✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/10/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९८६ - युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठवरील सर्व निर्बंध काढून टाकले 💥 जन्म :- १८७४ - कवी भा. रा. तांबे १९२० - के.आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती १९२३ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक. १९४७ - समाजसेवक डॉ. विकास आमटे १९५४ - पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल १९८४ - इरफान पठाण, भारताचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १६०५ - तिसरा मोगल सम्राट अकबर १७९५ - सवाई पेशवा माधवराव १९८७ - क्रिकेटपटू व समालोचक विजय मर्चंट २००१ - अभिनेता प्रदीप कुमार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेराला अटक; पुणे पोलिसांची मुंबईत कारवाई * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशातील सर्वाधिक श्रीमंत महाराष्ट्रात, अब्जाधिशांच्या यादीत 4 चौथ्या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचे नाव प्रथम स्थानावर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केली १५० उमेदवारांची यादी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याची मराठा क्रांति ठोक मोर्चाची मागणी. अन्यथा २५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा. १ डिसेंबरपासून आंदोलन तीव्र केले जाईल, समन्वयकांची माहिती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तिरुपती बालाजी मंदिरात येत्या 1 नोव्हेंबरपासून प्लास्टिक वापरावर बंदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या पूजा धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची केली कमाई, सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत भारताला पदक.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे https://sharechat.com/post/JZnQpg5 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाईल क्रांती आणि जीवन* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/10/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवी भा. रा. तांबे* भास्कर रामचंद्र तांबे अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी होते. हिंदी काव्य, उर्दू नज्म आणि गजल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. त्यांची समग्र कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७३ रोजी ग्वाल्हेर संस्थानातील झाशीजवळच्या मुंगावली या गावी झाला. तांबे यांचे मूळ गाव कोकणातील खेटकुई. तांबे यांनी आपली पहिली कविता शाळेत असतानाच लिहिली. चिपळूणकर, आगरकर यांच्या लेखनाचा अभ्यास त्यांनी केला. शिवाय बायरन, शेले, किट्स, वर्डस्वर्थ, टेनिसन, ब्राऊनिंग या इंग्रजी कवींच्या कवितांचाही त्यांनी अभ्यास केला. कायद्याचा अभ्यास हे निमित्त झाले आणि त्यांनी उर्दू भाषाही शिकून घेतली. ग्वाल्हेर संस्थानच्या शिक्षणखात्यात त्यांनी अकरा वर्षे नोकरी केली. ग्वाल्हेर दरबारने त्यांना राजकवी हा किताब दिला. त्यांच्या जवळजवळ अडीचशे कविता उपलब्ध आहेत. गायनातील नोटेशन्सचा त्यांनी अभ्यास केला होता. खंडकाव्य, स्फुटकाव्य, लेखन, भाषणे, अभिप्राय, प्रस्तावना, नाटक अशी त्यांची विपुल आणि विविधांगी साहित्यसंपदा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ?* ल्योन, फ्रान्स *२) जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण ?* ऋषभ देव *३) र्जमनीचा हुकुमशहा हिटलरची संघटना कोणती ?* नाझी संघटना *४) इराणची राजधानी कोणती ?* तेहरान *५) चौथ्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण ?* पी. एन. सिंघल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● दगडू गारकर, लातूर ● ओम माळवतकर ● मोहिनी रावजीवार ● प्रतीक बादेवाड, मुखेड ● श्रीमती छाया माळवाळ, खुलताबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बेगड* बेगडाचा रंग असा किती काळ रहातो काही दिवसातच तो पांढरा होऊन जातो चमकण्या पुरतेच ते लोकांना छान दिसते रंग गेला की बेगड खुपच घाण दिसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••●‼ *विचार धन* ‼●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. वयाचा काही काळ त्यांना संस्कार, संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर एका विशिष्ट वयानंतर त्याला 'कर्तव्य' ही संज्ञा प्राप्त होते. मग कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी केले जाणारे काम हेही कर्तव्यात मोडते. 'कामात देव शोधा' हे जीवनाचे खरे तत्वज्ञान मानले पाहिजे. "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो।" हे ज्याला कळले, तोच पुढे जातो.* *कामाशी साधली जाणारी एकरूपता, त्यातून दिसणारी तादात्म्यता हाही 'उपासना' मार्गच आहे.* *जो करी कर्म अहेतु निरंतर,* *देव तयास मिळो न मिळो रे।* *यातून कवीला जे सांगायच आहे, त्याचे चिंतन करूया. त्यासाठी 'मोहाच्या फुलबागा' दूर सारायला हव्यात. त्यासाठी मनाची अवस्था कोती असून चालणार नाही. आकाशाएवढे मन झाले, तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील. जन्मलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावे लागते. कुणीही त्यातून सुटत नाही. हे टाळून पुढे जाऊया, मनाचा विकास साधूया....* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 46* बार-बार तोसों कहा, सुन रे मनुवा नीच। बनजारे का बैल ज्यों, पैडा माही मीच। अर्थ : साधू व सज्जन मानवातील वैगुण्य नाहिसं व्हावं. म्हणून सतत उपदेश करीत असतात. परंतु बहुतांश माणसांच्या स्वभावातील मुळ वाकडेपण जाता जात नाही. कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे ते पुन्हा-पुन्हा मुळ स्वभाव धारण करीत असतं. अशा निर्लज्ज प्रवृत्तींना उद्देशून महात्मा कबीर म्हणतात , हे निर्लज्ज माणसा ! सज्जनांचे म्हनणे ऐक ! त्यात तुझी भलाई आहे. वारंवार सांगतो आहे. परंतु तुझ्या वर्तनात बदल का होत नाही ? जीवनातला निखळ आनंद घ्यायचा सोडून तू मोहांच्या मागे का धावत आहेस ? पतंगाला दिव्याचा मोह होतो. तिथं गेल्यावर आच (आग) लागून शरीराची हानी होणार आहे. हे माहित असूनही त्याने मोहांध होवून दिव्यावर धाव घेत स्वतःचे पंख जाळून घ्यावेत अन पंखहिन तडफड करीत राहावे. तशी तुझी गत झाली आहे. फिरत्या व्यापार्याच्या गोण्या वाहणार्या बैलाला खायला प्यायला चांगलं भेटत असलं तरी तरी त्याला रानवार्याचा मुक्त आस्वाद घेता येत नाही. डिरक्या मारून मनसोक्त चौखूर उधळण्याची आपल्या भाईबंदासोबत मजा चाखता येत नाही. कंटाळवाणं, निरस व भारवाही जगणं जगता जगता-जगता एक दिवस भटकंतीच्या मार्गावरच आपल्या जीवनाचा नकळत शेवट होऊन जातो. जन्माला आल्याच्या अन जीवन जगल्याच्या कोणत्याच पाऊलखुणा मागे न सोडता भूईला भार होऊन जगण्याची खंत मनी घेवून एक दिवस अस्तित्वहीन होवून जावं लागतं. तेव्हा आतापासून तुझ्या हाती असणार्या वेळेचा सदुपयोग करून जीवन सार्थक करून घ्यावंस असा संतोपदेश असतो . शेवटी रडत-रडत जगायचं का धडपडत उभं राहायचं हा सर्वस्वी तुझा तुच निर्णय घ्यायचा आहे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपली ओळख इतरांपेक्षा वेगळी करून द्यायची असेल तर आपल्याला इतरांपेक्षा वेगळे काहीतरी चांगले करावे लागेल आणि चांगले काही नवीन करण्यासाठी आपल्यातल्या कल्पकतेला चालना दिली पाहिजे.तसेच इतरांमध्ये जे नाही ते आपल्याला वेगळे सिद्ध करून दाखवावे लागेल.आपल्यातील असलेल्या कलेकडे एकदा का आकृष्ट झाले की,मग आपली ओळख लोकांना स्वत: होऊन द्यायची गरज नाही. लोक आपोआपच आपल्याला जगापेक्षा वेगळे काहीतरी आहे म्हणून ओळखायला लागतील. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌟🌙🌟🌙🌟🌙🌟🌙🌟🌙 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाद - sounds* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिबिंब* फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिने आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले. मौल्यवान अशा कंठ्यामध्ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्याने ते खाण्याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्या लक्षात एक गोष्ट आली की आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या.'' राजा म्हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घ्या. जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊ अशी घोषणाही त्याने त्यावेळी केली. अर्धे राज्य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्याच्या नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्य बक्षीसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्या मनातही लोभ निर्माण झाला. त्यानेही अर्धे राज्य मिळविण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली. पण हार पुन्हा गायब झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्याच हातात येत नव्हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या राज्याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्या पाण्याच्या वास सहन न झाल्याने पटकन पाण्यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले हे राजाच्या कानावर गेले व त्याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल. त्यासाठी राजाही तेथे आला व त्याने आपली राजवस्त्रे उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली. त्याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्या घाणेरड्या पाण्यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्यात पडला आहे म्हणून सर्वजण पाण्यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्याना विचारले काय झाले? संत त्यावर म्हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्ही ज्या हाराकडे पाहून पाण्यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्यात दिसते आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधत आहात.'' लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक शरमिंदा झाले. तात्पर्यः मानवी जीवनाची पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झाली आहे. जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्वास्थ्य हे शोधण्यापेक्षा आपण त्याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्यापेक्षा आपण कितीतरी गोष्टी गमावित आहोत. खरंय ना ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment