🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰〰 *🌺 जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰〰 *जोवर प्रकृतीच्या वर उठण्याची धडपड करीत आहे तोवर माणूस हा माणूसच असतो.ह्या प्रकृतीतही अंतःप्रकृती व बहिःप्रकृती अशी दोन उभयविध भाग असते.बाह्य प्रकृतीला जिंकणे ही फार चांगली आणि फार मोठी बाब आहे ह्यात काही शंका नाही.पण आपली अंतःप्रकृती जिंकणे ही खचितच त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे.* आपल्या ह्या उपयुक्तततावादी जीवनात आपले चांगले कर्मच आपल्या सोबत आपल्या अंतदायी स्वरुपात आपल्या दृष्टीआड कामी पडतील कारण आपल्या जीवनाचा जाळ फार मोठ्या विपरीत तान्या-बान्यानी विनला गेला आहे.जे दृष्टीगत होते ते वास्तविक नाही आणि जे आम्हाला दिसत नाही ज्याच्याशी आमचा संबंध नाही ते वास्तविक आहे. सत्य आहे दोन विपरीत किनाऱ्यांच्या मध्ये वाहनार्या नदीचे नाव जीवन सरीता आहे पूर्वेने पश्चिमेकडील याञेवर निघणाऱ्या सूर्याचे नाव🌞जीवन आहे . लोक उगवत्या 🌞सूर्याला तर🙏प्रणाम करतात.परंतु डुबत्या सूर्याला कोणी प्रणाम करत नाही.हीच जीवनाची भूल आहे.जन्म आणि मरणाच्या मध्ये जीवनाचे नीर वाहते,या दोन तटांमध्ये जीवनाची धारा वाहते. जसे जन्माच्या सोबत मृत्यू आणि मृत्यूच्या सोबत जन्माची छाया चालते. सावलीला कोणी पण कधीही वेगळे करू शकत नाही.कोणाच्या सावलीवर पाय ठेवून उभे राहून जा सावली पायाच्या वरती येवून जाईल डोक्याच्या वरती येऊन जाईल परंतु नष्ट होणार नाही.मृत्यूची पण हीच स्थिती आहे. आपण जेव्हापर्यंत संसारामध्ये कर्माच्या सूर्याच्या खाली चालत आहात.तेव्हापर्यंत जन्म मरणाच्या छायेचा अंत करू शकत नाही. म्हणून आपले चांगले कर्मच आपल्या कामी येतात. "मनुष्याच्या रुपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही.माणसाच्या कार्यामुळे,त्याच्या कर्तूत्वामुळेच त्याचा गौरव वाढत असतो." *शेवटी 🙏'कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो'*. *'कर्मे ईशू भजावा'.*🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) जि.प.प्रा.शा. वाटेगाव, हदगाव, नांदेड 〰〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment