बिना लग्नाच्या मुलांची कविता *लग्न* वय झालं तरी अजून जमत नाही लग्न त्यात पोरींच्या अपेक्षांनी आडवं येतय विघ्न काय तर म्हणे ....... " व्यावसायिक नको नोकरीवाला पाहिजे पगार त्याचा सरकारी पाहिजे काळा नको गोरा गोरापान हवा सगळ्या बाबतीत कोरा करकरीत नवा घरा असावे दोन ताळी माडी दारात त्याच्या चार चाकी गाडी खेड्या ऐवजी शहरात असावा सासू सासऱ्याचा थोडाही त्रास नसावा तो असेल राजा मी होईल राणी कुणाचा डिस्टर्ब नको जेव्हा गाईन गाणी गर् गर् फिरणारा जो असेल भवरा माझ्या तालावर नाचेल तोच करीन नवरा ." संख्या कमी म्हणून मुलींचा रूबाब वाढलाय आधीच्या पिढीचा राग त्यांनी आमच्यावर काढलाय आमच्यासाठी आईबापानी मारल्या पोटातच मुली सांगा आता कशा पेटतील आमच्या संसारात चुली

संकलित

No comments:

Post a Comment