✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/02/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे. २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. 💥 जन्म :- १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान. १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मेघालयचे पुढचे मुख्यमंत्री असणार कोनराड संगमा, नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद नाही- हिमंत बिस्वा, भाजपा* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर कर्नाटकमध्ये भाजपाच बाजी मारणार- अमित शहा* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात गारांचा पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा* ----------------------------------------------------- 5⃣ *विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.* ----------------------------------------------------- 6⃣ *आयपीएल : दिनेश कार्तिकची कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार म्हणून निवड.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मतदार जागृती आवश्यक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अलिबाग* अलिबाग (इंग्रजी - Alibaug) हे रायगड जिल्ह्याचे शासकीय मुख्यालय आहे. अलिबाग शहर समुद्रकिनार्याला लागून आहे. हे शहर महाराष्ट्रातील कोकण विभागात येते.अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचेसेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. आताचा रामनाथ परिसर हे तेव्हाचे मुख्य गाव होते. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे त्या वेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात. त्या काळात येथे बर्याच लढाया झाल्या. १७२२ मध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी कुलाब्यावर एकत्रित हल्ला केला होता, पण ते ती लढाई हरले होते. १८५२ मध्ये अलिबागला तालुक्याचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) महाराष्ट्रात खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?* लोणार जि. बुलढाणा *02) सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती ?* चार *03) फिरोजशहा कोटला मैदान कोठे आहे ?* नवी दिल्ली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक 👤 गंगाधर मदनूरकर, सहशिक्षक 👤 बाळू भगत 👤 अशोक कहाळेकर 👤 गं.बा. नुकूलवार, सहशिक्षक, देगलूर 👤बालाजी तिप्रेसवार, उमरी 👤 रमेश मेरलवार, करखेली 👤 समाधान शिंदे, कवी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *समर्पण* महत्त्व असेतच त्याग अन् समर्पणाला कोणाचे काय समर्पण माहित असते मनाला समर्पणा शिवाय कोणत काम होत नाही समर्पण नसेल तर त्यात राम रहात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस जाणतो की तो स्वार्थधुंदीत असत्याचा प्रयोग करीत आहे; पण सुखकर जगण्याच्या नादात त्याला अंतर्मनाविरूद्ध व्यवहार करावे लागतात. म्हणूनच आजही आपण पहातोच की जो 'नंबर दोन'चे धंदे करतो त्याच्याकडे संपत्ती-सुखे नांदताना दिसतात. आणि जो सत्य घेऊन बसला तो जागोजागी निराश, हताश होत दु:ख भोगताना दिसतो. कालपरवापर्यंत सामान्य जीवन जगणारा माणूस राजकारणात सत्तापदी पोहचताच पाहता-पाहता तो संपत्तीच्या राशीवर लोळताना दिसतो. मग 'सत्यमेव जयते'चे काय? सत्याचाच विजय होतो हे माणूस जाणत असूनही तो असत्याचा कैवारी का होतो? का होतोच नव्हे, तर होत आला, होत आहे आणि होत राहील.* *माणूस असा का वागतो? चोरी, भ्रष्टाचार ही पापकृत्य माहित असूनही तो का अंगीकारतो? त्याचे बाह्यमन अंतर्मनापासून अंतर ठेवून वागत असते तेव्हा ते बेडर आणि बेपर्वा झालेले असते. तेव्हा माणूस अपकृत्यात यशस्वी होणे ही अक्कलहुशारी समजून असत्याच्या नरकातील राज्यपद भोगत जातो. पण एक क्षण केव्हातरी त्याच्या जीवनात असा येतो की तो आपली असत्य कार्ये आपल्या अंतर्मनाजवळ मान्य करतो. कबुलीजबाब देतो. पश्चातापदग्ध होतो. परंतु काही लोक मरेपर्यंत अंतर्मनाशी संवाद करू शकत नाहीत. अशांना त्यांच्या पापकृत्यांची तमा नसेल तर त्यांचे अंतर्मनही मुक्ती मिळू देत नाही. कारण मुक्तीचा मार्ग हा अंतर्मनातून जातो.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रयत्नांती परमेश्वर* - कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांती साध्य होते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गर्विष्ठ मेणबत्ती* एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?' तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment