✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/10/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ : भारत आणि चीनदरम्यान सीमा संरक्षण सहकार्यविषयक करारावर स्वाक्षर्‍या 💥 जन्म :- १७७८: कित्तूरची राणी चेन्नम्मा १९२४ : संगीतकार, गायक, नट पं. राम मराठे १९४० : ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले १९४५ : अभिनेता, दिग्दर्शक देवेन वर्मा १९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार १९७८ : इंग्लिश क्रिकेटपटू स्टीव हार्मसन 💥 मृत्यू :- १९१५ : इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नाशिक : अहिंसेचा अर्थ खूप व्यापक असून तो समजून घेण्याची गरज विश्वाला आहे - मांगीतुंगी येथील विश्व शांती संमेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह आज राज्याच्या दौऱ्यावर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा तिढा सुटला असून यावर्षी कर्मचाऱ्यांना 15 हजार 100 बोनस जाहीर - रवी राव, म्युनिसिपल लेबरचे कार्याध्यक्ष यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये मिळणार दिवाळी भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी मुंबई : शासनाने 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास 26 नोव्हेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल - मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समितीचा निर्णय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागला भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *फरिदाबाद: येथे झालेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या ५ सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० विकेट्स राखून केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip खालील ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/X6MvpAv *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपघात - जीवनाला एक वेगळेच वळण देऊन जातो.* https://nasayeotikar.wordpress.com/2018/10/20/%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देवेन वर्मा* देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी कच्छ गुजरात येथे झाला. मात्र त्यांचे शिक्षण आणि बालपण पुण्यात झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र तसेच समाजशास्त्रात पदवी घेतली. अभिनयात आवड असल्याने त्यांनी करिअर म्हणून हे क्षेत्र निवडले आणि यात ते हास्य कलाकार म्हणून बर्‍यापैकी नावारूपासही आले. बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट विनोदवीरांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांनी अनेक चित्रपट केलेत त्यापैकी चोरी मेरा काम, चोर के घर चोरी आणि अंगूर या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. गुलजार, हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी या दिग्गज दिग्दर्शकांचे ते आवडते कलाकार होते. देवेन वर्मा यांचा विवाह अशोक कुमार यांची कन्या रूपा गांगुली यांच्याशी झाला. अनेक हिंदी चित्रपटांसह त्यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटातही काम केले. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले होते. देवेन वर्मा २ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकार आणि किडनी निकामी झाल्याने इहलोक सोडून गेले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) राजस्थानात अणुशक्ती केंद्र कोठे आहे ?* कोटा *२) महंमद गझनीने कनौजवर कधी चढाई केली ?* इ. स. १०११ *३) मेक्सिकोची राजधानी कोणती ?* मेक्सिको सिटी *४) 'मुद्राराक्षस' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* विशाखादत्त *५) 'मुस्लिम लीग'ची स्थापना कधी झाली ?* १९०६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  प्रवीण राखेवार, नांदेड ●  एकनाथ आव्हाड, मुंबई ●  स्वरदा खेडेकर गावडे ●  पंकज बदाने ●  प्रिया टेकाळे, माहूर ●  अभिषेक नागूल, नांदेड ●  नरेंद्ररेड्डी चाकरोड ●  शिवकुमार बुट्टे ●  ईश्वर डहाळे ●  व्यंकटेश यमेवार ●  श्याम जाधव ●  साई पाटील शहादत्त *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छेद* ज्या ताटात खायचं त्यात छेद करतात रोज सोबत राहून दोघात भेद धरतात ज्या ताटात खाता त्यात छेद करायचा नसतो चार घास खातो त्याचा उपकार स्मरायचा असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पावसाळा म्हणजे सृष्टीत चौफेर कसे चैतन्य भरलेलं असतं. नानाप्रकारचे चैतन्यकिडे, हिरव्या हिरव्या झुडपांमध्ये, नाजुक नक्षीदार वेलींवरती कसे मस्त रमलेले दिसतात. पानांआड लपून एकसारखा झीणझणझण आवाज हा ऐकायला येतो. पण एक दृष्टीभेट मात्र अलभ्य. एका वेलीच्या पानावर बघा कशी अंडी घातली होती. त्या अंड्यातल्या जीवाला मायेची ऊब देत एक मादी बसली होती. पण तेवढ्यात एका पक्षानं अचूक नेम धरला...बघता बघता किटक मादी बिचारी आकस्मिकपणे आपल्या न जन्मलेल्या जीवांना सोडून गेली. जीव बिचारे अनाथ पोरके झाले. पण त्यांना आधार होता तो हिरव्यागार पानांचा.* *मानवेतर प्राण्यांमध्ये जन्ममृत्यूचा हा खेळ असा आकस्मिक घडत असतो. हिरव्या पानांच्या उबदार पाळण्यात अंडी सुरक्षित होती. त्या अंड्यांतून जीव जन्माला येईल. जगण्याची एकाकी धडपड त्या जीवाची सुरू होईल. अल्पकाळ का होईना आईच्या प्रेमाची उब त्या अंड्यातल्या जीवाला मिळाली. कदाचित हीच निसर्गाची शिकवण असावी. एकटंच यायचं या जगात. जगायचा संघर्षही एकट्यानेच करायचा. त्या जगण्याचा भरभरून आनंदही घ्यायचा आणि एकट्यानेच परतायचं. हेच खरं जीवनाचं सूत्र.* *कवीने म्हटल्यानुसार या बिनभिंतीच्या शाळेत, अर्थात निसर्गात जशी वैविध्यपूर्ण समृद्ध उधळण असते, तशी मैत्रीची भावना देणारी ऊबही मिळते आणि गुरूसारखी शिकवणसुद्धा. त्यामुळे हेच खरं जगण्याचं सूत्र, असं म्हणणं संयुक्तिक नाही का ?* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 43* देह खेह होय जायगी, कौन कहेगा देह । निश्चय कर उपकार ही, जीवन का फन येह।” अर्थ – परोपकार व सद्वर्तन विषयक मार्गदर्शन करताना महात्मा कबीर म्हणतात की, जीवंत असेतो सर्व प्राण्यांना किंमत आहे. एकदा का शरीरातलं चैतन्प नाहीसं झालं की देहाचं मूल्य संपलं. मग तो मानव प्राणी जरी असला तरी देह मातीलाच अर्पण होणार आहे. रांत्रदिन संपत्तीत लोळणारी व्यक्ती असो की हलाखीत जीवन जगणारा गरीब असो. सर्वांच्या जीवनाचं अंतीम सत्य मृत्यू आहे. आईच्या उदरी वाढणार्‍या गर्भाचा जन्म कधी होणार? हे सांगता येतं. मृत्यू कधी होणार? हे सांगणारी यंत्रणा अद्याप तरी अस्तित्वात आलेली नाही. तो कोणत्याक्षणी ओढवेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे जीवन फुलवणं , जीवनाची सार्थकता वाढवणं हे जीविताचं लक्षण आहे. जीवंत असूनही जर जगणं आनंदी व समाधानी जगता येत नसेल तर जीवंतपणी मरण अनुभवणे होय. जे काही चांगलं करावयाचं आहे ते जीवंतपणीच करावयायासं हवं. दान देणं असो. आनंद वाटणं असो की इतरांची दुःखं वाटून घेणं असो. हे सारं जीवंत असे तो करता येतं. एकदा का देहाने अचेतन अवस्था धारण केली की तुमच्याकडं कोण काय मागणार आहे ? त्यावेळेला चैतन्य गमावलेल्या अचेतन देहाची विल्हेवाट लावण्यासाठी इत्तरांचं सहकार्य घ्यावं लागणार आहे. त्यावेळी कोणीही काही दे , म्हणून मागणी करणार नाही. तेव्हा काही परोपकाराचं पुण्य फळ गाठीला राहावसं वाटत असेल तर प्रयत्न पूर्वक सत्कर्म करावे लागतील. गरजवंतांना दान-धर्म, मदत करावी लागेल. मृत्यू समयी जवळ कितीही संपत्ती असली . तरी सोबत काहीही देत नाहीत. मातीचा अंश असणारा हा देह मातीशीच एकरूप होवून जातो. म्हणून माय, माती आणि माणसांशी गद्दारी करू नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांचे मन शुद्ध आणि दृष्टी निकोप आहे ते आपल्या जीवनात पूर्ण समाधानी असतात.त्यांना कोणत्याही गोष्टीची हाव नसते,तसेच ते जेव्हा दुस-या कडे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात आणि दृष्टीत कसल्याही प्रकारचे वाईट विचार आणत नाहीत किंवा येत नाहीत.ते कधीही दुस-या चे वाईट व्हावे आणि माझे चांगले व्हावे असे कधीच चिंतीत नाहीत. त्यांना आपल्या जीवनात कुठलीही अपेक्षा नसते तसेच ते निरपेक्षवृत्तीने जीवन जगत असतात. अशी माणसे आपल्या जीवनात आनंदी राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सदैव माणसाने मन शुद्ध ठेवावे आणि दृष्टी निकोप असू द्यावी. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥙🌸🥙🌸🥙🌸🥙🌸🥙🌸🥙 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कलुषित - Impure* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिंचेचे झाड* एके दिवशी एक कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले.  त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, ' अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. तुझ्या चिंचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.' 'मग काय बिघडले?' चिंचेचे झाड म्हणाले, 'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात'. हे ऐकून बाभळीच्या झाडाला चिंचेच्या झाडाची कीव करावीशी वाटली. ते रागाने म्हणाले, 'तू प्रतिगामी आहेस. तुझे माणसीकरण झाले आहे. तू असा आहेस. तू तसा आहेस'. चिंचेच्या झाडाने त्याचे म्हणणे कांही मनावर घेतले नाही. पण बाभळीच्या झाडाचे पालुपद रोजच चालू असे. ते रोज कांहीतरी नवीन मुद्दा मांडून चिंचेच्या झाडाचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी ते म्हणाले, 'या माणूस नावाच्या प्राण्याने जगभर झाडांची कत्तल चालवली आहे. या माणसांच्याकडे बघून घ्यायला पाहिजे.' झाडांच्या कत्तलींचा मुद्दा ऐकून चिंचेचे झाड थोडे हबकले. आणखी कांही दिवसांनी बाभळीचे झाड खोटेच म्हणाले, ' अरे तुला कळले का, आता माणसे चिंचेच्या झाडांची कत्तल करायला लागले आहेत'. आता मात्र चिंचेचे  झाड निराश झाले. त्याला माणसांचा राग यायला लागला. या माणूस नावाच्या प्राण्याला धडा शिकवायचाच असे त्याने ठरवले. काय करावे बरे? त्याला एक आयडीया सुचली. तो आपले मूळ विचार, मूळ गुण विसरून गेला. त्याने ठरवले,  आपल्या अंगाला चिंचा लागतात, म्हणून माणसे ती खायला येतात. आपली थंडगार सावली पडते म्हणून माणसे आपल्या सावलीत विसावा घेतात. आता आपण आपल्या अंगाला चिंचाच  लावून घ्यायच्या नाहीत. आपली सगळी पाने गाळून टाकायची, म्हणजे सावलीच पडणार नाही. असे केले तर ती माणसे आपल्याकडे कशाला फिरकतील? हे विचार त्याने लगेच अमलात आणले. त्या झाडाची सगळी पाने कांही झाडून गेली. त्या झाडाला आता चिंचा लागेनात. कांही महिन्यातच ते झाड खंगून गेले. वाळले, मेले. आत्तापर्यंत चिंचेच्या सावलीमुळे नीट वाढ होत नसलेले ते बाभळीचे झाड मात्र चांगलेच फोफावू लागले. तात्पर्य : ऐकावे जनाचे करावे मनाचे *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment