✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना. 💥 जन्म :- १६३८ - शुंझी, चीनी सम्राट. १७६७ - अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष. १७७९ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिक : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने गोदा काठावर दोन हजार वादकांकडून ढोल ताशांचे महावादन जल्लोषात सुरू* ----------------------------------------------------- 2⃣ *नेपाळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 51 वर पोहचली, तर 20 जणांवर उपचार सुरु आहेत.* ----------------------------------------------------- 3⃣ *अयोध्या प्रकरणाची न्यायालयात 23 मार्चपासून सुरू होणार सलग सुनावणी* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तर प्रदेश - गोरखपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा उमेदवार 21 हजार 961 मतांनी विजयी* ----------------------------------------------------- 5⃣ *सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात सर्वत्र अवकाळी पाऊस ; आंबा काजू बागायतदारांवर अर्थिक संकट.* ----------------------------------------------------- 6⃣ *अभिनेता नरेंद्र झा यांचे वयाच्या 55 व्या वर्षी मृत्यू आणि शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांचं निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *निदाहास ट्रॉफी 2018 : बांगलादेशवर 17 धावांनी मात करत भारत तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये केला प्रवेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. जगदीशचंद्र बोस* पूर्वबंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २०२० साली होणारे ऑलिंपिक कोणते देशामध्ये होणार आहेत?* 👉 जपान *२) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?* 👉 यमुना *३) हेमाडपंत मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?* 👉 यादवांचा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक 👤 विलास फुटाणे, प्रकाशक 👤 संतोष कळसकर, देगलूर 👤 बालाजी मामीलवाड, मुखेड 👤 लक्ष्मण चिंतावार, बाळापूर 👤 लक्ष्मीकांत धुप्पे, नांदेड 👤 अंबादास पवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *शब्द* कोणी शब्द दिला की विश्वास ठेवला जातो लगेच विश्वास ठेवला की वेगळा अर्थ लावला जातो शब्द देणारा कडून शब्द पाळला जात नाही नंतर आरडून ओरडून काही फायदा होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *विरेंद्रराजे या नावाचे एक संस्थानिक होते. नगरप्रदक्षिणा करण्यासाठी ते आपला दरबारी लवाजमा घेऊन पहाणी करीत होते. एक दगडफोड्या अत्यंत एकाग्रतेने दगड फोडण्याचे काम करीत होता. राजा समोर येऊन उभा राहिला तरी त्याचे लक्ष नव्हते. शरीरातून घाम गळत होता, त्याचा घण आघात करीत होता. राजा गुणग्राहक होता, त्याला त्याची एकाग्रता भावली. राजाने त्याला आपल्या दरबारात काही काम दिले. प्रत्येक काम तो एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे व चोखपणे करू लागला. राजाची त्याच्यावर मर्जी बसली, बढती देता देता राजाने त्याला प्रधानपद दिले.* *प्रधानाने राज्याला प्रगतीशिल बनवले. राजाने त्याचा सत्कार केला. अनेक चित्रकारांकडून प्रधानाची उत्कृष्ट चित्र काढली. त्यातील तीन उत्कृष्ट चित्रांतून प्रधानाला एक सर्वोत्तम चित्र निवडायला सांगितले. प्रधानाने एक चित्र निवडले, राजाने त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला..पूर्वी मी दगडफोड्या होतो, या चित्रात दगडफोड्याही दाखवला आहे, माझा भूतकाळ उभा केला. म्हणून हेच चित्र सुंदर आहे. प्रधान आपला भूतकाळ विसरला नव्हता.* ••●🌟‼ *रामकृष्णहरी* ‼🌟●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात यश आणि अपयश हे आपल्या कर्मानुसार अथवा कृतीनुसार मिळत असते.जर तुम्ही तुमच्या निवडलेल्या कामात मन लावले आणि एकाग्रता ठेवली तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडले जाऊ शकते. त्याबरोबरच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.जर का तुम्ही कामात कामचुकारपणा केला की,नक्की समजून घ्या तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात आहे. म्हणून यश अपयश मिळवणे हे आपल्या करणा-या ब-यावाईट कर्मानुसार मिळत असते.मग आपणच ठरवावे की,आपण जीवनात यशस्वी व्हायचे की अयशस्वी ..! *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *लेकी बोले, सुने लागे* - एकाला उद्देशून, पण दुसर्याला लागेल असे बोलणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.* *त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...* *त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल......."* *मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये* *पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला* *वरुन माती पडतचं* *होती...काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.....सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून* *पाहीले,तर तो पहातचं राहीला...अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.* *लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.....* *असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला....* *आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???* *आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.* *म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो....शांत मनाने ती हाताळा.... खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....* *झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.* *मस्त रहा,आनंदी जगा....हेच जीवनाचे सार आहे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment