) गावकरी मिळुन एक काम करू, शौचालयाचा वापर करू. 26) शौचालय असेल जेथे , खरी प्रतिष्ठा येईल तेथे. 27) संडास बांधण्या नाही म्हणू नये, शौचाला लोटा घेऊन जाऊ नये. 28) स्वच्छ घर , सुंदर परिसर , शोष खड्याचा करुया वापर. 29) कचरा कुंडिचा वापर करू , ल सुंदर परिसर निर्माण करू. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺* 📚✍🏻📕📗🗞📖🗃 *०१) ययाती* = वि. स. खांडेकर *०२) वळीव* = शंकर पाटील *०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर *०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती *०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात *०६) शिवाजी कोण होता*- गोविंद पानसरे *०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर *०८) तीन मुले* = साने गुरुजी *०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे. *१०) आय डेअर* = किरण बेदी *११) तिमिरातुन तेजाकड़े*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत *१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे *१४) जागर* - *१५) अल्बर्ट एलिस* - अंजली जोशी *१६) प्रश्न मनाचे* - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर *१७) समता संगर*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू *१९) ठरलं डोळस व्हायचं*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल *२१) गोपाळ गणेश आगरकर* = ग. प्र. प्रधान *२२) कुमारांचे कर्मवीर* - डॉ. द. ता. भोसले *२३) खरे खुरे आयडॉल*- यूनिक फीचर्स *२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी *२५) प्रकाशवाटा* - प्रकाश आमटे *२६) अग्निपंख*- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम *२७) लज्जा* - तसलीमा नसरीन *२८) दैनंदिन पर्यावरण* - दिलीप कुलकर्णी *२९) रणांगण* = विश्राम बेडेकर *३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे *३१) श्यामची आई* = साने गुरुजी *३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे *३३) बि-हाड* - अशोक पवार *३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे *३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर *३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड *३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर *३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर *३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर *४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर *४१) झोंबी* = आनंद यादव *४२) इल्लम* = शंकर पाटील *४३) ऊन* = शंकर पाटील *४४) झाडाझडती* = विश्वास पाटील *४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर *४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट *४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात *४८) इस्त्राइलची शेती*- *४९) बहाद्दुर थापा* - संतोष पवार *५०) सेकंड सेक्स* - सिमोन *५१) आई* = मोकझिम गार्की *५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी *५३) बलुत* = दया पवार *५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर *५५) स्वामी* = रणजीत देसाई *५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे *५७) पांगिरा* = विश्वास पाटील *५८) पानिपत* = विश्वास पाटील *५९) युंगंधर* = शिवाजी सावंत *६०) छावा* = शिवाजी सावंत *६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई *६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले *६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले *६४) वावटळ*- व्यंकटेश माडगुळकर *६५) ग्रेटभेट* - निखिल वागळे *६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू *६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती *६८) वाईज अंड आदर वाईज* *६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे *७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे *७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा *७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव *७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे *७४) गांधीनंतरचा भारत*- रामचंद्र गुहा *७५) आधुनिक भारताचे निर्माते*- रामचंद्र गुहा *७६) नापास मुलांची गोष्ट* = अरुण शेवते *७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे *७८) महानायक* = विश्वास पाटील *७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर *८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली *८१) मिरासदार*- द. मा. मिरासदार *८२) सुरेश भट यांचे* सर्व कविता संग्रह *८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *८४) स्पर्धा काळाशी*- अरुण टिकेकर, अभय टिळक *८५) बदलता भारत*- भानु काळे *८६) कोल्हाटयाचं पोरं*- किशोर काळॆ *८७) साता उत्तराची कहानी*- ग. प्र. प्रधान *८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास*- मा. म. देशमुख *८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी *९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई *९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर*- चांगदेव खैरमोडे *९२) समग्र महात्मा फुले*- राज्य सरकार *९३) झोत*- रावसाहेब कसबे *९४) ओबामा* - संजय आवटे *९५) एकेक पान गळावया*- गौरी देशपाडे *९६) आई समजुन घेताना*- उत्तम कांबळे *९७) छत्रपति शाहू महाराज* - जयसिंगराव पवार *९८) अमृतवेल*- वि. स. खांडेकर *९९) महात्म्याची अखेर*-जगन फडणीस *१००) बुद्ध आणि त्याचा धम्म*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Subscribe to:
Posts (Atom)