✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वांतत्र्य आंदोलन दिन - दक्षिण कोरिया. 💥 ठळक घडामोडी :- १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण. १९६२ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले. 💥 जन्म :- १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली: ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत जीडीपी दरात वाढ, देशाचा जीडीपी दर ७.२ टक्क्यांवर.* ----------------------------------------------------- 3⃣ *कांचीपुरम पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी पंचत्वात विलीन, पती बोनी कपूर यांनी दिला मुखाग्नी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर : विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन अखेर मागे; समितीचा अहवाल विधान परिषदेत सादर.* ----------------------------------------------------- 6⃣ *आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्या, एसटी कामगारांनी राज्यपाल - मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *टी-20 मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी 5.6 लाख रुपये ‘द गिफ्ट ऑफ द गिव्हर्स फाऊंडेशन’ला केले दान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= 09 क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/09.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= गौरी देशपांडे (फेब्रुवारी ११, १९४२ - मार्च १, २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत. प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका.गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= दुसऱ्याच विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ?* नेवासे *02) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?* गंगापूर जि. नाशिक *03) कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते ?* मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 आशा तेलंगे, उपक्रमशील शिक्षिका, मुंबई 👤 अमोल आलगुडे, लातूर 👤 साहेबराव बोणे, मोबाईल टीचर, धर्माबाद 👤 विक्रम अडसूळ, संयोजक ATM *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* कर्तव्य शुन्य अन् अपेक्षांच ओझं असतं कर्तव्य न करताही मोठेपण माझं असतं कर्तव्य न करता अपेक्षा खरंच किती व्यर्थ आहे कर्तव्यावीना अपेक्षा याला काय अर्थ आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= समयसुचकतेनुसार आपल्या विचारांशी इतर लोक सहमत नसतील तर आपला विचार बदलायला काहीच हरकत नाही, त्याबाबतीत आपलीही भूमिका आग्रही असू नये. त्यात इतरांचे नुकसान होणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी.म्हणून आपलेच खरे म्हणण्यापेक्षा इतरांच्याही चांगल्या आणि योग्य विचारांना प्राधान्य देऊन त्यात दोघांचेही हित साधून जीवनव्यवहार व्यवस्थितपणे पार पाडता येईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..8087917063/9421839590. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= पालथ्या घागरीवर (घड्यावर) पाणी - केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *नदी,मासा,युक्ती* एका नदीच्या तिरावर एक 👳🏽♀कोळी मासे 🐟🐠🐬🦈🐳🐋🐠🐟धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही 🕸म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा 🐠बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. 〰〰〰〰〰〰 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment