*" नातं कसं असावं "* नातं सन्मानित करणारे असावे, अपमानित करणारे नसावे। नातं प्रेरणा देणारे असावे, वेदना देणारे नसावे। नातं बळ देणारे असावे, घाव देणारे नसावे। नातं साथ देणारे असावे, स्वार्थ पाहणारे नसावे। नातं सुखावणारे असावे, मन दुखावणारे नसावे। नातं बदल घडवणारे असावे, बदला घेणारे नसावे। नातं समज देणारे असावे, गैरसमज वाढवणारे नसावे। नातं कौतुकास्पद असावे, संशयास्पद नसावे। नातं विश्वसनीय असावे, प्रशंसनीय नसावे। नातं खोडकर असावे, बंडखोर नसावे। नात्यात वाद असावा, राग नसावा। नात्यात परखडपणा असावा, परकेपणा नसावा। नात्यात प्रामाणिकपणाला वाव असावा, आविर्भाव नसावा। नात्यात उपकार असावा, अहंकार नसावा। नात्यात मोकळीक असावी, देख-रेख नसावी। नात्यात मर्यादा असावी, बांधिलकी नसावी। नात्यात परिचय असावा, संशय नसावा। नात्यात चिडवणे असावे, फसवणे नसावे। नात्यात रूसणे असावे, नात्यात उसणे नसावे। नात्यात विचारपूस असावी, चौकशी नसावी। नात्यात तृष्णा असावी, वासना नसावीl नात्यात ओढ असावी, नको ती खोड नसावी। नातं समाधानकारक असावे, बंधनकारक नसावे। नातं उपायकारक असावे, अपायकारक नसावे। नातं शोभनीय असावे, उल्लेखनीय नसावे। नातं म्हणजे संवाद, नसे ते अपवाद। नात्यात असे शब्दांना जाग, भासे आठवणींचा भाग। नातं म्हणजे तात्पुरता सहवास नसावा, आयुष्यभराचा प्रवास असावा। नात्यांमुळे जीवनाला अर्थ, नात्यांविना सारं काही व्यर्थ।l *Relation is Great* *Creation of the God !!!* 💐🌳👌☘☘👍🌱🌴👏🌴🌱☘☘🌳💐💐
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment