✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/03/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९०२ - नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व देशमान्य झाले. १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले. 💥 जन्म :- १९६९ - विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९९७ - नवकमल फिरोदिया, ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती. १९९८ - डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक. १९९९ - आनंद शंकर, संगीतकार. २००१ - जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी. २००३ - हरेन पंड्या, गुजरातचे माजी मंत्री(हत्या). २००३ - देविदास सडेकर, मराठी पत्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान संपूर्ण देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवणार मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - गिरीश महाजन आज सकाळी रामलीला मैदानावर जाणार, अण्णा हजारे यांच्याकडे सरकारचा प्रस्ताव मांडणार* ----------------------------------------------------- 3⃣ *कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आज सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर बसणार उपोषणाला, विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन ५ मार्च रोजी मागे घेतले होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : आजपासून पुणे ते रायपूर थेट नवीन विमानसेवा सुरू होणार* ----------------------------------------------------- 5⃣ *विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी  मुंबई शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला एका सामन्यासाठी केले निलंबित* ----------------------------------------------------- 7⃣ *मोहम्मद शमी कार अपघातात जखमी, ट्रकने कारला धडक दिल्याने झाला अपघात* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : श्रीरामनवमी संपूर्ण भारतात उत्साहात साजरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========     *कथा - गुरुदक्षिणा* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील  पेशींच्या  अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा  रोग आहे. प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत. बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्‍या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात. जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्‍या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्‍या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जो व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच व्यक्ती तुमच्या जीवनाला अर्थ देऊ शकते -,स्वामी विवेकानंद *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) दर्पण पेपर कोणी सुरू केले ?* आचार्य बाळशास्त्री जांभेकर *2) मराठा व केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?* लोकमान्य टिळक *3) साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केले ?* साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेश जेठेवाड, बरबडा 👤 महेश मुतूकले 👤 अविनाश कामटकर 👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद 👤 श्रीकांत सारकलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास* गमावलेला विश्वास पुन्हा मिळत नसतो मेलेला घोडा कोणाचा पुन्हा पळत नसतो एकदा विश्वास उडाला की पुन्हा विश्वास रहात नसतो कितीही विश्वास आहे म्हणा मनात अविश्वास जात असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्-भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते.जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *डोळ्यात केर नि कानात फुंकर* - रोग एक प्रकारचा व त्यावर उपाय भलतेच. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मुंगी आणि झाडाचे पान* एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती. एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या पानाचा आकार मुंगीच्या शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा होता. तरी सुद्धा मुंगी ते पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या व्यापार्या ला मजा वाटली व त्याने त्या मुंगीचे निरिक्षण करायला सुरवात केली. ती मुंगी तिच्या कामामध्ये ‘फुल्ली कॉन्सन्ट्रेडेड’ होती. ती इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिला तिचा मार्ग अचुक ठाऊक होता. ती उगीचच इकडे तिकडे भरकटत नव्हती किंवा आपला मार्ग चुकत नव्हती. तिच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. पण ते सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन चालली होती. हे बघून त्या व्यापार्याला त्या मुंगीचे कौतूक वाटू लागले होते. पण तिच्या मार्गात एक भला थोरला अडथळा आलाच. ती मुंगी ज्या कॉन्क्रीटच्या स्लॅबवरून चालली होती त्या स्लॅबला मोठी क्रॅक गेली होती. या क्रॅकच्या दोन्ही टोकांमधील अंतर बरेच जास्त होते. मुंगीला पानासकट ते अंतर पार करणे अशक्य होते. फक्त एकटी मुंगीच काय ती जाऊ शकणार होती. आता मुंगी काय करते या विषयी त्या व्यापार्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. त्या मुंगीने ते झाडाचे पान खाली ठेवले. थोडावेळ इकडे तिकडे भटकली. परिस्थितीचे निरिक्षण केले. मग ते पान एका टोकाकडून उचलले व त्या कॉक्रिटच्या फटीवर अशा रितीने टाकले की त्या पानाचा पुल तयार होईल. मग मुंगी त्या पानाच्या पुलावरून पलीकडे गेली आणि पलीकडच्या भागात पानाचे जे टोक आले होते त्याला धरून ते पान उचलून चालू लागली. मुंगीची ही कल्पकता बघून तो त्यापारी थक्क झाला. मुंगी ती केवढीशी तर तिचा मेंदू तर किती छोटा- बघायला मायक्रोस्कोपच हवा. पण मुंगीच्या या छोट्या मेंदुमध्ये सुद्धा परिस्थितीचे निरिक्षण करण्याची आकलन शक्ती तर होतीच पण आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी लागणारी कल्पनाशक्ती पण होती. सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन तिच्या वारुळापाशी आली. तिला ते पान आता आत, वारूळात न्यायचे होते. पण वारूळाचे दार म्हणजे एक छोटे छिद्र होते. त्या छोट्या छिद्रातून ते झाडाचे पान काही केल्या आता जाईना. मुंगीने थोडावेळ प्रयत्न केला. पण नंतर तिने तो नाद सोडून तिला व ते पान तेथेच टाकून एकटीच आत निघून गेली. महत्प्रयासाने त्या मुंगीने आणलेले झाडाचे पान काही तिला वारुळात नेता आले नाही. तिची सर्व मेहेनत बेकार गेली याचे त्या व्यापार्याच्या लक्षात आले व याचे त्याला खूप वाईटपण वाटले. पण त्याच्या लक्षात आले की अरे माणसांचे पण असेच असते. माणसे आयुष्यभर निरनिराळी पाने गोळा करत असतात, काहीजण तर यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. मग ही पाने विद्वत्तेची असोत, डिग्री-डिप्लोमा- सर्टिफिकेट सारख्या शैक्षणीक पात्रतेची असोत, धन-दौलत- श्रिमंतीची असोत, मान-सन्मान-प्रतिष्ठेची असोत, ऍवॉर्ड-बक्षीसे- मानाच्या पदव्यांची असोत नाहीतर अजुन कसलीतरी असोत. पण माणुस जेव्हा मृत्युच्या दारात पोचतो तेव्हा त्याला ही पाने मागेच ठेवावी लागतात, त्याला आपल्याबरोबर ही पाने काही नेता येत नाही. मग माणूस ढेर मेहेनत करून ही पाने का गोळा करत बसतो? आणि यातील किती पाने स्वतःसाठी व किती पाने इतरांसाठी दाखवण्यासाठी असतात? याचा अर्थ माणसाने पाने गोळा करू नयेत असा होत नाही. माणसाने पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा! ती मुंगी पान नेताना इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिच्या मार्गात अनेक सुंदर फुलांचे ताटवे येत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्या फुलांचा सुगंध येत होता तो तीला जाणवत नव्हता. आजुबाजुला अनेक सुंदर दृष्ये होती पण ती तिला दिसत नव्हती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून वारुळाच्या तोंडापर्यंत नेलेले पान काही तिला वारुळात नेता आले नाही. आपली अवस्था त्या मुंगीसारखी तर होणार नाही ना याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी नाही का? 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment