✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/06/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ६६७: वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. १८४४: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट. 💥 जन्म :- १८७८: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट १८९८: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर 💥 मृत्यू :- १५३४: योगी चैतन्य महाप्रभू १९३१: अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर १९७९: कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- जामा मशीदचे शाही इमाम यांनी ईद 16 जूनला साजरी करण्याची केली घोषणा, देशात कोठेही काल दिसला नव्हता चंद्र.* ----------------------------------------------------- 2⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पणजीत दाखल* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबईकरांचं पिण्याचं पाणी महागलं, पाणीपट्टीत आठ टक्क्यांची वाढ.* ----------------------------------------------------- 4⃣ *छत्तीसगड: पंतप्रधान नरेंद्र मोदींची भिलाई स्टिल कारखान्याला भेट* ----------------------------------------------------- 5⃣ *दिल्ली: अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह घेणार महत्त्वपूर्ण बैठक. २८ जूनपासून यात्रेला होणार सुरुवात.* ----------------------------------------------------- 6⃣ *एकविसाव्या फिफा विश्वचषकाला कालपासून सुरुवात, जगभरात फुटबॉल ज्वर शिगेला* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत वि अफगाणिस्तान कसोटी- मुरली विजयचं शानदार शतक. कसोटी कारकीर्दीतील 12 वं शतक.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक-विद्यार्थी संबंध वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सिद्धिविनायक (सिद्धटेक) सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती. इतिहास पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते. मंदिर मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते. भौगोलिक श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे. • सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर होड्या चालू असतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात. • दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे • पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. *संग्राहक* *राजेंद्र महाजन वेरुळ* 📱 9403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= *" फ्रेश सुविचार "* =========ஜ۩۞۩ஜ========= निवडलेला रस्ताच सुंदर असेल, तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणी असो वा नसो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= १) मँग्नीजचं सर्वात जास्त उत्पादन कोणता देश घेतो? रशिया २) विंध्याचल किंवा सातपुडा पर्वतरांगांमधून वाहणारी नदी कोणती? नर्मदा ३) आग्रा शहराची स्थापना कुणी केली? सिकंदर लोदी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनिल कांबळे, सहशिक्षक, नांदेड 👤 चंद्रकांत दुडकावार, सहशिक्षक, देगलूर 👤 दिगंबर मरकंटे, सहशिक्षक, बिलोली 👤 गणपतराव कात्रे, जेष्ठ शिवसैनिक, धर्माबाद 👤 किरण अन्नमवार, देगलूर 👤 आनंद पाटील,सहशिक्षक, धर्माबाद 👤 माधव उरेकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 संजय गैनवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 संजय नोमुलवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गोकूळ दुधारे सहशिक्षक प्रा.शा.तिसगाव कें.गल्लेबोरगाव ता.खुलताबाद जि.औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *विचार* दुस-याच्या विचारात लोक वेळ घालवतात कोणाला काय वाटेल स्वतःशीच बोलतात कोणाला काय वाटतं यापेक्षा स्वतःला काय पटतं ते पहावं रिकामे विचार करण्यापेक्षा आपलं आपण आनंदात रहावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *वंश टिकला तरच आपल्याला अन्नपान मिळत राहील, ही पितरांची काळजी कालिदासने 'शाकुंतल' मध्ये व्यक्त केली आहे. राजा दुष्यंतास मूल नसल्याने त्याची पितरे दुष्यंताच्या मृत्यूनंतर आपल्याला पिंडदान कोण करणार ? या विचाराने रडवेली होत. राजाने अर्पण केलेल्या जलाने आपले अश्रू धुवून मग उरलेले जल ती प्राशन करीत. अशा परिस्थितीत धार्मिकदृष्या बघितले तरी पितरे आपले वाईट करतील असा विचार करणे तितकेसे योग्य नाही. उलट त्यांच्याबद्दल आदरभाव राखला जावा.* *कुटुंबातील हयात ज्येष्ठांचा आदर करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आपले आई-वडिल जिवंत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अगर त्यांचा अपमान करणे, त्यांची काळजी न घेणे आणि मृत्यूनंतर मात्र पितरांचा त्रास होऊ नये म्हणून निरनिराळी कर्मकांडे करणे व्यर्थ होय. मातृदेवो भव:, पितृदेवो भव: असा उपदेश आपल्या संस्कृतीने केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करायचे, हे तर्कसंगत नाही. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, ज्येष्ठांचा आदर करणे सर्वात महत्वाचे आहे. अर्थातच ज्यांची कोणाची श्रद्धा असेल तर त्याने श्राद्धकर्मे जरूर करावीत.* •◆● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●◆• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात प्रत्येकजन कशानं कशाची मनात कोणती ना कोणती आशा ठेवून जगत असतो आणि त्या आशेमुळे काही ना सफल होईपर्यंत प्रयत्नही करत असतो. पण प्रत्येकवेळी त्यात यशस्वी होतोच असे नाही.अपयश आले तरी ते यश मिळवण्यासाठी प्रयत्नवादी असावे.निराश किंवा हताश होऊन चालणार नाही.प्रयत्नामध्ये सातत्य,आपल्या हाती घेतलेल्या कामावर ठाम विश्वास,मनाची एकाग्रता आणि आपल्यासमोर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर काम केले तर आपल्या मनातली असणारी प्रबळ इच्छा नक्कीच पूर्ण होईल.केवळ हातपाय न हलवता किंवा कोणतेही ध्येय आपल्यासमोर नसेल तर आपल्या जीवनात आशेच्याऐवजी पदरात घोर निराशा पडल्यावाचून राहणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुरक्षा* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मुंग्याची शिकवण* उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?' तात्पर्य: ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment