✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/06/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १३७७ - वयाच्या दहाव्या वर्षी दुसरा रिर्चड इंग्लंडच्या गादीवर बसला. १५१७ - अपंगांना कृत्रिम हातपाय पुरवणारे आणि रक्तवाहिन्या शिवून रक्तस्त्राव थांबविण्याची कल्पना मांडणारे अॅब्रायस्ते पेरी यांचा जन्म. १९४० - सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. फ्रान्सने अधिकृत शरनागती पत्करुन हीटलरसमोर गुडघे टेकले. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला 💥 जन्म :- १९३५ - वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १८९६ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता. १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक 💥 मृत्यू :- १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ. २००१ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दुभंगलेला समाज, विखुरलेल्या कुटुंबांना जोडण्याचे काम योग करते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त व्यक्त केले* ----------------------------------------------------- 2⃣ *कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (इपीएफओ) भविष्य निर्वाह निधी पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध येण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 3⃣ *आता राज्य सरकारमार्फत खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती करण्यात येणार, शासनाने घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 4⃣ *तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या वाट्याचे तापी खोर्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास गुजरात सरकारने दिला स्पष्ट नकार* ----------------------------------------------------- 5⃣ *शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिर ट्रस्टने राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी दिले तब्बल ७१ कोटी रुपयांचे 'दान'* ----------------------------------------------------- 6⃣ *इंग्लंडच्या पुरुष संघासह महिला क्रिकेट संघाने टी-२0 मध्ये २५0 धावांचा केला विक्रमी डोंगर* ----------------------------------------------------- 7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत गुरुवारला झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बलाढय़ डेन्मार्कला १-१ असे बरोबरीत रोखले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *अभ्यास एके अभ्यास* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_2.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *चिखलदरा* अमरावती- सातपुडा पर्वतांच्या कुशीत वसलेल्या चिखलदरा हे विलोभनीय पर्यटनस्थळ देश-विदेशातील पर्यटकांचे पावसाळ्यात लक्ष वेधून घेते. वर्षभरही पर्यटक मोठ्या संख्येने येते येत असतात. सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा नेहमीच आपल्या सौंदर्याने पर्यटकांना खुणावते. या संग्रहातील फोटोंमधून पाहूया चिखलदराचे सौंदर्य.. धुक्यात हरवतो रस्ता.. पावसाळ्यात दाट धुके आणि हिरवळीनं सजलेल्या पर्वतरांगा चिखलद-याच्या सौंदर्यात कमालीची भर घालतात. अवघा मेळघाटच पावसाळ्यात उठून दिसतो. येथील जंगल शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. परिसरात नेहमीसाठी थंड आणि आरोग्यदायी हवामान असते. जैवविविधतेसाठी चिखलदरा पोषक आहे. हे आहेत प्रेक्षणीय स्थळे.... चिखलदरा येथे 12 महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यामध्ये पंचबोल (इको पॉईंट), देवी पॉईंट, नर्सरी गार्डन, प्रॉस्पेट पॉईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, बेलेन्टाईन पॉईंट अशी स्थळ आहेत. धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेला भीमकुंड, मंकी पॉईंट, लॉग पॉईंट, लेन पॉईंट, वैराट पॉईंट व हरिकेन पॉईंट अशी स्थळंही आपल्याला आकर्षित करतील. येथील स्थळांची नावे ही ब्रिटिश अधिका-यांनी दिलेली आहेत. कसे जावे महामार्ग - राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर अमरावती हे शहर आहे. तेथून चिखलदरा हे 94 किमी अंतरावर आहे. तेथून चिखलदरा येथे येण्यासाठी थेट एसटी सेवा आहे. रेल्वेने- मुंबई-हावडा या मुख्य रेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तेथून अमरावतीसाठी एस.टी. किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. अमरावतीहून चिखलदरा 94 किमी अंतरावर आहे. एसटी व खाजगी वाहन सहज मिळते. पर्यटकांना खुणावणारा चिखलदरा! महाराट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वंतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते. चिखलदरा या ठिकाणाला मनोरंजक इतिहास आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पार महाभारतात जावे लागते. पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदर्यात घालवला होता, असे म्हणतात. भीमाने येथील राजा कीचकचा वध करून एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकदरीचे रूपांतर चिखलदरीत झाले व चिखलदरीचे चिखलदर्यात. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भात सर्वाधिक ऊन असते. निसर्गाची शितलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. चिखलदरा येथील हजारो फूट खोल दर्या या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात. दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केली होती, त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे. असे म्हणतात. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. मेळघाट परिसर हा व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे चिखलदर्याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते. मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरीन तर मुक्त संचार करतात. उन्हाळ्यात मात्र येथे पानझडी सुरू होते. कारण हा जंगल परिसर शुष्क पानझडी अरण्याच्या प्रकारात मोडते. परंतु पावसाळा व हिवाळ्यात सातपुड्याला सह्यादी पर्वताचे रूप प्राप्त होत असते. चिखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात. दरीच्या पायथ्याशी काही पायर्या उतरून गेले असता देवी पॉइंट आहे. डोंगराच्या एक भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे. कुंडातून पाणी सरळ दरीत उडी घेते. देवीचे दर्शन झाल्यानंतर फेसाळलेला धबधबा मनमोहून टाकतो. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेत पॉइंटही आहे. वनोद्यानात संध्याकाळी कुटुंबियांसोबत फिरायला मज्जा येते. रात्री वाघांच्या डरकाड्या ऐकायला येतात. लहान मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही सोय येथे करण्यात आली आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कॉफी व स्ट्रॉबेरी. येथे कॉफी व स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. चिखलदर्याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर गविलगड़ किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहे. पंचबोल पॉइंट तर पर्यटकांना चक्राऊन टाकणारा आहे. चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट. चिखलदऱ्यापासून 11 किलोमीटर दूर डोंगरावर विराट देवीचे मंदिर बांधलेले आहे. देवीचे मंदीर पश्चिमेकडील खोल दरीत एका भुयारात आहे. तेथे जाणे अशक्य असल्याने नवे मंदिर बांधण्यात आले.कसे जाल?महामार्ग-राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर अमरावती हे शहर आहे. तेथून चिखलदरा हे 94 किमी अंतरावर आहे. तेथून चिखलदरा येथे येण्यासाठी थेट एसटी सेवा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱 09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा.. की निराश झालेल्या व्यक्तीला, तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= १) कोळशाचं सर्वात जास्त उत्पादन करणारा देश कोणता? अमेरिका २) 'जागतिक दृष्टीदान दिन' कधी साजरा केला जातो? 10 जून ३) 'लोसांग' हा उत्सव कुठे साजरा केला जातो? सिक्कीम ४) अमीर खुस्रो या कवीचं मूळ नाव काय आहे? मुहम्मद हसन ५) 'ए सुटेबल बॉय' हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? विक्रम सेठ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 गंगाधर तोटलोड, धर्माबाद माजी जि.प. सदस्य, नांदेड 👤 गजानन पामे, तंत्रस्नेही शिक्षक, परभणी 👤 स्वप्नील पाटील 👤 सुधीर वाघमारे 👤 भिमराव तायडे 👤 माधव बोडके, सहशिक्षक 👤 गंगाधर बोमलवाड, सहशिक्षक 👤 आशा मानकवार 👤 अभिषेक बकवाड 👤 लक्ष्मण श्रीरामे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *नेक* ज्यांचे खायचे अन् दाखवायचे दात एक असतात त्यांचे विचार खरोखर नेहमी नेक असतात खायचे अन् दाखवायचे नेहमी एक असले पाहिजे सोन्या सारख्या माणसाचे वागणे फेक नसले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'चहा' आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग, नुसते पेय नाही तर वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याला खास स्थान आहे.* *'चहा' ही दोन अनोळखी माणसांमधल्या नात्याची सुरूवात असते व त्यांच्यातील गहि-या होत जाणा-या नात्याचा 'चहा' एक साक्षीदार असतो.चहाभोवती अनेक आठवणी पिंगा घालत असतात.* *यातलंच एक अतिशय सुंदर, नाजुक,* *कधी हवंहवसं वाटणारं...* *आणि कधी आयुष्यभराची सल,* *देऊन जाणारं हळुवार नातं....** *'त्याचं आणि तिचं!'* *'चहा' च्या साक्षीने* *गुंफलं जाणारं..* *गुलाबी नातं....!* ••●🍵 ‼ *रामकृष्णहरी* ‼🍵●•• ☕☕☕☕☕☕☕☕☕ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही या जगात आलात आणि तुमची ओळख माणूस म्हणूनच झाली. जन्मानंतर आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो. तिथून मात्र आपण आपल्यासाठी काहीना काही करायला लागतो आणि कशाच्यातरी मोहात पडतो. हे माझं ते माझं म्हणत म्हणत सारं आयुष्य संपवतो. शेवटी आपण जन्माला येताना सोबत काहीच आणले नव्हते आणि शेवटी जे काही मिळवले ते इथेच सोडून गेले. मग मनुष्य जन्माला येऊन काय केले ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर काहीच सापडत नाही. याचे जर खरेच काही उत्तर मिळवायचे असेल तर आयुष्यात चांगले जगायचे असेल तर, आपल्या पश्चात इतरांसाठी काही ठेवायचे असेल तर पहिल्यांदा कोणत्याही गोष्टींचा मोह टाळायला शिका, आपल्यातला मीपणा नष्ट करा,एकटेपणात जीवन जगण्यापेक्षा इतरांमध्ये जगायला शिका. पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी आपले सुंदर जीवन दु:खाच्या खाईत लोटू नका, इतरांमध्ये सामील होऊन सुखदु:खांत मदतीचा हात पुढे करा, इतरांपेक्षा आपण जन्माला आलो आणि वेगळे काही करून आपला ठसा जनमानसावर उमटवा जेणेकरून तुम्ही मनुष्यजीवनाला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. पुन्हा आपल्याला ही संधी कधीच मिळणार नाही हे लक्षात असू द्या. मग तुमच्याच लक्षात येईल की, आपणास काय करायचे आणि काय करावे लागणार याचा नक्कीच उलगडा होईल आणि अनेक मोहापासून आपली सुटका होईल. आपले जीवन अधिक सुसह्य होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सार्थक* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment