✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- 1945 - संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 1984 - भुयारी रेल्वे कोलकता येथे सुरू 💥 जन्म :- 1910 : मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीतील अभिनेत्री लीला पेंढारकर 1914 - आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल 1921 - व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण 💥 मृत्यू :- 1992 - मराठी नावकथेचे जनक अरविंद गोखले 2013 - तब्बल पाच दशके आपल्या जादुई, आवाजाने हिंदी चित्रपट संगीतात ठसा उमटवणारे पार्श्वगायक मन्ना डे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८0 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती केली जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सुप्रीम कोर्टाने देशभरात सरसकट फटाके विक्रीच्या बंदीला नकार दिला असला तरी कमी प्रदूषण करणार्या फटाक्यांचीच विक्री केली जावी, असे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाईन विक्री करण्यावरही कोर्टाने घातली बंदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भेट राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची १२८ कोटींची मालमत्ता लवकरच जप्त होण्याची चिन्हं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : मुंबई शहराच्या डायल-100 प्रकल्पासह शहर सीसीटीव्ही प्रकल्प व्यापक करणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : फॉर्मात असलेल्या आघाडीच्या फलंदाजांच्या जोरावर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आज होणाऱ्या दुस-या एकदिवसीय लढतीत विजयाची लय कायम राखण्यास उत्सुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/4Vj4TpwngR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाहिरात : एक चिंतन* https://b.sharechat.com/36eeXGAIbR आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पार्श्वगायक मन्ना डे* ख्यातनाम गायक मन्ना डे यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. त्यांचे मुळ नाव प्रबोधचंद्र डे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोलकाता येथे झाले. त्यांना कुस्ती व बॉक्सिंग खुप आवडत होते. सोबतच ते फुटबॉलप्रेमीसुद्धा होते. महाविद्यालयीन काळात ते अशा स्पर्धांमध्ये भाग घेत असत. त्यांच्या वडिलांची त्यांना वकील बनवण्याची इच्छा होती. वकील बनायचे की गायक अशा द्विधा मनस्थितीत ते होते. मात्र काका कृष्णचंद्र डे यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी गायक बनण्याचे ठरविले.एक दिवस काकांसोबत रियाज करीत असताना बादल खान यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि विचारणा केली असता आपण असेच गात असतो, असे उत्तर त्यांनी दिले. बादल खान यांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली. पुढे त्यांनी काकांसोबत संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी मुंबई गाठले आणि बॉलिवूडमध्ये गायक म्हणून प्रस्थापित झाले.त्यांनी १९४२ मध्ये तमन्ना चित्रपटापासून आपले करिअर सुरू केले. २०१३ पर्यंत त्यांनी सुमारे तीन हजार पेक्षा अधिक गाणे गायले. हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये आणि इतरही भाषांमध्ये त्यांच्या आवाजाला मोठा चाहतावर्ग लाभला. केंद्र सरकारने त्यांना चित्रसृष्टीतील योगदानासाठी १९७१ मध्ये पद्मश्री सन्मान तर २००५ मध्ये पद्मभूषण तर २००७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'पंचतंत्र' या ग्रंथाचे लेखक कोण?* विष्णू शर्मा *२) देशात सोन्याच्या खाणी कोठे आहेत?* कर्नाटक (कोलार) *३) सिमेंटचे कारखाने कोणत्या राज्यात आहेत?* मध्य प्रदेश *४) दक्षिण कोरियाची राजधानी कोणती?* सेऊल *५) भारतात रणगाडा तयार करण्याचा मोठा कारखाना कोठे आहे?* आवडी (तामिळनाडू) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गजानन क्यादलवार ● कृष्णा प्रकाशराव मोरे ● राज धनकवार ● माधव कौठवाड ● सतीश बावणे ● लक्ष्मीकांत बेंकट ● पागोजी डुकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कारलं* कडू कारल्यालाही गोड म्हणून खाता आलं पाहिजे वाईटालाही चांगल्या नजरेने पहाता आलं पाहिजे कारलं कडू म्हणाल तर ते खाता येत नाही वाईट म्हणाल तर त्याला चांगलं म्हणून पहाता येत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे. 'मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* •• ●‼ *रामकृष्णहरी*‼● •• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 44* बहते को मत बहन दो, कर गहि एचहु ठौर। कह्यो सुन्यो मानै नहीं, शब्द कहो दुइ और।” अर्थ सत्कर्म अथक असले पाहिजे , असे महात्मा कबीर म्हणतात . पोहायला न येता गंटागळ्या खावून बुडत असेल किवा वाहून जात असेल तर त्याला बुडू देऊ नका. वाहूनही जाऊ देऊ नका. त्याचा हात धरून मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याला बाहेर काढा. तो सांगितलेल्या गोष्टीकडे काना डोळा करीत असेल तरी त्याला उपदेश करणे सोडू नका. त्याच्या भल्याचे दोन शब्द सांगतच राहा. सज्जन दयावंत असतात. त्यांची कळवळ्याची जाती असते. 'बुडती हे जण । न देखवे डोळा । म्हणोणीया कळवळा । येत असे ।।' तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे ते जगाच्या कल्याणासाठी धडपडत असतात. वाईट संगती किवा विचाराच्या प्रभावाखाली येवून ज्ञान मार्गापासून माणूस भरकटलेला असेल तर त्याला ज्ञानामृताचे डोस पाजून सत्य व विवेकी मार्गावर आणण्याचं पवित्र काम साधू व विचारवंताचं आहे. खरा व मानवतावादी धर्म बुरसट विचार अंधश्रद्धेची शिकवण देत नाही. काही संधीसाधू ढोंगी बुवा, बाबा चमत्काराच्या नावाखाली लोकांची प्रचंड लूट व पिळवणूक करीत आपलं इप्सित साधत असतात. अशा अंधभक्तीपासून दूर करून लोकांना डोळस मार्ग दाखवणे हे संताचे खरे कार्य आहे. अशा वेळी उपदेश देवूनही समोरची व्यक्ती मानत नसली तरी सतत त्याला अज्ञानाची जाणीव करून देत राहिले पाहिजे. एक ना एक दिवस तो विचार प्रवृत्त होवून खर्या भक्ती मार्गाकडे वळेल. त्याच्या ठायी खर्या ज्ञानाची जाणीव होईल व तो अज्ञानापासून दूर होऊन सत्य व विवेकशील मार्गाची कास धरेल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिथे तुमची श्रद्धा आहे तिथे तुमचा आत्मविश्वास आहे हे लक्षात असू द्या.लोक तुम्हाला काही म्हणतील त्यावर विश्वास ठेवू नका.कारण तुमच्या श्रध्देपासून तुम्हाला परावृत्त करुन तुमच्यातल्या आत्मविश्वासाला तडा निर्माण करण्याचे काम करतात आणि मानसिकता विचलित करण्याचे. मग तुमचे त्यामुळे कोणत्याही कामात मन लागत नाही.अशामुळे त्यांना आनंद वाटतो.लोकांनी असे म्हटले म्हणून तुम्ही तसे करु नका.तुम्हाला ज्यातून आनंद आणि समाधान मिळत असेल तर जरुर एखाद्या तुमच्या असलेल्या श्रध्देवर विश्वास ठेवूनच काम करायला हरकत नाही.तुमची प्रगती हीच तुमच्या श्रध्देतून मिळणारी प्रेरणा आहे हे कधीही विसरू नका.शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हेच खरे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भांडण - Brawl* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सोन्याची कुदळ* एका माणसाला दोन मुले होती जेव्हा तो म्हातारा झाला. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि म्हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे धन-संपत्ती घ्यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्याला खोटे का सांगितले?मग त्याच्या आत्म्याने म्हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्त पीक त्याच्या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला. तात्पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्याच्या घरी समृद्धी, सुख अवश्य येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment