✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/08/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- 💥 जन्म :- १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार. १९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक. 💥 मृत्यू :- १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तिरुअनंतपुरम : केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने आज गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे, 400 हुन अधिक व्यक्ती मृत्युमुखी* --------------------------------------------------- 2⃣ *अमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.* --------------------------------------------------- 3⃣ *गडचिरोलीत पावसाचे थैमान, भामरागडसह अनेक गावे जलमय* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबईच्या तीन प्रवेशद्वारांवर एक महिना टोल नाही; छोट्या गाड्यांना मोठा दिलासा* --------------------------------------------------- 5⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड च्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचे दमदार शतक* --------------------------------------------------- 6⃣ *Asian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय* --------------------------------------------------- 7⃣ *जकार्ता - भारताच्या विनेश फोगाटने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनीगटात घातली सुवर्णपदकाला गवसणी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हम सब एक है* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/15.html वरील निळ्या अक्षरावर क्लिक करून आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *परळी वैजनाथ* परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतात पहिलं पोस्ट ऑफिस कुठे सुरू झालं ?* कलकत्ता *२) फुजियामा पर्वत कोणत्या देशात आहे ?* जपान *३) 'कुली' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण ?* मुल्कराज आनंद मुल्कराज आनंद *४) सौर वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते ?* चैत्र *५) उत्तर आणि दक्षिण भारताच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेला पर्वत कोणता ?* विंध्य पर्वत *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * भूषण परळकर, नांदेड * विश्वास बदापूरकर, येताळा * साईनाथ राचेवाड, बिलोली * दत्ता नरवाडे, बिलोली * पुरुषोत्तम चंद्रात्रे * गोपाळ पवार * संतोष गुम्मलवार, नांदेड * भीमाशंकर जुजगार, धर्माबाद * साईनाथ हवालदार, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* का-हाळ कालून काही बाजूला उभे रहातात काय होईल याची ते लांबून मजा पहातात लांबून मजा पहायला काहींना असते आवड कामापेक्षा रिकाम्या कामला जास्त मिळते सवड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= आजपासून विचारधन ऐवजी कबीराचे बोल हे नवीन सदर सुरू करीत आहोत. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे. *क्रमांक 01* *आवत गारी एक है* *उलटन होय अनेक ।* *कह कबीर नहिं उलटिये* *वही एक की एक ॥* अर्थ : जशास तसे म्हणून जर शिवीला शिवी देत राहिलात तर शिव्यांची लाखोलीच तयार होईल. तुमची शक्तीही निरर्थक वाया जाईल. कोणी जर शिवी दिली आणि त्याला परत शिवी नाही दिली तर शिव्यांची संख्या न वाढता ती देणाराही एकाकी पडतो. शिवी न स्वीकारल्यामुळे ती देणार्याच्याच पदरी राहाते. तो खजिल होतो. पुढचा संघर्षही टळतो. म्हणून मुर्खांच्या तोंडास तोंड न देणे हे कधीही सुज्ञपणाचे लक्षण समजावे, असेच कबिरांचे म्हणणे आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही जणांचे पाय जमिनीवर असले तरी ते कल्पनेच्या जोरावर आकाशातले तारे मोजण्यातच वेळ घालतात तरी त्यांचे तारे मोजणे होत नाहीत कारण जे अशक्य आहे ते कधी प्रत्यक्ष जीवनात साध्य होत नाही.मग विनाकारण वेळ वाया घालवून जीवन व्यर्थच घालवतात.अशांच्या पदरी घोर निराशाच पडते. तर काही लोक जमिनीवर राहूनच आपली पावले कुठपर्यंत जात आहेत याचा वेध घेतात.मग आपल्याला कशी आणि किती प्रगती करायची याचे नियोजन करतात.जे शक्य आहे ते आपल्या हातात आहे हे त्यांना माहीत असते.अशी विचार करणारीच माणसे जीवनात यशस्वी होतात.जे शक्य आहे ते आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करता येते कल्पनेने नाही हे त्यांना माहीत असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विचित्र - odd* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशाचे गणित* आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न? 'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली. 'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली. 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. 'खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment