✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/10/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३२: भारतीय वायुसेनेची स्थापना. २00५:पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीव्र भूकंप. २0१३:ज्येष्ठ पत्रकार ज्योतर्मय डे यांच्या हत्येचा आरोप असलेल्या पॉलसन जोसेफला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला 💥 जन्म :- १९२६ हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित उर्फ राजकुमार १९३५ फ्लाईंग सिख मिल्खा सिंग 💥 मृत्यू :- १९८२: कॅनडाचे नोबेल शांतता पुरस्कार विजेते फिलिप नोएल-बेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद ताजिकिस्तानला पोहोचले; तीन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागरी संरक्षण संचालनालयातील १०९ पदांना मुदतवाढ; पाच महिन्यांसाठी गृहविभागाचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींची संमती, राज्याच्या गृहविभागाने तातडीने तशी अधिसूचना केली जारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित! ; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *इंडोनेशियातील त्सुनामी आणि भूकंपात पाच हजार लोक बेपत्ता ; मदतकार्य मंदगतीने सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारावरील उपचारांसाठी राज्यातील ९0 टक्के नागरिकांना आरोग्य कवच उपलब्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणाविस यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या युवा खेळाडूंनीही जिंकला युवा आशिया चषक, अंतिम सामन्यावर भारताचं निर्विवाद वर्चस्व; श्रीलंकेचा 144 धावांनी धुव्वा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित *आपली माणसं* विषयी गीता देव्हारे यांचा लेख जरूर वाचावे http://epaper.ejanshakti.com/m5/1846778/Pune-Janshakti/08-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अभिनेता राजकुमार* डॉयलॉगचे बेताज बादशहा अभिनेते राजकुमार यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी बलुचिस्तानात झाला. त्यांचे मुळ नाव कुलभूषण पंडीत होते. इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन कुलभूषण यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. दोन चित्रपटानंतर त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. महबूब खान यांच्या १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकर्याच्या भूमिकेत दिसले. या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. यानंतर त्यांची यशस्वी कारकिर्द सुरू झाली. दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनयसम्राटाच्या पदावर पोहचवले. काजल चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता ठरले. वक्त चित्रपटातील ह्यचिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते तसेच ह्यचिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) थर्मास फ्लाक्सचा शोध कोणी लावला ?* जेम्स देवार *२) व्हिएतनाममध्ये कोणती खनिजे सापडतात ?* लोह, कोळसा *३) ग्रनीचवरून जाणार्या काल्पनिक रेखावृत्ताला काय म्हणतात ?* मूळ रेखावृत्त *४) थायलंडमधील नद्या कोणत्या ?* मेकाज, चाओ, प्याहा, मेनाम मुन *५) डमी, नो ट्रम्प, ग्रँड स्लॅम, रिव्होक, रफ या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?* ब्रिज *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● साईनाथ पोतलोड, धर्माबाद ● जगदीश पाटील कळसकर ● कैलास बगाले ● गणेश पेंडकर, येवती ● अमोल सिंगनवाड ● बळीराम शिवाजी खांडरे ● शांतीलाल कुमावत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *नाद* हल्ली आपलीच आपण पाठ थोपटून घेतात थोपटून घेण्याच्या नादात स्वतःच चेपटून घेतात आपली आपण थोपटताना चेपटली तर जाणार शेवटी व्हायचा तो उलट परिणाम होणार शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य. उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.* *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !* *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 34* पहुचेंगे तब कहेंगे, उमडेंगे उस ट्ठाई | अझू बेरा समंड मे, बोली बिगूचे काई || अर्थ अर्धवट ज्ञान असणार्यांनी पांडित्य करू नये. नावेतून प्रवास करीत असताना जेव्हा पैलतीरी जाईन तेव्हाच प्रवास व प्रवास मार्गाविषयी बोलावे. समुद्राच्या लाटामधून नौका दोलायमान अवस्थेत मार्गक्रमण करित असताना समुद्रप्रवासाचा थरार अनुवयाला येतोय . प्रवासही पूर्ण झालेला नाही अशा वेळी त्याबद्दल निश्चित काय सांगता येणार आहे ! पूर्ण अनुभूतीशिवाय कसं बोलायचं. विना अनुभवाची ती निरर्थक बडबड असणार आहे. अशा प्रसंगी तोंडघशी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे महात्मा कबीर पटवून देतात. बरेच जण वासरात लंगडी गाय शहाणी म्हटल्या प्रमाणे समोरच्यांचा अंदाज नसताना नको तीच चुकीची माहिती पुरवून जातात. ऐकणारे सर्वजण अज्ञानी किवा अर्धकच्चे असतातच असे नाही. श्रोत्यातील खूप जण चिंतन मनन करणारे असतात. चला आपल्याला संबंधित विषयावर आणखी काही नवीन ऐकता येईल या हेतूनेही आलेले असतात. अशावेळी जर वक्त्याने चुकीचे संदर्भ किवा माहिती पुरवली तर... उदभवणार्या प्रसंगाची कल्पनाच करायला नको. मध्येच श्रोत्याने चुकीचा संदर्भ खोडला तर वक्त्याची त्रेधातिरपीट उडून हसे होते. म्हणून परिपूर्ण माहिती व आत्मविश्वासाशिवाय गंंभीर व संवेदनशील विषयावर बोलू नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात आनंदाने आणि समाधानाने जगायचे असेल तर जीवनातल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन तोंड दिलेच पाहिजे, जिद्दीने लढायला शिकलेच पाहिजे, समोर कोणतेही असलेले आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवायला शिकले पाहिजे, अपयश आले तरी स्वत:तला आत्मविश्वास ढळू न देता तितक्याच ताकदीने उभे राहायला शिकले पाहिजे. कोण काय म्हणतीय याचा विचार करण्यापेक्षा आपण किती प्रामाणिक प्रयत्न करुन यश मिळवता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. तरच आपण आपल्या जीवनात नवे चैतन्य, नवा जोश अधिक कार्यक्षम होऊन आत्मसन्मानाने जगण्याची दिशा आपोआपच मिळेल. जर का आपणच जगण्यातला विश्वास कमी केला तर मग आपणच आपल्या जीवनात हार खाल्ली आहे असे समजावे. आपल्यापेक्षा इतरांच्या जगण्याकडे पहा आणि ठरवा. त्यांच्या जगण्यामध्ये किती यश अपयशाला तोंड देत संघर्ष करत असतात तरीही त्यात समाधान मानून पुढे पुढे जात असतात मग आपण तर त्यांच्यापेक्षा किती सक्षम आहोत हा विचार सदैव जागृत ठेवावा आणि चांगले जीवन जगण्यासाठी सतत क्रियाशील रहावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कार्यक्षम - Efficient* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मदतीचा हात* *जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.* *ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये."* *त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते की,"या जळालेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा माझे नाव 'आग* *लावणाऱ्यां'त नव्हे, तर 'आग विझणाऱ्यां'त येईल.".* *माणसे जोडणे हाच आमचा धर्म,काम छोटे असो वा मोठे कामाचा हेतु ,मर्म चांगले असणे महत्त्वाचे आहे.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment