✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज. १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला). 💥 जन्म :- १८१२ - विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री. 💥 मृत्यू :- १९१३ - हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी. १८९७ - सावित्रीबाई फुले १९९८ - लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात मदत करण्याची अमेरिकेच्या निओडॉक्टो फाउंडेशन कंपनीने दाखवली तयारी* ----------------------------------------------------- 2⃣ *काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. पंतगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन* ----------------------------------------------------- 3⃣ *महापुरुषांचं साहित्य वेब पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटींची तरतूद.* ----------------------------------------------------- 4⃣ *जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटींची तरतूद. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवण्यासाठी उपाययोजना.* ----------------------------------------------------- 5⃣ *नंदुरबार- दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला शहादा सेंटरवर कॉपी पुरविणारे तीन शिक्षक निलंबित. व्ही.के.शहा विद्यालयातील केंद्रावर घडला होता प्रकार.* ----------------------------------------------------- 6⃣ *हरियाणा- फरिदाबादमधील कृष्णा कॉलनी सेक्टर 25मधील पूल कोसळला. जडवाहन जात असताना घडली घटना. जिवीतहानी नाही.* ----------------------------------------------------- 7⃣ *कोणत्याही खेळाडूची कॉपी करु नका - अंजिक्य रहाणेचा सल्ला* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धेत सहभागी प्रमाणपत्र http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_3.html सहभागी सर्व स्पर्धकांनी हे प्रमाणपत्र download करून घ्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सावित्रीबाईनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथना आश्रय मिळवा हि त्याची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच १८७६ – ७७ मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या. आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांना मृत्यू आला. समाजातल्या दिनदलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचारणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) बावनकशी हे पुस्तक कोणी लिहिले ?* सावित्रीबाई फुले *02) सावित्रीबाई फुले यांचा जन्म केंव्हा झाला ?* 03 जानेवारी 03) हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?* बालिका दिन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शिवराज सावंत, सहशिक्षक, रत्नागिरी 👤 वीरभद्र मिरेवाड, सहशिक्षक तथा कवी 👤 साईनाथ शिरपूरे, भाजपा कार्यकर्ता 👤 नागनाथ लाड, सहशिक्षक, कुंडलवाडी 👤 विठ्ठल नवाथे, सहशिक्षक, सायखेड 👤 संतोष पवार 👤 उमाकांत बांगडकर 👤 शिवाजी जाधव, साहित्यिक, मरखेल 👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक 👤 माधव आप्पा पडोळे, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *तुलना* तुलना करावी पण अवहेलना करू नये तुलना म्हणजे कोणाची अवहेलना ठरू नये अवहेलना केल्याने व्यक्ती एकदम खचतो अवहेलनात्मक शब्द त्याला सारखा बोचतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.* *खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼ ★●•• 🔰🔰🌺🌺🔰🔰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वप्न पहायला परिश्रम,वेळ आणि पैसा कधीच लागत नाही परंतु पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी वेळ, परिश्रम आणि पैसा हा लागतोच तेव्हा कुठे स्वप्न पूर्ण होतात.केवळ स्वप्नांना कल्पनेत न ठेवता ती प्रत्यक्षात उतरावयाची असतील तर हे तुम्हाला करावेच लागेल.अन्यथा स्वप्न स्वप्नच राहतील. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये* - एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हरिण व कोल्हा* एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.' तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.' 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment