✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/10/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय मुलगी दिन.* 💥 ठळक घडामोडी :- १७२७: दुसरा जॉर्ज व कॅरोलीन, अॅन्सबॅक यांचा राज्यअभिषेक १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी चे उद्घाटन १८९०: डॉटर्स ऑफ द अमेरिकन रिव्होल्यूशन संस्थेची वॉशिंग्टन डी.सी. येथे स्थापना 💥 जन्म :- १९०२: जयप्रकाश नारायण - भारतीय राजकारणी १९०५: फ्रेड ट्रम्प - अमेरिकन उद्योगपती १९१६: नानाजी देशमुख - भारतीय सामाजिक कार्यकर्ते १९४२: अमिताभ बच्चन - भारतीय अभिनेता १९६५: रोनित रॉय - भारतीय अभिनेता 💥 मृत्यू :- १९६८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दर आठवड्याला दुष्काळग्रस्त भागाची करणार पाहणी ; मंत्रीदेखील घेणार परिस्थितीचा आढावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तितली चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उद्या ओडिशातील शाळा, महाविद्यालयं, अंगणवाड्या राहणार बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जेष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून करण्यात आली नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सौदी अरेबिया भारताच्या मदतीला ; अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार, अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधांमुळे चिंतेत असलेल्या भारताला दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक रामप्रहरमध्ये प्रकाशित लेख *" जीवन सुंदर आहे "* http://ramprahar.com/wp-content/uploads/2018/10/Ram-Prahar-11-October-2018-Page-4.jpg लेख वाचून आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. त्यांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. ते आधुनिक काळातील महान संत होते. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'सनी डेज' या पुस्तकाचे लेखक कोण ?* सुनिल गावसकर *२) १९९0 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धा कोठे पार पडल्या ?* बीजिंग *३) पश्चिम बंगालमधील प्रमुख बंदर कोणते ?* कोलकाता *४) भारताची उत्तर-दक्षिण लांबी किती आहे ?* ३,२१४ कि.मी. *५) एक्स रे चा (क्ष किरणांचा) शोध कोणी लावला ?* विल्यम व्हॉन रॉन्टेजन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● प्रवीण वाघमारे ● बाबाराव पाटील कदम ● रवी सितावार ● अजय वाघमारे ● सुमित बोधने ● दिनेश करपे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *माणसं* माणसंच माणसाला जेव्हा पाण्यात पहातील अशा माणसाकडून काय अपेक्षा रहातील माणसाने माणसाची किंमत केली पाहिजे माणसानेच माणसाला हिंमत दिली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 37* *कबीर कूता राम का,* *मुटिया मेरा नाऊ |* *गले राम की जेवड़ी,* *जित खींचे तित जाऊं ||* अर्थ महात्मा कबीर म्हणतात की, मी राम नामाचा सतत जप करतो म्हणून काही जण सततच्या उच्चारामुळे रामाचा कुत्रा म्हणून हिणवतात खाजवतात.. होय मी रामाचा कुत्रा आहे. राम नामाच्या मोत्यांची माला माझ्या गळ्यात मी धारण केलेली आहे, त्यामुळे माझा गळा कसा शोभिवंत दिसतो आहे. मी तिकडे जात असतो. मला गळ्यात घातलेली ही साखळी जिकडे ओढून नेईल. अशा या राम बंधनाच्या प्रेमात जगताना खूप मजा येते. रामाचा अंगीकार केवळ बोलण्यापुरताच नाही तर राम जगण्याचा भाग बनलेला आहे. रामाचा अंगीकार करताना सत्य मार्ग , एकवचनीपणा थोरा मोठ्यांचा सन्मान या बाबी जगताना आपोआपच प्रवृत्तीचा भाग बणून जात आहेत . त्यामुळे जगण्याला एकप्रकारची खुमारी चढते आहे. ती मला हवीहवीशी आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्याने जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपल्या मनाचा तोल जाऊ देऊ नये.परिस्थिती ही आपल्याला परीक्षा घेण्यासाठीच आपल्यासमोर उभी राहते आणि ती आपल्याला द्यावी लागते.तेव्हा आपण शांतवृत्तीने, संयमाने, विचारपूर्वकदृष्टीने परिस्थिती कशी आहे त्यास अनुसरून ती परीक्षा द्यायला सामोरे गेले पाहिजे तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो.जर आपण माघार घेतली तर आपल्या जीवनाला परिपूर्णता ही प्राप्त होऊ शकत नाही.परिस्थिती कोणतीही असो ती एक आपली खरी परीक्षाच आहे. ती दिल्याशिवाय आपल्याला कसे समजेल ?समजण्याआधी आपण तत्पर राहायला शिकले तरच यशस्वी होता येते. अन्यथा परिस्थितीसमोर हार मानून दुःखमय, यातनामय जीवन जगण्यासाठी तयार राहावे लागेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥙🍃🥙🍃🥙🍃🥙🍃🥙🍃🥙 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिस्थिती - situation* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चढ आणि उतार* आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.' बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते. थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले. त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...' *तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment