✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/06/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६६ - शिव सेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली. १९७८ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण. 💥 जन्म :- १५९५: सहावे सिख गुरु गुरु हर गोविंद १९४५ - ऑँग सान सू की, म्यानमारची राजकारणी. १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक. 💥 मृत्यू :- १८६७ - मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट मृत्यूदंड. १९०२ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तेलंगणात जाण्याचा नाद सोडा, पालकमंत्री म्हणून तुमच्या भागासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळाचा २५ टक्के निधी सर्व विकास कामासाठी खर्च करू, कालबद्ध कार्यक्रमातंर्गत सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी धर्माबाद सरपंच संघटनेला दिली ग्वाही* ----------------------------------------------------- 2⃣ *डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात वाहतूकदारांनी आजपासून पुकारला देशव्यापी बेमुदत संप .* ----------------------------------------------------- 3⃣ *हागणदारीमुक्ती, स्वच्छता या क्षेत्रात महाराष्ट्राचे काम देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार काढत केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वर अय्यर यांनी राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह या क्षेत्रात काम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांचे केले अभिनंदन.* ----------------------------------------------------- 4⃣ *दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजवरुन ब्रॉड गेज रुपांतरास वन संवर्धन कायद्याची मिळाली परवानगी* ----------------------------------------------------- 5⃣ *शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना मिळाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा* ----------------------------------------------------- 6⃣ *उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथे राहणार्या एका चहावाल्याची मुलगी १२ वी मध्ये सीबीएसई बोर्डातून ९८ टक्के मिळवणार्या सुदीक्षा भाटी हिला अमेरिकेच्या प्रतिष्ठित बॉबसन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी मिळाली 3.8 कोटीची शिष्यवृत्ती* ----------------------------------------------------- 7⃣ *1008 रुपये देऊन मिळवा, 24 हजार रुपये पेन्शन! मोदी सरकारने 2015 मध्ये केली अटल पेन्शन योजना* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कॉलेजच्या विद्यार्थ्याची बायोमेट्रिक हजेरी!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_18.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ग्रामपंचायत* छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पहाते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. महाराष्टात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना असतात. ग्रामपंचायत कायद्यातील कलमे ▪मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी. ▪ग्रामपंचायतीचे कार्य चालविण्यास गावातील लोक आपले प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाने निवडतील. सदर सदस्यांचे मतदान हे प्रोढ व गुप्त मतदान पद्धतीने होईल. ▪ आरक्षण :- अ) ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ५०% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ब) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. क) इतर मागासवर्गीय घटकामध्ये मोडणाऱ्यांसाठी लोकांकरीता २७ % जागा आरक्षित आहेत. ▪ सद्स्यांची पात्रता :- १) तो गावातील ग्रामसभेचा सदस्य असावा. २ त्याचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. ३) त्याने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत. ▪ कृषी व पतपुरवठा क्षेत्रातील सहकार सोसायटीच्या अध्यक्षांना सहयोगी सदस्य म्हणून घेता येते. मात्र त्यास ग्रामपंचायतीची परवानगी लागते, आता ही पद्धत बंद झाली आहे. ▪ मुदत – ग्रामपंचायतिची मुदत ५ वर्षांसाठी आहे. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ६ महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक आहे व कोणत्याही परीस्थित मुदतवाढ मिळत नाही. ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा करण्याचा अधिकार राज्यशासन आहे. जर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिला तर पोटनिवडणूक घेण्याचा निर्देश किंवा बरखास्ती निर्णय राज्यशासन घेते. त्या संदर्भातील अहवाल जिल्ह्याधिकारी शासनाकडे पाठवितो. ▪ डोंगरी भागातील लोकसंख्येस ३०० ते १५०० लोकसंख्येत सात सदस्य असतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरुळ* 📱 9403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= १) 'इटर्नल इंडिया' हे पुस्तक कुणी लिहिलं आहे? इंदिरा गांधी २) भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? हिकेटियस ३) दह्यात कोणतं अँसिड असतं ? लॅक्टिक ऍसिड *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रताप भिसे, सहशिक्षक, नांदेड 👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली स्तंभलेखक, दैनिक देशोन्नती 👤 सुभाष दरबस्तेवार, पत्रकार दैनिक गोदातीर समाचार, कुंडलवाडी 👤 नारायण शिंगारे 👤 शंकर बेल्लूरवाड 👤 नागेश कोसकेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिखावा* आपल्याकडे कामं कमी अन् दिखावाच जास्त आहे असले काम करणाराला वाटते आपलेच रास्त आहे दिखाव्या पेक्षा जास्त आपल काम बोलत असतं दिखाव्यावाल्यांच काम जास्त दिवस चालत नसतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुखकर्ता आणि दुखहर्ता ही गणेशाची स्तुती फक्त स्तुतीच्या पातळीवर न राहता आपल्यात कशी परिवर्तीत होईल याकडे लक्ष हवे. आपले उलट होते आरतीतल्या शब्दांपेक्षा सगळे लक्ष प्रसादावर असते. त्यामुळे आसक्ती वाढते. आरती म्हणणे ही चार चौघांमधली सक्ती होऊन बसते आणि सक्तीने केलेले कोणतेही काम फलप्रद नसते. घरातल्या माणसांना जेवायला लागते म्हणून स्वयंपाक करायचा आणि मन:पुर्वक स्वयंपाक करायचा यात जो मुलभूत फरक, तोच फरक जगण्यातल्या अध्यात्मात आहे.* *तो फरक जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच बदल घडेल. अन्यथा फक्त प्रतिक्रिया घडत राहील. प्रतिक्रियावादी असणे आणि गुन्हेगार असणे यात व्यापक अर्थाने फार फरक नाही. जगण्याच्या व्याप-तापात माणूसपण संभाळणे गरजेचे असते. सामाजिक उत्सव आणि उपक्रमांत ते संभाळण्याची संधी असते, पण त्या संधीचे सोने किती लोक करत असतील ? समाजातील जास्तीत जास्त वर्ग अशा उत्सवांतून उजळून निघायला हवा.* ☘ *॥ रामकृष्णहरी ॥* ☘ 🍀🍀🍀🍀🍀🍀 -- *संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सर्वसामान्यपणे माणसाच्या जीवनात जीवन जगत असताना एखादे पुढचे पाऊल उचलायचे झाले तर तो एकदा सोडून दहावेळेस विचार करतो. कारण त्याला त्याचे धाडस नसते. जर आपण एखादे धाडस केले नि यश मिळाले नाही तर आपण पार बुडालो असे वाटते आणि यश मिळाले तर त्याचा त्याला आत्मविश्वास वाटत नाही. मग करायचे काय हा प्रश्न सतत भेडसावत राहतो. अशावेळी सर्वसामान्यपणे एक आपल्या मनाशी ठाम निश्चय करायचा आपण उचललेले पाऊल हे नक्कीच चांगले आहे त्यात आपल्याला नक्कीच यश मिळणार आणि यश मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण आपले पाऊल टाकण्याचे ठरवले तर नक्कीच यश मिळेल. अशावेळी कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही तर आपण केलेला निर्धार हाच तुमचा खरा साथीदार आहे. त्यानेच तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रवृत्त केले. तुमच्या चलबिचल होणा-या मनाला संयमीत ठेवून पुढे पाऊल टाकण्याची प्रेरणा दिली.म्हणून आत्मविश्वासाला कधीही ढळू देऊ नये. हे सर्व सामान्यपणे जीवन जगणा-या माणसाने ठरवले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हिऱ्याची पारख* थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !! राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत." तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे." आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय" राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे" सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !! सारांश जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !! *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. वाजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment