✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट •••••••••••••••••••*•••••••••••••••••• 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••*••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••••••*•••••••••••••••••• 📅 दि. 03/10/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६७०- शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली १८६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकननेदरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थँक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला 💥 जन्म :- १९०३- समाजसुधारक व शिक्षण तज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ. १९११ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १५९६ - फ्लोरें क्रेस्टियें, फ्रेंच लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *इराकच्या राष्ट्रपतीपदी कुर्दीश मॉडरेट 'बार्हम सालीह' यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- पंतप्रधान मोदींकडून विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय सौर परिषदेचं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *335 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला बाल्टिक समुद्रात भीषण आग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली- किसान क्रांती पदयात्रेतील शेतकऱ्यांचा दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर ठिय्या; शीघ्र कृती दलाचे जवान तैनात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी दिला राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : वस्त्रहरण नाटकात तात्या सरपंच ह्यांची भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता संतोष मयेकरचं तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून होणार सुरूवात, वेस्ट इंडीज 35 वर्षांचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवणार का ?* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= नाशिक येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक देशदूतच्या blog वर प्रकाशित लेख *महात्मा गांधीजी म्हणजे स्फूर्ती* https://www.deshdoot.com/mahatma-gandhi-birth-anniversary-special-blog-nagorao-yevatikar/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *हद्दपार* जुन्या काळातले शिक्षक म्हटलं की बाणेदार पोरांना घडवणारे होते. प्रसंगी त्यासाठी विद्यार्थ्यांना मारझोड करावी लागली तरी त्याला विद्यार्थ्यांचे आईबाप आणि मास्तर दोघांचीही हरकत नसे. याचे उल्लेख साने गुरुजींच्या 'श्यामची आई' मध्ये सुद्धा आलेत. श्री ना पेंडसेंची ' हद्दपार' सुद्धा अशीच एका बाणेदारपणे आयुष्य जगणाऱ्या शिक्षकाची जिवीतकथा असणारी कादंबरी आहे. कोकणातल्या दापोलिजवळच्या दुर्गेश्वर नावाच्या एका छोट्या गावात शिकवणाऱ्या राजे मास्तरांची. स्वातंत्र्य पूर्वकालीन १९३०-४० च्या काळात घडणारी ही कथा सुरू होते ती मोगल काळापासून राजेंचा मुळपुरुष नुसत्या कोयतिनिशी वाघाशी झुंज देतो आणि घराण्याचा उत्कर्ष सुरू होतो तो राजे मास्तरांच्या वडिलांपर्यन्त भाई पाशी येवून थांबतो. मग पुढे मास्तरांचा जन्म झाल्यावर केलेलं भविष्य त्याला झुगारून जगणारे मास्तर, विद्यार्थी घडवण्यासाठी घेतलेले कष्ट, कोकणतल्या परंपरा, गावात विशेषतः पालखीच्या मानावरून होणारी आणि आयुष्य भर पुरणारी भांडणं यांचं सुरेख वर्णन श्री नां नि 'हद्दपार' मध्ये केलंय. 'हद्दपार' ही त्यांच्या सुरवातीच्या कादंबर्यापैकी एक होती त्यामुळे यात कोकणच्या निसर्गाचं वर्णन मुक्तहस्ते चितारले आहे. कादंबरीची पार्श्वभूमी जरी कोकणची असली, तरी त्यातल्या पात्रांच्या रोजच्या जगण्यात येणारे शब्द बोलण्याची पद्धत मात्र कोकणी न रहाता मराठी आहेत. त्यामुळे थोडंस चुकल्यासारखे वाटते एवढंच काय या कादंबरीत खुसपट काढता येईल. अन्यथा वाचणाऱ्याला बांधून ठेवणारी अत्यंत कसदार अशी कादंबरी म्हणून 'हद्दपार' चा उल्लेख निःसंशय पणे करता येईल. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर कोण होते?* 👉 वर्धमान महावीर *२) वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?* 👉 कुंडलपूर *३) वर्धमान महावीर यांचा जन्म कधी झाला?* 👉 इ. स. पू. ५९९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर ● पूर्वा श्यामसुंदर माडेवार, नांदेड ● नागेश क्यातमवार, परभणी ● विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद ● संदीप कडलग, अहमदनगर ● साईनाथ राचेवाड, बिलोली ● पांडुरंग यलमलवाड, उमरी ● नागनाथ लाड, कुंडलवाडी ● शिवाजी पांडुरंग मुटकुले ● दत्तप्रसाद ढगे, धर्माबाद ● शंकर पाटील डांगे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बापू* सत्य अहिंसेचा आम्हाला तुम्ही दाखवला मार्ग तुमच्या मार्गाने चालल्यास इथेच निर्माण होईल स्वर्ग तुम्ही सांगितलेले सत्य लोक फक्त बोलतात तुमच्या मार्गाने आज खरोखर किती चालतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 31* *साधु शब्द समुद्र है,* *जामे रत्न भराय |* *मंद भाग मुट्ठी भरे,* *कंकर हाथ लगाये ||* अर्थ सज्जन समुद्रासारखे अथांग असतात. समुद्राच्या घोंगावणार्या लाटा , पाणी खारट असलं तरी त्याची खोली अथांग असते. त्याचा तळ काढणे इतके का सोपे असते ! लोकोपयोगी असंख्य बाबी समुद्रातून मिळत असतात. संत वचन कडवट असलं तरी ते सत्य व वास्तवाचं भान करून देणारं असतं. समाजाला दिशादर्शन करून योग्य मार्गानं जाण्याची ते शिकवण देत असतात. संत कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा संयम ढळू देत नाहीत. विपरित समयी माणसानं विचार व विवेकापासून दूर न जाण्याचा सल्ला ते देत असतात. त्यांच्या ठायी दयाभाव व करूणा ओतप्रोत भरलेली असते. याउलट सामान्य व्यक्तीच्या ठायी चंचल प्रवृत्ती असते. जगण्याचा निखळ आनंद देणार्या गोष्टीपेक्षा लालचावणार्या बाबींच त्याला अधिक आकर्षक वाटू लागतात. तो विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्वच गोष्टींच्या मागं ऊर फुटेस्तोवर धावत राहतो. समुद्रकिनार्यावर पांढर्या शुभ्र दिसणार्या कणांनाच मोती समजून उचलावे तर ते सर्व रेतीचेच फसवे कण हाती यावेत. असा हा प्रकार आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही खोटे बोलून जग जिंकत असाल तर ते चुकीचे आहे.तुम्हाला असेही वाटत असेल की, लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपली वाहवा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.पण काहीजण करतीलही ते त्यांना माहित नसेल तिथपर्यंत जर का त्यांना जेव्हा समजेल की, तुम्ही खोटे बोलून स्वत:ची स्तुती करुन घेत आहात तेव्हा मात्र सारे लोक तुमच्यापासून दूर पळायला लागतील. सांगण्याचा तात्पर्य असा की, खोटं बोलून जग जिंकता येत नाही तर खरे बोलून जिंकता येते आणि तेही त्यांच्या हृदयावर आपले शेवटच्या क्षणापर्यंत राज्य करता येईल.म्हणून माणसाने सदैव खरेच बोलावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. ☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्ग - Nature* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्गाचे देणे* मिता कोकणातल्या छोटया खेड्यात रहायची. तिचे गाव शांत, सुंदर आणि समुद्राकाठी वसलेले होते. तिचे बाबा मासळी विकायचे आणि आई घरी पापड, लोणची करुन विकायची. ह्यावर त्यांच्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालत असे. रोज सकाळी पहाटे उठून मिताही त्यांच्या बरोबर समुद्र किनारी जात असे. तिला सकाळच्या उन्हात चमकणारी समुद्राची वाळू खूप आवडत असे. वाळूत ती अनेक प्रकारची नक्षी काढत असे. समुद्रातले अनेक रंगी मासेही तिला खूप आवडत असत. तिचे बाबा मासे पकडत तेंव्हा जाळ्यात अडकलेल्या माश्यांची तडफड तिला अस्वस्थ करुन जात असे. तिने एक दिवस तिच्या बाबांना विचारले," बाबा, आपल्या सारखेच सगळ्यांनी रोजच मासे पकडले तर समुद्रातले मासे एक दिवस संपून जातील? मग सगळ्यांनी बाजारात जाऊन विकायचे काय आणि खायचे काय?" मिताच्या ह्या प्रश्नावर आई-बाबा दोघांनाही हसू आले. त्या दिवशी रात्री मिताच्या आईला अस्वस्थ करणारे स्वप्न पडले. तिने स्वप्नात पाहिले की समुद्रातले सगळे मासेच संपून गेले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणेच कठीण झाले आहे. आईने मिताच्या बाबांनाही हे स्वप्न सांगितले. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे समुद्रावर जाण्याची तयारी झाली. मिताने बघितले की तिच्या आईने मासे ठेवण्याच्या नेहमीच्या टोपलीपेक्षा आकाराने लहान टोपली घेतली होती. तिला काही कळले नाही पण न विचारताच ती शाळेत गेली. आल्यावर मिताने बघितले तर तिचे बाबा नारळाच्या झावळ्या करत होते. आई पापड करण्यात गुंग होती. आज दोघेही जण मासळी बाजारातून लवकर घरी आले होते. मिताने त्याबद्दल विचारताच आई म्हणाली," मिता तुझ्या प्रश्नाने आम्हाला विचार करायला भाग पाडले आहे. आजपासून आम्ही ठरवले आहे की आवश्यकते नुसारच आपल्याला जितके मासे हवेत तितके मासे घ्यायचे. अधिक घेण्याचा हव्यास करायचा नाही. त्यामुळे आपला खर्च भागविण्यासाठी आम्ही इतरही उद्योग करायचे ठरविले आहे.निसर्गाची हानी अजिबात होऊ देणार नाही ."आईचे बोलणे ऐकून मिताला अत्यानंद झाला तिने आईला आनंदाने मिठी मारली." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. •••••••••••••••••••••••••••••••••••••
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment