✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय एकता दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार १८८० - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग १९२० - भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन काँग्रेस)ची स्थापना १९८४ - भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीची आपल्याच अंगरक्षकांकडून हत्या 💥 जन्म :- १८७५ - सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान १८९५ - सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू १९२६ - एच.आर.एफ़. कीटिंग, मुंबई शहर ही पार्श्वभूमी असलेल्या रहस्यकथा लिहिणारा इंग्रजी लेखक १९४६ - रामनाथ परकार, भारतीय क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :- १९७५ - सचिन देव बर्मन संगीतकार १९८४ - इंदिरा गांधी, भारतीय पहिली महिला पंतप्रधान १९९९ - डॉ.भय्यासाहेब ओंकार वास्तव शैलीत चित्रे काढणारे मराठी चित्रकार २००५ - अमृता प्रीतम, ज्ञानपीठ विजेती लेखिका *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *खास भावगीतांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गुजरात: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळ्याचे कडक पोलीस बंदोबस्तात आज होणार अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये दिवाळी बोनस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नंदुरबार - आदिवासी कारखाण्यातर्फे यंदा उसाला 2308 रुपये एकरकमी देण्याची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेल्या कॅमेरामनच्या कुटुंबीयांना 15 लाखांची केंद्र सरकार करणार मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागपूर - सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसानभरपाई द्यावी - अजित पवार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *चौथ्या क्रमांकासाठी ११ फलंदाजांची घेतली चाचणी, अंबती रायुडू या स्थानासाठी सर्वात उपयुक्त फलंदाज असल्याचे कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचे मत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/Nyd4Bnr Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय एकात्मता कशी टिकेल ?* https://sharechat.com/post/d9QN6Zw आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सरदार वल्लभभाई पटेल* वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पाटेल समाजामध्ये झाला त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४ मध्ये मणीबेन आणि १९०६ मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले. वल्लभभाईगोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते. एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ह्या पदवीने संबोधित केले आहे. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारतछोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकता येईल ते आदराने घ्यावे - साने गुरुजी *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैक किती जंगलांनी व्यापले आहे ?* ६२,२२४ चौ. कि.मी *२) 'फ्लड ऑफ फायर' या पुस्तकाचे लेखक कोण ?* अमिताभ घोष *३) अलीकडेच कोणत्या राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करण्यात आली ?* बिहार *४) इंटेलसॅट-४ या उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करण्यात आले ?* ८ जानेवारी १९७८ *५) रणगाड्याचा शोध कोणी लावला ?* स्विन्टन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आप्पासाहेब सुरवसे, बीड ● जागृती सुधीर निखारे, मुंबई ● निलांजय यडपलवार ● देवदास कोयेवार ● दामोदर डहाळे ● गणेश पाटील हांडे ● शीतल गांधी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुलाम* सहज मिळतं त्याला किंमत रहात नाही घरच्या देवाकडे तर कोणीच पहात नाही घरच्यांना लाथा अन् दुरच्यांना सलाम असतो असे वागणारा खरंच वैचारिक गुलाम असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.* *कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रमांक 48* जिही जिवरी से जाग बँधा, तु जनी बँधे कबीर। जासी आटा लौन ज्यों, सों समान शरीर।” अर्थ : हे जग मायावी आहे. इथे मोहिनी घालणारे भ्रमाचे अनेक फसवे धागे आहेत. मोहात पडून भ्रमित होवू नये. फसवे पाश ओळखता आले पाहिजेत. मात्र इथले जीव सारसार विचार न करताच मोहात दावनीला जखडले आहेत. जीवनाचं सार्थक करायचं असेल. तर माया , मोहात गुरफटू नको. विनाकारण स्वतःच स्वतःला फरफटत नेऊ नकोस. हा मानवरूपी देह विचार व विवेकाने वागण्यासाठीच लाभलेला आहे. सर्व प्राणी मात्रांकडे नसलेले बोली व बुद्धी हे आगळेवेगळे वैशिष्ट्य केवळ मानवाठायीच आहे . तेव्हा आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर सत्कर्म करून जीवन सफल करावयाला हवे. मीठाविना जेवन फिके वाटावे तसे सत्कर्माविना जीवन उठून दिसूच शकत नाही. माणसाच्या वागण्यातील विसंगती दाखवताना ' गेली सांगून ज्ञानेश्वरी , माणसापरीस मेंढरं बरी." वास्तवाचं बोलकं चित्र मांडून या गाण्यातून माणसातील भेदभावी वृत्तीवर फटकार मारलाय. माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागलं तरी मानवता नांदू लागेल. नाही तर मानव देह धारण करूनही मानवता विसरलेला पशू अशीच ओळख देवून कसं चालेल ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमचा धर्म कोणताही असो किंवा जात कोणतीही असो पण जी माणसे संकटात सापडली आहेत अशा माणसांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे असायला हवा हाच खरा माणुसकीचा सर्वात मोठा धर्म आहे हे कधीही विसरु नका.अशावेळी कोण श्रीमंत आहे किंवा कोण गरीब आहे हा देखील भेद पाहू नका.कारण संकटं जेव्हा येतात तेव्हा कधीच कुणामध्ये भेद करत नाही.त्यामुळे हादेखील भेद आपण माणूस म्हणून का करायचा. मदतीच्यावेळी सारेच भेद विसरुन आपले माणुसकीच्या नात्याने कर्तव्य म्हणून मदत करावी हीच आपल्याला खरी शिकवण साधूसंतानी आणि पूर्वजांनी दिली आहे.ती शिकवण नित्य स्मरणात ठेवून आपण जीवन जगायला शिकले पाहिजे कसल्याही प्रकारचा भेद न करता एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्यता - Qualifications* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सदाचरण* फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्या विद्वत्तेचा व योग्यतेचा यथायोग्य आदर होता म्हणूनच तो त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असे. प्रजेमध्येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्याला इतक्या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्यासाठी एक गुप्त योजना बनविली. दुस-या दिवशी त्यानी दरबारातून परतताना राजाच्या खजिन्यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्याने न पाहिल्यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्या व खिशात भरल्या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. न्यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्या या चुकीबद्दल त्यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्यात यावी. तीनवेळेला त्यांनी कोषातून धन चोरले म्हणून तीन महिने सजा देण्यात आली आहे जेणेकरून ते पुन्हा असा अपराध करण्यात यशस्वी होणार नाही. या न्यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्यास इच्छुक होतो की लोक कशामुळे मला सन्मान देतात, वैयक्तिक माझा सन्मान करतात की मी करत असलेल्या सदाचरणाचा लोक सन्मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्त झालो आणि त्यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्ही कोणत्याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्हणणे ऐकले व स्वत:ला सैनिकांच्या स्वाधीन केले. *तात्पर्य :-सदाचरण हेच मनुष्याचे धन आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment