✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - जगातील पहिले अणुउर्जा केंद्र एलिझाबेथ दुसरीने इंग्लंडच्या कुंब्रिया प्रांतातील सेलाफील्ड येथे सुरू केले. २००३ - भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला 💥 जन्म :- १८१७ - सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक १८६९ - भास्करबुवा बखले, हिंदुस्तानी गायक-संगीतकार, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू १८९२ - नारायणराव बोरावके, पहिले मराठी साखर कारखानदार १९७० - अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८८२ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. शिवसेनेसोबत जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचं जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) आणि अन्य बचत योजनांवरील व्याजाचा दरात वाढ ७.६ टक्के वरून ८ टक्के, केंद्रीय वित्त विभागानं या संदर्भातील परिपत्रक काढलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ठाणे - कल्याण-डोंबिवली मनपाचे 400 कंत्राटी कामगार आजपासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सिऐटल : जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * UEFA Nations League मध्ये इंग्लंडने चुरशीच्या सामन्यात माजी विश्वविजेत्या स्पेनला त्यांच्याच घरच्या मैदानावर ३-२ ने केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *स्वयंघोषित संत रामपालला दोन प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा; हिसार कोर्टाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेटपटूंनी स्थानिक क्रिकेट सामन्यांत 50 षटकांत तब्बल 3 बाद 596 धावा कुटल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 99603583007 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/AbXdmOZ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कथा - संशय* एक।छोटा संशय जीवन कसे उध्वस्त करते हे सांगणारी कथा https://b.sharechat.com/gYbH19ZJ4Q आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दादोबा पांडुरंग तर्खडकर (तथा दादोबा पांडुरंग )* हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणार्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मुर्शिदाबाद हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?* रेशमी आणि हातमाग कापडासाठी *२) कालमापक यंत्राचा शोध कोणी लावला ?* जॉन हॅरिसन *३) सूर्याची उंची तसेच इतर ग्रहगोलांची उंची मोजणारे उपकरण कोणते ?* सेक्सटंन्ट *४) हॉकी स्टीकचे वजन किती असते ?* २00 ते ७९४ ग्रॅम *५) भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?* सात *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● चेतन भैराम ● श्रीनिवास कोलोड ● धनराज पाटील भुमरे ● दीपक टेकाळे ● केशव सटाले ● गीतेश पाटील ● अनिकेत पाटील ● गिरीश तांबोळे ● निंबा पाटील ● गजानन बापूराव भोसकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नीतिमत्ता* माणसातली नीतिमत्ता कुठे पळून गेली आहे इथे सा-या लबाडांचीच गर्दी गोळा झाली आहे लबाडांच्या गर्दी मध्ये नीतिमान कसा सापडेल चिखलात जाईल त्यास सहजच घाण चोपडेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 40* *जब गुण को गाहक मिले,* *तब गुण लाख बिकाई.* *जब गुण को गाहक नहीं,* *तब कौड़ी बदले जाई.* अर्थ : महात्मा कबीर म्हणतात कि, जेव्हा गुणाची पारख असणारे गुणपारखी गाहक मिळतात तेव्हा गुणाची किमत होत असते. परंतु जेव्हा गुणाची पारख नसणारे ग्राहक भेटतात, तेव्हा गुणाची परिपूर्णता असूनही ती वस्तू कवड़ी मोलाने के भावाने विकावी लागते. एका व्यक्तीला रस्त्याने जात असताना दोन खडे चमकताना दिसले. त्याने कुतूहलापोटी ते उचलून सोबत घेतले. आणि तो पुढे निघाला. वाटेने जाताना तो थकून एका हाॅटेलात थोडा वेळ थांबला. हातातले दोन्ही खडे त्याने सहज टेबलावर ठेवलेले. इतक्यात हाॅटेल मालकाची दृप्टी त्या खड्यांवर पडली. त्याच्याकडे पाहून निरखून पाहात तो त्या खडेवाल्याला म्हणाला. 'कुठे भेटले हे दगडी कोळसे?' 'अहो मी त्या माळावरून येत होतो तर हे खडे इत्तर खड्यांपेक्षा वेगळे दिसले म्हणून मी सोबत घेतलेत. तुम्हाला हवा तर घेवून टाका यातला एक.' त्यावर तो दुसरा गृहस्थ म्हणाला, 'मी काय करू याला घेवून . नको तो तुमच्याकडेच राहू देत.' यांचे संभाषण चालू असताना एक जवाहिर्या तेथे आला. त्याची नजर त्या खड्यावर गेली. तो त्या खड्यांना पारखून म्हणाला. 'अरे भाऊ , तू हे खडे मला दिलेस तर मी तुला दोन लाख देईन.' हां ना करीत त्याने ते चार लाखाला घेतले. तो जवाहिर्या आला नसता तर त्या गृहस्थाने कवडीमोल भावाने कुणाला तरी देवून टाकले असते. गुणांची पारख नसली की किमती वस्तूचं मूल्यचं कळत नाही हेच खरं..! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सदैव - Always* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकीचे फळ* एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जीव जाणे, निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासाभरात एक चमत्कार झाला आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, “तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.” त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जीव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मानपूर्वक बोलून मग पुढे जा. माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment