युगे युगे क्रीडेत रंगले अवकाशाचे असीम अंगण तेजोनिधिभोवती फिरतसे अचूक ग्रहगोलांचे रिंगण. धूमकेतुही येती जाती नक्षत्रांच्या रचना सुंदर उल्का तेजे क्षणिक तळपती खेळ चालला असा निरंतर मंथर गती या वसुंधरेची साथीला छोटासा चंदर प्रदक्षिणेची होता पूर्ती म्हणतो आले नव संवत्सर दिन रजनीचे येणे जाणे सहा ऋतूंचे सहा तराणे गतीमान त्या हिंदोळ्यावर तुमचे अमुचे झुलते जगणे. आदि अंत ना या जिवनायाखेळाच्या वळणावरती या थांबुन करुया नववर्षाला नवा सलाम 👏👏👏👏👏👏👏👏

संकलित

1 comment: