स्वरचित काव्यरचना
*माझी वाटचाल*
स्ञी जन्माला आली तु
हीच आहे तुझी पुण्यायी
घेऊन नवी दिशा नवी वाट
आज महिला दिनाची आहे मंगलमय पहाट
जीवन असले आपुले संघर्षाचे
वाटेत काटे रुजतील धोक्याचे
कुणास न घाबरता जग तू अभिमानाने
यशाचा शिखरावर जा तू
प्रयत्नाने
जीवनाच्या या लढाईत
आहेस तू मजबूत
सक्षम होऊनी चालूया
समानतेचा हक्काने जगूया
स्ञी जन्माला आली तू
हीच आहे तुझी पुण्यायी
💐🌺🌹☘🌹💐🌹
*महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा!*
〰〰〰〰〰〰
*✍स्वरचित काव्य*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.(सहशिक्षिका)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment