✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/06/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८३ - सॅली राइड पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री झाली. २०१३ - भारताच्या उत्तराखंड राज्यात मुसळधार पाउस पडून मंदाकिनी व अलकनंदा नद्यांना महापूर. शेकडो मृत्युमुखी, हजारो बेघर 💥 जन्म :- १८१८ - जेरोम कार्ल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९३२ - डडली आर. हर्शबाख, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९६४ - उदय हुसेन, इराकी नेता. 💥 मृत्यू :- १९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार या मासिकाचे संपादक. १९७१ - पॉल कारर, स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, मराठी साहित्यिक २००३ - जानकीदास, भारतीय चरित्र अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एम्स रुग्णालयात घेतली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - पुरग्रस्त राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल - पंतप्रधान, नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला नितीश कुमार यांचा पाठिंबा बिहारलाही विशेष राज्याचा दर्जा देण्याची केली मागणी* ----------------------------------------------------- 4⃣ *इंजिनियरिंग प्रवेश अर्ज भरण्यासाठी २३ तारखेपर्यंत मुदत वाढ* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई: काही तासांच्या विश्रांतीनंतर दक्षिण मुंबई आणि परळ भागात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली- केजरीवालाबरोबर उपोषणाला बसलेल्या सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात केलं दाखल, उपोषणामुळे प्रकृती बिघडली* ----------------------------------------------------- 7⃣ *फिफा वर्ल्डकप २०१८: जगज्जेत्या जर्मनीला मेक्सिकोने 1-0 ने हरवले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागरूक पालक हेच मालक* मनुष्याच्या जीवन विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे मनुष्य सुसंस्कारी, सदाचारी आणि शीलवान बनतो. शिक्षणामुळे त्याला जीवन जगण्याची एक नवी दृष्टी मिळते. ज्याच्या आधारावर तो स्वतःचा विकास तर करतोच शिवाय........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_61.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नीरजा* आज आपल्या पैकी खुप जणांना "नीरजा भनोत" कोण हे ही माहीत नसेल. "नीरजा भनोत" ही एक भारतीय विरांगना होती जीने 1986 साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचवीले .आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची "अशोक चक्र" हां वीरता पदक मिळविनारी भारतीय ठरली होती. पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगणेला विसरून गेले. नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी. 5 सप्टेम्बर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात 400 प्रवासी होते. निरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते. विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली. त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले. निरिजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यां पर्यंत पोहोचविले. निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन निरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या. अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तिन जणांना मारून टाकले. निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला. निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तीचा अंत झाला . 17 तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवुन निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला. निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला. त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे. भारताने निरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले. पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हां सर्वोच्च पुरस्कार दिला. अमेरिकेने जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड हां वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले. खरच, नीरजच्या बहादुरीला आणि तिच्या समयसूचकतेला विसरून चालणार नाही. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ औरंगाबाद* 📱 9403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील, तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= १) भारतात पहिल्यांदा कधी आणीबाणी जाहीर केली होती? १९६२ २) आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी असतो? २१ जून ३) पहिला फॅक्टरी अँक्ट कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला? लॉर्ड रिपन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनंत उत्तरवार, सहशिक्षक, माहूर 👤 उद्धव भाईवाल 👤 कवी गंगाधर हरणे, वसमत 👤 भीमराव रुद्रवाड 👤 वैभव कुमारे, पांगरी 👤 सुनील लोखंडे 👤जयदीप वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *आंधळी भक्ती* काही भक्तांची खुपच आंधळी भक्ती असते आंधळ्या भक्तिवाल्यांना कधीच मुक्ती नसते आंधळ्या भक्तिवाले फार लवकर फसतात फसल्याचे कळाले की क्लेश करत बसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कृषिसंस्कृतीत सापाला अनन्य स्थान आहे. वावरात साप दिसला की तो आपला राखणदार आहे, असं लोकमानस मानतं. शेतक-याची संपत्ती म्हणजे त्याचं शेत आणि कुठल्याही संपत्तीचं; विशेषत: गुप्तधनाचं साप राखण करतो, अशी लोकांची भाबडी श्रद्धा असते.* *काया वावरात सरप ताजातुजा* *मारू नको बापा पुरवधीचा राजा* *अशी लोकवाङमयाची शिकवण असते. शेतक-यांच्या आणि सापांच्या कितीतरी लोककथा आहेत. सापाला पुरूषतत्वाचे प्रतिक मानतात. त्यामुळेच वारूळस्थ नागाची पूजा करतात. पृथ्वी स्त्रीरूप आणि साप पुरूषरूप.. त्यांच्या संयोगातून समृद्धी नांदते अशी लोकसमजूत असते. मुळात साप शेतीचा सहाय्यक म्हणून रक्षणकर्ता असतो, पण तो राखणदार असतो ही लोकश्रद्धा. काही का असेना पण वावरातील सापाला सहसा मारत नाहीत. तो शेतीला उपद्रवी उंदरांसारख्या प्राण्यांचा नाश करतो म्हणून शेतक-यांचा मित्र असतोच.* *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दूध तापविल्यानंतरच दूधापासून अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात आणि त्याचा खाण्याचा मनसोक्त आनंद सारेजण घेतात.त्याचप्रमाणे परोपकारी माणसांचेही तसेच आहे.ते स्वत:च्या जीवनाचा कधीच विचार करत नाहीत.त्यांचे जीवन म्हणजे एक ज्ञानकुंडच असते.ते नेहमी आपल्याकडून जे जे काही इतरांना देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करत असतात.ज्या आपल्या देण्याने इतरांना आनंद आणि समाधान मिळेल.परार्थासाठी दूधाप्रमाणे आपले जीवन समर्पित करीत असतात.ते कधीही मी केले आहे,माझ्यामुळेच शक्य झाले आहे असे म्हणत नाहीत किंवा म्हणूनही दाखवत नाहीत. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समुद्र* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चुकीची कबुली* " एक बैल जंगलात चरण्यासाठी जात असे. त्या जंगलात जवळच गवताळ कुरण होते तिथे बैल चरत होता. त्याच्या नकळत एक सिंह त्याच्यवर लक्ष ठेऊन होता. लांबवर एका झुडपाच्या मागे लपून सिंह, बैल शिकारीच्या टप्यात येण्याची वाट बघत होता. सिंहाने बैलावर हल्ला केला पण बैलाने संधी साधून सिंहच्या तावडीतून स्वताची कशीबशी सुटका करून घेतली. बैल एका गुहेत आश्रयासाठी पळून गेला. या गुहेचा वापर मेंढपाळ स्वतासाठी आणि मेंढयांसाठी करीत असत. जोरदार पाउस किंवा वादळवारे सुटलेल्या मेंढपाळ मेंढ्यांना या गुहेत नेत असत. बैल गुहेत शिरला तेव्हा त्या गुहेत एक बोकड राहिलेले होता. गुहेत बैल आलेला पाहून बोकड रागावला. आपल्या ताकतीची पर्वा न करता तो बैलाच्या अंगावर धावून गेला. आपल्या छोठ्याशा शिंगांनी बैलाला जखमी करण्याचा तो प्रयत्न करू लागला. बैल त्याला काहीच प्रतिकार करत नव्हता. गुहेच्या बाहेर सिंह उभा आहे हे माहीत असल्यामुळे बैलाने त्याला प्रतिकार केला नाही. बैल बोकडाला म्हणाला ,मी तुला घाबरत आहे असे तू वाटू देऊ नको. तू मनातही असा विचार अनु नकोस. ज्या क्षणी सिंह गुहेच्या दारापासून निघून जाईल त्या क्षणी मी तुला आयुष्यभर लक्षत राहील असा धडा शिकवेन . बोकडाला आपली चूक समजली आणि त्याने बैलाची क्षमा मागितली. *तात्पर्य - आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते."* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा. गोजेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment