✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचन प्रेरणा दिन* *हात धुणे दिन* *जागतिक विद्यार्थी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण. १९९७ - गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरुन पुढे गेले. 💥 जन्म :- १९३१ : मिसाईल मॅन, थोर वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम 💥 मृत्यू :- १९१८: शिर्डीचे साईबाबा यांनी समाधी घेतली. १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *चांगला वाचक हा चांगला लेखक होऊ शकतो असे प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनीही विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत हळूहळू होत आहे सुधारणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव आता ‘प्रयागराज’, बादशाह अकबरानं बदललं होतं ‘प्रयाग’चं नाव, योगी आदित्यानाथ सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची होतंय चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे रौप्यपदक पटकावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर दहा विकेट्स राखून मिळविला दणदणीत विजय मिळवून भारताने कसोटी मालिका २-० अशी खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/ljoUetKq1Q *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वाचन प्रेरणा दिनानिमित डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती *मिसाईल मॅन ते राष्ट्रपती* https://sharechat.com/post/ZQJyEmR आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. अब्दुल कलाम* डॉ. अवूल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. ते भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. बी.एस.सी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार असताना त्यांनी प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) स्ट्रेप्टोमायसीनचा शोध कोणी लावला ?* वेक्सिमन *२) पेरू या देशाची राजधानी कोणती ?* लिमा *३) राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोठे आहे ?* कोल्हापूर *४) भारतातील कोणत्या राज्यात बॉक्साईट सापडते ?* महाराष्ट्र *५) इंडियन इंडपेन्डन्स अँक्ट कधी पास करण्यात आला ?* १८ जुलै १९४७ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● फारुख शेख ● मंगेश फड ● मोहन भुसेवार ● संतोष दौडे ● पृथ्वीराज राहेरकर ● शिवराज काठेवाडे ● सुभाष मेंटेवाड ● संजय पा. कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिंता* आज प्रत्येकाला चिंता आहे रूपाची पण चिंता करावी ती खरी स्वरूपाची वरवर दिसते ते नश्वर रूप असते माणसाच्या मनात खरे स्वरूप असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 39* *कामी अमि नॅ ब्वेयी,* *विष ही कौ लई सोढी |* *कुबुद्धि ना जाई जीव की,* *भावै स्वमभ रहौ प्रमोधि ||* अर्थ दारुच्या व्यसनात गुरफटलेल्या माणसाला दारूंच आवडते. त्याच्या समोर अनमोल असा अमृताचा कुंभ ठेवला तरी त्याला त्याची काहीच किंमत वाटणार नाही. कारण तो व्यसनाधीनतेमुळे सदैव विषाचाच शोध घेत फिरत असतो. मुर्ख माणसाला समजावायला साक्षात ईश्वर जरी आला तरी मुर्खाच्या मुर्खपणासमोर बिचार्या ईश्वराचं काय खरंच नाही ठेवणार तो ! व्यसनाधीनतेत बुडालेला माणूस बुद्धी प्रामाण्य वागत नाही. तो त्याने जी नशा केलेली असते. त्या नशेच्या पूर्णपणे अमलाखाली जावून त्या क्षणी सुचेल त्याप्रमाणे इष्ट-अनिष्ट वर्तन करून बाजुला होत असतो. जसे : गंजेटी झोपडीत गप्पागोष्टी करत चिलीम फुकत बसलेले असतात. एकाने धुंदीत चिलीम सिलगावून जळती काडी भिरकावलेली.हे महाशय झुरक्यात गुंग. झोपडी पेट घेते. तिथे बर्याच जीवनपूरक वस्तू आहेत. अरे जाळ लागलाय पळा . म्हणत ते केवळ चिलीमच घेवून पळतात. त्यांना तीच हवी असते. "गंजेटी बैठे गांजा पिने झोंपडी मे लागी आग, चल रे निकल जोगी अपनी चिलम ले भाग । असं असतं व्यसनी माणसांचं वर्तन ! विचारानं मनावर घेतलं असतं तर बर्याच वस्तू वाचविता आल्या असत्या. परंतु नशेत बुद्धी साबुत राहातेच कुठं ! नको त्या मर्कट लिला करून तो बघणार्यांच्या विनोदाचा किवा दयेचा भाग बणून व्यसनी माणसं जगत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अहंकाररुपी माणूस सुरवातीला दुस-यावर आपला प्रभाव टाकायला जातो, परंतु सुरुवातीला लोकांना माहीत नसते म्हणून त्याच्यातील वर्तनाकडे पाहून थोडे दुर्लक्ष करतात.पुन्हा पुन्हा जर असे वर्तन करत असेल तर त्याची प्रतीष्ठा काय आहे हे चांगलेच ओळखायला लागतात आणि त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवत नाहीत.जर स्वत:चेच तुणतुणे वाजवत असेल तर काही काळात त्यांच्या अहंकाराचे डफडेच वाजवून टाकतात.त्याची कोणतीच प्रतिष्ठा समाजामध्ये ठेवत नाहीत.मग तो जीवनात एकटा पडतो.इतरही लोक त्याला दूर करतात.त्याच्या अहंकाराने त्याचे सगळे संपवलेले असते. माणसाने कधीही अहंकाराची भाषा करु नये.अहंकाररुपी राक्षस एकदा का अंगात आणि मनात शिरला तर त्याचे सर्वस्व संपलेच म्हणून समजावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिकवण - Teachings* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेटवस्तू न स्वीकारणे* अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’ काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले. कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले. ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’ अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment