✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/06/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- शिवराज्याभिषेकदिन - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले. १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला. 💥 जन्म :- १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी. १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष. १९६३ - मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा. २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आमच्या सरकारने संसदेत संविधान दिन साजरा केला - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *कारंजा : पुस्तकांची गुढी उभारून अभिनव पद्धतीने ‘प्रवेशोत्सव’, कारंजा तालुक्यातील कामरगाव जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली भारताच्या दौ-यावर, तीन दिवस भारतातल्या वरिष्ठ अधिका-यांचा घेणार भेटीगाठी* ----------------------------------------------------- 4⃣ *नांदेड : जुन्या मोंढ्यात जवळपास 2 टन प्लास्टिक जप्त, महापालिका आयुक्त लहुराज माळी यांची कारवाई.* ----------------------------------------------------- 5⃣ *नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार 2018 ने गौरवण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद व सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान* ----------------------------------------------------- 6⃣ *कोल्हापूर : राजर्षि शाहू मिलच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत 20 जुलैनंतर बैठक घेणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील* ----------------------------------------------------- 7⃣ *FIFA World Cup 2018: पहिल्या सत्रात फ्रान्स आणि डेन्मार्क सामना गोलशून्य बरोबरीत* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जसे चारित्र्य तसे जीवन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/38.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सारं काही हृदयासाठी* हृदयाला तणावापासून दूर ठेवावं. अतिरिक्त तणावाचा हृदयावर विपरित परिणाम होतो. ताण आला की हृदयगती आणि रक्तदाब वाढतो. यामुळे शरीराला अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासते. यामुळे छातीत दुखू लागतं. त्यामुळे आनंदी आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. *ताजी फळं, भाज्या, पूर्ण धान्याचा समावेश असलेला समतोल आहार घ्या.* *आहारातले सॅच्युरेटेड फॅट्स, कोलेस्टेरॉल, फॅट्स तसंच सोडियमचं मूल्यांकन करा.* *आहारातलं तेलाचं प्रमाण कमी ठेवा.* *दिवसाला फक्त दोन ते तीन चमचे तेल खा.* *दररोज ३0 ग्रॅम कच्चं लसूण खा.* *वजनावर नियंत्रण ठेवा.* *स्थूलतेमुळे रक्तातल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. यामुळे उच्च रक्तदाब तसंच हृदयाच्या धमन्यांवर ताण येतो.* *धूम्रपान टाळा, सतत धूम्रपान केल्यामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे धमन्यांमध्ये चरबीयुक्त स्राव साचू लागतो. याचं रूपांतर रक्ताच्या गुठळ्यांमध्ये होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.* *मधुमेही व्यक्तींना हृदयविकाराचा धोका बराच जास्त असतो. त्यामुळे मधुमेहींनी रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवायला हवं.* *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= मी नरकात सुद्धा चांगल्या पुस्तकांचे स्वागत करीन, कारण त्यांच्यामध्ये नरकाचे ही स्वर्गात रूपांतर करण्याची शक्ती आहे. - लोकमान्य टिळक *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= १) 'ग्रेट व्हिक्टोरिया' वाळवंट कुठे आहे? ऑस्ट्रेलिया २) देशातील पहिली नॅशनल स्पोर्टस युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? मणिपूर ३) रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? महेशकुमार जैन ४) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती? ताज उल मशीद ५) मायकल फेल्प्स कोणत्या क्रीडाप्रकाराशी संबंधित आहे? जलतरण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुशील कापसे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अनुपमा जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्ता* माणसातला माणूस संपवते सत्ता माणसा माणसात जुंपवते सत्ता निर्माण करते हाव सत्तेपाई सारे कुटील डाव शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी जीवन अनमोल आहे. पण ते फुकट मिळालेलं आहे. न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठे असते ! आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं. दिवस येतात, जातात. जीवन मात्र अडगळीत असतं. खरंतर माणूस जगतो कशासाठी? तर जगण्यासाठीच ! जीवन जटील नाहीच. पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत... त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो. माणूस वयानं जसजसा वाढू लागतो, तसतसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेह-यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात ! एवढं सुंदर जीवन हातात असताना झूटया भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते.* *माणूस धावत राहतो अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो. जीव गुदमरून टाकणा-या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठे हातात असतात ! काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या शेवटच्या प्रवासात एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.* ••●♦‼ *रामकृष्णहरी* ‼♦●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही तुमच्या आवडीने हाती घेतलेले काम तेवढ्याच आवडीने मन लावून करा.लोक काय म्हणतील याचा विचार करु नका.कारण जगाची एक रीतच आहे की,जी माणसं चांगली कामं करतात त्यांना काहीतरी नाव ठेऊन त्यांच्या चांगल्या करत असलेल्या कामात व्यत्यय आणतात.त्यांना तुमचे चांगले पाहवत नाही.त्यांच्या बोलण्याकडे किंवा काकदृष्टीने पाहणा-याकडे लक्ष देऊ नका.कारण त्यांना तुमच्यासारखे येत नाही आणि जमतही नाही.ते तुमचे चांगले कसे पाहवणार ? म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी कारण अशी माणसं जर नसती तर आपल्याला प्रोत्साहनतरी कसे मिळेल.उलट आपण त्यांच्या बोलण्याकडे किंवा काकदृष्टीने पाहणा-याकडे काना डोळा करुन मनात असे ठरवून टाकायचे की,आपल्याला अधिक प्रोत्साहन देत आहेत.काही दिवस ते करतीलही आणि काही दिवसांनंतर स्वत: होऊन आपल्याकडे दुर्लक्ष करून निघून जातील आणि आपला मार्ग बदलूनही टाकतील.कदाचित काही दिवसांनंतर तुम्हाला म्हणतीलही आमचे चुकले आम्हाला माफ करा.अशावेळी आपण वेगळ्या पद्धतीने उत्तर द्या की,तुमच्यामुळेच मला प्रोत्साहन मिळाले त्यामुळे आमची प्रगती झाली.अशा तुमच्या बोलण्याने कदाचित त्यांच्या जीवनशैलीत फरक पडेल आणि तुम्हाला तुमच्याकडे पाहण्याचा ही दृष्टिकोन बदलूनही जाईल.केवळ तुमच्या शांत,संयमी आणि तुम्ही करत असलेले चांगले काम पाहून.चार शब्द बोलून दाखवण्यापेक्षा आपल्या चांगल्या करत असलेल्या कृतीतून नक्कीच बोध घेतील आणि चांगल्या दृष्टीने जीवन जगण्याचा प्रयत्नही करतील हे केवळ तुमच्यामुळेच.नेहमी माणसाने आपल्या जीवनात आपल्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत चांगला दृष्टिकोन ठेवून जगायला शिकले पाहिजे *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दृष्टिकोन* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment