✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९३ - डन्स स्कोट्सला पोप जॉन पॉल द्वितीयने संतपद बहाल केले. २००५ - मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले. 💥 जन्म :- १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १६१७ - पोकाहोन्टास, मूळ अमेरिकन स्त्री, पोव्हाटनची मुलगी. १८४३ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीत नागरिकांना अडचणीला तोंड द्यावे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. बृहन्मुंबई महापालिकेला त्यासाठी ५ कोटी रुपये निधी देण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले.* ----------------------------------------------------- 2⃣ *ऊर्जा निर्मिती व रेल्वेसाठी लागणारी इंजिन्स पहिल्यांदाच तयार होणार भारतात. फोर्स मोटर्स आणि रोल्स रॉईस यांच्यात 300 कोटींचा करार* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे 15 मार्चपासून बंद. जळगाव-मुंबई विमानसेवाही बंद.* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३२० कोटी ७ लाख रूपयांचा अर्थसंकल्प वादळी चर्चेनंतर अनेक कपात सुचना मान्य करत मंजूर* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर : माळीनगर भागातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात पार्सलमध्ये स्फोट, तीन जण जखमी, पोलिसांकडून तपास सुरु.* ----------------------------------------------------- 6⃣ *आजपासून महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या पुर्नपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू, एक तास उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात मिळणार प्रवेश* ----------------------------------------------------- 7⃣ *चॅम्पियन्स ट्रॉफी 20 षटकांची व्हावी, ही तर आयसीसीची इच्छा; बीसीसीआयचा मात्र विरोध* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"हसता हसता सामोरे जा आयुष्याला* *तरच घडवू शकाल भविष्याला* *कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही* *आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मुंडा आदिवासी जमात अधिक वास्तव्य असणारे राज्य कोणते?* 👉 झारखंड *२) दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?* 👉 संयूग *३) संयूगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या सौजन्या व अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयूगाच्या केलेल्या लेखनास काय म्हणतात?* 👉 रेणूसुत्र *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 स्नेहलता कुलथे, साहित्यिक 👤 पी. अनिल, तेलंगणा 👤 शिवा जी. गुडेवार 👤 प्रवीण बडेराव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *क्षमा* लक्षात ठेवा दुबळ्यांना फक्त द्वेष करता येतो दुस-या विषयी मनात आकस धरता येतो वीर मात्र चूकणाराला क्षमा करत असतात चूकणाराला क्षमा करणारे श्रेष्ठ ठरत असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'स्पर्शसुख' म्हणजे प्रेम नक्कीच नाही. तो प्रीतीचा मुळ रंग नव्हे. तो नुसता अभिलाषेचा तवंग ! एक सवंग लालसा ! जाता येता भेटत राहते, जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लार्कने तिकीट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ऑफिसरने फाईल देताना तेच. हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुध्दा सुटाबुटात चिकटुन जाते. वर पुन्हा ‘सॉरी’चं गुलाबपाणी शिंपडायचं आणि एक औशट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलिकडचा पुरूषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत. स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील.. पुटं !* *महाभारततील युध्द समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं. तरी कृष्णाचं ऐकुन तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच, अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितलं, ‘कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. जर मी अगोदर उतरलो असतो, तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता.’ आयुष्यभर "स्त्रीदेहाचं संरक्षण असाच कुणी अज्ञात कृष्ण करीत असला पाहिजे. नाहीतर पुरूषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वीच जळून गेला असता."* *~वपुर्झा* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔱🔱🔱🔱🔱🔱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्तेपुढे शहाणपण नाही* - ज्याच्या हाती सत्ता आहे :त्याच्या मतापूढ़े इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एकदा *एका उंदराने हिरा* गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या *उंदिराला मारण्यासाठी* एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा *सगळे उंदिर एक घोळका* करून एका दुसऱ्यावर *चढून दाटीवाटीने* बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून *वेगळा बसला* होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच *उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.* हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच *उंदराला कसे काय ओळखले?* शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, *जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!* आयुष्यात *धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा* पण *आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो.* आपण ह्या *समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका..* नाहीतर त्या *मूर्ख उंदिरामध्ये* आणि *आपल्यात* काहीच *फरक* उरणार नाही..! *माणसे जोडा* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment