✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/08/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४४ - ज्यूंचे शिरकाण - गेस्टापोने ऍन फ्रँक व तिच्या कुटुंबास अटक केली. १९४७ - जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. १९८३ - थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी. १९८४ - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले. १९९३ - टॅक्सीचालक रॉडनी किंगच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल लॉस एंजेल्सच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना ३० महिन्याची कैद. २००६ - आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी. 💥 जन्म :- १९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक. १९३१ - नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी. 💥 मृत्यू :- १५७८ - सेबास्टियाव पहिला, पोर्तुगालचा राजा. १९१९ - डेव्हिड ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९६७ - पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मराठा आरक्षणाची सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला घेण्याचा हायकोर्टाचा निर्णय, राज्यातील तीव्र आंदोलन, आत्महत्यांची हायकोर्टाकडून दखल.* --------------------------------------------------- 2⃣ *गडचिरोली - 2 महिलांसह एकूण 5 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचे यश* --------------------------------------------------- 3⃣ *भंडारा : येथील जवाहर नवोदय विद्यालय अल्पसंख्याक वसतिगृहाच्या स्थानांतरणास अल्पसंख्यांक विभागाची मान्यता.* --------------------------------------------------- 4⃣ *यवतमाळ : बोगस बिटी-३ बियाणे निर्माण करणाऱ्या कंपनी मालकाला यवतमाळ पोलिसांनी गुजरातमधून केली अटक.* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन, यवतमाळ जि.प. समोर धरणे, मागणीचे निवेदन सादर* --------------------------------------------------- 6⃣ *भारताच्या सायना नेहवालचं जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात* --------------------------------------------------- 7⃣ *इंग्लंडला दुस-या डावात भारताचा गोलंदाज इशांत शर्मा याने एकामागोमाग धक्के दिले, भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा सातव्या स्थानावर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन बाबत प्रतिक्रिया* येत्या 15 ऑगस्ट रोजी फ्रेश मॉर्निंग बुलेटीन ही सेवा तीन वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने या टीमविषयी आपले मत आम्हांला या गुगल फॉर्म द्वारे कळवावे. यापुढे अजून चांगली सेवा देण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न राहील. https://goo.gl/forms/pu7luhvU7SovaB673 तेंव्हा आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चांगल्या प्रतिक्रियेला प्रसिद्धी देण्यात येईल याची नोंद घ्यावी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= अनंत लक्ष्मण कान्हेरे अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. तो इ.स. १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचा सदस्य होता. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारा अनंत कान्हेरे हा खुदीराम बोस याच्या नंतरचा सर्वांत तरूण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंताने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे असे समवयस्क साथीदारांची जोड मिळाली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= 01) इटलीची राजधानी कोणती ? रोम 02) लिट्ल मास्टर या नावाने कोणाला ओळखले जाते ? सुनील गावसकर 03) चॉकलेटमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर होतो ? कोको *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रभू रेब्बावार 👤 व्यंकटेश अमृतवार 👤 प्रतिभा येवतीकर 👤 अहेमद शेख 👤 आनंदराव आवरे 👤 अमित सूर्यवंशी 👤 विठ्ठल पवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वप्न* ऐन मोसमातच पावसाची दडी आहे लहरी पावसाची ही त-हा हर घडी आहे दडी मारल्याने सारे हवाल दिल होतात पाहिलेले स्वप्न सारे हवेत विरून जातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●🔸‼ *विचार धन* ‼🔸●•••• *तीन वर्षांपूर्वी ह्रदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. किडनी निकामी झालेला युसूफ अन्वर नावाचा एक तरूण मृत्यूच्या दारात होता. डायलिसीसवर त्याचा श्वास सुरू होता. दुसरी किडनी घ्यायची तर परिवारात रक्त जुळेना. जितेंद्रसिंग बिट्टा नावाचा दुसरा एक तरूण तिथं आला. त्याचीही किडनी गेलेली आणि कुटुंबात रक्त जुळत नव्हतं. एक दिवस अन्वर-जितेंद्रसिंग ओळख-भेट झाली. समदु:खी म्हणून घनिष्ठता वाढली. परस्परांना हात देण्याचा निर्धार झाला. योग असा की युसूफला जितेंद्रच्या पत्नीची व जितेंद्रला युसूफच्या मामाची किडनी जुळली. दोन्ही परिवारांच्या डोळ्यात कृतज्ञता दाटून आली !* *माणसा-माणसांत भेद करणारे सारे पूल ढासळले आणि दोघांनाही जीवदान मिळालं. आपल्याच राखेतून उडणा-या फिनिक्स पक्षाप्रमाणे जगण्याची नवी उमेद मिळाली. हिंदू मुसलमान भाई-भाई झाले. शरीराला कुठं धर्म ठाऊक असतो ! रक्तालाही कुठला धर्म नसतो. रक्त धर्मावरून नव्हे, रक्तगटावरून जुळते. पण माणसा-माणसांत भिंती उभ्या केल्यात व्यवस्थेनं. या भिंती दगड-विटांच्या नाहीत. त्या धर्म-पंथ-संप्रदायाच्या आहेत. जाती-धर्मावरून तलवारी निघतात. अशा क्षुद्र, निरर्थक गोष्टींसाठी माणसानं आपसात लढायचं का ?* *"धर्म, जाती, पंथ झाले खूप आता* *कोणता झेंडा धरू माणूस व्हाया ?* *रक्त असते लाल सा-यांचे गडेहो..* *लोक का लढतात द्वेषाच्या लढाया ?"* ••●🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• ♦♦♦♦♦♦♦♦♦ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात. असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत. अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी. काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे. अशा ठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे. ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो. या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत, हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधान - Solution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= सकारात्मक पाऊल एक प्राचीन चिनी कथा आहे. डोंगराळ भागात राहणारा एक माणूस आपल्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील एका तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे अनेक वर्षांपासून ठरवत असतो. अंतर खूप असल्याने साधारण रात्री 2 वाजेदरम्यान काळोखातच दर्शनासाठी चालत जावे लागत असे.काही झाले तरी त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायचीच,असा ठाम निश्चय मनाशी करत तो गावकर्यांना व त्या तीर्थक्षेत्राला भेट देणार्या भाविकांना मार्ग व सोबत लागणार्या सामानाविषयीची माहिती विचारतो.गावकरी त्याला आवश्यक सामानाची यादी देतात.सोबत कंदील घेऊन जा,असा सल्लाही देतात.मनाशी निश्चय केल्याप्रमाणे तो रात्री 2 वाजता तीर्थक्षेत्राकडे निघतो.अंधार असतो. कंदिलाच्या प्रकाशात त्याला केवळ दहा पावलांच्या अंतरावरील रस्ताच दिसत असतो.तो मनाशी विचार करतो 20 किलोमीटरचा रस्ता आणि अशा अंधारात कंदिलाच्या मंद प्रकाशात केवळ काही अंतरावरचेच दिसतेय.त्याची पावले जागीच थबकतात.त्याच्या मागोमाग एक साधु महाराज त्याला येताना दिसतात.तो साधुला थांबवतो.म्हणतो,तुमच्याकडे तर माझ्या कंदिलापेक्षाही मंद प्रकाश देणारा कंदील आहे.रस्ता धोकादायक आहे.तुम्ही जाऊ नका?साधु हसतो.त्याला म्हणतो,‘अरे एकदाच दहा पावले कुणाला टाकायचीत?एक पाऊल चालण्याइतका प्रकाश खूप झाला. एक एक पाऊल टाकत हजारो मैल दूरचा टप्पा आपण सहज गाठू शकतो.तो साधु महाराजांनाच गणिताचा तर्क सांगतो.मी तर्कनिष्ठ आहे.मी श्रद्धाळू नाही.मी गणितज्ज्ञ आहे.मला समजावण्याचा तुमचा प्रयत्न निष्फळ आहे.असे सांगत तो पुन्हा त्या मार्गावर न जाण्याची विनंती साधुला करतो.साधू त्याला म्हणतो,बाळा एक पाऊल,अर्थात पहिले पाऊल महत्त्वाचे आहे.पहिले सकारात्मक पाऊल कित्येक किलोमीटरचा तुमचा कठीण प्रवासही सुकर करतो,तर पहिल्याच पावलाला तुमचा विश्वास डगमगल्यास प्रवास कितीही छोटा असू दे,तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहचूच शकत नाहीत. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment