✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे. १७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिं 💥 जन्म :- १८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे 💥 मृत्यू :- १९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राबविलेल्या नो हॉर्न डे'चा उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार असल्याची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची घोषणा* ----------------------------------------------------- 2⃣ *बीड - श्रीक्षेत्र नारायणगडावरील विविध विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन, पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. विनायक मेटे होते उपस्थित* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - अस्वस्थ वाटू लागल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना लीलावती रुग्णालयात केले दाखल* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण, नीरव मोदी आणि गीतांजली शोरूमवर छापे, नीरव मोदीचे 5 हजार 100 कोटींचे हिरे जप्त करण्यात यश* ----------------------------------------------------- 5⃣ *बडोदा - मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडीस सुरुवात, साहित्यिकांसह बडोदेकर मराठी माणसांचा लक्षणीय सहभाग* ----------------------------------------------------- 6⃣ *शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा, खडगा प्रसाद ओली होणार नवे पंतप्रधान.* ----------------------------------------------------- 7⃣ *आयपीएलच्या आगामी सत्राची ७ एप्रिलपासून सुरुवात होणार असून सलामीला गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *एकच ध्यास ; वाचन विकास* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धुंडिराज गोविंद फाळके* धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= 1) कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे ? पुणे 2) सूर्यग्रहण फक्त कोणत्या तिथीला होते ? अमावस्या 3) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 बाप्पा महाजन, नाशिक 👤 प्रदीप वाघमारे, पुणे 👤 सतीश चौहान, चौसाळा 👤 प्रमोद हिवराळे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *यशाचा मंत्र* कठोर परिश्रमच यशाचा मंत्र आहे यशस्वी व्हायचे तेच एक तंत्र आहे कठीण परिश्रम घेईल त्याला यश मिळते परिश्रम करणारालाच यशाची किंमत कळते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शरण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दैव देते, कर्म नेते* - अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरी नक्कल* भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला. त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला. भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला. दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला. त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’ बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’ बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment