✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक स्ट्रोक दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार १९९९ - ओडिशाच्या किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळाने अतोनात नुकसान केले २००८ - डेल्टा एरलाइन्स आणि नॉर्थवेस्ट एरलाइन्स एकत्रित होऊन जगातील सगळ्यात मोठ्या विमानवाहतूक कंपनी तयार 💥 जन्म :- १९११ - रामचंद्र नारायण चव्हाण, वाईचे बहुजन समाज हितकर्ते विचारवंत व लेखक. 💥 मृत्यू :- १९६७ - डॉ. कूर्तकोटी, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व हिंदू धर्मप्रचारक १९९४ - सरदार स्वर्णसिंग, भारताचे माजी परराष्ट्रमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *यवतमाळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चार दिवसांच्या कतार आणि कुवेतच्या दौऱ्यावर रवाना.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मदनलाल खुराणा यांचे निधन, ते 82 वर्षाचे होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : मुंबई विमानतळावर सीआयएसएफ जवानाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाचे वाचविले प्राण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या कपातीमुळे गेल्या ११ दिवसांपासून भारतामध्ये इंधन दरवाढीत झाली कपात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली : 'बधाई हो' चित्रपटाची घौडदौड सुरूच, दुसऱ्या आठवड्यात 76 कोटींची घसघशीत कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : 2018 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचं केलं कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/iSM8wVmGoR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आधुनिक तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/10/11-%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्ट्रोक म्हणजे काय ?* बहुतेक वेळा मेंदूला रक्तपुरवठा करणार्या एखाद्या धमनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पक्षाघात होतो. यामुळे मेंदुच्या त्या भागाला हानी पोहोचते व तुमच्या शरीरातील मेंदुच्या त्या भागाद्वारे नियंत्रित केला जाणारा भाग निकामी होवू शकतो. उदा, तुमचा एखादा हात किंवा पाय किंवा वाचा निकामी होवू शकते. हे नुकसान तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचेही ठरू शकते, आंशिक किंवा पूर्ण देखील असू शकते. लक्षणे आढळताच तुम्हांला पूर्णपणे औषधोपचार मिळाल्यास मेंदुच्या त्या भागाला पुन्हा रक्तपुरवठा चालू होवू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, ज्यामुळे जास्त नुकसान होत नाही. पक्षाघात टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. ऍस्पिरिनचे लहान डोस तुमचा पक्षाघाताबाबतचा धोका कमी करू शकतात का याबाबत तुमच्या डॉक्टरला विचारा. ऍस्पिरिन तुमच्या रक्तामध्ये गाठी पडू देत नाही आणि यामुळे तुमच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होत नाही. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हरिका द्रोणावली हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बुध्दिबळ *२) बांगलादेशचं चलन कोणतं आहे ?* टका *३) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?* कृषी *४) नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ?* वैज्ञानिक ऑल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल *५) नौदलाचे प्रमुख कोण असतात ?* अँडमिरल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन मोहिते ● विशाल पाटील बोडे ● शिवानंद खपाटे ● निखिल गुजराथी ● संपदा पाटील ● गणेश कट्टावाड ● शंकरराव कुंटुरकर ● दिनेश राजपुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजेड* अंधा पुढे दिवा कशाला हवा डोळसा पुढे उजेड ठेवा ज्याला जे हवे त्याला ते द्यावं जे दिलं ते उपयोगी यावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले. "अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 47* मन राजा नायक भया, टाँडा लादा जाय । है है है है है रही, पूँजी गयी बिलाय । अर्थ मन प्रवृत्ती चंचल आहे. मनाची हीच चंचलता मानवाला सतत झुलवत असते. ते सर्वात वेगवानही आहे. क्षणात भुईवर तर क्षणात आभाळी विहार करीत असते. मनासारखा जगात दुसर्या खेळ्या नाही. त्याला नियंत्रणात न ठेवल्यास ते अधःपाताकडे नेते.. जवळ दमडी असो की नसो ते राजा बनतं. मोठा व्यापरी बणून विषय सुखांची खरेदी करतं. मोह, माया, लालसेच्या नादी लागून माणूस कुवतीबाहेर वागायला लागतो. त्यामुळे एक तर त्याचे दिवाळे निघते किवा तो ऊर फुटेतो धावून दमछाक करून घेतो. भोग विलास सारं उपभोगावं परंतु सारं प्रमाणात असावं. उपभोगांची अनिंयत्रित लुट केली की पक्वान्नाचं ताट पुढढ्यात असूनही मधुमेहीनं त्याच्याकडं नुसतंच बघत बसावं अशी परिस्थिती उत्तरार्धात ओढवते. म्हणून माणसाने मनाला मोकाट भटकू न देता त्याला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायला हवं. निसर्ग आपणास हवा, पाणी, प्रकाश देताना कुठलाही भेदभाव करीत नाही, एकमेव मणुष्य नावाचा सर्वात बुद्धीमान प्राणी वगळता कोणतेही प्राणी आपापसात कधीही भेदभाव करीत नाहीत. सर्वजण मिळून मिसळून एकोप्याने राहतात. निसर्गातील उपलब्धतेचा मिळून-मिसळून आस्वाद घेतात. कोणी मालक नसतो कोणी नोकर नसतो . माणसानं आपल्याच बांधवाचं जळूगत शोषण करीत शोषक व शोषित असे गट तयार केले. रिकाम्या हाती जन्मा येवून रिकाम्याच हाती मातीशी एकरूप होणे आहे तर माणसाची ही मिजास आहे. चिरंजीवीतेचं वरदान मिळाल्यावर माणूस माणसाची काय अवस्था करील ही कल्पनाच न केलेली बरी ! मानवतेचं राज्य आणण्यासाठी माणसासारखं वागणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे सारं काही असणार्यांनी हावरटपणा व लुटारू प्रवृत्ती सोडली पाहिजे. कृत्रिमतेचा बडेजाव मिरवण्याऐवजी शाश्वत व चिरंतनाचा वेध घेतला पाहिजे. माणसाच्या विकृत प्रवृत्तीने नको तेच अज्ञानाचे गाढव ओझे मानवाच्या पाठीवर लादले. अन तेच आम्ही पुढे पुढे नेण्यात काय हशील आहे ? निरामय जीवन जगत बुरसट रिती-परंपरा, भेदाभेद सोडला नाही तर माणूस या पदाला आपण पात्र होवूच शकत नाही. माणुसकीला पारख्या झालेल्या लोकांच्या मानवतेच्या भंपक घोषणाच ऐकायला मिळत राहतील. हेच खरं... एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण एखाद्यावेळी अनवाणी पायाने पायी जाताना तळपायाला खडा रुतला तर डोळ्यांत टचकन पाणी येते आणि असह्य वेदना होतात. काही काळ आपण झालेले दु:ख खूप सहन करतो आणि पुढे चालायला लागतो पण मनात खडा टोचल्याचे शल्य राहतेच. पण तोच खडा दुस-याच्या पायाला टोचला तर त्याला आपण खाली पाहून चालू नये का असा सल्ला देतो. जो त्रास आपल्याला झाला आहे तो त्रास इतरांना होऊ नये असे ज्यांना मनापासून वाटते ते दुस-या चे कधीच वाईट चिंतीत नाहीत. अशी माणसे नेहमी आपल्या जीवनात असावीसी वाटतात. जे दुस-यांच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतात ते कधी कधी स्वत:च्या जीवनात दु:ख झालेले कधीच कुणाला सांगत नाहीत. त्यांच्या मनात कधीही वाईट भावना निर्माण होत नाही. अशांचे आयुष्य हे एक दुस-यांसाठी प्रेरणादायी असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निष्क्रिय - Inactive* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वैचारिकतेचा अभावामुळे सर्वनाश* एका राज्यात निष्क्रिय,अविचारी राजाचे शासन होते. त्याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्या सर्व चापलुसी करणारे होते. त्या राजाच्या राज्यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्य त्या राज्यात जात नसत. त्यामुळे त्या राज्यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्या राज्यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्ला दिला की त्या ऋषींना आपल्या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्यांचा सत्कार करावा म्हणजे जनतेचा विश्वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्या मुख्य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्या झोपड्या पाहून थांबले व त्यांनी विचारले,’’ या कुणाच्या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्काळ राजाला म्हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी चापलुशी केलेल्या उपदेशाने राजाचे राज्य लयाला गेले. त्याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला. तात्पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे. खरे आहे ना !!!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment