✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• 📅 दि. 04/10/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय एकता दिन* *जागतिक प्राणी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५७ - सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले १९५८ - फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना 💥 जन्म :- १९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक 💥 मृत्यू :- १९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक. १९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी. १९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता. २००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत 7 हजार पंपांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली- रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी हजारो शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानात धडकले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथे महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेची स्थापना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ; केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बँक ऑफ महाराष्ट्र 50 शाखा बंद करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 40 टक्के ते 79 टक्के दिव्यांगांना 800 रुपये तर 80 टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधारकार्डचा इतिहास* https://www.deshdoot.com/nashik-news-29-september-adhar-card-day/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *केशवराव भोसले* केशवराव भोसले हे मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील एक अतिशय गुणी नट आणि उत्तम गायक होते. केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९0 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीवार्दाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९0८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सदर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार या नाटकातील केशवरावांची डेविडची भूमिका अविस्मरणीय आहे. संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= चंद्र आणि चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो. - कवी कालिदास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'वेलिंग वॉल' कोठे आहे ?* जेरुसलेम *२) 'एशियन ड्रामा'चे लेखक कोण ?* गुन्नार र्मदाल *३) स्वतंत्र दर्जा असणारे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे राष्ट्र कोणते ?* व्हॅटकिन *४) क्युबाची राजधानी कोणती ?* हवाना *५) फिलीपाईन्समधील प्रमुख नद्या कोणत्या ?* कागायान, पंपांगा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● संगीता भांडवले, उस्मानाबाद ● सुरेंद्र गादेकर, मुखेड ● विजय पळशीकर, नांदेड ● ओमप्रकाश येवतीवाड, धर्माबाद ● लक्ष्मण पंदोरे, कोपरगाव ● साईनाथ पोरडवार, कुंडलवाडी ● नितेश पांचाळ, नांदेड ● बालाजी इप्तेकार, धर्माबाद ● धनराज एच. शेट्टीगर, मुलकी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगंध* चंदनाचा सुगंध लपवल्याने लपत नाही कोण काय करणार ज्याला तो खपत नाही कितीही लपवला तरी सुगंध बाहेर येणारच चांगल्याचा कधी तरी गाजा वाजा होणारच शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 〰 ‼ *विचार धन* ‼ 〰 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 32* *पूत पियारौ पिता कू,* *गोहनी लागो धाई |* *लोभ मिथाई हाथि दे,* *अपन गयो भुलाई ||* अर्थ विधात्याला विसरून चालणार नाही. विश्वाचा हा कल्पनेबाहेरचा अनाकलनीय खटाटोप त्याच्पाकडून चालूच असतो. ठरल्या वेळी. ठरल्या काळी, त्या त्या क्रिया घडवून आणतो. दिवस-रात्र, ऋतू , उष्णता, प्रकाश, हवा आदि बाबीमुळे चराचराचं अस्तित्व आहे. म्हणून आपण आनंदानं जगत असतो. वरील सर्व बाबीप्रति कृतज्ञता म्हणून त्या ( विधाता) निसर्ग चालक शक्तिला आपण वंदन केले पाहिजे. वरील बाब महात्मा कबीर पुढील दृष्टांताद्वारे लक्षात आणून देतात. लहाण मुलाला वडिल प्रिय असतात, तो वडीलांकडे सतत धाव घेत असतो. वडिलांना आजूबाजुला जावू देत नाही. तेव्हा वडिल त्याला मिठाई आदि खावू देवून समजूत काढत असतात. मुलाला आनंदी ठेवतात. बाहेर गेले तरी बाहेरूनही त्याची काळजी घेत असतात. म्हणून माणसानंही केवळ गरजेच्यावेळीच , कठीण समयी विधात्याला न आठवता आनंदाच्या, सुखा-समाधानाच्या काळात निसर्गाला ओरबाडताना त्याला सजवलंही पाहिजे. हे विसरता कामा नये. केवळ नाम जप नाही तर कृती केली पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या अंगी असलेली कोणतीही कला पहिल्यांदा आपल्याला विकसित करावी लागेल आणि ती विकसित केल्याशिवाय जगासमोर सादर करता येत नाही.कारण ज्या कलेमुळे तुम्ही जगातील लोकांचे एक तर मनोरंजन करणार आहात, तुम्ही लोकांना नवे काहीतरी ज्ञान देणार आहात, त्यांच्यातील दडलेल्या सुप्त कलागुणांना जागे करणार आहात, तुम्ही सादर करणा-या कलेमुळे त्यांना प्रोत्साहित करणार आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या तील अंगभूत असणा-या कलाप्रतिभामुळे त्यांच्यावर इतरांपेक्षा वेगळी छाप पाडून आपली वेगळी ओळख निर्माण करुन देणार असल्यामुळे तुम्ही चांगल्या दृष्टीने लोकांच्या चर्चेत अथवा प्रसिध्दीस येणार आहात.याचे सारे श्रेय तुमच्यातील असणा-या कलेमुळेच ना ! तुमच्या अंगी असणारी कोणतीही कलाप्रतिभा असेल तर तिला प्रोत्साहित करा म्हणजे तुम्ही जगासमोर नेहमी आदर्श म्हणून नावलौकिकास पात्र व्हाल आणि ज्यामुळे तुमच्या कलेचे अनुकरण करून तेही चांगल्या समाजनिर्मितीचे कार्य करतील.नाही तर आपल्या अंगी असलेल्या कला प्रतिभेला प्रोत्साहित केले नाही तर आपल्या हातून कोणतेच कार्य होणार नाही याची खंत नेहमीसाठी लागून राहिल.यापेक्षा आपले कोणते दुर्भाग्य असेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣🌅🛣🌅🛣🌅🛣🌅🛣🌅 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रगट - Revealed* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= समाधानी वृत्तीने जगावे एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या. *तात्पर्यः समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.थोडे मिळाले तरी त्यात समाधान मानले पाहिजे.अती हाव कामाची नसते* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. •••••••••••••••••••••••••••••••••••••
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment