✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट झं 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८५५ - आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली. 💥 जन्म :- १८८४ - पीटर डेब्ये, नोबेल पारितोषिक विजेता डच रसायनशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- १९४६ - अलेक्झांडर अलेखिन, रशियन बुद्धिबळ खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *बंगळुरू: कर्नाटक सरकारकडून लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची घोषणा* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : रामलीला मैदानावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू.* ----------------------------------------------------- 4⃣ *यवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ.* ----------------------------------------------------- 5⃣ *तिरूवनंतपूरम : वरून काटे व आत गोड, रसाळ गरे असलेल्या फणसाला केरळ राज्याने बुधवारी राज्यफळाचा मान बहाल* ----------------------------------------------------- 6⃣ *महाबळेश्वरमध्ये तापमानात कमालीची घट, तापमान 10.3 अंशांवर.* ----------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली - गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज 27 मार्चपर्यंत स्थगित* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीरामनवमी विशेष* रघुपती राघव राजाराम ..... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ नदीच्या अगदी पात्रात एक समाधी आहे. ती ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची आहे. त्यांचे नाव आताच्या पिढीला माहीत नसल्यास आश्चर्य नाही. विधी आणि वैद्यक या शास्त्रांचा अभ्यास केलेले अण्णासाहेब समाजकारणातील आणि राजकारणातील धुरिण होते. इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. ते अत्यंत तेजस्वी बुद्धीचे स्वदेश व स्वधर्म याबद्दल प्रखर अभिमान बाळगणारे होते. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने दिपून न जाता भारतीय संस्कृतीच्या व संस्कारांच्या तागडीत ती तोलून पाहण्याची बुद्धी त्यांच्यात होती. इंग्रजी राज्य आणि पाश्चात्य संस्कृती यांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांच्या उठावाला मान देण्यापासून विधवा विवाहापर्यंत आणि परराष्ट्रीय चळवळीपर्यंत सर्व उपक्रम करण्याची त्यांची तयारी होती. यामध्ये संस्था स्थापन करणे, वृत्तपत्रे काढणे कारखाने उभारून स्वदेशी उत्पादन करणे या सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव होता.- जगदीश विष्णू जोशी *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ?* संत ज्ञानेश्वर *2) अभंगवाणी कोणाची प्रसिद्ध आहे ?* संत तुकाराम *3) मनाचे श्लोक कोणी लिहिले ?* संत रामदास *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सोमनाथ वाळके, सहशिक्षक, बीड 👤 राम मठवाले,सहशिक्षक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *ध्यास* काही काहींना सतत नव्याचा ध्यास असतो यशस्वी होण्याचा तोच तर खरा श्वास असतो ध्यास धरणाराला खरं यशस्वी होता येत ख-या अर्थाने यशाचं गाणं त्याला गाता येत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.* *रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.* 🌹 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹 🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना वादच करायचा असतो त्यांना कोणतेही कारण लावून करता येतो.अशा वादांमुळे माणसांचे असलेले चांगले संबंध विनाकारण बिघडून जातात.पण ज्यांना सुसंवाद साधायचा असतो ते मात्र एखादे चांगले कारण शोधून जीवनात काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे त्या जीवनात इष्ट बदल घडवून नवे करण्याची जीवनाला मिळावी व जीवन समृद्ध व्हावे यासाठी एक सुसंवादातून दिशा मिळते.म्हणून जीवनात वाद करण्यापेक्षा सुसंवाद साधण्याचे अधिक प्रयत्न करायला हवेत. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *जशी देणावळ तशी धूणावळ* - जशी मजुरी द्याल, तसेच काम होईल. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ========ஜ۩۞۩ஜ= 〰〰〰〰〰〰 *मूल्यांकन* एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,"तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?" सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही." मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला," मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे." हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले. *तात्पर्य-व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून किंवा त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात.* 〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment