✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/10/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- *१९८१-फ्रान्समध्ये मृत्यू दंडाची शिक्षा रद्द करण्यात आली २००१ - ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून अँथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली. 💥 जन्म :- १९५३ - टोनी शालूब, अमेरिकन अभिनेता 💥 मृत्यू :- १९८७ - गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमली राहमोन यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव : Dbt मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा फी शिक्षण फी ची रक्कम विद्यार्थ्यांच्या खाती लवकरात लवकर जमा करावी. यातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : शहरातील स्वाईन फ्लुचा ताप वाढतच चालला असून आणखी २१ जणांचा झाला मृत्यू, त्यामुळे शहरातील एकुण मृतांचा आकडा पोहोचला ४१ वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *95 वर्षीय दिलीप कुमार यांना न्युमोनिया, पुन्हा रुग्णालयात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 720.54 कोटी तुटीचा अर्थसंकल्प, कसलीही भाडेवाढ न करता बेस्ट समितीच्या बैठकीत सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यवतमाळ - बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 6 लाखांच्या बनावट नोटा जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला जिंकून दिले दुसरे सुवर्णपदक.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्तीमध्ये आज प्रकाशित लेख *" मतदार जागृती आवश्यक "* http://epaper.ejanshakti.com/m5/1848089/Pune-Janshakti/09-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रेणुका देवीचे माहूर* माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत. माहूर, नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) कुतुबमिनार कोठे आहे ?* नवी दिल्ली *०२) चारमिनार कोठे आहे ?* हैद्राबाद *०३) ताजमहल कोठे आहे ?* आग्रा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● नागनाथ बळीराम शिंदे, धर्माबाद ● स्नेहल श्यामसुंदर ढगे, चिरली ● पल्लवी मदन ढगे, चिरली ● रोहित भोळे ● हणमंत सावंत ● आर जे राठोड ● पिंटू कटलम ● नागेश अशोक धावडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पारख* हिरा अन् गारगोटी पृथ्वी मधून मिळते पारख करणाराला खरा फरक कळते एका खाणीत सारं सारखं असत नाही कोळशाच्या खाणीत हिरे असतात काही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= • • • ● ‼ *विचार धन*‼ ● • • • =========ஜ۩۞۩ஜ========= *दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !* *भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🦆🦆🦆🦆🦆संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 35* *मेरा मुझमे कुछ नही,* *जो कुछ है सो तोर |* *तेरा तुझको सउपता,* *क्या लागई है मोर ||* अर्थ माणसाचा हावरटपणा पाहून महात्मा कबीर उपदेश करताना म्हणतात. हे मानवा ! तुझा हा हावरटपणा म्हणजे, 'माझं माझं अन गाढव ओझं' असा हा प्रकार आहे. माझं जे काही रूप दिसतं ना ते माझं असं स्वतःचं काहीच नाही. जे काही मिळालंय ना ते सारं निसर्गाकडून मिळालेलं आहे. सौंदर्य वगैरे सारं काही विधात्याचंच वरदान. मला मिळालेली शक्तीसुद्धा निसर्गाचीच कृपा. मी तो फक्त भार वाही. जाताना मला संपत्तीसह हा देहही निसर्गालाच द्यायचा आहे. मी येताना काही आणलेलं नाही जातानाही काही नेणार नाही. सारं इथलंच उपभोगलं अन इथचं सोडायचं आहे. निसर्गाचं निसर्गाला द्यायचं आहे. अनेक बलवंतांनी बळाच्या जोरावर जगाला झुलविले. सर्वांना आपले अंकित बनवून ठेवले . सारं भौतिक वैभवं त्याच्या पायी लोळण घेत होतं. असाही एक दिवस उजाडला की सारं वैभव जिथून घेतलं तिथंच ते सोडावं लागलं होतं. वैभव संपत्ती काही जन्मतःच सोबत आणालेली नव्हती. ती जिथून घेतली तिथंच सोडावी लागली होती. जन्मताना आत्म्यासोबत शरीर मिळाल होतं. त्या शरीराला सजवून, शृंगारून खूप जपण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हट्टापायी नको त्या बाबींच्या मागे धावावं लागलं. ते शरीरही साथ सोडून ज्याच्या आधारानं रजाचं गज झालं होतं त्याच निसर्गाला ते अर्पण करावे लागणार आहे. याची जाणीव होताच आपल्या सहकार्यांना 'माझ्या मृत्यूनंतर माझे हात खुलेच ठेवा. जगाला कळू द्या की माणूस कितीही संपत्ती जमा केला तरी जाताना रित्या हातीच जावं लागतं.' हे बोल आहेत जग्गजेत्या ग्रीक सम्राट आलेक्झांडर अर्थात सिकंदराचे. यातून तरी माणसानं बोध घेवून समाधानी व्हायला हवं ! जीवनातल्या परमानंदाची निखळ अनुभूती घेत समाधानी व्हायला हवं ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दुस-यांना आनंद देण्यात जेवढे समाधान आहे तेवढा आनंद दुस-याचा हिरावून घेण्यात नाही. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आपल्याला कोणतेही साधन लागत नाही केवळ तुमचे निर्मळ मन आणि तुमची निकोप दृष्टी असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रास - Trouble* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हुबेहूब कला अवगत असणे.* एक मूर्तिकार मूर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. ज्याची मूर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. त्याने खुर्चीवर बसलेल्या व एका हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता. त्या पुतळय़ाला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढच्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहूब होता की, खराखुराच रखवालदार पहार्यावर बसला असल्याचा चोर-दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत. नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होते. आता 'आपला शंभरीनिमित्त जंगी सत्कार व्हावा' एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती, म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वत:चे नऊ पुतळे केले होते. अगदी हुबेहूब स्वत:सारखे. एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळय़ांत दहावा पुतळा म्हणून निश्चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक असे दहा मूर्तिकार! काही म्हणजे काही फरक नाही! यातल्या कुणाला घेऊ जावे? हा त्यांच्यापुढे पेच पडला. तेवढय़ात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्यांना मुद्दाम म्हणाला, 'बाबांनो, असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे? कारण खर्या मूर्तिकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळय़ांत दाखवायचे राहून गेले आहे. त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, 'उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष तुम्हाला दिसला. हे मुर्तीकार आम्हांला माहिती होते तु बोलणार जर तुझ्याबद्दल मी काही बोललो नसतो तर आम्हाला चिञकार कोण ते ओळखायला आले नसते. चल आता आमच्याबरोबर तु. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment