✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९३६ - हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला १९४७ - जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली 💥 जन्म :- १२७० - संत नामदेव महाराज १८९० - गणेश शंकर विद्यार्थी, भारतीय पत्रकार व भारतीय स्वातंत्र्यसैनिक १९३७ - संगीतकार हृदयनाथ मंगेशकर १९५० - तिरुमलै श्रीनिवासन, भारतीय क्रिकेट खेळाडू १९७० - रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री १९८५ - असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्री १९९१ - अमाला पॉल, दक्षिण भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९९१ - स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सूरत येथील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी यंदा दिवाळी भेट म्हणून त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना दिले सहाशे कार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *बोट दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार, फास्ट ट्रॅक चौकशी केली जाणार- गृहराज्यमंत्री दीपक केसरकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जायकवाडी धरणात 26 ते 31ऑक्टोबरदरम्यान पाणी सोडणार; कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांचे लेखी आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निवडणुकांसाठी तिसरं मूल दत्तक दिलं तरीही 'उमेदवारी बाद अन् पद धोक्यात' ओडिशातील एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वॅन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित तीन वन डेसाठी भारतीय संघ जाहीर, जस्प्रीत बुमरा व भुवनेश्वर कुमार यांचे पुनरागमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे https://sharechat.com/post/xp8bKlX *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मजबूत मन म्हणजेच यश* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/12/%e0%a4%ae%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हृदयनाथ मंगेशकर* हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत. त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्‌गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत. त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पारादीप बंदर कोठे आहे ?* ओडिशा *२) राज्यसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत ?* उत्तर प्रदेश *३) कंबोडियाची राजधानी कोणती ?* नॉमपेन्ह *४) राष्ट्रपती कोणत्या कलमाद्वारे वटहुकूम काढतात ?* कलम १२३ *५) 'कोलाज' या पुस्तकाच्या लेखिका कोण ?* शरीष पै *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संगीता संतोष कंदेवार - नामेवार ●  माधव लिंबाजीराव गव्हाणे ●  अविनाश थोरात ●  नवनाथ शिंदे ●  गणेश पालदेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शब्द* शब्दांना ह्रदयाच्या तराजूत तोललं पाहिजे विचार करून माणसाने कधीही बोललं पाहिजे विचार करून बोलतात ज्यांना कळते शब्दाचे मोल कायम लक्षात रहातात आपल्या माणसाचे बोल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचारधन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बायबलमध्ये एक महान बोधकथा आहे. एका अविवाहित स्त्रीच्या हातून घडलेल्या चुकीचा आपल्या सोयीचा अर्थ लावून नादान लोक तिला दगड-धोंड्यांनी ठेचून मारायला धावतात. ती जीवाच्या आकांताने पळत सुटते, खाली कोसळते तेव्हा तिच्यासमोर महाकारूणिक प्रभू येशू उभा असतो. ती त्यांचे पाय धरून आपले प्राण वाचविण्यासाठी गयावया करते. प्रभू तिला अभय देत उभं करतात आणि लोकांना विचारतात 'लोक हो., आपण हिच्या जीवावर का उठलात?' लोकातून क्रोधाने तप्त लाल झालेली वाक्य उत्तरतात 'हि पापीण आहे. हिने फार मोठे पाप केले आहे. हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, पुन्हा घोळका ओरडतो..मारा..मारा धोंड्यांनी मारा हिला..* *तितक्यात प्रभू पुन्हा धीरगंभीर अन् शांत मुद्रेने त्यांना म्हणतात 'बाबांनो, हिने खरोखरच पाप केले असेल तर तुम्ही मानता त्या कायद्याप्रमाणे ती दोषी आहे आणि दोषीला तुम्हीच शिक्षा देणारे असाल तर पहिला दगड फक्त त्यानेच उचलावा, ज्याने आयुष्यात चुकूनसुद्धा एकही पाप केले नाही. असा प्रस्ताव मांडताच सर्वजण परस्परांच्या नजरा चुकवत एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या हातातील दगडांची पकड सैल झाली. सर्वांच्या हातातले दगड धरतीवर लोळत येशूला शरण गेले. कारण त्या लोंढ्यात एकही निष्पाप नव्हता. प्रत्येकाचे हातून लहान-मोठी पापे झालेलीच होती. ते सर्व माना खाली घालून पराभूतागत पाठमोरे झाले. त्या स्त्रीचे प्राण वाचले. तिने तिची चूक मान्य केली, ती प्रभुभक्त झाली...* *"लोकांच्या हातुन गळून पडलेले दगड आजही पूर्ण निष्कलंक माणसाच्या हाताच्या स्पर्शाची वाट पहात तिथेच पडून आहेत..पण निष्पाप हात त्यांना स्पर्शायला पुढे धजले नाहीत."* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 45* धर्म किये धन ना घटे, नदी न घट्ट नीर । अपनी आखों देखिले, यों कथि कहहिं कबीर । अर्थ धर्मार्थ दान केल्याने संपत्ती घटत नाही. मात्र ते दान डोळसपणाने केलेले असावे. धर्म मानवता व सहिष्णूवृत्ती जपणारा असावा. न्याय, निती विवेकाचं अधिष्ठाण असणारा असावा. त्यात सर्वांप्रति कैवल्यभाव असावा. अंधश्रद्धा व वाईट रूढी-परंपरांना तेथे वाव असता कामा नये, अशावेळी परोपकारार्थ सांपत्तिक, वैचाचारिक, श्रमिक दान व सेवा व्हायलाच हवी. त्यातून समाजाला चालना, प्रेरणा निळते, नदीकडे पहा ना ! ती सदैव वाहत राहाते. तहानलेल्या जीवांना तृप्त करते. आजूबाजूच्या परीसराला सिंचित करून सृष्टी सौंदर्य खुलवित असते. वसुंधरेच रूपही बदलत असते. पशू पक्षी सार्‍यांचं जीवन खुलवित असते.त्यामुळे काय तिचे जल नाहिसे होत असते का ? उलट ती नदीमाय, जीवनदियिनी, कामिनी, अशी संबोधनं त्या त्या भागात धारण करीत असते. त्यात नदीच्या जीवनाची सार्थकता व साफल्य सामावलेलं असतं. मानसानंही नदीसारखंच सत्पात्री दान करावयाला शिकायला हवे. खर्‍या धर्मानं वागून तर बघा. कसा जीवनाचा परिमल सर्वत्र दरवळायळा लागतो. लोकादर करणारा राम, न्यायाची बाजू घेणारा कृष्ण ही अजरामर झालेली पात्रं. बुद्धांनी कारूण्याचं दान केलं ते महाकारूणी ठरले. राजा अशोकानं व हर्षानं संपत्तीचा जनतेच्या भल्यासाठी डोळसपणे वापर केला. ती साम्राज्यं सुवर्णकाळ म्हणून ओळखली जातात. ज्ञानदेवांनी संस्कृतातलं बंदिस्त ज्ञान प्राकृतात आणलं. तुकोबांच्या जीवनविषयक सुलभ तत्वज्ञानानं पाचव्या वेदाची जागा घेतली. शिवबांनी युक्तीला कर्तृत्वाचं दान देत अन्यायी राज सत्तांना नामशेष करीत सामाजिक बुरसट रुढी-परंंपरांना छेद देत रयतेचं शिवराज्य निर्माण केलं. ह्या सर्व जीवनदानाच्याच सुंदर अभिव्यक्तीची फलश्रुतीच नव्हे काय ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याला हुशारीचा, ज्ञानाचा आणि मीपणाचा अहंकार आहे त्याला पशूपातळीच्याच अवस्थेतला आहे असे समजावे.कारण तो ज्ञान असून चांगल्यासाठी उपयोगात आणत नाही, ज्ञान आहे, हुशारी आहे पण तो जर फक्त मी पणाचा टेंभा मिरवत असेल तर हा मुर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल. जर हे सर्वकाही स्वत:च्या जीवनात मिळवलेल्या ज्ञानाच्याआधारे चांगला बदल घडवून आणत असेल आणि जे काही ज्ञान लोकांपर्यंत लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो खरा निगर्वी व परोपकारी माणूस समजावे. अशी माणसे बोटावर मोजण्याइतकी कमी प्रमाणात पहायला मिळतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती - Great* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती आईची* एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. '' तात्‍पर्य :- आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment