✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/03/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक हवामान दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९३१ - भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी. 💥 जन्म :- १९३८ - मेनार्ड जॅक्सन, अटलांटाचा पहिला श्यामवर्णीय महापौर. १९७९ - इमरान हाश्मी, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- २००७ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. २००८ - गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शेतकऱ्यांना एकूण 3373 कोटी 71 लाख रूपयांची मदत जाहीर, केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे उचलणार खर्चाचा भार* ----------------------------------------------------- 2⃣ *संसदेकडून 'पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी (Payment of Gratuity) कायद्यात सुधारणा सुचविणाऱ्या विधेयकाला मंजूरी देण्यात आली, त्यामुळे भविष्यात २० लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युईटी करमुक्त असेल. यापूर्वी ही मर्यादा 10 लाख रुपये इतकी होती* ----------------------------------------------------- 3⃣ *उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरींचं नाव; खडसेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - उबेर टॅक्सीचालकांचा संप मागे, बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांनी संप घेतला मागे* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- गोदावरी नदीसह कोणत्याही नदीत रासायनिक पाणी सोडल्यास उद्योजकावर कारवाई करणार. प्रसंगी कारखाने सील करणार. आयुक्त तुकाराम मुंढे यांची उद्योजकांना तंबी.* ----------------------------------------------------- 6⃣ *मोहम्मद शामीवरील मॅच फिक्सिंगचे ग्रहण सुटले, बीसीसीआयकडून क्लीन चीट* ----------------------------------------------------- 7⃣ *तिरंगी मालिकेत भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्महत्या : एक चिंतन* ......जेंव्हा जगणेच मुश्कील होऊन बसते आणि यापेक्षा मेलेले बरे असा जेंव्हा विचार मनात येतो तेंव्हा आपोआप ती पाऊले आत्महत्येकडे वळतात. एकाच बाबीवर जास्तीत जास्त वेळा विचार केला की माणूस टोकाची भूमिका घेऊ शकतो. माणसासमोर अनंत कष्ट आणि अडचणी असतात. त्या सर्व समस्येवर कुठे ना कुठे पर्याय असतो. मात्र ही समस्या सुटणार नाही आणि माझे काही खरे नाही असे जेंव्हा आपल्या मनाला वाटते तेंव्हा माणूस जीवन संपविण्याचा मार्ग धरतो. मात्र आजची वेळ उद्या नसते........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कल्पना चावला ( मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात ) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीपला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जसजशी प्रगती होत जाते, तसतशा प्रगतीच्या मर्यादा जास्त जास्त जाणवू लागतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) गीतांजली कोणी लिहिले ?* रवींद्रनाथ टागोर *2) आनंदमठ कोणी लिहिले ?* बंकिमचंद्र चॅटर्जी *3) श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण ?* साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मल्लिकार्जुन शिवाजी तांदळे रा.तांदुळवाडी जि. परभणी 👤 सूर्यकांत आचार्य, निवृत्त शिक्षक 👤 साईनाथ सूत्रावे, करखेली 👤 विनायक नरवाडे 👤 अशोक गड्डमवार 👤 संजय मनुरे, हिंदी कवी, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *लोखंड* लोखंड गरम आहे तोवर घाव घालता येतो दक्ष राहून विरोधकाचा कसाही डाव टाळता येतो योग्य वेळी माणसाला घाव घालता आला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा सहज योग्य तुकडा केला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजच्या प्रसारमाध्यमांनी मनातल्या भावनांना बंदीस्त करुन टाकले आहे. मनातले विचार प्रकट करण्यासाठी संधीच उपलब्ध करून देत नसल्यामुळे माणसांच्या विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे चांगल्याही विचारांना मनातून बाहेर येण्यासाठी बांध घातला गेला आहे. त्यामुळे सुखी कोण..? आणि दुःखी कोण..? हे शोधणे अवघड होऊन बसले आहे. या सा-यांतून सुटका करायची असेल तर या प्रसारमाध्यमांपासून थोडे दूर राहून प्रचलित प्रसारमाध्यमांबद्दलचा मोह थोडा दूर ठेवला पाहिजे.* *त्याऐवजी थोडा संवाद, चर्चा, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करुन आपुलकीचे, प्रेमाचे, स्नेहाचे संबंध जोडण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. तरच प्रत्येकाला एकमेकांबद्दलची मनातली असणारी ओढ पूर्वीसारखी कायमची राहील. माणूस माणसाला विचारायला लागेल आणि जीवनव्यवहार सुरळीत चालायला लागतील. हाच माणुसकीचा धर्म जीवंत राहील अन्यथा माणसांपासून माणूस दूर जावून माणसामध्ये दडून बसलेली विकृती जन्मास येऊन सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही केलेला एक चांगला विचार तुम्हाला तर आनंद देतोच आणि त्या तुमच्या आनंदाबरोबरच इतरांनाही तुमच्या चांगल्या विचारांमुळे आनंद आणि प्रेरणा मिळते.म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या आनंदी जीवनाचा विचार करत नाही तर इतरांच्याही आनंदी जीवनाचा विचार करत आहात हे लक्षात असू द्या. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *हलवायाच्या घरावर तूळशीपत्र*- दुसर्याच्या जिवावर स्वतः उदार पणा दाखवणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म आणि धर्म* भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते. दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला," महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते." यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले," चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे." तात्पर्य- कर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment