✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन* * 💥 ठळक घडामोडी :- २००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्या उपग्रहाचे प्रक्षेपण. 💥 जन्म :- १९०० - अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतीकारी 💥 मृत्यू :- १७७९ - रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे, पेशवाईतील न्यायाधीश. १९७८ - प्रा. ना.सी. फडके, मराठी लेखक. १९९१ - ग.म. सोहोनी, देहदान साहाय्यक मंडळाचे संस्थापक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली : आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोर आणि सुरक्षा जवानांची चकमक, तीन सुरक्षा जवान शहीद झाले असून 1 गंभीर जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार : चंद्रकांत पाटील यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केली 77 उमेदवारांची यादी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 87.21 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 78.82 रुपये.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *डेन्मार्क : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालला जेतेपदाने दिली हुलकावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या शतकाच्या बळावर भारताने हा सामना 8 विकेटनी जिंकला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/WjQD6TKpcR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गावाकडच्या आठवणी .....! https://b.sharechat.com/gYLkILcR8Q जरूर वाचावे आणि आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ना सी फडके* नारायण सीताराम फडके (ऑगस्ट ४, १८९४ - ऑक्टोबर २२, १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणार्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते. अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले ?* इ. स. १५५६ *२) कोणत्या शहराला दक्षिण महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?* सोलापूर *३) लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान राज्य कोणते ?* सिक्कीम *४) 'जोक्स फॉर आवर मिलियन्स' या पुस्तकाचे लेखक कोण ?* व्ही. व्ही. गिरी *५) ओडिशाची उपराजधानी कोणती ?* पुरी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● ● ● अमोल शिंदे पाटील ● पस्कॉल डीसुजा ● पांडुरंग कुलकर्णी ● राम गुड्डे ● रमेश शंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक करायला गेलं की दुसरंच उभं रहातं कळत नाही तेंव्हा कसं डोक्याहून पाणी वहातं करायचे ते लवकर करताच येत नाही योग्य वेळ आल्या शिवाय कोणत काम होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 42* पानी केरा बुदबुदा, अस मानस की जात। देखत ही छिप जायेगा, ज्यों सारा परभात।। अर्थ महात्मा कबीर जीवनाची नश्वरता पटवून देताना सांगतात की, मानवी जीवन पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. त्याचा क्षणिकही भरवसा देता येत नाही. कोणत्याही क्षणी त्याचा शेवट होवू शकतो. जसे की सकाळ होऊ लागताच आकाशातल्या मिनमिनत्या तारका लपून बसायला लागतात. माणसाच्या जीवनाचा खरा अर्थ त्याच्या जीवन जगण्यातून कळत असतो. तो किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. उगाच कण्हत कण्हत जगण्यापेक्षा जीवनाचे गाणे म्हणत जगता आले तर जीवनाचे नंदनवन होते. त्यासाठी निखळ आनंदी जगायचा प्रयत्न केला पाहिजे. काही जणांना आपण जन्माला आलो आहोत. आपल्याला सुंदर जगायचे आहे. याची जाणीवच नसते. काही जण जगणं ओझं समजून जगत असतात. त्यांच्या जगण्याचंच इत्तरांना ओझं वाटायला लागतं. खरं तर अशी माणसं जीवंत असूनही वारंवार मरत असतात. खरंच जीवन आनंदाने भरता येतं . हेच विसरतात. खरंचते जीवनाला ,'तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे । तिन्ही लोक आनंदाने भरून वाहू दे रे । हेच सांगायला विसरतात. सर्व क्षमता असूनही सुंदर जगण्याची सुरूवात करण्याआधीच आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यापूर्वीच जीवनाला रामराम ठोकू लागतात. ती घटिका केव्हा येईल हे निश्चित माहित नसतं. आपल्या हाती असलेल्या क्षणांचा सदुपयोग केला पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याजवळ थोडाबहुत पैसाअडका, थोडीबहुत संपत्ती आहे अशा लोकांना या जगात माझ्यासारखे कोणीच नाही असे वाटायला लागते आणि त्याचा अभिमान तो इतरांना वेगळ्या पद्धतीने सांगत सुटतो. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व परिस्थितीने गांजलेल्या लोकांना अगदी गुलामासारखे वागवतो आणि सर्वसाधारण माणसे आपली परिस्थिती बिकट आहे म्हणून ते निमूटपणे सहन करत त्यांच्या हाताखाली जीवन संपवतात.अशी केवळ स्वार्थी, आपमतलबी, गर्विष्ठ, दुस-यांना हीनतेची वागणूक देणारी व दुस-याचे कधीतरी भले करावे अशी अपेक्षा नसलेले निर्दयी असतात.अशा माणसांना चारचौघात किंवा जनमाणसात कुठेही प्रतिष्ठा, मानसन्मान मिळत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिष्ठा - Reputation* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बिरबलाची युक्ती* एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो तुझी मला मुळीच गरज नाही .बिरबल अतिशय स्वाभिमानी होता .तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला .आणि एका गावात वेश बदलून राहू लागला बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही .बादशाहाला मात्र सारखी त्याची उणीव भासे त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहाला त्याच्या शिवाय करमत नव्हते .अन्न गोड लागत नव्हते .त्याने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला परंतु बिरबल सापडत नव्हता बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला .बादशाहने हि बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते .त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली .राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे. लग्न समारंभ थाटात होणार आहे .तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरी सह उपस्थित रहावे .जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना .बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोक हि चिंतेत पडले होते गावाच्या पुढारी ना या समस्येला कसे तोंड ध्यावे समजत नव्हते ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली .अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता त्याने गावकरी ना जाण्याची युक्ती सांगितली .गावकरी खुश झाले .एक दिवस गावातील पाच सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्ली ला गेले दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत .बादशहा जोरात हसला आणि तुम्हाला ही युक्ती कोणी दिली असे विचारले तर त्यांनी गावातील एका शेतकऱ्याने दिली असे सांगितले.बादशाहाने लगेच आज्ञा दिली जा आणि बिरबलाला सन्मानपूर्वक घेऊन या. बादशहाने आणि बिरबलाने आनंदाने मिठी मारली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment