✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित. १९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. 💥 जन्म :- १९६५ - आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १८८३ - कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोरेगाव-भीमा हिंसाचारावर विधानपरिषदेत निवेदन, सरकार 9 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने वाढवली आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ; यापूर्वी आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती.* ----------------------------------------------------- 3⃣ *दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कायदा. तीन वर्ष शिक्षेची तरतूद करणारा कायदा आणणार. अन्न-औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांची माहिती. विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना केली घोषणा.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - समृद्ध जीवन फूडचा प्रमोटर महेश मोतेवार याची 101.30 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *बारावी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल 4 चुका. या चुकांमुळे विद्यार्थ्यांना 7 मार्क मिळण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ - जिल्ह्यात १७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा, १२७ विहिरींचे केले अधिग्रहण, पाणीटंचाईने धारण केले उग्ररुप* ----------------------------------------------------- 7⃣ *एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी कर्णधार सरदार सिंगलाच हॉकी संघातून डच्चू, संघाचे नेतृत्व मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुंधती रॉय* अरुंधती रॉय ( जन्म: २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात ) या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे. अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, ,मेघालय येथे झाला. त्यांचे हिंदूधर्मीय वडील रणजित रॉय हे चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत. दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सतीची प्रथा कोणी बंद केली?* 👉 राजा राममोहन रॉय *२) गीतांजली कोणी लिहिली ?* 👉 रविंद्रनाथ टागोर *३) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?* 👉 महात्मा फुले *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संजय भोसले 👤 धर्मपाल धरम 👤 व्यंकट भंडारे 👤 पार्थ पवार 👤 भगवान कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *गंडे दोरे* अशिक्षितासह सुशिक्षितही गंड्या दो-याच्या मागे जातात गंड्या दो-याच्या नादाने बळी गेल्यावर जागे होतात सुशिक्षितही अशिक्षिता सारखे वागू लागतात सुशिक्षित म्हणून हे असे कसे जगू शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चार अर्थपूर्ण वाक्य एकत्र आली की,सुंदर अर्थपूर्ण रचना किंवा परिच्छेद तयार होतो.अर्थात एक वाक्य दुस-यावर आधारीत असते त्यामुळेच एकमेकांचा एकमेकांशी सुसंगत अर्थ जुळतो. त्याचप्रमाणे चार माणसे एकत्र आली आणि एखाद्या चांगल्या आणि विधायक विषयावर चर्चा घडवून आणली तर एकमेकांचा जीवनव्यवहारही व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतो.म्हणून माणसाने एकत्र येऊन विचार विनिमय केल्यास जीवनविषयक असणारे प्रश्नही सहज सुलभतेने सोडविण्यासाठी मदत होईल.त्यासाठी माणसाने एकत्रीत येण्याची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *लहान तोंडी मोठा घास* - आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वावलंबन* एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्याच शहरात चालले होते. त्यांच्यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्वाराच्या हातून चाबूक खाली पडला. त्या व्यक्तिने त्या घोडेस्वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्याची तयारी दर्शविली पण त्या सहका-यास नम्रपणे नकार देत स्वत: खाली उतरून त्या घोडेस्वाराने चाबूक स्वत:च हातात घेतला. खालून मदत करणा-या व्यक्तिने याचे कारण घोडेस्वारास विचारले असता घोडेस्वार उत्तरला,''आपण ज्यावेळी घोड्यावर बसतो तेव्हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण राहिलो तरच आपल्याला यशाची खात्री आहे असे समजावे.'' तात्पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्वावलंबनाचा स्वीकार केल्याने यश मिळतेच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment