✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/02/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. 💥 जन्म :- १९५७ - अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी. १९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार. १९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९५४ - पॉल, ग्रीसचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= ह्या बातमीपत्राची audio खालील लिंकवर ऐकता येईल. https://goo.gl/8jnrr8 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडें यांच्याविरुद्ध विरोधी पक्ष आणणार अविश्वास ठराव.* ----------------------------------------------------- 2⃣ *नांदेड : पॅथॉलॉजिस्ट विना सुरु असलेल्या नांदेड शहरातील 22 पॅथॉलॉजींचे परवाने मनपा आयुक्तांकडून निलंबित* ----------------------------------------------------- 3⃣ *अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे बारावी पेपर तपासणी बहिष्कार आंदोलन मागे* ----------------------------------------------------- 5⃣ *'द शेप ऑफ वॉटर' ठरला ऑस्कर 2018 यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट* ----------------------------------------------------- 6⃣ *मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली.* ----------------------------------------------------- 7⃣ *मेक्सिको येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टर प्रकारात पटकावले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्त्री जन्माचे स्वागत करू या* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= लोणावळा हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणेजिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे. पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे. मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाचीपॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"उद्योगी मनुष्य जीवनात यशस्वी होतो व त्याची भरभराट होते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) जालियनवाला बाग हत्याकांड कुणी घडविले ?* जनरल डायर *02) पोलाद तयार करताना कशाचा वापर होतो ?* मँगनीज *03) वन डे वंडर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* कपिल देव *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुरेश बावनकुळे, सहशिक्षक, माहूर 👤 श्रीकांत संतोष येवतीकर 👤 दत्ताहरी शिवलिंग दुड्डे, चिकना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *बुडबुडे* कितीही छान दिसो बुडबुडा फुटत असतो एकदा बुडबुडा फुटला की पुन्हा जुटत नसतो उगीच कोणी असे भ्रमात रहायला नको नको ते स्वप्न पाहून स्वप्नभंग व्हायला नको शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एकदा एक गृहस्थ आपली कैफियत घेऊन संत एकनाथांकडे गेला व म्हणाला...मला कसं जगावं हे समजत नाही, गोंधळल्यासारखं होतं. आपण त्याविषयी काही सांगावं. एकनाथ शांतपणे म्हणाले- "अरे तू तर थोड्या दिवसांचा सोबती आहेस. आठ दिवसांत तुझा मृत्यू होणार आहे. तू परोपकाराची कृत्य कर. जमलं तर दानधर्मही कर. म्हणजे लोक तुला दुवा ही देतील. जेवढं चांगलं करता येईल तेवढं कर, तुझं आनंदी आयुष्य तुला परत मिळेल.* *त्याप्रमाणे तो सारं करत राहिला. त्यात तो पूर्णपणे मग्न होऊन गेला. हळूहळू आठ दिवस संपले. आठव्या दिवशी तो झोपेतून जागा झाला, आपण जिवंत आहोत हे त्याच्या लक्षात आले. तो एकनाथांना म्हणाला..मी आठ दिवसांनीसुद्धा जिवंत आहे, हे कसे काय? संत एकनाथ म्हणाले-* *"त्यालाच तर आयुष्य म्हणतात. आठ दिवसांतील तुझे वर्तन-क्रिया आठवून बघ, म्हणजे आयुष्याचा अर्थ कळेल."* ⛳ *॥ रामकृष्णहरी ॥* ⛳ 🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻 *संजय नलावडे, चांदिवली,मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही लोकांचे म्हणणे असे आहे की, रंगमंचावरील कलाकार हे सगळ्यात आनंदी आणि सुखी असतात. पण माझे म्हणणे असे आहे की,सगळेच आनंदी आणि सुखी असतीलच असे नाही. कारण कलाकार हा आपल्या जीवनातल्या दु:खाला प्रेक्षकांसमोर किंवा जगासमोर कधीच येऊ देत नाही.तो फक्त लोकांच्या जीवनात असलेले दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करणे एवढेच काम करतो. तो आपल्या कलेच्या सहाय्याने निखळ मनोरंजन करणे व त्यांना आनंदी ठेवणे एवढेच माहीत असल्यामुळे आपल्या जीवनातले दु:खरे दु:ख मांडत बसलो तर प्रेक्षक म्हणतील घरी ते दारी काही जीवनात फरक आहे का ? कलाकार हा काही काळापुरता का होईना तो प्रेक्षकांच्या समोर असतो तेव्हा त्याचे सारे दु:ख विसरतो आणि रममाण होतो. म्हणून मला इथे म्हणायचे आपले दु:ख इतरांसमोर मांडून दु:खी न करता इतरांना कसे सुखात आणि आनंदात कसे पाहता येईल याचा विचार आपण सदैव करायला हवा, ज्यातून आपल्यालाही काही काळ सा-यांच्या सहवासात आपले असलेले दु:ख विसरून आनंदात घालवता येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बळी तो कान पिळी* - बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दूरदृष्टी* एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला. 'माणूस किती कृतघ्न असतो? स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचतो, धान्य संपले, मग मेंढया, मेंढया संपल्यावर बैल, कदाचित बैल संपल्यावर हा आपल्यालाही मारून खाईल, त्यापेक्षा आपण इथून पळून जाणेच चांगले' असा विचार करून कुत्रा तेथून पळून गेला. तात्पर्य 'अडचणीत सापडलेला मनूष्य स्वत:ची सुटका करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment