*मोल जाणूया सत्याचे*
कलीयुगात सत्याचे
मोल झाले कमी
प्राणीमाञाबद्दल जिव्हाळ्याची
दिसत नाही हमी
जन्मदात्याचा उपकाराची
जाणीव नाही राहिली मनी
कावडीने काशी दर्शनासाठी नेणारा
श्रावण बाळ आहे का कोणी ?
कलयुगात सत्याच
मोल झाले कमी
तोंडापुरते गोड बोलणाऱ्याची
आज मिळते हमी
रोष आणि विरोध
दिसते इथे सारे
चांगले काम करणाऱ्याला
माञ बांधावे लागतात पसारे
तोंड दाबुन बुक्क्यांचा
मार इथे असतो
असा फापटपसारा
रोज माञ दिसतो
कलीयुगात सत्याचे
मोल झाले कमी
हरिशचंद्रासारखा राजाची
आज आहे कमी
〰〰〰〰〰〰
✍ प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment