✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४७ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना. 💥 जन्म :- १९४० - पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :- २००४ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. २००४ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये २३ फेब्रुवारीपासून पुढील ७२ तासांच्या कालावधीत वादळी वा-यासह गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *कीटकनाशकामुळे शेतकरी मृत्यू प्रकरण : मृत शेतक-यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत द्या, मंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश* ----------------------------------------------------- 3⃣ *पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल अॅडमिशन प्रक्रियेत राज्याच्या कोट्याकरिता डोमिसाईल सर्टिफिकेटचा नियम रद्द ,मुंबई हायकोर्टाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - मुंबई महानगरपालिका अधिनियम-1988, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात, 8.65 वरुन 8.55 टक्क्यांवर* ----------------------------------------------------- 6⃣ *पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत मांडला अर्थसंकल्प* ----------------------------------------------------- 7⃣ *'खेळात करिअर करा, नवनव्या संधी निर्माण होताहेत'; असा सल्ला भारताचा विक्रमादित्य क्रिकेटवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाप आणि पुण्य* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/16.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= मोहिनीआट्टम् : केरळमधील एक पारंपारिक शास्त्रीय नृत्यप्रकार. ⇨ कथकळि नृत्यदेखील केरळमधीलच आहे; पण तो केवळ पुरुषांनीच नाचायचा, तांडव (उद्धत प्रणाली) युक्त नृत्यनाट्यप्रकार आहे; तर मोहिनीआट्टम् म्हणजे केवळ स्त्रियांनीच करायचा लास्य (सुकुमार प्रणाली) युक्त नर्तनप्रकार आहे. पुराणांमध्ये अमृतमंथन व भस्मासुर वध या कथांमध्ये विष्णूने मोहिनीचे- अतिशय लावण्यवती स्त्रीचे-रूप घेतल्याचा उल्लेख आहे. या कथांच्या संदर्भात या शैलीकडे पाहिले असता, मोहिनीआट्टम् या शब्दातील मोहिनी हा शब्द मोहकतेचा द्योतक वाटतो. आट किंवा ‘आट्टम्’ म्हणजे नृत्य. या नृत्यशैलीस ही मोहकता, त्यामधील अंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार व अर्धगोलाकार हालचालींमुळे प्राप्त होते. चेहऱ्यामध्येही ‘उत्क्षिप्त शिर’ (किंचित एका बाजूस झुकलेले डोके) व ‘साची दृष्टी’ (तिरका कटाक्ष) यांमुळे हाच परिणाम साधला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 *सहाय :- राजू भद्रे, बिलोली* =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= समाजासाठी सेवाभाव बाळगून नि:स्वार्थपणे काम करणाऱ्याच्या सेवेस सारे जग मदतीला येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) कोकणातील मुख्य पीक कोणते ?* भात *02) तीन ही दलाचा सर्वोच्च प्रमुख कोण असतो ?* राष्ट्रपती *03) विमानाचा शोध कुणी लावला ?* राईट बंधू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 डोखे विवेक मच्छिंद्र 👤 शशिकांत तालिमकर 👤 मारोती बोईनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लक्ष्य* सर्वस्व पणाला लावले की लक्ष्य गाठता येते कितीही मैलांचे अंतर जिद्दीने काटता येते सर्वस्व पणाला लावले की यश पदरात पडते असाध्य ते साध्य करिता सायास असेच काही घडते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आनंद' आणि 'दिर्घायुष्य' यातले नाते शोधले पाहिजे. अलिकडे दिवाळी येते आणि जाते. समाजातील एका वर्गाला तर या सणाचे आकर्षणच वाटेनासे झाले आहे. कारण आम्ही राजे झालो आहोत आणि राजाला रोजच दिवाळी असते. वर्षभर पंचपक्वान्, ऋतुनुसार तेलं, क्रीम्स, अभ्यंग रोजचेच, कपडेच काय पण फर्निचरही वर्षाला नवीन, फटाकेही नेहमीचेच मग 'दिवाळी आनंद' वेगळा काय असतो ?* *'आनंद' हा दिर्घायुष्यासाठी प्रथम क्रमांकावर. वाणसामानाच्या सटरफटर गोष्टींसारखी दिर्घायुष्यासाठीच्या गोष्टींची यादी करून ती फडकवणारे पुष्कळ. पण अचानक त्यांचीच विकेट पडते. जगणे हीच शिकवणी असताना, आपण त्रास न करून घेणे ही दिर्घायुष्याची दुसरी पायरी. इतरांना त्यांच्या त-हेने जगू देणे एवढेच आपल्या हाती असल्याने त्यात आनंद मानता यायला हवा. इतरांना शिकवत बसण्यात अर्थ नसतो, त्यासाठी आपला जन्म असतो का ?* 🌹 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी आपल्या कल्पनेने काढलेल्या रेखाटनामध्ये रंग भरते सोपे असते.कारण त्यात स्वातंत्र्य आणि कलात्मक दृष्टीकोन असतो.परंतु जीवनात रंग भरणे अतिशय कठीण असते.त्यात जीवनाचे अनेक रंग असतात.ते रंग कुठे आणि कसे भरायचे यासाठी आपले एक विशिष्ट कसब वापरावे लागते तेही समोरची व्यक्ती पाहून.ते एकदा त्याला जमले तर जीवन सुसह्य होते नाही तर आयुष्यभर असह्य होते.तेव्हा मात्र आपले कसब वापरण्यासाठी समोरच्यांच्या भावनिकतेचा विचार करावा लागतो.मग हे जमण्यासाठी अधिक मानसिकतेचा व आपल्या बुद्धीचातुर्याचा विचार करावा लागतो.तेव्हाच आपल्या नि इतरांच्या जीवनात रंग अधिक खुलून दिसतात व जीवन समृद्ध व्हायला मदत होते. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *न कर्त्याचा वार शनिवार* - अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बुड घागरी* बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणतो दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment