✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनुष्य गौरव दिन* 💥 ठळक घडामोडी :- 💥 जन्म :- १९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार. १९१० - चंद्रशेखर सुब्रमण्यम - नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १९२० - पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक. १९२५ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक. १९५४ - प्राची चिकटे, बाल साहित्यिक. १९५९ - प्रिया तेंडुलकर. अभिनेत्री आणि मराठी कथालेखिका. 💥 मृत्यू :- १९३४ - विश्वनाथ कार, उडिया लेखक व समाजसुधारक. १८९६ मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे नियतकालिक काढले. १९९५- बेबी नाझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री. २००६- श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यात प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांची गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एम. जे. अकबर यांचा राजीनामा स्वीकारला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : शिवसेनेला लक्ष्य करत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *उत्तर आर्यलडच्या ५६ वर्षीय लेखिका अँना बर्न्स यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/GElarZQ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा* https://www.deshdoot.com/dussehra-vijayadashami-special-article-nagorao-yevatikar-breaking-news/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्रीपांडूरंगशास्री आठवले (दादाजी)* आज स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम वंदनीय स्व.पांडुरंगशास्त्रीजी आठवले तथा प.पु.दादाजी यांचा जन्मदिन . . . other is not other ,other is my devine brother all the brotherhood under the fatherhood of god देवाचे प्रेम शाश्वत भाषेत समजावले.त्रिकाल संध्या मधुन देवाविषयीची कृतज्ञता . . .सकाळी झोपेतुन उठवतो सकल मानवाला स्मृतिदान(आठवण) देतो.कोणतेही अन्न खा त्यांचे रक्त बनवतो व त्यातून माणसाला शक्ती देतो म्हणून भगवंताचे दुसरे मोठे देणे म्हणजे शक्ती दान.रात्री झोपल्यानंतर माणसाच्या डोक्यातले सर्व टेन्शन्स काढून त्यांना शांती प्रदान करतो आणि म्हणून भगवंताचे तिसरे मोठे देणे म्हणजे शांतीदान . . निदान या तिनही कारणासाठी तरी देवाचे मनापासुन आभार माना समजावले.कोळी बांधवांमध्ये अस्मिता निर्माण करून आगरि वागरी सागरी या सर्व बांधवांना भावाप्रमाणे प्रेम दिले आणि त्यांच्यामधले व्यसन दुर केली . जागतिक धर्मपरिषदेमध्ये यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर प्रत्येक माणसाला श्रीमद भगवत गीता हा धर्मग्रंथ नसून तो जीवनग्रंथ कसा आहे तो unto the last man पर्यंत पोहचवला.शरीरातील रक्ताचा थेंब न थेंब श्वासाचा प्रत्येक श्वास हा अखंड मानवजातीच्या विकासाकरता ज्यांनी खर्च केला . तू अमृतस्य पुत्र आहेस तू भगवंताचा पुत्र आहे तू दीन नाही तु लाचार नाही तुझ्या मध्ये सुद्धा तेजस्विता तत्परता आणि तन्मयता आहे .तू नचिकेता चा वारस आहे .तू आदर्श ऋषींची संतान आहेस. म्हणून दिन दुबळा समजू नको .लाचार समजून नको .अशी खुमारि माणसा मध्ये भरली .माणसाला माणसाचे नाते समजावले. एकमेकाद्वितीय दुसऱ्याला दुसऱ्याची गरज का हा आदरभाव उभा केला. परकेपणा काढुन माणसांमध्ये आपलेपणा भरला . म्हणूनच अरब अमिरातितिल मुस्लिम धर्मगुरू असो. .वा ख्रिश्चन धर्मगुरू पोप ज्यांच्या जाण्याने दुःखि झाले . . अशा महामानवाला माझे वंदन. तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात सारे जीवांच्या चिंता या लोपती क्षणात. असे म्हणत लाखो स्वाध्यायी आज दादांचा वाढदिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करत आहेत. दादाजी तुम्हाला कृतज्ञतापूर्वक वंदन 🏻संकलन : राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला ?* डॉ. रेने लिनेक *२) भूकंपाची तीव्रता मोजणार्या उपकरणाला काय म्हणतात ?* भूकंपमापी *३) जगातील पहिले तिकट कोठे छापले गेले ?* इंग्लंड *४) 'बहुरूपी' या पुस्तकाचे लेखक कोण ?* चिंतामणराव कोल्हटकर *५) महाराष्ट्रातील प्रमुख लाकूड व्यापार केंद्र कोठे आहे ?* परतवाडा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● निलेश अतकूरकर ● योगेश्वर कंदकूरते ● श्रीनिवास बेंकट ● विशाल शेपाळकर ● अनिरुद्ध कोल्हाटकर ● लतिका चौधरी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••• *भावना* दरवर्षी रावण जाळतो ती वृत्ती जळाली नाही प्रतिकृती पेक्षा वृत्ती जळावी ही गोष्ट कळाली नाही रावणाच्या प्रतिकृती पेक्षा ती वृत्ती जळाली पाहिजे सण समारंभा मागची भावना कळाली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 41* *यह जग कोठी काठ की,* *चहुं दिश लागी आग* *भीतर रहै सो जलि मुअै,* *साधू उबरै भाग।* अर्थ हे मायावी जग यह (मोह) लाकडापासून बनवलेल्या महालासारखे आहे. ज्याच्या चारही दिशांनी षड्विकारांच्या ज्वाला उठत आहेत. त्या इतक्या प्रबळ आहेत की, त्या महालात वावरणारे प्राणी न दिसणार्या आगीत व सतत धुमसणार्या धुरात कोंडी होवूनच मरत असतो. मात्र साधू (सज्जन) अशा विकारी ज्वालांपासून अलिप्त असतात.सामान्यजण विकारांना आहारी जातात तर असामान्य माणसं विकारारांपासून अलिप्त म्हणजे अविकारी असतात. विकार क्रोध उत्पन्न करतो. क्रोधाचं कामंच असतं मधल्या मध्ये जाळून मारणं. क्रोध आगीचं प्रतिक तर स्थिरवृत्ती शांतीचे निदर्शक असते. साधूस सर्व क्रोध-विकारांपासून कोसो दूर असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजळणी - Revision* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरा संन्यासी कोण ?* एकदा एक तरुण, संन्यासीकडे गेला आणि म्हणाला, ‘मी सर्व काही सोडून आलो आहे, माझे मन आता संसारात रमत नाही. मला हा संसार नकोसा झाला आहे. काही तरी उपाय सांगा.’ सन्यासी त्या तरुणाला म्हणाले, ‘तू काही दिवस राजाकडे जा; त्याच्यासोबत राजवाड्यात राहा. तिथे तुला नक्कीच आत्मज्ञान मिळेल.’ साधूमहाराजांच्या या उपायावर तो तरुण संभ्रमात पडला, राजाकडे राहून आपला समस्या कशी दूर होईल असा प्रश्न त्याला पडला. तरुणाची संभ्रमावस्था पाहून साधूमहाराज म्हणाले, ‘तू राजमहालात जाण्याआधीच राजाला तुझ्याबद्दल सर्व माहिती मिळाली असेल.’ संन्यासी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तरुण राजवाड्यात गेला. सगळीकडे सुख समृद्धी असूनही त्या तरुणाचे मन तेथे रमले नाही. पण साधूमहाराजांनी त्याला दिलेल्या सुचनेमुळे त्याला तेथे जबरदस्तीने राहवे लागत होते. एकेदिवशी राजा जवळच असलेल्या नदीत स्नानासाठी उतरला. या तरुणाने देखील स्नान करण्यासाठी जायचे म्हणून आपला अंगरखा काठावर काढून ठेवला होता. तेवढ्यात राजमहालातून आवाज आला, आग लागली… आग लागली… काही क्षणात साऱ्या परिसरात धूर पसरू लागाला. तरुण लगेच पाण्यातून बाहेर आला आणि आपला अंगरखा उचलून जीव वाचवण्यासाठी पळणार, इतक्यात त्याला राजा अगदी निश्चिंत उभा असल्याचे लक्षात आले. काही झालेच नसल्यासारखे भाव राजाच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावर तरुणाने राजला विचारले, ‘राजमहालात आग लागलेली असूनही तुम्ही शांत उभे आहात. असे का बरे?’ याप्रश्नावर राजा म्हणाला, ‘मी या राजमहालाला कधी माझा समजलोच नाही. मी जन्माला आलो नव्हतो तेव्हाही हा राजमहाल होता आणि माझ्या मृत्यूनंतरही तो असेल. पण तू कपड्यांसाठी धावलास. याचा अर्थ तुला तुझे मन अजूनही संसरात आहे. तुला एवढा मोह आहे, तर मग संसारात मन नाही असे का म्हणतोस.’ हे ऐकून तो तरुण राजाच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘मला समजले की संन्यासी महाराजांनी मला तुमच्याकडे का पाठवले. तुमच्याकडे सर्व काही असूनही त्यावर आपला हक्क तुम्ही मानत नाही, मोहावर विजय मिळवला आहे. आणि मी सर्व काही सोडून आल्याचा दावाकरून संसार त्याग करण्याची भाषा बोलत होतो, पण माझं मन अद्यापही संसारातल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकलेले आहे, मोह सुटलेला नाही. संसार करताना देखील मोह न ठेवता संन्यासी सारखे जीवन जगता येते आणि संकटातही स्थिर राहता येते, हे मला आज कळले *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment