✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/03/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००५ - सम्राट कनिष्क या एर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली. 💥 जन्म :- १८७७ - मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा. १९४१ - रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा. 💥 मृत्यू :- १९४५ - गणेश दामोदर सावरकर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यातील शहरांपैकी १५२ शहरांसाठी १८५६ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *कोकणासह मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज. राज्यात हलका पाऊस होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 3⃣ *पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत आणखी एक घोटाळा झाल्याची तक्रार. 9.9 कोटींचा घोटाळा झाल्याची पोलिसात तक्रार दाखल.* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा ही जागा बिनविरोध* ----------------------------------------------------- 5⃣ *संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक न केल्यास मोर्चा काढू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : बिलोली पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी अजितकुमार डोके यांचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. 60 लाखांच्या घोटाळ्यात मुख्य आरोपी असल्याचा न्यायालयाचा अभिप्राय.* ----------------------------------------------------- 7⃣ *टी-20 मध्ये युवराज सिंगचा 74 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडणारा रोहित शर्मा ठरला भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा मॅगनीज खनिज साठ्यात भारतात कितवा क्रमांक लागतो?* 👉 प्रथम *२) मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?* 👉 मदर तेरेसा *३) दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?* 👉 सिंकदराबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रा. डॉ. सुरेश तेलंग, यशवंत महाविद्यालय, नांदेड 👤 अँड. कैलाश देशमुख गोरठेकर, उमरी 👤 अनिलकुमार जैस्वाल, कुपटी, माहूर 👤 अनिल कांबळे, जि. प. नांदेड 👤 कैलास एम. राखेवार, नांदेड 👤 बबलू भुसेवार, नांदेड 👤 सशिवम भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो खोटा खोटा विश्वास नुकसान करू शकतो आत्मविश्वास असावा पण खोटा नसला पाहिजे आत्मविश्वास म्हणजे आत्मविश्वास असला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• ☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *शितावरून भाताची परीक्षा* - एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= संत राबिया संत राबियाची ईश्वरभक्ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्वराचे स्मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्वरनिर्मिती मानून त्यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्त असताना तिच्या घरात चोर घुसला. त्याला राबियाच्या घरी धन तर सापडणार नव्हते. त्याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्याने डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्याला थोपटून पाहिले. तेव्हा त्याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्हा पुन्हा त्याची तीच अवस्थ झाली. चादर खाली ठेवली की त्याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्हा त्याला कोणीतरी म्हटल्याचा भास झाला,’’ तू स्वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्वत:चे अस्तित्व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्हा एक मित्र झोपतो तेव्हा दुसरा जागा असतो. मग त्याची कोणतीही वस्तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या राबियाचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला. तात्पर्य :-ईश्वराशी आपण एकरूप झालो की ईश्वरही आपली मनापासून काळजी करतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment