✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/06/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफरसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता 💥 जन्म :- १९०० - लुई माउंटबॅटन, इंग्लंडचा भारतातील व्हाइसरॉय. १९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान. १९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९७८ - आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९९७ - जाक-इवेस कूस्तू, फ्रेंच संशोधक. २००९ - फाराह फॉसेट, अमेरिकन अभिनेत्री. २००९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असून देशात प्रामाणिक लोकांमध्ये जीएसटीबद्दल उत्साहपूर्ण वातावरण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी होणार मतदान* ----------------------------------------------------- 3⃣ *विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी अहमदाबादमध्ये केली आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या नवीन संघटनेची स्थापना* ----------------------------------------------------- 4⃣ *२०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही मिळणार प्रवेश* ----------------------------------------------------- 5⃣ *रेल्वे फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारून येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्यावी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली* ----------------------------------------------------- 6⃣ *विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधरच्या मतदारसंघासाठी आज मतदान* ----------------------------------------------------- 7⃣ *दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेत भारताने सलग दुसर्या विजयाची केली नोंद, पाकिस्ताननंतर केनियावर मिळविला विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाढदिवसाची मेणबत्ती विझविण्यापूर्वी...* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/39.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गेट वे ओफ इंडिया* मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे. भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. जॉर्ज विटटे यांच्या कल्पनेतून साकार झालेली वास्तू असून वास्तूचे बांधकाम पिवळ्या बसातर दगडात केले आहे. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. या वास्तूचे बांधकाम आणि त्यावरील सुंदर गुजराती शिल्पकला वाख्ण्याजोगी आहे. अशी भव्य-दिव्य वास्तू पहिल्या नंतर येथून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या. गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात. या फेरी बोटांचा प्रवास सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असून या बोटीतून प्रवास करण्यासाठी ८० ते १२० रुपये पर्यंत तिकीट आकारले जाते. त्याचबरोबर येथील देशी-परदेशी लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यागाड्या आणि टांगे. प्राचीन मुंबईत आलेल्या प्रत्येक पर्यटकाची पहिली पसंती असलेल्या या वास्तूसमोर छायाचित्र काढण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. गेट वे ऑफ इंडिया व भव्य विशाल अशा ताज होटेल समोर वेगवेगळ्या पोझमध्ये उभे राहून पर्यटकांचे फोटो काढण्यास अनेक छायाचित्रकार असतात. निव्वळ २० ते ५० रुपये आकारून हे फोटो काढून दिले जातात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) निकोबार द्वीपसमुहात किती बेटे आहेत ?* १९ *२) भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते ?* उत्तर प्रदेश *३) पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे पार पडली ?* नवी दिल्ली *४) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?* कृषी क्षेत्र *५) विल्यम शेक्सपिअरच्या निधनाला किती वर्षे पूर्ण झाली ?* ४०० *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 योगेश कात्रे, लिपिक आय सी डी एस बिलोली 👤 सुरेश कात्रे, धर्माबाद 👤 सौरभ लाखे 👤 प्रल्हाद कापावार 👤 ओम पालकृतवार, धर्माबाद 👤 अशोक तनमुदले, येवती 👤 रुपेश पांचाळ 👤 श्रेयस इंगळे पाटील 👤 संदेश कोडगिरे, धर्माबाद 👤 राजेश अलगुंडे 👤 रमाकांत गोणे 👤 नादयाप्पा स्वामी 👤 आदर्श गावंडे 👤 दीपक जायवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= @@ गुगली @@ *जग पहाते* डोळे झाकून दुध पिले तरी जग पहाते झाकून दुध पिले म्हणून दिसायचे थोडे रहाते कधीतरी अंधारातलं उजेडात येतच असते लपवून ठेवलेल गुपित माहित होतंच असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खलील जिब्रान म्हणतात, 'शिल्पकार व चित्रकार यांच्या कामापेक्षा एखाद्या शेतक-याचे, सामान्य कामगाराचे काम श्रेष्ठ दर्जाचे असते.' जीवन म्हणजे खरोखर अंधार. भर उन्हांत काम करणारा शेतकरी, धडधडत्या यंत्राबरोबर काम करणारा कामगार, धगधगत्या भट्टीजवळ काम करणारा मजूर आणि सीमेवर जीव धोक्यात घालणारा सैनिक ही कामातून केल्या जाणा-या अत्युच्च त्यागाची उदाहरणे. तुम्ही काम करता तेव्हा स्वत:ला स्वत:शी, इतरांशी आणि देवाशी जोडत असता. एखाद्या हमालाच्या अंगातून वाहणा-या घामाच्या धारा पाहिल्या की रक्ताचे पाणी करणे काय असते हे संवेदनशिल मनाला सहज कळते. पण कष्टाच्या भाकरीवर फार थोड्यांची श्रद्धा आहे.* *शेक्सपिअरच्या एका नाटकात काॅरिन नावाचा साधाभोळा मेंढपाळ भेटतो. तो म्हणतो.. मी खरा श्रमकर्ता, कष्टकरी आहे. माझी भाकरी मी मिळवतो. माझे कपडेही मीच बनवतो. मी कुणाची निंदा करत नाही. कुणाच्या आनंदाचा हेवा करत नाही. इतर लोकांच्या चांगल्या गोष्टी पाहून मला आनंद होतो. माझे दु:ख मी माझ्याशी ठेवतो. माझ्या जीवनात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या शेळ्यामेंढ्या चरताना पाहणं आणि त्या कोकरांना दूध पिताना पाहणं. काॅरिनच्या जीवनाची साधीसुधी संकल्पना पाहून माणसं जगू लागली तर आपल्या जीवनात कित्येक प्रश्न निर्माण होणार नाहीत. एक साधा मेंढपाळ एवढ्या नैतिक उंचीवरून बोलू शकतो तर शिकल्या सवरलेल्यांनी कोणत्या उंचीवरून बोलले, वागले पाहिजे हे सांगितलेच पाहिजे असे नाही.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ईश्वराचे नामस्मरण करणे म्हणजे विचलीत झालेल्या मनाला स्थिर करुन आपल्यातील नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे वळविणे होय. दैनंदिन जीवनात अनेक लहान मोठे प्रसंग घडतात. काही प्रसंग मनाला अस्वस्थ करतात तर काही मनाला प्रेरणा देतात. पण एखादा प्रसंग अस्वस्थ करणारा हा मनावर इतका परिणाम करतो की, कोणत्याही कामात अडथळा निर्माण करतो. मग अशावेळी आपणच म्हणतो की, आज काय झाले आहे ? शेवटी मार्ग सापडतो तो ईश्वराच्या नामस्मरणाचा आणि हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नामस्मरण केले असता आपल्यातील नकारात्मक उर्जा हळूहळू लोप पावायला लागते. आपला विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. एकप्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन समोर येणा-या अडचणींवर मात करुन यशस्वी होण्यास मदत होते. दिवसभराच्या कामात आळस येत नाही की, कितीही कठीण काम असले तरी ते सहज उरकल्या जाते. म्हणून आपल्या जीवनाला नवी उभारी, नवा उत्साह, नवा जोश, चांगले हातून काम करण्यासाठी, आनंदी प्रसन्न जीवन जगण्यासाठी ईश्वराचे नित्य नामस्मरण करायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रसन्न* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मातृभक्ती* त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment