🦅🦅🦅🦅🦅🦅
*साद चिऊताईची*
🦅🦅🦅🦅🦅🦅
दिसामागून दिस गेली
संख्या माझी ढळत गेली
अजुनही मानवी मनाला
साद कशी नाही आली
💧💦☘💧💦☘
अशी व्यथा माझी
कोणी बर केली
मुक्या जीवा माझा
वेदना ही सोसेना झाली
☘💦☘💧☘💧☘
एकएक करूनी
वाढायचे सोडूनी
कमी होत चाललो
आम्ही आभायातुनी
☘💧💦💧☘💧
आमच्या जीवाची
हाक तुम्हांला सांगू
तुमच्या सोयीसाठी
जीव नका आमचा टांगु
छपरावर घराचा
दाणा पाणी मला ठेवा
हाच माझा जीवनातील
अनमोल मेवा
☘🌴💧☘💦💧☘
जिव माझा वाचेल
तुमच्या हातुन
हीच साद घालुनी
येते मी परतूनी
☘💧💦☘💧☘
अशी चिऊचिऊची
साद मि घालते
अंगणी येते
आनंदाने बागडते
🦅🦅🦅🦅🦅
🙏🙏🙏🙏
*✍©प्रमिलाताई सेनकुडे*
〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment