✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/03/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली 💥 जन्म :- १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे 💥 मृत्यू :- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी हवाई कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात, 40 जणांचा मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती* ----------------------------------------------------- 2⃣ * सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगितले. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या सहीचे पत्र देण्यात आले असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पटलावर सर्व पूर्ण मागण्या मांडणार असल्याची माहिती जे.पी. गावित यांनी सांगितली.* ----------------------------------------------------- 3⃣ *संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार : अशोक ढवळे* ----------------------------------------------------- 4⃣ *देशातील एक टक्के लोकांच्या हाती चार वर्षापूर्वी ४९ टक्के मालमत्ता होती, त्याचे प्रमाण आत्ता ७३ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. अर्थात सरकारच्या नितीमुळे गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत - सिताराम येचुरी* ----------------------------------------------------- 5⃣ *परभणी : पाथरी येथे 15 पथकाद्वारे महावितरणची विशेष वसुली मोहीम सुरु. पहिल्या दिवशीच केला 350 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, यात पाथरी पंचायत समितीचाही समावेश* ----------------------------------------------------- 6⃣ *अहमदनगर : महापालिकेकडून दरमहा मिळणारे पाच लाख प्रमाणे ८० लाख रुपये थकल्याने अभिकर्ता संस्था यशवंत अॅटोने सोमवारी सकाळपासून शहर बससेवा केली बंद.* ----------------------------------------------------- 7⃣ *निदाहास चषक -भारताचा श्रीलंकेवर 6 विकेट्सनं विजय* ----------------------------------------------------- *निधन वार्ता : धर्माबाद जि. नांदेड येथील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक मोहन नारसिमलू कामिनवार यांचे निधन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गोपीनाथ गणेश तळवलकर* गोपीनाथ गणेश तळवलकर (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पिनकोडचे विस्तारीत रूप काय आहे?* 👉 postal Index Number *२) पिनकोडमध्ये किती अंक असतात?* 👉 ६ *३) भारतात पिनकोड कधीपासून सुरू झाला?* 👉 १५ ऑगस्ट १९७२ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 भगवान कांबळे, पत्रकार, धर्माबाद 👤 रुस्तुम शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *बळी* कोणी कोणाचा उगीच अंत पहायला नको अंत पहायला म्हणून नुकसान व्हायला नको अंतच पहात गेलो की उलट परिणाम होतो वाईटा बरोबर चांगल्याचा मग त्यात बळी जातो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मनी वसे, ते स्वप्नी दिसे* - जशी इच्छा असेल, तशी स्वप्ने पडणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कड्यावर चरताना पाहिला. तेव्हा तेथे आपल्याला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन तो बकर्याला म्हणाला, 'अरे तू अशा उंच आणि अवघड जागी सगळा दिवस चरतोस, हे बरं नाही. एखादे वेळी पाय घसरून खाली पडलास तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा या मैदानात कोवळे गवत आणि गोड अशी झाडाची पानं आहेत ती खा, त्याने तुला जास्त समाधान मिळेल.' त्यावर बकरा म्हणाला, 'बाबा रे, तू म्हणतोस ते खरं, पण मला तू भुकेला दिसतो आहेस, म्हणून तू जिथे आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही.' तात्पर्य : - जे लोक स्वार्थी असतात, त्यांनी आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवूं नये, कारण त्यात काहीतरी कपट असते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
for web designers call / WHATS APP no 9689541131
ReplyDelete