✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/03/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८९३ - केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली १९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान. २००० - चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर. २००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. 💥 जन्म :- १९४१ - इव्हान गास्पारोविच, स्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष. १९६३ - क्वेंटिन टारान्टिनो, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक. १९७० - मरायाह केरी, अमेरिकन गायिका. 💥 मृत्यू :- १९८१ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार. १९९२ - प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय. १९९७ - भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- कृषिमूल्य आयोगाची नेमणूक करा, कृषिमूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा द्या- अण्णा हजारे* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - संभाजी भिडेला अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घातल्याशिवाय जाणार नाही, प्रकाश आंबेडकरांचा इशारा* ----------------------------------------------------- 3⃣ *रशियातील शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, 37 जणांचा होरपळून मृत्यू* ----------------------------------------------------- 4⃣ *यवतमाळ - यवतमाळ जिल्हा परिषदेचा २९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, स्वउत्पन्नात १४ कोटींची वाढ* ----------------------------------------------------- 5⃣ *चंद्रपूर - वरोरा येथील स्टेट बँक एटीएमचे लॉक हायजॅक करून 23 लाख रुपये उडविले, 9 मार्चची घटना आज बँकेच्या निदर्शनास आली* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि कुसुमाग्रज यांचे बंधू डॉ. के. रं. शिरवाडकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *सुनीत जाधवचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. * ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : मागील तीन दिवसांपासून कमाल तपमान वाढत असून काल पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिते व्हा......!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड, (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, मार्च १०, इ.स. १८६३ - मृत्यू : मुंबई, फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालां दरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही मोठी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४). *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) यंदाचा महाराष्ट्र केसरी कोणाला मिळाला?* 👉 अभिजीत कटके *२) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत?* 👉 शरद पवार *३) हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?* 👉 जयराम ठाकूर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कु. समिक्षा सत्यजित टिप्रेसवार, नांदेड 👤 प्रमोद मोहिते 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤वैदेही चिल्का, ठाणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लबाड* स्वतःची बिडी पेटवायला दुस-याच माडी जाळतात अशांना स्पष्ट बोलायचं लोक का?बरं टाळतात स्पष्ट न बोलल्यामूळे अशा लबाडांचे फावते लबाड स्वहिता पुढे लोकाला काडी लावते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना मदत करण्यासाठीच करत असे. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली.* *राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे, पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला...व साधूला बोलावून घेतले आणि विचारले तुला विद्या शिकविण्याची आज्ञा केली, तर तू नकार दिला. पण मी तुझ्याजवळ राहून ही कला शिकलो आहे.* *साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते. ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्हे.* ••●💡‼ *रामकृष्णहरी* ‼💡●•• 💡💡💡💡💡💡 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उथळ पाण्याला खळखळाट फार* - केवळ बडबड करणार्यां कडून काम होत नाही. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मनियंत्रणाणाचे महत्त्व* एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. *तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment