✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/03/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००४ - तैवानच्या राष्ट्राध्यक्ष चेन शुइ-बियान वर हल्ला. २०१३ - राष्ट्रीय महामार्ग १७वरील खेडजवळ जगबुडी नदीवरील पुलावरुन बस नदीपात्रात कोळून ३७ ठार, १५ जखमी. 💥 जन्म :- १९८४ - तनुश्री दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. कर्करोगाचे त्वरित निदान झाल्यास उपचाराचा खर्च कमी होतो व रोगाची गुंतागुंतही कमी होते, कर्करोगाच्या उपचारांसाठी भरीव मदत देणार - मुख्यमंत्री ददेवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - देशातील प्रत्येक धर्मातील तरुण आणि तरुणांच्या शक्तीशिवाय देश बदलणे शक्य नाही : राहुल गांधी ,काँग्रेस अध्यक्ष* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर -2022 पर्यंत देशाला मोतीबिंदू मुक्त करणार - केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा* ----------------------------------------------------- 4⃣ *पाटणा - बिहारमधील सीतामढी येथे बस उलटून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 5⃣ *पालघरमध्ये रात्री 11 वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू, वीजपुरवठा खंडित* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर : विदर्भाच्या संघाने रणजी करंडकापाठोपाठ इराणी करंडकावरही कोरलं नाव* ----------------------------------------------------- 7⃣ *फायनलमध्ये भारताचा थरारक विजय, बांगलादेशचा केला चार विकेटने पराभव, निदाहस मालिका जिंकली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गणेश हरी खरे* गणेश हरी खरे (जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू०५ जून १९८५) हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) नुकतेच निधन झालेले नीरज व्होरा कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?* 👉 चित्रपट *२) दादाभाई नौरोजीनी कोणता सिध्दांत मांडला?* 👉 संपत्तीचे अपहरण *३) नुकताच कोणत्या देशाने चित्रपटगृहावरून बंदी उठवली आहे?* 👉 सौदी अरेबिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 केदार ढगे, बिलोली तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पत्रकार 👤 अशोक सोनवणे, मूर्तिकार तथा सहशिक्षक जिल्हा परिषद धुळे 👤 व्यंकटी पावडे, नांदेड 👤 मंजूषा देशमुख, अमरावती 👤 मनोज शेटकार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अनुकूल प्रतिकूल* प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कधीच अनुकूल नसते एकाला अनुकूल गोष्ट दुस-याला प्रतिकूल असते प्रतिकूल गोष्टींनाही अनुकूल करायचं असतं प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी ठरायचं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••● *ॐ 🚩 विचार धन 🚩 ॐ* ●•• *वसंतोत्सवातील उधाण आणि नवचैतन्याचा भर थोडा शमत येतो. झाडांना आलेली कोवळी पालवी चकचकीत रूप धारण करते. विविध रंगाची फुलं मनाला मोहून टाकतात. नव-अनुभूतीच्या स्पर्शानं मनाला उभारी येते आणि चैत्रपालवीच्या साक्षीनं नवीन वर्षाचा आरंभ होतो, _'वर्षप्रतिपदा !'_ घराघरातून गुढी उभारून त्याच्या आगमनाचं आम्ही स्वागत करतो. हिंदू मान्यतेप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. जीवनातील कोणत्याही नवीन कार्यप्रकल्पाची सुरूवात करण्यासाठी 'शुभदिवस.'* *खरं पाहता हा क्षण असतो गतकाळातील जीवनचक्राच्या पूर्ण झालेल्या एका फे-यात आम्ही काय मिळवलं, याचा शोध घेण्याचा. आत्मपरिक्षण करण्याचा आणि भविष्याचा वेध घेऊन नवा संकल्प निर्धारित करण्याचा. मानवनिर्मित फे-यांच्या वेदनादायी संघर्षातून स्वत:ची मुक्तता केली तरच जीवन आनंददायी होऊ शकेल. गुढीपाडव्याला आपण सर्वांनी आपल्या जीवन-जाणिवांची पुनर्तपासणी करण्याची आवश्यकता आहे. गरज आहे ती मानवनिर्मित अभिलाषांमधून स्वत:ची मुक्तता करून घेणा-या _'संकल्प गुढी'_ उभारण्याची !* ••●🚩 *रामकृष्णहरी* 🚩●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी. हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌻🌺🌸🌼🌹🌷🌻🌺🌸🌼🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलाचे पाय पाळण्यात दिसतात* - एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मनाची एकाग्रता* एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.'' तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment