✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक महिला दिन.* 💥 ठळक घडामोडी :- १९४३ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला. १९८८ - फोर्ट कॅम्पबेल, केन्टकी येथे दोन हेलिकॉप्टरची टक्कर. १७ सैनिक ठार. 💥 जन्म :- १९६३ - गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 📺📺📺📺📺📺📺📺📺📺 *ही audio* ऐकण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे. https://drive.google.com/file/d/1P5wSFlTAzNcKDSzWhtG0oFFpLlp2P_yx/view?usp=drivesdk *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात सिंगापूर आणि इंडोनेशियाचा दौरा करणार असल्याची सुत्रांची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - आजारपणावरील उपचारांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेला रवाना* ----------------------------------------------------- 3⃣ *समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना राज्यसभेची उमेदवारी.* ----------------------------------------------------- 4⃣ *अमरावतीत तयार होणार विमान हल्ला विरोधी तोफा, 540 एकरावर, 400 कोटींची गुंतवणूक, भारत डायनॅमिक्स लिमिटेड चे अध्यक्ष व्ही. उदय भास्कर यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *नंदुरबार : अपंग युनिट अंतर्गत बोगस शिक्षक भरती प्रकरणी विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा, एसआयटी द्वारे चौकशी करण्याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा* ----------------------------------------------------- 6⃣ *उस्मानाबाद : बोगस परीक्षार्थीला बसवून सरकारी सेवेत रुजू झालेले 15 अधिकारी अटकेत.* ----------------------------------------------------- 7⃣ *गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कॅप्टनपदी नियुक्ती.* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : मराठी राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर, डॉ. शरयु शहा, अथर्व सुतार, रुचिता महानोर आणि दीप्ती क्षीरसागर यांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= साहित्य स्पंदन आणि आपली माणसं समुहाकडून जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित *मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धा* निकाल .....! निकाल ......! निकाल ..... http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_13.html पूर्ण निकाल पाहण्यासाठी वरील ब्लॉगला भेट द्यावे. =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक महिला दिन* महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करावा यासाठी आवाहन केले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) यूनोने जाहिर केलेले जागतिक महिला वर्ष कोणते ?* 1975 02) जगात पहिला महिला दिन केव्हा आणि कुठे साजरा झाला ? २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क *03) भारतात जागतिक महिला दिन केव्हा पासुन सुरुवात झाली ?* 1943 *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ नुतिवाड, पेंटर, नायगांव ध. 👤 संभाजी पाटील, सहशिक्षक, जळगाव 👤 बालाजी कदम, चिरली 👤 मारोती भोसले, सहशिक्षक, धर्माबाद 👤 उत्तम शिंदे, सहशिक्षक, नायगांव 👤 श्रीनिवास भुतावळे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्त्री शक्ती* बाहेर फक्त घोषणा देतो स्त्री म्हणजे शक्ती आहे माय माऊलीला खरंच घरात किती मुक्ती आहे कर्मात अन् विचारात तिला मुक्ती असावी वरवर दाखवण्या पुर्ती महिला भक्ती नसावी महिला दिनाच्या शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 दि.08:03:2018 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"* 😢 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 😢 😰😰😰😰😰😰😰😰😰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चांगल्या आणि उच्च विचारांची पायाभरणी ही आपल्यावर झालेल्या संस्कार आणि शुद्ध आचरणावरच अवलंबून असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *भित्यापाठी ब्रह्मराक्षस* - भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *माझी वाटचाल* स्त्री जन्माला आली तु हीच आहे तुझी पुण्यायी घेऊन नवी दिशा नवी वाट आज महिला दिनाची आहे मंगलमय पहाट जीवन असले आपुले संघर्षाचे वाटेत काटे रुजतील धोक्याचे कुणास न घाबरता जग तू अभिमानाने यशाचा शिखरावर जा तू प्रयत्नाने जीवनाच्या या लढाईत आहेस तू मजबूत सक्षम होऊनी चालूया समानतेचा हक्काने जगूया स्त्री जन्माला आली तू हीच आहे तुझी पुण्यायी 〰〰〰〰〰〰〰 *✍स्वरचित काव्य* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.(सहशिक्षिका)* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment