✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/02/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले. २०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय. 💥 जन्म :- १८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन 💥 मृत्यू :-  १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड तास दिले लोकसभेत भाषण* ----------------------------------------------------- 2⃣ *केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला देण्यात आली मंजुरी* ----------------------------------------------------- 3⃣ *इलाहाबाद - गंगेच्या शुद्धिकरणासाठी 20 हजार कोटींची तरतूद, शुद्धिकरणाच्या 189 प्रकल्पांपैकी 47 प्रकल्प पूर्ण* ----------------------------------------------------- 4⃣ *चंद्रपूर : प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लायड्स स्टील कंपनीला 48 तासात बंद करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश. काही वेळापूर्वीच कंपनीला दिले पत्र.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी 231 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज* ----------------------------------------------------- 6⃣ *विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत वनडे मालिकेत विजयी हॅटट्रिक साधली.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा उडवला 178 धावांनी धुव्वा, एकदिवसीय मालिकेत घेतली 2-0 अशी विजयी आघाडी* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी - राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त मा. नंदकुमार साहेब हे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी साधणार संवाद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========             *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *डॉ. झाकिर हुसेन* (८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते; पण झाकिर हुसेन नऊ वर्षांचे होते, तेव्हा ते वारले. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांस अनेक ठिकाणी हिंडावे लागले. इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेऊन अखेर त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व तिचे झाकिर हुसेन १९२६ मध्ये कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे (१९२६–४८) या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. शैक्षणिक वाटचालीतील त्यांची स्फूर्तिस्थाने दोन होती : म. गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर. विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य पुरेपुर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१९४८–५६). १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले (१९६२). १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला. त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या. स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. संदर्भ : Noorani, A. G. Zakir Husain, Bombay, 1967. लेखक : मु. मा. घाणेकर स्त्रोत : मराठी विश्वकोश *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत ?*          मा. विनोद तावडे *2) राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त कोण आहेत ?*         मा. नंदकुमार *3) राज्याचे शालेय शिक्षण सचिव कोण आहेत ?*        मा. असीम गुप्ता *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील ठमके, नांदेड 👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर 👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद 👤 दिलीप खोब्रागडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे  विनाशाचे द्वार आहेत  जेवढे वाढतील तेवढे  डोक्यावर भार आहेत  काम क्रोध लोभाने  डोक्यावर भार होतो  अती झाले म्हणजे  केवढाही गार होतो     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'* *ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.* *याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."*     ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••             🍁🍁🍁🍁🍁🍁          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========   शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उधारीचे पोते, सव्वा हात रिते.* - उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.  *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========          *स्वतःचे अस्तित्व जाणणे* एका बागेतील एका  काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली.  परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.' तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली.दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरया असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment