✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/02/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक मराठी राजभाषा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी. 💥 जन्म :- १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 💥 मृत्यू :- १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद नसल्यानं विरोधक संतप्त, सभागृहाबाहेर विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी* ----------------------------------------------------- 2⃣ *गडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने कायाकल्प ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाने राज्यात प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या संपामुळे बारावीच्या 65 लाख उत्तरपत्रिका तपासणीअभावी पडून, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : शासनाविरोधात सोलापूर जिल्हा परिषदेवर अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्या प्रकरणी डीएसके यांच्या ताब्यातील आलिशान गाड्या जप्त, पुणे पोलिसांनी केली कारवाई* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द* ----------------------------------------------------- 7⃣ *केप टाऊन - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका असेल मॉर्केलची शेवटची मालिका* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शालेय विद्यार्थी आणि खुल्या गटासाठी *मराठी दिनानिमित्त हस्ताक्षर लेखन स्पर्धा* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_26.html आज सकाळी 09 ते सायंकाळी 06 पर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वि. वा. शिरवाडकर* विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) मराठी साहित्यात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण होते ?* वि. स. खांडेकर *02) कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता कोण करत होते ?* वि. वा. शिरवाडकर *03) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?* मराठी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 गंगाधर मुटे, वर्धा 👤 श्यामल पाटील 👤 साई पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *जीव* मुठभर धान्यासाठी जातो कोणाचा जीव सामान्याविषयी कोणाला कुठे वाटत नाही कीव चुना लावून पळतात त्यांच कोण काय करतो चार घास मिळवण्यासाठी सामान्य माणूस मरतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पळसाला पाने तीनच* - कोठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *उंदीर कोंबडा आणि मांजर* एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही. वर्तमानपत्रातून संग्रहित 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment